हरलेला माणूस ?????????

नितिन शेंडगे's picture
नितिन शेंडगे in राजकारण
16 Apr 2015 - 7:48 pm

मराठी सिनेमाना प्राईम टाईम दिला गेला आणि समस्त मंडळीना मिरच्या झोंबल्या. आता हि मंडळी कोण तर ज्यांच्या मुळे मल्टीप्लेक्स चालतात असे सगळे म्हणतात.
का तर ते १०० करोड चे सिनेमे देतात, आता हे १०० करोड कसे होतात तर तिकीट दर वाढवले कि झाले. पण जे लोक खरच मनापासून सिनेमा वर प्रेम करतात त्यांनी मात्र ह्या मध्ये लक्ष दिले नाही. त्यांना हि माहित आहे कि मराठी सिनेमा आता बदलला आहे, जर २ ते ३ करोड मध्ये बनणारा सिनेमा ३० ते ४० करोड कमवत असेल तर तो तथाकथित हिंदी सिनेमा वाल्यांच्या पोटात गोळा आणणारा आहे .

आणि आपल्या कडे नियम केले कि रडत राहणारे दक्षिण भारतात का रडत नाहीत ??????

महेश भट्ट (अतिशय पकाव) का रडत बसला नाही जेव्हा दक्षिण भारतात त्याच्या सिनेमाला चित्रपट गृह मिळाले नाही. जर कायदा असेल तर मग कुठेही जा प्रादेशिक भाषेला नेहमी प्राथमिक दर्जा हवाच.

जेव्हा महाराष्ट्रात असे म्हटले जाते तेव्हा देश तोडायला चाललेली पार्टी म्हणून मनसेची बदनामी केली गेली. पण जेव्हा हीच गोष्ट दिल्ली किंवा चेन्नई किंवा इतर प्रांतात होते तेव्हा कुठे जातात हे लोक ????????

आता मराठी सिनेमा चा मुद्दा आला आहे , क्रांती रेडकर दिग्दर्शित "काकण" या सिनेमाला प्राईम टाईम देण्यास मल्टीप्लेक्स वाले विरोध करत आहेत.
अश्या वेळी त्यांनी महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री यांच्या कडे जायला पाहिजे होते, पण

त्यांनी राज ठाकरे यांच्या कडे गाऱ्हाणे मांडलेय .

ना ते सत्तेत आहेत ना त्यांच्या कडे कोणतेही पद आहे मग का ??

मराठी लोकांच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना सत्तेत आहेच कि मग ह्या हरलेल्या माणसाकडे का ????

जर समस्त महाराष्ट्राला वाटतेय ना कि राज ठाकरे काहीच करू शकत नाही मग त्यांच्या कडे जाण्यास काय कारण ??

मोदींनी अदानी ग्रुप सोबत काही मीटिंग केल्या कि ते देशाचे भवितव्य पाहत आहेत , हेच जर नाशिक मध्ये राज साहेबांनी केले तर काहीतरी झोल आहे, बरोबर ना ?? मी तुलना करत नाहीये, जर दोघांची पण पद बाजूला केली तर जे दोघांनी केल ते एक सारखच कि.

तरी पण हरलेल्या माणसाच्या मागे मेडिया वाले तर हात धुवून लागले आहेत, मागे आरे कॉलोनी च्या वेळेस हि तेच.

ज्या वेळेस मुंबई चा development प्लान आला त्या वेळेस नाक मुरडणारी लोकं, राज साहेबांच्या मीटिंग ला हजर.

इतके काय आहे तेच कळत नाहीये त्या हरलेल्या माणसात ………………

मला तुमच्या सगळ्यांकडून उत्तर अपेक्षित आहे !!!!

प्रतिक्रिया

जेपी's picture

16 Apr 2015 - 7:56 pm | जेपी

¿

होबासराव's picture

16 Apr 2015 - 8:16 pm | होबासराव

कोल्हे तै कविता रचतायत... हरलेल्या राजाचे महत्व

नितिन शेंडगे's picture

16 Apr 2015 - 8:40 pm | नितिन शेंडगे

मला उत्तर अपेक्षित आहे दादा !!

तसच या इंजीनाचं आहे.

मग जी घड्याळ चालू आहेत लोक त्यामध्ये का वेळ पाहत नाहीत ?????

पिलीयन रायडर's picture

17 Apr 2015 - 1:49 pm | पिलीयन रायडर

लोक वेडे हायेत..

