ड्रंकन उर्फ बीयर बम चिकन

गणपा's picture
गणपा in पाककृती
24 Sep 2011 - 6:04 am

कस काय मंडळी?
सर्व काही क्षेम कुशल आहे ना ?

बाप्पा त्यांच्या गावी परतले. आणि आता काही दिवसातच दुर्गा माता आपल्या भक्तांच्या भेटीस येतेय. मग ९-१० दिवस काही उसंत मिळायची नाही तुम्हाला. तेव्हा म्हटल एक विकांत मिळतोय मध्ये तर तो सत्कारणी लावावा.

फार काही कटकटीची पाककृती नाही आज. चला तर मग लागा कामाला. आधी झटपट कच्चा माल गोळा करु.

साहित्य :

१ बीयरचा कॅन. (लहान / मोठा / ब्रँड, चॉइस इज युवर्स.)

१ कोंबडी स्वछ धुवुन आणि पेपर नॅपकीनने एकदम कोरडी करुन.

१/२ चमचा साखर.
१ चमचा लसणाची पावडर.
१ चमचा लाल तिखट.
१ चमचा भाजलेली जीरे पुड.
१ चमचा मीठ.
१ चमचा भरड वाटलेली काळीमीरी पुड.
१ चमचा कांद्याची पुड.

२-४ मोठे चमचे ऑलिव्हच तेल. (ऑलिव्हच नसल्यास दुसर कसलही चालेल. ऑलिव्हच जरा हृदयासाठी बर असत.)
१ लिंबू.

कृती :

सगळे मसाले एकत्र करुन घ्यावे.

कोंबडीला ऑलिव्हच्या तेलने मसाज द्यावा.

जस दिवाळीला आपण उटण खसा खसा चोळुन लावतो, तस तो एकत्र केलला मसाला कोंबडीला चोळावा.

बीयरचा कॅन उघडुन त्यातुन चांगले २-४ मोठ्ठे घोट रिचवावे. पण आवडते म्हणुन सगळी गट्टं करु नये. अर्धी शिल्लक ठेवावी. (थोडीशी सावधानी म्हणुन म्हणुन एक एक्स्ट्रा कॅन बाजुला ठेवलेला आहे हे चणाक्ष वाचकांनी ओळखलेच असेल ;) ) हा तर काय म्हणत होतो, दोन घोट मारल्या नंतर कॅनला वरुन २-३ भोके पाडुन घ्यावीत.

जो थोडा फार मसाला उरला असेल तर तो त्या कॅनमध्ये रिकामा करावा. एकदम भक्सन टाकुनये. अन्यथ्या ती बीयर, कोण्या अडाण्याने मीठ मसाला टाकला ते पहायला लगेच बाहेर येईल. आणि तुम्हाला नसता त्रास सहन करावा लागेल.

एका ओव्हनप्रुफ भांड्यात कॅन ठेवुन कोंबडीला त्यावर बसवावे. हा आधी ती थोडी कां-कू करेल पण तिकडे दुर्लक्ष करुन तिची त्या कॅनवर प्रतिष्ठापना करा. एका लिंबाला २-३ टोचे मारुन ते (टोचे मारलेली बाजू खाली) कोंबडीच्या डॉक्याच्या जागी फिट्ट बसवावे.

(कधी कधी कोंबडी झिंगण्या आधीच आडवी होते. त्यामुळे तिस कॅन वर बसवताना काळजी घ्यावी. तुमच्या इथे जर कोंबडीसाठी पेश्श्ल बार स्टुल* मिळत असेल तर त्याचा वापर करावा. )

*

ही सगळी आरास उचलुन ओव्हन मध्ये ठेवावी. कोंबडीचे पंख लगेच करपतात म्हणुन त्यांना थोडी अ‍ॅल्युमिनियमची फॉईल लावली तर उत्तम.
ओव्हन* १८० ते २०० °C वर सेट करुन आणि कोंबडीला आत रखवालीस बसवुन तास-दिड तास भगीनी मंडळींनी आपल्या आवडत्या सास बहुंच्या कट-कारस्थ्यानात रममाण होण्यास हरकत नाही. ते नसेल आवडत तर आंजावर फेर फटका मारुन या. कॅलरी काँशस मंडळींनी नंतर वाढणार्‍या कॅलरीच्या प्रमाणात आधीच त्या जाळायला हरकत नाही.

