रंगीत/भगवा वगैरे दहशतवाद हा विषय आता चावून चावून चोथा झाला आहे. त्यामुळे या चर्चाप्रस्तावाचा त्याच विषयावर तीच चर्चा करण्याचा उद्देश नाही... पण आज जे काही मा. गृहमंत्री श्री. सुशीलकुमार शिंदे यांनी जे काही १८० अंशाची फिरकी दाखवली ती पाहून अचंबा वाटला...
जयपूरमधे काँग्रेसच्या आधिवेशनात शिंदे म्हणाले: "We have got an investigation report that be it the RSS or BJP, their training camps are promoting Hindu terrorism."
आता उद्या अर्थसंकल्प आधिवेशन आले असताना आणि भाजपाला संसदेत (नुसतेच मंत्री म्हणून नाही तर लोकसभानेते म्हणून) सामोरे जात असताना शिंदे यांनी माफी मागत म्हणले आहे की:
In a statement released on Wednesday evening, a day before the Budget session of Parliament begins, the home minister regretted that his comments at a Congress conclave in Jaipur last month had "created controversy" and "misunderstanding." Mr Shinde said he had "no intention of linking terrorism with any religion. There is no basis for suggesting that terror could be linked with the organisations mentioned in my brief speech at Jaipur." (दुवा)
मग नक्की खरे काय समजायचे? बरं हे काँग्रेसच्या आधिवेशनात अधिकृत नेता म्हणतो मग याला पक्ष जबाबदार नाही का? नक्की कुठल्या कुठल्या विधानांवार - आधीच्या आणि भविष्यातल्या आपण मग विश्वास ठेवू शकतो? त्यांचे आधीचे विधान ग्राह्य धरून जे लगेच संघावर आणि भाजपावर उड्या मारू लागले त्या तथाकथीत बुद्धीवाद्यांचा पण भ्रमनिरास झाला का का अजून हट्ट आहेच?
प्रतिक्रिया
21 Feb 2013 - 9:20 am | नाना चेंगट
संसद चालावी, अर्थसंकल्प सादर करता यावा म्हणून केलेली तडजोड आहे ही.
>>>मग नक्की खरे काय समजायचे?
खरे हेच आहे की त्यांचे त्यांनाच कित्येकदा कळत नसते की आपण काय करायला हवे आणि काय करत आहे.
>>बरं हे काँग्रेसच्या आधिवेशनात अधिकृत नेता म्हणतो मग याला पक्ष जबाबदार नाही का?
कित्ती कित्ती जबाबदारी घ्यायची कॉगेसने ? ऑ ! देशाची जबाबदारी घेतलीय ना? मग बाकी काही जबाबदारी घेणार नाही.
>>नक्की कुठल्या कुठल्या विधानांवार - आधीच्या आणि भविष्यातल्या आपण मग विश्वास ठेवू शकतो?
अजूनही तुम्हाला कॉगेस, कॉगेसनेते यांच्या विधानांवर विश्वास ठेवावा वाटतो?
>>>त्यांचे आधीचे विधान ग्राह्य धरून जे लगेच संघावर आणि भाजपावर उड्या मारू लागले त्या तथाकथीत बुद्धीवाद्यांचा पण भ्रमनिरास झाला का का अजून हट्ट आहेच?
इतक्या सहजासहजी बुद्धीवाद्यांच्या आपल्या बुद्धीवरचा विश्वास डळमळीत होत नसतो. आधी निष्कर्ष मग पुरावे हीच आमची आमच्या बुद्धीशी बांधीलकी असल्याने आम्हाला कुणाच्याही विधानाच्या ग्राह्यतेची गरज नसते. भगवा दहशतवाद ही वस्तुस्थिती आहे हे मत बदलणार नाही... मरते दम तक ;)
21 Feb 2013 - 10:04 am | ऋषिकेश
टाईम चेन्ज पीपल चेन्ज.. याला कोणतीही व्यक्ती, पक्ष, संस्था, संघटना अपवाद नाही
शेवटी चेन्ज इज द नेचर! ;)
21 Feb 2013 - 10:29 am | देशपांडे विनायक
माफीनामा
मी मला समजत नसल्याने माफी मागत आहे.
गृहमंत्री काय बोलतात हे समजले पाहिजे.पण मला समजत नाही.
हा माझा दोष आहे.मी त्यांना निवडून देताना त्यांची भाषा मला समजेल का याचा विचार केला नाही.
खरे तर मी विचार करून मतदान केलेच नाही.
विचार केल्यास मतदान करता येईल?
पक्ष्याचे मत,वैयक्तिक मत,अधिकृत मत,बोलण्या आधिचे मत,बोललेले मत,बोलल्या नंतरचे मत,
छापुन आलेले मत,खुलासा केलेले मत,संदर्भ सोडून व्यक्त झालेले मत,गैर समजाने झालेले मत,मला समजत नाही.
पण राजकारणात हे समजणारे लोक आहेत.मी त्यांना निवडून देतो आणि माझे मत मिसळ पाव वर व्यक्त करतो.
ते राजकारण करतात मी मिसळ पाव खात बसतो.
21 Feb 2013 - 3:32 pm | नितिन थत्ते
चालायचंच.
"माझ्यावरील खटला योग्य प्रकारे चालवला होता आणि मला झालेली शिक्षा योग्यच होती" असा माफीनामा कुणीतरी दिल्याचं स्मरतंय.
21 Feb 2013 - 6:01 pm | दादा कोंडके
मूळ मुद्द्याला खोडणं शक्य नव्हतं. त्यामुळे दोन शक्यता होत्या.
१. काही वेळेला देशहीत (संसदेचं कामकाज) पाहून असं म्हणावं लागत.
२. टू रॉग्स डोन्ट मेक वन राइइट हे माहीत असुनही, दुसरं कुठलतरी फाटेफोडू उदाहरण द्यायचं.
:)
21 Feb 2013 - 6:46 pm | आजानुकर्ण
बहुदा थत्तेचाचांना 'सिलेक्टिव क्रिटिसिझमची' दुसरी बाजू दाखवावीशी वाटली असेल. मूळ मुद्द्यामध्ये काही दम आहे असे वाटत नाही. एखाद्या पक्षाचे अधिकृत धोरण आणि पक्षसदस्यांचे धोरण वेगवेगळे असू शकते हे आपण भाजप - आणि जेठमलानी उपचर्चेमध्ये विस्ताराने पाहू शकता.
22 Feb 2013 - 9:32 pm | विकास
जेठमलानी यांनी स्वत:च्या वकीलीपेशाला अनुसरून कोर्टात वकीली करणे आणि पक्षाच्या अधिकृत चिंतन बैठकीत व्यासपिठावरून ते देखील गृहमंत्री असताना बोलणे यात फरक आहे.
23 Feb 2013 - 12:21 pm | चिंतामणी
माहीत असतील तर त्यांनीसुद्धा औरंजेबाला असेच लिहून दिले होते. आणि शंभुराज्यांना काहीकाळ बादशाहच्या चाकरीत ठेवले होते.
