ऍड्रिनलिन जंकी

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in काथ्याकूट
18 Sep 2008 - 4:56 pm
गाभा: 

मी ऍड्रिनलीन जंकी आहे. क्रिप्टिक चा आरोप येण्याच्या आधीच स्पष्ट करतो हा काय प्रकार आहे तो. शेवट्च्या चेंडूवर विजयी धाव घेउन भारताचा विजय होतो तेंव्हा हे केमिकल रक्तात धावत असते. ऑस्ट्रेलियात ब्रेट ली १५० + च्या चेंडुला सचिनने जो स्ट्रेट ड्राइव मारला तो आठवा म्हणजे नक्की कळेल. मी फक्त सोपे होण्याकरिता क्रिकेट चे उदाहरण दिले. ह्या केमिकल च्या शोधात आपण सर्व जण असतो. पोटापाण्याच्या उद्योगात सर्वच गुंतलेले असतात. त्या कामाच्या रुटिन चा कंटाळा आला की वेगळ करावसे वाट्ते. नेहेमीच्या कामातला ऍड्रीनलीन चा पुरवठा संपलेला असतो.
माझ्या ओळ्खीचे एक प्रोफेसर आहेत. मध्यम वर्गिय. ह्यांच्याकडे २२ लाखाचा कॅमेरा आहे. जमेल तेंव्हा सुट्टी घेउन हिमालयात जातात. स्टील फोटोग्राफी करतात. तो त्यांचा छंद आहे. त्यांचा संग्रह बघितला की आश्चर्य वाटते. त्यांच्या मास्टर पीस बद्दल त्यांना बोलताना ऐकत रहावेसे वाटते. नंतर लक्षात येते हा छंदापेक्षा ऍड्रिनलीन पाठ्लाग आहे. वर वर बघताना सामान्य दिसणारा माणुस, हिमालयातल्या फोटोग्राफी ची रिस्क घेतो ते सुद्धा कसलाही ग्रुप नसताना. पैसा किती खर्च होतो त्याची पर्वा नाही. इतर वेळी मात्र ५ रुपयाचा पक्का हिशोब.
माझ्याबद्दल म्हणाल तर माझा ऍड्रिनलीन पुरवठा सध्या मि.पा. देते. जिवंत आहोत ह्याची जाणिव देते. मि.पा सद्स्यानी प्रतिक्रियेतुन ठोकले तरी हे मिळ्ते. अर्धवट चालणार्या वॅक्युम क्लिनर प्रमाणे कुठले तरी १ वाक्य घेउन झोड्ल जाते तेव्हासुद्धा . आज काल १.५ तासाचे ६ प्रयोग असतात माझ्या नेहमीच्या तमाशाचे.
सतत बोलत राहुन सुद्धा काहीही थकवा नाही. वर्गपाठाबरोबर ग्रुह्पाठ पण खणखणीत. जोडीला समुपेदशनाची स्व माज सेवा असतेच की. असो मि.पा सोडून तुम्ही तुमचे ऍड्रिनलीन कशात शोधता.
जाता जाता: हा लेख तमाशाच्या मध्यंतरात लिहिला आहे. प्रथमच क्रिप्टीक न लिहिल्याबद्द्ल झेंडा ऊंचा रहे हमारा.

प्रतिक्रिया

संजय अभ्यंकर's picture

18 Sep 2008 - 5:14 pm | संजय अभ्यंकर

विनायकजी जिते रहो!
तुमचे ऍड्रिनालिन कधिच न संपो!

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

शैलेन्द्र's picture

18 Sep 2008 - 5:44 pm | शैलेन्द्र

माझा ऍड्रिनालिन सर्ज कार ड्रायव्हिंग मधे आहे... शिवाय ट्रेकींग आहेच

सखाराम_गटणे™'s picture

19 Sep 2008 - 8:47 am | सखाराम_गटणे™

आम्हाला ही माफक ठोकाठोकी आवडते,
पण दर वेळी नवीन कल्पना लागते.
कारण तीच तीच कल्पना वापरली तर प्रेरणा मिळत नाही.

काम आहे संशोधन आणि विकास मध्ये, आणि त्यात पुन्हा कन्या रास त्यामुळे सततकाम चालु असते.

प्रस्तरारोहण (रॉक क्लांयबिंग), रॅपलिंग, ट्रेकिंग करतो.

