श्री. मनमोहनसिंह यांचे प्रंतप्रधान म्हणून निवृत्त झाल्यानंतर त्यांचे वास्तव्य दिल्लीमध्ये प्रशस्त अश्या ठिकाणी व्यतित होणार आहे. वर्तमानपत्रातील बातम्यानूसार एका २ १/२ एकरातील भू़खंडावर ४ शयन घर, हिरवळ, उद्यान इत्यादींची सोय असेल.
उच्च पदस्थ लोकांचे जीवन कधी कधी आरोप प्रत्यारोपाच्या गदारोळात झाकले जाते. त्यांनी देशाला दिलेले योगदान विसरले जाते. कधी कधी नकळतच ते वादामध्ये गुरफटले जातात उदा. प्रतिभा ताई पाटिलांचे निवृत्तीनंतरचे वास्तव्य, त्यांना मिळालेल्या भेटी गाठी इत्यादी.
मनमोहन सिंह हे एक सुसंस्कृत व्यक्ति म्हणून ओळखले जातात. त्यांना असलेल्या मर्यादेत राहुनही त्यांनी देशाची सेवा केली असे समजायला हवे. पदावर असतांना १८ / १८ तास ते काम करित असत असे वाचल्याचे मला स्मरते.
राजकारणी आणि सिनेकलावंत लोकांना प्रसिद्धीचे वलय प्राप्त होते आणि झपाट्याने ते दुरही होत जाते. सुदैवाने मनमोहनसिंहाना याचा अनूभव आला नसावा. भारतासारख्या खंडप्राय देशाचे प्रमूख पद १० वर्षासाठी मिळणे ही साधीसुधी घटना नव्हे, कदाचित इतरांना त्यांचा हेवाही वाटत असेल.
असो, १४ तारखेनंतर त्यांना निवृत्तीनंतरे जीवन समाधानाचे जावो हीच माझी सदिच्छा.
प्रतिक्रिया
12 May 2014 - 12:16 pm | विनोद१८
13 May 2014 - 9:14 pm | विवेकपटाईत
*ROFL* *lol*
12 May 2014 - 12:23 pm | यसवायजी
काथ्याकुट?
12 May 2014 - 12:31 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
अर्थशास्त्र जाणणारा,अनेक वर्षे नोकरशाहीत काम केलेला,कुठ्लाही भ्रष्टाचाराचा डाग नसलेला पंतप्रधान ह्या देशाला मिळाला हे आपले भाग्य.चित्र-विचित्र,विनोदी आरोप होवूनही सिंग काम करत राहिले व त्यांनी देशाला एक आदर्श घालून दिला.
पुढचे आयुष्य त्याना समाधानाचे जावो हीच इच्छा.
13 May 2014 - 8:38 pm | श्रीगुरुजी
>>> अर्थशास्त्र जाणणारा,अनेक वर्षे नोकरशाहीत काम केलेला,कुठ्लाही भ्रष्टाचाराचा डाग नसलेला पंतप्रधान ह्या देशाला मिळाला हे आपले भाग्य.चित्र-विचित्र,विनोदी आरोप होवूनही सिंग काम करत राहिले व त्यांनी देशाला एक आदर्श घालून दिला.
:yahoo:
तुम्ही बाई भलतेच विनोदी बर्का नानासाहेब!
13 May 2014 - 9:15 pm | विवेकपटाईत
अर्थशास्त्र जाणणारा?????????????
13 May 2014 - 9:15 pm | विवेकपटाईत
अर्थशास्त्र जाणणारा?????????????
12 May 2014 - 12:41 pm | श्रीगुरुजी
तसेही ते १९९६ पासून आजतगायत निवृत्ताचेच आयुष्य जगत होते. आता १६ मे नंतर काय वेगळे करणार आहेत?
12 May 2014 - 1:41 pm | नानासाहेब नेफळे
नमोही संघाच्या कळसुत्री बाहुलीशिवाय वेगळ्या भूमिकेत राहणार नाहीत.नमो पीएम झाले तर मनमोहनसिंग यांची भूमिका ते घेणार, आदेश पाळायची ..व सोनियांच्या भूमिकेत संघ असणार...