याला काय म्हणायचे??
23 Feb 2013 - 12:27 pm | नितिन थत्ते
हो ठाऊक आहे.
तसेच "स्ट्रॅटेजिक रिट्रीट"* प्रकारचे विधान शिंदे यांनी केले असल्याचे सुचवायचे होते. पण डोळ्यावर रंगीत चष्मे घातलेले असले की मग साध्या गोष्टी लक्षात येत नाहीत.
सावरकरांनी दिलेल्या माफीनाम्याचे उदाहरणही म्हणूनच दिले होते.
23 Feb 2013 - 12:39 pm | चिंतामणी
आणि कुठे हे सुशिलकुमार जी शिंदे.
तुलना पाहून धन्य झालो.
आता बोलणे खुंटले.
23 Feb 2013 - 1:01 pm | नितिन थत्ते
तुलना कृतीची..... व्यक्तीची नव्हे.
असो.
23 Feb 2013 - 1:21 pm | नाना चेंगट
कृतीची तुलना?
सत्ताधीशासमोर बंडखोराने केलेली कृती आणि प्रत्यक्ष सत्ताधीशाने केलेली कृती या समान मानल्या जातात तर ! ;)
23 Feb 2013 - 1:48 pm | चिंतामणी
सहमत.
23 Feb 2013 - 6:02 pm | विकास
सहमत
21 Feb 2013 - 3:33 pm | नितिन थत्ते
चालायचंच.
"माझ्यावरील खटला योग्य प्रकारे चालवला होता आणि मला झालेली शिक्षा योग्यच होती" असा माफीनामा कुणीतरी दिल्याचं स्मरतंय.
21 Feb 2013 - 5:08 pm | परिकथेतील राजकुमार
टार्या का ?
22 Feb 2013 - 2:37 am | अर्धवटराव
शिक्षा झालीच तर आनंदाने भोगायला तयार असणारे गांधीजी आठवले.
अर्धवटराव
23 Feb 2013 - 9:04 am | नितिन थत्ते
बरोबर.
23 Feb 2013 - 9:58 am | चिंतामणी
तेच नेते ज्यांना आगाखान पॅलेससारख्या भय़ंकर ठिकाणी तुरुंगात ठेवले होते.
(मुद्दा फक्त तुरुंगवासाबद्दल आहे याची नोंद घ्यावी)
23 Feb 2013 - 10:32 am | नितिन थत्ते
तेच तेच ते.
ब्रिटिशांच्या काळात राजकीय कैद्यांना साध्याच तुरुंगात कोलू न पिसताच ठेवलं जाई. घातपाती कारवाया करणार्यांना अधिक कठोर शिक्षा होत.
अवांतर: गांधी एकूण ७ वर्षे तुरुंगात होते. त्यापैकी शेवटच्या तुरुंगवासात १९४२-४४ दोन वर्षे आगाखान पॅलेसमध्ये होते.
23 Feb 2013 - 11:23 am | नाना चेंगट
>>>ब्रिटिशांच्या काळात राजकीय कैद्यांना साध्याच तुरुंगात कोलू न पिसताच ठेवलं जाई.
असहमत.
23 Feb 2013 - 11:52 am | चिंतामणी
म्हणजे वासुदेव बळवंत फडके, भगतसींह, राजगुरू, सुखदेव..........................................................................................
.................................................................................................................................................................... स्वा.सावरकर, त्यांचे बंधु आदी क्रांतीकारक तुमच्या भाषेत घातपाती कारवाया करणारे म्हणजेच "अतीरेकी" होते तर.
असे सरळ सरळ लिहायची हिंमत दाखवा चाचा. मोघमपणे "घातपाती कारवाया करणार्यांना अधिक कठोर शिक्षा होत" असे म्हणुन पळुन जाउ नका.
23 Feb 2013 - 12:22 pm | नितिन थत्ते
ब्रिटिश सरकार ज्या शिक्षा देई ते तुम्हा-आम्हाला काय वाटते (क्रांतिकारक की अतिरेकी) यावर अवलंबून नसे.
23 Feb 2013 - 12:24 pm | चिंतामणी
तुमच्याबद्दलच लिहीले आहे.
23 Feb 2013 - 12:22 pm | चिंतामणी
माहीत असतील तर त्यांनीसुद्धा औरंजेबाला असेच लिहून दिले होते. आणि शंभुराज्यांना काहीकाळ बादशाहच्या चाकरीत ठेवले होते.
याला काय म्हणायचे??
21 Feb 2013 - 5:43 pm | डॉ सुहास म्हात्रे
जोपर्यंत गफला करून अथवा धडधडीत खोटे बोलून ते पचविणे आणि ते अंगावर आलेच तर उलटी उडी मारून माफी मागून वेळ सारून नेण्याला हुशारी (smartness) समजणारे मतदार आहेत तोपर्यंत अजून काय वेगळे अपेक्षा करणार?
पूर्वी फटका असलेला माणूस कॉर्पोरेटर / एम् पी / एम् एल् ए होऊन एकाएकी काहिही दृश्य उत्पन्नाचे साधन नसताही ४-५ वर्षांत करोडपती बनला की त्याचे आपल्याला आदरयुक्त कौतूक वाटते. त्याऐवजी तो जनतेच्या पैशाची लूटमार करणारा चोर आहे हे कळण्याची समज जेव्हा जनतेला येइल आणि त्या समजेचा प्रभाव मतदानावर होइल, तेव्हाच हे थांबेल.
तोपर्यंत कोण जनतेला जास्तीत जास्त उल्लू बनवू शकतो यासाठी सगळ्या राजकारण्यात खुली स्पर्धा चालू आहे... तमाशा देखते रहो !
21 Feb 2013 - 6:07 pm | परिकथेतील राजकुमार
'तृतीय श्रेणी कामगार' असे म्हणावे.
21 Feb 2013 - 6:23 pm | डॉ सुहास म्हात्रे
टंकन मिष्टेक झाली... "फटका" हा शब्द "फाटका" असा वाचावा.
अजून एक स्पष्टीकरण: माझे हे निरिक्षण भारतातील सर्वसाधारण परिस्थितिबद्दल आहे. त्याची असंख्य चालती बोलती उदाहरणे सर्व भारतभर विखुरलेली आहेत. जर मतदात्यांना त्यांच्या असल्या कर्तबगारीचे कौतूक आहे तर मग तथाकथित नेते सरळ मार्गाने जाउन स्वता:च्या पायावर कुर्हाड का म्हणून मारतील ?
21 Feb 2013 - 6:01 pm | प्रसाद१९७१
तुम्ही फार मनाला लावून घेता बाबा असल्या गोष्टी :-(
21 Feb 2013 - 6:27 pm | गणपा
तुम्हाला रंगीत = हिरवा असं म्हणायचं का विकास काका?
मग म्हणा ही सरळ सरळ. ;)
असो या विषयावर आम्ही काय जास्त अकलेचे तारे तोडणार म्हणा.
