`रुणुझुणू रुणुझुणू रे भ्रमरा’ (एक)

संजय क्षीरसागर's picture
संजय क्षीरसागर in जनातलं, मनातलं
15 Jun 2013 - 12:58 pm

मनसे मुक्ती ही तो दरअसल मुक्ती है ! : ओशो (अष्टावक्र महागीता)

ओशो

__________________________________

मन या जीवनातल्या गहनतम पैलूवरचं हे लेखन तुमच्या समोर मांडताना अतिशय आनंद होतो आहे. विषय कसा पुढे न्यावा याची कोणतीही योजना मनात नाही. तुमचे प्रतिसाद आणि प्रश्न लेखनाची दिशा ठरवतील.

अनेकानेक अंगांनी मनाचा सांगोपांग वेध घेण्याचा प्रयत्न या लेखमालेतनं होईल. वेगवेगळ्या सिद्धांचं मनाविषयीचं आकलन, व्यक्तिमत्त्वाची घडण, आपली स्मृती, माइंड-बॉडी को-ऑर्डिनेशन, मनाचा कल आणि व्यक्तिगत कौशल्य, संगीत, खेळ, फ्रॉइड आणि इतर दिग्गज मनोतज्ज्ञांचे विचार, मानवी नातेसंबंध, मनाचं हृदयाशी नातं (भावनिक विश्व : आनंद, नैराश्य, न्यूनगंड, अल्झायमर, आत्महत्या वगैरे), मानसिक धारणा, भक्तिमार्ग आणि इतर आध्यात्मिक मार्गातल्या मनापलीकडे नेणार्‍या साधना पद्धती आणि सरते शेवटी मनापासून मुक्ती असा लेखनाचा समग्र आवाका असेल.

____________________________

प्रथम मनाचं अत्यंत उघड स्वरूप समजावून घेऊ.

मनाच्या दोन विंग्ज आहेत, एक ऑडिओ आणि दुसरी विज्युअल. कुठलीही स्मृती मूलतः या दोन प्रकारच्या रेकॉर्डिंग्जवर आधारित असते. श्रवण आणि अवलोकन या दोन संवेदनांनी मानवी आकलनाचा जवळजवळ पंचाण्णव टक्के भाग व्यापल्यानं मन 'ऑडिओ- विज्युअल डिवाइस' आहे. इतर तीन संवेदनांनी (स्पर्श, गंध आणि स्वाद) मनाचा अत्यंत नगण्य भाग व्यापलेला आहे.

संवेदना ही मनाची कारक आहे म्हणजे कोणतीही संवेदना मन सक्रिय करते. जेव्हा आपण मनाची प्रक्रिया जाणण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ‘पहिली संवेदना’ हा अत्यंत बेसिक फॅक्टर आहे हे लक्षात घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

आजपर्यंत हजारो सिद्धांनी ‘ शांत बसून मनाकडे पाहा’ असा संदेश दिला आहे आणि आजही मनापलीकडे जाण्यासाठी ‘मनाचं तटस्थ अवलोकन’ ही (आध्यात्मिक) जगातली सर्वमान्य साधना मानली जाते. अगदी बुद्धापासून ते जे. कृष्णमूर्तीपर्यंत (इंन्क्लूडिंग ओशो) सर्व ज्ञानमार्गी या साधनेचा पुरस्कार करतात. आजवर कोट्यवधी लोकांनी ही साधना केली असेल पण ती अत्यंत निरर्थक, कंटाळवाणी आणि व्यर्थ आहे.

(भक्तिमार्गात ‘नाम साधना’ हा सर्वोत्तम मार्ग मानला गेला आहे पण तो तर त्याही पेक्षा व्यर्थ आहे. अर्थात त्याविषयी मी इतक्यात काहीही लिहिणार नाही किंवा त्यासंबंधी प्रश्नही विचारले जाऊ नयेत.)

मनाचं अवलोकन व्यर्थ का आहे हे जाणणं अगत्याचं आहे. कारण मनापासून मुक्ती याचा अर्थ ‘मानसिक प्रक्रियेचं समग्र आकलन’ असा आहे. मुक्त तर आपण ऑलरेडी आहोतच. मनाच्या प्रक्रियेमुळे आपण बंधनात असल्याचा भास होतोय आणि म्हणून मनाची प्रक्रिया जाणणं उपयोगी आहे.

