म्हणींचे अर्थ आणि वाक्यात उपयोगाची उदाहरणे हवीत

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
26 Nov 2014 - 8:49 am
गाभा: 

नमस्कार,


मराठी विकिक्वोट्स
नावाचा एक मराठी विकिपीडियाचा एक बंधू प्रकल्प आहे. ज्यात एखाद्या विषयास धरून अथवा व्यक्तींची (सु)वचने आणि अवतरणे नोंदवण्याची सोय आहे. मराठी विकिक्वोट्स प्रकल्प अद्याप खूप परिचीत झाला नसला तरीही त्यातील म्हणी आणि वाकप्रचारांवर आंतरजालावरील मराठी लोक संग्रह करत असतात असे दिसते. विकिक्वोसवरील लेख विकिसाच्या दृष्टीने मराठी म्हणींचे अर्थ वाक्यात उपयोगाच्या उदाहरणांसहीत हवे आहेत. (म्हणींची जनरल अर्थ नमुद न केलेली यादी नको आहे कारण अर्थ नमुद न करता यादी
मराठी विकिक्वोट्स
मध्ये सध्याही उपलब्ध आहेच.

जमल्यास त्याच अर्थाचे हिंदी आणि इंग्रजी वाक्य उपलब्ध झाल्यास चालेल.

शक्यतोवर अद्याक्षरानुसार प्रत्येक प्रतिसाद वेगळा ठेवल्यास विकिक्वोटवर नोंद घेणे सोपे जाईल. या धाग्यात शक्यतोवर म्हणींचे अर्थ हवेत वाकप्रचारांसाठी वेगळा धागा काढणार आहे.

मराठी म्हणींचा तार्कीक उणीवा दाखवण्यासाठी उपयोग कसा केला जातो अथवा जाऊ शकतो या बद्दलही काही प्रतिसाद उपयूक्त ठरू शकतील.

धाग्याची सुरवात अ या अद्याक्षरापासून सुरु होणार्‍या म्हणींनी करत आहे.

* अग अग म्हशी, मला कुठे गं नेशी.
* अघटित वार्ता आणि कोल्हे गेले तीर्था.
* अडला हरी गाढवाचे पाय धरी.
* अडली गाय खाते काय.
* अती झालं अन् हसू आलं.
* अती तेथे माती.
* अती परिचयात अवज्ञा.
* अती राग भीक माग.
* अती शहाणा त्याच अळवाला ठाऊक.
* असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ.
* असतील चाळ तर फीटतील काळ.
* असतील शिते तर जमतील भुते.
* असून अडचण नसून खोळंबा.
* असेल ते विटवा, नसेल ते भेटवा.
* असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी.
* अवघड जागी दुखणे आणि जावई वैद्य.
* अती झाले म्हसणात गेले.

*या धाग्याचा उद्देश नित्याप्रमाणे विकिप्रकल्पासाठी असल्यामुळे आपले या धाग्यावरील प्रतिसाद प्रताधिकारमुक्त गृहीत धरले जातील
*अनुषंगिक नसलेली अवांतरे/विषयांतरे टाळण्याबद्दल आभार

प्रतिक्रिया

माहितगार's picture

26 Nov 2014 - 8:53 am | माहितगार

सॉरी विकिक्वोट्सची लेखातील दुवा अनवधानाने वेगळ्या लेखावर जातो आहे. दुवा 'म्हणी' येथील प्रमाणे बदलून मिळावा हि संपादकांना विनंती

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Nov 2014 - 11:34 am | डॉ सुहास म्हात्रे

@ माहितगार : तुम्हाला अपेक्षित असलेला बदल केला आहे.

माहितगार's picture

26 Nov 2014 - 12:18 pm | माहितगार

धन्यवाद

अपेक्षित माहिती आंतरजालावर यावी हा उद्देश आहे का ?इतरत्र पुस्तकांत संदर्भ ग्रंथांत आहेच शिवाय अगोदर लिहिले आहे त्याची पुनरोक्ती नको असेल.