*तुमच्या सोई नुसार, ओव्हन ऐवजी ग्रीलचा वापरही करू शकता.

तासा दिड तासा नंतर झिंगुन टम्म झालेली ही कोंबडी बघा कशी खुणावतेय.

400

600

ओव्हन मधील उष्णतेने कोंबडीतील आर्द्रता कमी होऊन ती वातड होते. बीअर वापरल्याने ही आर्द्रता टिकुन रहाते. शिवाय तिच्यातील मॉल्ट आणि यीस्टच्या रासायनीक प्रक्रियेमुळे कोंबडीची चामडी पातळ आणि क्रिस्पी होते.
तरी ज्यांचे बीयरशी वाकडे आहे त्यांनी फळांचा रस आणि पीण्याचा सोडा वापरला तरी चालेल.

खालील ईडो मध्ये कोंबडी आतुन किती मॉईस्ट आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केलाय.

वीसु :

* धाग्याच शिर्षक आणि काही फोटू पाहुन अश्लील अश्लील म्हणुन ओरडणार्‍यांना आधीच योग्य त्या जागी मारण्यात आले आहे.

** ही पाककृती अंडे घालुन करता येईल पण ज्याच्या त्याचा जवाबदारी वर हे पाऊल उचलावे.

*** कोंबडीला पर्याय म्हणुन शाकाहार्‍यांनी कुठलीही भाजी (उदा. भोपळा / कोहळं / दुधी) घ्यायची असल्यास होणार्‍या कलाकृतीला तो स्वत:च जवाबदार असेल. मागाहुन धागाकर्त्यास बोल लावू नयेत.

प्रतिक्रिया

नंदन's picture

24 Sep 2011 - 6:14 am | नंदन

_/\__/\__/\__/\_

अगागागा, मेलो, खपलो, गतप्राण झालो, अंमळ हळवा होऊन स्वर्गवासी झालो, डोळे पाणावून पंचत्वात विलीन झालो, कर्मविपाकाच्या सिद्धांताच्या पडताळ्यासाठी तयार झालो.... बाकी प्रतिक्रिया पुन्हा पृथ्वीतलावर परतल्यानंतर :)

शुचि's picture

24 Sep 2011 - 6:21 am | शुचि

=)) =)) =))

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

24 Sep 2011 - 6:51 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

खरंतर गणपाचा धागा असला तरी सामिष पाकृंचे धागे मी फाट्यावरच मारते, पण धाग्याच्या शीर्षकामुळेच उत्सुकता चाळवली. आणि धागा वाचून मी निर्वाण पावले.

गणपासेठ, आमचा दंडवत.

श्रावण मोडक's picture

24 Sep 2011 - 12:10 pm | श्रावण मोडक

+२
हा प्रतिसाद मघाशी दिला. आता थोडा सावरलो आहे.

ओव्हन* १८० ते २०० °C वर सेट करुन आणि कोंबडीला आत रखवालीस बसवुन तास-दिड तास भगीनी मंडळींनी आपल्या आवडत्या सास बहुंच्या कट-कारस्थ्यानात रममाण होण्यास हरकत नाही. ते नसेल आवडत तर आंजावर फेर फटका मारुन या. कॅलरी काँशस मंडळींनी नंतर वाढणार्‍या कॅलरीच्या प्रमाणात आधीच त्या जाळायला हरकत नाही.

