अधिक देखणे तरी निरंतर पाहणे
योगिराज विनवणें मन आले ॐ मयी । (श्री ज्ञानेश्वर महाराज)
फक्त समोर पाहण्यानं तुम्ही मनाच्या चकव्यातनं बाहेर पडू शकता!
____________________________________
ज्ञानेश्वर महाराजांच्या चित्तदशेशी एकात्मता साधून, अत्यंत शांतपणे; त्यांनी वर्णन केलेली ही काव्यात्मक प्रक्रिया समजावून घेऊ.
मनाची तीन प्रमुख अंग आहेत : दृक, वाक आणि श्राव्य.
या अभंगात महाराज दृक प्रक्रियेविषयी सांगतायत. ही एक प्रक्रिया साधल्यावर, मनाच्या इतर दोन प्रक्रिया तुमच्या काह्यात येतात... 'मन आले ॐ मयी' हा तुमचा अनुभव होतो... महाराजांच्या चित्तदशेशी आपण समरूप होतो.
______________________________
पाहणं आपल्या जाणिवेचा जवळजवळ ऐंशी ते पंचाऐंशी प्रतिशत भाग व्यापून आहे. नजर आपल्या आकलनाचं सर्वात प्रमुख साधन आहे. त्यामुळे मेंदूचा अत्यंत मोठा प्रभाग दृक स्मृतींनी व्यापला आहे.
आपल्याला वाटतं पाहतो तर आपण सदैव आहोतच, 'अधिक देखणे तरी निरंतर पाहणे' यानं विशेष काय साधणार आहे? पण मजा म्हणजे आपण 'फक्त पाहत' नाही, पाहताना विचार करतो... आपण सक्रिय झालेल्या मनानं पाहतो.
त्यामुळे :
चंदन जेवी भरला अश्वत्थ फुलला
तैसा म्यां देखिला निराकार ॐ मयी ।
हा आपला अनुभव होत नाही.
आपली नजर सतत प्रकट जगावर राहते, व्यक्त गोष्टींवर राहते, आकार पाहते; सर्वव्यापी 'निराकार ' आपल्याला दिसत नाही.
_______________________
ट्राय टू अंडरस्टँड धिस,
एखाद्या निवांत वेळी पाहण्याच्या प्रक्रियेचं आकलन करून घेण्याचा प्रयत्न करा. समोरची वस्तू दिसते, मग स्मृतीतल्या आकाराशी वेरिफाय करून मन आपल्याला ती काय आहे याचं 'नांव' सांगतं. तो आकार आणि नांव स्मृतीत मॅच झालं की आपल्याला कळतं, 'सफरचंद'. पण गाडी तिथे थांबत नाही, कारण स्मृती सक्रिय झालेली असते. मग सफरचंदावरनं अॅडम, इव्ह किंवा न्यूटन> गुरुत्वाकर्षण> बाग > मग सखी बरोबर आपण गेलो होतो ती बाग डोळ्यासमोर तरळते > मग तिच्या समवेत हनीमून >त्यानंतर झालेले वादंग स्मरतात.. आणि असं होताहोता समोरचं सफरचंद दिसेनासं होतं.
थोडक्यात आपण 'अधिक देखणे तरी निरंतर पाहणे' असं पाहत नाही. आपलं पाहणं आणि विचार करणं सायमल्टेनिअसली चालू असतं. आणि हे एकदा-दोनदा नाही तर नेहमी, सतत, निरंतर चालू असतं. जागेपणी आपण त्याला विचार म्हणतो आणि निद्रेत स्वप्नं, इतकाच काय तो फरक!
________________________
झेन संप्रदायात झाझेन (Zazen ) नांवाची ध्यानप्रणाली आहे. भिंती समोर साधारण दोन फूट अंतरावर बसायचं आणि शांतपणे समोरच्या रिकाम्या भिंतीकडे पाहत राहायचं. तुमच्या लक्षात येईल मनाचा प्रोजेक्टर भिंतीवर विविध प्रतिमा प्रोजेक्ट करायला लागतो आणि आतमध्ये संवाद सुरू होतो.
साधना मजेशीर आहे. दहा मिनिटं जर आपण बसलो तर केवळ काही सेकंद समोरची भिंत दिसते आणि आजूबाजूला काय चाललंय ते ऐकू येतं. त्या काही सेकंदभरापुरते आपण मनाच्या चकव्यातून बाहेर पडलेलो असतो.
'अधिक देखणे तरी निरंतर पाहणे' म्हणजे समोरची भिंत अधिकाधिक वेळ दिसणं आणि त्या वेळी आजूबाजूला चाललेलं स्पष्टपणे ऐकू येणं.
असे निर्विकल्प क्षण जितके दीर्घकालीन होतील तितकी तुमच्या जीवनात शांतता येईल. पुढेपुढे ती शांतता भिंत समोर नसताना देखिल तुम्ही अनुभवाल. कारण प्रश्न भिंतीचा नाही, मनाची अविरत प्रक्रिया थांबण्याचा आहे.
_________________________________
देहबळी देऊनी साधिली म्यां साधनी
तेणे समाधान मज जोडले ॐ मयी ।
त्या निर्वेध क्षणात तुम्हाला कळेल की पाहणारा देहापेक्षा वेगळा आहे. देह बसलाय आणि आपल्याला कळतंय. मग दैहिक विवंचनांतून तुम्ही हळूहळू मोकळे व्हायला लागाल. वय, वजन, व्याधी, वार्धक्य शरीराला आहे, आपल्याला नाही, हा उलगडा तुम्हाला होईल. त्या समाधानातून मनाची प्रक्रिया आणखी शांत व्हायला लागेल.
___________________________
अनंगपण फिटले मायाछंदा साठविले
सकळ देखिले आत्मस्वरूप ॐ मयी ।
असा निवांतपणा सघन होत गेल्यावर एक दिवस अचानक तुम्हाला, भिंत आणि शरीरामध्ये असलेलं 'अंतर' दिसेल. तुमची नजर केवळ भिंत न पाहता, शरीर आणि भिंत यातली स्पेस पाहू लागेल. त्या स्पेसवर, निराकारावर, नजर स्थिर होईल.
ज्या क्षणी तुम्हाला निराकार दिसेल त्या क्षणी समोर पाहणार्या नजरेचं रिवर्सल होईल. तुमची नजर दुहेरी होईल. भिंत आणि शरीर या दोन्ही गोष्टी ती एकावेळी पाहू लागेल.
तुम्ही समरसतेनं प्रक्रिया केली तर तुमच्या लक्षात येईल की हा निराकार फक्त समोर नाही. तो आत-बाहेर, इथे-तिथे, सर्व व्यापून आहे; सकळ आहे. प्रत्येक आकार अंतर-बाह्य व्यापून आहे. तो सकळांचं आत्मस्वरुप आहे.
तुम्हाला बुद्धाची अलौकिक बुद्धिमत्ता कळेल... 'कुणाच्याही आत कुणीही नाही'.
जग माया आहे म्हणजे `ते नाही' असं नाही. तो भास नाही. स्वच्छंद आहे. तुमचं जगणं उत्स्फूर्त होईल, आनंदाच होईल.
__________________________
पुरे पुरे आता प्रपंच पाहणे
निजानंदी राहणे स्वरुपी ॐ मयी ।
हा निराकार दिसणं तुम्हाला तरल करेल. त्या तरलतेला निजानंद म्हटलंय. तुम्ही प्रपंच कराल पण त्याचं ओझं राहणार नाही.
________________________________
ऐसा ज्ञानसागरु रखुमादेविवरु
विठ्ठलु निर्धारु म्यां देखिला ॐ मयी ।
हा निराकार सर्व ज्ञानाचा स्रोत आहे.
ओशो म्हणतात : ज्ञानी सर्वज्ञ होता है इसका मतलब ये नही की वो पंक्चर निकाल लेगा या बिना सिखे हवाई जहाज उडा लेगा. ज्ञानी जाननेकी क्षमताको उपलब्ध होता है. जिस चिज़मे वह रस लेगा उसे समग्रतासे जान लेगा (अष्टावक्र महागीता)
असा हा निराकार निर्धारानं, सदासर्वकाळ, तुमच्या समोर उभा आहे. त्याला कोणत्याही आधाराची गरज नाही. तुम्ही फक्त 'अधिक देखणे तरी निरंतर पाहणे' इतकंच करायचंय.
तो आकार नाही, स्थिती आहे. आणि तुम्ही त्यापासून वेगळे नाही. तुम्ही आणि तो एकरूप आहात. केवळ मनाच्या अविरत प्रक्रियेनं तुम्हाला त्याचं दर्शन दुर्लभ झालंय.
__________________________
या काव्यपंक्ती प्रक्रिया आणि परिणाम दोन्ही सांगतात. 'अधिक देखणे तरी निरंतर पाहणे' ही प्रक्रिया आहे आणि 'मन आले ॐ मयी' हा मनाच्या 'वाक' भागावर तिचा होणारा परिणाम आहे.
'मन आले ॐ मयी' ही तितकीच रम्य स्थिती आहे. वैखरी>मध्यमा>परा>पश्यंती या प्रक्रियेतनं आपण ध्वनिशास्त्र काय आहे ते जाणून घेणार आहोत. स्वरमाधुर्य कशानं निर्माण होतं याचा वेध घेणार आहोत . त्या प्रक्रियेनं आपण वैश्विक शांतीशी एकरूप होतो.
'अधिक देखणे तरी निरंतर पाहणे' यावरचे प्रतिसाद आणि अनुभव तुम्ही लिहीलेत, की त्याविषयी पुन्हा केव्हा तरी.