माहितगार's picture

26 Nov 2014 - 9:26 am | माहितगार

आधीच्या पिढीतले लोक जे अर्थ स्वाभाविक पणे समजतात असे गृहीत धरतात ते अर्थ शब्दार्थ संग्रहण आणि म्हणींचा उपयोग कमी होत चाललेल्या नव्या पिढीस खरोखर समजतातच असे नाही. इतरत्र पुस्तकांत संदर्भ ग्रंथांत आहे किंवा आंतरजालावर इतरत्र आहे ते प्रताधिकार (कॉपीराईटच्या) समस्येमुळे विकिप्रकल्पांना वापरता येतनाही म्हणूनही विकिसाठी धागे वेगळे काढावे लागतात. पुनरोक्ती न झालेली केव्हाही बरी पण अर्थ आणि उदाहरणे न नोंदवली जाण्यापेक्षा पुनरोक्ती झाली अरीही चालेल (अर्थात कॉपीराईटसमस्या नसेल म्हणजेच तुमचे स्वतचे इतरत्रचे लेखन असेल आणि या धाग्यावर येऊन कॉपीराईट मुक्त होत असेल तर पुनरोक्ती चालेल ).

माहितगार's picture

26 Nov 2014 - 9:29 am | माहितगार

अर्थात म्हणींच्या विषयावर काही जणांना पुन्हा तेच विषय चघळल्याने कंटाळा येण्याचीही शक्यता आहे त्यांच्यासाठी जरासा बदल म्हणून तार्कीक विसंगती (उणीवा) दाखवण्यातील मराठी म्हणींचे योगदान हा विषयही या धागा चर्चेसाठी ठेवला आहे. (अर्थात त्यासंबंधीचे प्रतिसाद इतर विकिपीडिया अथवा विकिबुक्स प्रक्ल्पातून वापरता येतील)

==स्वर आ==
* आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी.
* आडात नाही तर पोहऱ्यात कोठून येणार.
* आधी पोटोबा मग विठोबा.
* आधीच उल्हास आणि त्यात फाल्गुन मास.
* आपण मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही.
* आपला तो बाळू दुसऱ्याचा तो कार्टा.
* आपला हात जगन्नाथ.
* आपलेच दात आणि आपलेच ओठ.
* आयजीच्या जिवावर बायजी उदार आणि सासूच्या **वर जावई सुभेदार.
* आयत्या बिळात नागोबा.
* आयत्या पिठावर रेघोट्या.
* आलीया भोगासी असावे सादर.
* आंधळं दळतंय अन कुत्रं पीठ खातंय.
* आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन.
* आधी लगीन कोंढाण्याचं.
* आवडतीचा शेंबूड गोड आणि नावडतीचे मीठ अळणी.
* आपलंच घर आणि हगून भर.
* आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून.
* आले देवाजिच्या मना तेथे कोणाचे चालंना.
* आई जेवायला घालीना आणि बाप भीक मागु देईना.
* आहे रेडा आणि म्हणे माझी धार काढा
* आड जीभ खा‌ई अऩ पडजीभ बोंबलत जा‌ई.
* आडाण्याचा गेला गाड़ा, वाटेवरची शेते काढा.
* आधणातले रडतात, सुपातले हसतात
* आधी करी सुन सुन, मग करी फुणफुण.
* आधी होता वाघ्या, मग झाला पाग्या, त्याचा स्वभाव जा‌ईना, त्याचा येळकोट राहीना.
* आधीच मर्कट त्यात मद्य प्याला
* आपण हसे दुसऱ्याला अन शेंबुड आपल्या नाकाला.

आधीची पिढी आणि जुनी शेती अवजारे वापरून होणरी शेती ,पूर्वीची पाणीपुरवठा व्यवस्था ,कुंभार ,लोहार ,सोनार वगैरे बारा बलुतेदारांच्या कार्यपध्दतीवरून आलेल्या म्हणी नवीन पिढीस समजावून सांगणे कठीणच आहे .

माहितगार's picture

26 Nov 2014 - 2:25 pm | माहितगार

होय खरे आहे ते. त्याशिवाय बदलत्या काळानुसार बदलती मुल्येही काही वेळा लक्षात घ्यावी लागतात. पण जिथपर्यंत ज्ञानकोशीय नोंदींचा विषय आहे तर वस्तुनिष्ठ नोंदी घेणे गरजेचे आहे. छायाचित्रांचा उपयोग ज्ञानकोशीय लेखांचे दुवे जोडणे इत्यादी गोष्टी करता येऊ शकतील पण भाषा प्रवाही असते. काही टिके काहीचे अर्काईव्हींग करून बाजूस ठेवावे लागेल.