या काळात तू काय केलंस? तो एकच अवांतर टिन पुरला, की दुसरं काही होतं? ;)

>> * धाग्याच शिर्षक आणि काही फोटू पाहुन अश्लील अश्लील म्हणुन ओरडणार्‍यांना आधीच योग्य त्या जागी मारण्यात आले आहे. >>

=)) =)) =))

बाकी बीअर वगैरे पीत नसल्याने प्रतिक्रिया देता येणार नाही पण मनोरंजन मूल्य भरपूर असलेली पाकृ आहे ;)

पाषाणभेद's picture

24 Sep 2011 - 6:26 am | पाषाणभेद

अशी कशी ही म्हागाई वाढ वाढ वाढली अन तुमी आमाला बीयर बम चिकन खायाला लावूं र्‍हायलेत राव!

पहाटे पहाटे मला जाग आली
गणपा,
तुझ्या चिकनने झोप पळून गेली

आत्मशून्य's picture

24 Sep 2011 - 6:52 am | आत्मशून्य

मस्त फटू

गणपाशेठ, पुढच्या जन्मी आमचे रूममेट म्हणून जन्माला या हो!! ( म्हण्जे हास्पिटलात नाही.. जन्मून मंग रूममेट!) चला रे उचला आता माझी तिरडी.

मी-सौरभ's picture

30 Sep 2011 - 1:47 pm | मी-सौरभ

राम नाम सत्य है!!
राम नाम सत्य है!!
राम नाम सत्य है!!
राम नाम सत्य है!!
राम नाम सत्य है!!
राम नाम सत्य है!!

५० फक्त's picture

24 Sep 2011 - 7:23 am | ५० फक्त

असा ही मांसाहारी नाहीच मी, त्यात हे फोटो पाहुन तर भविष्यातही कधि मांसाहार करावासा वाटणार नाही, हा खुप मोठा फायदा झाला धागा उघडल्याचा.

पाकक्रुती चांगली का वाईट ते सांगणं शक्य नाही, पण बाकी पाक्रु टाकणा-यांनी फोटो आणि प्रेझेंटेशन बद्दल शिकावं असा धागा.

पाषाणभेद's picture

26 Sep 2011 - 1:45 am | पाषाणभेद

>>> असा ही मांसाहारी नाहीच मी, त्यात हे फोटो पाहुन तर भविष्यातही कधि मांसाहार करावासा वाटणार नाही, हा खुप मोठा फायदा झाला धागा उघडल्याचा.

पाकक्रुती चांगली का वाईट ते सांगणं शक्य नाही, पण बाकी पाक्रु टाकणा-यांनी फोटो आणि प्रेझेंटेशन बद्दल शिकावं असा धागा.

अगदी सहमत.

बाकी गणपाभौ अन उत्कृष्ठ पाककृती हे नातं अगदी पक्कं झालंय.

प्रियाली's picture

24 Sep 2011 - 7:24 am | प्रियाली

हा काहीतरी भारी प्रकार दिसतोय.

ज्यांचे बीयरशी वाकडे आहे त्यांनी फळांचा रस आणि पीण्याचा सोडा वापरला तरी चालेल

सफरचंदाचा स्वाद असणारी गोडसर वूडचक बीअर मला अतिशय आवडते. कदाचित तिचा वापर केल्यास पाककृती चविष्ट होईल.

बिपिन कार्यकर्ते's picture

24 Sep 2011 - 7:51 am | बिपिन कार्यकर्ते

धिस इज द लिमिट!

थोडाफार बदल असलेल्या अश्या पाच ते सहा प्रकारच्या चिकनच्या पाकृत्या पाहण्यात आल्या आहेत.
अर्थातच टिव्हीवर! आम्ही हा प्रकार शिजवण्याची शक्यता नाही पण गम्मत म्हणून पाकृ वाचून मनोरंजन झाले.
इतक्या कमी साहित्यात मांसाहारी पदार्थ तयार केल्याबद्दल तुझं कौतुक करावं तेवढं थोडं!