12 May 2014 - 8:27 pm | श्रीगुरुजी
मोदींनी गुजरातमध्ये संघाला व विहिंपला फारशी भीक घातली नव्हती. त्यांच्याकडे बरेचसे दुर्लक्षच केले होते त्यामुळे उलटे होईल. संघ मौनमोहनांच्या भूमिकेत असेल व मोदी सोनियांच्या. मोदी बोले मोह्न डोले असे होईल.
12 May 2014 - 11:35 pm | नानासाहेब नेफळे
तसे नाही, मोदी पक्के संघिष्ट आहेत. गुजरातचा विकास, त्याची दणक्यात जाहिरात ,मग मोदींची लार्जर दॅन लाईफ प्रतिमा हे सगळे संघाचे प्लॅन होते, मोदी फक्त ते एक्झीक्युट करत होते . त्यामुळेच संघ मोदींच्या पाठीमागे उभा आहे.
संघातून वर आलेले गडकरी महाजनादी प्रभृती संघालाच फाट्यावर मारत होते ,म्हणून भाजप दहा वर्षे घरी बसला होता .आता भाजपवर पुर्ण संघाचा ताबा आहे.'फोडीले भांडार धन्याचा माल,मी तो हमाल भारवाही 'या ऊक्तीप्रमाणे मोदी इमानेइतबारे संघाचे अजेंडे राबवत राहतील.
13 May 2014 - 3:43 pm | llपुण्याचे पेशवेll
चांगलंय. संघाचा देशहितकार अजेंडा राबवणारा चांगला माणूस मिळाला. तो पंतप्रधान झाला तरच देशाचे हित होईल.
13 May 2014 - 8:32 pm | श्रीगुरुजी
>>> मोदी इमानेइतबारे संघाचे अजेंडे राबवत राहतील.
परकीय महिलेचे इमानइतबारे अजेंडे राबवून देशाची वाट लावण्यापेक्षा संघासारख्या नि:स्वार्थी व देशभक्त संघटनेचे अजेंडे राबविणे हेच देशहिताचे ठरेल.
19 May 2014 - 3:58 pm | पियू परी
परकीय महिलेचे इमानइतबारे अजेंडे राबवून देशाची वाट लावण्यापेक्षा संघासारख्या नि:स्वार्थी व देशभक्त संघटनेचे अजेंडे राबविणे हेच देशहिताचे ठरेल.
>> अनुमोदन.
12 May 2014 - 12:44 pm | चौकटराजा
निवृत झाल्यावर त्यानी एक अत्यंत प्रामाणिक कथनात्मक पुस्तक लिहावे. त्यात आपण नसताना अशीच प्रगतीची वाटचाल
चालू राहिली असती की नसती याचा तर्कशुद्ध उहापोह यानी करावा.तसेच झालेली प्रचंड महागाई जी नवश्रीमंत जनाच्या क्रयशक्ती मुळे? सहाव्या वित्त आयोगामुळे? पेट्रोलच्या आंतरराष्ट्रेय किमतीमुळे? शेतकर्याना वाढवून दिलेल्या भावामुळे ? नक्की कोणता फॅक्टर किती कारणीभूत झाला ते कथन करावे .
12 May 2014 - 1:00 pm | माहितगार
भारतीय सर्वच निवृत्त लोकांनी खरच अस काम केल तर खूप फायदेशीर होऊ शकत. (त्यांना दिर्घायूष्याच्या शुभेच्छा देऊन) सर्वांबद्दलच म्हणावे वाटते, जिवंतपणी भेव वाटला तर मेल्यावर प्रकाशित करण्याची व्यवस्था करावी पण आपल्याला दिसल तेवढ सत्य प्रामाणिक पणे आत्मचरित्रातून प्रत्येकाने मांडाव, किमान वरजाण्यापुर्वी प्रामाणिकपणे खर्याला खरे आणि खोट्याला खोटे बरोबरला झालेल्या दिसलेल्या चुकांना चूक म्हणावे म्हणजे पुढच्या पिढ्यांना काय बदल करावेत हे प्रामाणिक अनुभव कथनातून अधिक व्यवस्थीत कळू शकते.
12 May 2014 - 8:24 pm | श्रीगुरुजी
>>> निवृत झाल्यावर त्यानी एक अत्यंत प्रामाणिक कथनात्मक पुस्तक लिहावे.
