भटकंती - ६ खेलखेलमें..

इन्ना's picture
इन्ना in जनातलं, मनातलं
20 Mar 2014 - 7:03 pm

भटकंती- ६ खेलखेल में

काल एकटाकी लग्नाच्या बुंदी पाडल्या ,लगोलग फोटोही टाकता आले . पण बुंदीचा झारा थांबायच नाव घेत नाहीये. म्हणून आज खेल के मैदान में.

२०१२ च्या उन्हाळी सुटेत मी , माझा लेक , माझी मैत्रीण आणि तिची लेक असे गर्मनीच्या दौर्‍यावर गेलो होतो. टिनेजर मुल बरोबर त्यातही जर्मनी ला जातोय त्यामुळे गाड्या आणि फुट्बॉल अजेंडावर होतच. एक आर्कीटेक्ट म्हणून माझ्या लिस्टीत २ स्टेडियम होती . केव्हापासून पाहायची होती. फिरून अनुभवायची होती. हळूच मी , मैदानं बघायचीयेत ना ही पण दोन बघून टाकू म्हणून ऐनवेळी घुसवली.

जर्मनी मधे २ वेळा ऑलिंपिक होस्ट केल गेल. नव्यानी स्टेडियम्स बांधली गेली. दोन्हीही त्या त्या काळात एक स्टेटमेंट करण्याकरता बांधले गेले.

१) पहिल स्टेडियम बर्लीनचे , खुद्द हिटलर्ने फ्लॅगऑफ केलेले .त्याच्या राजकीय आय्डियॉलोजीज मांडण्याचे व्यासपिठ असा त्याचा वापर हिटलरला करायचा होता. सुप्रिम सत्ता अन ताकद दाखवणारे रोबस्ट पिलर्स असलेले भव्य स्टेडियम! ऑलिंपिक कालावधीत प्रतिमा साफसफाई पण केली गेली, एका ज्यु अ‍ॅथलिट्चा जर्मन संघात समावेश अन शहरातील ज्युना प्रवेश्बंदीचे बोर्ड काढणे हे वानगी दाखल. (१९३६ ) .

मुळ बर्लिन शहरातून हॅकशयर मार्केट (उच्चार बहुधा बरोबर नसेलच ;) ) नावाच सुंदर स्टेशन . तिथून ऑलिंपिक सिटीला जाणारी ट्रेन मिळणार होती. इतकं सुरेख जुन विटकाम होत की माझी फोटोग्राफी तिथेच सुरू. माझ्या लेकानी ' झालं हिच सुरू ' असा कटाक्ष टाकला. घरातल्या सगळ्यांचाच हिच्या फोटोत माणस शोधावी लागतात , हा आक्षेप आहे. असेना बापडे स्वतंत्र नागरिक आहेत. ;)

1
हे त्या स्टेशनचे प्लॅटफॉर्म
2

तंगडतोड करायची तयारी होतीच . पण उतरल्यानंतर जवळ्जवळ २० मि चालून स्टेडियम पाशी पोचलो.
भव्य!! हा एकच श्ब्द सुचला पहिल्या दर्शनानंतर. ही प्रवेश कमान. ऑलिंपिक बोधचिन्ह मिरवणारी.
3

वास्तू कला हे एक माध्यम असत. बांधकाम करू इच्छीणार्‍याच्या मनात असलेल्या संकल्पना इमारतीच्या माध्यमातून पेश करायच्या. इथे तर टेबलापलिकडे खुद्द हिटलर. काळ १९३२ दर्म्यानचा , हितलरच्या राजकिय महत्वाकांक्षा थर्ड राइश च्या सुरवातीचा . पॉडबेल्स्की नावाचा प्लॅनर आणि वेर्नेर मार्च हा आर्किटेक्ट , यांनी हे शिवधनुष्य उत्तम पेललय. हे स्टेडियम नाझी आर्किटेक्चर्चा नमुना मानले जाते. कुठेही काहीही नजाकतीच नाही सगळ कस भव्य , मी सुप्रिम आहे हे जोरजोरात ओरदून ठसवणार. जागाही भरपूर असल्यानी ह्या वास्तूचा भव्यपणा ठसवायला आवश्यक अ‍ॅप्रिसिएशन सेट्बॅक पण भरपूर. ( मोठी असूनही पुर्ण इमारत कोणत्याही अडथळ्याविना नजरेत भरते. )

