नमस्कार मित्रहो.
मी नुकतेच स्टेट बँकेकडून गृहकर्ज घेतले आहे. कर्जाची रक्कम रू. ३५ लाख. बँकेच्या पद्धतीनुसार आधी कर्जाच्या रकमेच्या चेकची छायाप्रत देण्यात आली. त्यावर मी १५ नोव्हें रोजी विकणार्या मालकांबरोबर सेलडीड केले. मग दोघांच्या सवडीने दि. २९ नोव्हें रोजी अॅपॉइंटमेंट घेऊन बँकेत गेलो व सेलडीड दिले. तेंव्हा प्रत्यक्ष चेक मालकांना देण्यात आला. तो त्यांनी दोन दिवसांनी भरला. मग तो त्यांच्या खात्यावर जमा झाला दि. ४ डिसें रोजी.
मी जेंव्हा आता स्टेटमेंट पाहिले, तेंव्हा माझ्या खात्यावर दि. ११ नोव्हें पासून ३० नोव्हें पर्यंतचे व्याज, जे रू. १८,५०० आहे, ते डेबीट दाखवले आहे. खरे तर बँकेतून रक्कम डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातच केंव्हातरी विकणार्यांच्या खात्यावर गेली आहे. बँकेच्या म्हणण्यानुसार, जेंव्हा चेक निघाला (११ नोव्हें), तेंव्हापासूनच व्याज सुरू झाले.
समजा मी बँकेत चेक भरला, तर बँक त्याच दिवशी बुक बॅलन्स दाखवते, पण व्याज मात्र मला ते पैसे प्रत्यक्ष माझ्या खात्यात आल्यावरच (व्हॅल्यू डेट) मला व्याज द्यायला सुरू करते. कर्जाच्या बाबतीत मात्र प्रत्यक्ष रक्कम बँकेतून गेलेल्या दिवसापासून नव्हे, तर चेक तयार झाल्याच्या दिवसापासूनच व्याज लावते. व्याजाची रक्कम तशी किरकोळ नसल्याने, हे बरोबर आहे का, असा प्रश्न पडला आहे. आपल्याला काय वाटते? बँकेबरोबर त्यांचा नियम एकांगी आहे, म्हणून भांडण्याचा फायदा होईल काय? ते सर्वाधिक परिणामकारक कसे होईल?
धन्यवाद.
-स्वधर्म
प्रतिक्रिया
9 Dec 2014 - 11:55 am | टवाळ कार्टा
जाणकारांच्या उत्तरांच्या प्रतिक्षेत
9 Dec 2014 - 12:01 pm | क्लिंटन
माझ्याबरोबरही असेच झाले. बँकेने ड्राफ्ट तयार केला होता १९ जुलैला आणि आमचे सेल डिड झाले १ ऑगस्टला.तरीही व्याज सुरू झाले १९ जुलैपासून.अलाहाबाद बँकेकडून कर्ज घेतले होते.इतर बँकांमध्ये कर्ज काढताना जितका त्रास होतो त्याच्या १०% त्रासही मला या बँकेत झाला नाही. तसेच कर्जही पहिले अॅग्रीमेन्ट केल्यानंतर १५ दिवसात मंजूर होऊन ड्राफ्ट तयारही झाला.एकूणच बँकेची सेवा आवडली.त्यामुळे १२ दिवसांचे व्याज भरावे लागले तरी त्याकडे दुर्लक्ष केले :)
9 Dec 2014 - 12:29 pm | स्वधर्म
बँके ने बराच वेळही लावला आणि घोळही केले. माझे चेक्स खात्यात बॅलन्स असतानाही सेलरला दिलेले चेक्स बाउन्स झाले. त्याचा दंड लावला. आता, तो रिव्हर्स करू असे सांगतायत.
भांडत बसायला वेळ नसतो, काम झालं की झालं असं माझं धोरण आहे, पण हे जरा अतिच होतय, म्हणून इथे विचारतोय.
-स्वधर्म
9 Dec 2014 - 12:43 pm | मोदक
भांडत बसायला वेळ नसतो
कस्टमर केअरला मेल पाठवा. एक कम्प्लेंट नंबर मिळेल त्यावर इमेलनेच तक्रारीचा पाठपुरावा करा.
"कस्टमर केअरकडे कशाला गेलात? आपण इथे सॉर्ट करूया" असले काही मॅनेजर म्हणाला तर सरळ फाट्यावर मारा. ते शक्य नसेल तर तो जे काही आश्वासन देईल त्याची त्वरीत अंमलबजावणी करून घ्या.
उदा. "तो रिव्हर्स करू असे सांगतायत." तर आज आत्ता लगेच रिव्हर्स करा असा आग्रह करा आणि चेक बाऊन्सचा रिपोर्ट सिबीलला गेला असेल तर तुम्हाला NOC घ्यावी लागेल का याचीही माहिती मिळवा.
(तसेच हा मॅनेजर बदलून गेला तर पुढच्या मॅनेजरला बँकेच्या कोणत्याही मदतीशिवाय तुमची केस तुम्ही समजावू शकाल इतकी कागदपत्रे तुमच्याकडे असणे आवश्यक आहे.)
9 Dec 2014 - 1:32 pm | कपिलमुनी
पूर्वी माझा एक कर्जाचा चेक बाउन्स झाला होता . नंतर मी तो लगेच भरला हलगेच, या साठी पण मला सिबिल साठीNOC घ्यावा लागेल का ?
9 Dec 2014 - 4:54 pm | स्वधर्म
ही सिबिलची भानगड माझ्या लक्षात नव्हती आली. चेक बाऊन्स झाल्याबद्दल बँकेकडून दिलगिरीचे पत्र घेऊन सिबिलला पाठवायला लागते काय? एन. ओ. सी.घेतले तर सिबिलला कसे कळ्णार? बँकेत विचारतोच.
पुन्हा धन्यवाद.
9 Dec 2014 - 1:10 pm | क्लिंटन
हो बरोबर. मला वाटते की १२-१५ दिवस जास्त व्याज लावले या बाबतीत फार काही करता येईल असे नाही.जर का लोन अॅग्रीमेन्टमध्ये व्याज पहिल्या दिवसापासून सुरू होईल असा क्लॉज असेल तर मात्र काहीच करता येणार नाही. पण खात्यात पैसे असूनही चुकीने चेक बाऊन्स करणे हा प्रकार बराच जास्त महत्वाचा आहे. त्याविषयी तक्रार करून काय करता येईल ते मात्र बघाच.
