तर मंडळी . . येत्या मे महिन्यातल्या १० तारखेला कोल्हापुरात कट्टा करणेचे योजिले आहे . .
सध्या मी , अन्या दातार, स्नेहांकिता, कंफ्युज्ड अकौंटंट हि एवढी मंडळी तयार आहोत . .
३०० किमी च्या परिघातल्या सर्वाना हे जाहीर निमंत्रण . ४-५ तासाच्या प्रवासात कट्टा होऊन जैल आरामात
त्या बाहेरचे लोक येणार असतील तर अति उत्तम . .
कोण कोण येतंय . आणि येत असल्यास कसं . कोल्हापुरात कुठे, कधी भेटायचं . इत्यादी समदं हिक्डीच बोलू . .
कट्टा १० तारखेला साधारण ११ वाजता सुरु होईल . सध्या ताराबाई पार्कात भेटण्याचं ठरलं आहे .
ज्यांचं यायचं नक्की आहे त्यांनी तसं कळवावं . म्हणजे त्यानुसार इतर गोष्टींची तयारी करता येईल .
काही प्रश्न असल्यास खालील पैकी कोणालाहि इथेच किंवा व्यनि करून किंवा फोनावून विचारू शकता .
आदित्य (म्हणजे मी ) = ९७४३१८६६५९
अन्या दातार = ९८९०८९७४०७
पूर्ण पत्ता : सर विश्वेश्वरय्या हॉल, आर.एम.मोहिते हाउससमोर,
किरण बंगल्याजवळ, ताराबाई पार्क कोल्हापूर.
सदर हॉलमध्ये खालच्या मजल्यावर अन्य कार्यक्रम असून आपली व्यवस्था टेरेसमध्ये आहे याची संबंधितांनी नोंद घ्यावी आणि येताना फोनवावे.
तसेच जेवण आधी ऑर्डर करायचे असल्याने येणार्यांनी कृपया व्हेज/नॉनव्हेज कन्फर्म करावे, ही विनंती.
चालू हो जाव
प्रतिक्रिया
22 Apr 2015 - 10:05 pm | पैसा
सध्या फिंगर्स क्रॉस्ड! काम आटपत आल्यास हजर रहाण्याचा नक्कीच प्रयत्न करीन. कोल्हापुरातले मस्त जेवण हादडायचे आहे!
22 Apr 2015 - 10:11 pm | सस्नेह
मस्त जेवण मिळण्याची गॅरंटी देण्यात येत आहे +)
22 Apr 2015 - 10:17 pm | पैसा
मिलनाईच मंगताय!
पुण्याला ३ फेर्या मारल्या तरी चहा मिळेना म्हणून रडारड केल्यावर एकदा चहा, एकदा कॉफी (शीशीडीतली का असेना!) आणि एक मस्तानी मिळाली होती!
आता तुम्ही कोल्लापूरकर म्हटल्यावर असेच जाऊ देणार काय! खाण्याच्या ढिगात बुडवाल! ;)
22 Apr 2015 - 10:32 pm | एस
किती (दिवस) ती रडारड!
जिथेतिथे ह्यांना पुणेच आठवतं. उद्या हामेरिकन सर्कारचा व्हिसा मिळाला तर त्या गोर्यांनाही म्हणाल, थँक्यू हं! नाहीतर त्या पुण्यात, आय टेल यू, एक चहापण देत नाहीत हो लोक्स! स्स्स्सो चिंगूस, यू नो?
22 Apr 2015 - 10:40 pm | पैसा
तरी पुण्याच्या जवळच पिंचिं आणि धायरी आहेत म्हणून बरं. तिथले लोक विरघळतात रडारड ऐकून. नैतर पुण्यात पाण्याचा घोट मिळताना मुश्किल हो!
22 Apr 2015 - 10:58 pm | अद्द्या
मी बेळगावचा असलो तरी कोल्हापुरात खायला कमी नाही याची ग्यारेंटी . .
23 Apr 2015 - 12:06 am | अत्रुप्त आत्मा
23 Apr 2015 - 8:40 am | नाखु
पाणी मागीतल्या मुळे हा गैरसमज झाला असावा.
असे आम्चे दै "नस्ती ऊठाठेव" चे वार्ताहर श्री.जवळपास धायरीकर कळवितो.