निवृत्तीनंतर कृतज्ञता म्हणून त्यांनी सोनिया, पप्पू, रॉबर्ट व प्रियांकाचे चरित्र लिहावे.
12 May 2014 - 11:46 pm | नानासाहेब नेफळे
गुर्जी! ,इतरांच्या चरित्राची कशाला काळजी तूमी का करत आहात??
चाल, चरित्र ,प्रखर राष्ट्रवाद, भाषाशुचीता याची लाईफटाईम व्हॅलीडीटी फक्त भाजपाकडे व आरेसी लोकांकडेच असते.त्यात परत येदीयुरप्पा स्टाईल शुद्धीकरणाचे टॉप अप प्लॅन असतील तर मग काय..मज्जानू लाईफ...
13 May 2014 - 8:35 pm | श्रीगुरुजी
>>> गुर्जी! ,इतरांच्या चरित्राची कशाला काळजी तूमी का करत आहात??
चाल, चरित्र ,प्रखर राष्ट्रवाद, भाषाशुचीता याची लाईफटाईम व्हॅलीडीटी फक्त भाजपाकडे व आरेसी लोकांकडेच असते.त्यात परत येदीयुरप्पा स्टाईल शुद्धीकरणाचे टॉप अप प्लॅन असतील तर मग काय..मज्जानू लाईफ...
आम्ही कशाला इतरांच्या चरित्राची काळजी करू? आम्ही फक्त आदरणीय म.मो.सिंगांना एक सुयोग्य काम सुचवित आहोत.
>>> चाल, चरित्र ,प्रखर राष्ट्रवाद, भाषाशुचीता याची लाईफटाईम व्हॅलीडीटी फक्त भाजपाकडे व आरेसी लोकांकडेच असते.
हे मात्र बरीक खरं हो माईसाहेब!
14 May 2014 - 3:01 pm | नानासाहेब नेफळे
गुर्जी, ते येदुयुरप्पा टॉपअप प्लॅनविषयीपण लिवा कि.नक्की हे शुद्धीकरण कसे केले जाते?
बंगलोरच्या बाहेर हजारो एकर सरकारी जमीन खरेदी करुन तुंबड्या भरणारा आप्पा ,इलेक्शन लागले की लगेचच प्रखर राष्ट्रवादी कसा झाला ?भाजपने नंबर पोर्टेबिलीटी प्रमाणे कॅरॅक्टर पोर्टबीलीटी सर्व्हिस सुरु केली असावी. :-P
14 May 2014 - 8:38 pm | श्रीगुरुजी
>>> गुर्जी, ते येदुयुरप्पा टॉपअप प्लॅनविषयीपण लिवा कि.नक्की हे शुद्धीकरण कसे केले जाते?
बंगलोरच्या बाहेर हजारो एकर सरकारी जमीन खरेदी करुन तुंबड्या भरणारा आप्पा ,इलेक्शन लागले की लगेचच प्रखर राष्ट्रवादी कसा झाला ?
लिहितो ना. पण आधी 'ग्रेटथुन्कर' चा 'टॉपगिअर्ड फिलॉसॉफर' कसा झाला, नंतर 'टॉपगिअर्ड फिलॉसॉफर' चा 'नानासाहेब नेफळे' कसा झाला आणि नंतर 'नानासाहेब नेफळे' चा लिंगबदल होऊन 'माईसाहेब फुरसुंगीकर' कसा झाला ते सांगा. ते एकदा सांगितले तुमच्या सर्व शंका-कुशंकाचे समाधान करतो.
14 May 2014 - 9:10 pm | नानासाहेब नेफळे
बोखारीयाचे प्रकरण इतके शेकलं काय :-P
15 May 2014 - 12:19 pm | श्रीगुरुजी
कोण बोखारिया?
माई, हा तुझा नवीन आयडी दिसतोय?
14 May 2014 - 9:29 pm | टवाळ कार्टा
उद्दाम आणि सचिन राहीले की :)
17 May 2014 - 2:07 am | हरकाम्या
त्यांनी पुस्तक लिहायला सुरुवात केलीय अस कानावर आलय. तुम्ही जाना त्यांना मदत करायला तेवढेच एखादे
फुटकळ पद तुमच्या पदरात पडेल......हा..हा..हा..हा..हा.