अवांतरः
स्टेट बँकेने माझ्या मित्राला होम लोन द्यायला जवळपास साडेतीन महिने लावले.इतका वेळ सगळ्यांच्या बाबतीत लागत नसला तरीही दोन-अडिच महिन्यांपर्यंत वेळ स्टेट बँक लावते हे अनेकांकडून ऐकले आहे. अनेकदा स्टेट बँक कमी व्याजात कर्ज देते म्हणून तिथे अर्ज केला जातो.पण स्टेट बँक कर्ज द्यायला इतका जास्त वेळ घेत असेल तर त्या बँकेकडे अर्ज करण्यात अर्थ नाही. मला १०.२५% ने व्याज भरावे लागत आहे तर स्टेट बँक १०.१०% ने कर्ज देत आहे. अगदी १०% ने स्टेट बँकेचे कर्ज मिळेल असे गृहित धरले तरी त्याचा माझ्या ई.एम.आय मध्ये सुमारे ८०० रूपयांचा फरक पडणार होता.म्हणजे वर्षाला १० हजारपेक्षा कमीच. जर बँकेने दोन महिने उशीर केला असता तर दोन महिन्यांचे भाडे मला जास्त भरावे लागले असते.एकिकडे दर वर्षाला वाचलेले १० हजार आणि दुसरीकडे दोन महिन्यांचे जास्त भरावे लागणारे भाडे यातून ब्रेक-इव्हन किती वर्षांनी होणार, दरम्यानच्या काळात किती मनस्ताप होणार, किती खेपा बँकेत माराव्या लागणार या सगळ्याचा हिशेब करून स्टेट बँकेकडे जायचे नाही असेच ठरविले. :)
9 Dec 2014 - 12:39 pm | संजय क्षीरसागर
रक्कम खात्याला डेबीट पडल्यावरच व्याज सुरु व्ह्यायला पाहिजे. कमीटमंट चार्जेस म्हणून एक प्रकार असतो (म्हणजे बँकेनं तुम्हाला ३५ लाख कमीट केल्याचा चार्ज), तसा काही क्लॉज लोन अग्रीमंटमधे आहे का ते पाहा. तो नसेल तर व्याज अयोग्य आहे.
9 Dec 2014 - 12:46 pm | स्वधर्म
नोंद (एंट्री) ०१ डिसेंबरची असून नॅरेशन 'डेबिट ईंटरेस्ट' असे आहे. बँकेच्या आधिकार्यांचे म्हणणे काय आहे (आमचा नियम असा आहे) ते मी सांगितलेच आहे.
- स्वचर्म
9 Dec 2014 - 12:53 pm | मोदक
माझ्या अनुभवानुसार कर्जाच्या रकमेचा DD दिला जातो त्यामुळे पैसे बँकेच्या खात्यातून डेबीट झालेले असतात आणि आपल्यालाच व्याज भरावे लागते.
चेक / DD ची झेरॉक्स प्रत तुमच्याकडे असेल तर पुन्हा एकदा तपासून पहा.
मी अशाच केसमध्ये ८ दिवसांचे व्याज भरले आहे.
9 Dec 2014 - 12:48 pm | योगी९००
मी आमच्याच कंपनीचा finance subsidiary कंपनी मधून कर्ज घेतले आणि असाच अनुभव आला. कर्ज काढताना कोठलाही म्हणजे कोठलाही त्रास झाला नाही. पण कंपनीने त्यांचा month-end quota पुर्ण करायचा असल्याने थोडा माझ्यावर दबाव टाकून ३० ऑगस्ट ला चेक काढला. (मला तो चेक ७ सप्टेंबर ला हवा होता). पण त्यानंतर त्यांनी ७ दिवसांचे व्याज लावले. (चांगले १२००० रुपये). खूप भांडलो पण काहीच उपयोग झाला नाही. (शेवटी आपलेच दात आणि आपलेच ओठ...).
9 Dec 2014 - 10:18 pm | मोदक
पण कंपनीने त्यांचा month-end quota पुर्ण करायचा असल्याने थोडा माझ्यावर दबाव टाकून ३० ऑगस्ट ला चेक काढला
मला आत्ता चेक नकोय असे ठणकावून सांगायचे राव.. आणि जर चेक ३० ला निघू शकत होता म्हणजे तुमची केस क्लीयर होती. अशा वेळी भुर्दंड का सहन करायचा..??
अर्थात कर्जाची आपल्याला गरज असतेच मात्र म्हणून हा प्रकार सहन करणे चूक आहे.
9 Dec 2014 - 12:52 pm | गणेशा
बँकेने चेक दिल्यावर व्याज सुरु होते, कारण त्यांच्या म्हणण्याने तुम्ही लगेच ती अमाउंट तुम्ही वापरु शकता. तुमच्या सवडीने तुम्ही कधीही व्यवहार केला तरी बँकेने ते पैसे तुमच्या साठी रिझर्व ठेवलेले असतात, आणि मला वाटते ते योग्य आहे. कारण त्यांनी त्यांची अमाउंट तुम्हाला दिली आहे असेच त्या चेक चा अर्थ असतो. भले ते डेबीट नंतर झाले असतील.
आणि दुसरा मुद्दा समजा तुमचे एकुन १८० हप्ते आहेत, ते ११ नोव्हेंबर ला चालु झाले तर अ८० वा हप्ता ११ नोव्हेंबरलाच संपेन. आणि ३० ला सुरु झाला तर ३० ला च संपेन.
आणि ११ ते ३० नोव्हेंबर मध्ये तो मालक जर तुमच्याकडुन व्याज घेत नाही तर तुम्हाला जस्त काळजीची कारण नाही.
कारण बॅक १८० च हप्ते घेईन. (ती रक्कम एक्स्ट्रा घेतली असे आपण म्हणु शकत नाही असे मला वाटते, एव्हडेच की तुमचा हप्ता लवकर सुरु झाला)
व्याज देणार आणि घेणारे हे बँक असते, जेंव्हा तुम्ही चेक भरता, जो पर्यंत ते त्यांच्या खात्याला येत नाही तो पर्यंत ते व्याज सुरु करत नाहीत.
9 Dec 2014 - 1:02 pm | स्वधर्म
माझा हप्ता १ डिसेंबरलाच चालू झालाय. ११ नोव्हें ते ३० नोव्हें चे व्याज लागले आहे. तो हप्ता नव्हे.
>> कारण त्यांनी त्यांची अमाउंट तुम्हाला दिली आहे असेच त्या चेक चा अर्थ असतो. भले ते डेबीट नंतर झाले असतील.
मग याच न्यायाने, त्यांनीही मी चेक भरलेल्या तारखेपासून व्याज द्यावे. त्या माणसाने पैसे तयार ठेवलेच होते की!
>> व्याज देणार आणि घेणारे हे बँक असते,
शेवटी हेच खरं.
>>जेंव्हा तुम्ही चेक भरता, जो पर्यंत ते त्यांच्या खात्याला येत नाही तो पर्यंत ते व्याज सुरु करत नाहीत
हेच ते!
9 Dec 2014 - 2:25 pm | गणेशा
ओके. बरोबर.
माझ्या बँकेने पहिला हप्ता घेतला होता बहुतेक निटसे आठवत नाही. म्हणुन मी लिहिले.
तुम्हाला चेक मिळाला होता का नक्की ? डीडी मिळत असतो शक्यतो.
डीडी असल्यास ते तुरंत त्या बंकेकडुन डेबिट असतात पैसे.
बाकी नियम बँकेना आण इसामान्य माणसाला सेम असले पाहिजेत.
पण सामान्य माणुस चेक बाउंस करु शकतो.. बॅंक करत नाही.
9 Dec 2014 - 12:54 pm | स्वधर्म
असा अनुभव आपल्या देशात नेहमीच येतो. बँकेला नियम असू शकतात, माझ्या कंपनीला असू शकतात, माणसाने ते पाळायचे आसतात. भले ते माणसाच्या बाजूने न्याय्य नसले तरी. नाहीतर जा कोर्टात.
- स्वधर्म
9 Dec 2014 - 1:04 pm | मोदक
असहमत... दरवेळी कोर्टात जावे लागत नाही.
