कॉर्बेट, कौसानी, नैनिताल - भाग १
एडवर्ड जेम्स जिम कॉर्बेट अर्थात जिम कॉर्बेट शिकार्यांमधला सचिन तेंडुलकर होता. (तेंडुलकर क्रिकेटरांमधला जिम कॉर्बेट होता असे म्हणणे खरे म्हणजे जास्त सयुक्तिक आहे पण असे मिपावर लिहिणे फारसे शहाणपणाचे होणार नाही.). या माणसाने भारतीय वाघांवर फार मोठे उपकारही केले आहेत आणि अपकारही. आयुष्याच्या सुरुवातीस जिम कॉर्बेट शुद्ध शिकारी होता. त्याने ढीगाने वाघ मारले. त्यावर रसाळ भाषेत, उत्कंठावर्धक पुस्तकेही लिहिली. Leopard of Rudraprayag, Maneaters of Kumaon आणि देवळाचा वाघ (हे मी मराठीतुनच वाचले आहे फक्त) ही त्याची पुस्तके तर निव्वळ वाचन सुख. एक शिकारी, एक छायाचित्रकार एवढे छान, ओघवत्या शैलीत लिहु देखील शकतो आणि ते आज ६-७ दशकांनंतर देखील वाचनीय वाटते याचे खरोखर कौतुक वाटले होते.
सौ चुहे खाकर बिल्ली चली हाज को असे काहितरी जिम कॉर्बेटच्या बाबतीत झाले असावे. नैनिताल मध्येच जन्मलेला तो. कुमाउ, गढवाढ, नैनिताल या भागांची त्याला सखोल माहिती. त्याला बेडर वृत्ती, साहसांची आवड आणि बंदुकीचा षौक यांची साथ मिळाली आणि एक अजरामर शिकारी जन्माला आला. पण नंतर जिम कॉर्बेटने केवळ नरभक्षक वाघांच्या शिकारी केला. वाघांना आणि इतर प्राण्यांना शूट करणे त्याने नंतरही चालुच ठेवले पण केवळ कॅमेरा हातात धरुन. आयुष्याचा उत्तरार्ध त्याने भारत आणि केनियात वनसंवर्धन आणि पशु संवर्धनासाठी खर्च केला. भारतातल्या वाघांची आणि केनियातल्या सिंहांची लक्षणीयरीत्या कमी होणारी संख्या त्याला अस्वस्थ करत गेली. त्यातुनच कॉर्बेट नॅशनल पार्कचा उदय झाला असे म्हणता येइल.
सुरुवातीला त्या अभयारण्याचे नावा हॅले नॅशनल पार्क होते मग त्याचे रामगंगा नॅशनल पार्क झाले आनी मग १९५७ सालापासुन जिम कॉर्बेटच्या नावाने ते ओळखले जाउ लागले. कॉर्बेट नेशनल पार्क खरोखर भव्य आहे. थोडेथोडके नाही ५२० स्क्वे. किमीवर हे पार्क वसलेले आहे. त्यातला ३२० स्क्वे कि चा परिसर १९७४ साली टायगर रिझर्व म्हणुन घोषित झाला. हे नॅशनल पार्क ३ राज्यांमध्ये विभागले गेलेले आहे आणि वेगवेगळ्या राज्यातली वेगवेगळी नावे लक्षात घेता त्याचा परिसर तब्बल १३०० स्क्वे मी पेक्षा जास्त आहे.
मी काही खर्या अर्थाने पर्यावरणप्रेमी नाही. म्हणजे पक्षी दिसला की अर्रे तो बघ ब्लॅक हॉर्नेट असे मी छातीठोकपणे सांगु शकत नाही. अंतर जास्त असेल तर कावळा आणि खंड्या पण मला एकसारखेच वाटतात. घार आणि गरुड यांची सरमिसळ करणे माझ्यासाठी अवघड नाही. गवती चहा आणि काँग्रेस गवत यातला फरकही मला नीटसा कळत नाही. तरीदेखील कॉर्बेटला जाण्याची, तो माहैल एंजॉय करण्याची मला मनापासुन उत्सुकता होती. त्या उत्सुकतेपोटीच असेल कदाचित पण चांगली कंपनी मिळाल्यावर मी कॉर्बेटला जायचा प्लॅन अगदी लगोलग पास करुन घेतला.
दिल्लीपासुन साधारण ७-८ तासांच्या रोड ड्राइव्ह नंतर कॉर्बेटला पोचता येते. राहण्याची व्यवस्था जंगलातील शासकीय विश्रामगृहात किंवा बाहेरील अनेको हाटेलांमध्ये होउ शकते. जंगलात रहायचे असेल तर बर्याच आधी व्यवस्था करणे बरे. आत राहण्याचा फायदा म्हणजे सकाळी लवकर फेरफटका मारायला बाहेर पडता येते त्यामुळे प्राणी जास्त दिसु शकतात आणि दुसरे म्हणजे निसर्गाचा पुरेपुर आनंद घेता येतो. जंगलाबाहेर राहणार्यांनाही सकाळी ६ ते १० या वेळात जंगल सफारी करता येतेच. चांगली गोष्ट अशी की त्यावेळेस नेशनल पार्कचा एक अतिशय प्रशिक्षित गाइडदेखील आपल्याबरोबर असतो. आम्हाला जो गाइड मिळाला होता त्याचे पशू पक्ष्यांचे, त्यांच्या आवाजाचे, पाउलखुणांचे ज्ञान थक्क करणारे होते.
