मर्डर ऑनलाईन
यु यु (युरोपीय युनियन) ची सायबर गुन्हे अन्वेषक संस्था (EC3), ने असे भाकीत वर्तवलं आहे की २०१४ च्या अंता पर्यंत ,
पहिला 'मर्डर ऑनलाईन' कदाचित झाला असेल. जगात आज सायबर तंत्राद्यान प्रचंड वेगाने मानवी जीवनाचा अविभाज्य अंग बनत आहे.
आज पेसमेकर ला ब्लू टूथ वैगरे तत्सम कनेक्टीविटी देण्यात आलेली आहे, हेतू हा की ह्रिदयाची कार्यक्षमता व पेसमेकरची क्षमता, शिल्लक ब्याटरी वैगरे तपासून पाहता येतील. (ह्रिदयाला जोडलेले पेसमेकर व बाहेरील डेटा रिडर यांच्यात संदेशाची देवाण घेवाण होऊन). सायबर-ह्याकर अश्या पेसमेकरच्या उत्पादकाच्या वा प्रोग्रमारच्या हातून सुटलेल्या त्रुटी शोधून काढून, एखाद्याच्या पेसमेकरवर नियंत्रण मिळवून, व्यक्तीच्या जीवाशी खेळू शकतात.
अशी ही शक्यता एखाद्या बॉंडपटातील नसून ती प्रत्यक्ष होऊ घातली आहे, असे खुद्द अमेरिकेचे उप राष्ट्राध्यक्ष डिक चेनी यांनाही अगदी
असे वाटल्यामुळेच, त्यांनी आपल्या पेसमेकरची वायरलेस संदेश क्षमता व वायरलेस डीफिब्रीलेशन क्षमता, निष्क्रिय करून घेतली आहे.
वाचन
11829
प्रतिक्रिया
0