प्रतिक्रिया
10 Aug 2013 - 12:25 am | अभ्या..
या धाग्यावर किंवा या विषयावर काहीही लिहायची माझी कुवत नाही पण माउलींचे चित्र एकटक पाहता असेच वाटते की,
अधिक देखणे तरी निरंतर पाहणे
योगिराज विनवणें मन आले ॐ मयी ।
10 Aug 2013 - 1:21 am | आदूबाळ
सगळ्या प्रतिसादाला +१
10 Aug 2013 - 11:36 am | संजय क्षीरसागर
अधिक देखणे तरी निरंतर पाहणे
योगिराज विनवणें मन आले ॐ मयी ।
दॅट्स द पॉइंट! लेखात न कळण्यासारखं काही नाही. ती एक निर्वैयक्तिक प्रक्रिया आहे. अँड इट हेल्प्स यू टू फोकस, एनी वे. अध्यात्म कळो न कळो त्यानं फरक पडत नाही.... ट्राय.
10 Aug 2013 - 12:30 am | लंबूटांग
चौथा परिच्छेद
मग आता ही तीन अंग कुठून आली? अंग आणि विंग्ज यात फरक काय? ऑडिओ म्हणजे श्राव्य आणि विज्युअल म्हणजे दृक ना? मग हे तिसरे 'अंग' कुठून आले?
10 Aug 2013 - 12:38 am | संजय क्षीरसागर
ऑडिओमधे `बोलणं आणि ऐकणं' (वाक आणि श्राव्य) ही दोन अंग आहेत. त्यावर पुढे लेखन होईल.
10 Aug 2013 - 12:49 am | धन्या
आमच्या एका मित्रवर्यांनी एका निरुपद्रवी संप्रदायाच्या शिकवणीबद्दल "शब्द जंजाळ" असा शब्द प्रयोग केला होता त्याची आठवण झाली.
10 Aug 2013 - 12:58 am | मोदक
एका निरुपद्रवी संप्रदायाच्या - कोणता संप्रदाय..?
कोण मित्र..? ;-)
10 Aug 2013 - 1:12 am | धन्या
थोडा तर्क लावत जा की राव. तुम्हीच शोधू शकता तुमच्या प्रश्नांची उत्तरे.
प्रत्येक वेळी दुसर्याने पोथी उलगडून सांगितली पाहिजे असं काही नाही.
10 Aug 2013 - 11:00 pm | निराकार गाढव
ईश्श्य! काहीतरीच काय!
--------------------
भांडता येणे ही कला आहे आणि सतत भांडत राहाणे हे मी सिद्ध केलेले शास्त्र आहे. आता याबद्दल कोणाचे दुमत असूच शकत नाही.
आणि की नै मला जिलब्या लै आवडतात. आणि आजपर्यंत तरी कोणीही माझ्या याही गोष्टीला बिनतोड प्रतिवाद करूच शकलेलाच नाहीच.
10 Aug 2013 - 11:12 pm | बॅटमॅन
बाकी तुमचे सदस्यनाम लैच क्यूट की कायसंसं आहे बॉ.
10 Aug 2013 - 11:17 pm | अत्रुप्त आत्मा
@लैच क्यूट की कायसंसं आहे बॉ.>>> अरे ब्याटम्याना, मनापसून बोललेलं सत्य आहे ते! :) स्व'तःचा स्विकार केलेला तुझ्या/माझ्या सारखाच सामान्य माणूस आहे तो! ;)
10 Aug 2013 - 1:46 pm | सुप्रिया
हा भाग आवडला.
10 Aug 2013 - 1:46 pm | प्रकाश घाटपांडे
अस आहे होय. मी हा अभंग असा ऐकत होतो " कधी कधी कधी कधी निरंजन पाहणे, योगिराज विनवले मन आले हो माये|" म्हणल असल ब्वॉ काहीतरी अध्यात्मिक भानगड. श्राव्यामधे शब्दांच्या स्पष्टता पुरेशा नसल्या कि अस होत. असो! बाकी काही समजले नाही तरी मन हे अगम्य आहे या बाबतीत दुमत नसावे. विज्ञान दुर्बोध मनाचा ठाव घेण्याचा प्रयत्न करीतच आहे. ती निरंतर प्रक्रिया असावी.
10 Aug 2013 - 5:30 pm | संजय क्षीरसागर
ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेली प्रक्रिया, अर्थ आणि साध्य यांच्याशी सुसंगत नाहीत.
निरंजन म्हणजे निराकार (ज्याला कसलाही लेप लागत नाही) असा अर्थ असला तरी प्रक्रिया 'निरंतर पाहणे' अशी आहे.
पुढे, `मन आले वो माये' असं म्हटलं जातं. ते शब्द साध्य (मनाचं ॐ कारमय होणं) दर्शवत नाहीत.
>असो! बाकी काही समजले नाही..
हे आवर्जून सांगायला प्रतिसाद दिलात त्याबद्दल काय लिहीणार?
लेख शांतपणे वाचून, ती प्रक्रिया समजावून घेऊन, तिची सार्थकता पटल्यावर, स्वतः प्रयोग करुन पाहिला, तर अनुभव येईल कारण ज्ञानेश्वरांसारख्या दिग्गजाचे ते शब्द आहेत.
ऐकिव शब्दांशी लेखनातले शब्द जुळत नाहीत हे सांगायला, लगबगीनं दिलेल्या प्रतिसादात, यापेक्षा वेगळं ते काय असणार?
10 Aug 2013 - 9:03 pm | आदूबाळ
"निरंजन पाहणे" सुद्धा असू शकतं, कारण त्याच ओवीत पुढे "चंदन देहीं भरला, अश्वत्थ फुलला. तैसा म्या देखिला, निराकार वो माये" असे शब्द आहेत.
जे बाय डेफिनिशन शब्दातीत/वर्णनातीत आहे ते शब्दांत पकडण्याचा माऊली प्रयत्न करत आहेत असा त्या ओव्यांचा सूर वाटला. हा सगळ्या ज्ञानेश्वरीचाच अंतःप्रवाह वाटतो. उपमा उत्प्रेक्षांची आणि दृष्टांतांची खैरात यामुळेच असावी. जे हजारो शब्द खर्ची घालून पकडता येत नाही ते एका दृष्टांतात श्रोत्याला पटवणं ग्रेट आहे.
11 Aug 2013 - 12:46 am | संजय क्षीरसागर
तुम्ही झाझेन ही ध्यानप्रक्रिया करून पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की काही सेकंद देखिल, मन आपल्याला निरंतर पाहू देत नाही. विचरांची दृष्यमय प्रोजेक्शन्स आपलं लक्ष वेधून घेतात किंवा मानसिक संवादात आपण इनवॉल्व होतो.
निरंतरचा अर्थ `विदाऊट दि इंटरप्शन ऑफ अ सिंगल थॉट' असा आहे. थॉट ही निरिक्षणातली गॅप आहे. त्यामुळे `अधिक देखणे तरी निरंतर पाहणे' ही साधना आहे.
चंदन देही भरला, अश्वत्थ फुलला. तैसा म्या देखिला, निराकार ॐ मयी ।
या ओळींचा अर्थ आणखी गहन आहे. कारण मुळात निराकार गंधहिन आहे, विदेह आहे. आणि त्याही पुढे जाऊन तो निर्लिप्त आणि संपूर्ण विकसित आहे. लेखावर चर्चा भलत्याच अंगानं चाललीये. इथे उघड असलेल्या गद्याचीच पंचाईत तर रुपकात्मकाविषयी काय लिहीणार? मी त्या काव्यपंक्तींच रसग्रहण नंतर लिहीन.
10 Aug 2013 - 4:03 pm | चौकटराजा
नेवैद्य ठेवला...... ते आले ..एक बरीक खरं तो .. साधक फारच चिवट दिसतोय व ते गगनविहारी तर महाचिवट !
10 Aug 2013 - 4:13 pm | ज्ञानोबाचे पैजार
तुम्ही म्हणता ते सगळे केल्या नंतर समजा प्राप्तझाली तुम्ही म्हणता तशी मनाची आवस्था. कळले की मी त्याचेच एक रुप आहे. पण त्या नंतर जेव्हा पोटात आग पडेल तेव्हा या भासमान जगात यावेच लागेल ना भासमान भोजन घ्यायला? ते भोजन मिळवण्यासाठी भासमान धडपड करावीच लागेल ना?
काहि क्षणांसाठी मनाला कसे फसवले याचे समाधान कदाचीत आपल्याला मिळेल पण तरी शेवटी मनाला आणि शरीराला शरण जावेच लागेल. पिंजर्यातल्या पोपटाने गरुड भरारीचे कितीही स्वप्न बघितले तरी भुके साठी त्याला त्याचा मालक शिकवेल तशी पोपटपंची करावीच लागते.
निर्गुण निराकाराचा प्रत्यय क्षणीक असतो.तर तहान, भुक, कामतृप्ती या भावना शाश्र्वत असतात. त्या निर्गुण निराकाराचा प्रत्यय घेतल्या नंतरही तशाच शाश्र्वत रहातात. दैहिक विवंचनेतुन माणसाची सुटका कदापि नाही, त्याच शाश्र्वत आहेत. बाकी सब झुट.
हे विश्र्व आणि मी एकाच वयाचे आहोत. कारण मी जेव्हा या विश्र्वात आलो तेव्हाच ते माझ्या दृष्टीने अस्तीत्वात आले. त्या आधि ते नव्हते आणि माझ्यानंतरही ते नसेल. मला जे समजत नाही असे या विश्र्वात काही नाही आणि मला जे समजत नाही ते अस्तित्वातच नाही. असे जर असेल तर उगाच काहितरी शोधण्यात मी वेळ वाया का घालवावा?
त्या पेक्षा "भाग मिल्खा भाग" पहाण्यात मला जास्त आनंद मिळतो.
