अरे आपल्या बिरुटेसरांना वाचवा...! :)

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in काथ्याकूट
26 Oct 2008 - 9:07 am
गाभा: 

अरे आपल्या बिरुटेसरांना वाचवा..!

आपल्या मिपाचे माननीय संपादक साहेब प्रा डॉ दिलिप बिरुटे सध्या उपक्रमावर खरडवहीच्या एका प्रकरणात अडकले आहेत व त्यांच्यावर आणि उपक्रमावर अजामीनपात्र गुन्हा दाखल झाला आहे आणि ऐन दिवाळीत बिरुटेसर गजाआड जातील की काय अशी चिंता उत्पन्न झाली आहे! :)

आमचे मित्र व उपक्रमाचे मालक शशांक आणि आमची मैत्रिण व उपक्रमाची संपादिका प्रियाली ही मंडळींनादेखील या केसमध्ये अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला गेला आहे! :)

फिर्यादीच्या उपक्रमाच्या संपादिका प्रियाली यांच्याबद्दलच्या जुन्या अढीवरून आणि व्यक्तिगत रोषातून हा दावा गुदरला गेला आहे अशी जाणकारांची कोर्टाबाहेर चर्चा ऐकली! :)

मिपावरील एक शिकाऊ वकील ऋषिकेश यांनी तिथे जाऊन सरकारी वकिलाविरुद्ध थोडाफार डिफेन्स तयार करून पाहिला परंतु त्यांच्या डिफेन्समध्ये तेवढा दम नाही. मुळात ऋषिकेशराव हे कवी मनाचे, साहित्यिक मनाचे वकील आहेत त्यामुळे वकिली हलकटपणा त्यांच्यापाशी नाही.... :)

दुसरे एक वकील श्री विसोबा खेचर हा वकिली वेषातला केवळ एक उडाणटप्पू मनुष्य आहे. तेव्हा त्याच्या युक्तिवादात काहीच अर्थ नाही! कोकणी हलकटपणा, गजाली, आणि बाई-बाटली यातच विसोबांची वकिली फुकट गेली! :)

सर्किट वकिलांनी फिर्यादीपक्षाची बाजू अंमळ भक्कम केली आहे व उलटपक्षी त्या केसमध्ये खुद्द मिपालाच अडकवण्याचा प्रयत्न केला आहे! :)

खुद्द फिर्यादी हे मिपावरील एका जुन्या अजामीनपात्र गुन्ह्यात मिपावरून फरार आहेत याची मात्र गंमत वाटते! :)

असो.

आपला,
(कुचकामी ऍडव्होकेट) तात्या देवगडकर.

हा संपूर्ण काथ्याकूट केवळ अन् केवळ ह घ्या ह्या सदरात मोडावा व त्या अनुषंगानेच चर्चा व्हावी अशी सणासुदीच्या निमित्ताने माफक विनंतीवजा अपेक्षा! :)

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

26 Oct 2008 - 9:41 am | विसोबा खेचर

विलि वोन्का या वकिलाचा मात्र डिफेन्स छान आहे! :)

मुक्तसुनीत's picture

26 Oct 2008 - 10:02 am | मुक्तसुनीत

ज्या सदस्याने उपक्रमावर प्रस्ताव टाकला तो सदस्य एरवी कणभरही तिथे आपला सहभाग दाखवत नाही. मात्र असली खुसपटे काढून वाद उकरण्यास तयार. यालाच धार्मिक कृत्यांच्या संदर्भात अपसव्यकृत्ये म्हणतात. या लोकांना मी , स्वतः , आपण , अस्मादिक यापलिकडचे क्षितीज दिसत नाही असे दिसते. जिकडे सर्वत्र "बघताय काय ! सहभागी व्हा !" अशा मंत्राचा गजर चालू तिकडे यांची गंगा उलटीच वाहताना दिसते. मिसळपावरून गच्छंति , मनोगतवरून शंख करत बाहेरची वाट आणि आता उपक्रमावरचा ठणाणा. "इक काबा न बन सका हमसे , तोड डाले सौ बुतखाने !" असे उर्दूत म्हण्टले आहे. स्वत:चे असे काही आम्ही बनवू शकलो नाही आम्ही , तरी काय झाले ? इतरांना प्रिय अशी शंभर देवालये तर तोडली ना !

असो. एकेकाळी प्रत्युन्मति समजल्या जाणार्‍या अशा ज्येष्ठ व्यक्तीचे एका प्रदीर्घ कालावधीतले असे वर्तन पाहून खिन्नता वाटते. त्यांना कुणीही गावकुसाबाहेरचे म्हण्टलेले नाही ; पण अशी पाळी त्यांनी स्वतःवर आणलेली आहे.

विसोबा खेचर's picture

26 Oct 2008 - 10:50 am | विसोबा खेचर

"इक काबा न बन सका हमसे , तोड डाले सौ बुतखाने !" असे उर्दूत म्हण्टले आहे. स्वत:चे असे काही आम्ही बनवू शकलो नाही आम्ही , तरी काय झाले ? इतरांना प्रिय अशी शंभर देवालये तर तोडली ना !

आयला! हे बाकी अगदी खरं बोललात बरं का मुक्तराव! काळजावरून सुरी चालवलीत...!

आपला,
(खिन्न) तात्या.

घाटावरचे भट's picture

26 Oct 2008 - 2:29 pm | घाटावरचे भट

>>एकेकाळी प्रत्युन्मति समजल्या जाणार्‍या अशा ज्येष्ठ व्यक्तीचे एका प्रदीर्घ कालावधीतले असे वर्तन पाहून खिन्नता वाटते.

