मुलगा झाला हो-अर्थात मेल ओपन

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in काथ्याकूट
14 Sep 2008 - 6:21 pm
गाभा: 

अश्वत्थामा म्हणतो त्याप्रमाणे मी पण कळत नकळ्त अपघाताने पालक झालो.
१ली पर्यंत मुलगा आखोंका तारा. नंतर ९वी पर्यंत रुटीन पालक. स्वतःत गुंतलेला. अर्थात सन्मान्य अपवाद सोड्ता सगळीकडे हेच असते. आणि म्हणुनच १ल्या टप्प्यात आठ आणि दुसर्या टप्प्यात चार मार्क दहापै़की.(मुलांच्या मार्काबरोबर आपल्याला पण मार्क द्यावेत पालकांनी)
९वीत एकदा खुप कमी मार्क मिळाल्यावर आमचे अर्धांग कडाड्ले.-" लो़कांची लुगडि धुता, माझ्या मुलाचे काय? (माझ्या मेहेनतीचे कायच नाय) गप्प रहाण्यात श हाणपणा होता.
९वी झाल्यावर सुट्टीला पुण्याला जाताना फलाटावर गाडीची वाट बघत असताना नागपुर एक्स्प्रेस आली. जनरल चे मधमाशाचे पोळे झाले होते. कोण गर्दी. कल्पनेची आय्डीया आली. मुलाला म्हट्ले बघ बाबा आपल्याकडे ए.सी चे तिकिट आहे. आणखी ६ वर्ष काढीन. नंतर तुला काय हव. जनरल का ए.सी.
उत्तर देताना डोळ्यात चमक दिसली. देवच पावला. म्हणाला, अर्थात ए.सी.
लागा कामाला लेको. कसं करायचे ते मी सांगतो. हा माझा अभ्यासाच्या बाबतीत पहिला आणि शेवट्चा संवाद. १०वीत ८७%. बायको तर हरखली. अख्य्या खानदानाला पार्टी ची कल्पना पुढे आली. मागुन पुढे आलेला म्हणुन सत्कार
झाला.पण गडी निर्विकार. बायकोला काही कळेना हा काय प्रकार आहे तो.
तीने मुलाला माझ्यासमोर विचारले.उत्तर ऐकल्यावर गोंधळ आण्खी वाढला मातेचा.१०वी च्या मार्काला काय महत्व नाही. मी यु.डी.सी.टी. ला गेल्यावर बघु. माझाच असल्याची खात्री पट्ली उत्तर ऐकुन. (हॉस्पिट्ल मध्ये बदला बदली
होते )
आता माझा पोपट झाला. कॉमर्स घेणार ह्या हिशोबात मी तयार नव्ह्तो सायन्सला आर्थिक स्वरुपाने. आले पैसे -उडवले पैसे.(आज काल गाढव रस्त्यावर दिसत नाही. कोणाला बघावेसे वाट्ले तर मला बघा. आणि आम्ही म्हणे समुपदेशक) तरीसुद्धा सर्व कॉलेजचे फॉर्म्स आणले. कॉमर्स चे सुद्धा. त्याचा निर्णय अंतिम. रुपारेल मध्ये नको म्हणाला. बायको परत हैराण. (रुपारेल मध्ये रोज सकाळी पेढे देतात काय असे म्हट्ल्यावर कोण काय बोलणार-माझा अभ्यास मलाच करावा लागणार). ह्यानंतर बायकोने परत कधी तोंड उघड्ले नाही. मला त्याच्यातल्या परिवर्तनाची जाणीव झाली.
आता हे होणार कि नाही ह्याची खात्री नव्हती. मला मेल ओपनचे त्रास काय असतात ह्याची संपुर्ण कल्पना असुन सुद्धा त्याच्या देहभाषेने बांधला गेलो.
११वी १२ वी ला त्याने केलेली मेहेनत आजही अंगावर शहारे आणते. अकॅडेमिक एक्सलन्स ची आपली कमी ही आपणच भरायची आहे आणि त्याकरिता इतर सर्व गोष्टीचा त्याग करायची शपथ त्याने पाळली. ११वी ला ८७ १२वी ला ८७ .सि.ई.टी ला १७२. आय्.आय्.टी नाही मिळाले. पण यु.डी.सी.टी. मिळत होते, हवी ती शाखा नव्हती. आरक्षण आडवे आले १ मार्काने. म्हणुन इलेक्ट्रोनिक्स ला जवळ्च्या कॉलेज मध्ये घेतले. वाट्लो आता सुट्लो.पुढ्च्या तयारीला लागुया. १० लाखाची पॉलिसी घेतली . कारण ११वी १२ वी मध्ये समभागामध्ये गुंतवलेले पैसे खर्च झाले होते.
