==================================================================
जगप्रसिद्ध प्राचीन हिंदू मंदिरांचा देश, कंबोडिया : १... २... ३... ४... ५... ६... ७... ८... ९... १०... ११... १२...
==================================================================
...कोरीवकामाचे वर्णन करायचा प्रयत्न मुद्दामच केला नाही... दगडांनी लिहिलेले हे काव्य शब्दात पकडणे केवळ अशक्य आहे. नि:शब्द होऊन ते डोळ्यांनी मनात साठवणेच शहाणपणाचे आहे.
यानंतर आम्ही काही मंदिरांना धावती भेट दिली. त्याचा हा धावता आलेख...
बांतीय साम्रे मंदिर
हे सम्राट दुसरा सूर्यवर्मनने (इ स १११३ - ११५०) वाराव्या शतकाच्या मध्यात बांधलेले विष्णूमंदिर आहे. पुनस्थापनेचे अनास्टायलोसिस तंत्र वापरून त्याला जवळ जवळ पूर्णावस्थेत उभे केलेले आहे. ख्मेर मंदिरे बांधण्यासाठी लागणारे दगड मिळणार्या कुलेन पर्वतराजीतील खाणींच्या परिसरात राहणार्या साम्रे जमातिच्या नावावरून या मंदिराचे नाव पडले आहे.
चला तर चक्कर मारू या मंदिरामध्ये...
बांतीय साम्रे परिसरातले स्वागतालय
.
बांतीय साम्रे : ०१ : गोपुर
.
बांतीय साम्रे : ०२
.
बांतीय साम्रे : ०३
.
बांतीय साम्रे : ०४
.
......
बांतीय साम्रे : ०५ व ०६
.
बांतीय साम्रे : ०७
.
बांतीय साम्रे : ०८
.
बांतीय साम्रे : ०९
.
बांतीय साम्रे : १० : मंदिर त्याच्या संपूर्णावस्थेत कसे दिसत होते याचे कल्पनाचित्र
.
प्रे रूप मंदिर
हे शिवमंदिर सम्राट दुसरा राजेंद्रवर्मन याने दहाव्या शतकाच्या दुसर्या भागात बांधले. याच्या बांधकामाच्या खास शैलीला त्याचेच म्हणजे प्रे रूप शैली असे नाव दिले गेले आहे.
प्रे रूप : ०१
.
प्रे रूप : ०२
.
प्रे रूप : ०३ : ह्या मंदिराच्या मध्यभागातिल पायर्यांचा चढ इतका तीव्र आहे की केवळ पर्यटकांनाच नाही तर येथे नेहमी येणार्या कंबोडियन लोकांनाही तिरके राहूनच चढ-उतर करावे लागते !
.
प्रे रूप : ०४
.
प्रे रूप : ०५
.
प्रे रूप : ०६ : मंदिराच्या मध्यशिखराच्या आतून शिवपिंडीच्या वरच्या भागाचा फोटो. वरचा मोकळा भाग बहुतेक सोन्याचे शिखर चोरीला गेल्यामुळे उघडा झालेला आहे
.
प्रसात क्रावन मंदिर
सम्राट हर्षवर्धनच्या कालात (इ स ९१५ -९२३) बांधले गेलेले हे शिवमंदिर सम्राटाने बांधलेले नसून बहुतेक त्याच्या दरबार्यांपैकी कोणीतरी बांधले असे समजले जाते. याच्या बांधणीचा विशेष म्हणजे या मंदिराची रचना नेहमीच्या ख्मेर परंपरेप्रमाणे चार मनोर्यात मध्यभागी मुख्य मनोरा अशी नसून एका रांगेत पाच मनोरे अशी आहे.
प्रसात क्रावन : ०१
.
प्रसात क्रावन : ०२ : शिलालेख
.
प्रसात क्रावन : ०३ : मध्य मनोर्यातल्या शिवपिंडी भोवतालच्या भिंतीवरील तांडवनृत्य करणार्या शिवाचे उठावचित्र
.