नियम पाळणे दोघांना बंधनकारक असते. बँकेने नियम न पाळल्याने त्यांना (किंवा त्या मॅनेजरला) कोंडीत पकडल्याचे आणि नियमाची जाणीव करून दिल्याचे अनेक स्वानुभव सांगू शकतो...
9 Dec 2014 - 1:12 pm | डॉ सुहास म्हात्रे
नियम पाळणे दोघांना बंधनकारक असते. बँकेने नियम न पाळल्याने त्यांना (किंवा त्या मॅनेजरला) कोंडीत पकडल्याचे आणि नियमाची जाणीव करून दिल्याचे अनेक स्वानुभव सांगू शकतो...
याकरिता, कराराचे कागदपत्र नीट वाचून, अटी आणि नियम न समजल्यास / अन्याय्य वाटल्यास चर्चा करून मगच प्रत्येक कागदावर सही करणे आवश्यक असते. पण, हेच अपवादात्मक आहे !
बर्याचदा, कर्ज देते म्हणजे बँक आपल्यावर उपकार करते आहे किंवा केवळ आळसामुळे बँकेतिल अधिकारी म्हणतिल तेव्हा आणि म्हणतिल तेथे (फुल्यांच्या जागेवर) सह्या केल्या जातात आणि मग मात्र तक्रार केली जाते... अनेकदा तर असे अनेक छुपे आकार (चार्जेस) ग्राहकाला नकळत कापले जातात त्यामुळे तक्रारही होत नाही... अज्ञानातले सुख !
बँकांपेक्षा नॉन-बँकिंग फिनान्शियल कंपन्यामध्ये तर हे सर्रास आढलते.
9 Dec 2014 - 1:17 pm | स्वधर्म
पण भांडत बसण्याचा अनुभव येतोच.
9 Dec 2014 - 1:00 pm | डॉ सुहास म्हात्रे
हे लॉजिक साधारणपणे असे आहे...
१. एकदा रक्कम कमीट केली की ती तुमची होते, म्हणून व्याज सुरू.
२. रक्कम तुम्हाला नाही तर बिल्डरला द्यायला कमीट केलेली आहे म्हणून ती बँकेकडे तुमची अमानत म्हणून ठेवलेली असते, म्हणून तुमच्या खात्यात जमा होत नाही (कारण तुमच्या खात्यातली रक्कम तुम्ही इतर कारणांसाठीही वापरू शकता.).
एका अर्थाने "कर्जाची रक्कम तुमच्या नावावर करून तेवढ्याच किंमतीचा डीडी / बँकर्स चेक त्वरीत बिल्डरच्या नावाने काढल्या सारखे."
त्यामुळे कर्ज मंजूरी (सँक्शन) घेताना त्याच्या वापराबाबत ज्या दिवशी चेक मिळेल तेव्हापासूनच कर्ज वापरले (अव्हेल केले) जाईल अशी पूर्वतयारी ठेवावी. हे माहित नसले तर सँक्शनच्या दिवसापासून कर्ज दिले असे दाखवून बँक व्याज आकारायला सुरूवात करते आणि ताब्यात न दिलेल्या पैश्यावर व्याज आकारायला सुरुवात करते. शिवाय नंतर तक्रार केली तरी भांडत राहून कर्ज अव्हेल करणे (बिल्डरला चेक देणे) लांबवणे ग्राहकाच्याच तोट्याचे असते... हे वागणे ग्राहकाला अंधारात ठेऊन घेतलेल्या अनेक सह्यांमुळे (ज्या करताना ग्राहक ते पन्नास कागद वाचत नाही) अनितीचे असले तरी कायदेशीर आहे.
9 Dec 2014 - 1:28 pm | स्वधर्म
पण बँकेच्या बाजूने लावल्यासारखं वाटतंय. जोपर्यंत पैसे घेलले नाहहो, तोपर्यंत व्याज लावणे बरोबर नाही हेही लॉजिकच. पण बारीक टाईपातले मुद्दे वाचले नाहीत हेही खरंच. बघतो तुंम्ही म्हणता तसं आहे का.
धन्यवाद.
9 Dec 2014 - 7:37 pm | डॉ सुहास म्हात्रे
जोपर्यंत पैसे घेलले नाहहो
जेव्हा बँक तुम्हाला कर्ज मंजूर करते तेव्हा बँकेच्या खात्यातून तुमच्या नावावर (तुमच्या सेविंग खात्यात नाही तर कर्ज-खात्यात) पैसे टाकते... म्हणजे ते तुम्ही वापरा न वापरा, तुमचे कर्ज (आणि म्हणूनच व्याज) सुरू होते.वरच्या प्रतिसादात मी कर्ज घेताना घातलेल्या अटींबद्दल म्हटले आहे त्याप्रमाणे जर कर्जमंजूरीच्या करारातल्या अटींमध्ये कर्जाचा चेक घेतल्यावरच कर्ज सुरू अट मान्य करून घेता आली तर उत्तम. नाहीतर निदान बिल्डरबरोबरचे काम इतके पुढे आणावे की कर्जमंजूरी नंतर लगेच (फारतर एक दोन दिवसांत) चेक बिल्डरकडे पोचावा.
कोणतीही बँक कर्ज मंजू केल्यावर लगेच (किंवा काही थोड्या मुदतीतच) ते पैसे बँकेला इतर कामासाठी वापण्यास उपलब्ध नसल्याने कमिट्मेंट चार्जेस (एक प्रकारचे व्याजच) लावणारच... ये धंदेका सवाल हे भाय !
9 Dec 2014 - 1:12 pm | आनन्दा
मी आयसीआयसीआय मधून कर्ज घेतले होते, पण मी सकाळी चेकची झेरोक्स घेऊन दुपारी सेलडीड केले, आणि सन्ध्याकाळी ते डीड बँकेत देऊन दुसर्या दिवशी तो चेक डिपोसिट पण झाला, त्यामुळे याचा काही अनुभव नाही.
9 Dec 2014 - 1:41 pm | कपिलमुनी
या बद्दल बरेच वाईट अनुभव ऐकले आहेत ? तुम्हाला किती दिवस झाले ?
9 Dec 2014 - 2:04 pm | पैसा
बँकेत लोनसाठी बॅकेबरोबर अॅग्रीमेंट केल्यानंतर त्याच दिवशी लोन रिलीज करून घेतले असेल तर त्या दिवशीपासून व्याज लागणार हे कायदेशीरच आहे. जर तुम्ही कर्जाची रक्कम अमूक एक तारखेला रिलीज करून हवी आहे असे सांगितले असते तर ते बँक ऐकते. म्हणजेच लांब मुदतीच्या कर्जाच्या बाबतीत अॅग्रीमेंट केल्यानंतर एक महिन्याच्या आत कर्जाच्या रकमेची पहिली उचल केली पाहिजे असा सर्वसाधारण नियम असतो. अशी उचल झाल्या दिवसापासून व्याज सुरू होतेच. कारण बँक तुम्हाला जे कर्ज देते ते त्यानी लोकांकडून आलेल्या ठेवींपैकी काही पैशातून तुम्हाला दिलेले असतात. आणि ठेवीदारांना बँकेला व्याज द्यायचे असते.
चेकची फोटोकॉपी बिल्डरला दाखवावी लागते हे मला नवीन आहे. मी दोन फ्लॅट्स घेतलेत पण एकाही बिल्डरने अशी कॉपी मागितली नव्हती.
