कॉफी विथ करन ...भारताचे भूषण ए. आर. रेहमान

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
26 May 2011 - 8:33 pm

कॉफी विथ करन ...भारताचे भूषण ए. आर. रेहमान

अशीच एक मुंबईतील सकाळची घाईगर्दीची वेळ. यशराज स्टुडियोच्या गेटजवळ कचकचकच् आवाज करत आलिशान गाड्या एकामागोमाग थांबतात. येणारे पाहुणे उतरतात. आपल्या आवडत्या कलाकाराला बघण्यासाठी सेक्युरिटी गेटवर एकच तोबागर्दी केलेल्या फॅन्समधून वाट काढत, काळ्या कोटातील सूटबुटातील एक व्यक्ती झरझर चालत सेक्युरिटीकडे बघुन हात उंचावत इमारतीमधे लिफ्टकडे वळते. लिफ्टच्या आगमनाच्या प्रतीक्षेत सुरवंटासारखी रांग तिथे वाट पाहते आहे, त्या रांगेत ही व्यक्ती उभी राहते. लिफ्टचा दरवाजा वर जायला उघडतो. क्यूमधे थांबून राहिलेल्या लोकांची पर्वा न करता अचानक एकजण लिफ्टमधे घुसू बघतो.

"येक्स्क्यूज मी मिस्टर, पीप्पळ् आर वेईटिंग इन् क्यू. कॅन् यू प्लीस् बी इन दि क्यू?" शांत पण निश्चयाचा आवाज आला. मधे जाऊ पाहणारी व्यक्ती गडबडून जाऊन मागे वळून पहात म्हणते, "सॉरी, बट होप यू नो मी. आय हॅव टू गो अर्जंटली. माझे शूटींग सुरू होणार आहे." आपल्या मोबाईल फोनवरून नजर न हटवता काळ्या कोटातल्या व्यक्तीच्या नम्र आवाजाला धार येते. "आयेम् सॉऽरी... यू हॅव टू ऑऽनर दि क्यू सिस्टीम..."

... प्रसंग ओळखून शूटींगवाल्याने धीर धरला, तो गुमान रांगेत जाऊन उभा राहिला. नंतर काही वेळाने लिफ्टमधे शूटींगवाल्याने काळ्या कोटवाल्याला हस्तांदोलन करण्यास हात पुढे करून स्वत:ची ओळख करून दिली... "माय नेम इज् करन जोहर..." "ओह्, यू आर करन जोहर, नैस्स् टू मिट्ट् यू..." स्मितहास्यांची देवाणघेवाण झाली...

....आणि मधे सेटवर त्यादिवशीच्या मुलाखतीच्या शूटींगची तयारी सुरु झाली. आज इथे काही विशष कार्यक्रम दिसतोय. नुकतेच 'जय हो' गीतासाठी अकॅडेमी अवॉर्ड मिळवलेले भारताचे भूषण ए. आर. रेहमान साहेब हे आजचे पाहूणे आहेत असे इतरांच्या बोलण्यातून कळतेय. मगाशी लिफ्टमधे घुसू पाहणारे करन जोहर त्यांची प्रकट मुलाखत घेणार असतात. लाईट?... साऊंड?...रेडी?.. व्हायच्या आत साहेब येतात, कोचवर विसावतात आणि मुलाखतीला सुरुवातही होते...

१० मिनिटांच्या शूटींगनंतर करन जोहरच्या मेकपसाठी विराम घेतला जातो. फावल्या वेळात कोचावर बसलेले साहेब प्रेक्षकांकडे बघतात. पहिल्या ओळीत विराजमान काळ्या कोटधारी व्यक्तीला खूण करून बोलावुन घेतात व त्यांच्या कानगोष्टी चालू होतात. नंतर प्रत्येक ब्रेकमधे असे घडते. साहेब आणि काळा कोटधारी तमिळ मधून बोलत असतात. दोघेही काहीतरी महत्त्वाचे बोलताहेत असे वाटते.

शूटींग संपते. साहेबांशी हस्तांदोलन करून शूटींग समाधानकारक झाल्याचे करन जोहर आनंदाने सांगितात व मगाशी फावल्या वेळात साहेबांशेजारी बसलेल्या, तमिळ मधून संभाषण करत असलेल्या त्या काळ्या कोटधारी व्यक्तीशी आपणहून हस्तांदोलनासाठी हात पुढे करून हसत हसत म्हणतात, "व्हेन् रेहमान इज देर, नोबडी ईव्हन लूक्स ऍट मी. सर, यू डिड्’ण्ट टेल् मी युवर् गुडनेम येट्?"