सन्जोप राव's picture

24 Sep 2011 - 9:12 am | सन्जोप राव

कोंबडी आणि बीअर हे दोन्हीही आवडते पदार्थ. ते एकत्र म्हणजे दुग्धशर्करा योग. बासुंदीत चारोळी, फ्रूट सलाडमधे काजू, आईस्क्रीममधे गुलकंद, गोवारीच्या भाजीत गोळे, अळूत खोबर्‍याचे काप, बटाटेपोह्यात शेंगदाणे, शिर्‍यात केळे किंवा अननसाचे तुकडे, खिचडीत सोडे.... पुरे आता..

शिल्पा ब's picture

24 Sep 2011 - 9:35 am | शिल्पा ब

मस्त...मुद्दाम जेउन खाउन झाल्यावरच धागा उघडला..

अत्रुप्त आत्मा's picture

24 Sep 2011 - 9:40 am | अत्रुप्त आत्मा

बम चिक चिकं बम, बम बम चिकं चिकं बम..... :-p ड्रंकन उर्फ बीयर बम चिकन :-D खलास.... :party:

@-कोंबडीला ऑलिव्हच्या तेलने मसाज द्यावा....ह्ही ह्ही ह्ही... अशी सेवा शुश्रुषा होऊन मरण येणार असेल,तर कोंबड्या तुमच्या कडे लाइन लावतील हो गणपाशेठ... ;-)

@-जस दिवाळीला आपण उटण खसा खसा चोळुन लावतो, तस तो एकत्र केलला मसाला कोंबडीला चोळावा.... धन्य धन्य त्या प्रतिभेची,,,आणी प्रतिमा स्रुष्टीची... खपलो

@-कधी कधी कोंबडी झिंगण्या आधीच आडवी होते. :bigsmile: टांगा मोड्ला,घोडे खल्लास ;-)

अवांतर- ती लिंबू मारुन ;-) खुर्चीत बसवलेली कोंबडी पाहील्यावर तर ही मेल्ये? की अत्ताच आनंदानी मरण्यासाठी खास जन्माला आलीये..असा भास होतो... हाँय मै मर जावाँ...! अस म्हणत खाणाय्रावर मरणारी कोंबडी आज पहील्यांदा पाहीली हो... गणपाशेठ तुंम्हाला शीरसाष्टांग दंडवत....

मी-सौरभ's picture

30 Sep 2011 - 1:49 pm | मी-सौरभ

प्रतिसाद..

नगरीनिरंजन's picture

24 Sep 2011 - 9:49 am | नगरीनिरंजन

धिस इज द लिमिट!

या बिकांच्या वाक्याशी शतशः सहमत.
मसाल्याचे उटणे, ऑलिव्ह ऑईलचा मसाज आणि बीयरची आंघोळ अशी सगळी कोंबडीची बडदास्त आहे हे वाचून आधी खूश झालो पण आठवा फोटो पाहिल्यावर कोंबडीची कीव आली.
असो.
नंतर 'तयार' झालेली कोंबडी पाहून मात्र "हमी अस्तो हमी अस्तो हमी अस्त" असं झालं. कोंबडीला अदेह आणि तिला खाणार्‍याला सदेह स्वर्ग दाखवणार्‍या गणपाभाऊंचा जाहीर सत्कार करण्यात यावा आणि त्यांची बल्लवाचार्य ही पदवी अपग्रेड करून बल्लवेंद्र अशी नवी पदवी त्यांना देण्यात यावी असा प्रस्ताव मांडून माझे लाळेत लडबडलेले दोन शब्द संपवतो.