आदूबाळ's picture

26 Nov 2014 - 11:59 am | आदूबाळ

माहितगार भाऊ

एडवर्ड मानवारींग या सायबाने संकलित केलेल्या म्हणींच्या संग्रहात म्हणी, अर्थ आणि प्रयोग तिन्ही आहेत. हे पुस्तक आर्काइव.org वर प्रताधिकार मुक्त स्वरुपात उपलब्ध आहे.

माहितगार's picture

5 May 2015 - 1:27 pm | माहितगार

पाहीले. म्हणींचे इंग्रजी अनुवाद दिसतात. मला वाटत लेखकाच नाव अलफ्रेड मानवरींग आहे. इंग्रजी विकिस्रोत प्रकल्पात ते अपलोडकरून मिळाव अशी विनंती टाकली आहे म्हणजे युनिकोडीफिकेशन सोपे जाईल. जमल्यास विकिमीडिया कॉमन्सवरून प्रत्येक म्हण अर्थासहीत वेगवेगळ्या इमेजमध्ये कटकरून मिळेल का ते पहातो म्हणजे इंग्रजी विकिबुक्समध्ये इंग्रजीतून मराठी शिकण्याच्या सुविधेत जोडणे सोपे जाईल.

इंगजी विकिस्रोत प्रकल्पात Index:Marathiproverbs00manwgoog.djvu या दुव्यावर सदर ग्रंथ चढवला असून मराठी म्हणींचे युनिकोडीकरण आणि इंग्रजी अनुवादाचे प्रुफरिडींग मध्ये साहाय्य प्राधान्याने हवे आहे. कारण इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेणार्‍या महाराष्ट्रीयन/यांच्या मुलांना या ग्रंथाचा चांगला लाभ होईल असे वाटते. (हा परिच्छेद स्व-पुर्नसंपादीत- ५-५-२०१५ दुपारी १३.३०)

माहितीसाठी खूप धन्यवाद.

माहितगार's picture

28 Nov 2014 - 12:03 pm | माहितगार

हे पुस्तक आर्काइव.org वर प्रताधिकार मुक्त स्वरुपात उपलब्ध आहे.

मराठी म्हणींचा अनुवादक अल्फ्रेड मानवरींग बद्दल आणखी काही माहिती मिळू शकेल काय ? आर्काइव.org वर प्रताधिकार मुक्त म्हटलय हे इंग्रजी विकिस्रोतावर चढवण्यास अल्फ्रेड मानवरींगचे मृत्यूवर्ष निश्चित झाल्याशिवाय पुरेस होत नाहीए. आणि या नावाची एका पेक्षा अधिक (त्या काळातील माणसे आहेत)

१) MANWARING Alfred Worthing
England Birth Births Jun 1855

२) Manwaring Alfred 94 Hastings Deaths Mar 1950

३) Alfred Manwaring William 1932 edition of Crockford's clerics that shows him as the author or the work, living in Sussex, and ordained in 1879 (which is usually when they are in early-mid 20s). 1911 England census has an Alfred Manwaring, a cleric, b.1855; and the 1861 census shows him the son of William (baker, grocer, postmaster) and Eliza in Broadwater, Sussex.

उपरोक्त तीन माहिती मिळत आहेत तर आपला मराठी म्हणींचा अनुवादक अल्फ्रेड मानवरींग उपरोक्त तीन पै़की कुणाशी जुळतो का आणखी कुणी वेगळा असेल.

माहितगार's picture

28 Nov 2014 - 2:32 pm | माहितगार

A. Manwaring बहुधा नासिकला असत. बहुधा एंग्लीकन पाद्री होते ते. त्यांच्या नावाने १९०४ पर्यंतची माहिती जालावर दिसते आहे. पण केव्हा निवर्तले ती माहिती हवी आहे.