कानडाऊ योगेशु's picture

6 Jan 2017 - 2:06 pm | कानडाऊ योगेशु

लोक चालु हायेत.

अर्धवटराव's picture

17 Apr 2015 - 9:35 pm | अर्धवटराव

पण बंद घड्याळाचा देखील काहि वापर करता येतोच कि.

भिंगरी's picture

17 Apr 2015 - 7:34 pm | भिंगरी

विषय एकदम खळ्ळ्ळ्ळ्ळ्ळ खट्याक आहे.

छान. वीकांताला करून पाहीन.

चलत मुसाफिर's picture

18 Apr 2015 - 9:36 am | चलत मुसाफिर

1. मराठी चित्रपटासाठी अमुक वेळ दिला जावा असा कायदा असेल तर तो सरकारने आपसूक, निरपवाद लागू करावा. त्यासाठी खळ्ळखट्याकची गरज भासू नये. (असा कायदा योग्य की अयोग्य हा सर्वस्वी वेगळा भाग झाला.)

2. जर असा कायदा नसेल, तर थेटरवाल्यांना मराठी सिनेमे लावताना अगर न लावताना कुणाच्या बापाला डरण्याची गरज नसावी.

3. मूळ मुद्दा कायदा पाळण्याचा आहे. थेटरवाले तो पाळत नाहीत, सरकार काही करत नाही, म्हणून विशिष्ट सरकारबाह्य संघटनांना महाराष्ट्राचे तारणहार समजून शरण जाणे, यात मुळातच घोळ आहे.

चलत मुसाफिर's picture

18 Apr 2015 - 9:45 am | चलत मुसाफिर

काकणबिकण ठीक आहे, पण हा प्राईमटाईम 'अरे सोडा बाटली बाई', 'झक मारली बायको केली', 'नाना मामा', 'माहेरचे पायपुसणे' यांनाही लागू होईल.

मराठीभक्त खळ्ळखट्याकवाले सदर प्रकारचे चित्रपट तिकीट काढून बघतील अशी आशा बाळगतो.

संदीप डांगे's picture

18 Apr 2015 - 12:46 pm | संदीप डांगे

जर चांदणीचौक टू चायना, रा.वन, चेन्नई एक्सप्रेस, तिसमारखान, जोकर, रेडी, बँगबँग इत्यादी प्राइमटाईममधे लागु शकतात आणि त्याबद्दल काही प्रॉब्लेम नसेल तर नाना-मामा बद्दल तरी का असावा?

सदरचे चित्रपट कोण पदरचे पैसे खर्च करून पाहायला जातं हे जगजाहीर आहे.

सिरुसेरि's picture

18 Apr 2015 - 6:58 pm | सिरुसेरि

मल्टिप्लेक्सचे अतिमहागडे तिकीट दर ,आणि पार्किंग ,खाणे पिणे यांचेही दर बघता , हिंदी / मराठी / अन्यभाषीक असे सर्वच चित्रपट मल्टिप्लेक्समध्ये जाउन बघण्यात काही 'अर्थ' राहिला नाही .

नगरीनिरंजन's picture

19 Apr 2015 - 2:54 am | नगरीनिरंजन

मराठी माणूस भिकार** आहे. युकेमध्ये एक हजार लोक महिना ५ पाऊन्ड द्यायला तयार असतील तर मराठी चॅनल दाखवायला स्काय टीव्ही वाले तयार होते. संपूर्ण इंग्लंडात त्यांना दिवसाला १६-१७ पेन्स खर्च करायला तयार असलेले फक्त एक हजार मराठी लोक नाही मिळाले.
स्वतःच्या भाषेबद्दल दुस्वास असलेला हा एकमेव दुर्दैवी समाज आहे. त्याला राज ठाकरे काय कोणीच काही करु शकत नाही.

अस्वस्थामा's picture

5 Jan 2017 - 8:01 pm | अस्वस्थामा

इथे भाषेचा दुस्वास चॅनेलवाले करतात की लोक्स (भारतातले अथवा भारताबाहेरचे) हो ?
म्हंजे असं की मला 'खुलता कळी खुलेना', 'माझ्या नवर्‍याची बायको' आणि असले तद्दन भिकार कार्यक्रम पहायचे नसतील ( वर्षातून किती पाहण्यालायक चित्रपट चॅनेलवर येतात ते एक आहेच) तरीही मराठी भाषेखातर असल्या वाहिन्यांना बघण्यासाठी का लोकांनी पैका खर्च करावा? भारतात आणि परदेशात हे असंच लागू होतं. फक्त भारतात पर्याय कमी असायचे (म्हंजे 'कहाणी घर घर की' पहा नै तर 'गोजिरवाण्या घरात'!) म्हणून चालून जात असेल पण आता तर इंटरनेटच्या जगात बक्कळ पर्याय असतेत नेटफ्लिक्स किंवा इतर मार्गांनी.