नानाच्या पहिल्या प्रतिसादाशी सहमत आहे.
21 Feb 2013 - 6:37 pm | विकास
तसे नाही रे बाबा, मी येथे आलेल्या आधीच्या धाग्यांच्या मथळ्यांच्या संदर्भाने म्हणत होतो. रंगीत दहशतवाद आणि नवा भगवा दहशतवाद??
मी दहशतवादाला कधीच कुठल्या रंगातून बघत नाही आणि डोळे शाबूत असल्याने कुठल्या चष्म्यातून देखील बघत नाही आणि म्हणूनच मी विचारवंत नाही! ;)
21 Feb 2013 - 6:52 pm | गणपा
ओक्के. :) वर मूळ लेखात दुवे नसल्याने गोंधळ झाला.
म्हटलं 'माजवाल्या' रंगाची एलर्जी आहे की काय? ;)
21 Feb 2013 - 9:03 pm | विकास
रंग न लावायचे अजून एक कारण म्हणजे, कुणाला कुठले रंग लावायचे हा पण एक प्रश्नच पडतो...
पुणे स्फोट: NCPकार्यकर्ता अटकेत
आता हे तर प्रत्यक्ष पक्ष कार्यकर्त्याकडून झाले आहे. बघू यावर विचारवंत म्हणतात ते...
21 Feb 2013 - 6:41 pm | चौकटराजा
ऐसे बडे देशमे हिंदी या अंग्रेजी बोलनेकी गलती के हादसे होतेच है ! अभी मै दोनो भाषाकी शिकवणी लगाउंगा के श्रीकांत ने हिंदी और कपिल देव ने अंग्ग्रेजी शिकवणीका कंत्राट लिया है ना - आपका सु शि. उर्फ हसमुखराय सोलापूरवाला .
21 Feb 2013 - 6:44 pm | आजानुकर्ण
सुशीलकुमार शिंदे तेव्हा चूक होते, आता त्यांनी चुकीची दुरुस्ती केली आहे एवढाच याचा अर्थ आहे.
दुसरे समांतर उदाहरण द्यायचे तर एखादा बौद्धिक नेता जेव्हा 'अमुकतमुक व्यक्ती हा पक्षाचा मुखवटा असून दुसरीच व्यक्ती हा चेहरा आहे' वगैरे लिहिते तेव्हा ते त्या नेत्याचे मत मानून आपण सोडून देतोच की. काँग्रेसच्या अधिवेशनात सर्व नेत्यांनी त्यांची भाषणे आधी कोणत्यातरी संघटनाबाह्य दुसऱ्या संघटनेकडून वगैरे ;) अप्रूव करुन घ्यावी असे म्हणायचे असेल तर बाब वेगळी.
आता तुम्हाला शिंदे यांनी नवी चूक केली आहे, हिंदू दहशतवाद वगैरे असे काहीतरी आहे असे म्हणायचे असेल तर गोष्ट वेगळी.
22 Feb 2013 - 2:45 am | अर्धवटराव
>>सुशीलकुमार शिंदे तेव्हा चूक होते, आता त्यांनी चुकीची दुरुस्ती केली आहे एवढाच याचा अर्थ आहे.
-- मुख्यमंत्रीपद भुषवलेला, केंद्रीय मंत्रीपद उपभोगलेला, देशाच्या सर्वात मोठ्या राजकीय पक्षाच्या अगदी कोअर वर्तुळात वावरणारा मुरब्बी राजकारणी एका महत्वाच्या सभेत "चुकीने" एखादं वाक्य बोलतो, आणि मग त्याला आपली चूक "कळ ते" (नशीब.. यात आत्माकी आवाज वगैरे प्रकार नाहि) व तो चुक "सुधारतो"... ह्म्म्म.. इंटरेस्टींग.
चला, जन्मघुटी घातलेले धारोष्ण दूध घ्यावे म्हणतो.
अर्धवटराव
22 Feb 2013 - 2:55 am | आजानुकर्ण
मूळ चर्चाप्रस्तावातील मुद्द्याच्या अनुषंगाने 'चुकीने' बोलणे आणि 'चुकीचे' बोलणे यांमध्ये फरक आहे एवढे सांगावेसे वाटले. सुशीलकुमार चुकीचे बोलले होते. चुकीने नाही. एकदा मूर्खपणा केलाच की त्या माणसाने तो मूर्खपणा तसाच चालू ठेवण्याची अपेक्षा तितकीच मूर्खपणाची आहे असे वाटते.
मात्र काहीही करुन सुशीलकुमारांना आणि त्याआडून काँग्रेसला (आणि खाली एनसीपीला) ठोकायचे असल्यास चालू द्या. विषयांतरात तूर्तास रस नाही.
22 Feb 2013 - 3:57 am | अर्धवटराव
http://online2.esakal.com/esakal/20130222/4940268199374267379.htm
काँग्रेसचे म्हणणे तर तुमच्या दाव्यापेक्षा अगदी विपरीत आहे. शिंदे "चुकीने" इंवा "चुकीचे" काहिच बोलले नाहि... किंबहुना पुराव्याच्या आधारेच शिंद्यांनी ते विधान केलं असं काँग्रेस म्हणतेय. म्हणजे शिंदे म्हणतात कि त्यांना त्यांच्य विधानाचा खेद वाटतोय, त्यांच्याजवळ कुठलाहि पुरावा नाहि. काँग्रेस म्हणते कि शिंदे पुराव्याआधारे अगदी खरं बोललेत. आम्हि सामान्य जनतेने काय समजायचं मग?
अवांतरः या सगळ्या प्रकरणात एन.सी.पी कुठे दिसली तुम्हाला? कि तुमचीच तशी इच्छा आहे एन.सी.पी ला मधे घुसडायची? काँग्रेसवाल्यांना तसंही पवारांचं भलं बघवत नाहि.
अर्धवटराव
22 Feb 2013 - 9:15 pm | आजानुकर्ण
मी काय म्हटले होते हे एकदा सोप्या भाषेत पुन्हा सांगतो म्हणजे तुमचा संभ्रम दूर होईल.
१. एखाद्या विशिष्ट गोष्टीबाबत पक्षाचे मत आणि पक्षसदस्यांची मते यामध्ये मतभेद असू शकतात. हे लोकशाही पद्धतीने चालवणाऱ्या पक्षांबाबत लागू आहे. काही पक्षांमध्ये पक्षाविरोधात बोलल्यास गद्दार किंवा लखोबा वगैरे म्हटले जाते, त्या पक्षाचा इथे संबंध नाही.
