काय हे मनिष तिवारी-जी!

सुधीर काळे's picture
सुधीर काळे in जनातलं, मनातलं
15 Aug 2011 - 1:54 pm

अण्णा हजारे यांच्यासाख्या ज्येष्ठ आणि त्यागी व्यक्तीला संबोधताना "तुम", तुम्हारा" सारखे एकेरी सर्वनाम वापरणार्‍याचे कुणीही समर्थन करणार नाहीं. पण काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते असलेल्या मनिष तिवारी यांनी पूजनीय अण्णांना असे एकेरीत संबोधले. त्याबद्दल त्यांचा त्रिवार निषेध!
('साहेब'चा 'जी' केला आहे!)

संस्कृतीप्रकटन

प्रतिक्रिया

काळे काका सध्या समस्त काँगी लोकांचा एक कलमी कार्यक्रम चालु आहे. अण्णांना विरोध कसा करता येईल. बुडाखाली जाळ निघत असताना सौजन्याची ऐशी तैशी होणारच हो.
पण त्यामुळे प्रतिमा कुणाची खालावत आहे? सांगा बर...

आवांतर : त्या तिवारीच्या नावा पुढे साहेब कशाला जोडलय?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Aug 2011 - 2:30 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>> काँगी लोकांचा एक कलमी कार्यक्रम चालु आहे. अण्णांना विरोध कसा करता येईल.

मनिष तिवारी, अंबिका सोनी, दिग्विजय सिंग आणि कपिल सिब्बल यांना श्रेष्ठींनी सांगितलं असावं की कसंही करुन श्री अण्णा हजारे आणि टीमला आवरा. उद्या उपोषणाला परवानगी नाकारुन श्री अण्णा आणि टीमला अटक करण्याचे षडयंत्र रचले जाणार आहे. एक गोष्ट खरी आहे की, कायदे बनविण्यासाठी संसदेच्या सभागृहात लोकप्रतिनिधी आहेत. पण त्यासाठी अण्णा आणि टीमचा काँग्रेसजनांनी इतका का धसका घ्यावा...?

असो,

-दिलीप बिरुटे

इथे दूर देशी असताना मला एक गोष्ट समजत नाहीं कीं अण्णांना उपोषणाला बसायला परवानगी कां नाकारली जात आहे? असे करण्याचा प्रत्येक नागरिकाला हक्क असताना अण्णांनी परवानगी मागावीच कां आणि ती नाकारली कां जावी? एका गांधीवाद्याने उपोषण केले तर सरकारच्या "धोतराचे पीतांबर" का होत आहे? पूर्वी "गोरे इंग्रज"सुद्धा अशी परवानगी नाकारत नसत, मग "काळे इंग्रज" असे कां घाबरले आहेत?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Aug 2011 - 2:51 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कलम १४४ लागू करून जमावबंदीचे आदेश दिल्ली पोलिसांनी लागू केले आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने असा निर्णय घेण्यात आला आहे (संदर्भ बातम्या) श्री अण्णा आणि टीमची कोंडी करण्याचा उद्योग कॉ.सरकारचा असावा. एकीकडे श्री अण्णा हजारे, केजरीवाल आणि टीमवर भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत. बाकी, कॉग्रेंसवाले गोंधळले आहेत हे मात्र खरे आहे. रामदेव बाबांसारखे आंदोलन चिरडून टाकता येईल काय असाही विचार कॉ.सरकार करत असावे असे वाटते.

-दिलीप बिरुटे

चिंतामणी's picture

15 Aug 2011 - 3:36 pm | चिंतामणी

तुम्ही प्रणव मुखर्जींना विसरलात. :|

प्रणव आणि पी. चिदंबरम् सध्या बॅडबुकात गेलेत.
म्हणुन कदाचीत त्यांच नाव विसरले असतील. ;)

llपुण्याचे पेशवेll's picture

16 Aug 2011 - 12:13 pm | llपुण्याचे पेशवेll

प्रणव मुखर्जींचाच सुपीक मेंदू या सगळ्यामागे असल्याचे बोलले जात आहे. भ्रष्ट काँग्रेसी नेत्यांवर मॅडममुळे कारवाई होऊ शकत नाही हे जाणून त्यांनीच हे शुक्लकाष्ठ काँग्रेसच्या मागे लावले असल्याचे काही 'जाणकार' मंडळींकडून ऐकले आहे.याची परीणती शेवटी गांधी घरण्याचा वरचष्मा मोडून काढण्यात करण्याचा प्रयत्न असेल. म्हणूनच एरव्ही गरीब शेतकर्‍यांचे तारणहार राहूलदादा हे ही मावळ प्रकरणी लक्ष घालणार नाहीत, भ्रष्टाचारावर काही बोलणार नाहीत याची खबरदारी घेतली जात आहे असेही बोलले जाते. हे खरे असेल तर प्रणवदांना कोणी चाणक्य म्हटले तर आमचा प्रत्यवाय नाही. :)

मनिष's picture

15 Aug 2011 - 2:12 pm | मनिष

पण कोणी 'तिवारी' आहे ना...मग चालू दे!

सुधीर काळे's picture

15 Aug 2011 - 2:12 pm | सुधीर काळे

अहो, ते कसेही वागले तरी आपण सौजन्य सोडू नये हो! अजून लहान आहे, सुधारेल!!

तिमा's picture

15 Aug 2011 - 3:06 pm | तिमा

काँग्रेसच्या पायाखालची वाळू सरकली आहे. म्हणून ते असे वागत आहेत.
खरे तर असे प्रसंग कसे हाताळायचे हे हल्लीच्या नेत्यांना समजत नसावे. मागे एकदा सेनापती बापटांनी मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यासमोर उपोषण केले होते. पण हुशार वसंतराव नाईकांनी ते कसे हाताळले ते 'सिंहासन' सिनेमात चांगले दाखवले आहे.
मुळात उपोषण करायला सरकारची परवानगी लागते हे नव्यानेच कळलं.
उपोषण दिल्लीतच का करायचे ? ते राळेगणसिध्दीला राहूनही करता येईल.मिडिया हल्ली कुठेही पोचतेच.
आज ममो लाल किल्ल्यावरुन म्हणाले, आमच्या जवळ काही जादूची छडी नाही. मग, ६५ वर्षे काय झोपा काढल्यात का ?
अशा वेळेला जर एखादा स्वच्छ चारित्र्याचा विरोधी पक्ष असता तर वेगळेच चित्र दिसले असते.