13 May 2014 - 10:07 am | नितिन थत्ते
कै उपयोग नाही.
कलामांनी काही लिहिलं तरी लोक सुब्बुस्वामीलाच खरं मानतात. :)
13 May 2014 - 9:19 pm | विवेकपटाईत
शेतकर्याना वाढवून दिलेल्या भावामुळे ? २००४ च्या भावांची २०१३ शी तुलना करून बघा. शेतकर्यांना भाव कमी दिला कि जास्त आपसूक कळेल. शरद पवार नसते तर शेतकर्यांचे दिवाळे निघाले असते. शेतकर्यांच्या पाठीशी उभा राहणारा एकमेव केंद्रीय मंत्री म्हंटले तर नवल नाही.
17 May 2014 - 2:01 am | हरकाम्या
एवधा भाव मिळुनही त्यांच्या आत्महत्या कमी होत नाहीत.आता मध्यमवर्ग आत्महत्या करायला लागु नये म्ह्णजे मिळवल.
12 May 2014 - 12:59 pm | मृत्युन्जय
पदावर असतांना १८ / १८ तास ते काम करित असत
महिन्यातुन की वर्षातुन? की प्रत्येक टर्ममध्ये मिळुन? बादवे पक्षप्रमुखांशी फोनवरुन बोलण्याचा आणि त्यांच्या घरी जाउन चर्चा करण्याचा काळही यातच धरला आहे का?
12 May 2014 - 1:19 pm | प्यारे१
>>>>१८ / १८ तास ते काम करित असत
यु रियली मीन इट?
>>>>फोनवरुन बोलण्याचा
>>>>र्चा करण्याचा
यु रियली मीन इट?
बाकी प्रश्न मलाही पडलाय
13 May 2014 - 3:45 pm | मृत्युन्जय
यु रियली मीन इट? म्हणजे काय? त्यांनी तेवढेही काम केलेले नाही असे तुमचे म्हणणे आहे काय?
13 May 2014 - 3:58 pm | प्यारे१
नक्की काय काम केलं?
नि
मुख्य म्हणजे बोलणं की ऐकणं?
चर्चा करणं की चर्चा ऐकणं?
:)
पंतप्रधान म्हणून ते स्वतः मानसिकरित्या तयार होते का हा खरा प्रश्न आहे.
चालणं, बोलणं, सभेसाठी गेल्यावरचं जनते साठीचं हात हलवणं ते बघून त्यांच्या मागं कुणीतरी एक त्यांना हे सगळं करायला भाग पाडतंय असं चित्र उभं राहत होतं. ही इज/वॉज नेव्हर नॅचरल.
12 May 2014 - 12:59 pm | धर्मराजमुटके
मनमोहन सिंग यांचे आणि सर्व भारतीय माणसांचे आयुष्य आता नक्कीच समाधानात जाईल अशी अपेक्षा बाळगतो.
12 May 2014 - 1:04 pm | आत्मशून्य
:)
17 May 2014 - 2:12 am | हरकाम्या
मनमोहनसिंगांचे नीट जाईल हो पण हे हरलेले त्यांचे पक्षीय मोदींना नीट काम करु देतील का ?
12 May 2014 - 1:04 pm | दुश्यन्त
डॉ मनमोहनसिंह हे अजून काही वर्षे तरी खासदार ( राज्यसभेचे सदस्य) असणार आहेत तेव्हा त्यांना राज्यसभेच्या माध्यमातून आपले योगदान देत येईल. त्यांनी पुस्तक लिहावे आणि त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत भ्रष्टाराची नवनवीन शिखरे गाठणारे घोटाळे होत असताना मनमोहनसिंह त्यापासून खरेच अनभिज्ञ होते कि हाय कमंडचा दबाव होता कि सगळ माहित असून त्यांनी सोयीस्कर मौन बाळगले हे जनतेला समजले तर बरे होईल. त्यांच्या काळात भ्रष्टाराची प्रकरणे झाली ती न रोखण्याला, प्रचंड महागाई वाढण्याला पंतप्रधान म्हणून ते जबाबदार ठरतातच.पदावर असताना त्यांनी कायम मौन बाळगणे पसंत केले. आता पद गेल्यावर तरी ते बोलतील/लिहतील अशी अपेक्षा आहे.