23 Apr 2015 - 11:23 am | मृत्युन्जय
आर उ शुअर की तुम्ही पुण्यातच आला होतात??? नाही म्हणजे चहा, कॉफी आणि मस्तानी मिळाली म्हणुन विचारतोय. कदाचित तुम्ही नदीपल्याडच्या भागात गेला असाल. अस्सल पुणेरी त्या भागाला पुणे समजत नाही. (अस्सल पुणेरी गोव्याकड्च्या माणसांना माणूस समजतो की नाही ते यशोधरेला विचारायला लागेल)
23 Apr 2015 - 11:34 am | पैसा
अगदी जंगली महाराज रस्त्यावर आणि सपे. त सुद्धा आले होते! मात्र चहा कापी आणि मस्तानी देणारे पिंचिं, धायरी रहिवासी आणि अनिवाशी कोकणी होते हो! =)) यशो पण अनिवाशी कोकणी. अजून पुरती धर्मांतरित झालेली नाय!
23 Apr 2015 - 2:25 pm | बॅटमॅन
टेक्निकलि स्पीकिंग, जंगली महाराज रस्ता पुण्यात येत नाही- नदीपल्याडच्या भांबुर्ड्यात येतो.
29 Apr 2015 - 12:33 pm | पैसा
कोणी पुणेकराने चहा पाजला तर ठाणे पुण्यात आहे म्हणीन! माझं काय जातंय!
29 Apr 2015 - 2:12 pm | सूड
कोल्हापूर जवळ नाही हो, नायतर चहा बनवूनच आणला असता!! ;)
29 Apr 2015 - 2:25 pm | टवाळ कार्टा
कै तो चिक्कूपणा =))
29 Apr 2015 - 2:28 pm | सूड
उगी हं बाळा!! तू येणार असशील तर सांग बरं का, तुझ्यासाठी श्रीखंडाच्या गोळ्या आणतो.
29 Apr 2015 - 2:40 pm | यसवायजी
जवळ-लांब काय लावलैस? थर्मास विकत घेईन.
तू ये.. तुला फुकट देईन.
29 Apr 2015 - 2:55 pm | सूड
नको, आहे माझ्याकडे. तुला हवाय का? पण फुकट बिकट मिळणार नै!! ;)
23 Apr 2015 - 7:28 pm | यशोधरा
यशो पण अनिवाशी कोकणी. >> मी अविनाशी वाचलं! =))
23 Apr 2015 - 7:35 pm | पैसा
=)) कोकणी माणूस अविनाशीच! =))
23 Apr 2015 - 7:45 pm | यशोधरा
हे मात्र खरं!
23 Apr 2015 - 7:27 pm | यशोधरा
अस्सल पुणेरी गोव्याकड्च्या माणसांना माणूस समजतो >> गोवा आणि पुणे दोन्ही मला तितकीच प्रिय आहेत. शिवाय त्यात कोल्लापूर, ब्येळगांव (असंच म्हणतात खरंतर), उर्वरीत कोकणपट्टी हेही धरा :) हिमाचल, उत्तराखंड, काश्मीर, लेह, लडाख विसरु नये.पंजाब, त्यातल्यात्यातही चंदीगड राहतच होतं..
:)
25 Apr 2015 - 3:05 am | बिपिन कार्यकर्ते
आणि थालिपिठ (लोण्याबरोबर) मिळाले होते ना एकदा? त्याचं काय? ;)
25 Apr 2015 - 9:18 am | पैसा
पण ते टेक्निकली पुण्याच्या बाहेर हो! आणि देणारी माणसं पण आमचीच! पुण्यात रहातात पण अजून वाण नाही लागला.
28 Apr 2015 - 9:32 am | स्पंदना
नुस्ते मिळाले होते?
खाल्ले नव्हते?
28 Apr 2015 - 11:34 am | सूड
थालपीटा नि नुस्तें? शिवराक जेवता मगे ती!! नुस्ते कित्यां? =))))
28 Apr 2015 - 12:28 pm | बिपिन कार्यकर्ते
खाल्लेही होतेच की! आम्ही देशावरचे बरं का! नुसतं दाखवून बोळवण नाही केली हो! ;)
22 Apr 2015 - 10:10 pm | अद्द्या
नक्की नक्की . .
