मिपा दिवाळी अंक २०१४ - सूचना.

दिवाळी अंक's picture
दिवाळी अंक in काथ्याकूट
24 Aug 2014 - 12:13 pm
गाभा: 

राम राम मंडळी. :)

मंडळी... कळविण्यास अतिशय आनंद वाटतो की गेल्या वर्षीच्या यशस्वी दिवाळी अंकानंतर आपण याही वर्षी आपल्या मिपाचा दिवाळी अंक काढणार आहोत. तेव्हा आपल्या कविता, व्यंगचित्र, कथा, माहितीपूर्ण लेखन, चुटकुले, विनोदी लेखन, अशा सर्व प्रकारचे लेखन दिनांक २०/०९/२०१४ पर्यंत वर्ड फाईल असेल तर mipa.sampadak@gmail.com या स्वतंत्र ईमेल आयडीला ईमेलद्वार किंवा दिवाळी अंक या मिपावरच्या आयडीला व्यनिद्वारे पाठवा. जास्त चित्रे असतील तर शक्यतो gmail आयडीला पाठवावे ही विनंती. कारण व्यनिद्वारे आलेली फाईल अंकात समाविष्ट करणे जरा जिकिरीचे काम आहे. अन्यथा जणू धागाच प्रकाशित करतो आहोत अशा रितीने मिपा एडिटरमधे (इमेज टॅग्जसकट) लिहीलेली पोस्ट तशीच्यातशी एचटीएमएल टॅग्जसहित चोप्य पस्ते करुन टेक्स्ट फाईल (नोटपॅड) जीमेलवर अटॅच करुन पाठवली तरी दिवाळी अंक संपादकांचे काम सोपे होईल.

१. कोणकोणत्या साहित्यप्रकारात लेखन अपेक्षित आहे.
कविता, व्यंगचित्र, कथा, माहितीपूर्ण लेखन, चुटकुले, विनोदी लेखन, कादंबरी, अन्य ललित लेखन, पाककृती,चित्रे, छायाचित्रे, व्हिडिओ इ. प्रकारचे साहित्य पाठवावे. अंक पीडीएफ स्वरूपातही काढायचा आहे त्यामुळे मल्टिमिडिया फाईल्स असतील तर त्या पीडीएफ अंकात फक्त लिंक या स्वरूपात येतील, तरी दिवाळीच्या निमित्ताने स्वतंत्रपणे प्रकाशित करायला हरकत नाही.

२. कोणत्या प्रकारचे साहित्य स्वीकारता येणार नाही (बंधने -विषय, आकार इत्यादिबाबतची)
नेहमीचे म्हणजे अगदी एकोळी दोनोळी साहित्य पाठवू नये, तसेच उत्सवी अंक असल्यामुळे दु:खी, सणाच्या दृष्टीने अप्रिय, किळसवाणे, मृत्यूशी संबंधित, थेट ट्रॅजेडीने भरलेले असे प्रकार कृपया न पाठवल्यास बरे.

३. साहित्य पाठवण्याची अंतिम तारीख : २०/०९/२०१४

४. इतर अटी:
साहित्य दिवाळी अंकात प्रसिद्ध करण्याच्या बाबतीत दिवाळी अंक संपादक मंडळाचा निर्णय अंतिम राहील. दिवाळी अंकात समाविष्ट न होऊ शकलेलं साहित्य तुम्ही नेहमीप्रमाणे मुख्य बोर्डावर प्रसिद्ध करू शकताच!

५. साहित्य पाठविण्याचा पर्याय.
वर लिहिल्याप्रमाणे mipa.sampadak@gmail.com या जीमेल आयडीला पाठवल्यास उपकृत राहू. पण काही कारणाने ते शक्य नसेल तर दिवाळी अंक आयडीला मिपावर व्यनि करावा.

६. अंकासाठी पाठवलेलं साहित्य पूर्व प्रकशित असू नये. आणि मिपा दिवाळी अंकात हे लिखाण प्रकाशित झाल्यावर निदान ३० दिवसांपर्यंत ते लेखन अन्यत्र प्रकाशित करू नये.