मन हा बायो-कंप्युटर आहे. जशी कंप्युटरची सर्व रेकॉर्डिंग्ज एकमेकांशी हेड आणि टेल अ‍ॅड्रेसेसनं जोडलेली असतात तशी आपल्या स्मृतीतली सर्व रेकॉर्डिंग्ज एकमेकांशी निगडित असतात. पण कंप्युटरमधला डेटा निर्वैयक्तिक असल्यानं तो सर्वांसाठी एकाच सलग पद्धतीनं रिट्राइव होतो आणि मन हा प्रत्येकाचा व्यक्तिगत बायो-कंप्युटर असल्यानं कुणाची स्मृती कशी सक्रिय होईल आणि त्याला किती दूर नेईल ते सांगता येत नाही.

मन सक्रिय झाल्याबरोबर आपण स्मृती चक्रात अडकून अनेकानेक गतकालीन प्रसंगातून आणि अनुभवातून फिरायला लागतो. हे इतक्या वेगानं घडतं की सुरुवात नक्की कुठून झाली हे लाखातला एखादाच जाणू शकतो.

मनाचं अवलोकन करताना आपण डोळे मिटून शांत बसलेलो असतो आणि या स्मृतीच्या चलत-चित्रपटात इतके गुंतून जातो की अवलोकन कशासाठी करतोय हेच लक्षात राहत नाही. मग मधून केव्हा तरी आपण कुठेही गेलेलो नाही, जागेवरच बसलो आहोत याचं भान येतं. मग थोडा वेळ शांत वाटतं. त्यानंतर कोणत्या तरी संवेदनेनं पुन्हा स्मृती सक्रिय होते मग पुन्हा आपण भोवर्‍यात सापडतो आणि या कामात बर्‍याच वेळा झोप लागून जाते. जाग आली की झक मारली आणि वेळ घालवला असं वाटायला लागतं. पण इतक्या थोर लोकांनी सांगितलेली साधना व्यर्थ कशी असेल म्हणून लोक रोजरोज ध्यान करत राहतात. त्यांना ज्याम कंटाळा येतो, यांच्या साधनेमुळे बर्‍याच वेळा घरचे वैतागतात (कारण साधनाकालात घरात शांतता लागते) पण सांगणार कुणाला? . शेवटी ते गुरुंना विचारतात आणि गुरू सांगतात ‘साधना कमी पडते आहे, जास्त वेळ बसत चला’. अशी साधना जन्मभर केली तरी काही उपयोग होत नाही कारण साधकाला मनापासून मुक्ती मिळत नाही.

मनाचं अवलोकन करायचा प्रश्न नसून त्याची चक्राकार गती जाणणं महत्त्वाचंय. म्हणजे ‘पहिला विचार कुठून सुरू झाला’ हे विचार मालिका सुरू असताना ‘कुठे तरी मध्ये थांबून बॅक ट्रॅक करणं’ ही खरी प्रोसेस आहे.

ज्या क्षणी आपल्याला ‘विचार चालू आहेत’ हे कळतं त्या क्षणी आपण मनापासून वेगळे झालेलो असतो. हा कालावधी अत्यंत अल्प असतो. या अत्यल्प कालावधीत शेवटच्या विचारापासून बॅक ट्रॅक करत पहिल्या विचारा पर्यंत येणं हा मनाची प्रक्रिया जाणण्याचं एकमेव मार्ग आहे.

हे काम अत्यंत कौशल्याचं आहे पण आता तुम्हाला प्रक्रिया कळल्यानं ते नुसतं सोपंच नाही तर अत्यंत इंटरेस्टिंग झालंय. ज्या क्षणी तुम्ही पहिला विचार जाणाल त्या क्षणी तुम्हाला कोणत्या संवेदनेनं तुमचा पहिला विचार निर्माण झाला ते कळेल. आणि मी संवेदना ही मनाची कारक आहे असं का म्हटलंय ते लक्षात येईल.