सुहास झेले's picture

24 Sep 2011 - 9:59 am | सुहास झेले

करपलो फोटो बघून....
पुढल्यावेळी गणपाच्या पाककृती वाचताना अ‍ॅल्युमिनियमची फॉईल गुंडाळून घ्यावी म्हणतो :D :beer:

बिपिन कार्यकर्ते's picture

24 Sep 2011 - 11:21 am | बिपिन कार्यकर्ते

बादवे, तो किचन प्ल्याटफॉर्म ओळखीचा वाट्टोय! ;)

विसुनाना's picture

24 Sep 2011 - 11:28 am | विसुनाना

'चाखिलानंदमूर्ते' या शब्दाचा अर्थ कोंबडी बघून कळला. :)

साती's picture

24 Sep 2011 - 11:42 am | साती

वेगळीच पाकृ.

कांद्याची आणि लसणाची पावडर रेडिमेड मिळते की घरातच या गोष्टी वाळवून तयार केल्यात?

सूड's picture

24 Sep 2011 - 9:33 pm | सूड

क ह र
कोंबडीला लावलेला उटणंरुपी मसाला, बसायला दिलेला पाट/चौरंगरुपी बियर टिन आणि ऊन ऊन बीयर बघता एकंदरीत या रेसिपीचं कोंबडीचं अभ्यंग असं मराठीकरण करण्यास हरकत नाही.

परिकथेतील राजकुमार's picture

24 Sep 2011 - 12:28 pm | परिकथेतील राजकुमार

शिर्षकात 'बम' वैग्रे शब्द बघूनच संताप आला. पण गणप्या हा मिपावरचा बाब्या आणि कंपूचा लाडका असल्याने शिर्षकाचे सुद्धा कौतुक होणार हे निश्चित.

असो...

*गणप्या अरे ह ल क ट माणसा जरा शाकाहारी काहितरी टाक की मेल्या.*

अवांतर :- 'हाच पदार्थ आपण कसा वेगळ्या पद्धतीने करतो, गणप्याने कधी ह्या पाकृ मध्ये अमके फलाने ट्राय करुन बघितले आहे का? , फलान्या फलान्या आणि हुच्चब्रु हाटेलात आम्ही फक्त हा पदार्थच खायला कसे जातो..' अशा प्रतिक्रिया अजून कशा आल्या नाहीत ?

बिपिन कार्यकर्ते's picture

24 Sep 2011 - 12:52 pm | बिपिन कार्यकर्ते

मला पण "चला! आता इथे चिकन / बीअर / ओव्हन कुठे मिळते ते शोधणे आले." असे अजून कोणी म्हणले कसे नाही त्याचेच आश्चर्य वाटत आहे.

कींवा देशी कोंबडीला बीयर ऐवजी देशीचा कॅन आपलं बाट्ली चालेल का? नाहीतर मसाला ऊट्ण्या सारखा लावण्याऐवजी साबणासारखा लावला तर नाही चालणार का? हॅ हॅ हॅ....

माझीही शॅम्पेन's picture

25 Sep 2011 - 11:22 pm | माझीही शॅम्पेन

शिर्षकात 'बम' वैग्रे शब्द बघूनच संताप आला. पण गणप्या हा मिपावरचा बाब्या आणि कंपूचा लाडका असल्याने शिर्षकाचे सुद्धा कौतुक होणार हे निश्चित.

एखाद्या नरभक्षक जमतीने ह्या पासून प्रेरणा घेवन असले उद्योग केले तर गणापाजींच फालतू कवतिक करणारे मीपा(कर) त्याला जबाबदार असतील सांगून ठेवतोय :)

कवतिक करणारे मीपा(कर) <त्याला जबाबदार असतील सांगून ठेवतोय
हा महिलाना सिंगलाऔट करण्याचा प्रकार आहे

शाहिर's picture

24 Sep 2011 - 1:03 pm | शाहिर

ही पाक कृती नाहिये, कला कृती आहे ..गणप हा महान कलाकार आहे , त्यांस मि पा रत्न हा पूर्स्कार द्यावा ..

बीयर चा परीणाम असेल कदचित , या वेळेस शाब्दिक कोट्या जबर्दस्त जमल्या आहेत ..
अफलातुन पन्चेस...