चेक खात्यात भरल्यादिवसापासून व्याज का मिळत नाही याचे उत्तर असे आहे की, चेक क्लिअरिंगला जो वेळ लागतो, त्या दिवसापर्यंत चेक पास झाला असे मानता येत नाही. क्लिअरिंगचा कालावधी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा असतो. गोव्यात तो तीन दिवस आहे. म्हणजे आज बँकेत भरलेला चेक दुसर्या दिवशी पेमेंट करणार्या बँकेकडे जातो आणि तिसर्या दिवशी तो पास झाला की बाउन्स झाला हे कळते. काही ठिकाणी लोकल क्लिअरिंग असेल तर एका दिवसात कळते. मुंबईत हा कालावधी बहुधा ५ दिवस आहे. (नक्की माहित नाही.) मधल्या काळात चेक रिटर्न आला (पास झाला नाही तर) तुम्हाला त्याचे पैसे किंवा व्याज कसे मिळेल?
खात्यात पैसे असताना चेक रिटर्न करणे मात्र गंभीर आहे आणि त्याबद्दल तुम्ही फार त्रास न होता सहज तक्रार नोंदवू शकता. मात्र चेक परत जाण्याचे कारण काय दाखवले होते हेही महत्त्वाचे आहे. जर चेकवर सही नसणे, सहीत फरक असणे, तारीख चुकीची असणे, रकमेत लिहिताना शब्दात आणि आकड्यात फरक असणे यापैकी काही कारण असेल तर ती तुमची चूक असेल.
9 Dec 2014 - 2:17 pm | मोदक
चेकची फोटोकॉपी बिल्डरला दाखवावी लागते हे मला नवीन आहे. मी दोन फ्लॅट्स घेतलेत पण एकाही बिल्डरने अशी कॉपी मागितली नव्हती.
कारण तुम्हाला तेथे रहायला जायची गडबड नसेल.. मी नवीन घरात रहायला जावून आठ दिवसांनी बिल्डरला DD दिला कारण माझा एक कागद बिल्डरकडून मिळाला नव्हता पण त्या दरम्यान बँकेने लोन पास करून DD काढून ठेवला व मला त्याची झेरॉक्स दिली.
मी ती झेरॉक्स बिल्डरला दिली व रहायला गेलो. बिल्डरकडून कागद मिळाल्यावर बँकेने DD दिला. या दरम्यानचे आठ दिवसांचे व्याज मला भरावे लागले.
DD असल्याने व्याज भरणे क्रमप्राप्त होते. चेक असता तर कदाचित असा विचार केला असता.
9 Dec 2014 - 6:05 pm | स्वधर्म
- इनसफिशिएण्ट बॅलन्स
माझे पगाराचे खाते आहे. ठराविक रकमेच्या वर शिल्लक गेली की आपोआप त्याची ठेव तयार व्हायची. अशा अनेक छोट्या ठेवी तयार झाल्या होत्या. माझ्ञा ऑनलाईन अकाऊंट्ला त्या दिसायच्या. पण मी एक मोठी ठेवही बँकेत जाऊन पावती करून ठेवली होती. झाले असे की, त्या स्वीप ठेवी चेक पास व्हायला आल्यावर आपोआप मोडल्या गेल्या पण ती मोठी ठेव मात्र मोडली गेली नाही. मग मी ती काळजी का घेतली नाही? कारण मला ती ठेवही अगदी इतर ठेवींसारखीच खात्यावर दिसत होती. ती आपोआप मोडली जाणार नाही, असा कोणताच अंदाज ऑनलाईन अकाऊंट पाहून आला नाही.
मी चेक देऊन देशाबाहेर गेलो होतो. मला सेलरचा चेक बाउंस झाल्याचा मेसेज आला. मग बायकोने ती ठेव स्वतः जाऊन मोडली व बॅलन्स अप केला. तरीपण दुसर्या दिवशी रिप्रे झेंट चेक परत सेलरच्या बँकेत परत गेले. मग मी माझ्या बँकेला त्या बँकेकडून चेक आणायला सांगितले व स्वतः बँकेच्या क्लिअरिंग हाऊसला फोन लाऊन ते पास होत आहेत याचा पाठपुरावा करत राहिलो. माझ्या अकाऊंटला पुन्हा बाऊन्स दिसताच कामा नये स्टँड घेतला. तेंव्हा एकदाचे ते गेले. अशा प्रकारे ते दोनदा बाऊन्स झाले.
मी बिल्डरकडून प्लॅट घेतला नाही. एका व्यक्तीचा रिसेलचा प्लॅट आहे तो. त्याला मी चेकची छाया प्रत दाखवल्याशिवाय सेल डीडवर सही का करेल तो? म्हणून ती कॉपी बँकेने त्यंच्या पच्दतीनुसारच दिली होती. पण मला एक सांगा पैसाताई, प्रत्यक्ष उच्चल झाल्याशिवाय बँकेने व्याज लावणं तुंम्हाला फेअर ऑन कस्टमर वाटतं काय? हे पैसे बाजूला काढून ठेवले वगैरे काय आहे? आपण एक इंडीव्हिज्युअल म्हणून बाजूला काढलेल्या पैशावर कोणाला व्याज आकारू शकतो काय? मी नोकरी बदलल्यावर नव्या कंपनीकडे रूजू तारखेपासून पगार मागू की, पहिल्या कंपनीतून राजीनामा दिलेल्या, रिलीज झालेल्या दिवसापासून ?
यालाच मी एकांगी नियम किंवा व्यक्ती पेक्षा संस्थेला झुकतं माप म्हणतोय.
9 Dec 2014 - 6:18 pm | मोदक
चेकची छाया प्रत दाखवल्याशिवाय सेल डीडवर सही का करेल तो?
तुम्ही प्रत्यक्ष चेक दिला आणि त्याने सही केली असेल तरी हा व्यवहार एक आश्चर्य समजण्यास हरकत नाही.
लोनच्या प्रकरणात (त्यातही रिसेलच्या) जर चेकचा व्यवहार होणार असेल तर चेक वटल्याशिवाय मी तरी कोणत्याही कागदावर सही करणार नाही.
थोडा विचार करा.. चेक बाऊन्स झाला आणि त्यादरम्यान सेलडीडवर स्वाक्षर्या झाल्या तर हे सगळे प्रकरण कोठे वळण घेईल..?
बहुदा वरती एकदा विचारले आहे.. आणखी एकदा - बँकेने नक्की चेक दिला होता की DD..?
9 Dec 2014 - 6:26 pm | स्वधर्म
माझे पूर्ण पैसे देऊन झाले होते. अन बँक सेल डीड दिल्याशिवाय प्रत्यक्ष चेक देतच नाही. म्हणूय्=त्यांनी केली सही.
9 Dec 2014 - 6:28 pm | मोदक
ह्म्म...
बँकर्स चेक काय भानगड असते कोणी सांगेल का..?
9 Dec 2014 - 6:42 pm | स्वधर्म
इज अॅज गुड अॅज अ डीडी. त्यावर बँकेच्या सक्षम आधिकार्याची सही असते. इतकेच माहिती आहे.