जेव्हा तुम्हाला मनाची ही समग्र प्रक्रिया समजेल तेव्हा तुमच्या वैचारिक आवर्तनांचा कालावधी कमीकमी होऊ लागेल. तुम्ही पुन्हापुन्हा वर्तमानात येऊ लागाल. मनाच्या एका महत्त्वाच्या दालनावर तुमची हुकुमत चालायला लागेल. मनाच्या अनेक प्रभागांपैकी एका व्यापक प्रभागापासनं तुम्ही मुक्ती अनुभवाल. निरंतर चालू असलेल्या वैचारिक कोलाहलातून बाहेर आल्यानं तुमच्या जीवनात शांतता येईल.

________________________________

‘रुणुझुणू रुणुझुणू रे भ्रमरा’ असं मनाचं अत्यंत कलात्मक वर्णन करणार्‍या काव्यपंक्तीचं श्रेय अर्थात संत ज्ञानेश्वर महाराजांना विनम्र अर्पण
________________________

पूर्वप्रकाशन : मनोगत

धर्मप्रकटन

प्रतिक्रिया

संजय क्षीरसागर's picture

27 Jun 2013 - 3:21 pm | संजय क्षीरसागर

>हा एकच मार्ग कोणता असावा हे निवडण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे
= मी कुठे म्हणतोय माझ्या मार्गावर चला?
>इतर मार्गांना व्यर्थ ठरवून आपलाच मार्ग बरोबर आहे असे सिद्ध करण्याची गरज वाटत असेल तर ते मानसिक असुरक्षिततेचे लक्षण आहे.
= नेमकं विरूद्ध लिहीलंय. तुम्ही प्रतिसाद वाचले असतील तर ज्यांना स्वत:चा मार्ग चुकला असं वाटतंय ते व्यक्तिगत प्रतिसाद देतायंत.
>संतांनी केवळ अभंग लिहून ठेवले म्हणून ते श्रेष्ठ ठरत नाहीत...वगैरे
= प्रत्येकाचा तो जीवंत असताना उपहास केला गेला आहे आणि नंतर गोडवे गायले गेलेत याची दखल घ्यावी.
>वरील प्रतिसादात प्रतिवाद हा शब्द वापरला आहे....वगैरे
= चर्चेचा अर्थ वैचारिक देवाणघेवाण. तुम्हाला बळजबरी का वाटतेय? मी सुरूवातीलाच म्हटलंय, पटत नसेल तर तुमचा मार्ग अनुसरा.
>आपल्याला अंतिम सत्याचे ज्ञान झाले...वगैरे
= ज्याला अंतिम ज्ञान झालं त्याला ‘दोष नव्हताच, गैरसमज होता’ हे लक्षात येतं. तो कुणालाही दोषी ठरवत नाही याची तुम्हाला कल्पना दिसत नाही. एखादी नवी प्रणाली मांडताना, जुनी निरुपयोगी आहे असं म्हणणं म्हणजे व्यक्तिगत दोषारोप नाही.
>द्वैत हे मार्गांत नसून दृष्टीमध्ये असते. ज्यांच्या दृष्टीतच अद्वैत आहे त्यांना मार्ग अनंत असले तरी त्यांत भेद दिसत नाही.
= साधी गोष्ट आहे : तुमच्याकडे अद्वैतदृष्टी असेल तर तुम्ही ‘नामसाधना किंवा मनाचं अवलोकन’ मनाचा उलगडा करायला कसं समर्थ आहे ते सांगा. उगीच गोलमाल प्रतिसाद देऊन काही उपयोग नाही.

अवतार's picture

30 Jun 2013 - 9:19 pm | अवतार

मी कुठे म्हणतोय माझ्या मार्गावर चला?

आजवर कोट्यवधी लोकांनी ही साधना केली असेल पण ती अत्यंत निरर्थक, कंटाळवाणी आणि व्यर्थ आहे. भक्तिमार्गात ‘नाम साधना’ हा सर्वोत्तम मार्ग मानला गेला आहे पण तो तर त्याही पेक्षा व्यर्थ आहे.

इतरांच्या मार्गांना आधीच व्यर्थ, निरर्थक आणि कंटाळवाणे ठरवल्यावर आणखी कुठला पर्याय तुंम्ही त्यांच्यासमोर शिल्लक ठेवला आहे?

प्रत्येकाचा तो जीवंत असताना उपहास केला गेला आहे..