पूर्ण प्रयत्न करा येण्याचा । नव्हे . याच
22 Apr 2015 - 10:13 pm | अजया
मी हा धागा वाचला नाहीये.
22 Apr 2015 - 10:20 pm | सस्नेह
मग वाचा, चष्मा घालून...!
22 Apr 2015 - 10:21 pm | अजया
दुष्ट दुष्ट स्नेहांकिता!
22 Apr 2015 - 10:34 pm | रेवती
वाईट वाटण्यात आल्या गेले आहे. ;)
22 Apr 2015 - 10:45 pm | रेवती
आता निदान कट्ट्याचा वृत्तांत, फोटू तरी चढवू नका. नाहीतर जळजळीपासून जळफळाटापर्यंत असा लेख लिहीन.
22 Apr 2015 - 10:57 pm | अद्द्या
मागे तुम्हीच म्हणाला होतात . . "लिहित जा"
वृत्तांत तर येणारच :D
23 Apr 2015 - 2:30 am | रेवती
मग लिहा........आणि द्या आम्हाला त्रास!
जौदे! निदान मेणू तरी कळेल.
23 Apr 2015 - 1:04 pm | अद्द्या
सोप्पा उपाय हाय ना काक्कू . .
एक क्वोल्लापूर तिकिटात सगळा त्रास वाचेल नं
22 Apr 2015 - 11:03 pm | प्रचेतस
यायचा प्रयत्न करतो.
22 Apr 2015 - 11:10 pm | सस्नेह
पक्के xxरी गुळमुळीत आश्वासन !
22 Apr 2015 - 11:11 pm | प्रचेतस
नाय ओ.
प्रयत्न नक्कीच करेन. हापिसातून सवड कशी मिळत्ये ते बघू
22 Apr 2015 - 11:13 pm | अद्द्या
१० तारीख रविवार आहे काका . ते बघूनच तारीख ठरवलीए .
बघो . जमवो कुछ तो
22 Apr 2015 - 11:14 pm | प्रचेतस
शनि रवि कदाचित हापिसला जावे लागण्याची शक्यता आहे.
22 Apr 2015 - 11:16 pm | अद्द्या
अर्र . माझं हि तेच आहे . पण तरी .प्रयत्न नक्की करा
23 Apr 2015 - 12:48 am | श्रीरंग_जोशी
भारतात असतो तर आवर्जुन आलो असतो. आजवर दक्षिण महाराष्ट्रात एकदाही जायचा योग आला नाही :-( .
भविष्यात कधीतरी प्रिती-संगमाजवळ मिपाकट्टा व्हावा.
23 Apr 2015 - 8:56 am | कहर
कोणत्या प्रीतिसंगमावर ?
23 Apr 2015 - 9:04 am | श्रीरंग_जोशी
कराडच्या प्रीतिसंगमावर.
23 Apr 2015 - 11:39 am | सस्नेह
तुम्हाला 'कोणाच्या' असे म्हणायचे आहे काय ?
24 Apr 2015 - 10:17 am | कहर
नाही नाही स्नेहांकिता ताई… संपूर्ण बालपण ज्या कृष्णा-कोयनेच्या प्रीतीसंगमात पोहण्यात गेले तो कोणाचा असे विचारण्याचा नाठाळपणा कसा करेन मी … फक्त खात्री करत होतो कि जगात दुसरा एखादा प्रीतीसंगम तर तयार नाही न झाला...
23 Apr 2015 - 2:20 pm | मोहनराव
:(
22 Apr 2015 - 11:44 pm | अत्रुप्त आत्मा
सध्या आमचा सीझन असल्यामुळे अवघडच वाटतय ज़रा!
पण अचानक.com वर जमल्यास नक्कीच येणार!
23 Apr 2015 - 12:04 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
अन्या दातार ला लुटायला णक्की येणार. ;)
जेवायचा बेत काय आहे ते सांगा मग सांगतो जमेल का नै ते.
23 Apr 2015 - 8:27 am | पैसा
नैतर हापिसाचं काम म्हणून पिंचिं मधे असायचा नेमका!
23 Apr 2015 - 8:30 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
किडणॅप करुन कोल्हापुरात नेण्यात येईल :P
23 Apr 2015 - 8:43 am | नाखु
"शुभकार्यासाठी" सक्रीय सहभाग घेण्याची तयारी आहे.