सानिकास्वप्निल's picture

24 Sep 2011 - 2:08 pm | सानिकास्वप्निल

_/\__/\__/\__/\_

गणपाभौ काय सांगु...शब्दचं उरले नाहीत आता :)
खरचं +१

सोत्रि's picture

24 Sep 2011 - 3:15 pm | सोत्रि

तुला मी भारतात आल्या आल्या किडनॅप करणार है ! आत्ताच सांगुन ठवतोय !!

- (छोटा डॉनचा उजवा हात) सोकाजी

सुहास झेले's picture

28 Sep 2011 - 10:57 am | सुहास झेले

सोकाजीराव एक पंटर हाये तय्यार.... तुम्ही फक्त बोला आपण उचलू ह्याला ;-) :beer:

इष्टुर फाकडा's picture

24 Sep 2011 - 4:26 pm | इष्टुर फाकडा

मेल्यानंतरही कोंबडीला आराम नाही.....पाकृची 'पार्श्वभूमीच' वेदनामय असल्यामुळे सौम्य निषेध :D

स्वाती२'s picture

24 Sep 2011 - 5:30 pm | स्वाती२

सिक्सर! एकदम अल्टिमेट!

दोन दिवसापूर्वीच या प्रकाराची आठवण झाली होती.

भन्नाट पाकृ. बियर पीत नाही, त्यामुळे पाकृ करुन बघता येणार नाही, पण पाकृ मस्त आहे हे नक्की. :)

अगं मृणालिनी बियर उडून जाते. तसेच बियर ऐवजी कोक वगैरे वापरु शकतेस.

ओ... मस्तय मगं.... नक्की करुन बघेन..

सोत्रि's picture

28 Sep 2011 - 10:24 am | सोत्रि

बियर उडून जाते.

स्वाती तै अशी कशी बिअर उडून जाइल? ती कोंबडी काय उगाच ट्म्म फुगलीय का?
व्हिडीओ बघितला नाहीत का धाग्यातला? कोंबडी कापल्यावर कशी बियर पाझरतेय ते बघा. :)

तरी बर गणपाने कोंबडीचे पंख कापुन तीथे फॉइल पण गुंडाळली होती, नाहीतर बियर बरोबर कोंबडीपण उडाली असती ;)

- (न उडणारी बियर पिणारा) सोकाजी

पांथस्थ's picture

24 Sep 2011 - 6:24 pm | पांथस्थ

मालक, भन्नाट आहे पाकृ.

आमच्या ओव्हन (कम मायक्रोवेव्ह) मधे नुसती कोंबडी पण बसणार नाहि बीयरच्या कॅन सकट तर नाहिच नाहि. बाकी कोंबडीची आर्द्र्ता बघुन डोळे पाणावले :)

मध्यंतरी जॅक डॅनियल्सचा BBQ Sauce आणायचा विचार चालला होता. मालकांनी वापरला आहे का?

ब्रिटिश टिंग्या's picture

24 Sep 2011 - 9:23 pm | ब्रिटिश टिंग्या

सही रे गणपु!

मराठमोळा's picture

24 Sep 2011 - 9:23 pm | मराठमोळा

गणपा/बल्लवाचार्य/प्रतिका राजा,
तू प्रतिक्रिया देण्यापलिकडे गेला आहेस रे.. :)

काय बोलु आणि काय लिहु? शब्दच संपले आहेत.

हॅट्स ऑफ टु यु!!!

jaypal's picture

24 Sep 2011 - 9:33 pm | jaypal

लगेरहो
dhink
ढिंकचिका ढिंकचिका ढिंकचिका रे$$$$
बारा महीने मे बारा तरीकेसे तुझ्हको प्यार जतांउंगारे

इरसाल's picture

25 Sep 2011 - 10:24 am | इरसाल

आमच्या कडून साभार.

अप्पा जोगळेकर's picture

25 Sep 2011 - 6:02 pm | अप्पा जोगळेकर

ग्रेट पाककॄती आहे इतकेच म्हणेन.