12 May 2014 - 1:24 pm | प्रसाद१९७१
मनमोहन सिंग कधीच निवृत्त झाले होते. आता वेगळे ते काय?
12 May 2014 - 1:47 pm | आनंदराव
दीवार मध्ये अमिताभ चा एक डायलॉग आहे... मेरा बाप मर तो पहले ही गया था, आज तो उसको सिर्फ जलाया है.
त्याच धर्तीवर असे म्हणावेसे वाटते की मनमोहनजी तो कबके रिटायर्ड हो चुके है, अब तो सिर्फ अपना पद छोडेंगे.
12 May 2014 - 1:53 pm | मदनबाण
मनमोहन सिंह हे एक सुसंस्कृत व्यक्ति म्हणून ओळखले जातात.
हॅहॅहॅ... ह्यांच्या सहकार्यांच्या भ्रष्टाचाराला यांना वेसण घालता आली नाही, हाच का यांचा सुसंस्कृतपणा ? मग असो ते कमालीचे सुसंस्कृत, पण त्यांचा हा गुण देशाला भिकेला लावणारा ठरला नाही ?
त्यांना असलेल्या मर्यादेत राहुनही त्यांनी देशाची सेवा केली असे समजायला हवे.
हॅहॅहॅ... घोटाळे होत असताना त्यावर ब्र देखील न काढणे ही देशाची सेवा ? सैंनिकांची मुंडकी छाटली गेली तेव्हा सुद्धा मौन पाळणे ही सेवा ? पण बरोबर आहे "मर्यादा" पाळायला हवी ना !
एक वाचलेला विनोद आठवला तो इथे देतो. :-
एकदा एका भुताने मनमोहन सिंग यांना झपाटले !
३ दिवसांनी त्या भुतानेच एका मांत्रिकाला गाठले, व म्हणाला... अरे लवकर यांच्या शरीरातुन मला बाहेर काढ !
मांत्रिक :- अरे तुझे काम तर झपाटणे, मग तू बाहेर काढण्याची मागणी कशाला करतो आहेस ?
भूत :- मला मौन व्रताची अॅलर्जी आहे.
पदावर असतांना १८ / १८ तास ते काम करित असत असे वाचल्याचे मला स्मरते.
त्यात काय विशेष ?
12 May 2014 - 1:59 pm | पैसा
मनमोहनसिंगाना शुभेच्छा!
घराबद्दल वाचले. पण ही घरे सगळ्यांना देत नाहीत का? लालबहादूर शास्त्रीजींच्या कुटुंबियांना दिले नव्हते बहुतेक. कारण त्यांचे स्वतःचे घर कधीच झाले नाही असे काहीसे वाचलेले आठवत आहे.
12 May 2014 - 8:43 pm | हुप्प्या
भारतीय लोक कुठल्याही दगडाला शेंदूर फासलेला दिसला की हात जोडतात. मनमोहनसिंग याहून वेगळे नव्हते. त्यांनी आपल्यावर पडलेली जबाबदारी मनावर घेतल्याचे दिसून आले नाही. एखादा रंगहीन, गंधहीन, स्वादहीन वायू असतो तसे कलरलेस, ओडरलेस, टेस्टलेस व्यक्तिमत्त्व, रटाळ ह्या शब्दाची व्याख्या म्हणता येईल इतकी रटाळ वक्तृत्वकला. सगळा आनंद होता.
त्यांच्या निवृत्त जीवनाकरता शुभेच्छा देण्याची गरज वाटत नाही.
संपादित.
14 May 2014 - 5:33 pm | सूड
>>रटाळ ह्या शब्दाची व्याख्या म्हणता येईल इतकी रटाळ वक्तृत्वकला. सगळा आनंद होता.
सहमत!! :)
14 May 2014 - 1:41 pm | हुप्प्या
मनमोहनसिंग निवृत्त झाल्यानंतर पुन्हा इतका अतीलायक (ओव्हरक्वालिफाईड) पंतप्रधान भारतीयांना लाभू नये अशा त्यांना शुभेच्छा देतो (कारण भारतीयांची इतका स्थितप्रज्ञ नेता पेलायची लायकीच नाही ना म्हणून!)