'फ्री' वे-वर भन्नाट वेगाने ड्रायविंगही करतो, पण एकटाचं असेन आणि गाडी भाड्याने (रेन्टल) घेतली असेल तरचं! :)

मुशाफिर.

भास्कर केन्डे's picture

18 Sep 2008 - 9:51 pm | भास्कर केन्डे

शाखेत जाऊन उड्या मारल्या, दोन चार खेळ खेळले की आठवडाभर पुरेल येवढा ऍड्रिनलिन मिळतो. भारतात तर तो दररोज मिळवण्याची सोय आहे... पण येथे परदेशात सध्या आम्ही सप्ताहिक शाखेवरच भागवतोय!

आपला,
(ऍड्रिनलिन सप्लायर) भास्कर
आम्ही येथे वसतो.

टारझन's picture

18 Sep 2008 - 10:11 pm | टारझन

आम्हास आमचं ऍड्रिनलिन मिळतो बाइक वर .... माझ्या सीबिझी वरून ताशी ११०किमी (जास्त नाही पळत .. आता पल्सर २२० नाही तर करिझ्मा घेतोय ..) वेगाने पळवताना .. तोंडात हवा जाउन तोंडाचा ऑटोमॅटीक चंबू होतो ... लॅप मारताना जेंव्हा शु टो रोडला टच होतो ... त्यावेळी एक रोमांच भेट्टो ... तो मला अजुन तरी आनिक कुठे मिळालेला नाही ...
एक स्वप्न आहे हायाबुसा किंवा यामाहा आर-१ चालवण्याचं ....

पॉवरबाज दुचाकीचा फॅन
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

प्राजु's picture

18 Sep 2008 - 10:43 pm | प्राजु

ऍड्रिनलिन ऍड्रिनलिन ऍड्रिनलिन ऍड्रिनलिन ऍड्रिनलिन ऍड्रिनलिन .........
नाव आवडले एकदम. एखादी मनासारखी कविता किंवा लेख लेखणीतून उतरला की मला मिळते ते हेच असावे.
बर्‍याच वेळेला माझ्या लेकाशी थोडी मस्ती केली किंवा समुद्राकाठी जाऊन नुसत्या फेसाळणार्‍या लाटा पाहिल्या की मिळते ते हेच असावे..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

अंतु बर्वा's picture

19 Sep 2008 - 12:07 am | अंतु बर्वा

ट्रेकिन्ग करतना... झपाटुन गेल्यासारख एखाद पुस्तक वाचताना, मोठ्या रोलरकोस्टर वर डोक खाली आनी पाय वर असताना...

भडकमकर मास्तर's picture

19 Sep 2008 - 1:17 am | भडकमकर मास्तर

स्टेजवर विनोदी वगैरे नाटकात ऍक्टिंग करताना भरलेल्या नाट्यगृहातून प्रचंड लाफ्टर मिळतो तेव्हा ऍड्रिनालिन वगैरे वाहत असे पूर्वी...मोरूच्या मावशीचे मी २२ प्रयोग केले ..एकदा खानदेशातल्या एका गावातल्या मैदानात आठ हजार लोक असतील..प्रचंड लाफ्टर यायचे...
( आता ऍक्टिंग करत नाही फारशी ,एकांकिका लिहितो अधून मधून)
... पण आपण लिहिलेले संवाद अभिनेते रंगमंचावर बोलताहेत आणि प्रेक्षकांमध्ये बसून आपण प्रेक्षकांचे प्रतिसाद, हशे ऐकत आहोत ही भावना अफलातून शब्दातीत असते....
स्वतःच्या प्रयोगाला प्रेक्षक फारसे लाभत नाहीत पण जेव्हा कधीतरी असतात, तेव्हा मात्र धमाल असते...

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

भडकमकर मास्तर's picture

19 Sep 2008 - 2:07 pm | भडकमकर मास्तर

मला सातवी आठवीपर्यंत उंचावरून उड्या मारायला जाम आवडत असे....सज्जावरून जमिनीवर आणि वाळू असेल तर अजून अजून उंचावरून.... दीड मजल्यावरून वगैरे.... तो त्या त्या वयातला ऍड्रिनालिन पसरवून थरार अनुभवायचा प्रकार असावा...
अवांतर : आणि बिल्डिंगच्या बाहेरून ( चोराप्रमाणे) टेरेसपर्यंत जाता येईल काय, याचे मी सतत अवलोकन करत असे....
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

आमच्या जुन्या वाड्यातल्या मधल्या चौकात मी वरुन बिनधास्त उड्या मारायचा, चोर पोलीस खेळताना फार फायदा व्हायचा! ;)
एके रात्री मामाच्या घरात गच्चीवरुन थेट खाली अंगणात उडी मारताना अंधारात एक मोठा दगड टाचेखाली आला आणि टाचेच्या हाडाला हेअरक्रॅक गेली, तेव्हापासून असल्या अघोरी उड्या मारणे थांबले!