प्रत्युन्मति म्हणजे हो काय?

विनायक प्रभू's picture

26 Oct 2008 - 5:08 pm | विनायक प्रभू

प्रत्युन्मति म्हणजे शहाणपणाचे व्यवच्छेदक लक्षण

आनंदयात्री's picture

28 Oct 2008 - 3:06 am | आनंदयात्री

>>प्रत्युन्मति म्हणजे शहाणपणाचे व्यवच्छेदक लक्षण

=)) चामारी हे म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर झाला हो ..
माफकरा विप्रकाका पण आता व्यवच्छेदक हे बेणं कोण म्हणायचं हो ??

घाटावरचे भट's picture

26 Oct 2008 - 2:30 pm | घाटावरचे भट

अरेच्चा दोनदा प्रतिसाद पडला. काढून टाकत आहे.

तात्या ही आताषबाजी, शोभेची दारुबाजी आवडली. ;-)

प्रकाश घाटपांडे's picture

26 Oct 2008 - 10:03 am | प्रकाश घाटपांडे

आम्हाला हा लक्षवेधण्याचा प्रकार वाटतो. उलिसक काही झाल कि त्याचा यवढा मोठा गाजावाजा करायचा. येतीन! येतीन! लायनीव येतीन!
प्रकाश घाटपांडे

धोंडोपंत's picture

26 Oct 2008 - 10:07 am | धोंडोपंत

मुक्तसुनीतांचा अभिप्राय आवडला.

अत्यंत योग्य शब्दात विचार व्यक्त करणे ते ही संतुलितपणा न सोडता.....

हे त्यांचे गुण आम्हाला आवडतात.

आपला,
(चाहता) धोंडोपंत

आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com

(जय जय महाराष्ट्र माझा! गर्जा महाराष्ट्र माझा!)

ऋषिकेश's picture

26 Oct 2008 - 10:17 am | ऋषिकेश

फिर्यादीच्या उपक्रमाच्या संपादिका प्रियाली यांच्याबद्दलच्या जुन्या अढीवरून आणि व्यक्तिगत रोषातून हा दावा गुदरला गेला आहे

अगदी खरंय! मी ही असंच ऐकलं ;)

उलटपक्षी त्या केसमध्ये खुद्द मिपालाच अडकवण्याचा प्रयत्न केला आहे!

हा फिर्यादिचाही मुळ उद्देश असावा.. मात्र त्याने तो गुन्हा दाखल करताना मांडला नाहि. विचार केला असेल वकिलाकडून पेशीच्यावेळी हा मुद्दा पुढे करू :)

खुद्द फिर्यादी हे मिपावरील एका जुन्या अजामीनपात्र गुन्ह्यात मिपावरून फरार आहेत याची मात्र गंमत वाटते!

हा हा हा!.. एक्ज्याक्ट्ली बोललात तात्या ;)

-(शिकाऊ) ऋषिकेश

विनायक प्रभू's picture

26 Oct 2008 - 10:38 am | विनायक प्रभू

विनायक नावाची ऍलर्जी आज लक्षात आली.

विसोबा खेचर's picture

26 Oct 2008 - 10:47 am | विसोबा खेचर

विनायक नावाची ऍलर्जी आज लक्षात आली.

संपलो..! :)

स्वगत : आयला हा समुपदेशक विनायक प्रभू मास्तर महा बेरकी दिसतो! :)

आपला,
(विनायक प्रभू मास्तरांचा आंगठे धरून उभं रहायची सजा झालेला विद्यार्थी) तात्या.

चतुरंग's picture

26 Oct 2008 - 10:51 am | चतुरंग

(विनायक प्रभू मास्तरांचा आंगठे धरून उभं रहायची सजा झालेला विद्यार्थी) तात्या.

हाताचेच आंगठे धरुन उभा रहाणार असेल तो!! ;)

चतुरंग

जैनाचं कार्ट's picture

26 Oct 2008 - 10:52 am | जैनाचं कार्ट (not verified)

>>हाताचेच आंगठे धरुन उभा रहाणार असेल तो!!

आपले स्वत:चे की प्रभुदेवाचे :?

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग

जैनाचं कार्ट's picture

26 Oct 2008 - 10:49 am | जैनाचं कार्ट (not verified)

>>>नावाची ऍलर्जी

लहान तोंडी मोठा बेसनचा लाडू -- तुम्ही नाव बदला !
नाय तर लफडा कधी काळी मोठा होऊ शकतो ;)

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग

विनायक प्रभू's picture

26 Oct 2008 - 11:41 am | विनायक प्रभू

मला तसा थोडासा डाउट होताच. खरड पण टाकली. म्हणुनच वि.प्र. सही करतो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Oct 2008 - 11:05 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सनासुदीच्या दिवसामुळे सध्या मौन धारण केले आहे.
(तसेच काही दोस्तांना शब्द दिलाय त्या विषयावर राडा करणार नाही म्हणुन )
पाव्हणे, रावळे गेले की, मग घेऊ तगडा समाचार !!! :)

-दिलीप बिरुटे

जैनाचं कार्ट's picture

26 Oct 2008 - 11:27 am | जैनाचं कार्ट (not verified)

>>>पाव्हणे, रावळे गेले की, मग घेऊ तगडा समाचार !!!

ये हुई ना बात !
तुम लढा... हम पाठी मागे हैच !

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग

विकास's picture

26 Oct 2008 - 5:58 pm | विकास

तात्या, हा दिवाळीचा सण आहे, शिमगा नाही.

दिवाळीत सात्विक विषयांवर चर्चा करा बरं! :-)