[झेन काव्याचा भावानुवाद]
(साथीच्या आजारात दगावलेल्या मुलांना श्रद्धांजली)
जेव्हा वसंताचे आगमन होईल
वृक्षाच्या प्रत्येक फांदीच्या अग्रभागी
पुन्हा नव्याने फुले बहरतील,
पण ती कोवळी मुले
जी मागल्या ग्रीष्मातल्या पानगळीबरोबर निवर्तली
ती कधीच परतणार नाहीत.
---
वादळ शांतवले आहे, सारा बहर झडून गेला आहे;
पक्षी गात आहेत, पर्वतान्वरची काजळमाया गहिरी झाली आहे --
हेच तर खरे बुद्धत्वाचे अलौकिक सामर्थ्य आहे.
---
माझा वारसा --
काय बरे असेल तो?
वसंतातला फुलांचा बहर,
दग्ध उन्हाळ्यातले कोकिळेचे कूजन,
आणि पानगळीच्या काळातले उघडेबोडके लालजर्द मॅपल्स ...
---
मूळ काव्य -
When spring arrives
From every tree tip
Flowers will bloom,
But those children
Who fell with last autumn’s leaves
Will never return.
---
The wind has settled, the blossoms have fallen;
Birds sing, the mountains grow dark --
This is the wondrous power of Buddhism.
---
My legacy --
What will it be?
Flowers in spring,
The cuckoo in summer,
And the crimson maples
Of autumn...
प्रतिक्रिया
6 Feb 2012 - 11:42 am | पियुशा
काळजाला घरे पाडणारे काव्य / कविता/ अनुवाद :(
6 Feb 2012 - 7:01 pm | शुचि
+१
करुण रसपूर्ण. असेच अजून येऊ दे.
6 Feb 2012 - 12:09 pm | कवितानागेश
आवडला अनुवाद
6 Feb 2012 - 12:11 pm | स्पा
अप्रतिम
6 Feb 2012 - 1:59 pm | बिपिन कार्यकर्ते
+१
6 Feb 2012 - 12:20 pm | जाई.
अनुवाद आवडला॑
6 Feb 2012 - 4:55 pm | अत्रुप्त आत्मा
वाचता वाचता ग्रेस यांच्या शब्दकळेची नकळत अठवण येऊन गेली
6 Feb 2012 - 5:30 pm | प्रशांत उदय मनोहर
सुरेख अनुवाद.
आपला,
(काव्यरसप्राशी) प्रशांत
7 Feb 2012 - 10:00 am | मदनबाण
सुंदर अनुवाद ! :)
7 Feb 2012 - 7:09 pm | पैसा
बरेच दिवसांनी लिहिलंस! सगळ्या काव्यकणिका फार आवडल्या.
7 Feb 2012 - 9:30 pm | अविनाशकुलकर्णी
जेव्हा वसंताचे आगमन होईल
वृक्षाच्या प्रत्येक फांदीच्या अग्रभागी
पुन्हा नव्याने फुले बहरतील,
पण ती कोवळी मुले
जी मागल्या ग्रीष्मातल्या पानगळीबरोबर निवर्तली
ती कधीच परतणार नाहीत
............................
निशब्द....
10 Feb 2012 - 5:13 am | ajay wankhede
नुसताच अनुवाद आवडला नाहि तर
आज खर्या अर्थाने जिवनाच्या सत्या कडे
जाणार्या मार्गावर नेण्याचा ठोस प्रयास.....
मुकवाचका तुला प्रणाम
...........................................................................................................................
नमामि बुद्ध गुणसागर तं
सत्ता सदा होन्तु सुखि अवेरा
कायो जुगुत्सो सकलो दुगन्धो
गच्छंति सब्बे मरणं अहं
25 Feb 2012 - 9:17 am | रणजित चितळे
कवितेचा अनुवाद करणे खूप अवघड असावे असे मला नेहमी वाटते (मी कधी केला नाही) पण आपला अनुवाद, मुळ कवितेचे सौंदर्य व गाभा दोन्हीही जपतो.
कविता आवडली
3 Mar 2012 - 4:39 pm | सांजसंध्या
कवितेचा विषयच असा आहे कि काय बोलावं हे सुचत नाही. मूळ काव्यातली वेदना अंगावर आली..
3 Jun 2020 - 4:43 pm | मूकवाचक
अवघे अस्तित्व माझ्या नजरेसमोर उभे ठाकले आहे, निस्तेज आणि अर्थहीन, अगदी माझ्यासारखेच.
आकाशात वादळ घोंघावते आहे, हिरव्यागार लुसलुशीत गवताचा पुरता पालापाचोळा झालेला आहे, आणि अवघी धरा असहाय्यपणे आक्रंदते आहे - मरणपंथाला लागलेल्या क्षते पडलेल्या वृद्धेसारखी.
युगांत होण्याची वेळ आली, पण वसंताच्या आगमनाची चाहूल लावणारे कोकिळेचे कूजन नाही, की हवेची ती मंद हळुवार झुळूक नाही.
आहेत ते फक्त माझ्या इवल्याश्या तकलादू पर्णकुटीला गिळंकृत करू पाहणारे थंडगार शिरशिरी आणणारे अक्राळविक्राळ ढग!
मूळ काव्यः
The world before my eyes is wan and wasted, just like me.
The earth is decrepit, the sky stormy, all the grass withered.
No spring breeze even at this late date,
Just winter clouds swallowing up my tiny reed hut.