नेहमी प्रमाणे या प्राककृतीसही सांभाळुन घेतल्या बद्दल धन्यवाद्स मंडळी. :)

एक सांगावस वाटत की जर कुणाचा बीयर कडवट असते म्हणुन त्याचा कोंबडीच्या चवी वर काही परीणाम होत असेल असा समज असेल तर ते चुक आहे.

तरी सुद्धा बीयर नकोच असेलच तर फळांचा ज्युस/ पिण्याचा सोडा वा प्रियालीने सुचवल्या प्रमाणे फ्रुट बीयरचा वापरही करता येईल.

चतुरंग's picture

26 Sep 2011 - 2:05 am | चतुरंग

'कुकभास्कर' पदवी देण्यात येऊन गौरवण्यात आल्या गेले आहे! ;)

-रंगा

पाषाणभेद's picture

26 Sep 2011 - 3:54 am | पाषाणभेद

''कुकभास्कर' पदवी देण्यात येऊन गौरव केला गेला आहे.'
''कुकभास्कर' पदवी देण्यात येऊन गौरव केलेला आहे.'

सूड's picture

26 Sep 2011 - 6:50 am | सूड

ओ पाभेकाका, रंगाआजोबांचंच वाक्य बरोबर आहे हां !! उगा व्याकरणातल्या चूका नका काढू. :D

गणपाला 'कुकभास्कर' पदवी देण्यात येऊन गौरवण्यात आल्या गेले आहे!
+१

क्रेमर's picture

26 Sep 2011 - 6:53 am | क्रेमर

!

विसोबा खेचर's picture

26 Sep 2011 - 2:40 pm | विसोबा खेचर

..................!!

प्रभो's picture

26 Sep 2011 - 7:31 pm | प्रभो

खपलो रे गणप्या.......

कॉकटेल लाउंज, तंदूरी तंगडी / विंग्स, ड्रंकन उर्फ बीयर बम चिकन, मासे ३४) टोळ , शेझवान पोटॅटो विथ व्हेज हक्का नुडल्स, जवसाची खमंग चटणी, ............................................................

एक नम्र विनंती- एकदा एकत्र सप्रात्यक्षीक रसस्वादाचा अनुभव द्या. म्हणजे सगळेजण पोट(भरल्यावर)भरून दुवा देतील.:party:

:beer:

जागु's picture

27 Sep 2011 - 7:47 pm | जागु

धन्य.

पैसा's picture

27 Sep 2011 - 8:15 pm | पैसा

मी दारवा 'खात' नाही आणि 'बाल कुक्कुट' सुद्धा नाहीच! त्यामुळे इथे काय लिहू कळेना!
फोटो छान आहेत. पण खरं सांगायचं तर पदार्थाचं नाव वाचून आणि बिअरच्या कॅनवर बसलेल्या कोंबडीचे फोटो पाहून हसून हसून पुरेवाट झाली.

चित्रा's picture

27 Sep 2011 - 11:05 pm | चित्रा

बिअरच्या कॅनवर बसलेल्या कोंबडीचे फोटो पाहून काय बोलावे ते कळेना.
चांगली लागत असावी अर्थातच.

बियर ऐवजी सोडा वगैरेही चालतो म्हटल्यावर स्पेसिफिकनेसच गेला. मग काय पाणीही चालेल असं वाटलं.

बाकी पाकृ पाहून मास्टरशेफ गणपांचे पाय धरावेसे वाटले. झ्याक..

एक शंका..

इतक्या हीटमुळे कॅन वेडावाकडा होणे, त्यामुळे वरची मुर्गी स्थानभ्रष्ट होणे, कॅनवरचा ब्रँडचा प्रिंटेड रंग वितळून पाघळून अन्नात मिक्स होणे वगैरे होत नाही का? कॅन तर अ‍ॅल्युमिनियमचा असतो आणि तो गरम केला की नक्कीच वितळून गोळा होतो.