सकाळी सकाळी ५ वाजता उठवुन ६ वाजता सफारीसाठी बाहेर पडायचा प्लॅन आम्ही आखलाच होता. त्याचे भान राखुन आम्ही ७ पर्यंत कडाक्याच्या थंडीत बाहेर पडलो. तरी प्राण्यांनी आमची फारशी निराशा नाही केली:
पार्कात सुरुवातीलाच याने आमचे स्वागत केले:
पार्कात फिरायचे तर कधी बाजुने वाहणार्या कोसी नदीच्या साथीने तर कधी तिच्या उदरातुन रस्ता काढतः
आमच्या आगमनाची वर्दी मिळताच आडुन आडुन सलामी ठोकण्यासाठी हजर झालेले गजराज. तुझे दात नाही पाडणार पण बाहेर ये असे भरघोस आश्वासन देउनही शेवटपर्यंत हा लाजत राहिला तो राहिलाच.
त्यामानाने ४०००० च्या संख्येने असलेल्या विविध जातीच्या हरणांनी मनसोक्त दर्शन दिले:
पक्षीराज गरुडदेखील मान वळवुन वळवुन आमच्याकडे बघत होते:
हे इतर काही पक्षी. कृपया नावे विचारु नका:
आम्ही येणार हे ऐकुन असल्याने व्याघ्रराजांनी बहुधा टेहळणीसाठी यांना पाठवले होते:
जंगल ट्रेल (ते फोटोत गाडीत उभे दिसतात ते अतिरेकी नव्हेत. थंडीने काकडणारे आमच्यासारखेच २ अभागी जीव होते)
पार्कात ठिकठिकाणी बांधलेल्या मचाणांपैकी एकातुन काढलेला हा लॅण्डस्केप फोटो:
जंगलच्या राजाच्या हेरांनी बहुधा बरोबर माहिती पुरवली होती. वाघ शेवटपर्यंत आमच्यासमोर यायला कचरत होता. शेवटी त्याचे पग मार्क्स बघुनच समाधान मानुन घेतले. वाघीण माझ्याबरोबरच होती त्यामुळे अजुन वेगळा वाघ अघण्यात असाही मला फारसा इंटरेस्ट नव्हता:
झाडांमधुन अल्लदपणे डोकावणारा आदित्यः
सकाळी ३-४ तास जीपमधुन फिरल्यावरही समाधान झाले नाही त्यामुळे संध्याकाळी परत हत्तीवर आम्ही आमची कृर दृष्टी वळवली (त्या एवढ्याश्या हत्त्तीवर माझ्यासारख्याने बसण्याचे पातक माझ्या हातुन घडेना. पण नाईलाज झाला. पापी पेट का सवाल था. हत्ती तयार झाला बिचारा. हत्तीवरुन सफारी हा एक आनंददायी अनुभव होता (आमच्यासाठी. हत्ती बिचारा काम के बोझ का मारा होता). कारण हत्ती ला जीपची लिमिटेशन्स नाहीत. तो बिचारा काट्याकुट्यांतुन, पाण्यातुन, बांबुच्या वनातुन, दाट झाडीतुन कुठुनही मुक्त संचार करु शकतो. तो मुळात स्वतःला जपतो त्यामुळे आपणही जपले जातोच. पिराब्लेम फक्त एकच. त्याचे मन मानेल तिथे तो मुक्तपणे थांबतो. आम्ही निघाल्यावर २च मिनिटात बाईसाहेब थांबल्या (हत्तीण होती, कलीना तिचे नाव). आम्हाला सुधरेना नक्की काय झाले. बर माहुताला विचाराबे तर तो देखील निवांत. शेवटी धीर करुन विचारल्यावर म्हणाला "हाथी पॉटी करेगा". मगापासुन भुकपाच्या आधी भुगर्भातुन जसे आवाज येतात तसल्या आवाजांचा उगम आत्ता कुठे आम्हाला कळाला. शेवटी ३-४ किलोने वजन कमी करुनच कलिनातै मार्गस्थ झाल्या.
हतीवरुन कोसी नदी (समोर नदीच्या पल्याड दिसणारे घोडे आहेत. हत्तीवर बसलेली गाढवे फोटोत येउ शकली नाहीत ;) )
कोसी नदीत मुबलक आढळणारे गोल्डन महासीर. एकेक मासा दहा दहा किलोचा आणि काही मासे तर चक्क २५ किलोचे. आमच्याबरोबर असणार्या काहींची संध्याकाळच्या जेवणात त्यांना पावन करायची खुप इच्छा होती पण हाटेलवाल्याने ठाम नकार दिल्याने त्यांच्या उत्साहावर पाणी फिरले:
असेच काही फटु:
याहीखेपेला मुबलक दिसलेली हरणे / सांबर. चितळ. हत्तीला ती फारशी घाबरत नाहीत. जीपला घाबरतात. त्यामुळे यावेळेस जास्त जवळुन दर्शन दिले त्यांनी:
अनपेक्षितपणे दिसलेला अजगर. जिवंत होता की निजधामाला लागलेला होता हे कळण्यास काही मार्ग नाही. पण तो चांगला १५ फूटी आहे असे माहुताने सांगितले. त्याने ३० फूटी आहे म्हणुन सांगितले असते तरी आम्ही माना डोलावल्या असत्या:
आमची लाडकी कलिना :) :
वाटेत लागलेले एक छानसे रिसोर्टः
हे थोडे आमच्या रिसोर्टचे फटु (टायगर कॅम्प):
आमची कॉटेजः
रिसोर्टमधले निवांत ओपन रेस्तॉस्तॉ:
निवांत अंतर्गत रस्ते:
कॉर्बेट, कौसानी, नैनितालची सफर पुढे सुरु राहिल................. (दुर्दैव तुमचे) ;)
वाचन
8974
प्रतिक्रिया
0