मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

खरबुजाचा आस्वाद

सर्वसाक्षी · · कलादालन
संकष्टी म्हणजे कडक उपास. उगाच उपास म्हणायचा अणि खिचडी, साबुदाणे वडे हाणायचे हे बरे नाही. अजिबात काही खायचे नाही. आपला पोटाला आधार म्हणुन चार पाच फळं खाल्ली की झाल. फळं म्हणजे कलिंगड, फणस अशी मोठाली नाहीत, छोटीशी - सफरचंद, पेर, केळ, संत्र, मोसंब, चिकु वगैरे. परवा रविवारी संकष्टी म्हणताना शनिवारी फळ आणली. बायकोनं आग्रह केला म्हणुन एक इवलस खरबूजही घेतलं. मोठ मजेशीर फळ! त्याची साल लक्ष वेधुन घेत होती. रविवारी सकाळी कॅमेरा बाहेर काढला, ते खरबूज टेबलावर जरा प्रकाशात घेतलं. अशी नक्षिदार साल लेन्स मधुन बघायला काय मजा आली म्हणता. Image removed. इथल्या खगोलशास्त्रज्ञांना हा एखाद्या ग्रहाचा फोटु वाटायचा Image removed. या नक्षीकामाची सुरुवात बुडातुन होऊन ती वर वलयाकारात पसरत गेली होती Image removed. सालीवरच्या रेघा रेघांच्या कलाकुसरीत मजा होती. कुठे शार्क, तर कुठे पंख पसरलेला समुद्रपक्षी तर कुठे पालथी पडलेली पाल असे असंख्य आकार दिसत होते. एका बाजुला सीमारेषा देखिल होती. Image removed. काही नक्षी जरा विरळ होती आणि शिकाऊ कलाकारान संगमरवरावर काढलेलं ओबड धोबड नक्षीकाम भासत होतं. Image removed. काही ठिकाणे समुद्रात उभ्या असलेल्या नौका आणि त्यांच्या आजुबाजुला तरंगणारी होडकी असा देखावा दिसत होता. Image removed. देठाच्या अगदी लगतचा भाग तुळ्तुळीत होता. थोड्या अंतरापासून आडव्या रेषांची वलयाकार नक्षी सुरू झाली होती आणि पुढच्या रेषा त्या वलयांकित रेषांना लंबरेषेत वर गेल्याहोत्या Image removed. जिथुन नक्षी सुरू झाली तिथुन मोठा प्रवाह रेषांना वेगाने बाहेरच्या दिशेने भिरकावत असलेले दिसत होते. Image removed. Image removed. पलिकडच्या भागाचे निरिक्षन केले असता काही मानवी आकृत्या आणि चक्क ईंग्रजीतील 'ए' हे अक्षर दिसुन आलं. Image removed. फोटु टिपताना वेळ कसा गेला ते समजलंच नाही. मग अचानक भूकेची जाणीव झाली आणि लगेचच आज संकष्टी असल्याची आठवण झाली. इतका वेळ मी खरबुजाकडे 'त्या' नजरेने पाहिलच नव्हतं. कॅमेरा बाजुला ठेवला आणि सुरी हातात घेतली.
लेखनविषय:

वाचन 10884 प्रतिक्रिया 0