बियर ऐवजी सोडा वगैरेही चालतो म्हटल्यावर स्पेसिफिकनेसच गेला. मग काय पाणीही चालेल असं वाटलं.

ह्याच चाली वर असेही म्हणतो की देशी कोंबडी घेतलीत आणि बियर ऐवजी देशीच वापरलीत तर कोंबडी सोबत तुम्हाला ही झिंगण्याचे समाधान मिळू शकेल. काय म्हंता? ;)

शंकेच निरसन माझ्यापरीने :

निदान माझ्या बाबतीत तरी कॅन वेडा वाकडा झाला नाही. की त्यावरील रंग उडाला नाही. सगळ काही ठिक ठाक जागच्या जागी शाबुत होत. हा कधी कधी कोंबडीचा तोल जाऊन ती कॅन सहीत आडवी होण्याची शक्यता असते, तेव्हा जर तुमच्या शहरात वर एका चित्रात दाखवलय तसा स्टँड मिळाला तर उत्तम त्यात मध्य भागी कॅन ऐवजी एखादा पेला ही ठेऊ शकता म्हणजे तुम्हाला जी अ‍ॅल्युमिनीयम बद्दल शंका आहे ती ही दुर होईल. :)

अ‍ॅल्युमिनियम 660.32 °C / 1220.58 °F ला मेल्ट होते. ईतकी पातळ अ‍ॅल्युमिनियम फॉईलसुद्धा ३०० °C ला मेल्ट होत नाही. शीवाय हल्ली सर्व भांडी (नॉन स्टीक, हार्ड अ‍ॅनोडाईझ्ड वगैरे) अ‍ॅल्युमिनियमचिच असतात.

गणपाच्या कॅनचा रंग वितळला नाही, पण रंग वितळण्याचा धोका ब्रँड नुसार बदलु शकतो असे वाटते.

परिंदा's picture

1 Jan 2014 - 2:44 pm | परिंदा

काय भारी प्रकार आहे हा!!

ज्याला सुचला तो महान आणि हे सर्व यशस्वीपणे करुन खाऊ घालणाराही महान __/\__

अर्धवटराव's picture

1 Jan 2014 - 3:13 pm | अर्धवटराव

शब्द नाहित माझ्याकडे तारीफ करायला.

__/\__

भटक्य आणि उनाड's picture

1 Jan 2014 - 9:24 pm | भटक्य आणि उनाड

ती लिंबू मारुन Wink खुर्चीत बसवलेली कोंबडी पाहील्यावर तर ही मेल्ये? की अत्ताच आनंदानी मरण्यासाठी खास जन्माला आलीये..असा भास होतो... हाँय मै मर जावाँ...! अस म्हणत खाणाय्रावर मरणारी कोंबडी आज पहील्यांदा पाहीली हो... गणपाशेठ तुंम्हाला शीरसाष्टांग दंडवत....

बकुळफुले's picture

28 Oct 2015 - 11:26 am | बकुळफुले

कसल्ली कातील पाककृती आहे ही.

बाबा योगिराज's picture

28 Oct 2015 - 11:51 am | बाबा योगिराज

लै म्हणजी लगी लैच झ्याकं वाटल.

ह्या गंपा भौ ला कुणी उचला रे. निस्ता जीव जळू रायला ना.

बाबा योगीराज

अत्रुप्त आत्मा's picture

28 Oct 2015 - 12:37 pm | अत्रुप्त आत्मा

आद्यखाद्य साहित्तिक गंपू पैलवान की जय!!!

प्रसाद गोडबोले's picture

28 Oct 2015 - 1:44 pm | प्रसाद गोडबोले

महान पाककृती आहे ही !!

______/\_____

याॅर्कर's picture

28 Oct 2015 - 2:05 pm | याॅर्कर

.

मोहनराव's picture

28 Oct 2015 - 7:21 pm | मोहनराव

झकास