रेहमान साहेबांच्या चेहर्‍यावर नेहमीचे सुपरिचित स्मितहास्य दिसत होते... "हायकोर्ट मधे प्रॅक्टीस करणारे एक बहुभाषी, कॉपीराईट क्षेत्रातील तज्ञ ऍडव्होकेट...." असा काळ्या कोटधारी व्यक्तीचा परिचय दिला गेला. करन जोहर ह्यांनी स्वत:हून त्यांच्याशी बिझनेस कार्डस् ची देवाणघेवाण केली... मगाशीच लिफ्टजवळ घडलेला प्रसंग आठवून दोघांनी एकमेकांजवळ दिलगिरी व्यक्त केली...

...ती काळाकोटधारी व्यक्ती म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून नाडीग्रंथातील भाषा-लिपींच्यावर अभ्यासकार्य करणारे.... हैयो हैयैयो होत....

मुक्तकमौजमजाचित्रपटरेखाटनसद्भावनाविरंगुळा

प्रतिक्रिया

भडकमकर मास्तर's picture

26 May 2011 - 8:55 pm | भडकमकर मास्तर

लेख ल्ह्यायची स्टाईल आवडली... :)
आणि मजकूरही मस्त...

आनंदयात्री's picture

26 May 2011 - 9:41 pm | आनंदयात्री

हाण तिचायला .. हैय्यो साहेब कोणीतरी भारी आहेत याचा अंदाज होताच.

रामदास's picture

26 May 2011 - 9:49 pm | रामदास

यांचा परीचय आवडला. ओक साहेब यांचा आभारी आहे.

प्रभो's picture

26 May 2011 - 11:16 pm | प्रभो

हेच म्हणतो...

करण जोहरचा चेहरा कसा झाला असेल त्या वेळेला , लै भारी!

लेखन वेगळे आणि छान!
हैय्यो साहेबांची ओळख आवडली.

कवितानागेश's picture

26 May 2011 - 11:02 pm | कवितानागेश

:)

आत्मशून्य's picture

26 May 2011 - 11:22 pm | आत्मशून्य

पण धाग्याच्या टायटलचा व हैयो हैयैयो ची वर्तणूक व व्यवसाय सांगण्याचा काही विषेश संबंध ? तसेच सदरील गोश्ट आपणास कोणी सांगीतली हे कळाले तर विस्तृत जानकारी मिळेल.

निल्या१'s picture

27 May 2011 - 1:06 am | निल्या१

कोण हे हैयो हैयैयो ?

शशिकांत ओक's picture

27 May 2011 - 8:04 pm | शशिकांत ओक

यावर वसंत काव्य कट्ट्य़ावर प्रकाश टाकावा असे मनात आहे.
नुकतीच सारसबागेची पहाणी करून ती जागा नक्की केली आहे. त्यासाठी त्याबागेत यायला तेथील चौपाटीकडील दरवाज्याने आत यावे आणि उताराच्यावाटेवरून आले की डाव्याहाताला असलेल्या झाडांखाली कट्टात सामील व्हावे.
चहा व अन्य डीशची सोय ही झाली आहे. तेंव्हा बिगीबिगी यावे. कारणे असतील तर बाजूला ठेवून रविवारी सायंकाळी ५पर्यंत हजेरी लावावी. ही विनंती.
आपण येत असल्याची वर्दी आधी मला ९८८१९०१०४९ वर दिलीत तर आनंद वाटेल.
आपला नम्र,

तुमचे नाडीव्यतिरीक्त जे लिखाण आहे ते आवडते. हा लेख आवडला.
एक भोचक विचारणा: तुम्ही हवाईदलातले अनुभव कधी लिहिणार?

माझे हवाईदलातील किस्से-अनुभव लिहिले गेले आहेत. ते अन्य ठिकाणी प्रकाशिक करायला दिले आहेत.

स्मिता.'s picture

27 May 2011 - 1:44 am | स्मिता.

हैयो हैयैयोंची वेगळ्याच पद्धतीने करून दिलेली ओळख आवडली.

"ओह्, यू आर करन जोहर, नैस्स् टू मिट्ट् यू..."

