भारताच्या सर्वोच्चपदावर दीर्घकाळ विराजमान असणार्या महात्यागी, महाबुद्धीमान, महातेजस्वी राजमाता सोनियाजींचे माहेर इटलीचे हे आपल्याला आठवत असेलच.
नुकतेच ह्या इटलीच्या एका हेलिकॉप्टर कंपनीने भारताला अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या वापराकरता डझनभर हेलिकॉप्टरे अफाट भावात विकली. त्यात मोठी लाचखोरी झाली अशा आरोपाखाली इटलीच्या सरकारने त्या कंपनीच्या प्रमुखाला अटक केली. ते झाल्यावर आपले धुतल्या तांदळासारखे स्वच्छ संरक्षण मंत्री व बाकी उच्चपदस्थ खडबडून जागे झाले. आता ते ह्या प्रकरणाची "सखोल" चौकशी करणार म्हणत आहेत.
नेहमीच्या स्वच्छ परंपरेनुसार इथेही काळ्या पैशाचे आकडे डोळे पांढरे करणारे आहेत.
मात्र महाराणींच्या माहेरची कंपनी असल्याने प्रश्न प्रतिष्ठेचा बनू शकतो. त्यामुळे शक्य तितके प्रयत्न करून भारत सरकार काखा वर करणार असे दिसते आहे. क्वात्रोचीजींचे उदाहरण ताजे आहे.
मागेही तंत्रज्ञानक्रांतीसूर्य राजीवजींच्या कारकीर्दीत ह्याच कंपनीने निकृष्ट हेलिकॉप्टरे भारताच्या गळ्यात मारली आणि नंतर ती नगण्य भावात विकली गेली. पण ते प्रकरणही दडपले गेले असावे.
इतक्या वर्षाच्या अनुभवाने इतक्या मोठ्या रकमांचा अपहार करताना नामानिराळे कसे रहायचे, कायद्याच्या कचाट्यातून कसे वाचायचे हे अगदी व्यवस्थित माहित झाल्याने कुणी उच्चपदस्थ ह्यात अडकतील अशी सुतराम शक्यता नाही. फारतर सैन्यातील कुणी ज्याने त्या मलिद्यातील दोन चार चमचे गिळले असतील त्याला बळीचा बकरा बनवतील आणि सारे कसे शांत होईल.
जय सोनियाजी!
http://www.loksatta.com/sampadkiya-news/one-more-scam-61041/
माहेरचा अहेर!
गाभा:
प्रतिक्रिया
14 Feb 2013 - 9:03 am | नाना चेंगट
सदर कंपनीचा आणि सोनीयाजींचा काहीही संबंध नाही. जे या प्रकरणात दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाईची आम्ही शिफारस करत आहोत. विरोधकांच्या काळातच या प्रकरणाचे बीज असल्याने त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. कुणीही दोषी मोकाट सोडला जाणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. न्यायप्रक्रियेत ढवळाढवळ करु नये. हा काळ अतिशय कठिण असून भारत अतिशय नाजुक अवस्थेत आहे. अशा वेळेस आपली ताकद सोनियाजींच्या मागे उभी करणे हेच राष्ट्रीय कर्तव्य आहे. देशहिताला प्राधान्य आधी दिलेच पाहीजे.
जय हिंद जय महाराष्ट्र जय सोनिया
14 Feb 2013 - 10:41 am | हंस
जय हिंद जय महाराष्ट्र जय सोनिया
नाना, क्रम चुकला का? ;)
जय सोनिया जय हिंद जय महाराष्ट्र!
14 Feb 2013 - 9:08 am | तर्री
हया कठीण परिस्थितीत "सोनियाजींच्या " मागे समर्थ पणे उभे राहावे. उगाच इटली बादरायण संबंध लावून त्याग्मूर्तीची बदनामी करू नये. एक स्री आपले सर्वस्व सोडून तुमची "बहु" बनते आणि देश सेवा करते. आपल्या मुलाचे कोवळे तारुण्य देशसेवेसाठी वेचते.....हाय आमचे दुर्भाग्य की काही संघी ह्याकडे कोत्या नजरेने पाहतात.
15 Feb 2013 - 2:38 am | आजानुकर्ण
सहमत
असहमत. संघ वेगळा आणि बाकीचे वेगळे... संघाचा याच्याशी संबंध नाही.
14 Feb 2013 - 9:34 am | श्री गावसेना प्रमुख
अमेरीकेने नाकारले ते भारताने स्विकारले
http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/today/main/DetailedNe...
चालु द्या परत भारतात सोन्याचा धुर निघायला लागला वाटते ह्या प्रकरणावरुन
आणखी एक ज्या अलिगढ मुस्लिम विद्यापीठात भारत मुर्दाबाद्,मोदींना फाशी द्या अश्या घोषणा दिल्या गेल्या त्याच विद्यापीठाने सोनियांना आजीवन सभासदत्व दिले.
14 Feb 2013 - 10:24 am | ऋषिकेश
अजून बर्याच गोष्टी स्पष्ट व्हायच्या आहेत. उलटसुलट माहिती तथ्य या नावाखाली दाखवली जात आहे.
थोडे दिवस थांबुन मग मत देता यावे.. सध्या नुसताच धुरळा आहे
बाकी, निष्पक्ष चौकशी व्हावी हे योग्यच!
15 Feb 2013 - 2:01 am | हुप्प्या
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/18496528.cms
विरोधाभास पहा. लाचखोरीत गुंतलेले उच्चपदस्थ लष्करी अधिकारी हवाई दलाचा प्रमुख त्याचे नाव एस पी त्यागी! किती हा त्यागी मनुष्य!
सदर प्रकरणात टेंडर पास व्हावे म्हणून त्यागी साहेबांचा टेंडर कॉर्नर वापरून काही सुस्वरुप कन्या त्यांच्या "सेवेकरता" पाठवल्या गेल्याची किंवदंता आहे. ह्या त्यागी मनुष्याचे विमान लवकरच जमिनीवर येईल अशी आशा.
सदर इसमाने आपल्या नातेवाईकांचाही ह्या लाचखोरीकरता उपयोग केला होता असे दिसते आहे.
बघू या हे प्रकरण किती दिवस गाजते ते.
15 Feb 2013 - 2:15 am | आजानुकर्ण
अहो चालायचेच. आता आडवाणींच्या पाकिस्तानातून नाही का अतिरेकी निर्यात होत. अगदी अलीकडेच एकाला फाशी दिली म्हणे.
असो. भ्रष्टाचाराच्या खटल्याची निष्पक्ष चौकशी होऊन दोषींना शिक्षा व्हावी असे वाटते.
15 Feb 2013 - 2:19 am | अग्निकोल्हा
स्त्रियांच्या कर्तुत्वाला कमी लेखायचा अतिशय जालिम कट या कारस्थानामागे शिजतोय.
15 Feb 2013 - 7:52 am | नितिन थत्ते
सदर कंपनीला फायद्याचे व्हावे म्हणून टेंडरची स्पेसिफिकेशन शिथिल केल्याचेही समजते.