येडचाप नीतीशकुमार उर्फ जे डी यू

चौकटराजा's picture
चौकटराजा in काथ्याकूट
16 Jun 2013 - 6:07 pm
गाभा: 

आपण 'लास्ट रिसोर्टऑफ स्काऊंड्रल्स ' च्या भानगडीत पडायचे नाही. उमेदवार पसंत नसला तर मतदानाचा हक्कच बजावायचा नाही हे म्या पक्के ठरवूनशान टा़कले आहे. पण मधेच घोटाळा झाला. मनोहर जोशी सर तिरकी मान करून म्हणाले आपल्या देशाची वाटचाल हळू हळू अराजकते कडे चालू आहे आणि आपले कलाम साहेब तर २०२० साली आपण जागतिक महासत्ता होणार असे म्हणत होते. त्यांच्या सुरात आपले परमपूज्य अर्थज्ञ नरेंद्र जाधव हेही आपला सूर मिसळत होते. असो . आमच्या मते घोटाळा यानी भारताला समजण्यात केलेला नाही .आम्हाला राजकारंणाच्या चर्चेच्या चर्‍हाटात ओढण्याचे खरे काम नीतिशकुमार या आमच्या मते येडचाप असलेल्या माणसाने केलेय.खरे खोटे देव जाणे पण एका चानल ने असे म्हटले आहे की नीतीशबाबूनी एक मुलाखत दिली त्यात पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी नसतील अशी ग्वाही द्या तर भाजपबरोबर रहातो अशी अट टाकली आहे म्हणे. आता आपल्याला सगळ्याना माहीत आहे की आपल्या लोकशाहीत जर अरूण गवळी निवडून येऊ शकतात तर त्यावेळी त्यांची निवड रद्द व्हावी म्हणून नीतीमान नीतीशकुमारानी जनहित याचिका का दाखल केली नाही ?१६२ खासदारांवर गुन्हेगारीच्या केसेस असताना ते कसे याना चालते ? ज्या अर्थी नरेंद्र मोदी अजून त्या १६२ खासदारांसारखेच तुरुंगाबाहेर आहेत त्याअर्थी ते लोकसभेत येऊन काही भूमिका बजविण्यास पात्र नाहीत असे नाही का? की असेच आहे ?

भारतीय घटनेचा उदोउदो करणार्‍यानी एक गोष्ट ध्यानात घेतली पहिजे की पंतप्रधान या पदावर बसवायची व्यक्ति ५४३ खासदार निवडतात १२० कोटी लोक नव्हे.त्या पदासाठीची निवडणूक ही प्रत्यक्ष होतच नाही. सबब लोकसभा अस्तित्वात आल्याखेरीज त्या पदाचा विचारच होउ शकत नाही. खरे तर २७३ वा खासदारच ( चुकभूल देणे घेणे या आकड्याबद्द्ल) या देशाचा पंतप्रधान ठरवू शकतो.

आम्हीही स्वतः ला समाजवादी विचाराचे समजतो. पण १९७७ चा इतिहास आठवला की हे समाजवादी कसे नुसते भांडकुदळ पणा करून तुला ना मला घाल सत्ता कुत्र्याला अशा चालीचे आहेत हे आताही आठवते आहे. आता हे सारे नरेंद्र मोदीना वाळीत टाकल्यासारखे भाषा करीत आहेत. त्यांच्या खर्‍या वा आभासी विकासाला भुलून जर तरूणानी स्त्रॅटेजिक मतदान केले व नरेंद्र मोदी गवळी सारखेच निवडून आले तर मग कलहप्रिय समाजवाद्यांचे काय म्हणणे असणार आहे ? आपल्या घटनेने राष्ट्रपति व प्रधान मंत्री या दोन्ही पदांपैकी एकाची तरी निवड थेट जनतेतून करण्याचा द्रष्टेपणा दाखविला असता तर ? तुम्ही पाच वर्षातून एकदा मतदान करा व हातावर हात ठेवून व मूग गिळून बसा हाच घटनेचा आपल्याला शुभ संदेश आहे असे आपण म्हणायचे का ?