प्रत्येकाला त्यांच्या हयातीत बरेच अनुयायी देखील मिळाले आहेत. ते अनुयायी निव्वळ उपदेश ऐकून नव्हे तर त्या महनीय विभूतींचे आचरण बघून प्रभावित झाले होते.

पटत नसेल तर तुमचा मार्ग अनुसरा.

इतरांच्या मार्गांना व्यर्थ निरर्थक आणि कंटाळवाणे ठरवण्याआधी हाच विचार तुम्हाला का बरे सुचला नाही? जे मार्ग तुम्हाला व्यर्थ वाटतात त्या मार्गांचा अवलंब करून कोणालाही अंतिम सत्याची अनुभूती आलेलीच नाही असे ठाम विधान तुम्ही करू शकता काय?

ज्याला अंतिम ज्ञान झालं त्याला ‘दोष नव्हताच, गैरसमज होता’ हे लक्षात येतं. तो कुणालाही दोषी ठरवत नाही..

मी फक्त दोन प्रचलित साधना पद्धतींचे दोष सविस्तर दाखवून दिले आहेत..

हे तुमचेच विधान आहे. जुनी प्रणाली दोषपूर्ण ठरवणे म्हणजे ज्यांनी ती प्रणाली शोधून काढली त्यांच्यावर व्यक्तिगत आरोप केल्यासारखेच आहे. याचा अर्थ तुम्हाला अंतिम सत्याचे ज्ञान झालेले नाही असा होऊ शकतो.

तुमच्याकडे अद्वैतदृष्टी असेल तर..

अध्यात्म हा अनुभूतीचा विषय आहे, तर्काचा नाही. ही अनुभूती मिळवण्याचे विविध मार्ग हजारो वर्षांच्या परंपरेतून निर्माण झालेले आहेत. स्वामी विवेकानंद यांना देखील प्रथम निराकाराची साधना सर्वश्रेष्ठ असून मूर्तीपूजा व्यर्थ आहे असेच वाटत असे. त्यावर रामकृष्ण परमहंस यांनी तार्किक युक्तिवाद न करता त्यांना कालीमातेच्या मंदिरात नेउन प्रत्यक्ष अनुभव दिला. त्यानंतर विवेकानंदांनी कधीही मूर्तीपूजेचा विरोध केला नाही.
आपलाच मार्ग बरोबर आहे आणि इतर मार्ग निरुपयोगी आहेत हे तर्काच्या आधारे सिद्ध करण्याची गरज वाटत असेल तर अंतिम सत्याचे ज्ञान झालेले महात्मे आणि नुसतेच शब्दपंडित यांच्यात फरक तो काय राहिला?

अर्धवटराव's picture

27 Jun 2013 - 8:21 am | अर्धवटराव

आत्मस्तुती हा एक अभिनव मार्ग या लेखामुळे, चर्चेमुळे सामोरा आला... हे ही नसे थोडके.

अर्धवटराव

Dhananjay Borgaonkar's picture

27 Jun 2013 - 10:23 am | Dhananjay Borgaonkar

_/\_

लाल झग्याचा अर्थ मला आताशा कळायला लागलाय.

कवितानागेश's picture

27 Jun 2013 - 11:30 am | कवितानागेश

< न्या. रा मोड. ऑन > बरें कां अंर्धवट्रांव, जगात मोठें व्ह्यायचे असेल तर ट्रोलिंगचे ज्ञान मिळवल्याशिवाय काही शक्य नाही बरें! < न्या. रा. मोड ऑफ >

या प्रतिसादातील वैयक्तीत सूर पटला नाही.

"प्राचिन ऋषीमुनींनी आणि संतांनी पेटवलेल्या ज्ञानरूपी मशालीच्या प्रकाशाकणांच्या सहाय्याने आजकालच्या अप्राचिन काळातील बाबाबुवांचे अनुयायी एन्लाईटमेंटच्या मृगजळात गळ टाकून मासेमारी करत आहेत"

असा काहीसा सूर वाटतो आहे.

कवितानागेश's picture

27 Jun 2013 - 6:47 pm | कवितानागेश

आता मात्र तुम्ही फाटे फोडताय मोदकराव.
ना तुम्हाला प्राचीन ऋषीमुनी माहित, ना प्रकाशाचे नियम कळतात ना मासेमारी करता येत.
नुसतं धन जमवायचं कळतं..
अश्यानी चर्चेचे किती नुकसान होतय.