'खुलता कळी खुलेना', 'माझ्या नवर्‍याची बायको' आणि असले तद्दन भिकार कार्यक्रम पहायचे नसतील

आय मष्ट से यू आर मिसिंग अ लॉट.

____________
@ननि: भाषेबद्दल दुस्वासाचा प्रश्न नाही. दर्शकांना हे चॅनल फुकट पहायला मिळतात. तेसुद्धा "ऑन डिमांड" पद्धतीने. मग कोणाचे १६-१७ पेन्स वर आले आहेत का? उलट, सुहास बांदल नावाचे मिपाकर नव्या मराठी सिनेमांचा खेळ यूकेत आयोजित करतात. पूर्णपणे व्यावसायिक तत्त्वावर. त्यांना उत्तम प्रतिसाद आहे असं ते म्हणत होते. त्यामुळे स्कायकडे "व्हॅल्यू प्रपोजिशन" नव्हतं एवढं खरं.

गेल्या भारतवारीत मी दोन प्रतिथयश पुस्तक-दुकानदारांना "दिवाळी अंक कुरियरने पाठवाल का" असं विचारलं. डेक्कनवरचा सरळ "नाही जमणार" म्हणाला. अप्पा बळवंत चौकातला "आधी आमचा अलाणाफलाणा व्यंगचित्र विशेषांक घ्या. मग मी तुम्हाला सगळं रेट कार्ड मेल करतो." असं म्हणाला. आजपर्यंत मेल आलेली नाही. आता त्याचा स्वतःच्या धंद्याविषयीचा दुस्वास माझ्या भाषाप्रेमापेक्षा मोठा असेल तर त्याला मी काय करू?

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

25 Apr 2015 - 9:51 am | माईसाहेब कुरसूंदीकर

छान मुद्दा रे नितिन.

मराठी लोकांच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना सत्तेत आहेच कि मग ह्या हरलेल्या माणसाकडे का ????

राडा(सॉरी न्याय्य हक्क) करणारे सत्तेत असले ते आता राडा करू शकणार नाहीत.सत्ता आली की थोडे शहाणपण येते म्हणतात.सत्तेत असलेल्या दुसर्या मोठ्या पक्षाला ह्याचे भान आहे.त्यामुळे ते मनसे,सेनेचे मुद्दे स्वतःच काढतात व नामानिराळे राहतात.

इतके काय आहे तेच कळत नाहीये त्या हरलेल्या माणसात

बाबारे, हे असे चालूच असते राजकारणात.सत्ताधार्यांवर टिका करणे,कोंडीत पकडणे हे मिडियाचे काम आहे.त्यासाठी विरोधकांना हाताशी धरणे,त्यांना बाबा-पुता करून शिडात हवा भरणे हे चालू असते.

योगेश कोकरे's picture

5 Jan 2017 - 8:14 am | योगेश कोकरे

सत्तेत असलेले लोक राडा करत नाहीत ......लोल.......राज्यसभा आणि लोक सभा यांचे कामकाज बघत जा .या वेळी सत्तेला असलेल्यांची दंगा करून किमकाज बंद पाडले. देशाच्या इतिहासात हे आधी घडले होते का नाही ते माहिती नाही ...पण आपला हा तर्क अत्यंत चुकीचा आहे.
आणि जरी मनसे मुद्दे हुडकून काढत असतील तरी ते लोकांच्या हिताचे असतात . सामान्य माणूस प्रत्येक ठिकाणी जाऊन आंदोलन करू शकत नाही.. त्यासाठी हे पक्ष त्यांच्या आक्रोशाचे प्रतिनिधित्व करत असतात ....आणि मराठी भाषा ,अस्मिता या गोष्टी महत्वाच्या आहेत ....मला माझ्या राज्यामध्ये दिवसातून अर्धा वेळ हिंदी बोलावे लागत असेल तर माझा स्वाभिमान दुखावणार नाही का ?....आपल्या मराठी मुलांना रोजगार मिळत नाहीत आणि येथे परप्रांतीयांना सहज रोजगार मिळत असतील तर चीड येणार नाही का ,,,,भारत माझा देश आहे आणि मी कोठेही फिरू शकतो असं म्हणत सगळे जर महाराष्ट्रामध्ये घुसत असतील तर महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांवर ताण येणार नाही का .....आपल्याला मुंबई पुणे अजून किती बकाल करायच्या आहेत ....या गोष्टी जर कोणता राजकीय पक्ष मांडत असेल तर त्याने तुमच्या पोटात दुखायचे कारण काय .टोल च्या मुद्द्यावर कोण आंदोलन केले ,आणि त्याचा फायदा तुम्हाला होत नाही का ....महाराष्ट्राच्या विधानभवनात हिंदीतूनच शपथ घेणार असा माज दाखवणाऱ्या अबू आझमी ला खाली खेचणारी लोक मनसेची च होती ........आणि ते गरजेचे होते असं मला तरी वाटत ....