वरील प्रतीसादात दुरूस्ती. माझे पूर्ण पैसे देऊन झाले नव्हते, तर सेल डीडच्या वे़ळी त्यातले काही काँट्रीब्ञ्ब्यूशन देऊन माझे पैसे पूर्ण दिले व उरलेल्या रकमेचा बँकर्स चेकची कोपी दिल्यावर सेलरने सेल डीडवर सही केली.
9 Dec 2014 - 7:10 pm | आनन्दा
तसे होत नाही. सेलडीड मध्ये तश्या क्लोझेस असतात. आणि घर म्हणजे वस्तू नव्हे, त्यामुळे जर चेक वटला नाही तर ते डीड कॅन्सल होईल अशी क्लॉझ डीड मध्ये टाकू शकता. आणि तसेही तो चेक तुमचा नसतो, तर बँकेचा असतो, आणि बँकेचा चेक बाउन्स होत नाही :)
9 Dec 2014 - 7:18 pm | स्वधर्म
डीडवर सही सब्जेक्ट टू रियलायझेशन असा डिसक्लेमरखाली केलेली असते. न वटणारा चेक देणे हा दखल पात्र गुन्हा आहे.
9 Dec 2014 - 7:21 pm | पैसा
ठेव आपोआप मोडणे हे त्याच्या अर्जात लिहिलेल्याप्रमाणे घडते. कुठेही सही करताना आपण कशावर सही करतोय हे वाचूनच सही करायला पाहिजे.
तुमच्या दृष्टीने तुम्ही पैसे उचलले नाहीत, पण ज्या दिवशी बँकेने बँकर्स चेक्/डीडी काढला त्या दिवशी बँकेच्या दृष्टीने पैसे तुम्हाला दिलेले आहेत. ते तुम्ही विकणार्याला कधी देता याला बँकेच्या दृष्टीने अर्थ नाही. कर्ज खाते ज्या दिवशी चेक/डीडी काढला त्या दिवशीच सुरू झाल. कर्जाच्या सर्व अटी त्या दिवसापासून लागू होतात. याला उपाय म्हणजे बँकेचे सँक्शन लेटर त्या विक्रेत्याला दाखवून तुम्हाला फ्लॅटचा व्यवहार करता आला असता आणि ज्या दिवशी व्यवहार पुरा करायचा त्या दिवशी बँकेत कर्ज खाते उघडून चेक घेता आला असता.
एक उदाहरण देते. तुम्ही समजा एक घर भाड्याने घेतले. करार १ तारखेला केला तर भाडे १ तारखेपासूनच भरावे लागेल. "मी १० तारखेला रहायला आलो म्हणून भाडे १० तारखेपासून देईन" असे म्हटलेले चालत नाही. घर कर्जाच्या बाबतीत तुम्ही बँकेचे पैसे भाड्याने घेतले आहेत इतकाच फरक.
9 Dec 2014 - 8:24 pm | क्लिंटन
या बाबतीत बँका चालूपणा करतात.माझ्या कर्जाचा डी.डी तयार झाला १९ जुलैला.तो दिवस शनीवारचा होता आणि मी जवळपास संध्याकाळी ६ वाजेपर्यंत बँकेत होतो.तसेच कर्जाचे प्रत्यक्ष डिसबर्समेन्ट व्हायच्या आधी एक एन.ओ.सी आणणे गरजेचे होते (म्हणजे ती एन.ओ.सी ही सॅन्क्शनसाठीची गरज नव्हती तर केवळ डिसबर्समेन्टसाठीची गरज होती).ती एन.ओ.सी मिळेपर्यंत उशीर झाला आणि आमचे सेल डिड झाले १ ऑगस्टला.बँकेने डी.डी तयार करून ठेवला होता आणि सगळे प्रॉपर्टीचे पेपर बँकेत दिल्यानंतरच तो डी.डी घराच्या मूळ मालकाच्या ताब्यात दिला आणि त्या सगळ्या पेपरमध्ये ती एन.ओ.सी पण होती.असे असेल तर ती एन.ओ.सी मिळाल्यानंतरच बँकेला डी.डी बनवता आला असता.पण तरीही बँकेने १९ जुलैलाच डी.डी तयार केला.पण वर म्हटल्याप्रमाणे बँकेत मला खरोखरच काहीही त्रास झाला नाही.बँकेत केवळ तीन खेपांमध्येच सगळे काम १५ दिवसात झाले.इतरांचे अनुभव ऐकता मला काहीच त्रास झाला नाही आणि मनस्तापही झाला नाही.एका नॉन बँकिंग हाऊसिंग लोन कंपनीमध्ये माझ्या एका मित्राकडे एकूण कर्जाच्या रकमेच्या १% अंडर द टेबल पैसेही मागितले होते.तसला काहीही प्रकार माझ्या बाबतीत झाला नाही.तेव्हा काही दिवसांच्या व्याजाचा मी पण फार बाऊ केला नाही.
9 Dec 2014 - 9:02 pm | स्वधर्म
>> ठेव आपोआप मोडणे हे त्याच्या अर्जात लिहिलेल्याप्रमाणे घडते. कुठेही सही करताना आपण कशावर सही करतोय हे वाचूनच सही करायला पाहिजे.
ऑटोमॅटीक ठेवी होताना ना सही करावी लागते, ना अर्ज. तसेच सही करताना बँकेत अॅपॉइंटमेट देतात. ४५ मिनीटापेक्षा जास्त वेळ देत नाहीत, कारण त्यांना पुढचा कस्टमर थांबलेला असतो. तेवढ्या वेळात बरेच फॉर्म्स इ. भरून घेतात. अशा वेळी सगळे कागद द्या. वाचून उद्या येतो व मग सही करतो, असे म्हटलेले चालेल काय? आणि माझ्या आक्षेपासाठी बँक कुठला क्लॉज बदलेल काय? प्रयत्न केला नाही, पण शंका वाटते.
बाकी घर भाड्याचे उदाहरण पटले नाही. पैसा हे चलन आहे. आणि त्यातही तो प्रत्यक्ष नोटा नाहीत. तो कसाही हलवता, फिरवता, वापरता येतो, जोपर्यंत घेतला नाही तोपर्यंत.
9 Dec 2014 - 9:30 pm | पैसा
तुम्हाला पटले नाही तरी बँकेच्या दृष्टीने पैसा ही भाड्याने द्यायची-घ्यायची वस्तूच आहे. ते धंदा करायला बसलेले आहेत. त्यात साईड इफेक्ट म्हणून कोणाचे भले झाले तर वा वा! नाही झाले आणि काही प्रॉब्लेम झाला तरी बँक आपले पैसे वसूल करणारच. एखाद्या ठेवीदाराने पैसे परत मागितले तर ते त्याला असे सांगू शकत नाहीत की "अरे त्या अमक्याचे पैसे आले नाहीत म्हणून आम्ही तुमचे पैसे परत देऊ शकत नाही". बँकेचा धंदा हा सहानुभूती आणि भावनांवर चालत नाही. तो कोरडा व्यवहार असतो.