मंडळी, आपल्या सहकार्याशिवाय कोणताच उपक्रम यशस्वी होऊ शकत नाही. आपले सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. अजून साधारण २५ दिवस बाकी आहेत. तरी सर्वांनी भरभरून प्रतिसाद द्यावा ही विनंती ! आम्ही आपल्या लेखनाची वाट पाहात आहोत, धन्यवाद !!!

प्रतिक्रिया

सुहास झेले's picture

24 Aug 2014 - 2:01 pm | सुहास झेले

ज्ये बात.... शुभेच्छा :)

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

17 Oct 2014 - 11:52 am | मिसळलेला काव्यप्रेमी

कधी येतोय म्हणे हा अंक.
फार वाट पहायला पाहू नका रे..

प्रभाकर पेठकर's picture

24 Aug 2014 - 2:27 pm | प्रभाकर पेठकर

धन्यवाद आणि मिपाच्या पाठीवर एक कौतुकाची थाप.

नक्कीच, दिवाळी अंकास एखादा लेख, एखादी पाककृती पाठवून सक्रिय सहभागाचा प्रयत्न करेन.

सस्नेह's picture

24 Aug 2014 - 2:41 pm | सस्नेह

उत्सुकतेने वाट पहात आहे..अंकाची

पैसा's picture

25 Aug 2014 - 12:55 pm | पैसा

मी दिवाळी अंकासाठी तुझ्याकडून एखाद्या मस्त लेखाची!

सस्नेह's picture

25 Aug 2014 - 3:46 pm | सस्नेह

a

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Aug 2014 - 5:48 pm | डॉ सुहास म्हात्रे

दिपावली अंकाला अनेक शुभेच्छा !

पैसा's picture

25 Aug 2014 - 12:54 pm | पैसा

लिवा एखादी मस्त अंतराळातली लाखों वर्षांची सफर!

एस's picture

24 Aug 2014 - 10:23 pm | एस

ह्यावर्षी चार ओळी दिवाळी अंकासाठी खरडण्याचा निश्चितच विचार केला जाईल.

vrushali n's picture

25 Aug 2014 - 12:49 pm | vrushali n

प्लीझ प्लीझ खुप जास्त संखेत कथा कादंबरी लिहा सगळ्या लेखक्/लेखीकांनो

पैसा's picture

25 Aug 2014 - 12:56 pm | पैसा

पेठकर काका, स्वॅप्स, धन्यवाद! लेखाची वाट बघत आहे.

सुहास झेले, अजून जरा मोठ्या शुभेच्छा पाहिजेत, एक पानभर! :P

सुहास झेले's picture

25 Aug 2014 - 1:21 pm | सुहास झेले

नक्कीच ताई..... :)

प्यारे१'s picture

25 Aug 2014 - 1:17 pm | प्यारे१

सुचना दीर्घ असायला हवी ना?... सूचना अशी?

पैसा's picture

25 Aug 2014 - 1:29 pm | पैसा

बदल करत आहे.

प्यारे१'s picture

25 Aug 2014 - 10:06 pm | प्यारे१

आमच्या सूचनेचं काम संपलं. उडवायला हरकत इल्ले.

टवाळ कार्टा's picture

25 Aug 2014 - 2:09 pm | टवाळ कार्टा

डॉ.खरेंचे लेख असलेच पाहिजेत आणि तेसुध्धा नविन :)

आदूबाळ's picture

25 Aug 2014 - 2:43 pm | आदूबाळ

त्याचबरोबर आतिवास, स्नेहांकिता, गवि, रामदास, जयंत कुलकर्णी, रणजीत चितळे, जैक डेनियल, अभ्या, इ. नियमित न लिहिणार्या मंडळींनीही लिहायचं मनावर घ्यावं ही विनंती.

मोजी आणि मकले यांनाही आग्रहाची विनंती ;)

सौंदाळा's picture

25 Aug 2014 - 3:01 pm | सौंदाळा

+१
आणि पिवळो डांबिस पण

स्पा's picture

25 Aug 2014 - 3:02 pm | स्पा

ह्येच बोल्तो

पैसा's picture

25 Aug 2014 - 3:15 pm | पैसा

त्याशिवाय टवाळ कार्टा, आदूबाळ, सौंदाळा आणि स्पा याम्च्या लेखाच्या प्रतीक्षेत.

