ब्रिटीशांनी मलाया म्हणून एक राष्ट्र स्वतंत्र करून दिले होते. त्यांत सिंगापूर देखील होते. भारत पाकिस्थानच्या पेक्षा अगदी वेगळे घडले येथे. पाकिस्थान ला फुटून वेगळे व्हायचे होते. पण इथे, त्यावेळचे पंतप्रधान टुंकू अब्दूल रहमान ह्यांना अशी भिती होती की चायनिजपुढे मलेय लोकांचा निभाव लागणे कठीण आहे. भविष्यात कदाचित हे लोक आपल्याला दाबून टाकतील. म्हणून स्वतंत्र मलायाने चायनिजला सांगितले की सिंगापूर हा तुमचा देश वेगळा करून तुम्ही -हावा ! टुंकूला वाटले होते की हा टिचभर देश काय टिकतोय! हा आपलाच आश्रित बनेल!
ली यांना मुळीच वेगळे व्हायचे नव्ह्ते. त्यांनी एकत्र रहाण्यासाठी खूप समजावले. पण शेवटी त्यांना सिंगापूर देश बनवून वेगळे केल्या गेले.
सिंगापूरच्या नॅशनल टीव्हीवर आपण वेगळे झालो हे जाहीर करतांना ली अनावर होऊन रडले देखील होते. इतके त्यांना (त्यावेळी) ह्याचे दु:ख झाले होते.
पण नंतरचा इतिहास साक्षी आहे.... मलेशिया सिंगापूरच्या कितीतरी मागे पडला. लींच्या दूरदृष्टी आणि नियोजना मुळे सिंगापूर आज कुठल्या कुठे पोहोचले आहे.
देशासाठी आपले पूर्ण आयुष्य वेचणा-या ली कुआन यू ह्या कर्तबगार कर्मयोग्याला लाख लाख प्रणाम.
प्रतिक्रिया
25 Mar 2015 - 1:25 pm | ब़जरबट्टू
सावरुन वाचायला बसलो, तोवर संपले पण..
थोडी अजून भर घाला... :(
25 Mar 2015 - 1:34 pm | अरुण मनोहर
लीं विषयी काय काय लिहीणार?
आणि कितीही लिहीले तरी ते तोकडेच पडेल. बाकी गुगल, फेसबुक विकी... सगळीकडे आहेच की.
पण खरडफळ्यावर " हाकलण्यात आले" अशी भाषा वाचली अन राहवले नाही म्हणून थोडे खरडले.
बाकी मिपाकरांनी लीं विषयीच्या माहितीत भर टाकावी.
25 Mar 2015 - 10:36 pm | विशाखा पाटील
टुंकू अब्दल रहमान यांनी जाहीर केलं होतं की, आमच्यासमोर सिंगापूरच्या नेत्यांना अटक करणे किंवा सिंगापूरला फेडरेशन मधून काढून टाकणे (हाकलणे), हे दोन मार्ग आहेत. त्यातला काढून टाकण्याचा मार्ग आम्ही स्विकारला आहे.
असं असताना लेखात म्हटल्याप्रमाणे पुढे सिंगापूर आश्रित बनेल, हाही टुंकू अब्दुल रहमान यांचा विचार नसावा.
25 Mar 2015 - 1:34 pm | प्यारे१
द्रष्टा नेता कसा असावा याचं उत्तम उदाहरण असं आतापर्यंतच्या वाचनावरून वाटतंय. श्रद्धांजलि.
अवांतर: कर्मयोगी शब्दाचा अर्थ फार वेगळा आहे. तो सर्रास चुकीचा वापरला जातो. कार्यसम्राट किंवा तत्सम शब्द वापरायला हवा.
25 Mar 2015 - 1:39 pm | अरुण मनोहर
चुभुघ्याद्या.
कर्मयोगी चा अचूक अर्थ वाचायला आवडेल.
26 Mar 2015 - 12:18 am | प्यारे१
वेळ काढून व्यनि करेन
इथे अवांतर आणि अस्थानी होईल.
25 Mar 2015 - 1:39 pm | क्रेझी
६० वर्ष अगोदर जेव्हा Singapore हे Malaysia (Malaysia नी Singapore ला हाकलून दिले असे म्हणा) पासून वेगळे झाले तेव्हा Singapore Bएक जंगल होते. MumVbai पेक्षा हि लहान असलेल हे एक बेट. Natural resources नाही, कोळश्याच्या किंवा aluminium च्या खाणी नाही , त्यावेळेस उद्योग धंदे नाही, इतकेच काय तर प्यायचे पाणी पण नाही. प्यायचे पाणी त्यांना Malaysia कडून ५ रुपये लिटर भावाने विकत घ्यावे लागले. उद्योगाच्या नावावर फक्त मासेमारी.