हे वाक्य करन जोहरच्या थोबाडीत मारल्यासारखे आहे :D

गोगोल's picture

27 May 2011 - 4:20 am | गोगोल

इथे बरेच जण करण जोहर ची फजिती कशी झाली या अर्थाने प्रतिसाद लिहीत आहेत.
मला तर याऊलट करन जोहर ईतका मोठा दिगदर्शक असूनही(माझे त्याच्या चित्रपटांबद्द्लचे मत जरा वेळ बाजूला ठेवू. हे तर मान्य करावेच लागेल की बॉलिवूड मधील प्रथितयश(का काय म्हणतात त्यापैकी) दिगदर्शकांपैकी तो एक आहे), तो नम्र आहे. विचार करा:
१. त्याने रांग मोडली:
आपल्या पैकी सर्व जणांनी घाईत असताना रांग मोडणे, सिग्नल तोडणे, शॉर्ट कट मारून वेळ वाचवायचा प्रयत्न केलेला असणारच. मग केवळ करन जोहरनी अस केल म्हणून त्याला का दोष द्यायचा?
२. एका अनोळखी आणि तिथे पहिल्यांदाच येत असलेल्या माणसानी त्याला त्याची चूक दाखवून दिल्यावर ती त्याने पट्कन सुधारून आपला सुसंस्कृतपणा दाखवला आहे:
याऊलट तो त्याचा इलाका आहे. तिथे त्याने आत्तापर्यंत शेकडो एपिसोड्स चित्रित केलेले आहेत. म्हणजेच तिथे त्याला सगळेजण ओळखतात (अगदी गार्ड्स सुद्धा). त्यानी वाकड्यात जाऊन नाही पाळत मी रांगेचा नियम अस म्हणल असत तरी कुणीही त्याच्या वाकड्यात जायची हिम्मत करू शकल नसत (आणि केली जरी असती तरी गार्ड्स ला सांगून अशा व्यक्तीला त्याला आरामात बाहेर फेकून देता आला असत. इथे कल्पना करा की करन जोहर च्या जागी एखाद राजकीय व्यक्तीमत्व असत (जस की ठाकरे मंडळी) तर कदाचित असा आक्षेप घ्यायची कुणाची हिम्मत ही झाली नसती.
उगाचच करन जोहर्ला दोष देणे म्हणजे ज्या माणसानी आपली चूक सुधारली त्याला खाली पहाण्याजोगे आहे.
यात सगळ्यात महत्वाचे असे वाक्य मला पुढीलप्रमाणे वाटते:
> मगाशीच लिफ्टजवळ घडलेला प्रसंग आठवून दोघांनी एकमेकांजवळ दिलगिरी व्यक्त केली

याच्यामध्ये अ‍ॅकनॉलेजमेंट आहे की हो माझे चुकले आणि हो मला मान्य आहे की अशी चूक सगळ्याकडून होऊ शकते.

सहज's picture

27 May 2011 - 7:39 am | सहज

करण जोहर यांचा चांगला परिचय करुन देणारा लेख परिक्षण -प्रतिसाद आवडला.

बाकीची पात्रे विनाकारण घुसडली आहेत.

ओकांचे वेगळे लेखन - हटके डीश म्हणुन कौतुकाने वाचायला जावे तर न विसळलेल्या खरकट्या भांड्यात स्वैपाक केलेला दिसला. नाडीचा दुर्गंध इतका जबरदस्त की एक चांगली डीश खराब झाली!

नितिन थत्ते's picture

27 May 2011 - 8:31 am | नितिन थत्ते

ओक साहेबांनी नाडी सोडून* काहीतरी लिहिलं आहे असं वाटून वाचायला आलो होतो.

*म्हणजे नाडी व्यतिरिक्त ;)

माझीही शॅम्पेन's picture

27 May 2011 - 4:54 am | माझीही शॅम्पेन

माफ करा साहेब , पण हा तद्दन भिकार लेख वाटतोय .. ह्यात काय ग्रेट आहे ? हैयो हैयैयो हा प्रसंग घडला म्हणून थोर की नाडीग्रंथातील भाषा-लिपींच्यावर अभ्यासकार्य करतात म्हणून थोर की ए. आर त्याना (किवा) ते त्याला ओळखतात म्हणून थोर ?
बर हा प्रसंग तुम्हाला कसा कळला ? त्यानी तुम्हाला सांगून तो तुम्ही छापताय का ? थोडक्यात सांगायाच हा किस्सा कमी आणि जाहिरात / लांगूलचालन जास्त वाटतोय !!

अवांतर :- हैयो हैयैयो ह्या शो वर आले तर त्याच नाव नाडी विथ करण ठेवायला हरकत नाही :)

डायरी डायरी प्लीज, पराभाउ काय झालं आल्या का नाय डाय-या छापुन. लवकर करा कि राव जरा.