२. शिंदे यांनी जयपूर अधिवेशनात केलेले विधान हे चुकीची माहिती किंवा अंदाज किंवा पूर्वग्रह वगैरे काहीही कारणांनी केलेले असेल, पण ते इंटेन्शनली (मुद्दामहून) केलेले विधान होते. चुकून तोंडातून निघून गेले वगैरे नाही. अन्यथा त्यानी माध्यमांचा अप्रामाणिकपणा आणि मला असे म्हणायचेच नव्हते वगैरे स्पष्टीकरण दिले असते. त्यांनी आधीच्या विधानाबाबत माफी (रिग्रेट) मागून नवे विधान केले आहे. ते विधान शिंदे ही व्यक्ती किंवा गृहमंत्री यांचे असू शकते. काँग्रेस पक्षाला हे विधान पक्षाचे धोरण म्हणून मानण्याचे बंधन नाही.
३. सामान्य जनता पेपरातल्या बातम्या वाचून आपली समजूत आणि मते ठरवते ही गैरसमजूत आहे. काही वर्षापूर्वी पेपरात इंडिया शायनिंगच्या बातम्या व जाहिराती प्रसिद्ध होऊनही सत्ताधारी पक्षाबाबत सामान्य जनतेने योग्य समजूत करुन घेतलीच होती.
४. सामान्य जनतेत तुमचा समावेश करायचा असल्यास तुमचा एकंदर मतप्रवाह आधीच ठरलेला आहे असे दिसते त्यामुळे उद्या काँग्रेसच्या बैलाने गूळ दिला तरी तुम्ही त्याचा वास घाण येतो असेच म्हणणार. त्यामुळे पेपरात काहीही आले तरी वैयक्तिक तुम्हाला फरक पडू नये.
५. एनसीपीला मी मध्ये घुसडलेले नाही. चर्चाप्रस्तावरील प्रतिसाद काळजीपूर्वक वाचल्यास हे तुमच्या लक्षात येईल.
मिपावरील चर्चा वाचून संघ आणि भाजपा या पूर्णपणे वेगळ्या संघटना असल्याचे सिद्ध होऊन माझा गैरसमज दूर झाला होता. मात्र त्या बातमीत संघाचे पदाधिकारी भाजपावर दबाव आणू शकतात अशी शक्यता पत्रकाराने लिहिल्याचे वाचले. संघ भाजपाचे एकंदर संबंध गूढच असावेत किंवा हे वर्तमानपत्र अप्राणिक असावे असे वाटते.
22 Feb 2013 - 10:34 pm | विकास
बरोबर
माध्यमे स्वत:ची चूक झालेली सिद्ध केल्यास ती मान्य करतात अन्यथा तसे ते मान्य करत नाहीत. सुशीलकुमारांचे भाषण स्पष्टपणे टेप केलेले होते आणि त्यात त्यांनी काय म्हणले आहे हे माध्यमांनी अवतरणचिन्हात सांगितलेले आहे. त्या बोलण्याचा माध्यमांना वाटणारा खरा-खोटा अन्वयार्थ (विश्लेषण) सांगितेला/ले नाही.
व्यासपिठावर ते बोलायच्या आधी त्यांची ओळख जर एक व्यक्ती म्हणून केली गेली असेल तर व्यक्ती म्हणून, काँग्रेस सदस्य, माननीय मंत्री म्हणून केली गेली असेल तर त्या अर्थानेच ते बोलले असे समजायला हवे.
फरक पडणार कारण त्यात जर एखाद्या संघटनेची बदनामी असेल तर त्याचे फायदेतोटे हे त्या संघटनेशी बांधील असलेल्या व्यक्तीपर्यंत पोचतात आणि म्हणूनच असे खोटे बोलणे/लिहीणे आक्षेपार्ह आहे.
यू वेलकम :-)
जर पत्रकाराला खात्री असती तर तसे त्याने ते स्पष्ट लिहीले असते. "शक्यतेचे" पिल्लू सोडले नसते. तरी देखील सकाळमधील त्या ओळी मी खाली परत लिहीतो, ज्यात ही "शक्यता" देखील व्यक्त केलेली नाही.
"शिंदे यांनी व्यक्त केलेल्या दिलगिरीनंतर भाजप नेत्यांनी या वादाला पूर्णविराम दिला असला, तरी संघाने शिंदेंच्या माफीचा आग्रह धरला आहे. त्यामुळे संघाच्या दबावाखाली भाजपकडून संसदेच्या कामात अडथळे येऊ शकतात काय, असे विचारले असता, यावर भाजपलाच ठरवायचे आहे. मात्र, त्या पक्षाच्या नेत्यांनी समाधान व्यक्त केले असल्याकडे चाको यांनी लक्ष वेधले. तसेच, पुन्हा या विषयाचा संसदेच्या अधिवेशनावर परिणाम होणार नाही, अशी अपेक्षाही बोलून दाखविली.
यात म्हणल्याप्रमाणे संघाने शिंदेंच्या माफीचा आग्रह धरलेला आहे. अर्थातच धरला आहे, तसे इतरत्र देखील वाचलेले आहे. पण संघाने भाजपाने काय करावे हे सांगितलेले नाही. त्यात जो, "त्यामुळे संघाच्या दबावाखाली भाजपकडून संसदेच्या कामात अडथळे येऊ शकतात काय," हा प्रश्न विचारला आहे तो कोणाला? तर आधीच्या (बातमीतील) परीच्छेदात म्हणल्याप्रमाणे काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे प्रवक्ते पी.सी. चाको यांना. मग हे काँग्रेस प्रवक्ते चाको महाशय म्हणणार, "यावर भाजपलाच ठरवायचे आहे." आणि ते वाचून तुम्ही "संघ भाजपाचे एकंदर संबंध गूढच असावेत " असे विश्लेषण करणार आणि इतरांना सांगणार. उत्तम! चालूं द्यात!
22 Feb 2013 - 10:39 pm | अर्धवटराव
व्यक्ती शिंद्यांनी (पक्षाचे व्यासपीठ वापरून) विधान करायचे, व्यक्ती शिंद्यांनी खेद व्यक्त करायचा. मग यात पक्षाने अजीबात पडायला नको ना. हे म्हणजे व्यक्ती शिंद्यांवर पक्ष त्यांच्या विधानावर टिकुन राहयला जबरदस्ती करतोय असं झालं मग.
४. सामान्य जनतेत तुमचा समावेश करायचा असल्यास तुमचा एकंदर मतप्रवाह आधीच ठरलेला आहे असे दिसते त्यामुळे उद्या काँग्रेसच्या बैलाने गूळ दिला तरी तुम्ही त्याचा वास घाण येतो असेच म्हणणार. त्यामुळे पेपरात काहीही आले तरी वैयक्तिक तुम्हाला फरक पडू नये.
-- अत्यंत अवाजवी प्रतिसाद. या न्यायाने तुम्हाला (आणि इतर काहि जेष्ठ मिपाकरांना) काँग्रेसने मुद्दाम मिपावर पक्षाची वकिली करायला ठेवलय असं म्हणता येईल.
संघ-भाजप, एनसीपी वगैरे मुद्दे देखील अवास्तव आहेत. माझा प्रश्न शिंदे व काँग्रेस पक्ष यांच्या विधानांमधील कॉण्टृअॅडीक्शन वर आहे. असो. प्रश्न अडचणीचा असल्यास राहु द्या.