मोदक's picture

27 Jun 2013 - 7:47 pm | मोदक

चर्चा..????

बॉर बॉर.. तुमचे चालूद्या.

ना तुम्हाला प्राचीन ऋषीमुनी माहित, ना प्रकाशाचे नियम कळतात ना मासेमारी करता येत.
नुसतं धन जमवायचं कळतं..

हा साक्षात्कार कोणत्या झाडाखाली झाला..?

कवितानागेश's picture

27 Jun 2013 - 7:56 pm | कवितानागेश

जगात वावरणे फार सोपे असते. काही साध्या प्रक्रिया समजून घेतल्या तर तुम्हाला सतराशे साठ पंखे मिळू शकतात.
आता पहा.
मी म्हणणार, 'धावण्याच्या स्पर्धेत माझाच पहिला नंबर. मिल्खासिन्गला तर नुसते धावायचे शिकायला कितितरी वर्षे लागली. माझा तर दुसरी ब मध्ये असतानाच पहिला नंबर आलय.'
यावर अर्धवटराव चकित होउन मला सांगायला येणार. 'अगं, माउ, तुझं वजन पाहिलयस का कधी? अशी कशी पहिली येशील? तो ब्याट्म्यान बघ किती जोरात पळतो. चल रेस लावुयात.'
मी: त्या ब्याटम्यानाला उगीच मध्ये आणू नकोस. मला तुझं सांग.
सांग बरं पळताना तू शेवटचा पाय कुठला टाकतोस?
अर्धू: क्क्याय्य???
मी: तुला पळण्यातलं काहीही कळत नाही. माझाच नंबर पहिला.
मी दुसरी ब मध्ये असतानाच पहिली आलेय. त्यावेळेस मिळालेल्या प्लास्टिकच्या ग्लासातूनच मी रोज पाणी पिते, हे त्याच पहिल्या नंबराचे द्योतक आहे'.
अर्धू: अगं, पण उपयोग काय त्या पहिल्या नंबराचा? तुला रोजचे काळ, काम वेगाचे गणित जमतय का त्या नम्बरानी?
मी: माझाच गणितात पहिला नंबर. मला शून्यापासून सगळे आकडे महितीयेत.
अर्धू: बरं, चल. मला सांग (x+y) * (x-y) कसे सोडवशील?
मी: याचा गणिताशी काय संबंध? x आणि y सारखे निरर्थक शब्द वापरुन तुझा गणितातला भोंगळपणाच दिसून येतोय.
अर्धू: अगं माउ, सगळं गणित abstractच आहे.
मी: तू निखालस चुकीचे शिकला आहेस. तुझ्या शिक्षकांच्या विद्वत्तेबद्दल वाद नाही. पण तुला गणितातला शून्यसुद्धा माहित नाही. मीच गणितात पहिली.
इथे बाण बरोबर बसतो.
अर्धवटराव गणित आवडीच विषय असल्यानी इमोशनल बनतो.
अर्धू ( कळवळून): अगं माउ, तुझे आणि माझे शिक्षक एकच आहेत. गणित हे नेहमीच abstract असतं. म्हणूनच आपण त्याचा साचा वापरुन ते सगळीकडे नेमक्या values घालून वापरु शकतो.
इथे मदनबाण पण कळवळून धावत येइल अणि युट्युबेतल्या बेसिक गणित शिकवणार्‍या पन्नसेक लिन्का दयाळूपणे अडकवून जाईल.
आता खरी मजा सुरु.
मी: पण तुम्हाला शून्याबद्दल काही माहित नाही. मला गणितातले शून्य येते!
अर्धू: पण त्याचा उपयोग काय? ( पुन्हा कळवळून) त्या शून्यातून रोजचे गणित कसं काय जमायचं?
मी: माझाच पहिला नंबर आहे. माझ्याकडे शून्य आहे. शून्यामुळे माझ्या प्रत्येक शब्दाला गोलाकार प्राप्त झाला आहे.
अर्धू: त्यानी काय होतं?
मी: गोलाकार शब्दामुळे त्यातील आवर्तने जाणवत नाहीत.
अर्धू (डोकेदुखीनी हैराण): पण याचा गणिताशी आणि धावण्याशी काय संबंध??????
मी: तसेही माझे गणित आणि माझे धावणं तुझ्यासारख्या पुस्तके भरभरुन शिकलेल्य पूरवग्रहदूषित लोकांसाठी नाहीच मुळी.
पुन्हा मीच: तुला धावण्याचे बेसिक्स माहित नाहीत. गणितात तर तुला काहीच गती नाही.
माझाच नंबर पहिला.
शिवाय रोज धावायचे तुझे तूच आहेस. ते तुला एकदा कळलं म्हणजे तू आपोआपच धावशील.
अर्धू: ते शून्य बाजूला राहू दे. मी तुला गणितातली बेसिक्स सांगतो...
मी: तुला बेसिक्स सांगावी लागतायत यातूनच तुझ्य गणितातला भोंगळपणा दिसून येतोय.
अर्धू (फुल्टू हुकलेला!): आता गणितात कसं काय बुवा तुझं माझं? ते तर वैश्विक आहे.
मी: तुझ्याकडे शून्य नाही, माझ्याकडे शून्य आहे. माझाच नंबर पहिला.
...
...
...
आता अर्धू आजारी पडतो!
त्यामुळे अर्थातच माझाच नंबर पहिला. धावण्यात सुद्धा आणि गणितात सुद्धा! ;)