मराठी_माणूस's picture

15 Aug 2011 - 3:43 pm | मराठी_माणूस

तुम्ही कशाला त्याला साहेब म्हणत आहात, अगदी उपहासाने सुध्दा नको.

राजपुत्र अद्याप राजमातेच्या सेवेत आहेत कीं स्वित्झरलंडमध्ये? राजमाताजींची तब्येत कशी आहे? त्या अद्याप न्यूयॉर्कच्या इस्पितळात आहेत कीं स्वित्झरलंडमधील "इस्पितळात" ..........? काल "सामना"मध्ये राजपुत्राबद्दल "तुम्ही यांना पाहिलेत काय?"टाईप जाहिरात होती असे टीव्हीवर पाहिले.

सर्वप्रथम एक विनंती राहुलचा राजपुत्र म्हणुन उल्लेख करणं टाळा. मिडियावाले करतात म्हणुन आपण पण तेच करायचं का?
दुसर म्हणजे गेला असेत तो त्याच्या आईची सेवा करायला तर त्यात एवढ राजकारण करण्या सारख काय आहे?
म्हणजे सेनेवाले मिनाताई ठाकर्‍यांचा उल्लेख माँसाहेब म्हणत त्यांचे गोडवे गातात ते चालतं. पण तेच जर इतर कुणी स्वतःच्या आजारी आई बद्दल आदर / सेवाभाव दाखवला तर यांना लगेच पोटदुखी चालु.
ये बात कुछ हजम नही हुई काळे काका.....

अरे हो एक सांगायचं राहिलच मी कुठल्याही पार्टीचा प्रवक्ता/पुरस्कर्ता नाही.

१०० % सहमत.

बाकी भावनेशीसुद्धा सहमत.

प्रियाली's picture

15 Aug 2011 - 4:16 pm | प्रियाली

राजपुत्र अद्याप राजमातेच्या सेवेत आहेत कीं स्वित्झरलंडमध्ये? राजमाताजींची तब्येत कशी आहे? त्या अद्याप न्यूयॉर्कच्या इस्पितळात आहेत कीं स्वित्झरलंडमधील "इस्पितळात" ..........?

मुलगा आईच्या शुश्रुषेसाठी सोबत असेल तर त्याबद्दल इतके उथळ शब्द सुधीर काळे यांना शोभत नाहीत. स्वतःच्या वयाचा विचार करून अशाप्रकारची जाहीर स्टेटमेंट्स करावीत असे वाटते.

अगं, तो जर सेवेत मग्न असेल तर ठीक!
पण आहे का?

प्रियाली's picture

15 Aug 2011 - 5:18 pm | प्रियाली

तो आईच्या सेवेत मग्न नाही हे सिद्ध करणारा डेटा आहे का आपल्याकडे?

चिंतामणी's picture

15 Aug 2011 - 5:35 pm | चिंतामणी

मला वाटते विषय भरकट आहे.

प्रियाली's picture

15 Aug 2011 - 5:47 pm | प्रियाली

चर्चाविषय ताळ्यावर ठेवण्याची पहिली जबाबदारी चर्चाप्रस्तावकाची असते. तेच जर बेजबाबदार विधाने करू लागले तर इतरांना प्रश्न उपस्थित करण्यापासून रोखणे अयोग्य वाटते. असो.

खरे आहे, प्रियाली. माझ्याकडे सामनातल्या जाहिरातीपलीकडे कांहींही डेटा या क्षणी तरी नाहींय्. आल्यास पुन्हा लिहीन.
पण मला राहुलजींची फार उणीव भासत आहे. ते इथे असते तर काय बोलले असते, आपल्या सर्व ’चेल्यां’ना त्यांनी कसे हाताळले असते, पंतप्रधानांकडे कुणाला घेऊन गेले असते वगैरे मनात येत आहे. (मागे मायावतीविरुद्ध शेतकर्‍याना घेऊन गेले होते तसे!)
असो मनीष-जींनी केलेल्या "तुम", "तुम्हारा"सारख्या हरकतीवर लक्ष केंद्रित करावे.....

प्रियाली's picture

15 Aug 2011 - 6:45 pm | प्रियाली

खरे आहे, प्रियाली. माझ्याकडे सामनातल्या जाहिरातीपलीकडे कांहींही डेटा या क्षणी तरी नाहींय्. आल्यास पुन्हा लिहीन.

ठीक.

मनीष-जींनी केलेल्या "तुम", "तुम्हारा"सारख्या हरकतीवर लक्ष केंद्रित करावे.....

आपल्या देशात एखाद्या वयोवृद्ध व्यक्तीस तुम-तुम्हारा करण्याची प्रथा नाही त्यामुळे तिवारींचे वाक्य नक्कीच निषेधार्ह आहे.

परंतु

आपकी उम्र ७९ साल है. देश के सर्वोच्च पद पर आप आसीन हैं. जिंदगी ने आपको सब कुछ दिया. अब आपको जिंदगी से और क्या चाहिए.

देशाच्या पंतप्रधानांना तुम्हाला आयुष्याकडून आणखी काय पाहिजे असे विचारणे योग्य आहे असे तुम्हाला वाटते का?

बिपिन कार्यकर्ते's picture

15 Aug 2011 - 6:50 pm | बिपिन कार्यकर्ते

त्या वाक्यात तसेही काय चूक आहे ते कळले नाही. त्यातही ते वाक्य देशाच्या पंतप्रधानाला उद्देशून विचारणे वगैरे यात काय चूक आहे?

प्रियाली's picture

15 Aug 2011 - 6:56 pm | प्रियाली

देशाच्याच पंतप्रधानाला नाही तर कोणत्याही वृद्ध व्यक्तीस असे विचारणे अनावश्यक आहे असं मला वाटतं. तसेही, पंतप्रधानांना हा प्रश्न विचारून काय साधायचे आहे? जे पंतप्रधानांनी मिळवले ते भ्रष्टाचाराने मिळवले आणखी अजून किती मिळवायचे असा तर संदिग्ध प्रश्न नव्हे?