(स्पा यांनी गेली २ वर्षे कबूल करून कल्टी मारली होती याची झाईर आठवण करून देत आहे.)

सस्नेह's picture

25 Aug 2014 - 3:50 pm | सस्नेह

ज्योती, यशोधरा, प्यारे १, मस्त कलंदर व मोदक यांनाही आग्रहाची लेखन विनंती अ

सूड's picture

25 Aug 2014 - 2:16 pm | सूड

नोटेड!!

पैसा's picture

25 Aug 2014 - 10:43 pm | पैसा

नुसतंच नोट करू नका!

भाते's picture

25 Aug 2014 - 3:00 pm | भाते

दिवाळी अंकासाठी समस्त मिपाकरांना लिखाणासाठी हार्दिक शुभेच्छा!

दिवाळी अंकाची वाट पाहतो आहे.

चला परत दर्जेदार साहित्यकृती वाचायला मिळणार तर! आतुरतेने वाट बघतोय.

पैसा's picture

25 Aug 2014 - 10:42 pm | पैसा

तुझी काहीतरी गोड पाकृ हवीच ना दिवाळीला!

रेवती's picture

27 Aug 2014 - 1:59 am | रेवती

तसं कुठं ल्हिलय वर? पाकृ चालतील असा उल्लेख केला नसल्याने आम्ही माघार घेतली होती ना पैतै!

मुक्त विहारि's picture

25 Aug 2014 - 9:42 pm | मुक्त विहारि

तारीख काय?

पैसा's picture

25 Aug 2014 - 10:38 pm | पैसा

दिवाळीच्या पहाटे प्रकाशित करू असा विचार आहे! आगे भगवान आणि नीलकांत की मर्जी आणि क्रिपा! :D

मुक्त विहारि's picture

26 Aug 2014 - 12:03 am | मुक्त विहारि

क्रिसमसच्या वेळी जरी प्रसिद्ध झाला तरी, त्याचे स्वागत दिवाळी सारखेच केल्या जाईल.

(मिपाभक्त) मुवि...

प्रभाकर पेठकर's picture

26 Aug 2014 - 1:22 am | प्रभाकर पेठकर

माझ्या लहानपणी एकदा वर्तमानपत्रात बातमी छापून आली होती.
'हवामानखात्याच्या अंदाजानुसार यंदाही ७ जून रोजी पावसाळा सुरु होईल'
ह्या बातमीचा संदर्भ देऊन दुसर्‍या दिवशी आचार्य अत्रे ह्यांची टिपण्णी आली होती,
'एक तारखेला पाऊस सुरु झाला तरी जनतेने, 'पावसाळा सुरु झाला आहे' असे मानू नये.'

अत्रुप्त आत्मा's picture

26 Aug 2014 - 12:31 pm | अत्रुप्त आत्मा

@पावसाळा सुरु झाला आहे' असे मानू नये.'>>> =))

नगरीनिरंजन's picture

25 Aug 2014 - 10:04 pm | नगरीनिरंजन

दिवाळी अंकाला हार्दिक शुभेच्छा!
संपादकांच्या निवडीच्या उमेदवार पानांमध्ये आम्हीही एखादं पान सरकवण्याचा प्रयत्न निश्चितच करु.

पैसा's picture

25 Aug 2014 - 10:41 pm | पैसा

विसरलात तर आठवण करून देईन.

सस्नेह's picture

26 Aug 2014 - 12:26 pm | सस्नेह

आश्वासन हवे.
ननि तुम्ही मागच्या दिवाळीअंकानंतर मिपासाठी काहीच लिहिले नाही. लिहिते व्हा..

चौथा कोनाडा's picture

25 Aug 2014 - 10:52 pm | चौथा कोनाडा

मी पण भाग घेणार या वेळी .... (असं आत्ता तरी म्हणतोय )

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

26 Aug 2014 - 1:21 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

कामाला लागतो...
(स्वगतः असं म्हणून कविता होत नाही, पण... बघू..)

