गाभा:
सचिनचे शंभरावे शतक पुन्हा हुकले!
हा सद् गृहस्थ आणखी किती वाट पाहायला लावणार आहे?
क्रिकेटमधल्या या चमत्कारावर अपेक्षांचे प्रचंड ओझे आहे हे खरे, पण ते त्याच्या कर्तृत्वरील विश्वासामुळेच आहे. शंभर शतके त्यानी नाही करायची तर कोणी?
असो. आता वाट पाहायची आणि आशा बाळगायची.
प्रतिक्रिया
25 Nov 2011 - 10:41 am | मनिष
काल द्रविड ने कसोटीत १३००० धावा पुर्ण केल्या. काल त्याचे शतक झाले असते तर एका वर्षात ३ शतके करणारा म्हणून एक जागतिक विक्रम त्याच्या नावे झाला असता. असो!
मला तरी सचिनच्या शतकांच्या-शतक ह्या हाईप चा आता कंटाळा आलाय. संपव म्हणा एकदाचे!
25 Nov 2011 - 10:44 am | प्रचेतस
http://stats.espncricinfo.com/ci/content/records/142011.html
25 Nov 2011 - 10:45 am | मनिष
६ शतके म्हणायचे होते, एवढ्यात बुच लागले :-)
25 Nov 2011 - 10:45 am | गणपा
आज घाइ नडली. :(
नर्व्हस वाटत नव्हता बिलकुलच.
25 Nov 2011 - 11:02 am | फारएन्ड
एकदा जजमेंट चुकले.
पण कोणत्याही परिस्थितीत वन डे सिरीज मधे खेळला पाहिजे आता. ऑस्ट्रेलिया सिरीज मधे हे आधीच होउन गेलेले असले पाहिजे. या डावात, ओव्हल ला मस्त खेळला तो, पण एरव्ही सध्या फार विचित्र खेळतोय गेले काही डाव. १०० चेच प्रेशर असणार ते.
वन डे ला त्याला विश्रांती देऊ नका म्हणावं. नंतर मधे दीड महिना गॅप आहे नाहीतरी.
25 Nov 2011 - 11:24 am | अमोल केळकर
चला एक बरं झालं . निदान १०० सोन्याच्या नाण्यांसाठी सचिन खेळला, या अधी शतक करायला काय झाले होते ? असे म्हणणा-यांचा आवाज गप्प झाला
अमोल केळकर
25 Nov 2011 - 6:16 pm | सुहास झेले
अगदी अगदी..... :)
25 Nov 2011 - 11:25 am | मदनबाण
नको सचिन देवा अंत असा पाहु
उत्सुकता ही आता थांबवेना... :)
25 Nov 2011 - 11:31 am | शिल्पा ब
याने शतक केलं तर तुम्हाला काय फरक पडणार? आणि त्यात धागा काढण्यासारखं काय आहे?
उगाच कैतरी!!
25 Nov 2011 - 11:46 am | अमोल केळकर
याने शतक केले तर आम्हाला खुप खुप आनंद होणार आहे. :)
अमोल केळकर
25 Nov 2011 - 11:48 am | मराठी_माणूस
सहमत
25 Nov 2011 - 11:45 am | ५० फक्त
खरंच सचिनच्या शंभर शतकांपेक्षा बरेच महत्वाचे अन गंभीर प्रश्न आहेत, जे या शतकानं सुटणार नाहीत.
आणि अंत नको पाहु, ही खरोखरच प्रचंड अतिशयोक्ती आहे. शंभरावं शतक झाल्यानं किंवा न झाल्यानं कशाचा अन कसला अन कुणाचा अंत होणार आहे किंवा टळणार आहे हे कुणी समजावेल का ? भावनेच्या भरात अजुन एका व्यक्तिपुजेचं स्तोम माजवलं जातंय एवढंच.
आणि मॅचचं म्हणाला तर फॉलोऑन टाळता येतो का नाही ते महत्वाचं.
25 Nov 2011 - 11:49 am | निवेदिता-ताई
सहमत आहे तुझ्याशी....:)
25 Nov 2011 - 12:14 pm | प्रास
आणि मी पण पन्नासरावांशी सहमत आहे.
तरी सचिनने शंभरावं शंभर लवकरात लवकर कराव असंही मला वाटतंय.....
:-)
25 Nov 2011 - 12:29 pm | छोटा डॉन
+१, हेच म्हणतो.
ह्या सो कॉल्ड महाशतकाच्या निमित्ताने जे काही कवतिक करायचे आहे ते एकदा करुन घ्या आणि नंतर प्लीज आम्हाला माफ करा असे म्हणतो.