अखिल मिपा बुवा चारोळी+आऱोळी पंखा संघ
23 Apr 2015 - 2:28 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
हाकानाका आणा टेंपो ;)
वर्हाड? ;)
23 Apr 2015 - 2:36 pm | नाखु
अन्या दिवसा(एकटा) तावडीत सापडून त्याचे अपहरण करून अत्रुप्तबुवांचे ताब्यात देणे किंवा देईन असे सांगून त्याचेकडून "पार्टी" खंडणी उकळणे या कामाला "शुभ" (आप्ल्याला) म्हणून "शुभकार्य"...
हुश्श्$$$हुश्श
इतक विस्कटून सांगायला लागतं तुला म्हणून मुवींच्या बुवांच्या दरबारात नेत नाहीत कुणी !!!
23 Apr 2015 - 2:40 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
खिक्क!! पुढच्या भेटीत सविस्तर खेचु. आपलं बोलु. ;)
23 Apr 2015 - 2:44 pm | पैसा
एक मलापण द्यायची आहे त्याने अजून!
23 Apr 2015 - 2:53 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
तुम्हाला बोलावलं की समस्तं पिंचिं करांना सांगायला विसरु नका :P
23 Apr 2015 - 2:56 pm | पैसा
आधी बोलू नको! आयत्या वेळी मुंबैला पळून जायचा.
23 Apr 2015 - 3:16 pm | अन्या दातार
अत्रुप्तबुवांच्या ताब्यात देण्याच्या नावाखाली खंडणी?? कोण देणार तुम्हाला त्यासाठी खंडणी?? छ्या, कैच्याकैतरीच तुमचं!
23 Apr 2015 - 3:28 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
अत्रुप्त बुवाचं देणार खंडणी. पहिजे तेवढे पैसे घ्या पण ह्याला घेउन जा म्हणुन... ;)
23 Apr 2015 - 3:32 pm | अन्या दातार
=)) =)) =))
23 Apr 2015 - 3:28 pm | नाखु
जब कोई घबराता है तो ऐसा बोलता टेन्शन नही लेनेका सस्तेमे छुट्कारा मिलेंगा..
गुमान तोडपाणी
कॅप्ट्न चिमन हटेला गँग
कल्लापूर
23 Apr 2015 - 12:21 am | यशोधरा
कोल्लापूर लई आवडीचं! जायला जमेल का ह्याची चाचपणी सुरु करण्यात यील.
९ ला का धा ला ते नक्की सांगा की!
23 Apr 2015 - 12:24 am | अद्द्या
९९% दहालाच . कारण रविवार आहे . .
इतर मंडळी काय ठरवतात ते बघायचं
23 Apr 2015 - 12:45 am | यशोधरा
लवकर सांगा, आयत्या वेळी सुट्टी नाही मिळत आमच्या इथे.
23 Apr 2015 - 1:43 am | जुइ
भारतात असते तर नक्की प्रयत्न केला असता यायचा. कोल्हापूरला यायला आवडते!!
23 Apr 2015 - 2:31 am | रेवती
मेरेकूभी आवडताय पण जानेको मिळताच नै, क्या करेंगे.
23 Apr 2015 - 9:03 am | स्पा
भारतात असलो तर नक्की जमवणेत येइल
23 Apr 2015 - 9:24 am | पैसा
म्हणजे हल्ली चंद्रावर असतोस काय तू?
23 Apr 2015 - 4:07 pm | स्पा
विल त्राय
25 Apr 2015 - 8:46 pm | सतिश गावडे
कं रं बाला, तुजा गाव यागला देस कदी झाला रं?
23 Apr 2015 - 9:37 am | जयराज
नेमकी परिक्षेच्या वेळची तारीख हाय..
यायला नाय जमनार..
23 Apr 2015 - 9:51 am | मिहिर
मस्त. जमवण्याचा प्रयत्न करण्यात येईल.
23 Apr 2015 - 10:43 am | वेताळ
नक्की येवु.ठिकाण कळवा.फोन नंबर द्या.