बिपिन कार्यकर्ते's picture

15 Aug 2011 - 7:15 pm | बिपिन कार्यकर्ते

आधी तुम्ही अयोग्य म्हणालात. आता अनावश्यक म्हणत आहात. दोन्हीत फरक आहे असे वाटते. One is not necessarily the other. असो.

पंतप्रधानपदी बसलेल्या व्यक्तीने आजपर्यंत जी बेजबाबदारी दाखवली आहे, न भूतो न भविष्यति असे घोटाळे होत आहेत, पण या गृहस्थांच्या तोंडून एक शब्द नाही?! मौनव्रत. असेच सतत चालू आहे. मग एखाद्या नाग्रिकाने सात्विक संतापाने असे काही विचारले तर त्याचा किती बाऊ करायचा? तसेही, त्या प्रश्नाचा रोख तसा होता असे वाटत नाही. तो प्रश्न संपत्तिच्या रोखाने नसावा. पंतप्रधान, सोनिया गांधींप्रती इतके इमानदार आहेत की त्यामुळे ते त्यांच्या स्वतःच्या तत्वात न बसणार्‍या गोष्टींचे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष (गप्प राहून) समर्थन करत आहेत का? आणि तसे असेल तर, त्यांच्यासारख्या अतिशय हुशार आणि आयुष्यात एवढी प्रतिष्ठा मिळवलेल्या व्यक्तीला हे सगळे चूपचाप सहन करायची काय गरज आहे? द्या सोडून! गप्प राहून तुम्ही भष्टाचाराचे साथी बनत आहात हे ते विसरत आहेत. असा एकंदर रोख असावा त्य प्रश्नाचा. त्यांनी वैयक्तिकरित्या संपत्ती कमावली असावी असे अण्णांना म्हणायचे असेल असे वाटत नाही.

प्रियाली's picture

15 Aug 2011 - 7:21 pm | प्रियाली

जर नीट वाचलेत तर कळेल की मी योग्य आहे का असा प्रश्न विचारला आहे. अयोग्य म्हटलेले नाही परंतु हे मात्र खरे की जे अनावश्यक आहे ते माझ्यामते अयोग्यही आहेच. किंबहुना, ते अनावश्यक असल्यानेच योग्य वाटते का असा प्रश्न विचारला आहे. तुम्ही मात्र मी न म्हटलेले माझ्या तोंडात भरून मोकळे झालात. ;)

मग एखाद्या नाग्रिकाने सात्विक संतापाने असे काही विचारले तर त्याचा किती बाऊ करायचा?

कोणी बाऊ केला? कुठे दिसतो आहे या चर्चेत बाऊ केलेला की कोणी अयोग्य वाटते का असा प्रश्न विचारला की बाऊ केल्याचा आरोप तुम्ही करणार आहात ते सांगून टाका आणि मग कोणी तू-तुम्हाला केले याचाही बाऊ होत आहे असे तुम्हाला का वाटत नाही तेही सांगा.

सात्विक संताप येतो हे ठीक आहे. तो बोलण्यातून निघतो. ड्राफ्ट केलेल्या पत्रातूनही तो तसाच निघत असेल तर कठीण आहे. विशेषतः ७४ वर्षांच्या व्यक्तीने ७९ वर्षांच्या व्यक्तीला लिहिलेल्या पत्रात.

त्यांच्यासारख्या अतिशय हुशार आणि आयुष्यात एवढी प्रतिष्ठा मिळवलेल्या व्यक्तीला हे सगळे चूपचाप सहन करायची काय गरज आहे? द्या सोडून! गप्प राहून तुम्ही भष्टाचाराचे साथी बनत आहात हे ते विसरत आहेत. असा एकंदर रोख असावा त्य प्रश्नाचा. त्यांनी वैयक्तिकरित्या संपत्ती कमावली असावी असे अण्णांना म्हणायचे असेल असे वाटत नाही.

हे तुमचे इंटरप्रिटेशन झाले. एखाद्याने ते तसे न घेता उलट अर्थाने घेतले तर ते चुकीचेच आहे असे तुम्ही सिद्ध करू शकत नाही. याचप्रमाणे तिवारींनी स्पष्टीकरण दिले की अण्णा तर गांधीवादी असल्याने मला अगदी जवळचे वाटतात म्हणून मी तुम म्हटले किंवा मराठी लोकांना तुम-तुम्हाराचीच सवय असल्याने मी तसे म्हटले तर ते तुम्ही पटवून घेणार काय? त्यामुळे अनावश्यक वाक्ये टाळलीच पाहिजेत.

पंतप्रधान, सोनिया गांधींप्रती इतके इमानदार आहेत की त्यामुळे ते त्यांच्या स्वतःच्या तत्वात न बसणार्‍या गोष्टींचे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष (गप्प राहून) समर्थन करत आहेत का?

तुमच्या या इंटरप्रिटेशनमधून काय सुचवायचे आहे? अण्णांचा अपमान करावा, त्यांना उपोषणाला प्रत्यवाय करावा, देशात भ्रष्टाचार करावा, लोकपालला संमती देऊ नये हे सोनिया गांधींचे कटकारस्थान आहे?

आत्मशून्य's picture

15 Aug 2011 - 7:42 pm | आत्मशून्य

.

वेताळ's picture

15 Aug 2011 - 8:20 pm | वेताळ

एकाद्या इनामदार,प्रामाणिक व निष्टावंत मुक्या प्राण्याबद्दल अशी चिठ्ठी लिहणे चुकच आहे. निदान ती त्याला वाचुन कळाली तर पाहिजे.

नितिन थत्ते's picture

15 Aug 2011 - 6:16 pm | नितिन थत्ते

डॉनमध्ये आली नसेल बातमी.

राजेश घासकडवी's picture

15 Aug 2011 - 7:28 pm | राजेश घासकडवी

अगं, तो जर सेवेत मग्न असेल तर ठीक!