(खुद के साथ बातां : रंग्या, ह्या मास्तरच्या आणि तुझ्या आवडी जुळतात असे वाटते. एकदा भेटायलाच हवे. त्याच्या घरी जाताना थेट पाईपवरुनच जावे का? एकदम धक्का! :O :? )

चतुरंग

एक's picture

19 Sep 2008 - 10:14 pm | एक

त्या लाफ्टर किंवा टाळ्यांची नशा जबरदस्त असते...

त्यावेळी "I am the KING" असं फिलींग येतं.

रेवती's picture

19 Sep 2008 - 5:16 am | रेवती

एड्रिनलीन मिळवण्याचा प्रकार!
कधी मैत्रिणींशी गप्पा, तर कधी रेस्टॉरंटमध्ये जेवायला जावून. नवर्‍याशी गप्पा मारल्या कि अनेक दिवस पुरेल इतकं एड्रिनलीन मिळतं.
मुलाशी रोजच खेळते पण एखाद्या दिवशी नाही खेळले तरी तो ब्रेक छान वाटतो व पुढे अनेक दिवस उत्साह टिकतो.

रेवती

भडकमकर मास्तर's picture

19 Sep 2008 - 1:59 pm | भडकमकर मास्तर

गप्पा, तर कधी रेस्टॉरंटमध्ये जेवायला जावून

उत्साह टिकवण्यासाठी आणि गेलेला पुन्हा मिळवण्यासाठी , स्वतःला रिजुविनेट करण्यासाठी वरच्या गोष्टी उपयोगी असतीलही....

पण एक क्षणिक थरार ज्यात ऍड्रिनालिन रश होतो ( बाकीची उदाहरणे पहावीत ... बाईक स्पीड, डायव्हिंग फ्रॉम हाईट्स, समुद्र प्रचंड लाटा अंगावर घेणे , रॉक क्लाईंब वगैरे वगैरे )....... या किंवा अशा क्षणिक थराराबद्दल चर्चा अपेक्षित असावी...

माफ करा पण गप्पा आणि कधी रेस्टॉरंटमध्ये जेवायला जावून ऍड्रिनालिन रश म्हणजे अंमळ अवघड वाटत आहे बुवा... अर्थात तुमच्या वैयक्तिक अनुभवांबद्दल मला काही म्हणायचे नाही... फक्त चर्चेला अंमळ ( माझ्या दृष्टीने ) योग्य दिशा देण्यापुरताच हा प्रतिसाद...

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

विनायक प्रभू's picture

19 Sep 2008 - 9:28 am | विनायक प्रभू

http://vipravani.wordpress.com/
आण़खी काय काय करता मास्तर. लिस्ट वाढते आहे. नाव वेगळे ठेवायला लागेल.
वि.प्र.

विजुभाऊ's picture

19 Sep 2008 - 9:41 am | विजुभाऊ

गुहागरच्या समुद्रात अंगावर तुमच्या पेक्षा तिप्पट उंचीची लाटेला सामोरे जाऊन ती छातीवर झेलण्यात जो थरार मिळतो तो कशातच नाही. ती लाट तुम्हाला तीनताड भिरकावुन देते आणि तुम्ही होलपटत तडमडत किनार्‍यावर उडवले जाता .
आणखी एक स्विमिन्ग पूलावरच्या सर्वात उंच ब्रीज वरुन खाली पहातउडी मारायच्या अगोदर पोटात मोट्ठा गोळा येतो. ती कीक कशातच नाही

तुमची प्यान्ट ढील्ली होत असेल तर जाडी कमी झाल्याची तारीफ करू नका, हे मान्य करा की प्यान्टची नाडी ज्योतिषा कडे विसरलात

भाग्यश्री's picture

19 Sep 2008 - 12:49 pm | भाग्यश्री

अगदी अगदी!!!
स्विमिंग सारखा आनंद देणारा दुसरा प्रकार नाही!!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Sep 2008 - 2:08 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

उतारावरून खाली येताना पेडल मारत सायकल आणखी वेगात खाली आणणे आणि तेवढीच मजा येते त्याच ठिकाणी सायकल खाली न उतरता वर चढवण्यात!
एकूणच 'आता यापुढे एक पाऊलही धावता येणार नाही' एवढा दम लागेपर्यंत धावणं, उड्या मारणं, खेळणं यात मला एकदोन दिवसांपुरतं ऍड्रिनलीन मिळतं!