प्रसात क्रावन : ०४ : मध्य मनोर्यातल्या शिवपिंडी भोवतालच्या भिंतीवरील गरूडावर आरूढ झालेल्या विष्णूचे उठावचित्र
.
प्रसात क्रावन : ०५ : मंदिर त्याच्या संपूर्णावस्थेत कसे दिसत होते याचे कल्पनाचित्र
.
थकलेल्या शरीराने आता तक्रार करायला सुरुवात केली होती. संध्याकाळ होऊ लागली होती. शिवाय आज रात्री कंबोज संगीत-नृत्य कार्यक्रम बघायला जायचे होते. त्यामुळे तेथे पूर्ण ताकदीनिशी पोहोचण्यासाठी हॉटेलवर परतून गरम गरम शॉवर घेणे भाग होते. नाईलाजाने परत फिरलो.
कंबोज नृत्य-संगीत-रजनी
पारंपरिक कंबोज नृत्याला "अप्सरा नृत्य" असे म्हटले जाते. अनेक देवळांच्या उठावचित्रांत या अप्सरांना मानाचे स्थान आहे. अंगकोर वट मध्ये तर अप्सरांची वेगवेगळी जवळ जवळ २,००० उठावचित्रे आहेत हे आपण पूर्वीच पाहिले आहे. त्यामुळे या कार्यक्रमाबाबत बरीच उत्सुकता होती.
तर बघूया त्या कार्यक्रमाची क्षणचित्रे...
अप्सरा नृत्य : ०१
.
अप्सरा नृत्य : ०२
.
अप्सरा नृत्य : ०३
.
अप्सरा नृत्य : ०४ : राम आणि सीता
.
अप्सरा नृत्य : ०५
.
अप्सरा नृत्य : ०६
.
अप्सरा नृत्य : ०७
.
अप्सरा नृत्याचे काही क्षणांची चित्रफीत...
.
अप्सरा नृत्यांबरोबर मधून मधून लोकसंगीतनृत्याचाही कार्यक्रम होता...
कंबोज लोककला : ०१
.
कंबोज लोककला : ०२
.
कंबोज लोककला : ०३
.
कंबोज लोककलेच्या नृत्याच्या काही क्षणांच्या दोन चित्रफिती...
.
.
कंबोज कला आणि कंबोज-आंतरराष्ट्रीय जेवणाचा आनंद घेत संध्याकाळ कशी संपली ते कललेच नाही. उद्याच्या दिवसात अजून काय सुखद आश्चर्याचे धक्के बसणार आहेत असा विचार करत बिछान्याला पाठ टेकवली.
(क्रमशः )
==================================================================
जगप्रसिद्ध प्राचीन हिंदू मंदिरांचा देश, कंबोडिया : १... २... ३... ४... ५... ६... ७... ८... ९... १०... ११... १२...
==================================================================
प्रतिक्रिया
23 Mar 2014 - 11:42 pm | सुहास झेले
सुरेख... निव्वळ भान हरपून ते फोटो बघत राहिलो. बांतीय साम्रे तर अप्रतिम. तुमच्यामुळेच आमची ही सफर घरबसल्या होतेय. त्यासाठी मनापासून आभार आणि आता पुढल्या भागाच्या प्रतिक्षेत :)
24 Mar 2014 - 8:36 am | प्रचेतस
जबरदस्त मंदिरे आहेत ही.
धन्यवाद ह्या सहलीबद्दल.
24 Mar 2014 - 8:46 am | प्रमोद देर्देकर
खुप छान माहिती आणि फटु.
24 Mar 2014 - 10:20 am | सुहासदवन
शिलालेखाची भाषा तमीळ किंवा त्याच सारख्या दुसर्या एखाद्या भाषेसारखी आहे काय?
24 Mar 2014 - 10:42 am | डॉ सुहास म्हात्रे
भाषा ख्मेर आहे. तिची लिपी (तमीळ न येणार्या मला) दिसायला तमीळ सारखीच दिसते.