10 Aug 2013 - 5:02 pm | संजय क्षीरसागर
अध्यात्माविषयी जनकल्पना अचाट आहेत. एकतर हे जग भासमान नाही. ते कालबद्ध आहे. जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत याच जगात आपल्याला जगायचंय आणि ते जगणं आनंदाचं व्हावं यासाठी अध्यात्म आहे.
आकार आणि निराकारचा समन्वय अध्यात्म आहे. अध्यात्मामुळे धकाधकीच्या जीवनाला स्थैर्य प्राप्त होतं कारण निराकार स्थिर आहे. त्याचं दिसणं तुम्हाला स्थिर करतं.
त्याही पुढे जाऊन, अध्यात्म मृत्यूचा धसका संपवत, कारण सध्या देहात असलो तरी मुळात आपण विदेह आहोत हा अत्यंत फंडामेंटल उलगडा अध्यात्मानं होऊ शकतो.
आता तुमचे प्रश्नः
>पण त्या नंतर जेव्हा पोटात आग पडेल तेव्हा या भासमान जगात यावेच लागेल ना भासमान भोजन घ्यायला? ते भोजन मिळवण्यासाठी भासमान धडपड करावीच लागेल ना?
= अर्थात, पण ती धडपड रहात नाही याचं बेसिक कारण म्हणजे आतून मन प्रत्येक गोष्ट `अस्तित्वाला धोका आहे' अशा तर्हेनं सांगत असतं. पण ती वस्तुस्थिती नाही हे तुमच्या लक्षात येतं.
>काहि क्षणांसाठी मनाला कसे फसवले याचे समाधान कदाचीत आपल्याला मिळेल पण तरी शेवटी मनाला आणि शरीराला शरण जावेच लागेल.
= मन तुम्हाला फसवतंय. मानसिक धारणांमुळे आपल्याला आपण व्यक्ती आहोत असं वाटतंय. आणि आपल्या निराकारत्वाचा उलगडा होत नाही. मनाला आणि शरीराला शरण जाण्याचा प्रश्नच नाही. मन, शरीर आणि आपण (निराकार जाणिव) ही एक सिंगल हार्मनी होते. जसं बाहेर अस्तित्व एकसंध आहे, तसे आत आपण एकसंध होतो. जगण्यात मजा येते.
>निर्गुण निराकाराचा प्रत्यय क्षणीक असतो.तर तहान, भुक, कामतृप्ती या भावना शाश्र्वत असतात. त्या निर्गुण निराकाराचा प्रत्यय घेतल्या नंतरही तशाच शाश्र्वत रहातात. दैहिक विवंचनेतुन माणसाची सुटका कदापि नाही, त्याच शाश्र्वत आहेत. बाकी सब झुट......असे जर असेल तर उगाच काहितरी शोधण्यात मी वेळ वाया का घालवावा?
= तुम्हाला निर्गुणाचा अनुभव नाही! तुम्ही ज्यांच नांव घेतलंय त्यांचं अनुसरण करत नाही. ते तर म्हणतायंत :
पुरे पुरे आता प्रपंच पाहणे
निजानंदी राहणे स्वरुपी ॐ मयी ।
असे प्रतिसाद, आपल्या श्रद्धास्थानांवर आपलाच विश्वास नाही हे दर्शवतात. तोही एकवेळ व्यक्तिगत प्रश्न आहे पण त्यामुळे आपण इतरांची दिशाभूल करतो याचं भान असणं आगत्याचं आहे.
>त्या पेक्षा "भाग मिल्खा भाग" पहाण्यात मला जास्त आनंद मिळतो.
तेच तर दुर्दैव आहे कारण मिल्खा किती भागेल? आणि कितीही भागला तरी शेवटी त्याला मृत्यू गाठेलच!
ज्याला निवांतपणी झाला नाही त्याला निर्वाणीच्या क्षणी, त्या घालमेलीत, निराकाराचा उलगडा असंभव आहे.
13 Aug 2013 - 5:13 pm | ज्ञानोबाचे पैजार
जर कोणी आपल्या विचारां बद्दल असहमती दर्शवली तर त्याचा प्रतिवाद करताना व्यक्तीगत टिका करण्याचे काहिच प्रयोजन नाही.
ज्ञानोबाराया मला पूर्णपणे उलगडला असा माझा मुळीच गैरसमज नाही. किंबहुना मी ज्ञानोबारायासारखा होण्याचा मुळी प्रयत्नच करत नाही. ती निर्गुण निराकार आवस्था त्यालाच लखलाभ होवो. माझ्या मर्यादांची मला पुर्णपणे जाणीव आहे, त्यातच माझ्या बरोबर निवृतीनाथांसारखा गुरु ही नाही. त्या मर्यादांमधे राहुन तुम्ही ज्या मर्गावर चालायचा प्रयत्न करता तो माझ्या सारख्या सामान्यांसाठी नाही इतकेच मी सांगु इच्छीतो.
त्याही पुढे जाऊन, अध्यात्म मृत्यूचा धसका संपवत :- या असल्या दाव्यांनाच माझा विरोध आहे. अध्यात्मामुळे नक्की कोणते फायदे तोटे याचा दावा या क्षेत्रातले दिग्गजदेखील करत नाहीत. तो पुर्णपणे व्यक्तीगत सापे़क्ष अनुभव असतो. असल्या सवंग दव्यांमुळेच माझ्या सारखे सामान्य लोक साशंक होतात.
सध्या देहात असलो तरी मुळात आपण विदेह आहोत :- हा देह आहे म्हणुनच आपल्याला विदेही पणाची जाणीव होते. समजा हा देहच नसता तर? पिंजर्यातल्या पोपटाला पिंजरा तोडणे शक्य नसते. उगाच त्याला गरुडभरारीची स्वप्ने दाखवु नयेत.
मन तुम्हाला फसवतंय. मानसिक धारणांमुळे आपल्याला आपण व्यक्ती आहोत असं वाटतंय :- माझे मन मला का बरे फसवेल? ते माझ्याशी का म्हणुन वैर घेईल? माझे मन जर खरोखर माझे असेल तर ते माझ्या हिताचाच विचार करेल. मनाच्या शक्ती बद्दल बोलायचे झाले तर वेगळा धागा काढावा लागेल. आणि क्षणभर समजून चालु की तुमचे मन तुमच्याच विरुध्द बंडखोरी करतय. तर त्याला जागेवर आणायचे सोडुन तुम्ही त्याला बाजुला फेकुन द्यायला सांगत आहात. घरातला लहान मुलगा जर बंडखोरी करु लागला तर त्याला वठणीवर आणायचे की त्याला दुर्लक्षीत करुन बाजुला टाकायचे?
माझे शरीर, माझे मन,माझा मेंदु व त्यातल्या माझ्या स्मृती आणि सगळ्यात शेवटी माझा आत्मा हे सगळे एकत्र म्हणजे मी आहे. या पैकी एकाच्याही अनुपस्थीतीमुळे माझे अस्तित्व संपते.
तेच तर दुर्दैव आहे कारण मिल्खा किती भागेल? आणि कितीही भागला तरी शेवटी त्याला मृत्यू गाठेलच :-यात तुम्ही काहीच नविन सांगत नाही आहात. मृत्यु हेच एकमेव शाश्र्वत सत्य या जगात आहे. मिल्खा धावला किंवा नाही धावला तरी त्याचा मृत्यु अटळ आहे. आणि हाच नियम या जगात आलेल्या सगळ्यांसाठी आहे. पण त्या चित्रपटाने जो आनंद मला दिला त्या आनंदाची तुलना मी तुम्ही वर्णन केलेल्या आनंदाशी केली तेव्हा चित्रपट बघणे मला जास्त आनंददायी वाटले.
ज्याला निवांतपणी झाला नाही त्याला निर्वाणीच्या क्षणी, त्या घालमेलीत, निराकाराचा उलगडा असंभव आहे. :- मुळात ज्ञान हे जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्ती कडे सारखेच असते. ते वढु शकत नाही किंवा कमी होउ शकत नाही. चांगला गुरु सुध्दा नेहमी तुम्हाला तुमच्या कडल्या ज्ञानाची जाणीव करुन देत असतो. माझ्या कडे जे आहेच त्याची जाणीव फक्त माझ्या मेंदुच्या पातळीवर करुन घ्यायचा हा सगळा खाटाटोप वाटतो.जो प्रश्र्ण आपल्याला डिग्रीच्या परिक्षेला विचारला जाणार आहे त्याची तयारी के.जी. मधे कशाला करायची? वेळ आली की सगळे आपोआप समजेलच ना.
10 Aug 2013 - 4:18 pm | अत्रुप्त आत्मा
.......अरे रे रे रे........!
अजूनी तो हरित नयनांचा आला नाही का धाग्यावरी?
की मनी विहरते आहे त्याच्या "संदेशा"ची ती परी ?
करोनी कौतुके घेतो, तो कुणाही झाडावरी
कडवट निघते आतून,ती-जो-देतो ती कॅडबरी
सावध रहा हो नव अभ्यागत,बोक्य्या पासूनी या..!
परगोलॅक्स वर्खुनी देतो,सांगतो ही "मिठाई" खा..!
गोड गोड वाटून आपण भक्षितो दोन/तिन "गोळ्या" तरी..!
नंतर सुरु होते आपुली - डबडे घेऊन बारी !
जेंव्हा आपण पुसतो तयाला,का मजला फसविले..!
म्हणतो तो "ह्या-ह्या" करूनी,"अत्ता का तुझ्या लक्षात आले???"
आजचा तांब्या संपला ,जातो टाकून मी जिल्बी..!
नव-लेखकूंन्नो सावध राहा हो, अचानक व्हाल एल्बी..! =))
10 Aug 2013 - 4:25 pm | ज्ञानोबाचे पैजार
एक नंबर साजुक तुपातली चितळ्यांची जील्बी....