विसोबा खेचर's picture

27 May 2011 - 9:06 am | विसोबा खेचर

शशी, छान लिहिलं आहेस रे..! :)

अजूनही लिहित जा रे सायबा.. :)

अवांतर - बाकी, दोन-चार मोजकी गाणी सोडली (ती नक्कीच चांगली आहेत) तर रेहमान हा एक अत्यंत सामान्य इसम आहे असं माझं व्यक्तिगत मत आहे. तो पुण्याचा डॉ सलील कुलकर्णीही 'सामान्य' कॅटॅगरीतच मोडणारा आहे, हेही माझं व्यक्तिगत परंतु परखड मत आहे..

तात्या.

टारझन's picture

27 May 2011 - 11:38 am | टारझन

. तो पुण्याचा डॉ सलील कुलकर्णीही 'सामान्य' कॅटॅगरीतच मोडणारा आहे, हेही माझं व्यक्तिगत परंतु परखड मत आहे..

नाहीतर काय .. भुस्सनळ्या साला :) माझा एक मित्र त्याच्या गाण्यांच्या कार्यक्रमाला गेलेला, नंतर त्याला भेटला तेंव्हा तो हवा फार खराब करतो असा रिपोर्ट त्याने मला दिला होता.
अर्थात हे पण माझं व्यक्तिगत आणि परखड मत आहे म्हणा.
संदिप खर्‍या बद्दल बोललो असतो , पण (प्राजु मारेल म्हणुन) गप्प रहायचे ठरवले आहे :)

- सलिम कुटकर्णी

शशिकांत ओक's picture

27 May 2011 - 12:09 pm | शशिकांत ओक

धन्यवाद,
करण किंवा रेहमान उच्च कोटीतील कलाकार आहेत. आपली आपली आवड-चव असते. हैयोंच्या व्यक्तीमत्वाची झलक मित्रांना व्हावी हा उद्देश. त्यात अन्यांच्या प्रतिभेचा अनादर नाही.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

18 Jun 2011 - 5:11 am | निनाद मुक्काम प...

पुण्याचा डॉ सलील कुलकर्णीही.........
सहमत
संदीप खरे ह्यांचा अमृता सुभाष व मधुरा सोबत कवितांचा एक कार्यक्रम पहिला .भन्नाट कविता व अप्रतिम सादरीकरण. मात्र
हा कुलकर्णी पक्का डांबिस . संदीप खरे चे कार्यक्रमात हा पार कडबोळे करून टाकतो .
अमृता संदीपच्या कवितांचे सोने करते तर सलील पार टिंब टिंब करून टाकतो .

:)

( हा प्रसंग ओकसाहेबाना कसा माहीत झाला म्हनूनक्विचारु नये. त्याना तो नाडी पाहून कळला असेल. )

Nile's picture

27 May 2011 - 10:32 am | Nile

आपल्या मनात तर बॉलीवूड बद्दलची जी काय प्रतिमा होती ती एकदम धुळीस मिळाली. साला करण जोहर जिथे त्याच्या शोच्या शुटिंग साठी जातो तिथे चक्क त्याला पब्लिक लिफ्ट मधून जावं लागतं!! (का त्याची लिफ्ट पब्लिक वापराला भाड्याने दिली आहे?) त्याच्या शिंच्या लिफ्टमध्ये लिफ्टमन नाही?(ओळख करून द्यायला हो, बाकी आजकाल पुण्यातल्या चाळींमध्ये पण लिफ्टमन अस्तात हो!)

बाकी लेखातून तर माझा असा ग्रह झालेला आहे की साहेबांना करण पेक्षा काळ्या कोटातील साहेबांशीच बोलण्यात जास्त रस होता. करणपेक्षा त्यांनीच का मुलाखत घेतली नाही कोणास ठावूक! (बाकी वकिल आपल्या साक्षीदाराला पढवतात या शिनेमात बघितलेल्या प्रसंगाची आठवण का आली हे ही कोणास ठावूक काय माहित!)

हायकोर्ट मधे प्रॅक्टीस करणारे एक बहुभाषी, कॉपीराईट क्षेत्रातील तज्ञ ऍडव्होकेट...."

वावावा! बाकी हैयो हैय्ययोंना करण जोहर माहित नव्हता हे ऐकून तर माझी छाती अभिमानाने फूगून आली आहे. म्हणून त्या ... मध्ये अजून काही विशेषणे रोवायचा मला मोहही होत आहे, पण साला आपण कोण गंगू गेली म्हणून स्वतःवरच डाफरतो झालं..

शशिकांत ओक's picture

27 May 2011 - 12:13 pm | शशिकांत ओक

धन्यवाद,

विश्वनाथ मेहेंदळे's picture

27 May 2011 - 12:28 pm | विश्वनाथ मेहेंदळे

लेख वाचताना सुरुवातीला थोडा गोंधळलो. नक्की काय दाखवायचे आहे ते कळले नाही. मात्र शेवटचे वाक्य वाचून आनंद झाला. परिचय आवडला आणि अशी व्यक्ती मिपा वर असते याचा आनंद झाला.

