शतशब्दकथा स्पर्धा: अंतिम निकाल

आदूबाळ's picture
आदूबाळ in जनातलं, मनातलं
6 Sep 2015 - 8:04 pm

मिपाला स्पर्धा आयोजनाचा मोठा इतिहास आहे. कथास्पर्धा, छायाचित्र स्पर्धा आदि स्पर्धा मिपाने वेळोवेळी आयोजित केलेल्या, करत असलेल्या स्पर्धांना भरभरून प्रतिसाद मिळतो आहे.

शतशब्दकथा स्पर्धेलाही अविस्मरणीय प्रतिसाद मिळाला. स्पर्धेसाठी आलेल्या तब्बल ८३ शतशब्दकथांमधून सहा कथा अंतिम फेरीसाठी निवडल्या गेल्या.

अंतिम फेरीसाठी स्पर्धक लेखकांनी आपल्या शतशब्दकथेचा सीक्वल लिहायचा होता. सहापैकी पाच स्पर्धकांनी सीक्वल लिहिले. वाचकांच्या मतांना आणि परीक्षकांच्या निवडीला समान महत्त्व देऊन अंतिम फेरीचा निकाल जाहीर करत आहोत.

तर अंतिम निकाल आहे:

प्रथम क्रमांकः मृत्युन्जय (कथा: लोकमान्य)
द्वितीय क्रमांकः चांदणे संदीप (कथा: येक रुपाया)
तृतीय क्रमांकः मधुरा देशपांडे (कथा: निकाल)

विजेत्यांचं हार्दिक अभिनंदन!

विजेत्या स्पर्धकांना मिपातर्फे पारितोषिकस्वरूपात पुस्तकं आणि मानपत्र देण्यात येईल.

प्रा. डॉ. दिलीप बिरुटे, खेडूत आणि वेल्लाभट यांनी या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून काम पाहिलं.

गेला महिनाभर अनेक उत्तमोत्तम शतशब्दकथा वाचायला मिळाल्या. एक वेळ अशी होती की मुख्य बोर्डाच्या पहिल्या पानावर फक्त शतशब्दकथाच दिसत होत्या. आज या निकालाबरोबर ही स्पर्धा संपते आहे, पण गेला महिनाभर मिळालेल्या साहित्य मेजवानीच्या आठवणी बरेच दिवस टिकून राहतील. सर्व स्पर्धकांचे, वाचक-मतदात्यांचे, संमं+सासंमं सदस्यांचे आणि मुख्यतः परीक्षकांचे आभार मानणं औपचारिक आणि कृत्रिम वाटेल, पण मनात असणारी कृतज्ञता व्यक्त करून इथे थांबतो.

कथाशुभेच्छाअभिनंदन

प्रतिक्रिया

एस's picture

6 Sep 2015 - 8:09 pm | एस

अभिनंदन!

अजया's picture

6 Sep 2015 - 8:10 pm | अजया

विजेत्यांचे अभिनंदन. आयोजकांचे कौतुक आणि परीक्षकांचे आभार!

पद्मावति's picture

6 Sep 2015 - 8:19 pm | पद्मावति

विजेत्यांचे अभिनंदन. आयोजकांचे कौतुक आणि परीक्षकांचे आभार!

..हेच म्हणायचे आहे.

मी-सौरभ's picture

7 Sep 2015 - 1:31 pm | मी-सौरभ

अभिनंदन

प्राची अश्विनी's picture

7 Sep 2015 - 2:40 pm | प्राची अश्विनी

+१११

मांत्रिक's picture

6 Sep 2015 - 8:13 pm | मांत्रिक

विजेत्यांचे अभिनंदन!!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Sep 2015 - 8:18 pm | डॉ सुहास म्हात्रे

सर्व विजेत्यांचे हार्दीक अभिनंदन !

आजपर्यंतच्या मिपा इतिहासात सर्वात जास्त गाजलेली स्पर्धा !

तसेच इतर सर्व स्पर्धकांचे उत्तमोत्तम कथांची पर्वणी दिल्याबद्दल आभार.

द-बाहुबली's picture

6 Sep 2015 - 8:34 pm | द-बाहुबली

अतिशय गुड बातमी. काँग्रॅट्स.

या स्पर्धेच्या परीक्षकांचे खास अभिनंदन. इतक्या अप्रतिम
कथांमधून तीन कथा निवडणे आणि त्यांचे क्रमांक ठरवणे हे खूपच कठीण काम होतं पण ते त्यांनी व्यवस्थितरीत्या निभावून नेलं.