पेट्लेल्या कोळ्शावरुन चालणे ते सुद्धा अनवाणी म्हण्जे काय ते आता कळ्णार होते. उपरवाला हस रहा था. जादा शान्पती कर रहा बे. अभी देख तेरी पुंगी कैसी बजती है. राहिलेले भोग क्रमशः
मराठी चा संबध सुटुन ३० वर्ष झाली. त्यामुळे प्रकटनात थोडीशी गड्बड होते. पण तुम्ही पैलवान संभाळुन घ्याल अशी खात्री आहे.
माझी ह्या सर्व विषयात काही मते-
१. दहावी आणि बारावी च्या मार्काची सांगड आयुष्यातल्या यशाशी घालु नये.
२. पालक मंडळी ने शैक्षणिक क्षेत्रात वेगाने होणार्या बद्लाची फर्स्ट हँड माहिती बाळ्गावी.
३.कोणी तरी बाबाने सांगितलेल्या कहाणी वर संपूर्णपणे विश्वास ठेवू नये.
४. तुम्ही समजता त्याच्यापेक्षा शिक्षणाचा खूप वाढ्णार आहे.
५. मिळालेल्या माहिती चा तुमच्या फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये मुल्यमापन करा. हर्ड मेंटॅलिटी ने कोणतेही निर्णय घेउ नका. बबन नेघेतल म्हणुन छगन ला पेलेल असे नाही. अपवादाला नियम समजु नका.
६. मेल ओपन चे आव्हान पेलायला बरेच खांब सोडावे लागतील. दोन वर्ष जरा दमाने घ्या. स॑र्व मजा करुन १८०+ मिळ्तील असे तुम्हाला वाट्ते तर रिस्क घ्यायला हरकत नाही.(बबनला जमले म्हणुन छ्गनला जमेल असे नाही.)
७.सि.ई.टी त चांगले मार्क मिळाले म्हणजे सर्व काही झाले असे नाही. आणि मिळाले नाही तरी जग काही संपत नाही. उदंड संधी उपलब्ध आहेत. असल्या यशाची भरपुर उदाहरणे सापड्तात.
८.१०वी त मिळाले म्हणुन १२वी त मिळ्तात असे नाही. आणि १२ वीत मिळाले म्हणजे सि.ई.टी. त मिळतात असे तर मुळीच नाही. भरपूर मेहनत हा एकच उपाय.
९.मी माझ्या पाल्याला घडवणार च्या गमजा मारु नयेत. तुम्ही फक्त प्रेम करु शकता त्याच्यावर.
१०.बदलत्या परिस्थितीला सामोरे जाताना तुमच्या वेळी काय झाले चे संदर्भ टाळा. आणि ते लवकर विसरा.
मोझेस बाबाच्या टेन कमांड्मेट्स पैकी काही पट्णार नाहीत. बरोबर आहे. कारण तुम्ही आज वेगळ्या प्लेन वर आहात. ऍक्सिस बदलला की बिंदु ची व्याख्या बदलते.
हे प्रतिपादन मी पालकांना रोज करतो. ऐकल्यासारखे करतात. परत पाच मिनिटाने ९०% चा फॉर्मुला विचारतात. मी आजकाल चालणे कमी केले आहे. पुरेसा गॅस नको का? सिझन सुरु आहे.
जाता जाता: मी आदर्श पालक नाही. आदर्श पालक व्हायचे क्लासेस चालतात असे ऐकते. ३ तासाचे ४ सेशन्स. ८०००रुपये मोजावे लागतात.
And remember once for all. All events turn into nonevents once the event is over so do not worry about evetuallity of events turning into non events look for further events and enjoy. आता जमतील तेव्ढ्या वि.प्र. च्या प्रु. वर प्र. करा. खांब सोडले आहेत मी पणाचे.