हे तर लै भारी.
10 Aug 2013 - 5:05 pm | संजय क्षीरसागर
याचा उलगडा होईल!
10 Aug 2013 - 6:52 pm | अत्रुप्त आत्मा
10 Aug 2013 - 6:57 pm | अवतार
खरे स्थितप्रज्ञ कोणालाही सुधारण्याचे प्रयत्न करत नाहीत. त्यांच्या संगतीचा परिणाम होऊन सुधारणारे आपोआप सुधारतात. फूल उमलणे ह्याप्रमाणेच व्यक्तिव उमलणे ही देखील एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. ती स्वत:च्या गतीने होतच असते. कोणी उपदेश केला किंवा नाही केला तरी ती प्रक्रिया थांबत नाही. रोपटे लावल्यानंतर फूल उमलण्याची वाट पहावी लागते. ते फूल आत्ताच इथेच ह्याच क्षणी उमलले पाहिजे म्हणून रोपटे मुळांसकट उपटून काढणे हे स्थितप्रज्ञाचे लक्षण निश्चितच नाही.
इतरांची रेडीमेड उत्तरे ऐकून व्यक्तित्वाचा खरा विकास घडत नाही. म्हणूनच खरे स्थितप्रज्ञ कोणाचेही व्यक्तित्व घडवत नाहीत तर स्वत:कडे कसलेही श्रेय न घेता तुमच्या मूळ व्यक्तीत्वावरील आवरण दूर करतात. त्यासाठी संयम आवश्यक असतो. "आम्हाला कोणी समजूनच घेत नाही", अशी तक्रार एकाही स्थितप्रज्ञाने केल्याचे आजवर तरी ऐकिवात नाही.
10 Aug 2013 - 7:52 pm | संजय क्षीरसागर
ते फक्त त्यांच म्हणणं मांडतात.
>त्यांच्या संगतीचा परिणाम होऊन सुधारणारे आपोआप सुधारतात....म्हणून रोपटे मुळांसकट उपटून काढणे हे स्थितप्रज्ञाचे लक्षण निश्चितच नाही.
= काय वाट्टेल ते आख्यान लावलंय. इथे कुणी कुणाला मुळांसकट उपटू शकत नाही.
>इतरांची रेडीमेड उत्तरे ऐकून व्यक्तित्वाचा खरा विकास घडत नाही..... "आम्हाला कोणी समजूनच घेत नाही", अशी तक्रार एकाही स्थितप्रज्ञाने केल्याचे आजवर तरी ऐकिवात नाही
= बुद्ध त्याच्या वेळीही लोकांना समजला नव्हता आणि शून्यत्वाची त्याची संकल्पना अजूनही लोकांना समजत नाही. अभ्यास वाढवा.
आणि मी काय म्हणतो, तुम्हाला स्थितप्रज्ञाची इतकी लक्षण वगैरे माहिती आहेत आणि स्वतःला `आवतार' म्हणवताय तर तुमचं आकलन स्वतंत्रपणे मांडा मग बघू... का आवतार फक्त प्रतिसाद देण्यासाठीच घेतलाय?
10 Aug 2013 - 8:26 pm | बॅटमॅन
बुद्ध त्याच्या वेळी लोकांना समजत नव्हता म्हणून त्याने आकांडतांडव केल्याचे किंवा लोकांशी तुच्छतेने बोलल्याचेही कुठे नमूद नाही.
10 Aug 2013 - 9:57 pm | अवतार
मूळ वाक्य नीट वाचले तर अर्थ कळू शकेल.
"आम्हाला कोणी समजूनच घेत नाही", अशी तक्रार एकाही स्थितप्रज्ञाने केल्याचे आजवर तरी ऐकिवात नाही
बुद्ध किती लोकांना समजला होता यापेक्षा बुद्धाने किती लोकांना समजून घेतले हे जास्त महत्वाचे आहे. अभ्यास वाढवण्याची गरज कोणाला आहे हे यातून स्पष्ट व्हावे.
वरील प्रतिसादात स्वतंत्र आकलन मांडण्याचाच प्रयत्न केला आहे. स्वतंत्र आकलन केवळ लेखातूनच मांडता येते हे आजच कळले. जे सत्य मोजक्या शब्दांत मांडता येते त्यासाठी भाराभर शब्द वापरणे हे इतरांना सोयीचे वाटत असले तरी मला गैरसोईचे वाटते.
हे आव्हान झाले. आवाहन नव्हे.
आव्हान देणे आणि स्वीकारणे हे अहंकाराच्या पातळीवर शोभून दिसते.
सत्याच्या शोधात असणाऱ्यांना स्वत:चे म्हणणे सिद्ध करण्यासाठी आव्हान देण्याची गरज पडू नये.
10 Aug 2013 - 11:34 pm | संजय क्षीरसागर
तुमचं अध्यात्मिक आकलन काय आहे ते पाहा :
>खरे स्थितप्रज्ञ कोणालाही सुधारण्याचे प्रयत्न करत नाहीत. त्यांच्या `संगतीचा परिणाम होऊन' सुधारणारे आपोआप सुधारतात.. ...वगैरे वगैरे
= इंटरनेटवर लेखन होतं. संगत नाही. आणि पुढे तर तुमचा प्रतिसाद फार विनोदी आहे :
>रोपटे मुळांसकट उपटून काढणे हे स्थितप्रज्ञाचे लक्षण निश्चितच नाही.
= इथे कोण कुणाला उपटतंय? का नुसतं लिहीत सुटायचं.
>इतरांची रेडीमेड उत्तरे ऐकून `व्यक्तित्वाचा खरा विकास' घडत नाही ?
= आहो व्यक्तित्व हीच तर वैयक्तिक धारणा आहे. त्याचा विकास कुठून काढला?... पण पुढे स्वतःची चूक लक्षात आली हे नशिब.
> म्हणूनच खरे स्थितप्रज्ञ कोणाचेही व्यक्तित्व घडवत नाहीत तर स्वत:कडे कसलेही श्रेय न घेता तुमच्या मूळ व्यक्तीत्वावरील आवरण दूर करतात.
= श्रेय दोन्हीकडे असतं. ज्ञानी, शिष्य समजू शकला म्हणून आनंदित होतो तर शिष्य, गुरूनी समजावलं म्हणून उतराई होतो.
>त्यासाठी संयम आवश्यक असतो.
= हा काही आश्रम नाही. आणि कुणाकडे गुरूपद नाही. तुम्ही कसल्या गोष्टी करता आहात?
> "आम्हाला कोणी समजूनच घेत नाही", अशी तक्रार एकाही स्थितप्रज्ञाने केल्याचे आजवर तरी ऐकिवात नाही.
= तुम्ही फेकत राहा. अश्या तक्रारींच्या नोंदी अध्यात्मिक ग्रंथात किंवा त्यांच्या चरित्रात होत नाहीत. बुद्धाला अवहेलना सहन करावी लागली हा इतिहास आहे. आणि संयम म्हणाल तर त्याचा शून्यवाद अजूनही लोकांना समजत नाही ही वस्तुस्थिती आहे.
तुम्हाला थोडं जरी अध्यात्मिक आकलन असतं तर बुद्ध ज्याला शून्य म्हणतो त्यालाच ज्ञानेश्वर : `तैसा म्यां देखिला निराकार ॐ मयी' म्हणतायंत हे लक्षात आलं असतं आणि तुमचा फोकस `स्थितप्रज्ञाची लक्षणं' वगैरे शोधण्याऐवजी लेखनावर राहिला असता.
>आव्हान देणे आणि स्वीकारणे हे अहंकाराच्या पातळीवर शोभून दिसते.
शाब्बास! आहो, लेख `अधिक देखणे तरी निरंतर पाहणे' या प्रक्रियेवर आहे, त्याविषयी तुमच्या प्रतिसादात एक शब्द नाही. प्रतिसादात तुम्ही स्थितप्रज्ञाविषयी लिहीतायं, इथे तुम्हाला ते कुणीही विचारलेलं नाही. म्हणून म्हटलं की त्याविषयी तुमचं आकलन स्वतंत्रपणे मांडा.
आणि `मग बघू ' यात तुम्हाला भिती वाटलेली दिसते कारण भय हेच तर अनाकलनाचं मुख्य लक्षण आहे आणि अहंकार त्याचा परिपाक आहे.
10 Aug 2013 - 11:56 pm | धन्या
इतके सारे लोक आपल्या विरुद्ध बाजूने लिहित आहेत तर कदाचित आपलंही काही चुकत असेल, असं तुम्हाला कधी वाटत नाही का हो?
11 Aug 2013 - 12:24 am | संजय क्षीरसागर
ते लेखकाविषयी लिहीतायंत.
ज्या संकेतस्थळाचा नांवलौकिक लेखनावर फोकस असण्याचा आहे त्याच्या हे विरुद्ध आहे. लेख आणि प्रक्रियेविषयी विद्वजनांचा एकही प्रतिसाद नाही. आणि मजा म्हणजे ज्ञानेश्वरांसारख्या व्यक्तीच्या काव्यपंक्तीवर लोक ही ज्ञानसुमनं उधळतायंत!
मला खरंच कुतुहल आहे. लेखात कुणाची निंदा नाही. कुणाची कुणाशी तुलना नाही. जे सांगितलंय ते कंटेपररी युगात, मनाच्या प्रक्रियेचा अभ्यास करून, स्वानुभवातनं लिहीलं आहे. कुणीही लेखनविषयाशी संबंधित लिहावं मी चर्चेला तयार आहे.
आता यात माझी काय चूक असू शकते?
11 Aug 2013 - 2:19 pm | निराकार गाढव
ज्ञानेश्वरांसारख्या व्यक्तीच्या काव्यपंक्तीवर लोक ही ज्ञानसुमनं उधळतायंत!...