4

आत प्रवेश केल्यावर दिसतात ते कार्ल अल्बिकेर नावाच्या नाझी स्कल्प्टर ने केलेले हे खेळाडूंचे पुतळे.
4

मग मुख्य इमारत.
5

हे आतल मैदान,
6

आतल्या खेळ्पट्या वगळता इतर इमारत १९३६ मधिलच .
7

काही पहिल्यांदा घडलेल्या घटना, ह्या ऑलिंपिक बाबत, पहिला इलेक्ट्रॉनीक स्कोर बोर्ड! आणि पहिल्यांदा ग्रीस ला सुर्याच्या किरणांनी प्रज्वलीत करून ३०० रिले धावपटूनी बर्लिनला पोचवलेली ज्योत. ह्यानंतर प्रत्येक ठिकाणी ज्योत अश्याच प्रकारे आणली गेली.
l

मागे एका विस्तिर्ण पटांगणापलिकडे होता बेल टॉवर. बरोबरची मुलं आणि स्वतःचे पाय दोन्ही कुरकुरत असतानाही तेथवर जाउन ठेपलोच. टॉवरच्या वरच्या गॅलरीत टिकिट काढून जाता येतं . तिथून दिसलेल हे स्टेडियम .

6

क्षणभर डोळे मिटले तर, हेल हीटलरचे नारे, १०० मि. मधे सुवर्ण पदक जिंकलेला जेसी ओवेन्स, रंगसफेदीच्यामागे उमटणारे पिडीत ज्युंचे उसासे आणि नाझी भस्मासुराचे फुत्कार पण ऐकू आले.
n

२)दुसर स्टेडियम म्युनिक शहरातल. १९७२ ,साली जर्मनीला परत संधी मिळाली अन दुसर्‍या महायुद्धानंतर प.जर्मनीनी त्याचा उपयोग "जर्मनी हा देश लोकशाही तत्वावर चालणारा भविष्याबद्दल बद्दल आशावादी असणारा आहे " हे ध्वनित करणार स्टेडियम बांधून केला. इथेही गुन्थर बेनिश आणि फ्रेइ ओट्टो नावाच्या आर्किटेक्ट्नी झकास काम केलय. प. जर्मनीला द्यायचा संदेश इमारत स्वरूपातून पोचवायला पुर्ण यशस्वी. दुर्दैवानी , इझ्राईली संघाच्या संतापजनक कत्तलीनी हे ऑलिंपिक जास्त गाजले.
वजनाला हलक्या अश्या टेन्साइल स्ट्रक्चर्स चा (वन ऑफ द) जनक फ्रेइ ओट्टो. भल्या मोठ्या विस्तिर्ण अश्या कॅनॉपिज , प्रेक्षकांच्या बैठक व्यवस्थेला पुर्ण आच्छदू शकेल असा एक्सपान्स असलेला , पारदर्शक अक्रेलिक काचांचा/प्लास्टिक चा पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात वापर केला गेला. जे स्वातंत्र्य, खुले पणा , लोकशाही जगासमोर मांडायची होती ती पुर्ण पणे जाणवत राहते ह्या प्रांगणातून फिरताना.
q

h

t
जलाशय ,त्याभोवतालच्या पायवाटा, हिरवळ, ऑर्गॅनिक फॉर्म असलेले स्टेडियमचे छप्पर सगळे त्या ऑलिंपिकचे बोध वाक्य हॅप्पी गेम्स प्रतिद्वनीत करत रहातात.
s
ह्याचाही कम्युनिकेशन टॉवर आहे. वर जाउन , ऑलिंपिक स्टेडीयमचा परिसर , दुर बायर्न म्युनिकच होम ग्राउंद मधे पसरलेल म्युनिकच नेटक शहर दिसत.

d

s

दुसर्‍याबाजूला खेळाडूना रहाण्यासाठी बांधलेल्या डॉर्मिटरीज दिसतात.