अर्धवटराव
21 Feb 2013 - 6:50 pm | प्रसाद१९७१
सिंदे दुर्दैवाने ( देशाच्या ) गृहमंत्री आहेत, त्यांनी पूर्ण माहिती घेउन च बोलणे अपेक्षीत आहे. त्यांनी जे म्हणले ते जर बरोबर असेल तर त्यावर त्यांनी टिकुन रहायला पाहिजे.
21 Feb 2013 - 6:54 pm | आजानुकर्ण
“Emerson has said that consistency is a virtue of an ass. No thinking human being can be tied down to a view once expressed in the name of consistency. More important than consistency is responsibility. A responsible person must learn to unlearn what he has learned. A responsible person must have the courage to rethink and change his thoughts. Of course there must be good and sufficient reason for unlearning what he has learned and for recasting his thoughts. There can be no finality in rethinking.”
22 Feb 2013 - 9:55 pm | विकास
वाक्य एकदम आवडले... प्रश्न इतकाच पडला की हे आपल्याकडील तथाकथीत बुद्धीवाद्यांना आणि डाव्या विचारसरणीच्या लोकांना कधी कळणार. त्यांच्या इतके टिकेत आणि तेच तेच विचार पसरवण्याच्या बाबतीत consistent कोणीच नसावे असे वाटते. अर्थात आंबेडकरांच्या वाक्यात म्हणल्याप्रमाणे त्यातील (तथाकथीत बुद्धीवादी, डावे विचारवंत) कुणालाच कधी कसली जबाबदारी (responsibility) घेयची नसते हा मुद्दा आहेच.
21 Feb 2013 - 6:53 pm | नीलकांत
सुशीलकुमार एवढया लवकर माफी मागतील असं वाटले नव्हते.
त्यांचे ते वक्तव्य केवळ एक राजकीय खेळी होती असे वाटते. काँग्रेस मुस्लीमांची कैवारी आहे हा दावा सपा बसपा फोल पाडताहेत त्यामुळे त्यांनी हे वक्तव्य केलं असावं असं वाटते. सोबतच आधी हे वक्तव्य देणे आणि काही काळातच अफजल गुरूला फाशी देणे हे केवळ योगायोग आहेत असं मी मानत नाही. प्रेशर बॅलेन्सींग असावं असे वाटते.
- नीलकांत
22 Feb 2013 - 10:09 pm | विकास
सहमत
राजकारणात प्रेशर बॅलन्सिंग करावे लागते यात काही आश्चर्य नाही. पण ते करत असताना नक्की कशाचा वापर करतो, कसा वापर करतो हे देखील महत्वाचे असते. यात केवळ सुशीलकुमारांचाच संबंध नाही तर तमाम राजकारण्यांचा संबंध आहे. विशेष करून साठीच्या दशकाच्या शेवटापासून चालू झालेल्या या राजकीय पद्धतीचे हे सर्व प्रॉडक्ट्स आहेत. त्यामुळे आपल्याकडे राजकीय खेळी करता करता राजकीय खेळखंडोबा झाला आहे. :(
21 Feb 2013 - 6:58 pm | आजानुकर्ण
काँग्रेसने कसाब आणि अफजलला फाशी देऊन विरोधी पक्षाच्या इमोशनल मुद्यांमधील हवा आधीच काढून घेतली आहे. लवकरच निवडणुका होतील, त्यामुळे या अर्थसंकल्पीय अधिवेशनात काही महत्त्वाची बिले वगैरे पास करण्याची शक्यता आहे काय? ही बिले पास होऊ नये म्हणून हिंदूंचा(!) कैवार घेऊन संसदेत गोंधळ घालण्याची संधी विरोधी पक्षांना न दिल्याबद्दल व संसदेचे काम सुरळीत चालू ठेवण्यासाठी मोठ्या मनाने चूक मान्य केल्याबद्दल शिंदे यांची मी मनःपूर्वक अभिनंदन करतो.
22 Feb 2013 - 5:36 pm | चिंतामणी
अभ्यास केलेला आहे. पण तो पुरेसे मार्क्स देणार नाही. कारण या घटना क्रमाची आणि कारणांची कल्पना सगल्यांना आहे.
लोकांचे लक्ष "महागाई, अनागोंदी कारभार, भ्रष्टाचार" इत्यादी गोष्टींवरून उडवण्यासाठी जी आघाडी केंद्रातील सत्ताधारी पक्ष्याच्या नेत्यांनी उघडली आहे ती सडक्या मनोवृत्तीचे द्योतक आहे.
कसाब, अफजल यांची फाशीचे टायमींग काय हे सगळे ओळखुन आहेत.
पण याच शिंदेसाहेबांनी जे उद्गार काढले होते त्याचा फायदा सइद हाफिज साहेबांनी घ्यायचा प्रयत्न केला होता. म्हणून माफी मागीतली असे का नाही म्हणत.
ही बघा हाफिज सईद याची मुलाखत.
शिंद्यांनी दिलेल्या टॉनिकमुळे बळ मिळालेले त्याच्या वक्तव्यात दिसून येईल.
अमेरिकेलासुद्धा आवाज देत आहे तो.
याबद्दल कधीतरी मत प्रदर्शन करा.
असो.
माफी मागण्याच्या अनेक कारणात हेसुद्धा कारण आहे.
तेंव्हा कॉंग्रेसी नेते जसे सगळ्यांना गृहीत धरतात, तसे तुम्ही धरु नका की सगळेच मुर्ख आहेत.
22 Feb 2013 - 10:00 pm | विकास
हा प्रतिसाद केविलवाणा वाटला.
22 Feb 2013 - 10:42 pm | चिंतामणी
धन्यु.
21 Feb 2013 - 7:28 pm | वेताळ
कुणाच्यातरी खांदावर बंदुक ठेवुन तिसर्या कुणाची तरी शिकार करणे हे कसब फक्त कॉग्रेसलाच जमते.
21 Feb 2013 - 9:21 pm | इरसाल
माफी मागतील हैद्राबाद प्रकरणात की माझे स्टेटमेंट १ बरोबर होते म्हणुन.
22 Feb 2013 - 9:23 am | नानबा
काल झालेल्या हैदराबाद बाँबस्फोटानंतर अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्त्व माननीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले की गृहखात्याला या हल्ल्यांची पूर्वकल्पना २ दिवस आधीच मिळाली होती.
>> मग ते काय हल्ला होऊन काही निरपराध नागरिक मारले जाण्यासाठी थांबले होते? त्याच बहाण्याने थोडीफार लोकसंख्या कमी होईल असा स्तुत्य विचार केला की काय गृहखात्याने?
22 Feb 2013 - 9:29 am | श्री गावसेना प्रमुख
पुर्वकल्पना होती,पण तो हैदराबादेतच होइल हे वाटले नव्हते असेही म्हणाले ते बी लिवा की
22 Feb 2013 - 9:57 pm | विकास
Specific alert was sent to Hyderabad yesterday morning: Govt
आता कोणी असे म्हणू शकते की त्यांनी सांगितल्यावर पुढच्या सुरक्षाव्यवस्थेची जबाबदारी आंध्र सरकारची होती, तर तो मुद्दा वेगळा.
