मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र

सौन्दर्य · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
(काही दिवसांपूर्वी, "How to take care of your wife" ह्या शीर्षकाचा एक लेख वाचला होता. त्या लेखाचा स्वैरानुवाद करण्याचा प्रयत्न केला आहे. काही ठिकाणी स्वानुभवाचे बोल देखील पेरले आहेत. आपण आयुष्यात खुश राहू इच्छिता ?? – हा घ्या गुरुमंत्र आपापल्या बायकाना सदा खुश ठेवा ? कसे ? अगदीच सोपे आहे, खालील नियम पाळा म्हणजे ‘आनंदाचे डोही आनंद तरंग ----------’ ह्याची गँरंटी. १) बायकोला आवडेल असे काहीतरी करा म्हणजे तुमच्या खात्यात मार्क जमा होतील. २) बायकोला आवडणार नाही असे काहीतरी केले तर तुमचे मार्क्स कमी होतील. ३) बायकोला जे काही अपेक्षित आहे ते तुम्ही केलेत – सॉरी, नो मार्क्स फॉर दँट, ते तुमचे नवरा म्हणून कर्तव्यच आहे. (कंसात तुम्हाला मिळणारे अथवा कमी होणारे मार्क्स दिले आहेत.) घरातले नियम - तुम्ही रात्री झोपण्यासाठी बिछाने घातलेत (+१) - तुम्ही बिछाने तर घातलेत, परंतु चादरींना साजेश्या उश्या ठेवायला विसरलात (०) - बिछान्यावरची चादर चुरगळलेली आहे (-१) - तुम्ही बाजारात बायकोला हवी आहे ती वस्तू आणायला निघालात (+५) - अगदी भर पावसात (+८) - पण फक्त बीअर घेऊन परत आलात (-५०) - रात्री काहीतरी शंकास्पद आवाज आला म्हणून झोपेतून उठून तो आवाज कोठून आला ते बघायला निघालात (०) - काहीही शंकास्पद आढळले नाही (०) - काहीतरी शंकास्पद वाटले म्हणून अर्धवट झोपेत तुम्ही काठीने ‘ते काहीतरी’ झोडपले (+५) - ‘ते काहीतरी’ बायकोची आवडती मांजर होती (-५००) सोशल गँदरींगमधले नियम - संपूर्ण पार्टीभर तुम्ही सतत बायकोच्या बाजूलाच राहीलात (०) - थोडावेळ तुम्ही बायकोबरोबर घालवला आणि नंतर तुम्ही तुमच्या कॉलेजमधल्या एका परिचीताशी गप्पा मारू लागलात (-२) - त्या परिचिताचे नाव ‘टीना’ आहे (-५) - टीना एका नाईट क्लब मध्ये डान्सर आहे ( -५०) बायकोच्या वाढदिवसाचे नियम (सुचना - वाढदिवस विसरलात तर पुढचे वाचायची गरज नाही, तुम्ही ‘वाचणार’ नाहीत, गँरेंटेड) - बायकोला सर्वात आधी, प्रेजेंट देऊन विश केलं (०) - बायकोला हॉटेलमध्ये जेवायला घेऊन गेलात (०) - ज्या हॉटेलमध्ये बार नाही अश्या हॉटेलमध्ये नेलेत (+१) - समजा हॉटेलमध्ये बार आहे (-५) - हॉटेलमध्ये बारबाला देखील आहे (-१५) - तिच्याबरोबर तुम्ही ‘चढती जवानी मेरी चाल मसतानी’ वर नाच केलात (घराचे दरवाजे तुम्हाला बंद) सिनेमाला घेऊन जायचे नियम - बायकोला तुम्ही सिनेमाला नेलेत (+२) - तिच्या आवडीच्या हिरो-हिरोईनच्या सिनेमाला नेलेत (+५) - तुमच्या, अगदी ना-पसंत हिरो-हिरोईनच्या सिनेमाला नेलेत (+८) - तुमच्या आवडीच्या सिनेमाला नेलेत (-५) - त्या सिनेमाचे नाव ‘मँडमँक्स – २’ असे होते (-२०) - तुम्ही तिला ‘तो फॅमिली ड्रामा आहे’ असे खोटेच सांगितले होते (-५०) खरेदीला जायचे नियम - बायकोला खरेदीला नेलेत (० मार्क – विसरलात ? ते तर तुमचे आद्य कर्त्यव्यच आहे) - बायको म्हणेल त्या दुकानात गेलात (०) - “अगं तुला चपला घ्यायच्या आहेत ना ? मग ह्या कपड्यांच्या दुकानात काय आहे ?” (-५००) - “अगं, तू हे जे बघते आहेस ना ते ‘झिरो’ साईजचे आहे” (-५००) - “तुझ्यासमोर जे काही मांडले आहे ते बघ ना, दुसरीचे कशाला ओढतेस ?” (-५००) - “मी ह्याला निळा रंग म्हणतो, तू त्याला, आकाशी म्हण, जांभळा म्हण की मोरपिशी म्हण, तो तुझा प्रश्न आहे” (-५००) - “दीपिकाला जे शोभते ते तुला देखील शोभेल हा गैरसमज आधी काढून टाक” (-५००) (तुमच्या) शरीरसौष्ठवाचे नियम - तुमचे पोट सुटले आहे (-१५) - तुमचे पोट सुटले आहे आणि ते आत घालण्यासाठी तुम्ही नियमित व्यायाम करीत आहात (+१०) - तुमचे पोट सुटले आहे आणि ते लपवण्यासाठी तुम्ही ढगळ पँट आणि शर्ट घालता आहात (-३०) - तुम्ही तिला म्हणालात, “त्यात काय झाले, तुझे देखील पोट सुटले आहे” (-५०००) संवादाचे नियम - तिने विचारले, “मी जाडी दिसत्ये?” (-१०, तुमचे उत्तर काहीही असो, तुमचे मार्क्स कमी होणारच) - तुम्ही उत्तर देताना आढेवेढे घेतलेत (-१०) - तुम्ही विचारलेत, “कोठे?” (-१००) - ती तिचे प्रॉब्लेम्स तुम्हाला सांगत आहे, तुम्ही ऐकल्यासारखे दाखवता आहात आणि चेहर्यावर साजेसे एक्स्प्रेशन्स देखील आहेत (०) - तुम्ही सतत तीस मिनिटाच्यावर, वरीलप्रमाणे ‘ऐकता’ आहात. (+३०) - तुम्ही सतत तीस मिनिटाच्यावर, टीव्हीकडे एकदा देखील न पाहता, वरीलप्रमाणे ‘ऐकता’ आहात (+५००) - तिला तुमचे नाटक कळले आहे कारण तुम्ही घोरायला लागला आहात (-२०००) - तिच्या माहेरच्या लोकांचे वर्णन तुम्ही तन-मन-धन अर्पून ऐकता आहात. (+५०) - तिच्या माहेरच्या लोकांचे वर्णन ऐकता ऐकता भान हरपले, थोडक्यात झोपलात (-५००) - तुमच्या माहेरच्या लोकांचे ‘गुणगान’ कपाळाला आठ्या घालून ऐकताय. (-५००) तर काय मंडळी आहे की नाही एकदम सोप्पे !!

वाचन 9242 प्रतिक्रिया 0