24 Mar 2014 - 10:43 am | डॉ सुहास म्हात्रे
सुहास झेले, वल्ली आणि प्रमोद देर्देकर : अनेक धन्यवाद !
24 Mar 2014 - 10:50 am | सूड
लेखाच्या शेवटी क्रमशः बघून बरं वाटलं. राम आणि सीता थोड्या वेगळ्या तरीही आकर्षक स्वरुपात मांडलेत. पुभाप्र.
24 Mar 2014 - 11:13 am | डॉ सुहास म्हात्रे
बहुसंख्येने बौद्ध असलेल्या दक्षिणपूर्वेच्या सर्वच देशांत रामायणावर आधारीत संगीत, नृत्य, नाटके, इ खूप लोकप्रिय आहेत. पारंपारिक (क्लासीक) कला तर रामायणाशिवाय सुरु होउ शकत नाहीत. यात काही विरोधाभास आहे असे तेथिल लोकांना वाटल्याचे वाटत नाही. बौद्ध धर्म स्विकारताना त्यांनी पूर्वीच्या हिंदू धर्माचा वारसा आत्मियतेने जपलेला आहे हे वारंवार जाणवते. अर्थात त्या रामायणावर स्थानिक पेहराव, प्रथा, इ चे संस्कार होणे सहाजिकच होते.
24 Mar 2014 - 11:43 am | खबो जाप
जेव्हा जेव्हा इस्पिकचा एक्का यांचा भटकंती लेख येतो तेव्हा पहिला आधाशासारखे सगळे फोटो बघून घेतो, मग हळू हळू एक एक बघतो मग प्रवास वर्णन वाचत वाचत बघतो तोपर्यंत काही लिहायला राहतच नाही….
प्रत्येक वेळी फक्त अप्रतिम एवढेच लिहू शकतो ( बहुतेक वेळी ते पण लिहिले जात नाही फक्त लेखाचा आस्वाद घेणे एवढेच होते)
24 Mar 2014 - 5:43 pm | जेपी
अप्रतिम (एवढच सुचतय)
24 Mar 2014 - 5:47 pm | बॅटमॅन
देवळाचे फटू नेहमीप्रमाणेच भारी. अन कंबोज नृत्यकलाही जबरीच ;)
24 Mar 2014 - 6:23 pm | अत्रुप्त आत्मा
लय भारी !
24 Mar 2014 - 7:18 pm | विवेकपटाईत
अप्रतिम आणि सुंदर अप्सरांचे सुंदर फोटो. कम्बोडिया सारखा देश आपली कला, परंपरा अतिशय सुरेख रीतीने विकू शकतो. पण आपल्या देशात आलेल्या पर्यटकांना आपण इतिहास आणि परंपरा दाखवतो का? सर्व दक्षिण पूर्व देशांत मग तो मलेशिया किंवा इंडोनेशिया का 'रामायण' सारख्या महाकाव्याचे मार्केटिंग करते. आपण का करत नाही?
24 Mar 2014 - 7:45 pm | आत्मशून्य
टोनी ज्या च्या एका देमार चित्रपटात एका स्ट्रीट फाईट कोम्पीटीशन मधे त्याचा पराक्रम बघून समालोचक त्याला हनुमान लंकेत घुस्ल्याची उपमा देतो हे ऐकूनच आनंददायी धक्का बसला होता.
24 Mar 2014 - 8:11 pm | मिसळ
उत्तम माहिती आणि फोटो.
24 Mar 2014 - 8:56 pm | मदनबाण
लयं भारी ! :)
25 Mar 2014 - 7:15 am | सुधीर कांदळकर
प्रे रूप ३: माझ्यासारख्या अॅगोरोफोबियावाल्यांचे काय? ** कपाळात आणि जीव मुठीत.
25 Mar 2014 - 9:55 am | डॉ सुहास म्हात्रे
खबो जाप, जेपी, बॅटमॅन, अत्रुप्त आत्मा, विवेकपटाईत, आत्मशून्य, मिसळ, मदनबाण आणि सुधीर कांदळकर : अनेक धन्यवाद !