बँक फॉर्म्स वाचूनच सह्या केल्या पाहिजेत. त्यात बरेच क्लॉज, सबक्लॉज, फाईन प्रिंट्स असतात. ४५ मिनिटेच काय, बँकेचे फॉर्म्स घरी नेऊन वाचून दुसर्या दिवशी जाऊन सह्या केल्यात तरी कोणी काही बोलणार नाही. आपला फायदा आपणच पाहिला पाहिजे. तिथे कोणत्याही सबबी चालणार नाहीत. लहान ठेवी ऑटोमेटिक तयार होत होत्या त्याच अर्जाखाली ही मोठी ठेव केली होती का त्यासाठी स्वतंत्र अर्ज भरला होता हे तुम्ही स्पष्ट केले नाही. प्रत्येक कागद वाचून सही करणे ही कोणत्याही माणसाची जबाबदारी आहे. उद्या समजा कोणी कोर्या कागदावर सही कर म्हटले तर तुम्ही कराल का?
11 Dec 2014 - 11:23 am | असंका
सुरेख विश्लेषण! शब्दाशब्दाशी सहमत!!
_/\_
9 Dec 2014 - 3:09 pm | रघुपती.राज
चेक बाउन्स झल्यास सिबिलला काही फरक पडत नाही.
जर कर्ज फेड करण्यासाठी दीलेल्या चेक पैकी एखादा वटला नाही तरी सिबिल स्कोअर ला फरक पडत नाही.
पण वारन्वार कर्ज फेडिचे चेक वटले नाहीत तर मात्र सिबिल स्कोअर निश्चित घसरतो. एखाद्या चेकचे मनावर घेउ नका. पण तशी सवय होउ देउ नका.
9 Dec 2014 - 3:33 pm | सुनील
तुम्ही चेक तुमच्या बँक अकाउंटमधून देता. सिबिलकडे तुमच्या बँक अकाऊंटची माहिती नसते. त्यामुळे चेक बाउन्स झाला किंवा काय याने सिबिलला शष्प फरक पडत नाही.
फरक पडतो तो बाउन्स झालेल्या चेकच्या परिणामामुळे.
त्या न वटलेल्या चेकमुळे तुमच्या कर्जाचा EMI चुकलाय काय? किंवा तुमच्या क्रेडिट कार्डाचे पेमेंट हुकलेय काय? जर याचे उत्तर होय असे असेल तर, सिबिल स्कोअरवर परिणाम नक्कीच होणार.
जर तसे नसेल, तर त्या न वटलेल्या चेकमुळे तुमच्या सिबिल स्कोअरवर परिणाम होणार नाही. कारण ती माहिती सिबिलपर्यंत पोचणारच नाही.
9 Dec 2014 - 5:11 pm | स्वधर्म
गेल्या दहा वर्षात कर्ज, क्रेडीट कार्ड इ. नसल्याने, सिबिलचा विचारच आला नाही. पण तरीही एनओसी किंवा दिलगिरीचे पत्र नक्की घेईन. बँकेने कागदपत्रे घेताना पहिल्यांदाच सिबिलचा विषय आला होता. माझे काहीच रेकॉर्ड नसल्याने बहुधा तो -२ येईल असे सांगितले होते, पण नंतर तो विषय आलाच नाही.
9 Dec 2014 - 5:58 pm | क्लिंटन
सिबील स्कोअरशिवाय बँक गृहकर्ज देते हे मला माहित नव्हते.त्या नव्या माहितीबद्दल धन्यवाद. मी ज्या चार ठिकाणी चौकशी केली होती त्यात किमान ७५० स्कोअर हवा (एका बँकेत ७००) असे मला बँकेतल्या लोकांनी सांगितले होते. प्रत्येक बँकेची पध्दत वेगळी असावी.
9 Dec 2014 - 6:02 pm | मोदक
बहुदा काहीच कर्ज / क्रेडीट कार्ड नसल्याने सिबील स्कोअरला काही नुकसान नसावे. त्यामुळे सिबीलचा विषय लोन प्रकरणात फारसा चर्चिला गेला नसावा.
एक शक्यता....
9 Dec 2014 - 6:08 pm | स्वधर्म
कदाचित माझा स्कोअर परस्पर चेक केला असावा, पण मला काहीच माहीती नाही.
9 Dec 2014 - 6:13 pm | लॉरी टांगटूंगकर
आत्ताच विचारलो. जर का काही क्रेडीट हिस्ट्रीच नसेल तर काय म्हणजे काहीच प्रॉब्लेम नसतो. ब्यांकेच्या स्टाफला लॉग इन करून सिबील स्कोर बघता येतो. तो असायलाच पाहीजे असं कंपल्शन नाही, पण घेतलेली कर्ज वेळेवर दिली नाहीत तर ते दिसतं आणि मग त्यानुसार ब्यांक निर्णय घेते.
आमची बरीच मित्रमंडळी वेगवेगळ्या ब्यांकात आहेत. काय शंका असेल तर विचारता येईल.
9 Dec 2014 - 7:14 pm | पैसा
कन्झ्युमर लोन क्याटेगरीतल्या लोन्सना सहसा सिबिलचे रेकॉर्ड बघायची गरज नसते. तसेच ५० लाखपर्यंतच्या घर कर्जाला सिबिल कम्पल्सरी नव्हते. (२ वर्षांपूर्वी) लेटेस्ट माहित नाही. कारण ५० लाखाच्या वरचे घर कर्ज तेव्हा रिअल एस्टेट लोन गणले जात असे.
9 Dec 2014 - 10:19 pm | क्लिंटन
हे नियम बहुदा बँकांपरत्वे बदलतात असे दिसते. मी २००९ मध्ये स्टेट बँकेकडे शैक्षणिक कर्जाला अर्ज केला होता.ती रक्कम अर्थातच कन्झ्युमर लोक होती आणि रक्कमही अर्थातच ५० लाख पेक्षा कमी होती.तरीही माझ्या सिबील रिपोर्टवर २००९ मधील स्टेट बँकेची स्टुडन्ट लोनसाठीची इन्क्वायरी आहे.तसेच मी ज्या क्रेडिट कार्डांना अॅप्लाय केले त्याची एन्क्वायरीही माझ्या रिपोर्टवर आहे.आणि त्या क्रेडिट कार्डांची लिमिट ५० लाखपेक्षा कितीतरी कमी होती :) आताही होम लोन ५० लाखापेक्षा कमीच आहे.होम लोनशी संबंधित मी जे काही बँकेला दिले होते त्याची एक जाडी फाईल बँकेकडे होती.त्यात माझा सिबील रिपोर्टही होता.
9 Dec 2014 - 11:17 pm | पैसा
बँकेच्या भाषेत आपण ज्याला abundant caution म्हणतो त्यासाठी आणि क्रेडिट रेटिंग चार्ट तयार करताना सावधगिरी म्हणून सिबिल रिपोर्ट बघितले आतात आणि एकदा तुमचे नाव आणि जन्मतारीख सर्चमधे आली की दर वेळी ती इन्क्वायरीमधे रिपोर्ट होते. जेव्हा सिबिल नव्याने आले तेव्हा आम्हीही प्रत्येक अर्जदाराची चौकशी घेत होतो याची आठवण आली. ही इन्क्वायरी त्यांच्या सिबिल रिपोर्टमधे नोंदली गेली असणारच! काही बँका असा सर्च कशासाठी केला होता हे अनडिस्क्लोज्ड ठेवतात तर काही बँका सगळे डिटेल्स तिथे ठेवतात. सिबिल रिपोर्टमधे समजा थोडेफार इकडे तिकडे असेल तरी इतर काही प्रकारचे मार्क्स वाढवून म्यानेजर लोक कर्ज मंजूर करतात. काही लोकांचे क्रेडिट कार्ड्स क्रॉनिक ओव्हरड्यु असतानाही त्यांना कर्जे मंजूर केलेली मी पाहिली आहेत. ती कशी हे मात्र विचारू नका! मात्र अगदीच वाईट रिपोर्ट असेल तर कर्ज मिळणे सर्वसाधारणपणे अवघड जाते.
