आटपाट नगरीतील जज आणि चुलबुल पांडे...

JAGOMOHANPYARE's picture
JAGOMOHANPYARE in काथ्याकूट
29 Jul 2011 - 9:01 am
गाभा: 

आटपाट नगरीतील जज आणि चुलबुल पांडे...

आटपाट नगरातील ही सत्यकहाणी.

गावातील कोर्टात एक जज मॅडम होत्या. त्यांचा नवरा गेल्यामुळे त्या एकट्याच होत्या. साधारण ४० एक वय असावं.

कोर्टाशेजारीच पोलिस स्टेशनची इमारत. तिथल्या चुलबुल पाम्डेवर त्यांचं मन फिदा झालं आणि त्या दोघानी लग्न केलं.

लग्न केलं आणि गोंधळ झाला. कारण चुलबुल आधी विवाहीत असून दोन मुलांचा बाप आहे. त्याचं म्हणणं, मी दोन्ही बायकाना व्यवस्थीत करीन.

आणखी एक तिढा. बाई मुसलमान, तर बुवा हिंदु. बाईनी हिंदु धर्मानुसार कुंकू बांगड्या वापरायला सुरुवात केली.

गावचे बार असोसिएशन खवळले. त्यानी बाईंवर बहिष्कार घातला आणि कोर्टाचं कामकाज बंद केलं. त्यांचं म्हणणं, दुसरे लग्न बेकायदेशीर आहे, हे माहीत असूनही जजबाईनी विवाहिताशी लग्न केले, आता त्याना न्यायदान करायचा नैतिक अधिकार नाही..

पण मग असे असेल, तर बाईवर बहिष्कार कसा? चुलबुल पांडेवर मात्र कोणताच बहिष्कार नाही.

गाव मात्र सारी कहाणी बघत बसले आहे.

यात नेमके दोषी कोण?
१. बाई-- हे लग्न करायला नको होते. आणि धर्म बदलायला नको होता.
२. बुवा-- निदान धर्म तरी बदलायचा, म्हणजे दुसरा विवाहही चालला असता.
३. बार कौन्सिल-- खाजगी गोष्टीचे भाम्डवल करुन फक्त स्त्रीवर बहिष्कार टाकायला नको होता.

प्रतिक्रिया

अन्या दातार's picture

29 Jul 2011 - 9:28 am | अन्या दातार

आता इथल्या सदस्यांनीही हा धागा गावाप्रमाणे बघत बसायचे आहे कि त्यावर (बार कौंसिलचे सदस्य असो वा नसो) निवाडा करायचा आहे?
जर नुसताच बघत बसायचे असेल तर ताबडतोब वाचनमात्र करावा का???

(चिंताग्रस्त) अनिरुद्ध

llपुण्याचे पेशवेll's picture

29 Jul 2011 - 10:02 am | llपुण्याचे पेशवेll

नवरा गेल्यामुळे बाई जर दुसरे लग्नं करू शकत असतील तर बाईवर बहीष्कार का? चुलबुलवर बहीष्कार टाकावा.
चुलबुलने सांगावे निराधार बाईला आसरा दिला आहे. आम्ही लग्नं केलेले नसून लग्नं केल्यासारखे केले आहे. ;)

चुलबुल मजा करतोय तर करु द्यावि...
गावाचा काय संबध ?

श्रीरंग's picture

29 Jul 2011 - 12:21 pm | श्रीरंग

राखी का इन्साफ चा एपिसोड वाटतोय.

नावातकायआहे's picture

29 Jul 2011 - 1:52 pm | नावातकायआहे

आधि विचार करायचा...दोघांनीबी.
उगा दुनियेला ताप...आनि बिनकामाच्या डोक्यांना खुराक

सही रे सई's picture

29 Jul 2011 - 3:34 pm | सही रे सई

ही दबंग या पिक्चरच्या सिक्वेलची स्टोरी तर नाही? अशी शंका आली शिर्षक बघून!!
म्हणून लगेच वाचलं. पण कसचं काय आणि कसचं काय...

पल्लवी's picture

29 Jul 2011 - 4:32 pm | पल्लवी

..पोलिस स्टेशनची इमारत अज्ज्ज्जिबात असायला नको होती.
भलत्या भानगडी होतात ते होतात अन वर पुन्हा इथे वाचत बसायला लागतात.