< न्या. रानडे मोड ऑन > असेंच यां जगातलें ट्रोलिंग चांलत असतें बरें का. आतां तंरी कळंले का तुम्हास अर्धंवट्राव? < न्या. रानडॅ मोड ऑफ >

रामपुरी's picture

27 Jun 2013 - 8:15 pm | रामपुरी

खतरनाक... ह ह पु वा
फक्त मध्ये मध्ये अजून थोडे हुकुमत, पराभूत, हल्ले इत्यादी शब्द यायला पाहीजे होते. 'म' ची बाराखडी सुद्धा वाढवली असती तरी चालले असते. जसे "मी अमुकतमुक करतो. तसे तुम्हाला जमणार नाही. पण तुम्ही पुन्हा प्रयत्न करा. आत्ता इथेच ताबडतोब करा. जमले नाही तर माझा लेख पुन्हा पुन्हा वाचा. मी काय म्हणातोय ते तुम्हाला लगेच समजून येईल. सोपंय ते." वगैरे वगैरे

अर्धवटराव's picture

30 Jun 2013 - 11:57 pm | अर्धवटराव

अगं पण माझ्या काहि कळण्याचा आणि शुण्याच्या धावण्याचा काय संबंध =))

अर्धवटराव

कवितानागेश's picture

1 Jul 2013 - 12:04 am | कवितानागेश

हा प्रतिसाद पूर्णपणे चुकलेला आहे. =))

माणूस हुकण्यापेक्षा प्रतिसाद चुकणं बरं! ;)

एकूण काय, पहिल्या धाग्यावरचीच गुणगुण थांबत नाहीये, तर पुढचे धागे येणार तरी कधी?

पुढील भागाच्या प्रतिक्षेत...

प्यारे१'s picture

3 Jul 2013 - 12:49 am | प्यारे१

हा संपला?

मन म्हंजे तरी काय ज्याला मरण नसलेल म्हंजे आत्मा. तो अमर असतो अशी आपल्या हिंदु मध्ये मान्यता आहे.
मनाच अवलोकन म्हंजे आत्माच अवलोकन तो सापडण्याच्या रीती वेगवेगळ्या असु शकतात पण १००% तो सापडण्याचा प्रयत्न करणे आवश्यक असते.

संजय क्षीरसागर's picture

6 Jul 2013 - 3:26 pm | संजय क्षीरसागर

पुढचे प्रतिसाद दोन नंबरच्या लेखावर द्यावे किंवा व्यनि करावा.

>मन म्हंजे तरी काय ज्याला मरण नसलेल म्हंजे आत्मा.