नाहीतर काय. कळतच नाही काही कुणाला इथे.
11 Aug 2013 - 2:29 pm | अभ्या..
कळतच नाही काही कुणाला इथे.
मग नायतर काय:-(
एका ओळॆच्या प्रतिसादासाठि चार चार ओळि स्वाक्षरी म्हणजे फुकट शाई अन वेळ वाया घालवायचे धंदे.;-)
11 Aug 2013 - 10:06 am | अवतार
इथे वारंवार विनोदी आणि हास्यास्पद कोणाला ठरवले जात आहे ते एव्हाना पुरेसे स्पष्ट झाले आहेच.
याचा अर्थ ज्यांची अवहेलना होते ते सर्वच बुद्ध असतात, असा नक्कीच नाही.
यालाच रोपटे मुळांसकट उपटून काढणे असे म्हणतात.
हे लिहिण्याची संधी तुम्ही इतरांना कधी देणार?
11 Aug 2013 - 12:09 pm | संजय क्षीरसागर
बुवा, आहो लेखनविषयवार लिहा. नांव `अवतार' पण प्रतिसाद काय दिलेत ते पाहा.
बुद्धाची अवहेलना झाली हे तुमच्या `संयम' वगैरे लक्षणांना उत्तर आहे. आणि अवहेलना करणार्यांना शून्यवाद कळला नाही असा त्याचा अर्थ आहे. `अवहेलना होणारे सर्व बुद्ध नसतात' वगैरे भानगड पुन्हा आकलनातली तृटी दर्शवते. प्रत्येक जण बुद्धच आहे, कुणाला ते समजेल कुणाला नाही हा अध्यात्माचा सारांश आहे.
आणि रोपटं मुळासकट उपटतंय असं वाटत असेल तर लिहीण्यापूर्वी विचार करा. असली मुळं काय कामाची?
वरच्या एका प्रतिसादात लिहीलंय ते पुन्हा सांगतो, लेखनविषयावर चर्चा होऊ द्या. आणि लेखनविषयात चूक दाखवली तर त्यावर मान्यता, अमान्यता ठरू शकते. स्थितप्रज्ञतेचा उपदेश वगैरे करुन चर्चा भरकटवण्याचा प्रयत्न खरं तर हास्यास्पद आहे.
11 Aug 2013 - 12:48 pm | अवतार
या वाक्यावरून आपली एकूण आध्यात्मिक कुवत लक्षात आली आहे.
रोपटे एकाने उपटले म्हणून दुसऱ्या ठिकाणी ते रुजणारच नाही असे नाही. तेव्हा रोपट्याच्या मुळांना दोष देण्यापेक्षा ते उपटणाऱ्या हातांनी आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे.
तुम्ही वापरत असलेल्या या भाषेमुळेच चर्चा लेखनविषयावर न होता लेखकाविषयी होते आहे. आणि हे तुमच्या प्रत्येक धाग्यावर होत आहे. त्यासाठी काही विशिष्ट सदस्य आणि त्यांची मानसिकता जबाबदार नाही हे सत्य समजून घेणे हे अंतिम सत्य समजण्यापेक्षाही अधिक महत्वाचे आहे.
11 Aug 2013 - 3:49 pm | संजय क्षीरसागर
>या वाक्यावरून आपली एकूण आध्यात्मिक कुवत लक्षात आली आहे?
पुन्हा प्रगाढ अज्ञान दर्शन! आहो, बुद्ध याचा अर्थ सत्य. द काँस्टंट स्टेट, द अबसल्यूट.
मला वाटलं होतं तुमचा अभ्यास कमी पडतोय. आता तर आभ्यास शून्य आहे असं दिसतं.
सर्व शोध त्या स्टेटचा आहे. ती स्थिती आपलं स्वरूप आहे आणि आपण त्यावेगळे नाही हे ज्ञानेश्वर महाराज सांगतायंत :
अनंगपण फिटले मायाछंदा साठविले
सकळ देखिले आत्मस्वरूप ॐ मयी ।
याचा अर्थ ते आत्मस्वरूप सकळांचं आहे. इट इज एवरी वन्स रियालिटी.
आता तुमच्या इतक्या फंडामेंटल चुका आहेत (आणि त्यावर पुन्हा `अवतार' वगैरे आयडी घेऊन कडी केली आहे) म्हटल्यावर तुमच्याशी चर्चा करण्यात अर्थ उरला नाही. माझ्या लेखांचं सोडा, आता तुम्ही स्वतःचं बघावं हे ब्येस्ट राहिल.
11 Aug 2013 - 7:02 pm | अवतार
बुद्ध याचा खरा अर्थ Awakened म्हणजे पूर्ण जागृतीच्या अवस्थेत असलेला असा आहे. सत्य हे स्थिर, अचल आणि अपरिवर्तनीय आहे हे माहित असणे वेगळे आणि त्या सत्याच्या डोहात स्वत:च्या जाणीवेला विलीन करणे हे वेगळे. ह्याच स्थितीला आपुले मरण पाहिले म्यां डोळा असे म्हटले आहे. दुसऱ्यांना अभ्यास वाढवण्याचे सल्ले देण्यापेक्षा इतक्या लोकांनी दिलेला आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला मनावर (की भ्रमरावर) घेतलात तर उत्तम.
काय सांगता! इतका वेळ चालली होती ती चर्चा होती? तुमच्याशी चर्चा करण्यात मुळातच काही अर्थ नाही असे सल्ले मला इतरांकडून आधीच मिळाले आहेत. तरीही इतरांना वारंवार तुच्छ लेखण्याची फंडामेंटल चूक करणे तुम्ही थांबवाल अशी अजूनही आशा होती. सत्य हे आहे की मुळात तुमच्या ह्या वृत्तीमुळे इतरांनाच तुमच्याशी गंभीर चर्चा करण्यात काही स्वारस्य उरले नाही. विषयाला सोडून येणाऱ्या विनोदी आणि उपहासात्मक प्रतिक्रियांचे हेच कारण आहे. इतक्या सदस्यांनी पदरचा वेळ खर्ची घालून केवळ चर्चा भरकटवण्यासाठी असे प्रतिसाद द्यावेत इतके तुम्ही मोठे नाही आहात.
आमचं आम्ही बघू शकतोच. त्यासाठी तुमची कोणालाच गरज नव्हती आणि नाही. हाच सल्ला तुम्ही स्वत: वापरून पाहिलात तर कदाचित भ्रमराला थोडी स्थिरता मिळू शकेल.
11 Aug 2013 - 9:20 pm | संजय क्षीरसागर
काहीही संबंध नसतांना `स्थितप्रज्ञाची लक्षणं' सांगून `लेखक कसा स्थितप्रज्ञ नाही' हे दाखवण्याचा तुमचा प्रयत्न होता. त्यात `मुळासकट उपटणे वगैरे भाषा होती'. याला दुसर्याला तुच्छ लेखणं म्हणतात. आता तुम्ही अशी सुरूवात केल्यावर बाकीचे त्यावर उपप्रतिसाद आहेत हे तुमच्या लक्षात आलेलं दिसत नाही. तुम्ही स्वतःचे प्रतिसाद पहिल्यापासून वाचा म्हणजे घटनाक्रमाची संगती लागेल.
11 Aug 2013 - 10:12 pm | अवतार
संत वाड:मयावर लिहिणारे तुम्ही एकटेच नाही आहात. इतरही आहेत. पण त्यांच्या वाट्याला इतका उपहास का येत नाही आणि तुमच्याच वाट्याला का येतो ह्याचे कारण शोधण्याचा प्रयत्न करून बघा.
तुम्ही इतरांना तुच्छ लेखता हा तुमच्यावरील आरोप असत्य आहे असे जर तुम्हाला वाटत असेल तर ते शब्दांतून सिद्ध करण्याची जबाबदारी तुमची आहे. त्याऐवजी खाली क्लिंटन यांनी लिहिल्याप्रमाणे इतरांच्या बुद्धीची कुवत काढणे असले प्रकार तुम्ही जितके जास्त कराल तितका ह्या आरोपांचा खरेपणाच सिद्ध होईल. To every action there is always an equal and opposite reaction.
ह्या धाग्यावरील प्रतिक्रिया म्हणजे मागील सगळ्या धाग्यांवर तुम्ही जे काही लिहून ठेवले आहे त्याची परिणती आहे. हे सर्व थांबायला हवे असे सर्वांनाच वाटते आहे. ते तुमच्याच हातात आहे. तुम्ही इतरांचा स्वीकार केला नाही तर इतरही तुमचा स्वीकार करणार नाहीत.
काही लोकांचा अभ्यास शून्य असू शकतो.
त्यांची वैचारिक उंची , बौद्धिक कुवत कमी असू शकते.
त्यांचे फंडे चूक असू शकतात.
प्रश्न हा आहे की वारंवार तेच तेच लिहित राहिल्याने त्यांच्यात काही फ़रक पडणार आहे काय? सतत दुसऱ्यांच्या चुका वेशीवर टांगणे हा जगात बदल घडवण्याचा मार्ग आहे काय? बुद्ध असण्याचे सर्वात महत्वाचे लक्षण म्हणजे करुणा [Compassion].
इथे इतर कोणीही अंतिम सत्याचे ज्ञान झाल्याचा दावा केलेला नाही. तो ज्यांनी केला असेल त्यांच्यावर ही जबाबदारी आहे.
With great power comes great responsibility
12 Aug 2013 - 7:52 am | संजय क्षीरसागर
फक्त (प्रत्येक वेळी) सुरूवात कुणी केली आहे ते पाहा.