23 Feb 2013 - 9:33 am | श्री गावसेना प्रमुख
विकास राव मालेगाव् ,हैदराबाद बाँब स्फोटात एक साम्य आहे ते म्हणजे सायकलींचा वापर तरीही मालेगाव स्फोटात साध्वी,अन हैद्राबादेत मुजाहीदीन असे दुतोंडी खेळ का?
ओवेसी ने शांतता ठेवण्याचे आवाहन केलेय ते पोलीस टार्गेट वर येण्यापासुन वाचण्यासाठीच ना?कारण त्याच्या पक्षाचा एक मराठवाडी कार्यकर्ता जंगली महाराज रोड स्फोटात आरोपी आहे म्हणे.
हेही वाचा
http://online2.esakal.com/esakal/20130223/4649976891578194238.htm
http://www.saamana.com/2013/February/23/AGRALEKH.HTM
23 Feb 2013 - 9:41 am | विकास
वर दिलेल्या माझ्या प्रतिसादातातील बातमीत म्हणल्याप्रमाणे तो एनसीपीचा कार्यकर्ताआहे.
22 Feb 2013 - 9:41 am | नानबा
म्हंजे घरातल्या कर्त्या बाईनं घरात साखर हाये, पण कुठं ठिवलीये त्ये सापडत न्हाई असं म्हणण्यासारखं झालं हे..
22 Feb 2013 - 9:43 am | श्री गावसेना प्रमुख
प्रथम साहेब हा बाँब शिंदेनी ठेवला असे म्हणावयाचे आहे काय तुम्हाला?
22 Feb 2013 - 10:36 pm | नानबा
छे हो श्री साहेब, शिंदेंकडे एवढं धैर्य कुठून येणार?? त्यांना नी सोनिया बै बोल्ली तरच ते काम करतात म्हणे. सकाळी "तिकडे" जाण्याआधी पण ते पूर्वपरवानगी असल्याखेरीज जात नाहीत म्हणे...
22 Feb 2013 - 4:30 pm | खटासि खट
मेरे देस में ..ओ S S S S
मेरे देस में, पवन चलें पूरवाई
निसर्गसुंदर गावी सकाळी सकाळी शेतात गाणे म्हणणारा खट
22 Feb 2013 - 4:33 pm | खटासि खट
शेतात बाँब फोडणा-यांना रोखण्यासाठी महाराष्ट्रात भरारी पथके स्थापन झालेली आहेत. काही दिवसांपूर्वी अशाच एका नेत्रदीपक पाठलागात एका संशयिताचा मृत्यू झाल्याची बातमी सकाळ पेपरने छापली होती.
हागणदारीमुक्त गाव, स्फोटमुक्त गाव
26 Feb 2013 - 12:24 pm | अनामिका
एक नवी सेक्युलर फ़ॅशन
आपण स्वच्छ आहोत असे भासवायचे तर दुसर्याकडे घाणेरडा म्हणुन सतत बोट दाखवावेच लागते. आजकाल ब्राह्मणांना शिव्या घालण्याची एक फ़ॅशन झाली आहे. पण तिचे अनुसरण करताना नेमक्या त्याच ब्राह्मण्य़ प्रवृत्तीचा अवलंब अगदी सढळ हस्ते होत असतो. ज्या काही स्पृष्य़ अस्पृष्यतेच्या कल्पना शेकडो वर्षे व पिढ्य़ानुपिढ्या राबवल्या गेल्या, त्याची कार्यपद्धती आपण कधी बारकाईने समजून घेतली आहे काय? त्यात पहिली गोष्ट अशी कटाक्षाने केली जाते की समोरच्या व्यक्तीवर वर्चस्व गाजवण्यासाठी त्याच्या मनात कसली तरी अपराधी भावना मोठ्या खुबीने रुजवली आणि विविधप्रकारे खतपाणी घालून जोपासली जाते. एकदा का ती अपराधी मानसिकता निर्माण झाली; मग पुण्यात्मा बनून त्यावर दिर्घकाळ सत्ता गाजवता येत असते. मग कुठलेही कारण असो नसो; तुम्ही पापी आहात असे तुम्हाला सातत्याने कानीकपाळी ओरडून सांगितले जात असते. अर्थात त्याच पापासून मुक्त होण्याचे सोपे सोपे मार्गही तयार ठेवलेले असतात. पुर्वी त्याला कर्मकांड, सोपस्कार म्हटले जायचे. आताही त्याचे नवे रूप अवतरले आहे.
रोजच्या रोज घराघरात काळ्यासावळ्या त्वचेबद्दल आणि ती गोरी करण्यार्या क्रीमबद्दलच्या जाहिराती, त्याचे उत्तम उदाहरण आहे. आधी असलेल्या त्वचेबद्दल न्युनगंड पेरायचा, जोपासायचा आणि मग त्यातून मुक्तीचा उपाय सांगून धंदा करायचा. जेव्हा असा कुठलाही न्युनगंड माणसात व समाजात जोपासला जातो, तेव्हा मग त्याच्या शरीरावर साखळदंडाने वा हत्यारी बलप्रयोगाने हुकूमत मिळवावी लागत नसते. तो मनाने गुलाम झाला, की नुसत्या शब्दांतून त्याला गुलामी सोसावी लागत असते. कारण मनातली अपराधी भावना व न्युनगंडच त्याचे साखळदंड झालेले असतात. ते झुगारण्याची हिंमतच त्यापासून मुक्ती देऊ शकत असते. आजच्या भारतीय समाजात हिंदू म्हणून असलेली त्याची मुलभूत ओळखच त्याचे लांच्छन असल्याचे विविध मार्गाने ठसवण्याचा उद्योग गेली कित्येक दशके आधुनिक सेक्युलर विचार म्हणून रुजवण्याचे कारस्थान यशस्वीरित्या राबवण्यात आलेले आहे. त्यामुळेच तो आपली प्रतिकार शक्ती गमावून बसला आहे. त्याचे उत्तम प्रत्यंतर हिंदू घातपाती वा भगवा दहशतवाद अशा शब्दातून येऊ शकते.
गेल्या दोन दशकात आपल्या देशात जितके घातपात, दंगली वा दहशतवादाच्या घटना घडल्या, मृत्यू झाले वा नुकसानीची व त्यातील गुन्हेगारींची आकडेवारी पाहिल्यास त्यात हिंदू म्हणावेत असे आकडे नगण्य आहेत आणि मुस्लिम म्हणावेत ते अगणित आहेत. पण भगवा दहशतवाद म्हणून नुसता शब्दोच्चार केला तरी आपण अकारण स्वत:ला अपराधी समजू लागतो. इस्लामिक जिहादने हजारो बळी घेतले असताना तथाकथित डझनभर बळी न घेणार्या भगव्या दहशतवादाचे स्तोम त्यासाठीच माजवले जात असते. जितके अधिक मुस्लिम आक्रमक होतील, तितका भगव्या दहशतवादाचा जोरात डंका पिटला जाताना दिसेल. हाच खरा ब्राह्मण्य़वाद आहे आणि त्याचे अनुकरण करणारे मात्र अगत्याने ब्राह्मणांना शिव्या मोजताना दिसतील. किती चमत्कारिक विरोधाभास आहे ना? थोडक्यात आता भगवा दहशतवादाचा आरोप ही एक नवी सेक्युलर फ़ॅशन झाली आहे.