प्रभाकर पेठकर's picture

27 Aug 2014 - 1:16 am | प्रभाकर पेठकर

>>>>(स्वगतः असं म्हणून कविता होत नाही, पण... बघू..)

कांहीतरी 'चुरण' घेऊन पाहा.

प्रभाकर पेठकर's picture

27 Aug 2014 - 1:20 am | प्रभाकर पेठकर

हलकेच घ्या हो. *biggrin* हसरी smiley टाकायला विसरलो होतो.

यावर्षी माझा देखील सहभाग आहे, काही व्यक्तिगत कारणामूळे अनेक दिवस मिपावर मी उपलब्ध नव्हतो, पण आता असेन.

पैसा's picture

26 Aug 2014 - 11:52 pm | पैसा

चौथा कोनाडा, मिका आणि दशानन, लिखाणाची वाट बघते. पुढची आठवण कधी करू ते सांगा!

मी लिहतो आहे सध्या, आठवण करुन द्यावी लागेल असे वाटत नाही आहे ;)

चौथा कोनाडा's picture

28 Aug 2014 - 12:19 pm | चौथा कोनाडा

उत्तेजनासाठी धन्यवाद, पैसाताई ! लिखाण चालू आहे.
अधून मधून आठवण करून दिली तरी चालेल.
असा पुश मिळाला की वेळेत होइल.

दिवाळी अन्काची वाट पाहते.

ऋषिकेश's picture

27 Aug 2014 - 4:40 pm | ऋषिकेश

मनःपूर्वक शुभेच्छा!

पिंपातला उंदीर's picture

27 Aug 2014 - 7:26 pm | पिंपातला उंदीर

शुभेच्छा : )

एस's picture

28 Aug 2014 - 2:17 pm | एस

१. कोणकोणत्या साहित्यप्रकारात लेखन अपेक्षित आहे.
कविता, व्यंगचित्र, कथा, माहितीपूर्ण लेखन, चुटकुले, विनोदी लेखन, कादंबरी इ. प्रकारचे साहित्य पाठवावे.

चित्र चालेल काय हो? फोटूबिटू? की 'वर्थ अ थाउजंड वर्ड्स' हे वर्ड्समध्येच पाहिजे?

फोटो, कलाकृती आणि पाकृन्चेपण स्वागत आहे

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

28 Aug 2014 - 11:30 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

शुभेच्छा.

अविनाशकुलकर्णी's picture

29 Aug 2014 - 9:48 am | अविनाशकुलकर्णी

एक कविता पाठवली आहे...

अविनाशकुलकर्णी's picture

29 Aug 2014 - 9:51 am | अविनाशकुलकर्णी

एक कविता पाठवली आहे...अकु श्टाईल..

माम्लेदारचा पन्खा's picture

31 Aug 2014 - 2:22 pm | माम्लेदारचा पन्खा

अंकासाठी टंकणे क्रमप्राप्त आहे !!

चिगो's picture

1 Sep 2014 - 11:27 am | चिगो

दिवाळी अंकासाठी शुभेच्छा.. मागील दोन अंकांप्रमाणे हा दिवाळी अंकदेखील दर्जेदारच असणार ह्याबद्दल शंका नाही.. :-)

दिवाळी अंकाची वाट पहात आहे.....

काहितरि लिहिण्याची इच्छा आहेच.पाककृती आणि कलाविभागातील चालेल ना!पण गणपती उत्सवाची गडबड संपल्यानंतर
जमेल.

पैसा's picture

4 Sep 2014 - 1:52 pm | पैसा

ईशा१२३, माम्लेदारचा पंखा, लिहायला सुरुवात झाली का?

माम्लेदारचा पन्खा's picture

8 Sep 2014 - 3:10 pm | माम्लेदारचा पन्खा

विषयच गावना....

प्रभाकर पेठकर's picture

8 Sep 2014 - 4:10 pm | प्रभाकर पेठकर

दूरचित्रवाणीवरील जाहिराती.
वाचन संस्कृती मागे पडते आहे का?
स्त्रिचा सन्मान - मुलांवर करायचा संस्कार.
ऐहिकतेचा प्रभाव आणि मनःस्वास्थ.
आरोग्यदायी जीवनपद्धती.
व्यायामाचे महत्व.
बचतीचे महत्व आणि मार्ग.
ऋतु हिरवा.
पावसाळी सहल.
पर्यावरण रक्षण.
कौटुंबिक विनोदी प्रसंग.
कुटुंबप्रमुख.