प्रियाली यांच्यासाख्या मिसळपाववरील ज्येष्ठ आयडीला संबोधताना "अगं" सारखे एकेरी सर्वनाम वापरणार्‍याचे कुणीही समर्थन करणार नाहीं. पण मिसळपाववर लेखन करणाऱ्या सुधीर काळे यांनी माननीय प्रियालींना असे एकेरीत संबोधले. त्याबद्दल त्यांचा त्रिवार निषेध!

(मूळ लेखापेक्षा प्रतिसाद मोठा होण्याच्या भयापोटी प्रतिसाद आवरता घेतो आहे)

प्रियाली's picture

15 Aug 2011 - 7:39 pm | प्रियाली

प्रियाली यांच्यासाख्या मिसळपाववरील ज्येष्ठ आयडीला संबोधताना "अगं" सारखे एकेरी सर्वनाम वापरणार्‍याचे कुणीही समर्थन करणार नाहीं. पण मिसळपाववर लेखन करणाऱ्या सुधीर काळे यांनी माननीय प्रियालींना असे एकेरीत संबोधले. त्याबद्दल त्यांचा त्रिवार निषेध!

खरंय! पण मी बाऊ करत नाही. ;)

श्रावण मोडक's picture

15 Aug 2011 - 8:47 pm | श्रावण मोडक

प्रियाली ज्येष्ठ आयडी आहे याच्याशी सहमत! ;) म्हणूनच हा आयडी बाऊ करत नाही.

सुधीर काळे's picture

15 Aug 2011 - 9:34 pm | सुधीर काळे

By God, I didn't know she was senior. In fact I have seen her rarely on MiPa. I have come across this name on some other website!
Thanks,
KBK

प्रियाली's picture

15 Aug 2011 - 9:42 pm | प्रियाली

अरे जमा रे कोणीतरी मिपाचौकात!

मी बाऊ करत नाही वगैरे म्हणून मी उगीच स्वतःला मवाळ करून घेतलं.

In fact I have seen her rarely on MiPa.

हा मात्र माझा अपमान आहे किंवा तुम्ही आत्ममग्न असता असे हे वाक्य सांगते.

हे अण्णा हजा-यांच्या प्रभावामुळे झाले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.;)

परिकथेतील राजकुमार's picture

16 Aug 2011 - 12:36 pm | परिकथेतील राजकुमार

अरे जमा रे कोणीतरी मिपाचौकात!

दगडं घेउन का मेणबत्त्या ?

पराण्णा ठाकरे

प्रियाली's picture

16 Aug 2011 - 3:04 pm | प्रियाली

आपण काय मेणाहून मऊ आहोत का मेणबत्त्या पेटवायला? दगड चालतील.

स्वतःला जेष्ठ आयडी म्हणवून घ्यायच्या आधी वरील दोघांनी होमवर्क नीट करावा. मिपाच्या थोर परंपरेत अशा कामांकरता बटाटे वापरले जातात याचा विसर पडू देऊ नका.

अभ्यासू कनिष्ठ,

श्रावण मोडक's picture

15 Aug 2011 - 9:59 pm | श्रावण मोडक

और ये लगा सिक्सर... ;)

प्रियाली's picture

15 Aug 2011 - 10:01 pm | प्रियाली

और ये लगा सिक्सर...

आता क्रिकेट नको हां या चर्चेत. नाहीतर बिरुटेसरांचं पित्त खवळायचं. ;)

चिंतामणी's picture

15 Aug 2011 - 4:52 pm | चिंतामणी

याचा संदर्भ मावळमधे झालेल्या गोळीबाराशी आहे. उ.प्र.मधे शेतक-याची बाजु घेउन मायावती विरूध्द आघाडी उघडणारे आणि "किसानोंका मसीहा" अशी स्वत:ची प्रतीमा बनवु पहाणारे राहूल गांधी ही घटना झाल्यावर इकडे फिरकले नाहीत या संदर्भात ती तिरकस जाहिरात होती.

विनायक प्रभू's picture

15 Aug 2011 - 4:55 pm | विनायक प्रभू

ही स्मस्या कशी सोडवावी ह्यावर एक पत्र 'मिपापोस्ट' वर पोस्ट करा.
घ्या मनावर काळेकाका.

मन१'s picture

15 Aug 2011 - 5:30 pm | मन१

माझ्यावर काहिही घ्यायची गरज नाही.

--मन

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Aug 2011 - 5:32 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काळे काका, श्री अण्णा हजारे आत्ता राजघाटावर चिंतन करत आहेत. उपोषणावर ठाम आहेत. याचाच अर्थ असा की ते आणि सर्व सहकारी स्वतःला अटक करुन घेतील. किंवा पोलीस आज रात्रीच त्यांना उचलतील ?
सायंकाळी सात वा.श्री अण्णा हजारेंची पत्रकार परिषद आहे. तेव्हा उद्याच्या उपोषणाबाबतची 'रणनीती' ठरेल असे वाटते.

-दिलीप बिरुटे

मीही पहाणार आहे ती पत्रकार परिषद. त्यानंतर बघू काय होते ते!
इथे जकार्तातल्या भारतीयांनीही जनलोकपालबिलाच्या समर्थनार्थ सह्यांची मोहीम काढली होती व आज स्वतंत्रतादिनानिमित्त्य आम्ही सारे ध्वजवंदनाला गेलेलो असतांना इथले राजदूत श्री बिरेन नंदा यांना ही सह्यांची यादी त्यांना देऊ इच्छितो असे सांगितले आहे व उद्या ती यादी देण्यात येईल.
मीही आमच्या कॉलनीत या मोहिमेत सक्रीय भाग घेतला होता. उद्या-परवा याबद्दल अधीक लिहीन.

नितिन थत्ते's picture

15 Aug 2011 - 6:15 pm | नितिन थत्ते

चालायचंच हो काळेकाका !!!! तरी वाकड्या तोंडाचा गांधी म्हणण्यापेक्षा बरं.