----भाऊ तोरसेकर -----
26 Feb 2013 - 12:41 pm | अनामिका
तब्बल चार आठवड्यापुर्वीची गोष्ट आहे. ‘पुण्यनगरी’च्या याच स्तंभातून मी केंद्रिय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या जयपूरच्या विधानातील खोटेपणा स्पष्टपणे कथन केलेला होता. तेव्हा अन्य माध्यमे त्यावर सावधपणे बोलत होती. लौकरच सुशिलकुमार आपली चुक वा खोटेपणा मान्य करतील व त्याची कबुली देतील असेही मी तेव्हाच म्हटलेले होते. मात्र ती वेळ इतक्या लौकर येईल, अशी माझी अपेक्षा नव्हती. पण संसदेच्या अधिवेशनाची कोंडी व्हायची पाळी आल्यावर शिंदे यांनी आपले शब्द मागे घेतलेच. अधिक दिलगिरीही व्यक्त केली आहे. माझ्या दृष्टीने ती दिलगिरी वा शिंदे खोटे पडण्याला महत्व नाही. त्यापेक्षा अतिशय महत्वाची बाब आहे; ती दहशतवादाच्या बाबतीतल्या अडाणीपणाची. मुस्लिम वा हिंदू दहशतवाद अशी लेबले लावून जे घाणेरडे मतांचे राजकारण चालते, त्याने देशाची सुरक्षा व जनजीवन किती धोक्यात आणले आहे, याचा त्यावर पांडीत्य करणार्यांनाही थांगपत्ता नसावा ही बाब अधिक घातक आहे. ज्याला रोगराई वा वैद्यकशास्त्राचे काडीचे ज्ञान नाही, अशा लोकांच्या इस्पितळात एखाद्या रोग्याला भरती केल्यास त्याच्या जीवाशी कोणकोणते खेळ होतील, त्याची कल्पना करा. म्हणजे आज आपला देश व समाज दहशतवादाचा शिकार का झालेला आहे, त्याचा अंदाज येऊ शकतो. कारण दहशतवाद म्हणजे नेमके काय त्याचाच थांगपत्ता नसलेले लोक यातले जाणकार म्हणून मिरवत असतात व पोपटपंची करीत असतात. त्यामुळे गल्लीतल्या दंगलीपासून बॉम्बस्फ़ोट व घातपातापर्यंत कशालाही ते दहशतवादाच्या व्याख्येत आणुन बसवतात. त्यामुळे होते काय? साधा ताप आणि डेंग्यू वा स्वाईनफ़्लू; यातला फ़रकच लोकांना कळेनासा होता. जेवढे अशा विषयातील अज्ञान अधिक, तेवढी रोगाची साथ झपाट्याने फ़ैलावत असते. म्हणूनच दहशतवाद म्हणजे नेमके काय व त्यातल्या दहशत शब्दाचा नेमका अर्थ काय; हे जाणून घेणे अगत्याचे आहे. त्यातही पुन्हा जिहाद व दहशतवाद यात जमीन अस्मानाचा फ़रक आहे. त्या दोघांची तुलना होऊच शकत नाही.
पहिली गोष्ट म्हणजे गुजरातची दंगल वा अन्य कुठलीही दंगल आणि घातपाती कारवाया; यांच्यात कसलेही साम्य नाही. दंगल ही जमावाकडून घडते वा तशी घडवून आणली जाऊ शकते. पण त्यात कितीही माणसे मारली गेली, म्हणून त्याला दहशतवाद म्हणता येणार नाही. कारण दंगल ही स्थानिक समाजघटक व त्यांचे जमाव यांच्यात होत असते आणि त्याला स्थानिक संदर्भ असतात. त्यामागे स्थानिक राजकीय शक्तीसुद्धा असू शकतात. पण त्यातून प्रस्थापित राजकीय सत्तेला आव्हान दिले जात नसते. उलट दहशतवाद हे प्रस्थापित सत्तेला दिलेले आव्हान असते. त्यामागे देशाबाहेरील सत्तेचा हात असतो. त्याकरिता बाह्य शक्ती कार्यरत असते. उदाहरणार्थ मुजाहिदीन, तोयबा वा अलकायदा अशा ज्या जिहादी संघटना आहेत; त्यांच्यामागे वेळोवेळी अमेरिका, पाकिस्तान व अन्य सत्ता उभ्या राहिलेल्या आहेत. तीन दशकांपुर्वी अफ़गाणिस्तानमध्ये जिहाद पुकारण्यात आला, त्यामागे अमेरिकेची प्रेरणा होती. आजच्या भारतातील व काश्मिरातील घातपातामागे पाकिस्तान सरकारची शक्ती उभी आहे. आपण कितीही नाकारणार असलो; तरी श्रीलंकेतील तामिळी वाघांच्या दहशतवादामागे भारत सरकारची शक्ती उभी होती. अगदी त्यांना आरंभीच्या काळात घातपाती लष्करी कारवायांचे प्रशिक्षण भारतीय सेनेकडून देण्यात आलेले होते, हे नाकारता येणार नाही. कारण त्याचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत. पुढल्या काळात चीन वगैरेंनी तामिळी वाघांचा उपयोग आपल्या राजकारणासाठी करून घेतला. आज आसामातील उल्फ़ा वगैरे संघटनांच्या दहशतवादाला बंगला देशच्या माध्यमातून चीन मदत करीत असतो. त्याचप्रमाणे नक्षलवादी माओवादी दहशतवादाला चीनचे सहाय्य लाभत असते. तर तोयबा व अन्य जिहादी संघटनांना पाकिस्तान, सौदी अशा देशांची खुली वा छुपी मदत मिळत असते. थोडक्यात मुद्दा इतकाच, की दहशतवाद हा कुठल्या तरी देशाच्या सत्तेचा पाठींबा असल्याशिवाय होऊच शकत नाही. त्यामुळेच हिंदू दहशतवाद असा जो आरोप केला जातो, त्यात काडीमात्र तथ्य नाही, कारण अशा कुठल्याही अतिरेकी हिंदू संघटनेला जगातल्या अन्य कुठल्याही देशाच्या सत्तेकडून मदत मिळू शकत नाही. मिळालेली नाही. ती मिळू शकली असती, तर मालेगाव किंवा तत्सम चिरकुट स्फ़ोटात ही मंडळी पकडली गेली नसती. त्यांना दंगलखोर म्हणता येईल. ते हौशी हिंदूत्ववादी आतिरेकी माथेफ़िरू नक्कीच आहेत वा असतील. पण त्यांची गणना कुठल्याही दहशतवाद्यांमध्ये होऊ शकत नाही.
