मराठी शुद्धलेखन : दशा आणि दिशा.
समर्थ मराठी संस्था, पुणे तर्फे शनिवार, दिनांक ०२. ०८. ०७ या दिवशी दुपारी ०४ ते ०७ या दरम्यान 'महाराष्ट्र साहित्य परिषद'च्या, माधवराव पटवर्धन, पुणे येथील सभागृहात 'मराठी शुद्धलेखन : दशा आणि दिशा' या विषयावर श्रीमती सत्त्वशीला सामंत यांचे व्याख्यान आणि प्रश्नोत्तरे - चर्चा असा कार्यक्रम आयोजित केला आहे.
कृपया या विषयात रुची आणि आवड असणाऱ्यांनी या कार्यक्रमात जरुर भाग घ्यावा.
संपर्क : प्रा. अनिल गोरे, ९४२२००१६७१.
काही शंका,
मराठीचे व्याकरण आणि शुद्धलेखनावरच आता का बरे चर्चा होत आहे?
मराठीचे व्याकरण आणि शुद्धलेखनावर संस्कृतचा प्रभाव असावा का?
(इतर भाषेमध्येही असेच प्रवाह चालू आहेत का?फ़्रेन्चमध्ये ७०० वर्षांत काहीही सुधारणा झाल्या नाहीत. बंगाली लिपीत लिहिली जाणारी मैते भाषा तिच्या जुन्या कालबाह्य झालेल्या लिपीत लिहावी अशी चळवळ चालू आहे. उडिया लिपीतून ऋ, ॡ काढून टाकावे अशी मागणी आहे. तशीच जरूर असेल तर ऋषिकुमार हा शब्द मुनिकुमार असा लिहावा असे या लोकांचे म्हणणे आहे(?). मलयाळम्ने लिपी सुधारणेचा प्रयत्न करून पाहिला. आता नवीन विद्यार्थ्यांना जुनी लिपीही येत नाही आणि नवी देखील. हिंदीत नुक्ता आणि चन्द्रबिन्दू नकोत असे काही जणांचे म्हणणे आहे, पण या सुधारणांना तेथील विद्वानांची संमती नाही. तसेच गुजराथीच्या अशुद्धलेखनाचा पुरस्कार करणारी ऊंझा-सुधारणा अजून रूळलेली नाही. तमिळमध्ये कुठलीही सुधारणा करण्याचा विचार चालू आहे असे ऐकिवात नाही. आधार आणि सौजन्य: उपक्रमवरील चर्चा)
भाषा हे प्रवाही माध्यम असल्यामुळे काही बदल व्हावेत का?
सर्वसामान्यांचे याबाबतीत काय मत आणि अनुभव आहे.
विद्वानांचे एकमत शक्य आहे काय? (१९६२च्या शुद्धलेखन सुधारणा राजकारण्यांच्या सोयीसाठी होत्या, हे कुणीही विसरू नये. आधार आणि सौजन्य: उपक्रमवरील चर्चा).
या सर्व चर्चा आणि विवादातून मराठीचे पाऊल पूढे पडेल का?
पुण्यातील मिपाच्या सर्व सभासदानी कृपया उपस्थित रहावे ही विनंती.
मिपाचे सर्वच सभासद जे प्रत्यक्ष कार्यक्रमाला उपस्थित राहू शकणार नाही त्यांनी आपापल्या शंका , आपले विचार आणि मते येथे अवश्य मांडावीत. ती सत्त्वशीला बाईकडे नक्कीच मांडली जातील.
मिपा सरंपच : उपक्रमवरील चर्चा येथे कापा आणि डकवा अश्या पद्धतीने लिहिली आहे. कृपया यास स्थान द्यावे.
वाचन
7596
प्रतिक्रिया
0