23 Apr 2015 - 10:53 am | क्लिंटन
अरे कट्टा हुकणार माझा. त्या दरम्यानच सांगलीला यायचा बेत होता पण तो सध्या रद्द झाला आहे :( आणि मी कोल्हापूरपासून ३०० किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावर राहतो :(
मार्च २०११ मध्ये कोल्हापुरातच मी, अन्या दातार आणि विनायक पाचलग यांचा एक छोटेखानी कट्टा झाला होता त्याची आठवण झाली. कट्ट्याला शुभेच्छा. दणदणीत मजा करा.वृत्तांत लिहायला आणि फोटो टाकायला विसरू नका :)
23 Apr 2015 - 3:26 pm | अन्या दातार
खरंच मस्त कट्टा झाला होता तो.
23 Apr 2015 - 11:08 am | टवाळ कार्टा
ठाण्यातून अथवा पुण्यातुन जाणारे कोणी आहे का?
23 Apr 2015 - 11:20 am | पैसा
किती जण येतात बघू. वल्ली, बुवा, यशो एवढे सध्या आहेत. तुला काय स्पेशल गिफ्ट आणायची का? =))
23 Apr 2015 - 11:25 am | टवाळ कार्टा
नै...कोणी जाणारे असेल तर मी पिग्गीबॅक करून येईन...तुम्हीच सांगा तुम्हाला काय हवे...ठाणेकर शब्द पाळतात ;)
23 Apr 2015 - 11:18 am | आसिफ
आपल्या भागात कट्टा होत आहे आणि कट्ट्याला यायची जबरी इच्छा आहे पण ७-८-९-१० ला असलेल्या लग्नांमुळे जमेल असे वाटत नाही
~असिफ
23 Apr 2015 - 11:25 am | माईसाहेब कुरसूंदीकर
कट्टेकर्यांना शुभेच्छा.
खा-प्या-मजा करा.
23 Apr 2015 - 12:06 pm | कपिलमुनी
तुम्ही आणि नाना कट्ट्याला मेहूण म्हणून या !
23 Apr 2015 - 12:22 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
ओटी भरायचा कार्यक्रम करायचा का शालजोडी ते पण ठरवा. उगीच ऐन वेळी धावाधाव नको॥
23 Apr 2015 - 1:46 pm | काळा पहाड
माईंची ओटी भरा. त्यांच्या 'ह्यां' ना शाल द्या. माईंचे बाकीचे 'अवतार' (नाना, ग्रे.थिं., हितेश इत्यादी) अवतीर्ण झाले तर शालजोडीतले द्या. हा.का.ना.का.
23 Apr 2015 - 3:06 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
तू आपली आवडती फियाट गाडी घेऊन ये काळ्या पहाडा.
25 Apr 2015 - 1:51 pm | पैसा
तुम्ही येणार का हो माईसाहेब? कोट-पगडी घालून आलात तरी चालेल. एकदा माई आणि नानासाहेब यांना सदेह पाहिले की मी डोळे मिटायला मोकळी!
25 Apr 2015 - 2:10 pm | टवाळ कार्टा
******* पाहिले की मी डोळे मिटायला मोकळी!
असे लिहायची मिपावर लेटेश्ट फ्याशन आहे कै? नुकतीच एका साफसफाई झालेल्या धाग्यावर पण अश्शीच प्रतिक्रीया वाचलेली ;)
25 Apr 2015 - 2:22 pm | पैसा
माएसाहेब आणि नानासाहेब यांना सदेह पाहणे म्हणजे साक्षात स्वर्गप्राप्तीच की!
25 Apr 2015 - 3:54 pm | अजया
अगदी अगदी=))
मी कोट पगडी घालून आलेल्या माईची पण खणानारळाने ओटी भरायला तयार आहे!
माईची पंखी क्र१
25 Apr 2015 - 7:16 pm | टवाळ कार्टा
गाणे पण होउन जौदे....माई नी माई :)
25 Apr 2015 - 10:06 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
माईन माईन मुंडर पे तेरे बोल रहा है णाणा!! ;)
रेफ्रन्स: आम्ही तुमचे कोण?
27 Apr 2015 - 1:49 pm | कपिलमुनी
नाना करते प्यार तुम्हीसे कर बैठे !
27 Apr 2015 - 6:34 pm | बॅटमॅन
आज हमारे दिलमें....अजब कुरसुंदी है ए ए....
गाने बैठे नाना...सामने माई है!!!
