विष्णुसहस्त्रनाम - पुणे येथे

विटेकर's picture
विटेकर in जनातलं, मनातलं
28 Aug 2012 - 6:18 pm

पुण्यातील लोकांच्या श्रेयस आणि श्रीकृष्ण प्रीतीसाठी भागवत अभ्यास वर्ग पुणे तर्फे पुण्यात
विष्णू सहस्र नाम पठण आयोजित केले आहे
१००० नामप्रेमी एकत्र आले व त्यांनी प्रत्येकी १० वेळा पठण केले तर १० सहस्र आवर्तने सहज होतील
दिवस ८ सप्टेबर २०१२ अधिक भाद्रपद कृ अष्टमी
वेळ दुपारी २.३० ते ६.३० (प्रत्यक्ष पठण ३ ते ६ ) या वेळेत
ठिकाण सुपर्ण कार्यालय ,अरण्येश्वर रस्ता,पुणे सातारा रोड
सर्व पुणेकरांनी सहभागी व्हावे .परगावच्या लोकांनी आपल्या पुण्यातील आप्त परिचितांना निरोप द्यावा
अधिक माहितीसाठी आणि प्रतिसादासाठी उत्तर द्या अथवा ९८६००३२०८२ वर फोने करा
धन्यवाद श्रीकृष्ण शरणं मम!
आपटे ( धर्मयज्ञ मसिक )

-----
मी तो भारवाही हमाल ..
श्री . दिलिप आपटे गुरुजी , मिरज यांच्याकडून आलेल्या माहितीचे मी फक्त आलोडन केले आहे.

धर्मबातमी

प्रतिक्रिया

तिमा's picture

28 Aug 2012 - 9:00 pm | तिमा

मी फक्त आलोडन केले आहे.

नवीन शब्द कळल्यामुळे ज्ञानात भर !
'आलोडन'. कुठे कुठे वापरता येईल याचा विचार करतो आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

28 Aug 2012 - 11:20 pm | अत्रुप्त आत्मा

आ... लोडन करणे,म्हणजे चढवणे। असा अर्थ अभिप्रेत आहे काय?

शुचि's picture

28 Aug 2012 - 11:44 pm | शुचि

त्यांना निवेदन म्हणायचे असेल जे चुकून आलोडन झाले =)) =))

आलोडन शब्दाचा वापर जरा चुकला की काय अशी एक शंका येतेय. आलोडन=परिशीलन हा अर्थ काही जुन्या पुस्तकांवरून वाटतो. त्याचे स्पेशल आंजासाठी रूप वापरले की काय अशी शंका आल्या गेली आहे. तसे असेल तर अपलोडन देखील चपखल बसावा अशी आपली एक सजेशन् :)

त्या बातमीकडे लक्ष द्या रे .... आलोडन आलोडन बास झाले =)) =))

मिपाकर बहुतेक आलोडनसहस्त्रनाम करतील कि काय अशी शंका येतेय ;)

सोबत साबुदाण्याच्या खिचडीचा अल्पोपहार आहे का?

अत्रुप्त आत्मा's picture

29 Aug 2012 - 1:17 pm | अत्रुप्त आत्मा

@ खिचडीचा-अल्पोपहार >>>
एकाच वाक्यात दोन परस्पर विरोधी शब्द वापरल्या बद्द्ल...णिषेध..णिषेध..णिषेध..! ;)

कॉमन मॅन's picture

29 Aug 2012 - 1:26 pm | कॉमन मॅन

आमच्या माहितीप्रमाणे साबुदाण्याची खिचडी ही अल्पोपहार म्हणूनच खातात म्हणून तसा उल्लेख केला. अर्थात, आपण ती किती खावी हा पूर्णत: आपला अधिकार आहे आणि आम्ही त्याचा आदर करतो..

अत्रुप्त आत्मा's picture

29 Aug 2012 - 1:37 pm | अत्रुप्त आत्मा

@ही अल्पोपहार म्हणूनच खातात >>> कॉमन मॅन तुंम्ही नक्कीच अल्प खात असाल,पण आमच्या पहाण्यात साबुदाण्याच्या खिचडीचं समीकरण कचकावुन हदडणे,असच जास्तीत जास्त पहाण्यात आलय. म्हणुन मी उपरोध केला गमतिनी :)

========================================================
किसणीधारं बटाटखारं,शेंगदाण्णं सुरस्सम ।
साबुदाणं रबरं सदृशं श्वेतवर्णं च्यूईंगम॥ ;)

कॉमन मॅन's picture

29 Aug 2012 - 1:42 pm | कॉमन मॅन

पण आमच्या पहाण्यात साबुदाण्याच्या खिचडीचं समीकरण कचकावुन हदडणे,असच जास्तीत जास्त पहाण्यात आलय. म्हणुन मी उपरोध केला गमतिनी

मनमोकळा प्रतिसाद आवडला..!

बाळ सप्रे's picture

29 Aug 2012 - 4:38 pm | बाळ सप्रे

श्रेयस आणि श्रीकृष्ण प्रीतीसाठी

म्हणजे नक्की कशासाठी ??

श्रेयस (हीतकारी) आणि प्रेयस (स्वतःला प्रिय )अशा २ गोष्टींच्या मागे माणूस धावतो का काहीसं वाचले आहे. पैकी दोहोत द्वंद्व निर्माण झाल्यास श्रेयस निवडावे जसे नामसंकीर्तन = श्रेयस, इतर निरुद्योग = प्रेयस वगैरे वगैरे

बाळ सप्रे's picture

31 Aug 2012 - 12:21 pm | बाळ सप्रे

शब्दप्रयोग समजावून सांगितल्याबद्दल धन्यवाद !!
मलातरी हे काम श्रेयस वाटत नाही..प्रेयस तर नाहीच नाही.. :-)

मेघवेडा's picture

30 Aug 2012 - 4:59 pm | मेघवेडा

आलोडन असा संस्कृत शब्द आहेच. पण त्याचा अर्थ मंथन असा आहे. :)

आ + लुड असा मूळ धातु (दशमगण उभयपदी - आलोडयति/आलोडयते)* - हलविणे, घुसळणे या अर्थी.

तुम्ही माहिती घुसळत नाही आहात, तेव्हा आलोडन हा शब्दप्रयोग वरील वाक्यात चुकीचा वाटतो!

* - खात्री नाही.

प्रास's picture

30 Aug 2012 - 6:12 pm | प्रास

'आलोडन' या शब्दाचा अर्थ 'लेपन' या अर्थाशी मिळता जुळता वाटतो. तरी मेवे म्हणतायत त्याप्रमाणे 'घुसळणे'पेक्षा 'घोळवणे' असा अर्थ जास्त संयुक्तिक दिसतो. अधिक माहिती मिळतेय का ते बघतो.

बाकी, धागाकर्त्याला कदाचित आलोचन सारखा शब्द वापरायचा असावा असं वाटतंय.

नाना चेंगट's picture

30 Aug 2012 - 6:06 pm | नाना चेंगट

असले पठन करुन काय फायदा?

निनाद's picture

3 Sep 2012 - 11:21 am | निनाद

नक्की काय फायदा ते माहिती नाही.
पण एकत्र म्हणायला मजा येते हे नक्की.

अमोल केळकर's picture

31 Aug 2012 - 3:20 pm | अमोल केळकर

उपक्रमास शुभेच्छा :)

अमोल केळकर