- (कंटाळलेला*) छोटा डॉन
कंटाळलेला* = शतकाची वाट बघुन कंटाळलेला अस्सा अर्थ अपेक्षित नाही ह्याची आवर्जुन नोंद घ्यावी, इतरही प्रश्न आहेत, असो.
25 Nov 2011 - 5:30 pm | मन१
उगीच हिरमोड का करावा म्हणून संकोच करत होतो, पण सचिनच्या आणि एकूणच मनोरंजन दुनियेच्या (टी व्ही, बॉलीवूडच्या ) नावानं जो काही हिस्टेरिया सदृश प्रकार लोकांना होतो, तो पाहून चिंता वाटते.( त्यांची नाही हो, स्वतःचीच. ते तर त्यांच्याच जगात मग्न आहेत.)
"सारं काही सुरळित आहे" असं हे लोक खरच मानतात का? कसे मानू शकतात ह्याबद्दल कुतूहल आहे.
25 Nov 2011 - 12:22 pm | sagarpdy
सत्यसाईबाबांच्या निर्वाणानंतर सचिन ने शतक केलं का हो?
25 Nov 2011 - 12:29 pm | गणपा
सर्व सचिन द्वेष्ट्यांशी सहमत आहे. ;)
25 Nov 2011 - 1:20 pm | निखिल देशपांडे
गणप्या सहमत रे तुझ्याशी
25 Nov 2011 - 1:19 pm | नगरीनिरंजन
शंभरावे शतक न केल्यास सचिनच्या थोबाडीत मारली जाईल की कसे याचा विचार करतोय.
25 Nov 2011 - 8:37 pm | यकु
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =))
=))
का हो ननि, आज अण्णांना भेटून आलात की काय?
25 Nov 2011 - 3:08 pm | प्रशांत उदय मनोहर
सचिनच्या १००व्या शतकाबद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे, असावी. पण लोकांनी व मुख्य म्हणजे प्रसारमाध्यमांनी संयम ठेवणं आवश्यक आहे.
एक लक्ष्यात घ्यावे, की सचिनची यापूर्वीची ९९ शतके झाली ती सलग ९९ सामन्यांमध्ये झालीत का? नाही ! मग १००व्या शतकासाठी थोडी वाट पहावी लागली तर कुठे बिघडलं?
उगाच चाळीमधल्या संडासासमोरच्या रांगेतला माणूस संडासाचं दार उघडायची वाट पाहतो तसे करू नका.
25 Nov 2011 - 4:58 pm | श्रीरंग
हाहाहाहा! करेक्ट!!
25 Nov 2011 - 3:25 pm | दादा कोंडके
कोण सचिन?
धन्यवाद.
ह्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत. :)
25 Nov 2011 - 5:41 pm | ऋषिकेश
त्या पेपरवाल्यांनी तर केव्हाचा लेख लिहुन ठेवला असेल, टिव्हीवाले बोंडुकमन तर स्ट्याटिस्टिकांच्या ब्याटी घेऊन ट्यार्पीच्या शतकाला तैय्यार असतील नी तु असं काय रे करतोस!
लेखाच्या मथळ्यावरुन काहिबाहि रचलं
नको रे सचिना, अंत असा पाहु
आमुची उत्कंठा, फुटु पाहे!!!
शंभराची आशा दावुन पाडियले
मजलागी जाहले तैसे देवा!
पुढची मुळ कडवीच विसरलो! :)
असो. होत असं कधी कधी!
25 Nov 2011 - 8:39 pm | यकु
लेख??
अहो अख्खी पानच्या पानं तयार करुन ठेवलीत महाराजा, अक्षी प्रतिक्रियांसह.. पण त्याला आता जवळजवळ दीड महिना उलटून गेला..
26 Nov 2011 - 5:45 am | आत्मशून्य
तोपर्यंत कार्यकर्त्यांनी कृपया संयम बाळगावा, व कोणताही अनूचित प्रकार घडणार नाही याची काळजी घ्यावी.
26 Nov 2011 - 11:34 am | आनंद
आत्ता परत चान्स आहे सच्याला . जिंकुन ही देइल आणि महाशतक ही होइल अशी आशा करुयात.
26 Nov 2011 - 3:44 pm | प्रकाश घाटपांडे
मला वाटल काही परमेश्वरासंदर्भात आर्त हाक आहे की काय?
नको देवराया अंत आता पाहू|
प्राण हा सर्वथा जाउ पाहे ||
अस काही वाचायला मिळेल अशा अपेक्षेने धागा उघडला होता.
28 Nov 2011 - 3:16 pm | राजो
सचिन "देवा" काही अज्ञ पामर तुझ्या खेळातील देवत्वाला मानत नाहीत.. त्यांचे त्यानाच कळत नाही ते काय करत आहेत..
असो..
(बॉक्सिंग डे च्या प्रतिक्षेत)
-गुरूघंटाल