टग्या's picture

19 Sep 2008 - 10:38 pm | टग्या (not verified)

नीलायम टॉकीज़मागल्या पुला*वरून (आहे का अजून तो?) सायकल खाली सुसाट सोडून बर्‍यापैकी शेवटापर्यंत आल्यावर काहीतरी आठवावे किंवा कशाचीतरी अचानक भीती वाटावी आणि करकचून ब्रेक आवळावा, आणि त्या धांदलीत तो नेमका पुढच्या चाकाचा ब्रेक निघावा, अशा वेळीस जो अनुभव येतो, त्यातून चढणार्‍या (आणि घटनोत्तर तितक्याच खाडकन उतरणार्‍या) ऍड्रिनलीनला तोड नाही!

(*गैरपुणेकरांनी या पुलाच्या ग्रेडियंटची कल्पना येण्यासाठी सॅनफ्रॅन्सिस्कोतले रस्ते आठवावे. किंवा तेही पाहिले नसल्यास समजावणे कठीण आहे.)

विनायक प्रभू's picture

19 Sep 2008 - 3:32 pm | विनायक प्रभू

ह्या पुरुषोत्तमाचे क्लोनींग करावे लागेल. बरीच घर आणि त्यातले पाल्य सुखी होतील. खरंच सांगतो एकदम लकी आहात रेवती ताई.
वि.प्र.

टारझन's picture

19 Sep 2008 - 3:52 pm | टारझन

पभु देवा
एक रिक्वेस्ट आहे. डायरेक्ट प्रतिक्रिया न टाइपता, त्या प्रतिक्रियेला आपल्याला प्रति -प्रतिक्रिया द्यायची आहे, त्याला 'उत्तर द्या" या लिंक वर क्लिकवावे. आपण डायरेक्ट धाग्यालाच प्रतिक्रिया देतात .. यामुळे आमचे ऍड्रिनलीन प्रमाणापेक्षा वाढत :)
कळावे , लोभ पण असावा..

आज्जे.... दोन दोन दिवस पुरणारं ऍड्रिनलीन ? सोसल का सोसल ?

-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

प्रभाकर पेठकर's picture

19 Sep 2008 - 3:37 pm | प्रभाकर पेठकर

जानी दोस्त, मनजोगत्या गप्पा, मस्त खाणे, सात्विक किंवा असात्विक पिणे.... और क्या चाहिए जीने के लिए.

झकासराव's picture

19 Sep 2008 - 4:48 pm | झकासराव

माझी १०० सीसीच आहे बाइक. पण उजवीकडची मुठ जमल तेवढी पिरगाळायची (गाडीवर एकटा असतानाच ) आणि मस्त गाडी कशी पळते बघायची. मजा येते.
साली माझी गरीब दुचाकी ८० म्हणजे डोक्यावरुन पाणी.
पण एकदा हातात पल्सर गावली होती तेव्हा १०० ला जावुन बघितल होत. :)
अहाहा! काय वर्णावी त्या क्षणाचे महती! स्वानुभव घ्याच. पोटात ५-६ किलो ऍद्रिनलीन जमा झाल्यासारख वाटत.
अजुन एक प्रकार म्हणजे भटकंतीला गेल की धोपट मार्ग सोडुन उगाचच किरकोळ पायवाट किंवा जरा वाकडी वाट करुन वर कठीण मार्गाने जायला बघणे. त्यात पाउस असला तर अजुन मज्जाच की. अर्थात ह्या प्रयत्नात पडल तरी ऍड्रिनलीनमुळे काय वाटत नाही :)

प्रभाकर पेठकर's picture

19 Sep 2008 - 9:33 pm | प्रभाकर पेठकर

मस्कत मध्ये असताना एकदाच ...फक्त एकदाच होन्डा ४०० वर स्पिडोमीटरच्या सूईने १४० आकडा टच केला पण तरीही थ्रोटल पुर्ण ओपन नाही करू शकलो.
विरुद्ध दिशेने एक कंटेनर गेला (स्पीड १२० असावा) आणि माझी बाईक किंचित हलली. ** कपाळात. लगेच वेग आटोक्यात आणला. मागे बसलेला माझा मित्र १० मिनिटांनी म्हणाला, 'कुठे तरी पाणी प्यायला थांबू या का?'
त्यानंतर 'ते' धाडस पुन्हा कधी केले नाही. कदाचित, म्हणूनच हा प्रतिसाद इथे टाकू शकलो.

