चौपाटी !

मुक्तसुनीत's picture
मुक्तसुनीत in जनातलं, मनातलं
22 Nov 2008 - 2:52 am

स्थळ : आपली सगळ्यांची लाडकी , चौपाटी !

मुक्तराव : या सुनितराव ! काय म्हणताय ? हवा पाणी काय म्हणते ?
सुनितराव : हीक्क् च्छॉ ! कसली हो हवा ! कधी वारं झणाण्तंय , कधी जीवघेणा उकाडा.. सर्दी होऊन राह्यली आहे केव्हाची.
मु. : (स्वगत) हा सुनितराव सुद्धा एकदम कंडम माणूस आहे. कुणी "कसे चालले आहे" असे विचारल्यावर "खरोखरच" कसे चालले आहे हे कुणी सांगते काय ?! नि काय तो आवाज शिंकताना ! जाऊ द्या.
(प्रकट) मग ? काय हालहवाल आपल्या चौपाटीवर ?
सु. : ठीकच चालले आहे म्हणायचं ! जो तो आपल्या आपल्या "ह्याच्यात" ! तो आपला "हा" ... भारी पेटलाय त्याच्या नेहमीच्या "ह्या" विषयावर !
मु. : खराय ! पण विद्वान किती आहे ! "ह्या" विषयावर "ह्या"चा हात धरणारा कुणी आहे का ?
सु. : पण म्हणून काय झालं ? कुणालाही काहीही बोलायचं ? "हा" असला तर घरचा ! ये चौपाटी है , उसका घर नही !
मु. : काय करणार सुनितराव , "हा" कसाही असला तरी तो आपल्याला हवा. त्याने "ही" गिरी सुरु केली की थंबवावे म्हणजे झाले ! पण "ह्याला" पर्याय नाही ! बाय द वे , "ह्या"ला "त्या"ने सुद्धा बरोबर खिंडीत गाठले, नाही का ?
सु. : तर ! "तो" म्हणजे काय कमी नाही आहे ! "त्या"च्या फिल्ड मधे एकदम सचिन तेंडुलकर ! पण त्याचे ना "ते" जरा अतिच झाले "ह्या"ला बोलताना ! "हा" "इथे" रहात असला म्हणून काय झाले ? सगळेच "इकड"चे असले असतात काय ? स्वीपींग जनरलायझेशन, आय टेल यू !
मु.: ओ मामा ! मराठीत बोला ! निदान "चौपाटी"वर तरी ! आणि "त्या"ला तंबी देताना भेळवाला काय बोलला पाहिलेस ना ?
सु : भेळवाला महान आहे बाबा ! त्याच्या हातच्या भेळेची चव दुसरीकडे नाही !
मु.: ते बरोबर ! पण तो काय म्हणून गेला माहिताय ? म्हणतो "तुम्ही लोक भेळ कमी खाता नि भांडता जास्त ! काय नाही तर कधीतरी भेळ बंद करून जाईन निघून !"
सु: मग ? काय चुकलंय त्याचं ? भेळवाला झाला म्हणून काय ? माणूस आहे ना ? चिडणारच !
मु: अरे हो ! आपण माणसंच की सगळी. तुमच्या आमच्यासारखी काही चिल्लर ; आणि "ह्या"च्या -"त्या"च्या सारखी काही अरभाट ! पण अरभाटांनी थोडे अरभाटासारखे वागायला हवे !
सु : खराय मुक्तराव ! अहो , चौपाटी काय केवळ जागा आहे ? ही एक अशी गोष्ट आहे , की जिथे कुणीही आपले कुठलेही मत मांडू शकतो ! आणि बहुदा ते विरोधीच असणार कुणाच्या ना कुणाच्या ! पण त्यावर भांडून झाल्यावर जाताना दोघांना एकत्र भेळ खाऊन , हात मिळवून निघता यायला पाह्यजे !
मु: सुनितराव ! आपल्या चिल्लर लोकांची पंचाईत ही , की आपल्याला "ह्या"तले गुण सुद्धा दिसतात नि "ह्या"ने ओलांडलेल्या लक्ष्मणरेषाही दिसतात. "त्या"चा आगाऊपणा टोचतो , पण "त्याच्या"सारखे "ते" कुणीच करू शकणार नाही हेही माहिती आहे ! कसं व्हायचं आपलं ?
सु. : मुक्तराव , आपलं हे असंच नेहमी होत आलंय. तू काय नि मी काय , "आल्फा मेल" नाही. कुणी आपल्याला "सरशी तिथं पारशी" म्हणतो ; तर कुणी "कुंपणावरचे" म्हणतो.
मु : म्हणजे जगातले सहाशे कोटी लोक "कुंपणावरचे" का काय ? कुणाला आवडतात युद्धे आणि मारामार्‍या ? आपल्याला एखाद्याच्या (वाटलेल्या) चुकीच्या वाटलेल्या गोष्टीवर ताडताड बोलून जाणे म्हणजे "आल्फा मेल" बनणे असेल तर . ... नकोच ते !
सु.: मग ? निघायचं काय ?
मु: निघूया ! उद्या येणारच इकडे चौपाटीवर ! जातो कुठे चुकला फकीर ?? :-)