बाकी काही प्रतिक्रिया अत्यंत अपेक्षित अशा आहेत. काही जणांना २५०-३०० शब्दांमधून नेमका नाडी हा अर्धाच शब्द दिसून त्यांचा पोटशूळ उठला. तर काही जणांना निव्वळ जळजळ झालेली दिसते.धाग्याच्या शेवटी इनो चा फोटो टाकावा ही विनंती.

llपुण्याचे पेशवेll's picture

27 May 2011 - 12:42 pm | llपुण्याचे पेशवेll

विश्वनाथाशी सहमत आहे. लेख चांगला झाला आहे. असे अभ्यासू तसेच अनेक भाषा जाणणारे तज्ञ व्यक्तिमत्व मिपावर आहे याचा आनंद झाला.
बाकी अर्धा शब्दवगैरेशी तंतोतंत सहमत.

विनंतीनुसार देत आहोत.

आनंदयात्री's picture

27 May 2011 - 10:42 pm | आनंदयात्री

विश्वनाथ आणि पेशव्यांशी सहमत आहे.

छोटा डॉन's picture

27 May 2011 - 11:40 pm | छोटा डॉन

विश्वनाथ, पेशवे आणि यात्रीशी सहमत आहे.
लेख खरोखर चांगला झाला आहे, हैय्यो साहेबांच परिचय करुन देण्याची पद्धत आवडली.
हैय्यो कुणीतरी मोठ्ठी तज्ज्ञ असामी असावी असा अंदाज होतात, आता त्यांचे कौतुक वाटले असे सांगतो.

- छोटा डॉन

Nile's picture

28 May 2011 - 5:13 am | Nile

नाडीची जाहिरात करून तुम्हाला आर्थिक फायदा होतो का हा प्रश्न ओकांना वेळोवेळी विचारून झाला आहे आणि त्याचे उत्तर त्यांजकडून मिळाल्याचे माझ्या वाचनात नाही (कोणाच्या असल्यास दाखवून देणे). असे असता ओळखीत नाडी आणणे हा, दुसर्‍या धाग्याच्या अनुषंगाने, जाहिरात उद्देशही असु शकतो अशी शंका वावगी नाही.

ज्यांना विरोध पचत नाही त्यांनी स्वतःच स्वतःच्या इनोच सदुपयोग करून घ्यावा.

प्रदीप's picture

27 May 2011 - 2:43 pm | प्रदीप

आणि हैयो हैयैयो ह्यांचे अभिनंदन.

आमच्या येथे करण जोहर काही वर्षांपूर्वी आला असतांना त्याने एका टी. व्ही. क्रूस वेळ देऊनही अनेक तास ताटकळत ठेवले होते, आणि प्रत्यक्ष जेव्हा तो अवतरला तेव्हा त्याने एका शब्दानेही दिलगीरी व्यक्त केली नाही. त्या क्रूमधील ब्रिट* कॅमेरामनचे त्यावरील भाष्य अजून विसरू शकलो नाही!

(* म्हणाजे एका परदेशी व्यक्तिचे सदर व्यक्तिविषयीचे भाष्य इतकेच म्हणायचे आहे. तो ब्रिट होता म्हणून त्याचे भाष्य भारतीयांपेक्षा जास्त महत्वाचे का, इत्यादी प्रतिक्रिया प्री-एंप्ट करण्यासाठी हा तारांकित खुलासा).

शशिकांत ओक's picture

27 May 2011 - 10:14 pm | शशिकांत ओक

यावर वसंत काव्य कट्ट्य़ावर प्रकाश टाकावा असे मनात आहे.
नुकतीच सारसबागेची पहाणी करून ती जागा नक्की केली आहे. त्यासाठी त्याबागेत यायला तेथील चौपाटीकडील दरवाज्याने आत यावे आणि उताराच्यावाटेवरून आले की डाव्याहाताला असलेल्या झाडांखाली कट्टात सामील व्हावे.
चहा व अन्य डीशची सोय ही झाली आहे. तेंव्हा बिगीबिगी यावे. कारणे असतील तर बाजूला ठेवून रविवारी सायंकाळी ५पर्यंत हजेरी लावावी. ही विनंती.
आपण येत असल्याची वर्दी आधी मला ९८८१९०१०४९ वर दिलीत तर आनंद वाटेल.
आपला नम्र,