मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मूगाच्या डाळीची खिचडी

Pearl · · पाककृती
हा वन डीश मील साठी छान, सोपा, टेस्टी ऑप्शन. ही खिचडी कमी तिखट केली तर लहान मुलं पण आवडीने खातात. लहान मूलांना द्यायला हा एक हेल्दी ऑप्शन आहे. साहित्यः अर्धी वाटी तेल, अर्धा टीस्पून जिरे, अर्धा टीस्पून मोहरी, पाव टीस्पून हिंग, पाव टीस्पून हळद, कढिलिंबाची ४-५ पानं, २/३ पाकळ्या लसूण बारीक चिरून किंवा किसून (साधारण १ टीस्पून), कच्चे/भाजलेले शेंगदाणे पाव वाटी, सुकं खोबरं अर्धी वाटी, गोडा मसाला अर्धा टीस्पून, तिखट अर्धा टीस्पून, तांदूळ १ वाटी, पाऊण वाटी हिरवी (स्प्लिट) मूगडाळ, १ टीस्पून मीठ, ४ वाट्या पाणी कृती: १) एका स्टीलच्या कुकरमध्ये तेल गरम करत ठेवावे. एकीकडे तांदूळ आणि मूगाची डाळ धुवून ठेवावी. २) तेल गरम झाले की त्यात जिरे, मोहरी, हिंग घालून फोडणी करावी. आता त्यात शेंगदाणे, कढिलिंब, लसूण घाला. शेंगदाणे परतून घ्या. मग सुकं खोबरं घाला. हळद घाला. मग तांदूळ आणि मूगाची डाळ घाला. चांगले परता. ३) आता त्यात पाणी, तिखट, मीठ, गोडा मसाला घाला. आवडत असल्यास १ चमचा तूप घाला. ४) कुकरचे झाकण लावून मध्यम आचेवर ३ शिट्ट्या होऊ द्या. ५) १५ मिनिटांनी कुकरचे झाकण पडले/निघाले की गरम गरम मूगाच्या डाळीची खिचडीवर तूप घालून लोणचे, दही, भाजलेला/तळलेला पापड ह्या बरोबर खा. टीपः इथे १ वाटी = १ आमटीची मोठी वाटी असे प्रमाण घेतले आहे. abc

वाचन 7595 प्रतिक्रिया 0