ज्या दिवशी Singapore हे Malaysia पासून वेगळे करण्यात आले, त्या दिवशी एक माणूस ढासा ढासा रडला. आता आपल्या देशाचे काय होयील ह्या चिंतेत त्याने स्वतःला १२ दिवस एका खोलीत कोंडून घेतले. आणि बाहेर पडला तो एक निर्धार घेवुन. त्याने सरकार स्थापन केले, मंत्रिमंडळात हुशार लोक नेमले आणि लोकांना सांगितलं कि तुम्ही फक्त माझ्या पाठीशी उभे राहा. अत्यंत खंबीर आणि दूरदृष्टी असलेल्या ह्या एका माणसाने पुढील काळात मग Singapore चा असा काही कायापालट केला कि आज Singapore हे Asia मधील सर्वात समृद्ध राष्ट्र म्हणून मानल जात. त्या एका माणसाच्या Vision , Policies आणि Determination मुळे Singapore च आज जन्मलेल मुलं सुद्धा करोडपती आहे. जगातल्या मोठ्यातल्या मोठ्या कंपन्या रोज Singapore च्या दरवाज्यात उभ्या असतात, उद्योग सुरु करण्याच application घेवुन. त्या एका माणसामुळे आज Singapore citizens ला एवढा मान आहे कि जगातल्या १७० देशात Singaporeans ना VISA-Free एन्ट्री आहे! त्या माणसाचे नाव आहे Lee Kuan Yew, Singapore चे पहिले पंतप्रधान.
वयाच्या ९१ व्या वर्षी आजाराने त्याचे आज पहाटे निधन झाले. केवळ एक माणूस एखाद्या संपूर्ण देशाचं भविष्य कसं बदलवू शकतो ह्याच Lee Kuan Yew पेक्षा उत्तम उदाहरण कदाचितच असावे.
बहुधा अशी लोकं प्रेरणा देण्यासाठीच जन्माला येतात.व्व्होट्स्वरुरुन
साभार
25 Mar 2015 - 2:52 pm | अदि
भारताच्या नशिबात असा द्रष्टा नेता कधी येणार ??
25 Mar 2015 - 2:55 pm | टवाळ कार्टा
नेते सगळीकडेच असतात... लोकांच्या डोक्यात "अक्कल" असावी लागते
25 Mar 2015 - 5:52 pm | अत्रन्गि पाउस
लायकी ...
25 Mar 2015 - 11:49 pm | NiluMP
ह्यात लोकांचा दोष कसा? जरा विस्कटून सांगाल.
26 Mar 2015 - 7:09 pm | अभिजित - १
मोठ्या गोष्टी तर सोडून च द्या. छोट्या गोष्टी वर सुधा बोलायची कोणाची तयारी नसते. आपल्या सोसायटीत पण प्रत्येकाने हा अनुभव घेतला असेल -
जाऊ दे ना, आपल्याला काय करायचेय ? आपल्याला काही तितके अडत नाही .. इ. इ. टा इ प कातडी बचाव धोरण .. मग मोठ्या गोष्टीत काय बोलणार हे लोक ?
थोडक्यात जशी लायकी तसे सरकार ..
लोक दिखावू , मग सरकार पण तसेच ..
26 Mar 2015 - 7:20 pm | NiluMP
बंर, मग आता लोक Metro3 विरोध करताय तरीही सरकार ते लादु का पाह्त आहे.
26 Mar 2015 - 7:55 pm | NiluMP
आणि हो तुम्ही लोकपालच आंदोलन विसरलात वाटत. जनतेच सर्व प्रश्न सोडवायचे तर यांना काय उपटायला निवडूण दिलय.
जनतेला दोष देण्यापे निवडणुक पध्दतच बदला हिमंत असेल तर
26 Mar 2015 - 11:34 pm | अत्रन्गि पाउस
लोक आपल्या 'स्वतःच्या ' वागण्याने आपल्या आजूबाजूचे पर्याय निर्माण करत असतात ...
१.सार्वजनिक स्वच्छता
२.एकूण शिस्त
३.सामुहिक प्राधान्यक्रम
त्यातूनच तर छोट्यात छोट्या ग्रुप पासून लोकसभे पर्यंत आपले प्रतिनिधी ठरतात ...
त्यामुळेच आपल्या आजूबाजूला असलेल्या परिस्थितीला शेवटी फक्त आणि फक्त आपणच जबाबदार ठरतो
25 Mar 2015 - 5:24 pm | रेवती
माहिती आवडली.
25 Mar 2015 - 8:45 pm | आयुर्हित
देशासाठी आपले पूर्ण आयुष्य वेचणा-या ली कुआन यू ह्या कर्तबगार कर्मयोग्याला लाख लाख प्रणाम.
समयोचित लेख व शिकण्यासारखी बरीच माहिती मिळाली, धन्यवाद.
26 Mar 2015 - 7:16 pm | मेघनाद
आजच ली कुआन यु च्या संबधातील मेसेज whats app वर आला होता, लगेच मिपा वर वाचायला देखील मिळालं.
शेम टू शेम मेसेज क्रेझी ह्यांच्या प्रतिसादात आहे.