आणि एक गोष्ट उघड आहे, इथे जशाचा प्रतिवाद तशानं झालायं. माझ्या लेखावरच्या उपसाहात्मक प्रतिसादांचा माझ्याशिवाय कोण प्रतिवाद करणार?
मला एक आश्चर्य वाटतं, सतत माझी चूक काढण्यापेक्षा, सदस्य लेखनविषय सोडून अवांतर करतायंत आणि ते मूळ कारण आहे ही गोष्ट तुमच्या लक्षात येईल तो सुदीन.
12 Aug 2013 - 8:23 am | कवितानागेश
सुरुवात धन्यानी केली!! :D
इतके सारे लोक आपल्या विरुद्ध बाजूने लिहित आहेत तर कदाचित आपलंही काही चुकत असेल, असं तुम्हाला कधी वाटत नाही का हो?
तो विरुद्ध वैचारीक बाजूबद्दल लिहित होता.....
पण नेहमीप्रमाणेच प्रतिसाद नीट न वाचताच तुम्ही तक्रारी सुरु करण्याची घाई घाई केलित.
असो!
तसेही तुमचे कधीच काहीच चुकत नाही याबद्दल तुम्हाला स्वतःल खात्री असल्यानी 'चर्चा' नावाचा हार्मलेस प्रकार इथे कधीही होउ शकत नाही!
12 Aug 2013 - 11:03 am | अवतार
इतर धाग्यांवर जर उपहासात्मक प्रतिसाद आले तर लेखकाच्या बाजूने त्यांचा प्रतिवाद करायला इतर सदस्य पुढाकार घेतात. तुमच्या धाग्यांवर मात्र हे काम तुम्हाला एकट्यालाच का करावे लागते हे तुमच्या लक्षात येईल तो सुदिन.
10 Aug 2013 - 7:32 pm | संजय क्षीरसागर
पण आता फार झालं आहे. सतत निष्कारण उपहासात्मक प्रतिसाद आणि असंबद्ध विडंबनं या मागची मानसिकता एकदा उलगडून दाखवतो म्हणजे पुन्हा असं करण्यापूर्वी जरा विचार केला जाईल.
पाठांतर हा बुद्धीचा सर्वात निम्नतर पैलू आहे. त्याला काहीही समजलं नाही तरी चालतं. घोकणं आणि फेकणं इतकंच काय ते बुद्धीचं काम. आणि त्यात त्यावरच चरितार्थ म्हटल्यावर, सगळी बुद्धी त्याच कामी गहाण पडणार.
अश्या बुद्धीला नवा विचार पेलणं अशक्य आहे. खरं तर धोक्याचं आहे कारण ते घोकंपट्टीच्या विरोधात आहे. घोकलेलं डोक्यात इतकं ठोकून बसवलेलं असतं की नवा विचार म्हटला की ते बेभान होतं, अस्वस्थता निर्माण करतं. आतला टेपरेकॉर्डर तत्क्षणी सुरू होतो.
इतक्या निम्नतर स्तरावर काम करणार्या बुद्धीला कमालीचा न्यूनगंड असतो कारण तिला कुठलीही वैचारिक उंची गाठता येत नाही.... आणि मग विदूषकी चेष्टा करुन ती स्वत:चं सांत्वन करू पाहते.
10 Aug 2013 - 8:22 pm | धन्या
मी त्या मानसिकतेबद्दल वाचायला उत्सुक आहे. लवकर लिहा.
11 Aug 2013 - 11:16 pm | अत्रुप्त आत्मा
@मी त्या मानसिकतेबद्दल वाचायला उत्सुक आहे. लवकर लिहा.>>> मी ही आहेच..! +++१११... :)
अरे धन्या,लवकर लिहाच्या आधी..''कळेल असं'' -- हे दोन शब्द र्हायले का? =))
11 Aug 2013 - 11:57 pm | निराकार गाढव
त्यात काय एव्ह्ढं? कळलं नाही तर पुन्हा पुन्हा वाचायचं.
12 Aug 2013 - 12:07 am | अत्रुप्त आत्मा
@ तर पुन्हा पुन्हा वाचायचं.>>> मग..आपण नाही वाचलो..तरी चालेल..!
---हे पुढचं वाक्य ल्याहायचं र्हायलं अता! =))
=======================================
आजचा कू विचार-
आपली कुठलीही वैचारिक उंची नाही वाढली तरी चालेल,
पण वैचारिक तळ गाठता आला'च पाहिजे!
12 Aug 2013 - 7:03 am | अत्रुप्त आत्मा
जे काव्य "टाकलं" गेलं,ते स्वतःवर आहे,की अजून कोणावर एव्हढंही कळायचं भान व कॉमनसेन्स न राहिलेल्या मंद मती माणसाची कथित वैचारिक उंची,कुठे सूर मारत असेल...हे कळणं अवघड नाही!!
=======================================
आजचा कू विचार-
आपली कुठलीही वैचारिक उंची नाही वाढली तरी चालेल,
पण वैचारिक तळ गाठता आला'च पाहिजे!
11 Aug 2013 - 1:02 am | होकाका
खरं तर मी सोडून देत होतो आणि आता ही सोडून देणार होतो
हे नक्की कशाबद्दल लिहिलेले आहे?11 Aug 2013 - 1:12 am | होकाका
आणि हो, बुद्धीचा कमालीचा न्यूनगंड कसा दिसतो? आणि तो कसा घालवतात?
11 Aug 2013 - 8:30 pm | क्लिंटन
ही असली भाषा आली म्हणजे विचार थकून विकार भडकल्याचे लक्षण आहे हे नक्की. इतरांच्या बुध्दीची कुवत काढणे, वैचारिक उंचीवर भाष्य करणे असे प्रकार आले म्हणजे मुद्दे संपले आहेत आणि त्यामुळे चीडचीड होत आहे हे समोर दिसतच आहे. असल्या प्रकारांना फाट्यावर मारणेच उत्तम. आणि असे फाट्यावर मारले तरी 'माझ्या मुद्द्यांचा प्रतिवाद कोणी करू शकलेले नाही आणि वादविवादात मला कोणी हरवू शकलेले नाही' असे म्हणून कॉलर ताठ केली जाईलच. पण अशी कॉलर ताठ करणे म्हणजे मूर्खाच्या तोंडी कुठे लागा म्हणून इतर लोक गप्प बसत आहेत हे लक्षात न आल्याचेही लक्षण आहे हे सूज्ञांना वेगळे सांगायलाच नको. असो. पण या लेखमालेतून अनलिमिटेड मनोरंजन होत आहे (विशेषतः प्रतिसादांमधून) तेव्हा याबद्दल लेखकाचे आभार मानावेत तेवढे कमीच आहेत. असेच मनोरंजन या लेखमालेच्या उरलेल्या भागांमधून होईल ही अपेक्षा.
11 Aug 2013 - 9:09 pm | संजय क्षीरसागर
सतत विडंबनं आणि विषयाशी असंबंधित प्रतिसाद देण्यामागच्या सदस्याच्या मानसिकतेबद्दल ते लिहीले आहे.
मजा म्हणजे तुम्ही जेंव्हा या साइटवर संन्यास घेण्याची भाषा करत होता तेंव्हा आपली काहीही ओळख नसतांना तुम्ही मला इथेच नाही तर माझ्या व्यक्तिगत मेलवर निरोप पाठवला होता. तुमचे इश्यु सॉर्ट करण्यासाठी मी स्वतः सं.मं.ला विनंती करून तुमच्यासाठी रदबदली केली होती. सं.मं.नं मला उत्तर देऊन (आणि आभार मानून) तुमच्या प्रकरणात विषेश लक्ष घातलं होतं. तो सर्व पत्रव्यवहार अजूनही इथे उपलब्ध आहे. थोडक्यात, तुम्ही जे काही चालवलंय (मागच्या लेखावर ही हाच प्रकार केला होता पण मी दुर्लक्ष केलं) ते वस्तुस्थितीशी संपूर्ण विसंगत आहे.
लोकांना चांगल्या गोष्टींचं विस्मरण होतं यासारखं दुर्दैव नाही.
11 Aug 2013 - 9:19 pm | क्लिंटन
बरं बुवा. तुम्हीच बरोबर. :)
11 Aug 2013 - 9:38 pm | संजय क्षीरसागर
माझ्या बाजूनं तर सतत संकेतस्थळाच्या मूल्यवर्धनाचाच प्रयत्न असतो. पण इतक्या झटक्यात तू वर जे काही लिहलं आहेस ते तुझ्याविषयी कुणी लिहीलं असतं तर तुझी काय परिस्थिती झाली असती याचा विचार कर. अँड धीस वॉज द सेकंड टाईम. सूज्ञ माणसाकडे कृतज्ञता आणि दिलदारी दोन्ही असते. तो पुन्हा `तुम्हीच बरोबर' असा प्रतिसाद देईल?
11 Aug 2013 - 9:52 pm | क्लिंटन
माफ करा पण इतरांच्या बुध्दीची कुवत काढणे किंवा इतर लोक किती वैचारिक उंची गाठू शकतात यावर भाष्य करून कितपत मूल्यवर्धन होते? तुमच्या लेखातील कन्टेन्टपेक्षा इतर गोष्टींवर चर्चा का होते? याचे कारण (माझ्या मते) इतरांच्या बुध्दीची कुवत काढण्याचा प्रकार आणि असे वारंवार झाले तर ते कोणाला आवडेल? आणि बाय द वे, मी या संकेतस्थळावर एका निकनेमने लिहितो आणि कोणी कोणत्या नावाने लिहावे हा ज्याचा त्याचा प्रश्न झाला. तुम्हाला माझे नाव माहित आहे पण ते नाव मी इथे जाहिर करत नसताना तुम्ही परस्पर ते इथे कसे जाहिर करू शकता?
