वाट...(शतशब्दकथा)

योगी९००'s picture
योगी९०० in जनातलं, मनातलं
6 Jul 2015 - 7:46 pm

काहीही झाले तरी मी आज तिच्याकडे जाणार होतो. बराच काळ वाट पाहिली होती...

लहानपणापासून तिच्या वाड्यावरून जाताना खिडकीत बसलेली दिसायची. पाहून हसायची, रुसायची, नजरेनेच बोलवायची, पण कोणीच मला तिच्याकडे जाऊ दिले नाही. दोन-चार वेळा चोरून तिच्या वाड्यात शिरलो होतो. रखवालदाराने हाकलले,मारले पण ती मात्र कधीच मदतीला आली नाही.

मध्यंतरी बराच काळ गेला पण ती मात्र तशीच खिडकीत कायम बसलेली दिसायची.

धावतच तिच्या वाड्यावर गेलो. कोणीच अडवू शकणार नव्हते मला... झरकन तिच्या खोलीत शिरलो...

ती माझीच वाट पहात होती...मला हसून म्हणाली

"तुच मरायची वाट पहात होते. गेली पाचशे वर्ष माझी जागा कोण घेणार ह्याच्याच शोधात होते मी. आज मुक्त झाले मी....."

मांडणीप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Jul 2015 - 7:50 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

:/

-दिलीप बिरुटे

एक एकटा एकटाच's picture

6 Jul 2015 - 8:13 pm | एक एकटा एकटाच

जबरदस्त

एस's picture

6 Jul 2015 - 10:28 pm | एस

अरे बाप रे!

अर्धवटराव's picture

6 Jul 2015 - 10:52 pm | अर्धवटराव

:(

श्रीरंग_जोशी's picture

7 Jul 2015 - 1:10 am | श्रीरंग_जोशी

खासंच!!

रातराणी's picture

7 Jul 2015 - 1:22 am | रातराणी

भन्नाट!

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Jul 2015 - 1:28 am | डॉ सुहास म्हात्रे

मस्तं !!

अरवीन्द नरहर जोशि.'s picture

7 Jul 2015 - 5:09 am | अरवीन्द नरहर जोशि.

फारच भन्नाट आहे .

नाखु's picture

7 Jul 2015 - 8:47 am | नाखु

भन्नाट आणि अचाटही.

ज्ञानोबाचे पैजार's picture

7 Jul 2015 - 9:17 am | ज्ञानोबाचे पैजार

आता बसा अजून पाचशे वर्ष वाट पहात, दुसर्‍या गिर्‍हाईकाची,
पैजारबुवा,

क्रेझी's picture

7 Jul 2015 - 10:42 am | क्रेझी

;) +१

क्रेझी's picture

7 Jul 2015 - 10:42 am | क्रेझी

:( कै च्या कै!!

खेडूत's picture

7 Jul 2015 - 11:59 am | खेडूत

''लेकिन'' चित्रपट आठवला - त्यातलं गाणं : '' मैं एक सदी से बैठी हुं '' आठवलं .

एक शंका : पाचशे वर्षांत एकही लायक व्यक्ती त्या पदावर मिळू नये?

योगी९००'s picture

13 Jul 2015 - 9:51 am | योगी९००

पाचशे वर्षांत एकही लायक व्यक्ती त्या पदावर मिळू नये?
दुसर्‍या कोणाला ती दिसली नाही हो...मलाच दिसली फक्त...!!

बाकी वाट बघतो आहे तुमची वाड्यावर... एखादी बाई दिसली की म्हणतो "बाईSSSS!! वाड्यावर या". पण कोणालाच ऐकू जात नाही माझी हाक..!!

एखादी बाई दिसली की म्हणतो "बाईSSSS!! वाड्यावर या".

एकदम निळू फुलेच आठवले. असले ड्वायलाक त्यांनीच म्हणू जाणे!

"नजरेनेचबोलवायची" अंगावर काटा आला.

धावतच तिच्या वाड्यावर गेलो. कोणीच अडवू शकणार नव्हते मला... झरकन तिच्या खोलीत शिरलो...

धावतच या शब्दाच्या अगोदर आज मात्र असे शब्द पाहिजे होते, असे मला वाटते. म्हणजे कथेचा प्रवाहीपणा कायम राहिला असता.

योगी९००'s picture

16 Jul 2015 - 10:37 am | योगी९००

तुमचे बरोबर आहे..आज मात्र मुळे अजून चांगला प्रवाहीपणा आला असता पण दोन शब्द दुसरीकडून काढावे लागले असते...

मदनबाण's picture

14 Jul 2015 - 12:03 pm | मदनबाण

छान...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- जायकवाडी आटलं, पाणीसाठा अवघ्या 0.34 टक्क्यांवर

अभिजीत अवलिया's picture

14 Jul 2015 - 4:02 pm | अभिजीत अवलिया

उत्तम.

बापरे,आता पाचशे वर्षात सुटलात तरी बरं!

स्नेहल महेश's picture

16 Jul 2015 - 12:34 pm | स्नेहल महेश

बापरे भन्नाट आहे

इशा१२३'s picture

16 Jul 2015 - 12:41 pm | इशा१२३

भन्नाट...

पद्मावति's picture

16 Jul 2015 - 12:55 pm | पद्मावति

जबरदस्त ट्विस्ट ....आवडली कथा.

मी-सौरभ's picture

16 Jul 2015 - 1:08 pm | मी-सौरभ

:)