प्रतिक्रिया

ऋषिकेश's picture

14 Sep 2008 - 6:29 pm | ऋषिकेश

ऍक्सिस बदलला की बिंदु ची व्याख्या बदलते.

हे वाक्य आवडले.

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Sep 2008 - 6:30 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

१. दहावी आणि बारावी च्या मार्काची सांगड आयुष्यातल्या यशाशी घालु नये.
माझ्या शाळेतल्या बय्राचश्या शिक्षकांनाही हे सांगा ना, प्लीज!

All events turn into nonevents once the event is over so do not worry about evetuallity of events turning into non events look for further events and enjoy.
आवडलं. :-)

(दहावीचे मार्कही न आठवणारी) अदिती

यशोधरा's picture

14 Sep 2008 - 6:32 pm | यशोधरा

१. दहावी आणि बारावी च्या मार्काची सांगड आयुष्यातल्या यशाशी घालु नये.
९.मी माझ्या पाल्याला घडवणार च्या गमजा मारु नयेत. तुम्ही फक्त प्रेम करु शकता त्याच्यावर.
१०.बदलत्या परिस्थितीला सामोरे जाताना तुमच्या वेळी काय झाले चे संदर्भ टाळा. आणि ते लवकर विसरा.

सहमत!

रेवती's picture

14 Sep 2008 - 10:56 pm | रेवती

आमची आत्ता कुठे सुरूवात आहे. आपण जे सांगितले आहे तसे वागताना स्वतःमध्ये (माझ्या वागण्यात) खूप बदल करावे लागणार आहेत. काही खांब सोडताना भीती वाटते. काहीतरी माहीत नसलेलं करताना वाटते तशी. सध्या आखोंका तारा असला तरी अभ्यासाला मारून बसवत नाही, पण एका जागी निदान २० मिनिटे बसावे यासाठी तो जे म्हणेल तो खेळ (बैठा) आम्ही खेळतो. कधी चित्र तर कधी गोष्टी, कधी चेस तर कधी साधे गणित. त्याला अजून हे सांगितलेले नाही कि गणित हा विषय अभ्यासाचा आहे. पण तो म्हणेल तेंव्हाच अभ्यास म्हणजे वाचन करतो.

रेवती

ब्रिटिश's picture

15 Sep 2008 - 7:49 pm | ब्रिटिश

>>९.मी माझ्या पाल्याला घडवणार च्या गमजा मारु नयेत. तुम्ही फक्त प्रेम करु शकता त्याच्यावर.
लोक ह्येच ईसरतान. लै भारी

मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)

सुमीत भातखंडे's picture

15 Sep 2008 - 9:55 pm | सुमीत भातखंडे

छानच.
मुद्दे पटले.
दहावी आणि बारावी च्या मार्काची सांगड आयुष्यातल्या यशाशी घालु नये.

सहमत.