12 Aug 2013 - 6:25 am | यशोधरा
इथे टीपी करण्यापेक्षा काहीतरी चांगलं लिही की! किती दिवसांत काहीच वाचले नाही तुझ्याकडून.
12 Aug 2013 - 7:29 am | कवितानागेश
हाय रे दैवा!!! :(
कुणी कुणाचं नाही इथे. :(
12 Aug 2013 - 7:34 am | संजय क्षीरसागर
जर एखादा सदस्य सतत विडंबन करत सुटला आणि लेखनविषयाशी संपूर्ण असंबद्ध प्रतिसाद देत असेल तर त्या मागे काय मानसिकता आहे हे सांगणं हा त्या उपहासाचा आणि विडंबनांचा प्रतिवाद आहे.
तुम्ही प्रतिसाद देण्यापूर्वी या (आणि इतर) लेखावरच्या प्रतिसादांचा अनुक्रम पाहिला असता तर इतकी साधी गोष्ट लक्षात येऊ शकली असती.
त्याऐवजी आपल्यासारख्या विचारी व्यक्तीनं मी `इतरांच्या बुध्दीची कुवत काढण्याचा प्रकार वारंवार करतो' वगैरे सरसकटीकरण केलं याचं आश्चर्य वाटलं.
आश्चर्य एवढ्यासाठी की निदान आपण (उपरोल्लिखित) मदतीची आठवण ठेवली असती तर तो निष्कर्श काढण्यापूर्वी स्वतःच्या मनाशी विचार केला असता.
म्हणजे माझे लेखनविषय आपल्याला कळत नाही हे आपण अत्यंत जोरदारपणे जाहिर केलं आहे, त्यामुळे आपल्या लेखी त्यातून काही मूल्यवर्धन होत नाही. पण काहीही कारण नसतांना, एखाद्या अनोळखी व्यक्तीला केवळ त्याच्या आर्जवातला प्रामाणिकपणा बघून, संकेतस्थळावर अशी व्यक्ती असावी या हेतूनं मदत करणं ही देखिल मूल्यवर्धनाची एक बाजू असू शकते हे कळणं अवघड नसावं
असो इतकी किमान अपेक्षा करण्यात देखिल माझीच चूक असेल, पण `इतरांच्या बुध्दीची कुवत काढून मी संकेतस्थळाचं मूल्यवर्धन करतो' हे म्हणण्या इतकी बेईमानी निदान मी तरी करू शकत नाही.
10 Aug 2013 - 7:35 pm | राजा सोव्नी
बाकी काहीही असो चित्र फारच झकास
10 Aug 2013 - 9:00 pm | राजेश घासकडवी
या लेखातलं चांगलं काय हे शोधण्याचा प्रयत्न आवडला. अक्षरदेखील वळणदार आणि सुवाच्य आहे.
10 Aug 2013 - 9:07 pm | आदूबाळ
स्वच्छता आणि टापटिपीचे दोन मार्क?
10 Aug 2013 - 9:12 pm | बॅटमॅन
सुवाच्य हा शब्द शुद्ध लिहिण्याचा अर्धा मार्क जास्ती.
"तुम्हावर केला मी मार्क बहाल".
समस्यापूर्तीचा प्रश्न. सोडवल्यास १० मार्क जास्ती.
10 Aug 2013 - 9:28 pm | राजेश घासकडवी
मी सोडून देतो म्हणून माझा उपहास करत राहू नका. मी प्रामाणिकपणे या लेखातून नीरक्षीरविवेकबुद्धीने चांगलं ते निवडण्याचा प्रयत्न करतो आहे आणि तुम्ही चेष्टा मांडलेली आहे. तुमच्या गहाण ठेवलेल्या बुद्धीला नवीन विचार पेलणं शक्य नाही हे उघड आहे. वैचारिक उंची गाठता येत नाही म्हणून विदूषकी चेष्टा करणं थांबवा पाहू.
10 Aug 2013 - 9:38 pm | बॅटमॅन
अहो बुद्धाच्या वेळीही झेन कोअन्स कळत नव्हती लोकांना, अजूनही कळत नाहीत. माझी झेन/मर्सिडीज कोअन्स तुम्हाला कळत नाहीएत.
अन ही विदूषकी चेष्टा नव्हे. विदूषक माझा शत्रू आहे हे तुम्हा विचारवंतांना माझी स्वाक्षरी पाहूनही कळेना, हद्द आहे .
11 Aug 2013 - 12:20 pm | राजेश घासकडवी
ते कोअन्स नसून क्ॐस आहे इतकंही तुम्हाला ठाऊक नाही. ऐकिव शब्दांशी लेखनातले शब्द जुळत नाहीत म्हणून लोकांचा गैरसमज होतो. असे चुकीचे शब्द क् चं ओंकारमय होणं दर्शवत नाहीत. त्यामुळे प्रत्यक्ष बुद्धाने लिहिले असतील तरी ते ॐकारासह लिहायला हवेत.
विदूषक तुमचा शत्रू असेल, पण विदूषकी हा वेगळा शब्द आहे. एवढंही तुम्हाला कळत नाही म्हणजे तुमची मानसिकता लक्षात येते.
तुम्हाला लादेन ही ध्यानप्रक्रिया करून बघण्याचा सल्ला देतो. तूर्तास एवढंच.
11 Aug 2013 - 8:30 pm | बॅटमॅन
लादेन या ध्यानप्रक्रियेतल्या गुरूंचे शब्द पाहतो आहोतच, धन्यवाद ;)
11 Aug 2013 - 10:07 pm | राजेश घासकडवी
लादेन ध्यानप्रकाराविषयी मी चार शब्द लिहिले आहेत ते वाचावे. म्हणजे तुम्हाला किती कळत नाही याचा तरी अंदाज येईल कदाचित.
http://www.misalpav.com/node/25355
11 Aug 2013 - 1:22 am | कवितानागेश
उपहासात्मक प्रतिसाद आणि असंबद्ध विडंबनं या मागची मानसिकता - =))
हॅ हॅ हॅ हॅ हॅ
12 Aug 2013 - 12:37 am | होकाका
इथे हॅ हॅ हॅ हॅ हॅ मध्ये पाच वेगवेगळ्या लिन्का होत्या हे कळलेच नव्हते आधी:
http://www.misalpav.com/node/21377
http://www.misalpav.com/node/23678
http://www.misalpav.com/node/22325
http://www.misalpav.com/node/21861
http://www.misalpav.com/node/21341
सावकाश वाचेन आता लवकरच.
12 Aug 2013 - 2:12 pm | बाळ सप्रे
याला म्हणतात दांडगा अभ्यास !!
11 Aug 2013 - 7:21 am | निराकार गाढव
हा प्रतिसाद पूर्णपणे चुकलेला आहे.
11 Aug 2013 - 11:08 am | मदनबाण
पैजारबुवा भाग मिल्खा भाग" बरोबरच खालचा व्हिडीयो देखील नक्की पहा ! { इतरांनी देखील पाहण्याचे कष्ट घेतल्यास माझी हरकत नाही. }
मेजर जनरल जी.डी.बक्शी :-
11 Aug 2013 - 4:33 pm | चित्रगुप्त
प्रत्येकाने बघावाच असा हा अत्यंत ओजस्वी व्हिडियो दिल्याबद्दल मदनबाण यांचे अनेक आभार.
या धाग्यावर चक्कर मारण्याचे सार्थक हा व्हिडियो बघून झाले.
12 Aug 2013 - 7:40 pm | मदनबाण
धन्यवाद काका ! मला माहित होते की या धाग्याचे टिआरपी मुल्य अधिक आहे, त्याचाच फायदा मी उचलला ! उद्देशच एकच सगळ्यां पर्यंत या व्हिडीयोतला संदेश पोहचावा.
ज्या काश्मिर मधल्या ५ वर्षातील ३ पोस्टींग बद्धल त्यांनी सांगितले आहे त्या किस्तवाड { Kishtwar } मधेच सध्या दंगल चालु आहे ! देशातल्या अर्थव्यवस्थेचे ३-१३ तर वाजलेच आहेत शिवाय राजकिय अराजकता पराकोटीची झाली आहे.
जनरलनी सांगितल्या प्रमाणेच आपला तमाशा झाला आहे ! राजकिय गँगरीन आपल्याला संपवायला लागला आहे. पाकडे आपल्याला ठार मारत आहेत... त्यांची खेळी मस्त चालु आहे. आपल्या मिडीयाला देखील ते लिलया खेळवायला शिकले आहेत... त्याचे उत्तम उदाहरण देतो, ते म्हणजे आत्ता ५ जवानांना ठार मारल्या नंतर सर्व मिडीया पाकड्यांवर आगपाखड करु लागले,यातुन त्यांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी त्यांनी एक हाडुक टाकले ! कुठले हाडुक ? कोणी टाकले? तर शहरयार खान { Shahryar Khan } यांनी ते हाडुक टाकले... काय तर दाउद इब्राहिम पाकिस्तानात होता म्हणे ! आता तो म्हणे युएइ मधे असु शकतो !
झालं ते हाडुक टाकुन मोकळे झाले आणि आपले मिडीयावाले लगेच हे हाडुक चघळायला तुटुन पडले ! अरे ५ जवानांना ठार मारले ना पाकड्यांनी ? मग या माध्यमांनी सरकारला धारेवर धरुन हैराण करायला नको ? पण ह्यांना नविन हाडुक चघळायला मिळाल्यावर ५ जवानांच्या हत्येला ते क्षणार्धात विसरले देखील ! ही अवस्था आहे आपल्या मिडीयाची.
त्याज्या बातमी नुसार पाक सैन्याच्या गोळीबारात जखमी झालेला अजुन एक शहिद झाला आहे. :(
अजुन एक... अजुन एक... अजुन एक... आपण सर्वांनी फक्त मोजत बसायच !
