मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

क्रिकेटमधील स्लेजिंगचे किस्से

स्पार्टाकस · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
क्रिकेटच्या खेळाच अविभाज्य भाग म्हणजे स्लेजिंग! एकाग्रपणे खेळत असलेल्या बॅट्समनचं चित्तं विचलीत करण्यासाठी आणि एकग्रता भंग पावून आणि एखादा भलताच चुकीचा शॉट मारून तो बाद व्हावा म्हणून अनेकदा शेरेबाजी केली जाते. बहुतेक वेळा ही शेरेबाजी वैयक्तीक असते आणि एकमेकांचं गुणवर्णन करणार्‍या - विशेषतः 'फ'काराने सुरु होणार्‍या - खास शब्दांनी सजलेली असते हे वेगळे सांगणे न लगे! स्लेजिंगची ही कला रुजवली आणि मोठ्या प्रमाणात वापरण्यास सुरवात केली ती ऑस्ट्रेलियन कॅप्टन इयन चॅपल आणि त्याच्या सहकार्‍यांनी! चॅपलच्या संघातील स्वतः चॅपल, त्याचा धाकटा भाऊ ग्रेग चॅपल, डेनिस लिली, रॉडनी मार्श आणि अ‍ॅश्ली मॅलेट हे या कलेत माहीर असलेले खेळाडू! चॅपलच्या या स्लेजिंगच्या कलेलाच पुढे स्टीव्ह वॉने मेंटल डिसइंटीग्रेशन हे नाव दिलं. ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी यात विशेष प्राविण्य मिळवलेलं आहे! पर स्लेजिंगच्या वेगवेगळ्या किश्श्यांसाठी हा धागा - (असा धागा आधी निघाला असल्यास कल्पना नाही. निघाला असल्यास त्याची लिंक द्यावी. हा धाग रद्द करण्याची मी संपादकांना विनंती करेन). ************************************************************************************

वाचन 10146 प्रतिक्रिया 0