9 Dec 2014 - 11:30 pm | खटपट्या
बरोबरे !! माझ्या दुसर्या होमलोनच्या वेळेस मला बँकेतील माणसाने फोन करुन एका कँसल झालेल्या विमा पॉलीसीबद्द्ल विचारणा केली होती. त्याला ही माहीती सीबील कडूनच मिळाली असणार.
अजून एक मुद्दा, त्याने मला हेही विचारले की "घरासाठी जी १५% रक्कम स्वत: भरणार आहात ती कुठून भरणार?"
बँक असा प्रश्न विचारू शकते का?
10 Dec 2014 - 12:15 am | पैसा
बँक असा प्रश्न विचारू शकते आणि विचारतेही. कारण राहिलेले १५% तुमच्याकडे खरेच आहेत का, नसले तर ते उभे करायची काय योजना आहे, नातेवाईकांकडून उधार, पर्सनल लोन वगैरे याची खात्री करावी लागते. नाहीतर ते पैसे भरले गेले नाहीत तर उद्या बिल्डर फ्लॅटचा ताबा देणार नाही. म्हणजेच बॅंकेच्या कर्जातून जी अॅसेट निर्माण व्हायला हवी ती न झाल्यामुळे बँकेचे कर्ज विनातारण बनेल. यासाठी मार्जिनचे १५% आधी भरावे लागतात आणि बँकेची कर्जाची रक्कम नंतर वितरित होते.
9 Dec 2014 - 11:33 pm | सुबोध खरे
मी वेगवेगळ्या कारणांसाठी सात वेळा कर्जे घेतली आहेत. (घरांसाठी तीन, दवाखान्यासाठी एक, सोनोग्राफी मशीनसाठी एक , मोटारीसाठी एक आणि मोटार सायकलसाठी एक)परंतु सिबिलचा रिपोर्ट कधीहि लागला नाही. सात पैकी ५ कर्जे फेडून झाली आहेत (एक राहत्या घराचे आणि सोनोग्राफी यंत्राचे कर्ज चालू आहे ). सर्व कर्जे हि खात्यातून सरळ वजा होतील हि सोय केलेली होती/आहे १७ वर्षात क्रेडीट कार्डावर एकही पैसा व्याज भरलेले नाही( वेळेत पैसे भरल्यामुळे). आजही सिबिलचा रिपोर्ट मिळवण्यासाठी ४५० रुपये का भरावे असा विचार आहे? दोन बँकांनी(SBI आणि CITI) मला न विचारता क्रेडीट कार्ड पाठवले आणि बिल सुद्धा. मी बिल न भरता त्यांची वरपर्यंत तक्रार केली आणि दोन्ही बँकांनी सहा आणि आठ महिन्यांनी पूर्ण बिले आणि कार्डे माफ/रद्द केली.
फक्त एकदा बँकेच्या चुकीने ECS bounce झाले( एका खात्यात पैसे नसतील तर दुसर्या खात्यातून पैसे वळते असावेत असा उभा आदेश(standing instruction)असूनही ते परत पाठविले गेले. त्याचा भुर्दंड मी बँकेच्या कर्मचार्यांना भरायला लावला होता. आणि तो हप्ता मी रोख रक्कमेने दुसर्या दिवशी भरून टाकला.
एक उत्सुकता -- या गोष्टींचा उल्लेख सिबिलमध्ये असेल का ?
10 Dec 2014 - 12:08 am | पैसा
सिबिलकडे सगळ्या कर्जांची नोंद होते. त्यात किती हप्ते ओव्हरड्यु आहेत (असलेच तर) हेही दिसते. मात्र ईसीएस बाउन्स झाल्याची नोंद होणार नाही. कारण ओव्हरड्यु दाखवण्यापूर्वीच तुम्ही तो हप्ता भरला होता.
9 Dec 2014 - 5:12 pm | स्वधर्म
रघु, धन्यवाद
9 Dec 2014 - 8:27 pm | सुहास पाटील
जर गृह कर्ज ग्यावे तर नेहमी स्टेट बॅंकेचेच घ्या. कारण दोन फायदे आहेत. एके तर स्टेट बँक नेहमी सगळे कागद पत्र पडताळून लोन देते. बिल्डर कडून फसगत होणायचे च्नाचेस ९९% नाहीत. दुसरा फायदा असा कि max gain लोन account असेल तर एकदम मस्त. लोन प्रीपेड करून टोटल व्याज कमी करता येते आणि हवे तेव्हा पैसे लागले तर काढून घेता येतात. जितके दिवस जास्तीचे पैसे राहिले तितक्या दिवसांचे व्याज कमी होते. इथे पूर्ण लोन कालावधीचा विचार केला तर खूप व्याज वाचवता येते
9 Dec 2014 - 8:29 pm | सुहास पाटील
माहित आहे सुरवातीला सत्ते बँक थोडा त्रास देते पण बिल्डर ला आपण सुधा थोडे ताटकळत ठेवायला शिकले पाहिजे
9 Dec 2014 - 8:47 pm | स्वधर्म
नाहीतर मी तिथून शैक्षणिक कर्ज घेतले होते. असा अनुभव आला होता, की पुन्हा यांच्या दारात जाऊच नये, असे वाटले होते. पण तो मॅनेजरच खडूस होता. त्याने मला हीरो पेन (२५ रूचे) कशाला हवे, साधे ८ रू चेच सँक्शन करता येईल, असे म्हणून कोटेशन आणायला लावले होते.
आत्ता त्या नादाला लागलो ते मॅक्सगेनसाठीच.
9 Dec 2014 - 9:16 pm | प्यारे१
तुम्हाला लोकांचं 'जेन्युईन' मत हवं आहे असं वाटत नाहीये.
तुमच्या मताशी सहमत नसलेल्या मतांना तुम्ही एकतर अव्यावहारिक म्हणत आहात अथवा पटत नाही असं म्हणत आहात. (लॉजिक पटतंय पण बँकेच्या बाजूनं लावलंय किंवा घर भाड्याचे उदाहरण पटले नाही. वगैरे)
तुम्हाला विनंती की तुम्ही सुद्धा दुसर्या बाजूने विचार करावा. बँक व्यवसाय करायला बसली आहे.
इएमआय च्या ८०% च्या वर रक्कम आपण किमान ३-४ वर्षे व्याज म्हणून भरतो. त्यात आणखी वरच्या १५ दिवसांची भर घाला. १० वर्षांनी ही रक्कम फार काही वाटणार नाही. (घराच्या किंमतीच्या तुलनेत. व्यावहारिक आणि भावनिक किंमत) ;)
10 Dec 2014 - 12:02 am | स्वधर्म
त्यातली काही:
- बँक धंदा करायला बसली आहे. ते आपला फायदा व्हावा असेच नियम बनविणार. आपल्या हिताची जबाबदारी आपली आहे.