म्हणूनच ज्याला हिंदू वा भगवा दहशतवाद असे संबोधले जाते त्यांची संख्या व साधने बघितली, तरी त्यांच्या हौशीपणाची साक्ष मिळू शकते. उलट कुठल्याही जिहादी घातपाताच्या घटना बघा, त्यातल्या कारवाया लष्करी सफ़ाईने पार पाडण्यात आलेल्या दिसतील. कारण त्यामागे सत्ता व कुठले तरी सरकार उभे आहे. दहशतवादाचा मूळ हेतू कुणाला मारण्याचा वा जीव घेण्याचा अजिबात नसतो, तर मृत्यूच्या भयाने ठराविक लोकांना शरण यायला भाग पाडणे, हाच त्यामागचा खरा हेतू असतो. हिंदू दहशतवाद म्हणून ज्याचा गवगवा केला जातो, त्या मालेगाव, अजमेर वा मक्का मशीदीच्या घटना नुसत्या बारकाईने बघितल्या, तरी त्यातली दंगलखोर वृत्ती लपत नाही. सुडाला पेटलेल्या माथेफ़िरुंची कृती असा तो प्रकार आहे. पण कसाब, अफ़जल गुरू, मुंबई वा अन्यत्रचे अनेक जिहादी स्फ़ोट सुडाची परिणती नसून त्यामागे पद्धतशीर युद्धयोजना दिसून येते. त्यामागे पाकिस्तानचा हात दिसून येतो. म्हणूनच जिहाद किंवा दहशतवाद म्हणजे नेमके काय प्रकरण आहे, ते समजून घेण्याची गरज आहे. कसाब किंवा अफ़जल हे सामान्य मोहरे होते, असाही दावा केला जातो, ते खरे सुद्धा आहे. पण दहशतवाद असाच खेळत असतो, त्यात कर्नल पुरोहित सारखा महत्वाचा माणूस कधी अडकू शकत नाही किंवा सापडू शकत नाही. म्हणूनच साध्वी किंवा पुरोहित अडकले; हाच त्यांच्या दहशतवादी नसल्याचा व सूडबुद्धीने बेभान झालेले असण्याचा पुरावा आहे. कारण त्यांना दहशत माजवायची होती असे दिसत नाही. त्यांना दहशत कशी निर्माण होते ते सुद्धा ठाऊक नसावे. त्यांनाच कशाला आपल्या देशाच्या गृहमंत्र्यांना तरी दहशतवाद म्हणजे काय व ती दहशत कशी निर्माण होते; त्याचा थांगपत्ता आहे काय? आपल्या देशाचे बाजूला ठेवा. अकरा वर्षापुर्वी न्युयॉर्कचे जुळे मनोरे उध्वस्त झाल्यावर अफ़गाणिस्तानला धडा शिकवायला निघालेल्या अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी थेट युद्धाचा पवित्रा घेतला व त्याला दहशतवाद विरोधी युद्ध असेही नाव दिले. पण अकरा वर्षे उलटून गेल्यावरही त्यांना त्या दहशतवादाचा पराभव करता आलेला नाही. आता थकूनभागून अफ़गाणीस्तान मधून माघार घेण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे. कारण इतकी वर्षे घालवल्यावर आणि इतके नुकसान सोसल्यावर त्यांना दहशतवादाचे खरे रूप लक्षात आलेले आहे. त्या दहशतवादाशी पारंपारिक युद्ध छेडून त्याला पराभूत करता येणार नाही, याच्या साक्षात्कारानेच अमेरिकेला माघार घ्यायची पाळी आणली आहे. मात्र दुसरीकडे दहशतवादाचे खरे रूप ओळखून त्याचा नि:पात करायला कंबर कसलेल्या श्रीलंकेने वर्षभरात तामिळी वाघांचा निर्णायक पराभव केलेला आहे. दोन देशांच्या या अनुभवातून आपण काही शिकणार आहोत काय; एवढाच प्रश्न आपल्यासमोर आहे.
ज्या रोगावर उपाय करायचा असतो किंवा ज्या समस्येचे निवारण करायचे असते, ती निदान आधी नेमकी समजून घेतली पाहिजे. तरच तिच्यावरचे उपाय शोधता येतात व योजता येतात आणि मगच त्याचे योग्य परिणाम मिळण्याची अपेक्षा बाळगता येत असते. अत्याधुनिक सेना व साधनसामग्री हाताशी असूनही अमेरिकेला अफ़गाण युद्धात माघार का घ्यावी लागली आहे? त्याच्या तुलनेत अत्यल्प साधने व मोजकी सेना हाताशी असताना श्रीलंकेच्या सेनेला तामिळी वाघांचे निर्दालन का करता आले; याचा अभ्यास म्हणूनच आवश्यक आहे. तो केला तरच दहशतवाद, जिहाद, नक्षलवाद आणि हिदू दहशतवादाचा बागुलबुवा यातला फ़रक लक्षात येऊ शकेल. त्यानंतरच त्यावरचे उपाय शोधता व अंमलात आणता येतील. या विषयात अमेरिकेमध्ये खुप अभ्यास चालतो. पण त्या पुस्तकी अभ्यासाचा उपयोग नसतो. ज्या अफ़गाण युद्धात अमेरिका जिहाद मोडून काढायला सरसावली; तिला दहशतवाद म्हणजे नेमके काय ते ठाऊक नव्हते, तिथेच तिचा पराभव झाला. कारण नेहमीचे युद्ध व त्यामा्गची प्रेरणा आणि जिहाद व दहशतवाद यामागची प्रेरणा, यातला फ़रकच अमेरिकन युद्ध जाणकारांना नव्हता. दहशत कशी व कोणत्या बळावर माजवली जाते आणि कुठल्या कारणास्तव दहशत माजवता येत नाही, याचे विश्लेषण म्हणूनच खुप मोलाचे आहे. त्याचे नवे युद्धशास्त्र आहे, जे सय्यद कुतुब वा ब्रिगेडीयर एस, के. मलिक अशांनी मांडलेले आहे. आपल्या वाहिन्यांवर पोपटपंची करणार्या कितीजणांना हे ठाऊक आहे? त्यांना ही नावे तरी माहित असतील की नाही, याची शंका आहे. धर्माचा दहशतवादाशी संबंध नाही ह्या दाव्यापासूनच मुळात चुक सुरू होते, चुकीच्या वाटेने जाऊन ध्येयापर्यंत पोहोचणार कसे? पाकिस्तानचे निवृत्त सेनाधिकारी ब्रिगेडीयर मलिक त्याचे नेमके तपशील देतात. धर्माचा व दहशतवादाचा नेमका संबंध कसा असतो?
----भाऊ तोरसेकर -----