(कळले ते फंडे)

Primary tabs

नाना चेंगट's picture
नाना चेंगट in जे न देखे रवी...
4 Jul 2012 - 6:23 pm

प्रेरणा - ऋषीकेषाला कळलेले अंडे

लिहिल्या लेखना पटकन केवळ कळले ते फंडे
नेमक्यावेळी डिलिट करुनी मारले ते दंडे

अनिवासी वाद, तोडी पाणी, भट्टी जमली वाट्टं
परंतु मागच्या चावडीमागे शिजले ते फंडे

धोरणाच्या पेप्रात मी दिली उत्तरे सारी
तरी पेपरावरती शेवटी उरले ते फंडे

झकास ठुमक्या नंतर देवा मनभावे स्मरले.
दुखतील भावना म्हणूनी ढोसले ते फंडे

रंगत चढल्या मैफिलीत मग मीही घेतली तान
पण पीसीवर बसल्याबसल्या बोलले ते फंडे

**नेहमीच्या फंडे महोत्सवाच्या निमित्ताने पटकन काही स्फुरले. वृत्त वगैरेवर अजिबात विचारही केलेला नाही

सदर काव्य आमचे परममित्र परा यांना समर्पित.
त्यांचा पार्श्वभाग सध्या हुळहूळत आहे कदाचित ह्या मलमाचा उपयोग व्हावा.

रौद्ररसनृत्य

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

4 Jul 2012 - 6:35 pm | मुक्त विहारि

मस्त..

पैसा's picture

4 Jul 2012 - 11:07 pm | पैसा

पराला नाना डाक्टराचं औषध लागू पडलं की!
बाकी काय! संडे हो या मंडे, रोज वापरा फंडे!!

श्रीरंग_जोशी's picture

5 Jul 2012 - 7:22 am | श्रीरंग_जोशी

विडंबन करावे तर ते नानांनीच, असे वाटले.

अत्रुप्त आत्मा's picture

5 Jul 2012 - 8:09 am | अत्रुप्त आत्मा

:-D
परा...अता मरा ! ;-)

नाना चेंगट's picture

5 Jul 2012 - 6:18 pm | नाना चेंगट

सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे आभार :)

मराठमोळा's picture

6 Jul 2012 - 6:53 am | मराठमोळा

>>सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे आभार

हा कोंचा फंडा? ;)

बाकी "नृत्य रौद्ररस" इथेच फुटलो. :)

नाना चेंगट's picture

6 Jul 2012 - 5:25 pm | नाना चेंगट

>>>>हा कोंचा फंडा? Wink

पद्धत आहे थोरामोठ्यांनी अंगिकारलेली... :)

llपुण्याचे पेशवेll's picture

6 Jul 2012 - 1:18 pm | llपुण्याचे पेशवेll

वाह वाह .. छान छान.

परिकथेतील राजकुमार's picture

6 Jul 2012 - 5:44 pm | परिकथेतील राजकुमार

पुप्याने वाह वाह केल्याने आम्हाला वाह वाह करायला लागणे ओघाने आलेच.

नानबा काहीतरी क्रिएटिव लिहीत जा बरे. गेला बाजार भारताला, संस्कृतीला नावे ठेवणारे, मनमोहन साहेबांची टिंगल उडवणारे असे एखादे वाक्य तरी लेखनात येऊ देत जा. नाहीतर उगाच तुझे लेखन बाद ठरवले जायचे.

कुंदन's picture

6 Jul 2012 - 6:02 pm | कुंदन

>>नानबा काहीतरी क्रिएटिव लिहीत जा बरे. गेला बाजार भारताला, संस्कृतीला नावे ठेवणारे, मनमोहन साहेबांची टिंगल उडवणारे असे एखादे वाक्य तरी लेखनात येऊ देत जा. नाहीतर उगाच तुझे लेखन बाद ठरवले जायचे.
+१