मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मला पडलेले काही प्रश्न ....

आपला आभि · · काथ्याकूट
काल पासुन काही प्रश्नांनी माझ्या डोक्याची मंडई करून टाकली होती. स्वस्थ बसवेना.. मग मिपा वर येऊन ही मनाची उबळ काढली............. १.सलमान खानला शिक्षा झाली होती तिचे पुढे काय झाले ? कोणत्या न्यायालयात तो खटला चालु आहे? २.फरदीन खानने ९ ग्राम कोकेन बाळगले म्हणुन त्याला अटक झाली होती, त्याचे पुढे काय झाले ? ३.संजय दत्त बाँबस्फोट खटल्यात दोषी ठरूनदेखिल समाजात उजळ माथ्याने कसा वावरू शकतो? ४.राहुल महाजन ने अमली पदार्थाचे सेवन केल्याचे सार्‍या जगासमोर टिव्ही वर झळकले असताना त्याच्यावर कारवाई का होत नाही ? ५.अफजल गुरु ला कोणता पाहुणचार चालु आहे ? ६.खुनाच्या आरोपाखाली शिक्षा होऊनसुध्दा सिध्दु अजून मुर्खासारखा एका शो मध्ये रोज हसताना का दिसतो ? ७.राज ठाकरे यांची महाराष्ट्राची blue print कधी तयार होणार ? ८.अणुकराराविषयी गुप्त पत्राची बातमी व्रुत्तपत्राच्या पहिल्या पानावरून आतल्या पानावर कशी सरकली आणि नंतर गायब का झाली? कोणत्याच पक्षाला त्याचा पाठपुरावा का करावा वाटला नाही ? ९.आरुशी हत्याकांड म्हणजे देशाचा ज्वलंत प्रश्न आहे असे रान माजवणार्‍या व्रुत्तवाहिन्यांनी त्याबद्दल बातमी देणे का बंद केले ? १०. खासदार पैसे वाटप प्रकरणाचे पुढे काय झाले ? ११. खैरलांजी प्रकरणावरून सरकार उलटवण्याची भाषा करणार्‍या दलित नेत्यांनी त्यातील काही आरोपींना परवा न्यायालयाने दोषमुक्त सोडल्यानंतर साधी प्रति़क्रिया सुध्दा का देऊ नये ? १२...१३.... तुमच्याही मनात असेच काही प्रश्न येत असतील ????

वाचन 3510 प्रतिक्रिया 0