प्यारे१'s picture

8 Sep 2014 - 4:23 pm | प्यारे१

आता दिवाळी अंकासाठी विषय सांगता का काका? ;)

प्रभाकर पेठकर's picture

8 Sep 2014 - 4:31 pm | प्रभाकर पेठकर

अरे असं सारखं सारख गीतावाचन करायला लावू नकोस मला. *sad*

एकदम गावामधलं 'ढ' झाल्यासारखं वाटलं. गा आणि व मध्ये ढ.

थॅन्क यु, 'काका'.

चला...ह्या निमित्ताने का होईना .... श्रीगणेशा करावा म्हणतो

प्रभाकर पेठकर's picture

8 Sep 2014 - 4:33 pm | प्रभाकर पेठकर

चावट विषय देऊ का?

आम्ही "बा म वि प" नाही होऊ देत !!!

चौकटराजा's picture

5 Sep 2014 - 5:53 am | चौकटराजा

एक पी डी एफ करून ती ई -मेलवर पाठवू का ?. त्यात मजकूर व चित्रेही असतील.
विषय - युरोपातील वास्तुकलेचा खजिना .

स्पंदना's picture

5 Sep 2014 - 6:16 am | स्पंदना

काहीतरी वेगळं पहायला मिळणार अस वाटतय.
पण पीडीएफ अ‍ॅक्सेस करता येणार नाही अस वाटतय मागच्या अनुभवावरुन.

चौकटराजा's picture

5 Sep 2014 - 7:04 am | चौकटराजा

बर. मग धाग्याप्रमाणेच लेखन करायचे का ?

हो. ते जास्त बर पडेल अस वाटतय. विशेष्तः चित्र लावताना लिंकाच बर्‍या पडतील.

पैसा's picture

5 Sep 2014 - 9:25 am | पैसा

धाग्याप्रमाणे लेखन करून जी फाईल तयार होते (टेक्स्ट फाईल) ती जीमेल वर पाठवा.

स्पार्टाकस's picture

6 Sep 2014 - 7:50 pm | स्पार्टाकस

काहीतरी लिहीण्याचा निश्चितच प्रयत्न करेन

चौथा कोनाडा's picture

14 Sep 2014 - 10:43 pm | चौथा कोनाडा

लेख पाठवला आहे (हुश्श्य ! झाला बाबा मुदतीत पुर्ण लिहून ! कॉलेज सबमिशनचे दिवस आठवले) ७ एमबी ची वर्ड फाईल पोहोचली असेल ना जीमेलने ? काय म्हणतायत संपादक ?

पैसा's picture

14 Sep 2014 - 11:05 pm | पैसा

लेख छान आहे! मात्र उत्तर पाठवलंय तशी टेक्स्ट फाईल पाठवा प्लीज! इतकी चित्रे असतील तर आम्हाला पुन्हा मिपावर अपलोड करायला फार त्रास होईल.

अभिप्रायासाठी मनापासून धन्यवाद !

कुठे "दिपावली" या विभागातच लेखन करायचे ना ?
मला Insert Picture असा पर्याय कुठे दिसला नाही.
स्क्रीन वर दिसणारा "Add a New File" " Browse" आणी "Upload' हाच तो पर्याय का?
याने केले व पूर्वपरीक्षण ला क्लिक केले तरी

पैसा's picture

15 Sep 2014 - 7:21 pm | पैसा

व्यनि केला आहे.

आम्हाला काही अजून मुहूर्त लागलेला नाही लिहायला. तरी प्रयत्न नक्कीच करेन.. :)

विटेकर's picture

15 Sep 2014 - 2:58 pm | विटेकर

आम्ही प्रतिसादापुरते , ते नक्की लिहू...

सस्नेह's picture

17 Sep 2014 - 7:09 am | सस्नेह

प्रतिसादक्स मिपाकी शान है !
सगळेच मोजी झाले तर लेखाच्या पायाला कोण वाली ?

