वि.सू. :- शीर्षक वाचून घाबरू नका...गंभीर काहीच नाही खाली! वाचून बघा....:)
गेल्या आठवड्यात कामामुळे आणि करामुळे -- दोन्ही कर, आपले हात; सदा-सर्वकाळ गुंतले होते, त्यामुळे इथे येणे जमलेच नाही...नाही म्हणायला तल्ल्फ फार व्हायची पण सी.ए. आणि टॅक्स चे टेंशन ह्यामुळे हालत फारच खराब होती....त्यात पुन्हा मिसळपाव विड्रॉवल सिंड्रोम मुळे जिवाला फारच घरघर लागून गेली होती बुवा....सदर इसम (मीच कि हो!) आता बराच बरा आहे , आणि आज दुपारपासून जेवणानंतर केवळ मिसळपाव चा खुराक चालू केल्यामुळे तब्येत झपाट्याने सुधारत आहे!
अरे खरच....५-६ दिवसांनी येऊन बघतो तर इथे तर मेजवानीच...पिडाकाका, रामदास, भडकमकर मास्तर...सगळेच बढिया!!!!!!!!!!!!
अजून किती पक्वांनाकडे नजर गेली नाही ते माहितच नाही...छे! फारच बॅकलॉग राहिलाय बुवा...कधी वाचायचे एवढे सगळे? त्याचेच टेंन्शन येतेय.....आता निदान दिवसातले २ तास तरी फक्त वाचायला देले पाहिजे रोज...(स्वगत :- नाहितरी स्वतः लिहितो ते कळते का स्वतःला तरी, वाच कि त्यापेक्षा पिडाकाका, रामदास, भडकमकर मास्तर आणि तशा भारी मंडळींचे!!:P)
छे!छे!छे! किती सारं वाचायचं.....आणि काम तर संपत नाही. मंडळी, तर तुम्हाला काय वाटते?
आपल्या ह्या हव्याहव्याशा मिसळपाव विड्रॉवल सिंड्रोम चे काय करायचे?
प्रतिक्रिया
28 Jul 2008 - 4:03 pm | अन्जलि
मि ११० % सहमत आहे. माझिहि हिच अवस्था होते मग ठरवते कि आता मिपावर मुळिच फिरकायचे नाहि पण मग रहावत नाहि आणि आपोआप मिपावर पोचते काम रहाते बाजुलाच.
28 Jul 2008 - 7:07 pm | राधा
बरोबर आहे हो तुमचा...........
28 Jul 2008 - 7:38 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
पिडाकाका, रामदास, भडकमकर मास्तर आणि तशा भारी मंडळींचे!!
याला का हो जीभ बाहेर काढता? मी तर पिडाकाका एट अल ची फ्यान झाले आहे.
(मिपा ऍडिक्ट) अदिती
28 Jul 2008 - 8:23 pm | मनिष
फॅन आहे. जीभ (माझ्या) आगाऊपणाबद्द्ल बाहेर काढली.
- मनिष
अवांतर - माझ्यासाठी 'तू'च ठिक आहे.
31 Jul 2008 - 8:58 am | विसोबा खेचर
मनिषराव,
कुठल्याही गोष्टीचं व्यसन वाईट बरं! :)