वाचक's picture

15 Sep 2008 - 11:44 pm | वाचक

आणि यशाची सांगड घालू नये हे 'थियरी' म्हणून बरोबरच पण
- दहावीत कमी मार्क मिळाले की 'नावडत्या' महाविद्यालयात घ्यावा लागणा प्रवेश
- त्याच बरोबर आलेला (थोडा तरी) न्यूनगंड आणि पालकांच्या अपेक्षांचे ओझे
- महाविद्यालयातही 'कमी मार्कांचेच' बरोबरीचे विद्यार्थी त्यामुळे 'संगत चुकीची लागण्याची शक्यता'
- दर्जेदार स्पर्धा, शिक्षण, सोयी त्या महविद्यालयात नसण्याची शक्यता
- 'कॉलेजचे म्हणून दिले जाणारे' मार्क (प्रॅक्टिकल मधले)
- अपयशाचे 'बॅगेज'

ह्या सगळ्याचा १२ वी च्या मार्कांवर परिणाम होणारच - अपवाद कमीच
आणि मग त्या अपयशामुळे 'आत्मविश्वास / पालकांचा विश्वास' हरविणे हे सगळे दुष्ट्चक्र आहे असे नाही का वाटत ?

अजिंक्य's picture

16 Sep 2008 - 5:16 pm | अजिंक्य

- दहावीत कमी मार्क मिळाले की 'नावडत्या' महाविद्यालयात घ्यावा लागणारा प्रवेश
-महाविद्यालयातही 'कमी मार्कांचेच' बरोबरीचे विद्यार्थी त्यामुळे 'संगत चुकीची लागण्याची शक्यता'
- दर्जेदार स्पर्धा, शिक्षण, सोयी त्या महविद्यालयात नसण्याची शक्यता

प्रत्येक वेळी असं होईलच असं नाही, पण तरीही बर्‍याच वेळी असं होतं खरं.
(स्वतःचा अनुभव! अर्थात आता मी त्या दुष्टचक्रातून - सुदैवाने - बाहेर पडलोय - वयानुरूप!)
बर्‍याच अंशी सहमत.

-अजिंक्य
www.ajinkyagole1986.blogspot.com.

भास्कर केन्डे's picture

17 Sep 2008 - 9:06 pm | भास्कर केन्डे

आपले म्हणने अगदी पटले. या दुष्टचक्रातून बाहेर येण्यासाठी शैक्षणीक नियमावलीमध्ये अमुलाग्र बदल घडणे आवश्यक आहे. वेळोवेळी शैक्षणिक समित्यांनी अभ्यास करून केलेल्या शिफारसी पडताळून आंमलात आणायला आपल्या शासनास वर्षानुवर्षे लागतात. त्या विद्यार्थी तसेच पालकांपर्यंत पोचण्यासाठी आणखी वेळ जातो. व पर्यायाने हवे ते बदल हवे त्या गतीने होताना दिसत नाहीत.

पण हे दुष्टचक्र अस्तित्वात आहे म्हणून प्रभूसाहेबांनी सांगितलेले "मार्कांची यशाशी सांगड नसावी" हे मुद्दे चूक ठरत नाहीत असे वाटते.

आपला,
(गोंधळलेला) भास्कर
आम्ही येथे वसतो.

चतुरंग's picture

17 Sep 2008 - 9:26 pm | चतुरंग

'मार्कांची सांगड यशाशी घालू नये' हे बरोबर.

आता प्रश्न असे येतात की मग मार्क कमी असले तरी 'यशस्वी' होण्यासाठी काय करावे?(यशस्वी ह्या शब्दाची प्रत्येकाची व्याख्या वेगवेगळी असणार - तरीही व्यवहारिक दृष्ट्या लौकिकार्थाने यश मिळवणे, पुरेसा पैसा देऊ शकेल अशी नोकरी/व्यवसाय/धंदा करता येणे अशी मर्यादित व्याख्या तात्पुरती धरु).

तुमच्या अंगच्या नाना कळा, तुमची बुद्धिमत्ता, तुमच्या अंगचे गुण मोजण्याचे आणि त्याप्रमाणे तुम्हाला योग्य वाट दाखवण्याची मार्क आणि परीक्षांखेरीज इतर काही सोय आहे का?