आनन्दा's picture

26 Nov 2014 - 1:38 pm | आनन्दा

सर्वसामान्यपणे म्हणी या कोणत्यातरी कथेवरून, प्रसंगावरून वगैरे बेतलेल्या असतात. तर मग तश्या कथा पण आपल्याला अपेक्षित आहेत का?

विकिक्वोट प्रकल्पासाठी अर्थ आणि वाक्यात उपयोग पुरेसे आहेत.

वयवर्षे १० ते १२ साठी थोडीशीच जोडाक्षरे असलेल्या साधारणत दोन एक परिच्छेदांच्या भारतीय बोधकथा (मराठी अथवा इंग्रजीतून) असल्यास विकिबुक्स प्रकल्पात वापरता येतील.

तुम्ही हे जे काही करताय ते खरंच स्तुत्य आहे. या धाग्याचा हा विषय नाही, पण बोलीभाषांच्या बाबतीत शोधाशोध करताना आढळलेली गोष्ट अशी की पाठपुरावा करुनही लोक फार लक्ष देताना आढळत नाहीत.

बोलीभाषांच्या बाबतीत शोधाशोध करताना आढळलेली गोष्ट अशी की पाठपुरावा करुनही लोक फार लक्ष देताना आढळत नाहीत.

खरय बोलीभाषांच्या बाबतीत गोष्टी तात्कालीक मनोरंजना पलिकडे सहसा जात नाहीत.

तिमा's picture

26 Nov 2014 - 7:08 pm | तिमा

आम्हाला विडंबनातच इंटरेस्ट फार! पण इथे म्हणींची विडंबने लिहून धाग्याचा इस्कोट करायचा नाहीये. सबब वेगळा धागा काढावा.

खरय, सहकार्यासाठी धन्यवाद.

विश्वनाथ नरवणे यांनी म्हणींचा कोश प्रकाशित केला होता अस ऐकलंय. वसंत पोतदारांच्या 'नाळ' या पुस्तकात त्याचा उल्लेख आहे. स्वतः पोतदारांकडून या ग्रंथाची खूप स्तुती ऐकली होती. उदाहरणंही सुंदर आहेत असं पोतदार म्हणाल्याचं आठवतंय. ही माहिती कदाचित आपल्या कामाला येऊ शकेल.

माहितगार's picture

27 Nov 2014 - 2:52 pm | माहितगार

बुकगंगा डॉट कॉमवर चाळला छान वाटतो आहे, पण कॉपीराईट स्टेटसचा अंदाजा नाही आला.

साती's picture

28 Nov 2014 - 4:42 pm | साती

वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग कसा करावा हा प्रश्नं असू शकतो.
म्हण हेच एक स्वतंत्र वाक्य असते, तिचा आणि वाक्यात उपयोग करायचा नसतो.
म्हणी बोलण्यात/ लिहिण्यात कश्या वापरल्या जातात असे विचारा हवे तर.
अर्थात , तुम्हाला काय म्हणायचे हे लक्षात आले आहेच. पण भाषाशास्त्राच्या दृष्टीने माहिती गोळा करणाराने स्वतःची भाषा काटेकोरपणे वापरली पाहिजे असे वाटते.

माहितगार's picture

28 Nov 2014 - 5:59 pm | माहितगार

ताई,

आपणास मला काय हवे ते कळले या बद्दल धन्यवाद. मी तथाकथीत आदेशात्मक व्याकरणशास्त्राचे कोणतेही पालन करत नाही, गरजेशिवाय अभिजनीय प्रमाण भाषेचे किंवा र्‍हस्व दिर्घादी शुद्धलेखनाचेही पालन करत नाही करणारही नाही. मी माझी सर्मसामान्य मराठी भाषा जशी बोलतो लिहितो त्यावर माझे नितांत निष्ठा आहे. प्रांजळपणे सांगायचे तर त्या बद्दल मला दुसरा शब्द कधीही ऐकलेला नाही ऐकणारही नाही.