- जरी कोणी कितीही ओळखीचे असले, सहकार्य करतायत असे वाटले, तरी सही करण्यापूर्वी कागद पूर्ण वाचून, समजून घेऊन सही करावी. भीड नको. घाई नको. जसे की क्लिंटन यांनी सांगितलेला क्लॉज असू शकतो, हे लक्षातच आले नव्हते.
- सिबिल संबंधी नविन माहिती मिळाली व महत्त्व समजले.
- व्याजापेक्षा चेक परत जाण्याची बाब गंभीर आहे हे सजमजले. आणि सर्वांच्या माहिती साठी आजच बँकेने माझे चेक रिटर्न चार्जेस परत खात्यावर जमा केल्याचे दिसून आले. म्हणजे ते न्याय्य व माझ्या चुकीमुळे झाले नव्हते, हे सिद्धाच झाले.
तुमचा शेवटचा मुद्दा - व्याजाची रक्कम नगण्य आहे. १८५००, तुमच्यासाठी नगण्य असले तरी माझ्यासाठी नाहीत, हे नम्रपणाने नोंदवतो. देय व न्याय्य असलेले व्याज देण्यात मला काहीच हरकत नव्हती. पण निदान ते तसे आहेत का हे समजून घेत आहे. एक तर नक्की की इथे अनेक सदस्यांनी आपल्या बाबतीतही तसे झाल्याचे सांगितले. काहींनी 'सोडून' दिले, कारण पटकन लोन झाले होते, आठच दिवसांचे व्याज होते, असे म्हटले आहे. माझ्यासाठी लर्निंगः हे एवढे सरळ नाही, जरा हुशारीने हे किमान टाळता तरी आले असते, असे आहे.
त्यासाठी अनेक सदस्यांनी अनेक मुद्दे उलगडून सांगितले, त्यांचे मनापासून आभार.
- स्वधर्म
10 Dec 2014 - 2:13 pm | प्यारे१
रक्कम नगण्य आहे असं म्हटलेलं नाही, मनस्ताप कमी करण्यासाठी आवश्यक उपायांपैकी एक उपाय असं त्या सूचनेचं स्वरुप आहे.
बाकी पैसे परत मिळण्यासाठी आपली बाजू १००% बरोबर असणं आवश्यक असतं. (बँकेला करारादिवशीचाच डीडी काढायला लावणं अथवा तशा सूचना देणं वगैरे.)
>>> निदान ते तसे आहेत का हे समजून घेत आहे.
आपल्याकडं बहुतेकदा करार होण्या आधी काही अनाकलनीय कारणानं गोपनीयता बाळगली जाते नंतर अरे मी फसवला गेलो वगैरे घोषे सुरु होतात. हाच धागा कराराआधी जास्त उपयुक्त ठरला असता.
कधी कधी आपली बाजू योग्य असूनदेखील पैसे मिळत नाहीत हेदेखील तितकंच खरं आहे. अशा वेळी मनस्ताप कमी करण्यासाठी वरील सूचनेचा वापर उपयोगी आणि व्यावहारीक ठरतो.
>>> हे एवढे सरळ नाही, जरा हुशारीने हे किमान टाळता तरी आले असते, असे आहे.
हे बरोबर आहे.
तरी ही प्रयत्न करत असाल तर पैसे मिळण्यासाठी हार्दिक शुभेच्छा!
10 Dec 2014 - 2:23 pm | मोदक
प्यारे काका...
बहुदा त्यांना असा काही मुद्दा असेल असे माहिती नसल्याने व्याज गेल्याचा त्रास झाला असावा..
मला माहिती होते मी अमुक अमुक इतके पैसे ८ दिवसांच्या व्याजरूपात भरणार आहे त्यामुळे मी त्या व्याजाचा बेशर्त स्वीकार केला होता.
तुमचा नक्की विरोध / आक्षेप कशाला आहे ते मला कळाले नाही.
10 Dec 2014 - 2:31 pm | प्यारे१
वास्तवाला सामोरं जाण्याची त्यांची मानसिकता जाणवली नाही म्हणून सांगितलं. आक्षेप अथवा विरोध नाही.
'मला वाटतं' अथवा 'माझ्या मते' ह्याबरोबरच 'मला माहिती नव्हतं' ह्या गोष्टींना बाजारामध्ये काडीची किंमत नसते हे वास्तव आहे.
इ.ए. अथवा पैसानं दिलेल्या उदाहरणांमधून ते बँकेच्या बाजूनं वाटतंय, हे पैसे काही चलनी नोटा नाहीत मग का व्याज लावतात वगैरे गोष्टी त्यांनी लिहील्या आहेत त्यावरुन मला तसं वाटलं.
10 Dec 2014 - 2:37 pm | मोदक
ओके. :)
10 Dec 2014 - 5:49 pm | स्वधर्म
>> मला माहिती होते मी अमुक अमुक इतके पैसे ८ दिवसांच्या व्याजरूपात भरणार आहे त्यामुळे मी त्या व्याजाचा बेशर्त स्वीकार केला होता.
मी ऑनलाइअन लोन अकाउंट व त्यावर बुक बॅलन्स ( क्लिअर डेबिट नव्हे) दिसू लागल्यावर बँकेत फोन करून व्याज कधी सुरू होणार विचारले होते. मला उत्तर मिळाले डिसबर्समेंट झाल्यावर.
>> तुमचा नक्की विरोध / आक्षेप कशाला आहे ते मला कळाले नाही.
मलाही नव्ह्ते कळले. खाली प्यारे काका यांनी वास्तवाचा स्विकार करण्याची मानसिकता दिसत नाही, असेही लिहिले आहे. त्यांना विनंती की माझा मूळ प्रतिसाद पहावा. व्याज लावले हे बरोबर आहे का, असा प्रश्न पडला आहे, व म्हणून धागा काढत आहे असे लिहिले आहे. त्यावर पैसाताई व अनेकांनी लॉजिक दिले. काही पटले, काही तितके नाही. यात मानसिकता वगैरेचा काय संबंध, हेही कळले नाही.
13 Dec 2014 - 12:28 pm | hitesh
समजा ब्यान्केकडे वीस हजार रुपये आहेत.
तुम्हई ब्यान्केकडे दहा हजाराचे कर्ज मागितले. ब्यान्केने तुम्हाला ड्राफ्ट किंवा चेक दिला.
ज्या दिवशी तुम्हाला ड्राफ्ट / चेक दिला त्याच दिवशी तुम्हाला ती रक्कम अलोकेट झाली.
आता दुसरा कस्टमर समजा वीस हजाराचे कर्ज मागायला आला. तरत्याला ब्यान्क दहाच हजार देणार . कारण ब्यान्केकडच्या पैशामधील दहा हजार तुम्हाला अलोकेट झाले आहेत.
त्यामुळे तुम्ही चेक ड्राफ्ट किती का तारखेला वठवा , ब्यान्केच्या दृष्टीने ज्या दिवशी तुमचा चेक ड्राफ्ट तुम्हाला दिला तेंव्हाच ते पैसे तुम्हाला दिले कारण ब्यान्क आता ते पैसे दुसर्याला वापरु शकणार नाही.
10 Dec 2014 - 1:34 am | मुक्त विहारि
तितकेच माहितीपुर्ण प्रतिसाद...
11 Dec 2014 - 12:20 pm | hitesh
हो ना ! तिसर्या म्हमईत जायला हे ज्ञान कदाचित उपेगी पडेल.