बहुगुणी's picture

6 Sep 2015 - 8:42 pm | बहुगुणी

सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन! आणि परीक्षकांचे आणि एका अनोख्या स्पर्धेचा नवीन पायंडा पाडून तो यशस्वी करणार्‍या सार्‍यांचे आभार!

विजेत्यांचे अभिनंदन आणी मान्यवरांचे आभार.

नाखु's picture

7 Sep 2015 - 8:42 am | नाखु

शत्पावली वाला नाखु

अभ्या..'s picture

6 Sep 2015 - 8:58 pm | अभ्या..

अभिनंदन.

पिलीयन रायडर's picture

6 Sep 2015 - 9:08 pm | पिलीयन रायडर

अभिनंदन!!

चांदणे संदीप's picture

6 Sep 2015 - 9:11 pm | चांदणे संदीप

काय सांगू....कस सांगू...
फारच भारावून गेलो आहे!

सध्या फक्त ___/\____

प्यारे१'s picture

6 Sep 2015 - 9:11 pm | प्यारे१

हार्दिक अभिनंदन!

अत्रुप्त आत्मा's picture

6 Sep 2015 - 9:46 pm | अत्रुप्त आत्मा

दण्णकून अभिनंदण्ण! http://www.sherv.net/cm/emoticons/hand-gestures/hand-clapping-smiley-emoticon.gif

नाव आडनाव's picture

6 Sep 2015 - 10:05 pm | नाव आडनाव

अभिनंदन.

एक एकटा एकटाच's picture

6 Sep 2015 - 11:06 pm | एक एकटा एकटाच

अभिनंदन

ह्या कथांची लिंक देता येईल का?

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Sep 2015 - 12:20 pm | डॉ सुहास म्हात्रे

दोन्ही कथांचे दुवे, याच लेखात त्यांच्या नावांखाली देता आले तर वाचकांना कथा परत वाचून त्यांचा आनंद घेणे शक्य होईल.

सासंमंला या उपयोगी कृतीकरता विनंती आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Sep 2015 - 12:25 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कथेच्या शीर्षकात दुवे दिले.

-दिलीप बिरुटे

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Sep 2015 - 12:51 pm | डॉ सुहास म्हात्रे

फॅन्तॅखतख !

सगळ्या विजेत्यांचे अभिनंदन

सर्व विजेत्यांचे अभिनंदन.

संजय पाटिल's picture

7 Sep 2015 - 6:33 am | संजय पाटिल

आभिनंदन!!!

अनामिक२४१०'s picture

7 Sep 2015 - 9:19 am | अनामिक२४१०

अभिनन्दन....!!!

विजेत्यांचे खुप खुप अभिनंदन!!

मृत्युन्जय's picture

7 Sep 2015 - 9:55 am | मृत्युन्जय

सगळ्या विजेत्यांचे अभिनंदन.

सर्ब वाचक प्रतिसादकांना अनेक धन्यवाद. शशक लिहिण्याचा माझा हा पहिलाच प्रयत्न होता. बरा जमला असे आत्ता तरी वाटते आहे.

आयोजक, संपादक आणि परिक्षकांचे अनेक आभार. त्यांनी अतिशय मेहनते घेउन ही स्पर्धा यशस्वी केली. मराठी आंजावर पहिल्यांदाच असा काही उपक्रम हाती घेतला गेला. त्याबद्दल नीलकांत आणि टींमचे अभिनंदन आणि शुभेच्छा.

प्रीत-मोहर's picture

7 Sep 2015 - 10:13 am | प्रीत-मोहर

अभिनंदन

नीलमोहर's picture

7 Sep 2015 - 10:46 am | नीलमोहर

विजेत्यांचे अभिनंदन, मान्यवरांचे आभार.

गोगट्यांचा समीर's picture

7 Sep 2015 - 10:47 am | गोगट्यांचा समीर

विजेत्यांचे खुप खुप अभिनंदन!!

बबन ताम्बे's picture

7 Sep 2015 - 11:31 am | बबन ताम्बे

विजेत्या कथा आणि इतरही अनेक कथा छानच होत्या.
आयोजकांचेही आभार. खूप छान स्पर्धा होती.