अवांतर: मराठी लोकांना 'आप' ऐवजी 'तुम' म्हणणे खटकले हे आश्चर्यकारक आहे. मराठी लोक आप न म्हणता तुम म्हणतात याबद्दल उत्तर भारतीय लोक नाराज असतात. कदाचित त्यांनी अण्णा मराठी आहेत म्हणून त्यांना रुचेल/पचेल असे तुम असे संबोधन वापरले असावे. ;)

असेल, असेल. तसेही असेल!
पण राहुल-जी बाकी कांहींही असोत वा नसोत, ’राज’बिंडे नक्कीच आहेत!

बिपिन कार्यकर्ते's picture

15 Aug 2011 - 7:05 pm | बिपिन कार्यकर्ते

चालायचंच हो काळेकाका !!!! तरी वाकड्या तोंडाचा गांधी म्हणण्यापेक्षा बरं.

वाकड्या तोंडाचा गांधी आणि इतर ठाकरी भाषेतली मुक्ताफळे ही चूकच आहेत, असतात. कधी कधी तर, क्षणिक करमणूकही होत नाही. त्यामुळे तुमची प्रतिक्रिया मान्य आहे. पण एक विचारावेसे वाटते... काँग्रेसच्या चुका काढल्या किंवा टीका केली तर त्यावर थेट टिप्पणी करण्यापेक्षा (समर्थन किंवा टीका काहीही) विरोधकांच्या तत्सम वागण्याचा संदर्भ देणे एवढेच का नेहमी बघायला मिळते? :) वरील प्रतिक्रियेआधी सरकारचेही चुकते आहे हे मान्य केले असते तर उत्तमच झाले असते.

अवांतर: मराठी लोकांना 'आप' ऐवजी 'तुम' म्हणणे खटकले हे आश्चर्यकारक आहे. मराठी लोक आप न म्हणता तुम म्हणतात याबद्दल उत्तर भारतीय लोक नाराज असतात. कदाचित त्यांनी अण्णा मराठी आहेत म्हणून त्यांना रुचेल/पचेल असे तुम असे संबोधन वापरले असावे.

प्रत्येक माणूस दुसरी भाषा, जी मातृभाषा नाही अथवा ज्या भाषेत बोलण्याचा सराव नाही अशी, भाषा बोलताना, चूका करतातच. हिंदीभाषिक लोकांनी दुसर्‍या भाषा नीट बोलून दाखवाव्यात, इतरभाषिक लोक हिंदी जितकी बोलतात तेवढं तरी. मगच इतरांना हसावे. मनिष तिवारी हिंदीभाषिक आहेत. त्यामुळे त्यांना हिंदी भाषेत आप / तुम / तू चे काय महत्व आहे हे माहित असावे. त्यामुळे त्यांनी हे केले ते अक्षम्यच आहे. हेच जर का एखाद्या व्यंकय्या नायडू अथवा जयपाल रेड्डींकडून झाले असते तर फारसे मनावर घेतले नसते.

नितिन थत्ते

याच्याबद्दल मला काहीच म्हणायचं नाही. ;)

... काँग्रेसच्या चुका काढल्या किंवा टीका केली तर त्यावर थेट टिप्पणी करण्यापेक्षा (समर्थन किंवा टीका काहीही) विरोधकांच्या तत्सम वागण्याचा संदर्भ देणे एवढेच का नेहमी बघायला मिळते?

एक नाणावलेले संपादक आहेत ते एवढाच एक धंदा करण्यात पटाईत आहेत.

नितिन थत्ते's picture

15 Aug 2011 - 8:04 pm | नितिन थत्ते

>>काँग्रेसच्या चुका काढल्या किंवा टीका केली तर त्यावर थेट टिप्पणी करण्यापेक्षा (समर्थन किंवा टीका काहीही) विरोधकांच्या तत्सम वागण्याचा संदर्भ देणे एवढेच का नेहमी बघायला मिळते? Smile वरील प्रतिक्रियेआधी सरकारचेही चुकते आहे हे मान्य केले असते तर उत्तमच झाले असते.

१. फालतु धाग्यावर फालतू प्रतिक्रिया म्हणून दिली होती. मला मोठा प्रतिसाद द्यायला भाग पाडल्याबद्दल आपला निषेध. ;)
२. सरकारचे चुकते आहे हे मान्य का करायला हवे? मला तर अण्णांचेच चुकते आहे असे वाटते. आधीच्या उपोषणाच्यावेळीही मी विरोधच केला होता. त्या उपोषणाच्या समाप्तीच्यावेळी संयुक्त मसुदा समितीचा प्रस्ताव आला तेव्हाच आपला 'ठोकपाल' मसुदा मान्य होणार नाहीये हे अण्णांना* कळायला हवे होते. तरीही या नव्या सरकारी विधेयकात आधीच्या विधेयकापेक्षा बर्‍याच चांगल्या गोष्टी आहेत. (विद्यमान) पंतप्रधान आणि हायर ज्युडिशिअरी सोडली तर इतर सर्व लोक त्यात कव्हर्ड आहेत. ज्या राजकारण्यांवर लोकांचा राग आहे ते सर्व राजकारणीही (संसदसदस्यदेखील) कव्हर्ड आहेत. ९०+ टक्के लोक कव्हर झालेले असताना उरलेले १०% नाहीत म्हणजे सगळे मुसळ केरात असा आविर्भाव ठेवणे मला पटत नाही.
३. मी विरोधकांच्या "तत्सम" वागण्याचे उदाहरण दिलेले नाही. त्याहून खूप भयंकर उदाहरण दिले आहे. परंतु काँग्रेसी व्यक्तीच्या बोलण्यातील तुम म्हणण्याचा गुन्हा हा वाकड्या तोंडाचा गांधी म्हणण्याशी "तत्सम" आहे हे आज कळले.
४. काँग्रेसची कुसळे काढून त्यावर एकसारखे धागे काढत बसणार्‍यांना काही सल्ला दिला तरी चालेल.
५. बिपिन कार्यकर्ते - याच्याबद्दल मला पण काहीच म्हणायचे नाही.

*येथे माननीय, परमपूज्य, जनतेचे तारणहार इत्यादि योग्य असतील ती आदरार्थी विशेषणे लावून वाचावे. न जाणो मी लावलेले विशेषण अण्णांच्या इभ्रतीच्या खालचे निघाले तर पुन्हा अण्णांचा अपमान व्हायला नको.

