मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ह्या कन्नडीगांना आलाय माज

पाषाणभेद · · जे न देखे रवी...
काव्यरस
ह्या कन्नडीगांना आलाय माज ह्या कन्नडीगांना आलाय माज तो माज आता काढू मोडून अर्रे 'देत नाही देत नाही' म्हणता कशाला चलारं बेळगाव कारवार सीमाभाग घेवू ओढून ||धृ|| लई तुरूंगवास करवला रे तुम्ही काय सहन नाही केलं आम्ही मराठीसाठी किती रक्त वाहवलं ह्या कन्नडीगांना आम्हां डिवचलं लई झालं आता उठला मराठी माणूस पेटून चलारं बेळगाव कारवार सीमाभाग घेवू ओढून ||१|| अरे गल्या-बोळांना नावं आमची सार्‍या दुकानांना नावं आमची सार्‍या शाळा रे आमच्या आमच्या सारी आडनावं आमची आमची बेळगाव महानगरपालीका आमची एका ठरावानं होईल का तुमची? आता चाला तोडू कर्नाटक विधान भवन चलारं बेळगाव कारवार सीमाभाग घेवू ओढून ||२|| आहे जसं कन्नडी शासन मुजोर त्याला सामील केंद्रशासन कमजोर खेळी दोघांनी केली विधानभवनाची साक्ष आहे जशी उंदराला मांजराची बास झालं लई झालं बंद करा तुमचं दडपशाहीचं संमेलन चलारं बेळगाव कारवार सीमाभाग घेवू ओढून ||३|| या सीमेपाई एक पिढी गेली की रं आमची ही सारी जमीन आमच्या बापजाद्याची जमवून सारी फौज मराठी माणसाची ईच्छा पुरी करू महाराष्ट्री जाण्याची सांगून ठेवतो मुस्कटदाबी करू नका उगा आमच्यावर वार करू नका महाराष्ट्रात जाण्यासाठी आमची तर फोडूच पण तुमचीबी डोकी फोडू सांगून ठेवतो मिशीला पिळ देवून चलारं बेळगाव कारवार सीमाभाग घेवू ओढून ||४|| -(अपुर्ण - योग आलाच तर पुर्ण करेन) महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी आपण सार्‍या 'ऑनलाईन मराठी कम्युनिटीजनी' मुजोर कर्नाटक, मरगळलेले मराठी नेते अन नाकर्ते केंद्रशासन यांचा ऑनलाईन निषेध करायला हवा. -पाषाणभेद

वाचन 21072 प्रतिक्रिया 0