इथे मात्र डोळे मिटायच धाडस झाल नाही. इज्राईली चमूची निर्दय कत्तल करून पॅलेस्टाइन नी गालबोट लावल खेळ भावनेला.

असो
दोन्ही स्टेडिया एक विशिष्ठ विचारधारा ध्व्नीत करण्याकरता संयोजली गेली. वास्तूरचना ते ध्वनीत करण्यात यशस्वीही ठरली . ती मला जमतिल तशी मांडली.

टिपः क्रूष्ण धवल छयाचित्र नेट वरून साभार . इतर माझ्या मोबाईलवरून साभार. :)

प्रवास

प्रतिक्रिया

जेपी's picture

20 Mar 2014 - 7:13 pm | जेपी

मी पयला .

हा प्रतिसाद मी पुर्ण लेख वाचुन देत आहे . आवडल हेवेसांनल

यसवायजी's picture

20 Mar 2014 - 7:18 pm | यसवायजी

मस्त.
@इतकं सुरेख जुन विटकाम होत की माझी फोटोग्राफी तिथेच सुरु >>
अगदी असच वाटतय तिथलं बांधकाम बघुन.

म्युनीकचे स्टेडीयमचे फोटो त्या टॉवरवरुन काढलेत काय? सुपर्ब आलेत.

इन्ना's picture

21 Mar 2014 - 1:36 pm | इन्ना

धन्यवाद,
हो म्युनिकचे फोटो , फोटोतल्या टॉवरवरून. :)

प्रीत-मोहर's picture

20 Mar 2014 - 7:26 pm | प्रीत-मोहर

सुंदर!!!!

सुधीर कांदळकर's picture

20 Mar 2014 - 8:22 pm | सुधीर कांदळकर

भाग ३ ते ५ आत्ताच वाचले. आवडले.

घरातल्या सगळ्यांचाच हिच्या फोटोत माणस शोधावी लागतात , हा आक्षेप आहे.

असो आक्षेप बापडा. मला तरी सगळीच चित्रे आवडली. विटांच्या भिंतीचे सौंदर्य सुरेख टिपले आहे. पहिली दोन चित्रे आणि टॉवरवरून घेतलेले स्टेडीयमचे चित्र जास्त आवडली. धन्यवाद.

बहुगुणी's picture

20 Mar 2014 - 8:41 pm | बहुगुणी

'ऑर्गॅनिक फॉर्म असलेले स्टेडियमचे छप्पर' म्हणजे काय ते नीटसं कळलं नाही, आणखी काही उदाहरणांसह स्पष्ट करू शकाल?

(हा भाग ६ आहे ना? संपादकांना विनंती करून दुरुस्त करुन घेऊ शकाल.)

सगळे फोटू व काही वर्णन आवडले. थोडे वाचवले नाही.
वीटकामाचे फोटू गोड आलेत.

अत्रुप्त आत्मा's picture

20 Mar 2014 - 10:09 pm | अत्रुप्त आत्मा

जब्बरदस्त!!! http://www.sherv.net/cm/emoticons/olympics/olympic-torch-bearer-smiley-emoticon.gif

केदार-मिसळपाव's picture

20 Mar 2014 - 10:23 pm | केदार-मिसळपाव

म्युंशन (म्युनिक) चे फोटु लै आवडले...तो परिसर एकदम मस्त आहे फिरायला..फोटुबद्दल थांकु बरका..

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Mar 2014 - 10:33 pm | डॉ सुहास म्हात्रे

एका वेगळ्या (आर्किटेक्टच्या) नजरेनं केलेली सफर उत्तम खुलवलीय... स्टेडियम्सची सफर इतकी रोचक ! मजा आ गया !!