ता.क. : हायर ज्युडिशिअरीला कव्हर करणारा कायदा केला तर न्यायालय तो घटनाबाह्य म्हणून रद्द करणार नाहीत याची हमी अण्णा देत आहेत का?

बाळकराम's picture

16 Aug 2011 - 4:40 am | बाळकराम

थत्तेचाचा,

अण्णांची चूक कशी काय बुवा? माफ करा आपला आधीचा लेख मी वाचला नाही, त्यामुळे हा ठोकपाल मसुदा का मान्य होणार नाही ते जरा समजाऊन सांगाल का? काँग्रेस सारखा भ्रष्टाचार केला नाही, यापलिकडे अण्णांची दुसरी कुठलीही "चूक" माझ्यामते नाही! आणि सरकारी ड्राफ्ट आणि जनलोकपालाचा मसुदा यात काय काय फरक आहे ते लोकपालाच्या वेबसाईट वर दिलेले आहेच. विद्यमान पंतप्रधान आणि उच्च न्यायाधीशांना लोकपाल बिलात समाविष्ट का करु नये याची सरकारने दिलेली सोडून इतर कुठली कारणे आपल्याला ठाऊक आहेत ज्यायोगे आपण इतकी ठाम विधाने करता आहात? आणि हा मुद्दा लोकपाल विधेयक न्यायालये घटनाबाह्य ठरवतील का नाही असा नाहीच- जे काही विधेयक सरकारने मांडले आहे ते लोकपालाच्या तत्त्वाला धरून आहे की नाही हा आहे. कायद्याची वैधता हा नंतरचा मुद्दा आहे आणि त्याबद्दल सरकार तरी गॅरंटी देते आहे का? किंबहुना, या जनलोकपाल मसुद्याला विरोध करण्याच्या निमित्ताने सरकारने आणि सर्व सरकारी बगलबच्च्यानी जो प्रजातंत्राचा आणि लोकशाहीचा खून चालवला आहे, त्याबद्दल आपले काय मत आहे? आपल्या प्रतिक्रियेतून अनवधाने का होइना, पण अण्णांची सूक्ष्म हेटाळणी करण्याचा जो सूर डोकावतो आहे तो आपल्यासारख्याला नक्कीच शोभनीय नव्हे!

नितिन थत्ते's picture

16 Aug 2011 - 10:09 am | नितिन थत्ते

>>आपले काय मत आहे?

<हैयो मोड ऑन>ते तुम्हीच माझ्या विविध प्रतिसादांतून शोधा<हैयो मोड ऑफ>

चेतन's picture

16 Aug 2011 - 2:51 pm | चेतन

...याच्याबद्दल मला काहीच म्हणायचं नाही.

विकास's picture

15 Aug 2011 - 7:11 pm | विकास

मराठी लोक आप न म्हणता तुम म्हणतात याबद्दल उत्तर भारतीय लोक नाराज असतात.

खरे आहे! म्हणूनच मी जेंव्हा हे वाचले तेंव्हा तिवारींच्या वक्तव्यापेक्षा त्यांच्या अशुद्ध हिंदीचा निषेध करावासा वाटला! :) म्हणूनच अशा व्यक्तींनी मुंबई-महाराष्ट्रात येऊन राहू नये. उगाच अजून हिंदी बिघडेल... ;)

बाकी कोण हे तिवारी? थोडक्यातः असल्या लोकांच्या वक्तव्याकडे लक्ष देयचे असते का? अण्णांचे उपोषण हे होणारच आहे, आणि ते भ्रष्टाचारविरोधात होणार आहे, भाषाशुद्धीसाठी नाही...

अवांतरः फक्त एकच आशा आहे, की हे (अण्णांचे उपोषण) सिद्धसाधकाचा डाव ठरू नये. असो.

आनंदयात्री's picture

15 Aug 2011 - 7:42 pm | आनंदयात्री

=)) =))

>> आहे! म्हणूनच मी जेंव्हा हे वाचले तेंव्हा तिवारींच्या वक्तव्यापेक्षा त्यांच्या अशुद्ध हिंदीचा निषेध करावासा वाटला! म्हणूनच अशा व्यक्तींनी मुंबई-महाराष्ट्रात येऊन राहू नये. उगाच अजून हिंदी बिघडेल...

हा हा हा .. मनोसक्त हसलो !! चालू द्या.

मला एक मुलभुत शंका आहे.
जर उपोषणाला बसायच आहे तर त्यासाठी दिल्लीतील जागेचाच हट्ट का?
बातम्यांसाठी हपापलेली मिडिया मंडळी पार झुमरीतलैय्याही गाठतील की.

विकास's picture

15 Aug 2011 - 7:30 pm | विकास

जर उपोषणाला बसायच आहे तर त्यासाठी दिल्लीतील जागेचाच हट्ट का?

सत्ताकेंद्र म्हणून...

बातम्यांसाठी हपापलेली मिडिया मंडळी पार झुमरीतलैय्याही गाठतील की.

सहमत. हपापलेलीच कशाला, जर तुम्ही काही इफेक्टीव्ह केलेत तर मेडीया, जनता, राज्यकर्ते आपोआप येतात. दांडी हे काही सत्ताकेंद्र नव्हते.

कदाचीत जर हजार्‍यांनी साबरमतीतच उपोषणाला बसायचे ठरवले तर? गुजरात काही त्यांना अडवणार नाही! ;)

चिंतामणी's picture

15 Aug 2011 - 7:48 pm | चिंतामणी

कदाचीत जर हजार्‍यांनी साबरमतीतच उपोषणाला बसायचे ठरवले तर? गुजरात काही त्यांना अडवणार नाही! ;)

कै भारी पर्याय आहे.

पण यामुळे वरील सर्व मंडळींच्या हातात आयते कोलीतच मिळेल. आधीच संघ/भाजप बदनाम. त्यात नमोंच्या राज्यात. मग काय काय वक्तव्ये करतील हे बघायलाच नको.

विकास's picture

15 Aug 2011 - 8:12 pm | विकास

पण यामुळे वरील सर्व मंडळींच्या हातात आयते कोलीतच मिळेल. ... त्यात नमोंच्या राज्यात.