मी आता अजुन एक व्हिडीया आता इथे देतो...
पूर्व रॉ प्रमुख आरएसएन सिंग
14 Aug 2013 - 9:45 am | ज्ञानोबाचे पैजार
बाणराव,
दोन्ही व्हिडीओ पाहिले. त्यातले बरेच काही समजले. काहि ठिकाणी थोडा अडखळलो उदा. हेमंत करकरेंच्या उल्लेखाच्या वेळी. (अर्थात या विषयातले माझे वाचन फार तोकडे आहे) पण तुमचा हे सगळे दाखवण्या मागचा जो उद्देश होता तो नक्की सफल झाला.
अजुन एक विनंती ह्या विषयासाठी वेगळा धागा काढला तर तो अधिक जणांपर्यंत पोचेल.
(अस्वस्थ)
11 Aug 2013 - 1:16 pm | प्रसाद गोडबोले
ह्याच ज्ञानेश्वर माऊलींनी हतिपाठामध्ये " हरिमुखे म्हणा हरीमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी " असे म्हणुन नामस्मरणाचा महिमा गायिला आहे . मागे एका लेखात आपण
असेही म्हणाला आहात (संदर्भ : http://www.misalpav.com/node/24998)
थोडक्यात ज्ञानेश्वर माऊली काही ठिकाणी योग्य आणि काही ठिकाणी व्यर्थ बोलतात असे आपले मत आहे काय ? ह्यावर जरासा प्रकाश पाडावा .
(अवांतर : हा प्रश्न गिरीजा तांबे ह्यांनी विचारला आहे कि प्रसाद गोडबोले ह्यांनी की मुहम्मद अब्दुल्ला ह्यांनी की शेल्डन कुपर ह्यांने उत्तरावर परिणाम पडु नये अशी अपेक्षा आहे .
अवांतर २: वरील आणि ह्या अवांतराला उत्तर देण्याचे टाळल्यास धागा अवांतरात जाण्याचे टाळता येईल .)
11 Aug 2013 - 4:27 pm | संजय क्षीरसागर
काही लोकांची स्वतःची संकेतस्थळं वगैरे आहेत अशी माहिती आहे (अॅट एनी गीवन टाईम, साधारण दोन किंवा तीन सदस्य उपस्थित असणारी). त्यांचा तिथे वेळ जात नाही म्हणून इथे येतात हे उघड आहे. येई नात का, पण आल्यावर प्रतिसादातून `फेसबुकी ज्योक' मारणं यात काय फुशारकी वाटते? एकच कारण असावं, हे असले उद्योग तिथे केले तर `एक सदस्यिय संकेतस्थळ' म्हणून गौरव होण्याची शक्यताच जास्त, म्हणून इथे हौस भागवत असावेत.
स्वतःला गाढव म्हणवणारा एक आयडी, फक्त माझ्या लेखांवर गोंधळ घालायला निर्माण झाला (का केला?) आहे.
आता स्वतःला गाढव म्हणणं यासारखा स्वतःचा अपमान नाही हे गाढवाला कसं कळणार? पण माणसाला तरी ते कळायला हवं! अर्थात इतक्या निम्न बुद्धीचं प्रदर्शन केल्यावर गाढव हा `आकार' आहे हे लक्षात येणं अवघडच. त्यामुळे स्वतःला गाढव आणि (त्यात पुन्हा निराकार!) म्हणून गाढव कितीही नाचलं तरी मराठीत त्याला गर्दभलीलाच म्हणतात.
11 Aug 2013 - 8:33 pm | बॅटमॅन
12 Aug 2013 - 12:28 am | नि ३
कधी येणार?
संजयजी मि आतुरतेने वाट बघतोय....
जाता जाता ...एक शंका आहे ती विचारुन घेतो...
आमिर खान च्या मन चित्रपटातले एक गाने आहे ....
" मेरा मन क्यु तुम्हे चाहे मेरा मन "
तर ह्या गाण्यावरुन गीत लिहण्यार्याला हेच सुचवायचे आहे की ...ह्रद्य किंवा ब्रेन नाही तर मन च प्रेम वैगेरे करायला लावते ...तर आपण मनाचे एकावे काय?? आणी "मेरा मन क्यु तुम्हे चाहे मेरा मन" ह्याचे उत्तर आपण मनापासुन कसे वदवुन घ्यायचे???
कळावे लोभ असावा...
12 Aug 2013 - 11:43 am | स्पा
या भागातलं जवळ जवळ सगळचं डोक्यावरून गेले , तरी समजून घ्यायचा प्रयत्न करतोय
12 Aug 2013 - 11:46 am | स्पा
पण मी कदाचित हे लेखन समजायला बराच लहान आहे आणि ""एक्स्पिरियंस्ड इलाइट क्लास"" मध्येही नाही ..
आता कसं होणार माझं :(
12 Aug 2013 - 11:48 am | पैसा
बाळ प्रसन्ना, तुझी सही काय सांगते?
आहे ना सोप्पं?
12 Aug 2013 - 10:54 pm | अत्रुप्त आत्मा
@आता कसं होणार माझं smiley>>> =)) काय डँबिस मणुक्श आहे हा..! =))
13 Aug 2013 - 10:49 am | चौकटराजा
तुझं कसं होणार याची काळजी करू नको. आमची स्वाक्षरी वाच.तू त्या क्लास मधे नाहीस याची जाणीव म्हणजेच तू त्या क्लासला जायचा सोपानावर उभा आहेस ! भिउ नकोस त्या सोपानावर तुझ्या पाठीमागे कुणीच नाही. कारण उणीवेची जाणीव
ही जाणीवेची पहिली पायरी आहे मित्रा !
13 Aug 2013 - 11:28 am | विटेकर
चोक्कस्स्स !
13 Aug 2013 - 8:04 pm | लंबूटांग
प्रतिसादाचं शीर्षक + पहिलं वाक्य धरून सुद्धा sarcasm मधे काहीच फरक पडत नाही.
आता तुमचे व्यनि मला वाचता येत नाहीत. व्यनिमधे कौतुक केले की ते खरे असे मानायचे का? तुमची कोणी टांग खेचत असेल तर तो व्यनि, खरड्वही, ईमेल, फोन, sms कशानेही खेचू शकतो. (मी स्पाने खेचली असेल असे म्हणत नाहीये पण नाकारतही नाहीये) असो बाकी. व्यनि म्हणजे व्यक्तिगत निरोप. आता व्यक्तिगत ह्याचा अर्थ तुम्हाला मी नव्याने सांगायची गरज नसावी. तुम्ही व्यनि खरडवहीतील गोष्ट धाग्यावर आणता आणि इतरांना लेख सोडून लेखकावर प्रतिसाद देता अशी दूषणे देता.
त्याचा संपूर्ण प्रतिसाद - केवळ ह्याच नाही तर इतरही धाग्यांवर - वाचून मला जे वाटलं ते लिहीलं आणि जे मी तुमचा प्रतिसाद वाचून जे जाणवलं ते लिहीलं.
बाकी तुमच्याकडून तुम्ही नेमकं तेवढंच सोडूनच दिलंय! हे वाचून डोळे पाणावले.
मी गेल्या काही लेखात विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे द्यायची तुम्ही नेमकी सोडून दिली आहेत त्याचे काय?
13 Aug 2013 - 11:34 pm | संजय क्षीरसागर
पहिल्या पोस्टवरचा पहिला प्रतिसाद वाचला तरी कुणाही मंदमतीला अर्थ कळेल!
तुम्ही जितकं स्पष्टीकरण द्याल तितकी तुमची मानसिकता उघड होत जाईल याचं भान ठेवून लिहा.
13 Aug 2013 - 11:56 pm | लंबूटांग
तुम्ही कोणता प्रतिसाद म्हणत आहात माहित नाही मला पण त्या प्रतिसादाचा संदर्भ घेऊन हा प्रतिसाद sarcastic नव्हता असे कसे. मी लिहीले होते ते सांगायला की मी सर्व प्रतिसाद नीट वाचतो. म्हणून. भ्रमर १ वर पहिला प्रतिसाद बिरुटे सरांचा आहे.
कैच्या कै. कसली मानसिकता आणि कसलं काय. जरा लिहाच तुम्ही माझ्या मानसिकतेबद्दल तुम्हाला काय वाटतेय. मलाही उत्सुकता आहे. इथेच लिहीलेत तरीही चालेल. मी अजिबात वैयक्तिक आरोप केलेत वगैरे बोलणार नाही. तुम्हाला माझ्या आजपर्यंतच्या ५-१० प्रतिसादांतून माझी मानसिकता कळली ह्याचेच मला आश्चर्य आहे.
तुमच्या पोस्टवर तुमच्या सिद्धांतांवर/ विचारांवर कोणी आक्षेप घेतला की आक्रस्ताळेपणा करून वाट्टेल ते मानसिकता काय आणि inferiority complexकाय बरळायचे, स्वत:च्या सोयीनुसार एखादे वाक्य घेऊन त्याचा वाट्टेल तसा अर्थ लावायचा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणे सोयीस्कररीत्या टाळायचे हे सर्वांना माहिती आहे.
बरं मागील धाग्यांत विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर देणार का? तुमच्या संज्ञांच्या व्याख्या विचारल्या होत्या ते.
14 Aug 2013 - 12:04 am | मोदक
लंबूटांगजी - मी एक सुचवू का..?
ते सगळे प्रश्न (आणि शक्य झाल्यास लिंका) एका प्रतिसादात याच धाग्यावर द्या.
आणखी कुणाचे अनुत्तरीत प्रश्न असतील तर ते येथेच येवूदेत..
माझेही काही अनुत्तरीत प्रश्न आहेत - शोधतो सवडीने!
का त्याचा नवीन धागा काढूया..?