= मन म्हणजे मेंटल अ‍ॅक्टीविटी. आत्मा म्हणजे आपण स्वतः

>मनाच अवलोकन म्हंजे आत्माच अवलोकन तो सापडण्याच्या रीती वेगवेगळ्या असु शकतात

> मन थांबलं की आपण स्वतःलाच शोधत होतो हे लक्षात येतं

जेम्स बॉन्ड ००७'s picture

23 May 2014 - 4:48 pm | जेम्स बॉन्ड ००७

खुप इंटरेस्टिंग आहे

ज्या क्षणी आपल्याला ‘विचार चालू आहेत’ हे कळतं त्या क्षणी आपण मनापासून वेगळे झालेलो असतो. हा कालावधी अत्यंत अल्प असतो. या अत्यल्प कालावधीत शेवटच्या विचारापासून बॅक ट्रॅक करत पहिल्या विचारा पर्यंत येणं हा मनाची प्रक्रिया जाणण्याचं एकमेव मार्ग आहे

हे तर जबरदस्तच..

बॅटमॅन's picture

23 May 2014 - 4:51 pm | बॅटमॅन

हे धत्तड तत्तड *yahoo*

सर्जिंका ग्यान देखो
जे जगतो ते लिखाण देखो
उनकी ये मजाल देखो ओ ओ ओ
प्रतिसादांची धमाल देखो
आंव देखो ना तांव देखो
उनका सिर्फ कमाल देखो।...........

हे धत्तड तत्तड तत्तड तत्तड तत्तड तत्तड तत्तड

पिलीयन रायडर's picture

23 May 2014 - 4:52 pm | पिलीयन रायडर

प्लिझ नको हो... खरंच..

जेम्स बॉन्ड ००७'s picture

23 May 2014 - 4:56 pm | जेम्स बॉन्ड ००७

शेवटच्या विचारापासून बॅक ट्रॅक करत पहिल्या विचारा पर्यंत येणं हा मनाची प्रक्रिया जाणण्याचं एकमेव मार्ग आहे.

हे कोणी ट्राय केलं आहे का? खरंच विचारतोय.

पिलीयन रायडर's picture

23 May 2014 - 5:03 pm | पिलीयन रायडर

हो.. मी केलय ना.. बर्‍याचदा विचारांची लिंक अचानक तुटली तर आपण नक्की काय विचार करत होतो हे आठवायला असं अनेकदा केलय मी.. पण..

हा "मनाची प्रक्रिया जाणण्याचं एकमेव मार्ग "का" आहे" ते मला माहित नाही आणि त्यासाठि मी हे लेख वाचु शकत नाही हे नक्की..

जेम्स बॉन्ड ००७'s picture

24 May 2014 - 12:32 pm | जेम्स बॉन्ड ००७

बर्‍याचदा विचारांची लिंक अचानक तुटली तर आपण नक्की काय विचार करत होतो हे आठवायला असं अनेकदा केलय मी..

त्यामुळेच या बर्‍याच वेळेला अजाणतेपणी केल्या जाणार्‍या क्रियेत एवढं काही महत्त्वाचं असेल हे वाचुन थोडं विचित्रच वाटलं होतं, पण नंतर यातलं लॉजिक तरी पटतंय. प्रत्यक्ष करुन बघेन.

हा "मनाची प्रक्रिया जाणण्याचं एकमेव मार्ग "का" आहे" ते मला माहित नाही

अर्थातच हे प्रत्येकाचं वैयक्तिक मत आहे. पण लेखात सांगितलेल्या ध्यान आणि नामस्मरण यापैकी नामस्मरणाचा मला फार काही फायदा झाला नाही, म्हणजे त्यामागचं लॉजिकच पटत नाही. पण अर्थात हे माझं व्यक्तिगत मत. आणि त्यामागचं रिझनिंग मी कोणाला शब्दात समजावुही शकत नाही.

विचारांची लिंक तुटल्यावर `शेवटच्या विचारापूर्वी कोणता विचार होता' याचा शोध घेणं आणि पुन्हा विचार करायला लागणं अशी प्रोसेस नाहीये.

सांप्रत विचारापासून पहिल्या विचारापर्यंत जाऊन तो कोणत्या जाणीवेनं अ‍ॅक्टीवेट झाला हे समजणं मनाची क्रिया उलगडत नेतं. मग जाणीवेशी सतर्क राहून तुम्ही कायम स्वतःशी कनेक्टेड राहू शकता. हा स्वतःशी संपर्क शांतता आहे. मनाची रुणझुण थांबण्याचा सहज मार्ग आहे.

