असाच एकदा फिरत असताना एका पुस्तकाच्या प्रदर्शनात गेलो होतो , तिथे माझ्या मुली करता करून पहा हे अरविंद गुप्तांचे पुस्तक घेतले , घरी आल्यावर पुस्तका बरोबर आलेली CD बघत आसताना त्यात त्यांच्या arvindguptatoys .com याचा ऊल्लेख दिसला म्हंटले पाहावे तरी जाऊन आजून काही मजेशीर खेळणी किंवा टाकाउतून टिकाऊ करण्याकरिता काही कल्पना मिळता आहेत का ते.
तर पहिल्याच पानावर मराठी हिंदी व इंग्लिश पुस्तकांचा दुवा दिसला म्हणून जाऊन बघतो तर काय ही मोठी यादी होती. मराठी , इंग्लिश व हिंदी पुस्तकांची.
त्यातली काही उतरवून वाचली आहेत.
या दुव्यावर साधारण खालील प्रकारची पुस्तके आहेत.
१) ओरोगामी
२) विज्ञान विषयक
३) शैक्षणिक
४) गोष्टी
व इतर बरीच पुस्तके आहेत.
चांगल्या गोष्टींचा मिपाकरांना पण आस्वाद घेता यावा म्हणून हा खटाटोप .
धन्यवाद .
प्रतिक्रिया
21 Jul 2012 - 8:41 am | चौकटराजा
पंकजराव , मागे टीवी वर त्यांचे कार्यक्रम पाहिले आहेत. खरोखरच कल्पकतेची कमाल आहे या माणसाची.
लिंक पहातो.
धन्यवाद !
21 Jul 2012 - 6:44 pm | अशोक पतिल
छान वेब साइट लिकं ची माहीति दिलीत .
धन्यवाद !
21 Jul 2012 - 9:37 pm | मनोज श्रीनिवास जोशी
आवडले .हा दुवा दिल्या बद्दल आभार .
22 Jul 2012 - 10:32 pm | पैसा
पुस्तके आहेतच, पण इतर बर्याच गोष्टी मुलांनी पण करण्यासारख्या आहेत. धन्यवाद!
23 Jul 2012 - 11:19 am | मी_आहे_ना
पंकजराव, दुवा दिल्याबद्दल धन्यवाद, चांगली 'लिंक'