27 Apr 2015 - 7:09 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
हाये नाना ये क्या हुआ..क्यु ऐसे हमे सताने लगे
माई इतनी प्यारी हो सामने नाना काबु मै कैसे रहे..
तुझ्यावर परत "ह" आला.
27 Apr 2015 - 7:18 pm | बॅटमॅन
हम आपके है कौन.....नाना माईके है कौन....
बेचैन है, उस्की खवं...डुआयडी-मुळे हे असं....
स आलं.
27 Apr 2015 - 7:21 pm | यशोधरा
मी लिहू का स वरुन?
27 Apr 2015 - 7:28 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
नै मी आधी लिहलं तुम्ही ह वरुन लिहा.
27 Apr 2015 - 7:28 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
सपने मे मिलती है..हो माई तेरी सपने मे मिलती है..
सारा दिन घुंगटे मे बंद कुडियासी ओए ओए ओए ओए
सारा दिन घुंगटे मे बंद कुडियासी नानाजी को मिलती है!!!
=))
27 Apr 2015 - 7:33 pm | यशोधरा
आता ह वरुन मला गाण सुचत नैय्ये! स वरुन चांगलं सुचलं होतं तर! :| :P
27 Apr 2015 - 7:36 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
सोदा मंजे सापडेल.
२००
कट्टा आयोजकांचे प्लॅस्टिकच्या डिस्पोजेबल डिश, ग्लास आणि चमचे देउन सत्कार करण्यात येत आहे. (कचरा कचरापेटीतचं टाकावा नैतर पर्स किंवा बॅगेत टाकुन घरी पाठवण्यात येईल.)
-चिमण हटेला आणि नाखुभाई गँग्स ऑफ पिंचिंपुर-
27 Apr 2015 - 7:38 pm | सूड
मेल्यांनो, अंताक्षरीचा वेगळा धागा काढा बघू..कट्ट्याच्या धाग्याचं त्या माई-नानाच्या नादात काश्मीर नका करु!!
27 Apr 2015 - 7:40 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
ए काश्मिर कसलं रे? आत्ताशिक लग्नाची गाणी चालु झालीयेत. काश्मिर, चिंचेचं झाड, चिनार वृक्ष, ९-तरुणी परंत पोचायला अवकाश आहे. आधी पुजा करायची असते म्हणलं.
27 Apr 2015 - 7:43 pm | सूड
९? माताय, लग्न आहे का नवरात्र?
27 Apr 2015 - 7:49 pm | बॅटमॅन
विग्रह द्वितीयाक्षरावर अपेक्षित आहे की तृतीयाक्षरावर?
27 Apr 2015 - 7:51 pm | टवाळ कार्टा
चायला एक अंताक्षरी तेव्हडी जमत नै मला...नाहीतर ३०० असेच केले असते
27 Apr 2015 - 11:38 pm | कपिलमुनी
हाल कैसा है नाना का ?
क्या खयाल है माई का
हितेश मचल गये ओ ओ ओ
थि़ंकर फ़िसल गये, आ आ आ
28 Apr 2015 - 1:30 am | सिद्धार्थ ४
मी नाना हि नाही आणि मी माई हि नाही. हितेश भाई मोड ऑफ >
28 Apr 2015 - 5:55 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
पोरांनो आवरा अता. आपण वेगळा धागा काढु उखाळ्या-पाखाळया काढायला.
23 Apr 2015 - 11:53 am | दा विन्ची
एक चांगला चानस हुकणार राव. लई लांब असल्याने जमणार न्हाय . पण जूनच्या शेवटच्या आठवड्यात माहेरी सांगलीला येणार आहे.
23 Apr 2015 - 2:09 pm | पदम
नाही जमणार यायला बहुतेक. ऐनवेळी काही अड्थळे नाही आले तर नक्की जमवेन.
23 Apr 2015 - 3:11 pm | उमा @ मिपा
कट्ट्याला शुभेच्छा!
23 Apr 2015 - 4:03 pm | यसवायजी
याला जमतंय कनी म्हाईत नाही खरं ट्राय करतो.
23 Apr 2015 - 4:40 pm | मितान
अजुन स्पेसिफिक - १० तारखेला कधी ?
मला १० मे ला संध्याकाळी ६ च्या आधी एका शिबिरासाठी सातार्यात पोहोचायचं आहे.