असं बघा. गुजरात सर्वप्रथम सार्वभौम राष्ट्राचा (भारताचा) एक भाग आहे, मग ते महात्मा गांधीजींचे जन्मस्थान असल्याने आणि त्यांच्या पुण्यस्पर्शाने पवित्र असलेले गांधीजींचे गृहराज्य (होमस्टेट) आहे, म्हणूनच अहींसावाद्यांसाठीचे तिर्थक्षेत्र आहे. साबरमती हे तर समाजसेवकांचे देशप्रेमी जनतेचे प्रार्थनास्थळ! मग त्यानंतर जे कोणी आत्ता राज्यकर्ते असतील ते या राज्याचे जनतेने निवडलेले पालक म्हणून मुख्यमंत्री वगैरे असतील... अर्थात येथे ते नरेंद्र मोदी आहेत. आता जर कोणी त्यातील भारताचा भाग, महात्मा गांधीजींच्या गृहराज्यास, साबरमतीच्या स्वतंत्र पावित्र्यास टाळून फक्त मोदींचेच राज्य म्हणू लागला, तर त्यांचा जाहीर निषेध! त्यांनी केवळ गुजराथीच नाही तर समस्त भारतीयांच्या भावना दुखावल्या असे मी समजेन. :-)

अशा अहींसेच्या, असहकार आंदोलनकर्त्याच्या, खड्ग आणि ढाली ऐवजी उपोषण हे संयमीत शस्त्र म्हणून वापरत स्वातंत्र्य देणार्‍याच्या जन्मस्थळी कोणीच विरोध करू शकणार नाही असे वाटत असल्याने, "गुजरात काही त्यांना अडवणार नाही" असे म्हणले होते. असो. :-)

हेच केंद्रातील सरकारला बोचेल ना.

कदाचीत जर हजार्‍यांनी साबरमतीतच उपोषणाला बसायचे ठरवले तर? गुजरात काही त्यांना अडवणार नाही! ;)

विकासराव तुमच्या म्हणत्यात पॉईंट हाय हा. :)

माननिय विकास यांना मी विकासराव संबोधले आहे याची जाणकारांनी दखल घ्यावी. ;)

आजचे राजघाटावरचे दृश्य पाहिल्यावर उद्या जेपी पार्कचा तेहरीर चौक होणार असे वाटते, (किंबहुना व्हायलाच हवा.)

तरुण मंडळी आपापल्या 'बालवीरां'ना घेऊन आली होती ते दृश्य थेट तेहरीर चौकाची आठवण करून देणारेच होते.


सरकारला जनतेच्या मनातील चिडीचा, क्षोभाचा अंदाज आलेला दिसत नाहीं, पण अण्णांवर "व्यक्तिगत हल्ला" न करण्याचा "आदेश" काँग्रेसजनाना 'वरून' आलेला दिसतोय कारण तशी घोषणाही झाली. (त्यात "तुम-तुम्हारा"चाही समावेश नक्कीच असणार!)
अण्णांचे भाषण सुरचित नव्हते (disorganized होते) पण भावना लोकांपर्यंत छान पोचल्या.
आता उद्या काय होते तिकडे लक्ष लागले आहे.
सध्या टीका फक्त नेते, मंत्री, बाबू यांच्यावर केंद्रित आहे, पण खरे भ्रष्टाचारी आहेत उद्योगपती. ते पैसे 'चारतात' तेंव्हाच 'जनावरे' चरतात. त्यामुळे यथावकाश अण्णांनी आपली बंदूक पूंजीपतींवर रोखायला हवी, नाहीं कां?
जय अण्णा हजारे.....!

आत्मशून्य's picture

15 Aug 2011 - 9:38 pm | आत्मशून्य

मी स्वतः अण्णा हजारेंची ५-६ भाषणे प्रत्यक्ष हजर राहून ऐकली आहेत, त्यांचि भाषणे मला कधीच सुरचित वाटली नाहीत. पण RTI पासून त्यांच्या आंदोलनांना मी बराच मानायला लागलो. *

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Aug 2011 - 9:33 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काका तुमचं प्रथम अभिनंदन. चर्चेला तुम्ही जवाबदारीनं मूळ मुद्यावर आणत आहात. नाही तर मला वाटलं चर्चेत फाटे फोडण्यासाठी चर्चेत उगाचच आवश्यक म्हणून येणारे अनावश्यक विषय जसे, स्त्री म्हणून- आई म्हणून एका मुलाच्या भावना व्यक्त करणारे विषय, स्त्रीयांचे आजार आणि श्रीमती सोनिया गांधी यांचे एक स्त्री म्हणून येणारे आजाराचे विषय, शामची आई तशी राहूल गांधी यांची आई अशी चर्चा जाते की काय असे वाटायला लागले होते, परंतु त्यामानाने चर्चाप्रस्तावक म्हणून आपण आपली जवाबदारी पाळलेली दिसते . आपले मनःपूर्वक अभिनंदन. असो,

हं तर आपण कुठपर्यंत आलो होतो. सात वाजेच्या पत्रकार परिषदेपर्यंत-

पत्रकार परिषेदेतील सूर तर आपल्या लक्षात आलाच आहे की, उपोषण होणार म्हणजे होणार. पत्रपरिषदेत मला जाणवलेला एक मुद्दा असा की अतिशय चतुरपणे श्री अण्णा आणि टीम सरकारविरुद्ध प्रभावी लोकपाल विधेयकासाठी यशस्वी रित्या आंदोलन करत आहे. आता प्रभावी लोकपाल येईल किंवा न येईल परंतु हे आंदोलन करत असतांना विचारातून व्यक्त होत असलेला संसदेचा आदर आणि तत्त्सम गोष्टी अतिशय प्रभावीपणे सदरील मंडळी मांडत आहेत म्हणूनच राजघाटावर झालेली गर्दी असे दाखवते की श्री अण्णा आणि टीम कदाचित सर्व भ्रष्टाचार क्षणात नाहीसा करु शकणार नाही परंतु भ्रष्टाचाराविरुद्ध एक लढा उभारण्याची जी गरज आहे त्यासाठी सर्वांनी सहभागी व्हायला पाहिजे ही जी जनजागृती आहे, ती मला लोकांच्या गर्दीतून जाणवली. आता तिथे हौसे गौसे जास्त असतीलही. परंतु भ्रष्टाचाराविरुद्ध लोकमत बनत आहे ही मला चांगली गोष्ट वाटत आहे, तुम्हाला काय वाटते ?