प्रतिक्रिया

नितिन थत्ते's picture

16 Jun 2013 - 9:39 pm | नितिन थत्ते

>>नीतीशबाबूनी एक मुलाखत दिली त्यात पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी नसतील अशी ग्वाही द्या तर भाजपबरोबर रहातो अशी अट टाकली आहे म्हणे. आता आपल्याला सगळ्याना माहीत आहे की आपल्या लोकशाहीत जर अरूण गवळी निवडून येऊ शकतात तर त्यावेळी त्यांची निवड रद्द व्हावी म्हणून नीतीमान नीतीशकुमारानी जनहित याचिका का दाखल केली नाही ?१६२ खासदारांवर गुन्हेगारीच्या केसेस असताना ते कसे याना चालते ? ज्या अर्थी नरेंद्र मोदी अजून त्या १६२ खासदारांसारखेच तुरुंगाबाहेर आहेत त्याअर्थी ते लोकसभेत येऊन काही भूमिका बजविण्यास पात्र नाहीत असे नाही का? की असेच आहे ?

नरेंद्र मोदी "गुन्हेगार आहेत म्हणून पंतप्रधानपदी नकोत" असं नीतिशकुमार यांनी म्हटलं होतं का? तसं म्हटलं नसेल तर पुढच्या गवळी, १६२ खासदार, नीतिमान, जनहित याचिका या सर्वाचा इथे काय संबंध असा प्रश्न पडला.

आशु जोग's picture

17 Jun 2013 - 12:24 am | आशु जोग

काहीतरी लिहायला गेलेत आणि काहीतरी लिहिलं गेलय.
बादवे
परमपूज्य अर्थज्ञ नरेंद्र जाधव...
जाधवांचा इथे काहीच संबंध नाही. विषय नितीशकुमार यांचा आहे. आंबेडकरजयन्तीच्या धाग्यावरही काही जातीच्या आय मीन कॅटेगरीच्या लोकांनी उगाचच विरोध दर्शवला होता. इथे तर ओढून ताणून...

प्रसाद गोडबोले's picture

17 Jun 2013 - 1:55 am | प्रसाद गोडबोले

नितीश असो कि मोदी असो .... निवडुन राहुलजींच येणार आहेत ....बोला लावता का पैज ?

राहुलजीं शपथ घेत आहेत अन सोनियामैयांच्या डोळ्यातन कृतार्थतेने अश्रु ओघळत आहेत ...अहाहा ...कधी एकदा तो सुदिन पाहतोय असं झालय =))

विकास's picture

20 Jun 2013 - 1:54 am | विकास

निवडुन राहुलजींच येणार आहेत ...

सध्या नमो विरुद्ध नमु असे म्हणले जाते... (नरेन्द्र मोदी विरुद्ध नन्हा मुन्ना)

बाकी काँग्रेससंदेश या माहितीपूर्ण संस्थळावर असाच फिरत फिरत गेलो होतो. ;) तेथे काँग्रेस च्या माननीय उपाध्यक्षांच्या छायाचित्रातील संदेश हे माहितीपत्रकही दिसले. त्या खालीच "ECONOMIC GROWTH - THE CONGRESS AGENDA" नावाचा दुवा दिसला. उत्सुकतेने टिचकी मारली तर काय!

NaMu

तर्री's picture

17 Jun 2013 - 9:25 am | तर्री

पण १९७७ चा इतिहास आठवला की हे समाजवादी कसे नुसते भांडकुदळ पणा करून तुला ना मला घाल सत्ता कुत्र्याला अशा चालीचे आहेत हे आताही आठवते आहे. वाह ! स"माज"वाद्यांचा बिहार / यु.पी वगळता झालेला सर्वनाश हे भारतीय लोकशाहीला लाभलेले लेणे आहे !

त्यांच्या खर्‍या वा आभासी विकासाला भुलून जर तरूणानी स्त्रॅटेजिक मतदान केले व नरेंद्र मोदी गवळी सारखेच निवडून आले तर मग कलहप्रिय समाजवाद्यांचे काय म्हणणे असणार आहे ?
एकाच वाक्यात असत्य कथन , अतिशयोक्ती , कल्पनाविलास , उपमा , तुलना आणि राम्शास्त्रीपणा वाचून मन भरून आले आहे !

जरा गण्या-गीण्याचे लिहा हो चौ रा साहेब ! हे राजकारण जावू दे **** *** !