त्यामुळे दुपारी भेटणार असू तर येऊ शकेन.
23 Apr 2015 - 4:49 pm | सस्नेह
पोचू शकशील. १० तारखेला सकाळी ११ ला कट्टा.
ठिकाण ताराबाई पार्क. जेवण वगैरे आवरून ३ ला तू निघालीस तरी पाचला साताऱ्यात पोचशील.
23 Apr 2015 - 5:30 pm | मितान
मी येते मग :)
23 Apr 2015 - 4:42 pm | अनन्न्या
चार दिवस आधी नक्की सांगेन.
23 Apr 2015 - 5:34 pm | पैसा
नक्की असेल तर सांग. म्हणजे मी इकडून थेट जाण्यापेक्षा व्हाया रत्नागिरी येईन.
23 Apr 2015 - 7:06 pm | अनन्न्या
घरी विचारते.
23 Apr 2015 - 7:04 pm | अद्द्या
कट्टा १० तारखेला साधारण ११ वाजता सुरु होईल . .
सध्या ताराबाई पार्कात भेटण्याचं ठरलं आहे . नक्की पत्ता स्नेहांकिता ताई लवकरच देतील . .
ज्यांचं यायचं नक्की आहे त्यांनी तसं कळवावं . .
म्हणजे त्यानुसार इतर गोष्टींची तयारी करता येईल .
काही प्रश्न असल्यास खालील पैकी कोणालाहि इथेच किंवा व्यनि करून किंवा फोनावून विचारू शकता .
आदित्य (म्हणजे मी ) = ९७४३१८६६५९
अन्या दातार = ९८९०८९७४०७
संपादकांना विनंती :- हि पोस्ट धाग्यातच अडकवता आली तर पहा
23 Apr 2015 - 9:53 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कट्ट्याला शुभेच्छा !!! कलापूर लांब पडतंय.
-दिलीप बिरुटे
23 Apr 2015 - 10:30 pm | सस्नेह
काॅलेजला सुट्टी लागली असेल तर वैनींना घेऊन शनि-रवि दौरा काढा की. अंबाबाईचं दर्शनपण होईल +)
23 Apr 2015 - 11:28 pm | यशोधरा
खरंच, जाता येईल का देवळात प्लीज?
24 Apr 2015 - 7:56 am | पैसा
मी आणि प्रीतमोहर हल्लीच जाऊन आलो. सुटीच्या दिवशी थोडे गर्दी असते म्हणे, पण एकूण व्यवस्थापन खूपच चांगले आहे. रांग फार मोठी असेल अन वेळ नसेल तर सभामंडपातून मुखदर्शन घेऊन पटकन बाहेर पडता येते.
24 Apr 2015 - 8:38 am | नाखु
कोल्हापूरला दर्शनासाठी आटा-पिटा करावा लगत नाही तुळजापूर सारखा शिवाय मंडपातून दर्शन्-सोय आहेच.
दोन्ही दर्शन अनुभवी.
नाखु
24 Apr 2015 - 11:15 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सुट्ट्या लागल्या आहेत. गेल्या वर्षी येऊन गेलोय कलापुरात. आणि हिचं म्हणाल तर कलापुरातून पुढे वाट स्वर्गात जरी जाणारी असली तरी 'असल्या उन्हात' आम्ही घर सोडणार नाही.
-दिलीप बिरुटे
24 Apr 2015 - 2:33 am | सांगलीचा भडंग
कोल्लापुरात कट्टा एकच नंबर… सांगली मध्ये असतो तर नक्कीच आलो असतो .
पण जे कोणी येतील त्यांनी सांगलीचा भडंग मात्र जरूर खावा /खरेदी करावा :-) . जयसिंगपूर चा अंबा भडंग पण भारी असतो
27 Apr 2015 - 2:57 pm | मोहनराव
जयसिंगपूर चा अंबा भडंग ---> आपुनका फेवरेट!!
24 Apr 2015 - 4:26 pm | अन्या दातार
नक्की येणारी मेंब्रं किती आता??
24 Apr 2015 - 4:32 pm | नाखु
लिहिलय
मेंब्रं किती की मेंढ्र ??
24 Apr 2015 - 4:34 pm | अन्या दातार
मेंबरं मेंबरं!!