डॉक्टर, इंजिनियर होणे म्हणजेच सर्व काही असे नसेल तर - इतर कोणते करियरचे मार्ग आहेत ह्याची पूर्ण माहिती होणे गरजेचे आहे.
समुपदेशनात 'असे करु नका' हे सांगतानाच 'त्याऐवजी कसे/काय करा' हेही सांगणे महत्त्वाचे आहे. समर्थ, सक्षम पर्यायी व्यवस्था असल्याखेरीज सरधोपट मार्ग लोक सोडणार नाहीत.

चतुरंग

भास्कर केन्डे's picture

17 Sep 2008 - 9:44 pm | भास्कर केन्डे

प्रभू साहेब,

खूप महत्वाच विषय ऐरणीवर घेतलात. चर्चेची सुरुवात सुद्धा मुद्देसूद आहे. तुम्ही म्हणता तसे खांब सोडायला हवेत पण ते सहजासहजी जमत नाही हे ही नक्की.

आम्ही आजून आठ मार्कांच्या गटात (म्हणजे सुपात) आहोत. जात्यात जायच्या आत तुमच्या सारख्या दळून निघालेल्यांची मते समजून घेणे फायद्याचे ठरेल हे वादातीत. कारण अत्ताच मला मी "आऊट डेटेड" झाल्यासारखे वाटत आहे... विषेशतः भाचे मंडळी आजकालच्या नियम बदलांचा विषय काढून मत विचारतात तेव्हा. मला न समजनारे नवीन मुद्दे...
१. दहावी नंतर जिल्हा बदल करण्याचे नियम - आमच्या वेळी कोणीही कोणत्याही जिल्यातून महाराष्ट्रात कोठेही जाऊन ११वीत प्रवेश घेऊ शकत असे. त्यावर आता मर्यादा येत आहेत. कारण लातूर सारख्या शिक्षणासाठी प्रसिद्ध शहरात बाहेरील मुलांच्या स्पर्धेमुळे स्थानिक मुलांना ११वीत प्रवेश मिळत नाहीत.
२. सेमी इंग्रजीचा परिणाम - या विषयावरील प्रश्न हे मला नवीनच आहेत. मुलांना ११वीत विज्ञान घेतल्यावर एकदम इंग्रजीचा सामना होतो व खूप आवघड जाते. पण म्हणून ५वी-६वी पासून घेणे योग्य आहे का? कारण पुढे विज्ञान शाखेत जायचे किंवा नाही हे या वयात मुलांनी ठरवलेले नसते.
३. वेगवेगळ्या एन्ट्रन्स परिक्षा - या आजकाल येवढा गुंतागुंतीच्या झालेल्या आहेत की कोणत्या परिक्षेसाठी केव्हा वेळ द्यावा वा कोणती टाळली तरी चालेल याची कल्पना ना पालकांना असते ना विद्यार्थांना.

या विषयांवर सुद्धा येथील जाणकार काही माहिती देतील का?

आपला,
(आउट डेटेड) भास्कर
आम्ही येथे वसतो.

टवाळ कार्टा's picture

7 Feb 2016 - 5:59 pm | टवाळ कार्टा

टू गुड

अजया's picture

7 Feb 2016 - 6:04 pm | अजया

All events turn into nonevents once the event is over so do not worry about evetuallity of events turning into non events look for further events and enjoy.
लक्षात ठेवले पाहिजे.पोरगं गेलं बारावीत बघता बघता!
खांब मात्र केव्हाच सोडले आहेत!

बोका-ए-आझम's picture

7 Feb 2016 - 9:01 pm | बोका-ए-आझम

पण तो बारावीला येईल तेव्हाही हा लेख तेवढाच relevant असेल याची खात्री आहे.

हे वाचायचं राहून गेलं होतं