इथे सिंपल म्हणींचे अर्थ आणि वाक्यातील उपयोगाची उदाहरणे हवी आहेत. आपण आपला अभिजनवाद बाजूस ठेऊन जे काही सहकार्य देऊ कराल त्याचे स्वागत असेल. ज्या धाग्यात सहकार्य मिळते त्या लेखांचे काम व्यवस्थीत पुढे जाते. निबंध लेखन आणि इतरही धाग्यांमध्ये फाटे न फोडता जेथे सहकार्य मिळाले तेथे चांगले काम झालेली बर्‍या पैकी उदाहरणे आहेत. याच धाग्या सोबत दुसरा धागा काढला त्यावर एका ताईंचेच सहकार्याने एकदम चांगले काम चालू आहे. काही धाग्यांच्या वाटेस फाटे फोड येते तशी या धाग्याच्या वाटेस आली असावी. तेते त्या त्या विषयाच्या धाग्याचे नशीब.

साती's picture

28 Nov 2014 - 7:10 pm | साती

तुमचंच खरं.
तुमच्या कामाला शुभेच्छा.
या संकलनाच्या वर शीर्षकात तरी म्हणी आणि त्याचे वाक्यात उपयोग असे लिहू नका.
उद्या तुमचे संकलन संदर्भ म्हणून वापरले गेले तर लोक चुकीचे मराठी शिकतील.

साती's picture

28 Nov 2014 - 7:15 pm | साती

बाकी 'सा' आला की
'सांगायला गेले तर टांगायला जातात' या म्हणीचा लेखनात उपयोग , किंवा तुमच्या भाषेत वाक्यात उपयोग म्हणून तुमचा प्रतिसादच देता येईल.

माहितगार's picture

28 Nov 2014 - 8:12 pm | माहितगार

उद्या तुमचे संकलन संदर्भ म्हणून वापरले गेले तर लोक चुकीचे मराठी शिकतील.

मी सामान्य व्यक्ती आहे मी जसा संवाद साधतो तशी भाषा बनते. भाषाशास्त्रानुसार दुसर्‍याव्यक्तीच्या उपयोगासा चुक बरोबर शुद्ध अशुद्ध अशी विशेषणे द्यायची झाल्यास अभिजनवाद्यांची भाषा अत्यंत चूक आणि अशुद्ध असते आमची सर्वसामान्यांची नव्हेच. व्याकरणशास्त्री आणि भाषाशाशास्त्रींनी मी काय भाषा वापरतो याचा जरूर अभ्यास करावा. मी काय भाषा वापरावी हे सांगण्याच्या भानगडीत पडू नये. तसे पडल्यास टांगले गेल्यास आश्चर्य वाटू नये.

व्याकरणाच्या दृष्टीने 'म्हण' हि एक पूर्ण वाक्य असते. म्हणींचे वापरातील उदाहरण असा विकिलेखात बदल करावा एवढे सुचवले असते तर आनंदाने केले असते. स्वतःची भाषा काटेकोरपणे वापरली पाहिजे हे अभिजनी प्रबोधनामृत आपल्या स्वताच्या शिंक्याला टांगून ठेवण्यासाठी परत देताना, आपण म्हणीचा उपयोग सुचवालात तसेच मीही 'अग अग नसते उपदेश देशी, माझ्या नैसर्गीक भाषेला कुठे नेशी ? ने परतफेड करतो आहे.

या संकलनाच्या वर शीर्षकात तरी म्हणी आणि त्याचे वाक्यात उपयोग असे लिहू नका.


शीर्षकात आज्जीबात बदल न करण्याचे ठरवले आहे हे आपण लक्षात घेतले असेलच.

साती's picture

28 Nov 2014 - 8:39 pm | साती

इथल्या नव्हे हो, विकीवरिल संकलनाचे शीर्षक बदलण्याविषयी सूचविले आहे.

माहितगार's picture

28 Nov 2014 - 8:49 pm | माहितगार

सूचविलेले बदल विकिवर केले. आभारी आहे.

साती's picture

28 Nov 2014 - 9:30 pm | साती

धन्यवाद!
कदाचित माझा पहिला प्रतिसाद चुकीच्या अर्थाने घेतला गेल्याने पुढचा गोंधळ झाला.
आता या प्रकल्पात आठवतील त्या म्हणींची भर टाकायला आवडेल.
एक दोन मजेशीर लिंक्स आहेत(मराठी भाषादिनानिमित्त दुसर्या एका संस्थळावर झालेल्या म्हणींच्या खेळाच्या) त्या वेळ मिळताच इथे चिकटवते.

