काटा रुते कुणाला
Taxonomy upgrade extras
लाचलुचपतीचे विडंबन.....
काटा रुते कुणाला?
काटा रुते कुणाला? चरबीच जाड आहे.
मज "फ़ूल" हे समजती, हा कृरभाग आहे
........ रुते कुणाला? काटा रुते कुणाला?
सांगू कसे कुणाला ते स्वच्छ शुभ्र बगळे
चिरकाल चरणे त्यांचे, साहतात लोक सगळे
........ रुते कुणाला? काटा रुते कुणाला?
काही करू कसे मी? सारेच साव ठरले.
भरतात पोतडी ते आडदांड बोके सगळे
........ रुते कुणाला? काटा रुते कुणाला?
ह्या शर्मवंचितांना काटा कधी रुतेना
पाहूनी लूटमारी मज बोच सलत आहे
........ रुते कुणाला? काटा रुते कुणाला?
काटा रुते कुणाला?
काटा रुते कुणाला? चरबीच जाड आहे.
मज "फ़ूल" हे समजती, हा कृरभाग आहे
........ रुते कुणाला? काटा रुते कुणाला?
वाचन
2465
प्रतिक्रिया
0