24 Apr 2015 - 6:47 pm | यशोधरा
आधी नक्की नौ का धा ते सांग की! होताहोईतो धा वगैरे असं नको. नाहीतर आम्ही येऊ धा ला आणि तुम्ही ९ ला कट्टा संपवलेला असायचा. म्हंजे गेली सुट्टी फुकट!
24 Apr 2015 - 9:37 pm | सस्नेह
१० मे सकाळी ११ वा. ताराबाई पार्क कोल्हापूर +)
24 Apr 2015 - 4:47 pm | वेताळ
तुम्हाला फोन करतो
24 Apr 2015 - 10:07 pm | अद्द्या
अन्या , मी , स्नेहांकिता , अकौंटंट
वेताळ , मीतान
हि मेम्ब्र नक्की झालीत .
अनन्या , टवाळ कार्टा , यस वाय जी , यशोधरा , वल्ली
हि मेम्ब्र नक्की नाहीत . .
लोकहो . कळवो पटापट
पुणे मुंबई , गोवा किंवा अगदी हुबळी धारवाड सांगली मिरज कोणी असतील तर प्रयत्न करा येण्याचा .
एका दिवसात होण्यासारखा प्रवास आहे . .
24 Apr 2015 - 10:46 pm | पैसा
मला येन्ट्री न्हाय का?
24 Apr 2015 - 10:50 pm | अद्द्या
अर्र . .
गडबडीत काही पोस्ट सुटल्यात . .
भरपाई म्हणून पेशल कुंदा चालेल का? :P
24 Apr 2015 - 11:05 pm | पैसा
चालेल काय, धावेल!
24 Apr 2015 - 10:56 pm | सस्नेह
झाले की शंभर !
जेपीभौ उठा, हार आणा !
24 Apr 2015 - 11:12 pm | अत्रुप्त आत्मा
25 Apr 2015 - 3:04 am | बिपिन कार्यकर्ते
यायचा प्रयत्न करेन. मात्र कोल्हापुरातला मिसळपाव हा मिसळ आणि 'पाव' या दोहोंचाही अपमान आहे असे नोंदवून ठेवतो. ;)
25 Apr 2015 - 7:14 am | सस्नेह
आपल्यासाठी वेगळा पदार्थ ठेवला जाईल +)
रच्याकने नोंदवलेले निरीक्षण : कोल्हापुरी मिसळीचा झटका पुणेकरांना सोसवत नाही !!
25 Apr 2015 - 9:15 am | स्पा
कोल्हापूरात पाव मिळत नाही, जाम डोका गरम होतो, साला ते जाड जाड स्लाईस घशाखाली उतरत नाहीत
रंकाळ्याची भेळ भारी पण
25 Apr 2015 - 10:06 am | बिपिन कार्यकर्ते
हो! मिसळपाव सोडून अजून काही भारी पदार्थ मिळतात कोल्हापुरात!
28 Apr 2015 - 9:40 am | स्पंदना
बेकरीत भाजलेलं वरजीनल पाव असत्यात त्ये लेका. दुकानातलं नसत्यात कमर्शीय्ल बेकरीतलं.
25 Apr 2015 - 10:07 am | बिपिन कार्यकर्ते
काय कल्पना नाय ब्वॉ! अजून तरी बसलाच नाही झटका! कधी बसला तरच कळेल ना! ;)
25 Apr 2015 - 11:25 am | अन्या दातार
कधी खाल्ली तर बसेल ना झटका. निस्त्या फोटोवरुन बोल्ल्यावर अस्संच हुतंय ;)
25 Apr 2015 - 2:05 pm | यसवायजी
काही लोकांना पोहे घातलेली गुळमाट मिसळ आवडत असेल तर आवडो बापडे. :p
(काटाकिर्रर्र) SYG
28 Apr 2015 - 9:42 am | स्पंदना
बावडा मिसळ खायला जा हं लेको. उगा इकडे तिकडे नका खाऊ.
25 Apr 2015 - 8:51 am | अजया
हा झटका पण ब्येसच ^_~
25 Apr 2015 - 4:30 pm | यमगर्निकर
माझे घर कोल्हापुरातच आहे. आणि कंपनिच्या कामानिमित्य सध्या मी कोल्हापुरातच आहे. तुम्हि फक्त कुठे यायचे ते सांगा, १० मिनिटात हजर आहे.