हे ठिकाणधोरणसमाज

प्रतिक्रिया

चतुरंग's picture

22 Nov 2008 - 3:48 am | चतुरंग

तुमचे चौपाटीवरील 'मुसुमुसुणे' आवडले! ;)

(खुद के साथ बातां : रंगा, इतस्ततः पडलेले भेळेचे कागद उचलत जा हो अधून मधून. चौपाटी कशी स्वच्छ हवी की नाही आपली? ;) )

चतुरंग

सर्किट's picture

22 Nov 2008 - 3:55 am | सर्किट (not verified)

आपल्याला एखाद्याच्या (वाटलेल्या) चुकीच्या वाटलेल्या गोष्टीवर ताडताड बोलून जाणे म्हणजे "आल्फा मेल" बनणे असेल तर . ... नकोच ते !

आल्फा मेलच्या विरुद्धार्थी शब्द काय आहे, माहिती आहे ना मुक्तराव ? "शेपूटघालू".

(प्राणी जगतातून हे दोन्ही शब्द आलेले आहेत.)

-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

मुक्तसुनीत's picture

22 Nov 2008 - 3:58 am | मुक्तसुनीत

चुकलेच . नुसत्या "ताडताड" च्या ऐवजी "वैयक्तिक शेरेबाजी असणारे , पाणउतारा करणारे ताडताड" असे म्हणायचे होते.
अर्थात , मुक्तराव नि सुनितराव , हे शेपूटघालूच ! त्याबद्दल नवा वाद नको !

धनंजय's picture

22 Nov 2008 - 3:58 am | धनंजय

मुक्त अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणि सुनीत-मर्यादित अभिव्यक्ती यांच्यामधील परस्परविरोध कधी संपणारा नाही.

चौपाटीची ब्यांडविड्थ (यासाठी इंग्रजी शब्द कुठला?) ही मोठी आहे, पण भेळवाल्याच्या गाडीभोवती थोडेच लोक गराडा घालू शकतात. त्यामुळे स्वातंत्र्य आणि मर्यादा यांच्यातील विरोध फारच प्रखर होतो.

चैत्रातल्या एखाद्या मस्तपैकी संध्याकाळी चौपाटीवर फेरफटका मारायला आपण जातो. भेळ खाता-खाता हलक्या-फुलक्या-गंभीर सगळ्या प्रकारच्या गप्पा आपल्याला हव्या असतात. पण भेळेला गुळाची चव यावी की नाही याबद्दलच हमरातुमरी आपल्याला ऐकू येते.

>निघूया ! उद्या येणारच इकडे चौपाटीवर ! जातो कुठे चुकला फकीर ??
खरंय.

विसोबा खेचर's picture

22 Nov 2008 - 10:25 am | विसोबा खेचर

लेखन ष्टाईल एकदम वेगळी व मस्त वाटली! :)

येऊ द्या अजूनही....

( "आमची भेळ ही आहे ही अशी आहे, खायची तर खा, वर त्या बाजूला ठेवलेल्या प्लाष्टिकच्या पिंपातलं पाणी प्या, निवांत गप्पा मारा, हसा खेळा आणि चालू पडा! भेळ नाही आवडली तर पुन्हा आमच्या गाडीवर येऊ नका! जोपर्यंत लोक प्रेमाने आमच्या गाडीवर भेळ खायला येताहेत, तोपर्यंत ठीक, नायतर गाडी बंद करून आम्ही स्वत:च दुसर्‍या एखाद्या गाडीवर भेळ खायला निघून जाऊ!" असे म्हणणारा गिरगाव चौपाटीवरील भेळवाला! ) तात्या.

--

बाय द वे, अनेक लोकांना आमची भेळेची गाडी खूप आवडते आणि नेहमी यावसंही वाटतं! परंतु काही मंडळींना मात्र आमच्या गाडीवरची भेळ पचत नाही! तरीही बापडे पुन्हा पुन्हा इथे भेळ खायला येतच असतात! :)

विनायक प्रभू's picture

22 Nov 2008 - 12:21 pm | विनायक प्रभू

एकावेळी दोन समुद्रकिनारे. हे राम. पहिला तो बघितला. नाय कळल. मग हा बघितला. लगेच सगळ कळल. ह्याचे त्याने हे केलेले लक्षात आले. ह्याला आणि त्याला दोघानाही दंडवत.
अवांतर : सगळ्-कोकणीत अर्थ??????