मराठी_माणूस's picture

5 Jan 2017 - 11:10 am | मराठी_माणूस

मला माझ्या राज्यामध्ये दिवसातून अर्धा वेळ हिंदी बोलावे लागत असेल तर माझा स्वाभिमान दुखावणार नाही का ?.

ही समस्या प्रामुख्याने मुंबई मधे आहे इतरत्र नाही.

संदीप डांगे's picture

5 Jan 2017 - 11:17 am | संदीप डांगे

सहमत.

विदर्भात हिंदी बोलणे प्रचलित आहे, तो प्रभाव एम्पीमुळे आहे. आम्हाला तर काही खास समस्या वाटत नाही.

शेंडगेदादा, महाराष्ट्रात मराठी चित्रपटांना मनोरंजन कर माफ आहे. अन्य चित्रपटांना (सरासरी) ४५% आहे. मराठी चित्रपटनिर्मात्यांना सबसिडी / फंडिंग असंही काहीतरी असतं. मल्टिप्लेक्सात मराठी चित्रपट लावलेच पाहिजेत अशी सक्ती आहे. आता प्राईमटाईम पण द्या म्हणतायत.

हे म्हणजे वानखेडेवर बॅटिंगला अजिंक्य रहाणे असेल तर सगळ्यांनी कंपल्सरी फुलटॉस टाकायचा. बोलरने दोन्ही पायांना साखळी बांधून बॉल टाकायचे. सगळ्या फील्डर्सनी रहाणेकडे पाठ करून उभं रहायचं. आता म्हणतायत की रहाणे दोनदा औट म्हणजे एकदा औट.

तरी रहाणे सोडून इतर बॅट्समन सेंचुरी मारतायत. त्यात समजून घ्या काय ते...

गॅरी ट्रुमन's picture

5 Jan 2017 - 8:50 pm | गॅरी ट्रुमन

हे म्हणजे वानखेडेवर बॅटिंगला अजिंक्य रहाणे असेल तर सगळ्यांनी कंपल्सरी फुलटॉस टाकायचा. बोलरने दोन्ही पायांना साखळी बांधून बॉल टाकायचे. सगळ्या फील्डर्सनी रहाणेकडे पाठ करून उभं रहायचं. आता म्हणतायत की रहाणे दोनदा औट म्हणजे एकदा औट.

तरी रहाणे सोडून इतर बॅट्समन सेंचुरी मारतायत. त्यात समजून घ्या काय ते...

पूर्ण सहमत आहे.

सतत रडत राहायची सवय असेल तर त्याला काही इलाज नाही.

मराठी_माणूस's picture

6 Jan 2017 - 10:37 am | मराठी_माणूस

त्यात , मराठी प्रेक्षक, मराठी चित्रपटा कडे पाठ फिरवुन हींदी चित्रपटाना गर्दी करतात आणि मराठी चित्रपट न चालण्यास अप्रत्यक्षरीत्या हातभार लावतात. परवा ऑफिस मधला एक मराठी सहकारी , ३१ डीसे. ला सर्व कुटुंबा समवेत "दंगल" पाहील्याचे सांगत होता आणि असेही म्हणाला की सर्व कुटुंबा बरोबर पाहु शकतो असेच चित्रपट पहातो. त्याला मी "फॅमिली कट्टा" व इतर मराठी चित्रपटा बद्दल विचारले तेंव्हा, असे काही चित्रपट आल्याचे त्याला माहीतही नव्हते आणि त्या बद्दल त्याला काही उत्सुकताही नव्हती.

हा काही एकमेव अनुभव नाही असे बरेचदा अनुभवले आहे.