माहितगार's picture

28 Nov 2014 - 10:27 pm | माहितगार

असो.

आता या प्रकल्पात आठवतील त्या म्हणींची भर टाकायला आवडेल.

अवश्य प्रतिक्षा असेल. इतरत्रची माहिती देताना कॉपीराईटबद्दल काळजी आपण घ्यालच तरीही धाग्याचा एक उद्देशच प्रताधिकारमुक्त स्वरुपात मजकूर मिळवणे असल्यामुळे स्मरण एवढेच

धन्यवाद

एक नातू {अरविंद ?}नावाचे कोणी विकिमराठीत बरीच भर घालतात असे ऐकून आहे.
इथल्या काही संदर्भांपर्यंत विकिवरून सतत वाचक येऊ लागले तर मिपा एक मराठीतले about dot com होईल इतके झाले तरी खूप झाले. स्वतंत्र असे आपण विकिमराठीसाठी काही लिहित नाही मग खारीचा वाटा उचलायला काय हरकत आहे ?

माहितगार's picture

3 Dec 2014 - 5:10 pm | माहितगार

एक नातू अभय म्हणून आहेत. आपण कदाचित त्यांच्या बद्दल म्हणत आहात का.

बाकी आपण म्हणता ते बरोबर आहे. प्रोत्साहनासाठी आभारी आहे.

प्रसाद गोडबोले's picture

3 Dec 2014 - 1:00 pm | प्रसाद गोडबोले

स्वतःचं ठेवायचं झाकुन अन दुसर्‍याचं पहायचं वाकुन

मी नाही त्यातली अन कडी लाव आतली

अश्या म्हणींचा संग्रह आजवर पाहण्यात आलेला नाहीये .... जाणकारांनी ह्यात भर घालावी ;)

टवाळ कार्टा's picture

3 Dec 2014 - 1:17 pm | टवाळ कार्टा

मी बाई संतीण...माझ्या मागे दोन-तीन :)

प्रसाद गोडबोले's picture

3 Dec 2014 - 1:32 pm | प्रसाद गोडबोले

धु म्हणलं की धुवायची , ... ... म्हणुन विचारायचं नाही :D

माहितगार's picture

3 Dec 2014 - 5:43 pm | माहितगार

स्वतःचं ठेवायचं झाकुन अन दुसर्‍याचं पहायचं वाकुन

आणि

आपली ठेवायची झाकून अऩ दुसऱ्याची पहायची वाकून

यातील मूळ म्हण कोणती असेल का दोन्ही रचना प्रचलीत आहेत.

अनुप ढेरे's picture

3 Dec 2014 - 2:17 pm | अनुप ढेरे

ढवळ्याशेजारी बांधला पवळ्या, वाण नाही पण ढवळ्याच लागला...

माहितगार's picture

3 Dec 2014 - 4:57 pm | माहितगार

विंडंबने आणि नवनिर्मीत म्हणींची या धाग्यावर चर्चा करण्यास माझी हरकत नाही, पण म्हणी प्रकाराचे स्वरूप पहाता मूळम्हणींचा विसर पडावयास लागेल म्हणून विंडंबने आणि नवनिर्मीत म्हणीं नमुद करताना विंडंबने अथवा नवनिर्मीती असल्याचे नमूद केल्यास आभारी असेन

प्रसाद गोडबोले's picture

3 Dec 2014 - 4:08 pm | प्रसाद गोडबोले

करके गया गाव और बाबुराव का नाव ;)

जयन्त बा शिम्पि's picture

12 Jan 2015 - 5:17 pm | जयन्त बा शिम्पि

कळेना वळे अन चालना धुये { धुळे } अशी ही एक म्हण माझ्या कानावर आली होती मी मूळचा धुळे येथील असल्याने ज्याला काहीही कळत नाही , त्याने धुळे येथे जाण्यात काही अर्थ नाही यावरून धुळे येथे फक्त शहाण्यांनीच जावे असा होतो
जाणकारांनी प्रकाश टाकावा