आय विल टेक यू टू अ डीपर डायमेन्शन. भाषा शिकायला लागते, शांतता शिकता येत नाही. इट इज ऑलरेडी देअर! शांतता हा आपला स्वभाव आहे, भाषा हे संपर्काचं माध्यम आहे. स्वतःशी एकरुप व्ह्यायला ध्वनी किंवा भाषेची गरजच नाही. तस्मात नामस्मरण व्यर्थ आहे. तुम्ही समग्रतेनं बॅक-ट्रॅक प्रक्रिया केलीत तर विचारपूर्व शांतीपाशी येता. तेच आपलं स्वरुप आहे त्यामुळे तुम्ही मनाच्या कोलाहलातून मुक्त होता.

ही कला एकदा साधली की मनाची प्रकिया तुमच्या काह्यात येते. मन तुम्हाला सैरभैर करु शकत नाही.

संजय क्षीरसागर's picture

23 May 2014 - 7:16 pm | संजय क्षीरसागर

"शेवटच्या विचारापासून बॅक ट्रॅक करत पहिल्या विचारापर्यंत येणं हा मनाची प्रक्रिया जाणण्याचं एकमेव मार्ग आहे."

ही सध्या प्रचलित असलेल्या कोणत्याही प्रणाली पेक्षा सर्वात शास्रशुद्ध आणि निर्धोक आहे. जितके तुम्ही पहिल्या विचारापर्यंत येऊ शकाल तितकी जाणीव प्रगल्भ होत जाईल. You will come to know how mental activity starts and how the mind works.

हे कुणीही ट्राय केलेलं नाही ते प्रतिसाद वाचून लक्षात आलं असेल. तुमचाच अनुभव तुम्हाला आत्मविश्वास देईल.

जेम्स बॉन्ड ००७'s picture

24 May 2014 - 12:40 pm | जेम्स बॉन्ड ००७

ही सध्या प्रचलित असलेल्या कोणत्याही प्रणाली पेक्षा सर्वात शास्रशुद्ध आणि निर्धोक आहे

यामागचं लॉजिक तरी पटतंय. अनुभव घेउन सांगेनच. वर पिलीयन रायडर यांना दिलेल्या प्रतिसादात मी म्हटलंय कि

त्यामुळेच या बर्‍याच वेळेला अजाणतेपणी केल्या जाणार्‍या क्रियेत एवढं काही महत्त्वाचं असेल हे वाचुन थोडं विचित्रच वाटलं होतं

बर्‍याच वेळेला हि बॅक ट्रॅक ची प्रोसेस चालु असते पण आता त्याकडे लक्ष देईन मुद्दाम.

असो, या लेखाचे पुढचे भाग वाचुन त्यावर प्रतिक्रिया देईनच.

हे गुर्‍हाळ पुन्हा चालू झालं का?

चान चान.

संजय क्षीरसागर's picture

24 May 2014 - 10:19 am | संजय क्षीरसागर

वर प्रतिसाद देणार्‍या एकालाही विषयाचं गम्य नाही. प्रत्येकाची लेखनिक कारकिर्द पाहिली तर एकूण वैचारिक आवाका लक्षात येतो. पण छपरी प्रतिसाद देण्यात अहमिका मात्र पाहण्यासारखी आहे.

संजय क्षीरसागर's picture

24 May 2014 - 11:15 am | संजय क्षीरसागर

खुप इंटरेस्टिंग आहे

ज्या क्षणी आपल्याला ‘विचार चालू आहेत’ हे कळतं त्या क्षणी आपण मनापासून वेगळे झालेलो असतो. हा कालावधी अत्यंत अल्प असतो. या अत्यल्प कालावधीत शेवटच्या विचारापासून बॅक ट्रॅक करत पहिल्या विचारा पर्यंत येणं हा मनाची प्रक्रिया जाणण्याचं एकमेव मार्ग आहे

हे तर जबरदस्तच..

कुणाला काही चांगलं वाटलं, नवं वाटलं, प्रयत्न करुन पाहावासा वाटला आणि त्यानं थोडी स्तुती करायचा अवकाश... की झाली जळजळ सुरु!