चौकटराजा's picture

20 Jun 2013 - 6:23 pm | चौकटराजा

एकाच वाक्यात असत्य कथन , अतिशयोक्ती , कल्पनाविलास , उपमा , तुलना आणि राम्शास्त्रीपणा वाचून मन भरून आले आहे !
हे खरेंच की आम्ही लिहिलेले वाक्य मनमोहन देसाईंचा पिच्चरच्या स्टोरी सारखे वाटतेय !

रमेश आठवले's picture

18 Jun 2013 - 4:51 pm | रमेश आठवले

कर्नाटकात फक्त भा ज पा चे सरकार येण्याआधी देवेगौडा यांचे जनता दल व भा ज पा चे संयुक्त सरकार होते. ते सरकार येण्याच्या वेळी पहिली अडीच वर्षे देवेगौडा जनता दलाचा मुख्यमंत्री असेल आणि नन्तरच्या अडीच वर्षासाठी भा ज पा चा मुख्यमंत्री असेल असा करार झाला होता. परंतु स्वताची अडीच वर्षे झाल्यावर देवेगौडा पार्टीने करार पाळला नाही आणि सरकार पडले. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत भा ज पा चे सरकार सत्तेवर आले.
नितीशकुमार यांनी असेच काहीसे केले आहे. त्याचा परिणाम बिहार विधानसभेच्या पुढच्या निवडणुकीवर काय होतो ते कळेलच. इतिहासाची पुनरावृत्ती होते असे म्हणतात.

ऋषिकेश's picture

20 Jun 2013 - 10:05 am | ऋषिकेश

पण मग झारखंडचे काय?

श्रीगुरुजी's picture

20 Jun 2013 - 3:54 pm | श्रीगुरुजी

>>> कर्नाटकात फक्त भा ज पा चे सरकार येण्याआधी देवेगौडा यांचे जनता दल व भा ज पा चे संयुक्त सरकार होते. ते सरकार येण्याच्या वेळी पहिली अडीच वर्षे देवेगौडा जनता दलाचा मुख्यमंत्री असेल आणि नन्तरच्या अडीच वर्षासाठी भा ज पा चा मुख्यमंत्री असेल असा करार झाला होता.

एक दुरूस्ती. कर्नाटकमध्ये मे २००४ मध्ये लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्र झाल्या होत्या. त्यात एकूण २२४ पैकी भाजप - ८०, काँग्रेस - ६५ व निधर्मी जनता दल (देवेगौडा) - ५६ अशी परिस्थिती होती. कोणालाच बहुमत नव्हते. अशा वेळी देवेगौडाने आपले पत्ते नीट खेळले असते तर निजदचा मुख्यमंत्री झाला असता. पण निकाल लागल्याक्षणीच आपला पक्ष जातीयवादी भाजपला पाठिंबा देणार नाही असे जाहीर करून देवेगौडाने मुख्यमंत्रीपदाचे दरवाजे आपल्या पक्षासाठी बंद करून घेतले.

त्यामुळे शेवटी निजदच्या पाठिंब्याने काँग्रेसने संयुक्त सरकार स्थापन करून मुख्यमंत्रीपदी धरमसिंगला बसविले. त्यापूर्वी १९९९ ते २००४ मध्ये काँग्रेसचे एस एम कृष्णा मुख्यमंत्री होते. ते व देवेगौडा एकाच जातीचे (वोक्कलिंग) असल्याने त्यांना मुख्यमंत्रीपद देण्यास देवेगौडाचा विरोध होता. त्यामुळे कृष्णांना हटवून त्याजागी मागासवर्गीय धरमसिंगला बसविण्यात आले. उपमुख्यमंत्रीपद निजदला देण्यात आले.