ही कसर एखाद्या सकस कथेने दिवाळी अंकात भरून निघो हीच प्रार्थना.

तुम्ही मोजींचे फ्यान दिसत नाही. नाहीतर ही तक्रार केली नसतीत.

यावर दुमत नाही पण तो एक स्वतंत्र साहित्य प्रकार आहे.

मी कथानक रहस्यमई असणार्या कथाबिजाबाबत बोलत आहे.... नुसतेच रहस्यमयी शब्द असणार्या कथांबाबत न्हवे :)

माम्लेदारचा पन्खा's picture

16 Sep 2014 - 11:53 pm | माम्लेदारचा पन्खा

दिलाय ब्वा लेख....गोड मानून घ्या संपादक मंडळी !!

श्रीरंग_जोशी's picture

17 Sep 2014 - 5:21 am | श्रीरंग_जोशी

दिवाळी अंकासाठी कष्ट उपसणार्‍या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!!

अर्धा टंकून व्यनि करायला गेलो स्वतःला आणि मिपा बंद पडले. :-( पुढच्या दिवाळीच्या आत लिहून पूर्ण करण्याचे आश्वासन देतो. :-)

पैसा's picture

17 Sep 2014 - 12:01 pm | पैसा

असं कुठं झालंय! सगळ्यांनाच २ दिवस जास्त देऊ, मिपा बंद पडलं होतं तेवढे! पण लेख पायजेच!

प्रभाकर पेठकर's picture

17 Sep 2014 - 1:26 pm | प्रभाकर पेठकर

>>>> सगळ्यांनाच २ दिवस जास्त देऊ.

उत्साहवर्धक बातमी.

>>सगळ्यांनाच २ दिवस जास्त देऊ

धन्यवाद्स संपादककाकू !! ;)

प्रयत्न जोरात सुरू आहेत. शनिवार/रविवारपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न नक्की करेन. :-)

एस's picture

20 Sep 2014 - 7:05 pm | एस

हुश्श्...

ग्वॉड मानुन घ्या जी. आसलं काय ल्हायची पयलीच कोशिस हाय आमची. लय तरास झाला काय सांगू! :-P

मोजींनी दिवाळी अंकासाठी काही लिहीलं नाही का? :)

आदूबाळ's picture

19 Sep 2014 - 9:53 pm | आदूबाळ

काय की!

पण लिहिल्यास मुद्रितशोधनाविना ते लेखन पाँस व्हावं ही विनंती.

प्रभाकर पेठकर's picture

24 Sep 2014 - 2:00 pm | प्रभाकर पेठकर

दिवाळी अंक २०१४ ची साहित्य स्विकारण्याची तारीख उलटून गेल्यामुळे दिवाळी अंक २०१४ चे दरवाजे आता बंद झाले आहेत का? कि किलकिले उघडे आहेत?

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

30 Sep 2014 - 5:48 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

मलाही हाच प्रश्न पडलाय.
मला माहीत आहे आता फारच उशीर झालाय पण काय करणार माझी कविता फारच लहरी आहे.

इनिगोय's picture

30 Sep 2014 - 8:24 am | इनिगोय

कधी? ...कधी?

झकासराव's picture

31 Oct 2014 - 1:59 pm | झकासराव

दिवाळी अंक उत्तम झाला आहे.
:)

गवि, रामदास काका, प्रभु सर, जेपी, जॅक डॅनियल्स ह्यांनी देखील लेखणी सरसावयला हवी होती असं वाटलं.
अजुन मोठा अंक वाचायला आमची ना नाही :)

मूळ विषया पासुन जराचे अवांतर :-
आपले मिपा आयबीएन लोकमतच्या "वाचाल तर वाचाल" कार्यक्रमात दिसले. :) इतर मराठी संकेतस्थळे सुद्धा दिसली. :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
अमरापूरकरांचे जाणे
पडद्यावरील खलनायक, सामाजिक क्षेत्रातील 'नायक'
मातीत रमणारा अभिनेता!
अंत्यदर्शनासाठी कलाकारांना वेळच नाही ! :(
Maharaani :- { Sadak }