14 May 2014 - 5:21 pm | वेताळ
विपश्यना केंद्रात पाठवायला हवे. उत्तम मार्गदर्शन करु शकतील.बाकी काल व आज त्यांचे टीव्हीवर दर्शन झाले त्यात ते प्रत्येकाचा निरोप घेताना खुप उत्साही दिसत होते. आता निदान त्या उत्साहात त्यानी राहुल गांधीच्या पाया नाही पडले म्हणजे मिळवली.
15 May 2014 - 12:59 pm | चिगो
आयला.. तुमच्या ह्या प्रतिसादची भिती वाटल्यानेच का काय, राहुलबाबा कालच्या निरोप सहभोजनाच्या कार्यक्रमाला गेले नव्हते म्हणे.. ;-)
15 May 2014 - 3:22 pm | नानासाहेब नेफळे
नरेंद्र मोदींना तर इतका उत्साह आला आहे की त्यांना भाजपचे कार्यालय थेट गांधीनगरलाच हलवले आहे व राजनाथपासून ते गडकरीपर्यंत सगळे तिकडे जाऊन लाळघोटेपणा करत आहेत व रडकी बाळं दिल्लीत गाल फूगवून बसली आहेत.कालाय तस्मै नमो.
15 May 2014 - 8:37 pm | श्रीगुरुजी
>>> त्यांना भाजपचे कार्यालय थेट गांधीनगरलाच हलवले आहे
म्हणजे २००४ ते आजतगायत पंतप्रधान कार्यालय १०, जनपथ इथे हलविले होते तसंच ना!
>>>> व राजनाथपासून ते गडकरीपर्यंत सगळे तिकडे जाऊन लाळघोटेपणा करत आहेत
म्हणजे पवार, मौनमोहन, सुशील, विलास वगैरे मंडळी १०, जनपथ ला जाऊन जे करत होते तेच ना!
15 May 2014 - 9:42 pm | नानासाहेब नेफळे
पवारांचा स्वतःचा पक्ष आहे ,गडकरी स्वबळावर नागपूरच्या पालिकेत नगरसेवकही होऊ शकत नाही. :-P
15 May 2014 - 9:45 pm | पैसा
आपल्या होऊ घातलेल्या माजी पंतप्रधानाना शुभेच्छा द्या! तुम्हाला मोदी आणि गडकरी इतके आवडतात की तुम्ही सगळीकडे त्याम्च्याबद्दल बोलल्याशिवाय राहूच शकत नाही का?
16 May 2014 - 10:36 am | श्रीगुरुजी
>>> पवारांचा स्वतःचा पक्ष आहे
मग जा त्यांच्या पक्षात
17 May 2014 - 1:52 am | हरकाम्या
पवारांचा पक्ष सध्या मरु घातलाय. तिथ कशाला जाताय?
16 May 2014 - 11:35 am | आनन्दिता
मला वाटतंय मनमोहन सिंगा नी बॉलिवुड मधे नशिब आजमावावं.
अनुराग बासु ला सांगुन " बर्फी २ " काढायला लावावा अन त्यात लीड रोल करावा. :)
16 May 2014 - 6:59 pm | अभिजित - १
एखाद्या माणसाचे लग्न उर्वशी किवा मेनके बरोबर लावावे पण त्याला "त्याची" बंदी घालावी. म्हणजे त्याला कसे वाटेल ? तसे या मुकमोहनचे झाले होते. आपल्या हातानेच त्याने हे करून घेतले.
18 May 2014 - 12:59 pm | आत्मशून्य
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/35269041.cms
18 May 2014 - 4:18 pm | डॉ सुहास म्हात्रे
मस्त दुवा आहे. काही खास गुद्दे...
'कोई देख्ख लेगा तो बस्स, बोलेगा के हर बार मैणू कोई औरत जातही कुर्सीविच बिठाणे आन्दी है.'
'हां हां..जोभी दिल करदा..अब्ब तूस्सी आझाद हो.'
'अब्ब कुछ बरस तो कोयलाणू हात्तभी नही लगाऊंगा मैं. कोयला बेचेगा तू और हात्तविच कालिख लगेगी मेरे.'
दुव्यासाठी धन्स !