त्यानंतर २० महिन्यांनी जानेवारी २००६ मध्ये भाजपने देवेगौडापुत्र कुमारसिंगच्या महत्वाकाक्षांना खतपाणी घालून निजदला काँग्रेस सरकारचा पाठिंबा काढून घ्यायला लावला व स्वत: निजदबरोबर संयुक्त सरकार स्थापन केले. त्यावेळी अशी तडजोड केली होती की उर्वरीत ४० महिन्यांपैकी पहिले २० महिने निजदचा कुमारस्वामी मुख्यमंत्री असेल व उरलेले २० महिने भाजपचा मुख्यमंत्री असेल. पण आपले २० महिने पूर्ण झाल्यावर निजदने सुरवातीला मुख्यमंत्रीपद सोडायला नकार दिला व नंतर काही काळाने अत्यंत अनिच्छेने मुख्यमंत्रीपदसोडून भाजपच्या येडप्पाना मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा दिला. पण जेमतेम ७ दिवसांनंतर पाठिंबा काढून घेऊन येडप्पाला राजीनामा द्यायला लावला व त्यामुळे मे २००८ मध्ये कर्नाटकात मुदतपूर्व निवड्णुक होऊन २२४ पैकी ११० जागा मिळवून भाजप सत्तेवर आला.

रमेश आठवले's picture

21 Jun 2013 - 10:42 am | रमेश आठवले

धन्यवाद श्रीगुरुजी.

विकास's picture

19 Jun 2013 - 7:53 pm | विकास

जगभरातील (विशेष करून लोकशाही) देशांच्या संदर्भात कायम वापरलेले वाक्य कायम सर्वच राजकारण्यांच्या बाबतीत लक्षात ठेवावे: politics makes strange bedfellows...

तेंव्हा नितिशकुमारांनी जे काही केले त्यात आश्चर्य नाही. मोदींच्या जागी अगदी वादग्रस्त नसलेली अजून कोणीही व्यक्ती असती जिच्यामुळे नितिशकुमारांचे पंतप्रधानाचे स्वप्न भंगले असते, तरी त्यांनी या ना त्या प्रकारे असेच केले असते. फक्त मला एक कळत नाही, की आता त्यांना पंतप्रधान कसे होता येणार. झालेच तर तिसरी आघाडी आली तर होऊ शकतील, ते देखील औटघटकेचे राज्यपदच...

मुख्य मुद्दा विशेष करून समाजवाद्यांच्या बाबतीत आहे, तो म्हणजे त्याच त्याच चुका परत परत करत बसणे. त्यामुळे ७७ च्या नंतरच्या काळात देखील काही शिकले गेले नाही. आइन्स्टाईनच्या नावाने एक कायम वाक्य सांगितले जाते ते आठवले... Insanity: doing the same thing over and over again and expecting different results.

असो.

ऋषिकेश's picture

20 Jun 2013 - 10:10 am | ऋषिकेश

नितीशकुमार 'हाय रिस्क हाय गेन' या प्रकाराने लढत आहेत! जर तिसर्‍या आघाडीचे सरकार आले तर मोदीत्त्वाला ठाम विरोध करणारा पहिला नेता म्हणून नितीशकुमारांच्या गळ्यात पंतप्रधानपदाची माळ पडू शकेलच.

शिवाय सध्या युपीए म्हंजे फक्त काँग्रेस+राष्ट्रवादी+नॅकॉ (बाकी काहि अगदीच छोटे पक्ष) आणि एन्डीए म्हणजे सुद्धा भाजप+शिवसेना+अकाली दल (बाकी काहि अगदीच छोटे पक्ष) उरले आहे. त्यामुळे नॉन काँग्रेस नॉन भाजपा सरकार हे अगदीच 'राईट ऑफ' करणे कदाचित आततायी ठरावे.

भाजप एक ऑपॉर्च्युनिस्ट पक्ष आहे. तसे असणे वाईट नाही मात्र भाजप जे तत्वनिष्ठतेचे मुखवटे वापरते ते ऐन वेळी गळून पडतात. ( उदा कर्नाटक / उत्तर प्रदेश ) आणि त्यांचे वेळोवेळी हसे होते.
भाजप आपण ऑपॉर्च्युनिस्ट आहोत हे कधीच कबूल करणार नाही. अर्थात ते संघाच्या हातातले खेळणे आहे हे देखील ते कधीच कबूल करणार नाहीत. पण ती वस्तुस्थिती आहे हे सर्वच जाणून आहेत.
बिहार मधे तू मारल्यासारखे कर मी ओरडल्यासारखे करतो हा खेळ लोक ओळखून आहेत्.भाजप प्रणीत आघाडीला बहुमत मिळेल या चुकीच्या समजावर त्यांचे डावपेच आखत आहेत. उद्या तिसर्‍या आघाडीला बहुमत मिळाले तर भाजपाची भुमीका काय असेल हे त्यानी आत्ताच सांगावे आनि त्यासोबतच भाजप तिसर्‍या आघाडीच्या कोणत्या नेत्याला पंतप्रधान म्हणून मान्यता देईल ते सांगावे. अर्थात जिथे देवेगौडा पम्तप्रधान होऊ शकतात. गणपती दूध पिउ शकतो त्या देशात कोणताही चमत्कार होउ शकतो. कदाचित मुलायमसिंगाना पम्तप्रधान होउ द्यायचे नाही आनि राहूल गाम्धीना विरोध करायचा पन गाम्धी घरान्यातील व्यक्ती हवी म्हणून राजनाथ सिंग वरुण गांधीना सुद्धा पम्तप्रधान म्हणून पाथिंबा देतील

श्रीगुरुजी's picture

20 Jun 2013 - 8:00 pm | श्रीगुरुजी

>>>> भाजप एक ऑपॉर्च्युनिस्ट पक्ष आहे. तसे असणे वाईट नाही मात्र भाजप जे तत्वनिष्ठतेचे मुखवटे वापरते ते ऐन वेळी गळून पडतात. ( उदा कर्नाटक / उत्तर प्रदेश ) आणि त्यांचे वेळोवेळी हसे होते.

वरील वाक्यांत "भाजप" या शब्दाऐवजी काँग्रेस, डावे पक्ष, राष्ट्रवादी, समाजवादी, जनता दल इ. कोणत्याही पक्षाचे नाव घाला व वाक्य परत वाचा. ही वाक्ये भारतातील कोणत्याही पक्षाला लागू पडतील.

>>> भाजप आपण ऑपॉर्च्युनिस्ट आहोत हे कधीच कबूल करणार नाही.

कोणता पक्ष संधीसाधू नाही व असल्यास आपण संधीसाधू आहे हे तो कबूल करेल?

>>> अर्थात ते संघाच्या हातातले खेळणे आहे हे देखील ते कधीच कबूल करणार नाहीत. पण ती वस्तुस्थिती आहे हे सर्वच जाणून आहेत.

काँग्रेस गांधी घराण्यातील व्यक्तींच्या हातातील खेळणे आहे. सोनिया किंवा राहुलकडे सरकारमधील कोणतेही अधिकृत पद नाही, तरीसुद्धा सर्व निर्णय हे तेच घेत असतात. त्यांच्याप्रमाणे डावे पक्ष देखील चीनच्या इशार्‍यावर चालतात. भारतातील सर्वच पक्ष याबाबतीत सारखे आहेत.

>>> बिहार मधे तू मारल्यासारखे कर मी ओरडल्यासारखे करतो हा खेळ लोक ओळखून आहेत्.भाजप प्रणीत आघाडीला बहुमत मिळेल या चुकीच्या समजावर त्यांचे डावपेच आखत आहेत.

ही चुकीची समजूत नाही. गेल्या दीडदोन वर्षातील सर्व सर्वेक्षणांनी भाजपप्रणित रालोआला सर्वात जास्त जागा मिळतील हा निष्कर्ष काढलेला आहे. दर ६ महिन्यांनी आजतक-इंडिया टुडे, आयबीएन-लोकमत, एबीपी माझा या व अनेक वृत्तसंस्था मतदार सर्वेक्षण करतात. त्यांच्या प्रत्येक सर्वेक्षणात आधीच्या सर्वेक्षणापेक्षा रालोआच्या जागा वाढताना दिसतात.

>>> उद्या तिसर्‍या आघाडीला बहुमत मिळाले तर भाजपाची भुमीका काय असेल हे त्यानी आत्ताच सांगावे आनि त्यासोबतच भाजप तिसर्‍या आघाडीच्या कोणत्या नेत्याला पंतप्रधान म्हणून मान्यता देईल ते सांगावे.

हे आताच कशाला सांगायला हवे? जेव्हा अशी परिस्थिती उद्भभवेल तेव्हा भाजप निर्णय घेईलच. भाजपचे सर्वात जास्त प्राधान्य हे स्वतःच्या आघाडीचे सरकार स्थापन करण्याला असेल. ते जरे शक्य होत नसेल तर काँग्रेसविरहीत वेगळ्या पक्षाचा पंतप्रधान व्हावा असाच प्रयत्न ते करतील.

>>> अर्थात जिथे देवेगौडा पम्तप्रधान होऊ शकतात. गणपती दूध पिउ शकतो त्या देशात कोणताही चमत्कार होउ शकतो.

मान्य

>>> कदाचित मुलायमसिंगाना पम्तप्रधान होउ द्यायचे नाही आनि राहूल गाम्धीना विरोध करायचा पन गाम्धी घरान्यातील व्यक्ती हवी म्हणून राजनाथ सिंग वरुण गांधीना सुद्धा पम्तप्रधान म्हणून पाथिंबा देतील

यात चुकीचे काहीही नाही. जेव्हा तुम्ही आपल्या शत्रूला थेट व लगेच पराभूत करू शकत नाही तेव्हा भेदनीती वापरून शत्रूला शक्य तेवढे दुर्बल करावे लागते व नंतर योग्य वेळी शत्रूवर निर्णायक हल्ला चढवून विजय मिळवावा लागतो. अजित पवारांनी मुंडे घराण्याला फोडून गोपीनाथ मुंड्यांना असाच शह दिलेला आहे. काँग्रेसने देखील पूर्वी भुजबळ व नंतर राणेला बाहेर आणून शिवसेनेला असाच शह दिला होता. १९८९ साली भाजपला ९० जागा मिळाल्या, काँग्रेसला १९५ व जनता दलाला १४४ होत्या. अशावेळी स्वतः सरकार स्थापणे अशक्य होते. त्यामुळे भाजपने वि.प्र.सिंगला पाठिंबा देऊन काँग्रेसला सत्तेबाहेर ठेवण्याचा योग्य तोच निर्णय घेतला होता. शत्रूची माणसे फोडून शत्रूला कमजोर करणे हे सर्वच पक्ष करतात.

क्लिंटन's picture

21 Jun 2013 - 11:25 pm | क्लिंटन

वरील वाक्यांत "भाजप" या शब्दाऐवजी काँग्रेस, डावे पक्ष, राष्ट्रवादी, समाजवादी, जनता दल इ. कोणत्याही पक्षाचे नाव घाला व वाक्य परत वाचा. ही वाक्ये भारतातील कोणत्याही पक्षाला लागू पडतील.

+१. भारतीय राजकारणात असा संधीसाधूपणा अनेक वेळा झालेला आहे.सध्या भाजपबरोबर किती का वर्षे आधी राहिला असेना, भाजपबरोबर सत्ता उपभोगली असेना पण आता भाजपबरोबर नाही म्हणजे तो माणूस सेक्युलर (नितीश कुमार, नवीन पटनाईक).यंग टर्क म्हणून गणले गेलेले चंद्रशेखर कॉंग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर कॉंग्रेसचे हाडवैरी होते.१९८९ मध्ये त्यांच्या लेखा राजीव गांधी भ्रष्ट होते.पण १९९० मध्ये त्याच भ्रष्ट राजीव गांधींचा पाठिंबा घेऊन पंतप्रधान होताना त्यांना काही वाटले नाही.आपात काल के चार चोर म्हणून गणले गेलेल्यांपैकी (संजय गांधी, विद्याचरण शुक्ला,बन्सी लाल, प्रकाशचंद्र सेठी) प्रकाशचंद्र सेठी वगळता इतर तीन चोर (किंवा त्यांच्या "विचारांचा" प्रसार करणारे नातलग) आणि जगमोहन भाजपबरोबर कधीनाकधी होते.१९७८ मध्ये चिकमागळूरमधून इंदिरा गांधींविरूध्द निवडणुक लढविणारे आणि इंदिरा गांधींविरूध्द दोषारोप करणारे विरेन्द्र पाटील परत इंदिरा गांधींच्याच कॉंग्रेस सरकारमध्ये मंत्री झाले.आयुष्यभर कॉंग्रेसला नावे ठेवणारे कम्युनिस्ट २००४ ते २००८ मध्ये कॉंग्रेसला बाहेरून पाठिंबा देत होते.१९९२ च्या अयोध्या प्रकरणाचे खलनायक अडवाणी आता अगदी दिग्विजयसिंगांना आदर देण्याजोगे आणि हिंदू च्या पत्रकारांनाही statesman वाटू लागतात तेव्हा तो प्रकार भयंकर विनोदी वाटतो. अयोध्या प्रकरणाचे दुसरे खलनायक कल्याण सिंह मुलायमसिंहांच्या पाठिंब्यावर लोकसभेवर निवडून जातात!! अशा प्रकारची अनेक उदाहरणे आहेत.तेव्हा संधीसाधू पणा केवळ भाजपनेच केला असे म्हणणे म्हणजे अशा अनेक गोष्टींकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करणे.

चौकटराजा's picture

21 Jun 2013 - 9:09 am | चौकटराजा

बर्‍याच उदाहरणांवरून असे दिसले आहे की भाजपाने कांग्रेसी कल्चर स्वीकारली आहे ( एकाच घराण्याचा लळा असण्याचा मुद्दा सोडून ) .बँका, शेती व्यवसाय, सहकारी सोसायट्या यांच्या वर सत्ता मिळवून " कार्यकर्ते" नावाची एक समाजापेक्षा वेगळी अशी एक जात निर्माण करायची अशी ती कल्चर आहे. पाच वर्षातून फक्त एकदा सामान्य मतदाराशी संपर्क करायचा हे त्या कल्चरचे आणखी एक वैशिष्ट्य आहे.

विजुभाऊ's picture

21 Jun 2013 - 1:13 pm | विजुभाऊ

भाजपाने कांग्रेसी कल्चर स्वीकारली आहे.
हे तर त्यानी केंव्हाच स्वीकारले आहे. कल्याण सिंग, बम्गारु लक्ष्मण , दिलीप जुदेव , रेड्डी बंधु , येडीयुरप्पा हा कळस झाला.
एकाच घराण्याचा लळा असण्याचा मुद्दा सोडून
तो त्यांच्या नाईलाज आहे. विजयाराजे शिंदे , वरूण गांधी यांच्या नावाचा त्याना विचार करावासा वाटला तेंव्हाच लक्षात आले की घराणेशाही शिवाय भाजपला सुद्धा पर्याय नाहिय्ये. कदाचित पुढच्या २५ वर्षात घराणेशाही ही त्यांच्यात पूर्ण रुजलेली असेल. ( गेला बाजार पंकजा पालवे( मुंडे) उद्धव ठकरे ( बाळासाहेब) ही घराणे शाही त्याना दिसत नसावी.

पिंपातला उंदीर's picture

22 Jun 2013 - 9:37 am | पिंपातला उंदीर

>>>> भाजप एक ऑपॉर्च्युनिस्ट पक्ष आहे. तसे असणे वाईट नाही मात्र भाजप जे तत्वनिष्ठतेचे मुखवटे वापरते ते ऐन वेळी गळून पडतात. ( उदा कर्नाटक / उत्तर प्रदेश ) आणि त्यांचे वेळोवेळी हसे होते.

वरील वाक्यांत "भाजप" या शब्दाऐवजी काँग्रेस, डावे पक्ष, राष्ट्रवादी, समाजवादी, जनता दल इ. कोणत्याही पक्षाचे नाव घाला व वाक्य परत वाचा. ही वाक्ये भारतातील कोणत्याही पक्षाला लागू पडतील.

>>> भाजप आपण ऑपॉर्च्युनिस्ट आहोत हे कधीच कबूल करणार नाही.

कोणता पक्ष संधीसाधू नाही व असल्यास आपण संधीसाधू आहे हे तो कबूल करेल?

>>> अर्थात ते संघाच्या हातातले खेळणे आहे हे देखील ते कधीच कबूल करणार नाहीत. पण ती वस्तुस्थिती आहे हे सर्वच जाणून आहेत.

काँग्रेस गांधी घराण्यातील व्यक्तींच्या हातातील खेळणे आहे. सोनिया किंवा राहुलकडे सरकारमधील कोणतेही अधिकृत पद नाही, तरीसुद्धा सर्व निर्णय हे तेच घेत असतात. त्यांच्याप्रमाणे डावे पक्ष देखील चीनच्या इशार्‍यावर चालतात. भारतातील सर्वच पक्ष याबाबतीत सारखे आहेत.

अरे पण आम्हा पामराणा भाजप हा 'वेगळा' पक्ष वाटायचा.