-दिलीप बिरुटे

दिलीप,
माझा वरचा प्रतिसाद तुझा प्रतिसाद वाचायच्या आधीच मी लिहिला होता. मला तर राजघाटावरील वातावरण तेहरीर चौकाची छोटी आवृत्तीच वाटली.
एका तरुणाचे उद्गार फार हृदयाला भिडले, "मैंने गांधीजीको कभी देखा नहीं था, पर आज देखा अण्णजीके रूपमें!"
बस्स. हे एक वाक्य बरेच सांगून जातो.
लोक मुला-बाळांना घेऊन आले होते त्यामुळेही तेहरीर चौकाची आठवण झाली!
(पुतण्या म्हणून एकेरी संबोधन केले आहे, चालेल ना? नाहीं तर पुन्हा निषेध व्हायचा!-काका)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Aug 2011 - 9:48 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>> पुतण्या म्हणून एकेरी संबोधन केले आहे, चालेल ना?
चालेल-चालेल.

>>>> नाहीं तर पुन्हा निषेध व्हायचा !)

हाहाहाहा.

-दिलीप

राजेश घासकडवी's picture

15 Aug 2011 - 11:09 pm | राजेश घासकडवी

चर्चेला तुम्ही जवाबदारीनं मूळ मुद्यावर आणत आहात.

हे पटत नाही. चर्चाप्रस्ताव अत्यंत मर्यादित आहे. कोणीही ऐऱ्यागैऱ्याने एखाद्या ज्येष्ठ, माननीय व्यक्तीला अरेतुरे करणं योग्य नाही, त्याचा निषेध करावा इतपतच मांडणी चर्चाप्रस्तावात आहे.

राजघाटावर झालेली गर्दी, भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलन, लोकपाल विधेयक या गोष्टी या चर्चेत आणणे म्हणजे चर्चाप्रस्तावाला वेगळं वळण देणं होय. त्याला मूळ मुद्द्यावर आणणं कसं म्हणता येईल? फारतर फुटकळ विषयावरून महत्त्वाच्या विषयावर आणणं म्हणता येईल.

नितिन थत्ते's picture

16 Aug 2011 - 9:38 am | नितिन थत्ते

सहमत आहे.

बाकी ज्या गोष्टीवर धागाप्रस्तावक आक्षेप घेत आहेत तीच गोष्ट ते (पूर्वपरवानगी न घेता) इतर आयडीबाबत करत आहेत. त्यांच्या वयाचा मान ठेवून ते इतर आयडी नंतर विचारल्यावर चालेल म्हणतात.

मी त्यांना अशी पश्चात परवानगी दिली होती ती मी मागे घेत आहे.

(१) मला हे कळत नाहीं कीं आपल्याकडे स्वातंत्र्यदिनाच्या परेडमध्ये जे फ्लोट्स असतात तसा एक साबरमती आश्रमाचा फ्लोट करून त्यात बसून अण्णासाहेब उपोषणाल कां बसत नाहींत? तो फ्लोट मुंगीच्या वेगाने लोकसभेच्या भोवती, जंतर-मंतर, रामलीला मैदान असा फिरत राहील व अण्णांच्या समर्थकांना सहज त्या 'रथा'मागे चालत जाता येईल. हे किरण बेदी यांना किंवा केजरीवाल यांना कळवायला हवे! कुणाला त्यांचा ई-मेल किंवा फोन नं माहीत असेल तर मी त्यांच्याशी संपर्क साधू इच्छितो!
(२) पण असे करायला लावणे हीच सरकारची घोडचूक आहे. असेच करून बेन अली, होस्नी मुबारक हे गादीवरून तर उतरलेच पण जनतेच्या तीव्र तिरस्काराचेही धनी झाले. आज मुबारक यांची काय अवस्था आहे हे खालील चित्रात पहा. आपले नेतेही असेच 'तिहार'मध्ये मुक्काम ठोकतील काय आणि तिथून न्यायालयांत पेश होतील काय?

या पोस्टच्या शीर्षकात 'साहेब' काढून 'जी' वापरला आहे कारण 'तिवारी-जी' हा शब्दप्रयोगच जास्त योग्य वाटतो!.

मराठी_माणूस's picture

16 Aug 2011 - 9:36 am | मराठी_माणूस

हेच मत मी वर व्यक्त केले होते. साहेब हा शब्द त्या व्यकी साठी खटकत होता

इंदिरा गांधींनी १९७५ साली आणीबाणी जाहीर केली. त्यानुसार मोरारजींना अटक करायला जेंव्हां पोलीस त्यांच्याकडे गेले तेंव्हां स्वाधीन होताना ते म्हणाले होते, "विनाशकाले विपरीत बुद्धि:". आज अण्णांना अटक झाली तेंव्हां या उद्गारांची आठवण झाली.

मराठी_माणूस's picture

16 Aug 2011 - 11:51 am | मराठी_माणूस

ह्याच मोरारजीना हीच ""विनाशकाले विपरीत बुद्धि:". १९६० मधे झाली होती.

१९६० साली काय झाले? (डॉनमधे आलेले नसल्यामुळे) आठवत नाहीं. महाराष्ट्र-गुजरात यांची मोट? कीं आणखी कांहीं?

मराठी_माणूस's picture

16 Aug 2011 - 12:31 pm | मराठी_माणूस

संयुक्त महाराष्ट्र चळवळ , आकसापोटी गोळीबाराचा आदेश , १०५ जण हकनाक बळी गेले

सुधीर काळे's picture

16 Aug 2011 - 2:01 pm | सुधीर काळे

खरंच कीं! तो 'दै. मराठा'चा सुवर्णकाळ होता! आम्ही पुण्याच्या (त्यावेळच्या एकुलत्या एक) इंजिनियरिंग कॉलेजात होतो आणि 'मेस'मध्ये सामुदायिक वाचन व्हायचे.....