नमस्कार !!,
आज काल सगळीकडे टोल चा मुद्दा खूप गाजतोय. नुकताच सरकार ने काही टोल बंध केले आणि काही ठिकाणी तात्पुरती टोल माफी दिली .
मी सुरुवातीला स्पष्ट करतोय कि कोणत्याही राजकीय पक्ष आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी मी हे लिहित नाहीये.
हा तर चला मग, ज्या वेळेस मनसेने टोल चा मुद्दा घेतला त्याच्या आधी आपल्यासारख्या सामान्य माणसाचे तरी लक्ष होते का कि आपण किती आणि का टोल देतो ?? कधीतरी आपण विचारले का रे बाबा किती दिवस टोल घेणार ?
कारण टोल चा झोल आपल्याला काही माहित नव्हताच (आता हि कळणार नाही), मुंबई पुणे द्रुतगती मार्ग हा सध्या तरी महाराष्ट्रातील एक उत्तम मार्ग म्हणता येईल जिथे आपण टोल देतो काही प्रमाणात का होईना ठीक आहे.
पण हीच गोष्ट पुणे ते कोल्हापूर ह्या राष्ट्रीय महामार्गाला लागू होत नाही , सरासरी ५० ते ६० किमी ला टोल आणि रस्ते तर काय केवळ एक बाजू सिमेंट चे आणि दुसरी बाजू डांबर. काय हे ??????
आणि टोल कशासाठी तर म्हणे रस्ते व्यवस्थित ठेवणे आणि त्यांची निगा राखणे.
अरे कशाला बनवताय, आहे तोच रस्ता केवळ वरून डांबर मारले जाते. Just Patching जसे काही ठिगळ लावले आहे.
एक साधा हिशेब , मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर समजा एका चारचाकी ला ५० रुपये टोल घेतला तर एका दिवसाला तिथून ५०० चारचाकी गेल्या (५०x ५००=२५००० रुपये रोज ) तर महिन्याला सरासरी २५०००x ३०=७५०००० रुपये मिळतात. वर्षाला ९०००००० रुपये.
हे केवळ एक उदाहरण आहे, रस्ता बांधून आता जवळपास १५ वर्ष झालीत. तरी पण वसुली चालूच आहे.
आणि अजून किती दिवस टोळ भैरव पाळायचे ?????
प्रतिक्रिया
14 Apr 2015 - 8:34 pm | जेपी
आंदोलन करा कोल्हापुर वाल्यांसारख ...
(ट्रोलभैरव)जेपी
15 Apr 2015 - 11:34 am | मराठी_माणूस
टोल बंद करणे फार पुढची गोष्ट आहे. टोल च्या पास साठी डेबीट्/क्रेडीट कार्ड का स्वीकारले जात नाही.
वाहनांची संख्या दिवसेंदीवस वाढत असताना टोलचे पैसे कमी व्हायच्या ऐवजी वाढतात कसे ?
१५ ऑगस्ट, २६ जानेवारी अशा दीवशी, जोडुन अलेल्या सुट्ट्यांच्या दीवशी टोलनाके बंद ठेवणे शक्य होईल का ?
मागे एकदा एका उपनगरा जवळच्या रेल्वेच्या पुलाचा काही भाग लोकल वर पडल्यामुळे लोकल्स बंद होत्या, सगळी रहदारी रस्त्यावरुन होत होती आणि जॅम मुळे अतिशय संथ गतीने होत होती. ह्या अडचणीत टोलची भर होती. त्या वेळेस त्यांच्या कडुन टोल बंद करुन रहदारी सुकर करण्याची अपेक्षा होती पण त्याना मात्र ही पर्वणी वाटत होती. शेवटी एका संघटनेने त्यांना ते बंद करावयास भाग पाडले. हा टोलवाल्यां चा प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार होता.
15 Apr 2015 - 2:52 pm | नरेन.
मुंबई मध्ये येण्या-जाण्या करता ५ ठिकाणी टोल भरावा लागतो. थोडी आकडे मोड करून पाहू, मग कळेल कसे राजकारणी आणि टोल कंपनी ला हे सगळे असेच का चालू राहावे असे वाटते.
छोट्या गाड्यांची रोज ची संख्या (५ टोल नाके धरून) = १००००० (१ लाख)
टोल (सरासरी ३० रुपये, सुरुवात २५ पासून झाली होती आणि आता ३५ आहे.) = ३० रुपये
रोजचा जमा झालेला टोल = ३०००००० (३० लाख)
वर्ष भरातील साधारण जमा = १०९.५० कोटी
साधारण ११० कोटी निव्वळ छोट्या गाड्या कडून जमा होतो. जर १० वर्षाचा हिशोब लक्षात घेतला तर ११०० कोटी होतात. मालवाहू गाड्या, प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेस यांचा टोल तर यात धरला नाही आहे. विचार करा किती मोठ्या प्रमाणा वर टोल जमा झाला असेल.
त्यात ही रोज प्रवास करणाऱ्यांना मासिक पास सोडून काही ही सुविधा नाही आहे. परतीच्या प्रवासा करता दीडपट रक्कम घेणे अपेक्षित आहे, पण तरी देखील पूर्ण टोल घेतला जातो.
दुभती गाय कोण सहजा सहजी मारून टाकेल. अहो, आता गोवंश हत्या बंदी आहे. ;-)