मित्रहो's picture

7 Sep 2015 - 12:10 pm | मित्रहो

सर्व विजेत्यांचे आणि सहभागी सदस्यांचे अभिनंदन

राजाभाउ's picture

7 Sep 2015 - 12:12 pm | राजाभाउ

सर्व विजेत्यांचे सर्व विजेत्यांचे

राजाभाउ's picture

7 Sep 2015 - 12:13 pm | राजाभाउ

सर्व विजेत्यांचे अभिनदन

कविता१९७८'s picture

7 Sep 2015 - 12:31 pm | कविता१९७८

सर्वांचे अभिनंदन

अनिता ठाकूर's picture

7 Sep 2015 - 12:43 pm | अनिता ठाकूर

सर्व संबंधितांचे मनापासून अभिनंदन.

मृत्युन्जय आणि मधुरा देशपांडे यांचे अभिनंदन!

या स्पर्धेच्या निमित्ताने आणि विजेत्यांपैकी एक म्हणून सांगायचं झाल तर, कमी शब्दांत खूप मोठा अर्थ व्यक्त करणे तेही साध्या-सोप्या भाषेत, सर्वसामान्य वाचकांना कळेल आणि रुचेल अस लिहावं यासाठी फार वर्षांपासून माझे प्रयत्न सुरू आहेत. कवितेत मी ब-यापैकी यशस्वी झालो पण कथेच्या बाबतीत अशा परिमाणाचा विचार कधीच नव्हता केला.

वाचनाची आवड मला आंतरजालावरही फिरवत राहिली आणि साधारण वर्षभरापूर्वी मिपावर मी वाचनमात्र स्थिर झालो. याचदरम्यान कुठेतरी आतीवासताईंची "आन्जी" मला इथे भेटली आणि ह्या लेखनप्रकाराशी (शतशब्द्कथा) ओळख झाली आणि हा लेखनप्रकार मला अतिशय भावला! (आन्जीही मला खूप आवडते!)

मी आतीवासताईंना यानिमित्ताने धन्यवाद देतो की त्यांच्या लेखनातून प्रेरणा घेऊन ही कथा मी लिहिली आणि मिपावर 'श्रीगणेशा' केला!

सर्व स्पर्धकांचे आभार ज्यांनी ही या स्पर्धेला छान आकार दिला. सर्व परीक्षकांचे शतश: आभार! सर्व वाचकांचे आणि प्रतीसादाकांचे आभार ज्यांनी आपले प्रेम माझ्या झोळीत टाकले!

आशा आहे आत्मचरित्राएवढा मोठा प्रतिसाद झाला नसावा! चूभूद्याघ्या!

यमन's picture

7 Sep 2015 - 1:14 pm | यमन

अभिनंदन सर्व विजेत्यांचे.

या निमित्ताने शशक विषेशांक काढुयात का? एक वेगळा प्रयोग म्हणून ?

चिगो's picture

7 Sep 2015 - 4:21 pm | चिगो

सर्व विजेत्यांचे दणकून अभिनंदन.. परिक्षक आणि आयोजकांचे आभार..

हेमंत लाटकर's picture

7 Sep 2015 - 6:45 pm | हेमंत लाटकर

सर्व विजेत्यांचे मनपुर्वक अभिनंदन

नया है वह's picture

7 Sep 2015 - 6:48 pm | नया है वह

स्पर्धाही छान होती

मधुरा देशपांडे's picture

8 Sep 2015 - 8:12 am | मधुरा देशपांडे

स्पर्धा आयोजक, परीक्षक, वाचक आणि प्रतिसादक सर्वांचे खूप आभार!! शशक लिहिण्याचा हा पहिलाच प्रयत्न होता. या अनोख्या साहित्य प्रकाराची ओळख करुन दिल्याबद्दल आतिवास ताई यांना धन्यवाद. नेमक्या १०० शब्दात सगळे बसवताना जी कसरत करावी लागली त्याने मजा आली लिहिताना. सिक्वे ल मुळे त्यात अजुन भर पडली. पुन्हा एकदा धन्यवाद.

समीरसूर's picture

8 Sep 2015 - 11:37 am | समीरसूर

सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन! आणि आयोजकांचेदेखील अभिनंदन! या स्पर्धेमुळे काही दिवस मिपावर एक आगळे चैतन्य बघायला मिळाले हे खरे!

अतिवास यांचे खास आभार! त्यांच्यामुळे हा नवीन आणि कठीण साहित्यप्रकार सगळ्यांना अनुभवता आला.

स्पर्धा छान पार पडली.

सर्व विजेत्यांचे अभिनंदन.