मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

लोकसभा २०१४ बीजेपी सरकार

वेताळ · · काथ्याकूट
आजच आपली लोकसभा २०१४च्या निवडणुकीचे मतदान संपले. खुपच प्रदिर्घ चाललेले जवळजवळ ९ टप्प्या पर्यत चाललेले मतदान असलेली ही पहिलीच निवडणुक होती. सर्वसाधारण सत्ताधारी विरुध्द सर्व विरोधक असे स्वरुप हवे असताना प्रथमच ह्या निवडणुकीत सत्ताधारी व सर्व विरोधक एकत्र येवुन एका प्रमुख विरोधी पक्षात ही निवडणुक पार पडली. कॉग्रेस पक्षाने सर्वात चांगली रणनिती आखली असे वाटत असतानाच भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्रमोदी नी कॉग्रेसची जी वाताहात प्रत्यक्ष मैदानावर केली त्याला तोड नाही.सर्व हल्ला स्वःताच्या अंगावर घेवुन एकाद्या कसलेल्या योध्याप्रमाणे शेवटी कॉग्रेसला शेपुट घालुन मैदानावरुन पळावे लागले. जगातील सर्वश्रेष्ट धर्मनिरपेक्ष नेते नितीशकुमार ह्यांना त्याच्या सेकुलरनिती मुळे आपले अस्तित्व टिकवणे मुश्किल झाले आहे. माणुस स्वःताच्या पायावर धोंडा कसा मारुन घेतो ह्याचे इतिहासप्रसिध्द उदाहरण त्यानी भारतिय जनतेला घालुन दिले आहे.बुडत्याला काडीचा आधार मिळावा तसे लालुना बिहार मध्ये आधार नितीशकुमारांनी मिळवुन दिल्यामुळे लालु नितीशकुमारांचे जन्मभर ऋणी राहतील. ममतादीदी व जयाअम्मा आपले खरे विरोधक कोण आहेत हे विसरुन नरेंद्रमोदींवर टिका करताना लक्षात येत होते कि प्रथमच बंगालव तामिळनाडुमध्ये कमळ खुलणार आहे. जिथे भाजपाला एकही जागा मिळणार नाही असे छातीठोक पणे राजकिय पंडीत सांगत होते त्या भुमीवर ह्यावेळी कमळ नक्की खुलणार असे दिसते आहे आंध्र मध्ये आजच मुन्सिपल रिझल्ट लागले त्यात टीडीपी+बीजेपी युतीने सीमांध्र मध्ये जबरदस्त यश मिळवले आहे.त्यामुळे लोकसभेत काय होणार हे सांगायला ज्योतीष्याची गरज नाही. दिल्लीत आपची हालात अगदीच वाईट झाली आहे.दिल्लीमध्ये बीजेपी सर्व लोकसभा जागा जिंकेल. सर्व वाहीन्याचे एक्जिटपोल रिझल्ट येत आहेत.माझ्या मतानुसार मिळणार्‍या जागा कशा असतील त्याचा चार्ट खाली देत आहे. बीजेपी+ = २७० ते २९० कॉग्रेस+ = ११० ते १२० इतर+ = १२५ ते १४०

वाचन 20651 प्रतिक्रिया 0