तुमच्या मराठी सहकाऱ्याशी सहमत आहे. 31 डिसेंबरला त्याने विकत घेतलेली वस्तू मनोरंजन ही होती. "मराठी संस्कृतीचा आदर असल्याने मराठी सिनेमांना दिलेला आश्रय" ही नव्हती.

जे मराठी चित्रपट "मराठी रक्त अंगात खेळत असेल तर माझा चित्रपट पहा" या भावनिक आवाहनाऐवजी दर्जावर लक्ष देतात त्यांना कुबड्यांची गरज पडत नाही. प्रस्तुत सहकाऱ्यापुढे दंगल की सैराट असा ऑप्शन असता तर कदाचित उत्तर बदललं असतं.

बबन ताम्बे's picture

6 Jan 2017 - 12:45 pm | बबन ताम्बे

दर्जेदार मराठी चित्रपट मराठी प्रेक्षक मल्टीप्लेक्स मधे देखील आवर्जून पहायला जातात. नुकताच व्हेंटीलेटर पाहिला फिनिक्स मॉल मधील PVR मधे. हाऊसफुल होता.
अशीच गर्दी मला देऊळ, नारबाची वाडी, बालगंधर्व, मसाला, प्रेम म्हण्जे प्रेम असतं, विटीदांडू, नटसम्राट, प्रकाश बाबा आमटे अशा ब-याच चित्रपटांना दिसली. सैराटने तर रेकॉर्ड केले.

गॅरी ट्रुमन's picture

6 Jan 2017 - 1:50 pm | गॅरी ट्रुमन

२०११ मध्ये बालगंधर्व आला होता त्यावेळी मी चेंबूरला राहायला होतो. चेंबूर म्हणजे बर्‍यापैकी दाक्षिणात्यांची आणि सिंधी लोकांची वस्ती असलेले ठिकाण आहे हे तर सर्वांनाच माहित आहे. त्यावेळी बालगंधर्व रविवारी संध्याकाळी ६.३० च्या शो ला म्हणून गेलो होतो. त्याकाळी ऑनलाईन बुकिंग वगैरे प्रस्थ आताइतके नव्हते. बुकमायशोचे अ‍ॅप असू शकेल याची कल्पनाही नव्हती. आणि चेंबूरमध्ये कोण मराठी चित्रपट बघायला येणार , कधीही गेले तरी तिकिट मिळेल या मोठ्या खात्रीने के-स्टार मॉलमध्ये जाऊन थडकलो. पण कुठचे काय. शो हाऊसफुल होता. पण या शोसाठी इतके लोक अजूनही आले आहेत हे लक्षात घेऊन दुसर्‍या स्क्रिनमध्ये ६.५० चा स्पेशल शो लावला गेला होता. आणि त्यासाठीही ८०% थेटर भरलेले होते. तेव्हा सांगायचा मुद्दा हा की जर क्वालिटी असेल तर प्रेक्षक चित्रपट बघायला गर्दी करणारच आणि गर्दी होते आहे हे बघून चित्रपटगृहाचे मालकही चित्रपटगृह देतीलच.

हे मराठी बाणे वगैरे उठा आणि राठा सारख्या रिकामटेकड्या राजकारण्यांनी हवेत सोडलेले बुडबुडे आहेत. जर का मराठी चित्रपटांना मनोरंजन कर नसेल आणि वर सरकारकडून अनुदान दिले जात असेल तर एक करदाता म्हणून मराठी बाणा जपण्यात (इफ अ‍ॅट ऑल मराठी चित्रपटांना असे संरक्षण देऊन मराठी बाणा जपला जात असेल तर) माझाही वाटा आहेच. त्यापलीकडे जर मराठी चित्रपट बघितले नाहीत तर मराठी बाण्याची पर्वा नाही, खेकड्याची मनोवृत्ती वगैरे लेक्चरबाजी नको.

मराठी_माणूस's picture

6 Jan 2017 - 2:24 pm | मराठी_माणूस

कित्येक हींदी चित्रपट अतिशय रद्दी असतात तरीही बघीतले जातात.

गॅरी ट्रुमन's picture

6 Jan 2017 - 2:26 pm | गॅरी ट्रुमन

कोंबडी पळाली, माझा नवीन पोपट हा वगैरे गाणी तुफान लोकप्रिय होतात पण ग.दि माडगूळकर, कुसुमाग्रज यासारख्यांच्या कविता तितक्या प्रमाणात लोकप्रिय होत नाहीत याविषयी तुमचे काय म्हणणे आहे?