माझी नवीन चित्रे

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in कलादालन
19 Jul 2011 - 3:22 pm

माझी काही नवीन चित्रे:

ही चित्रे माझ्या अनेक वर्षांच्या चित्रकलेतील खटाटोपींतून हळूहळू विकसित होत गेलेल्या स्वतःच्या शैलीतील आहेत.
चित्र सुरु करताना ते कसे होणार आहे, म्हणजे बरे वाईट असे नव्हे, तर या चित्रात मी काय काय आणि कसे चित्रित करणार आहे, याची काहीही पूर्व कल्पना मला नसते. एक एक चित्र अनेक दिवस चालत रहाते... सुरुवतीला काही अनिश्चित असे रंग-आकार कॅनव्हास वर पसरवून ठेवतो, त्यातूनच कल्पनेला चालना मिळत जाऊन चित्र आकार घेत जाते. असे असले, तरी माझ्या अनेक चित्रात प्राचीन जागा, मंदिरे, राजवाडे, वडाच्या पारंब्या, मातीची घरे, ढग वगैरे असते... याचे कारण मी अनेक वर्षे अतिशय आवडीने अश्या अनेक जागांवर जाऊन, तिथे बसून चित्रे काढत आलो आहे... हल्लीची चित्रे मात्र अमूक अश्या विशिष्ट जागांची नसून माझ्या अनुभवातून आकार घेत जाणारी काल्पनिक चित्रे आहेत

आणखी चित्रे खालील दुव्यावर बघता येतीलः
http://www.flickr.com/photos/sharad_sovani/

कलासंस्कृतीरेखाटन

प्रतिक्रिया

परिकथेतील राजकुमार's picture

19 Jul 2011 - 3:32 pm | परिकथेतील राजकुमार

पाषाणभेद's picture

20 Jul 2011 - 9:35 am | पाषाणभेद

चित्रगुप्तांना चित्र गुप्तरितीने सादर करण्याची सवय दिसते आहे असे वाटते. मागल्या चित्राच्या धाग्यातही असेच झाले होते.

चित्रात बारकावे फारच छान चित्रीत केले आहेत. शैलीही छान आहे. मुर्त आहे.

अमोल केळकर's picture

19 Jul 2011 - 3:34 pm | अमोल केळकर

गुप्त झालेली चित्रे दिसू लागली
मस्त :)

अमोल

धमाल मुलगा's picture

19 Jul 2011 - 3:41 pm | धमाल मुलगा

झकास चित्रं काढता की द्येवा...
लोकांच्या पाप-पुण्याच्या डेबिट क्रेडिट वेंट्र्या मारता मारता एव्हढा वेळ मिळतो तरी कुठून म्हणतो मी. ;)

मृत्युन्जय's picture

19 Jul 2011 - 3:43 pm | मृत्युन्जय

सुंदर चित्रे आहेत. सालं आम्हाल हे असलं कधी जमलं नाही आणि जमायचं बी नाही.

हेहेहे चित्रकलेत नेहमीच दांड्या उडायच्या. पण इथे तर चित्रकारिता धो धो बरसते आहे. लगे रहो चित्रगुप्तजी..

- (अडाणी चित्रकार) पिंगू

खादाड's picture

19 Jul 2011 - 4:20 pm | खादाड

खुप छान !!

अतिशय छान चित्र..
विषेश करुन दूसर्या चित्रातील गर्द रंग खुपच छान वाटत आहे..

आणि पहिल्या चित्रातील गणपती, बुरुजाशेजारी चालणारा एक परिवार हे चित्रकाराच्या मनाचे वेगळेच तरंग दाखवत आहेत.

बहुगुणी's picture

19 Jul 2011 - 8:29 pm | बहुगुणी

दोन्ही चित्रे आवडली.

दक्षिण-पूर्व इटली मधल्या मटेरा या भागातील पुरातन घरांची आठवण झाली, राहवत नाही म्हणून इथे त्या स्थळाची चित्रे टाकतो आहे:

Nile's picture

19 Jul 2011 - 9:15 pm | Nile

असेच एक जॉर्डनचे.

स्मिता.'s picture

19 Jul 2011 - 8:49 pm | स्मिता.

दोन्ही चित्रे छानच!
दुसरे जास्त आवडले. शांत रंग जास्त असल्याने डोळ्यांनाही एकप्रकारची शांतता मिळते.

खूप आवड्ली दोन्ही चित्रे!
:)

स्वानन्द's picture

19 Jul 2011 - 9:07 pm | स्वानन्द

मस्त!!

चतुरंग's picture

20 Jul 2011 - 3:33 am | चतुरंग

ही कोणती शैली म्हणायची?

-रंगा

सहज's picture

20 Jul 2011 - 6:42 am | सहज

तुम्ही काढलेल्या दोन्ही चित्रांबद्दल कृपया अजुन माहीती द्यावी.

मदनबाण's picture

20 Jul 2011 - 9:14 am | मदनबाण

पहिल्या चित्रातला गणपती बाप्पा लय आवडला... :)

(कला प्रेमी)

राघव's picture

20 Jul 2011 - 12:42 pm | राघव

खूप आवडले. पण चित्राच्या पार्श्वभूमीबद्दल थोडे लिहाल का?
आम्हा सर्वांना मूळ संदर्भ नीट समजून घेण्यासाठी सोपे पडेल अन् चित्र बघतांनाचा आनंदही द्विगुणीत होईल. :)

राघव

चित्रगुप्त's picture

9 Aug 2011 - 2:51 am | चित्रगुप्त

खालील लेखांमध्ये याबद्दल वाचा:
http://misalpav.com/node/18741
http://misalpav.com/node/18587

चित्रगुप्त's picture

21 Jul 2011 - 12:55 pm | चित्रगुप्त

चित्रांबद्दल थोडेसे लिहिले आहे, आणखी पुढे कधीतरी...

गणपा's picture

21 Jul 2011 - 2:48 pm | गणपा

छान आहेत. आवडली.

नितिन थत्ते's picture

21 Jul 2011 - 2:03 pm | नितिन थत्ते

आवडली चित्रे.

सहज's picture

21 Jul 2011 - 2:58 pm | सहज

चित्रे छान आहेत. आता तुम्ही मोठे कलाकार आहात तर आम्ही काय बोलायचे.

माध्यम, रंग, एक चित्र पूर्ण व्हायला किती वेळ लागतो. चित्राचे विषय कसे निवडता इ वाचायला आवडेल.

आत्मशून्य's picture

21 Jul 2011 - 3:04 pm | आत्मशून्य

सुरुवतीला काही अनिश्चित असे रंग-आकार कॅनव्हास वर पसरवून ठेवतो, त्यातूनच कल्पनेला चालना मिळत जाऊन चित्र आकार घेत जाते.

खरोखर छान. स्वप्न सत्यामधे उतरवणे फार कमी लोकांना साधते. चित्र पाहताना त्यामधे खरोखर हरवल्यासारखे वाटते