मुक्तसुनीत's picture

19 Sep 2008 - 8:44 pm | मुक्तसुनीत

- राहुल देशपांडे यांचे गायन मैफलीत ऐकणे. बस्स. एकेक ताना, सट्टे ... वसंतरावांची नाट्यगीते, बेगम अख्तरच्या गजला, कुमारांची भजने. "घेता किती घेशील दोहो कराने" अशी गत... देहभान विसरवणारा प्रकार.
- एक काळ असा होता की बाळासाहेब मंगेशकर यांच्या मैफली ऐकल्या. सुमारे पन्नास ! आम्हीही तरुण होतो, बाळासाहेबांचा ताराही अस्मानी चमकत होता. त्यांच्या संगतीत शेकडो तास अशा अवस्थेत गेले की दुसर्‍या दुनियेत आहोत.
- जी ए कुलकर्णींच्या कथा. काळ : कॉलेजच्या दिवसांमधला. जी एंची पहिली वाचलेली गोष्ट सुद्धा लख्ख आठवते : "प्रदक्षिणा". लाईट गेले होते घरातले. त्यांच्या कथेची नशा रात्रभर उतरली नाही. पुढे वर्षानुवर्षे जी ए मानगुटीवरून उतरले नाहीत. तो काळ आठवतो. विलक्षण "चार्ज्ड" होतो तेव्हा.
- आमच्या शहरातल्या जगप्रसिद्ध आर्ट ग्यालरी मधे गेलो होतो. इंप्रेशनिस्ट भागात गेलो होतो. माने, मोने आदिंची चित्रे होती. त्यातले एक चित्र समोर आले : "नावेतले प्रवासी" . बस्स. तो क्षण आठवतो.

शेखस्पिअर's picture

19 Sep 2008 - 8:59 pm | शेखस्पिअर

स.प.महाविद्यालयासमोरील गतिरोधकापाशी उभे राहणे...
हा कधीकाळी आमचे ऍड्रिनलीन वाढवून घेण्याचा छंद होता...
समजेल त्याने हसून घ्यावे बाकीच्यांनी वेग कमी न करता निघून जावे...
सध्या ... झी मराठी सा रे ग म प ...

ग्रीनवर पडतो तेव्हा...आहाहा काय सही वाटतं.. असे अनुभव फार थोड्यावेळा येतात..

पण त्या उत्साहात बर्डीचा चान्स जावून बोगी होते..दैव देतं आणि कर्म नेतं..

(भावी टायगर वूड्स)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Sep 2008 - 11:22 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

बरं झालं खाली ते भावी टायगर वूडस लिहिलंत, मला कळलंच नाही आधी हे काय चालू आहे ते!

(अंंमळ अडाणी) अदिती

म्हणूनच लिहिलं.

टायगर वूड्स वरून तरी क्लु लागला हे ऐकून बरं वाटलं. नाहीतर मला गोल्फ (एक छोटा चेंडू आणि अनेक काठ्या यांचा एक खेळ) आणि त्याचे नियमपण समजावून सांगावे लागले असते :)

झकासराव's picture

20 Sep 2008 - 11:38 am | झकासराव

एकदाच होन्डा ४०० वर स्पिडोमीटरच्या सूईने १४० आकडा टच केला पण तरीही थ्रोटल पुर्ण ओपन नाही करू शकलो.
विरुद्ध दिशेने एक कंटेनर गेला (स्पीड १२० असावा) आणि माझी बाईक किंचित हलली.>>>>>>>>
अग्गाबाबौ!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
१४०!!!!!!!!!!!
हे "किंचित" जे असत ना ह्या वेगाला ते "ह्या" दुनियेतुन "त्या" दुनियेत नेवु शकत हे मात्र खर हां.
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao