मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मिपाचा प्रथम वर्धापन दिन आणि गणेशोत्सवाच्या शुभेच्छा...!

सरपंच · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
राम राम मंडळी, समस्त मिपाकरांना मिपाच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त आणि गणेशोत्सवानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा! केवळ अन् केवळ मायबाप मिपाकरांच्या सहकार्यामुळेच मिपाला गेल्या वर्षभराची वाटचाल करता आली. गेल्या वर्षभरात जे काही चांगलं झालं असेल, उत्तम झालं असेल ते सर्व मिपाकरांमुळेच झालेलं आहे आणि जे काही चुकलं असेल त्याकरता मी स्वत: जबाबदार आहे... या पुढेही मिपाकर सभासदांचा स्नेहाशीर्वाद मिपाच्या डोक्यावर अखंड राहो एवढीच श्री गजाननाचरणी प्रार्थना..! गणपतीबाप्पाची तुम्हाआम्हा सर्वांवर नेहमीच कृपादृष्टी राहो, हीच शुभकामना...! आपला, (कृतज्ञ) तात्या अभ्यंकर. मिपाचे श्रद्धास्थान - लालबागचा राजा. (याच्या आशीर्वादामुळेच मिपाची वाटचाल सुरू आहे असा मिपाचा विश्वास आहे!) लालबागच्या राजाचा विजय असो.....!

वाचन 26976 प्रतिक्रिया 0