झणझणीत वेब मसाला..

गवि's picture
गवि in जनातलं, मनातलं
24 May 2011 - 5:33 pm

आजचा ऑनलाईन मटा.

त्याचा सायंकाळी ५ वा. ६ मि. भारतीय प्रमाणवेळेनुसार घेतलेला प्रिंटस्क्रीन पहा.

"११ वर्षीय मुलीचे कौमार्य विकले" अशा टायटलची बातमी आहे. तिची लिंक अर्थातच अन्य वेबसाईटला आहे. ती उघडल्यावर मजकूर दिसत नाहीये.

मला धक्कादायक हेच वाटतं की "११ वर्षीय मुलीचे कौमार्य विकले" अशा मथळ्याची बातमी "झणझणीत वेब मसाला" अशा सदरात द्यावी ? (डावा कॉलम बघा)

तिथेच "ऑनलाईन सेक्स रॅकेटचा पर्दाफाश" अशीही बातमी कम एक्सटर्नल लिंक आहे. ही पण त्यांच्यामते झणझणीत मसालेदार बातमी असावी.

याच सदरात कोणाकोणाचे न्यूड फोटोसेशन, चावट हेडलाईनवाल्या बातम्याही दिल्या जातात. पण "११ वर्षीय मुलीचे कौमार्य विकले" ही असल्याच प्रकारची चमचमीत बातमी म्हणून प्रेझेंट केली जावी?

वा रे संवेदनशीलता.. हॅट्स ऑफ..

समाजजीवनमानविचारबातमीमाध्यमवेध

प्रतिक्रिया

मृत्युन्जय's picture

24 May 2011 - 5:39 pm | मृत्युन्जय

तिथे नेहमी असल्याच बातम्या असतात. इण्डियाटाइम्स ही पोर्नो साइट आहे असे माझे स्पष्ट मत आहे. पोर्न साईटला कसली नैतिकता आणि कसली संवेदना.

पुन्हा तेच म्हणतो..

अरे पॉर्न साईट असण्याबद्दल आक्षेप नाही. दाखवा हॉट फोटोसेशन्स वगैरे, झणझणीत वेब मसाला म्हणून. स्तुत्य उपक्रम आहे तो.

पण "११ वर्षाच्या .... कौमार्य विकले" अशा मथळ्याची बातमी (ती काही का असेना) तीही झणझणीत मसाला म्हणून ?

उद्या बलात्काराची बातमीही "चमचमीत मसाला" म्हणून देणार का? भले वाचकांतले अनेक त्या दृष्टीने चघळून वाचत असतीलही. मी वर्तमानपत्राच्या अँगलविषयी म्हणतोय..

मृत्युन्जय's picture

24 May 2011 - 5:59 pm | मृत्युन्जय

माझेही तेच म्हणणे आहे गवि. ती बातमी योग्य सदरात नाही हे मलाही मान्य आहे. पण एकदा इंडियाटाइम्स पोर्नसाइट आहे हे मान्य केले की काही वेगळे वाटणार नाही तुम्हाला. इंडियाटाइम्स चा आणि पत्रकारितेचा काडीमात्र संबंध नाही. निव्वळ धंदेवाईक वर्तमानपत्र आणि संकेतस्थळ. अश्या लोकांचा आणि नैतिकतेशी किंवा संवेदनशीलतेशी काही संबंध असेल असे वाटत नाही.

(ऑनलाईन) मटा अत्यंत फालतू असतो असे माझे मत आहे. परवा आयफोन अ‍ॅन्ड्रॉईड वर चालतो असे खुशाल छापले होते. मंद लोक आहेत.

आत्मशून्य's picture

24 May 2011 - 6:08 pm | आत्मशून्य

कूठे, कूठय ती बातमी ? लींक टाका राव... मटा म्हणजे खरच कहर आहे....

गोगोल's picture

24 May 2011 - 11:33 pm | गोगोल

आयफोन आयपॅड वर चालतो ईत़क पण नाही माहीत.

चिरोटा's picture

24 May 2011 - 6:01 pm | चिरोटा

गगनविहारींशी सहमत आहे.म.टा. अगदीच ***** झालाय्.असो.

तिथेच "ऑनलाईन सेक्स रॅकेटचा पर्दाफाश" अशीही बातमी कम एक्सटर्नल लिंक आहे

ह्या बातमीचा उल्लेख अनेक व्रूत्तपत्रांनी "high-tech-prostitution-racket-busted" असा केला् . ह्यात हाय टेक काय होते ते शेवटपर्यंत कळले नाही.!! मोबाईल तर सगळेच वापरतात.केवळ वाचकांची नजर बातमीकडे जावी असाच उद्देश असावा.

http://expressbuzz.com/cities/bangalore/high-tech-prostitution-racket-bu...

नगरीनिरंजन's picture

24 May 2011 - 6:10 pm | नगरीनिरंजन

टाईम्स ग्रुपचा निव्वळ धंदेवाईक उद्देश तर उघड असतोच, पण धंदेवाईक लोक पाळतात तेवढीही नीतिमत्ता त्यांची पाळायची तयारी नाहीय. लोकांची अभिरुचि खालावत न्यायची आणि मग एक दिवस अशी पातळी गाठायची की कसलंच काहीच वाटेनासं होतं. कोणावरचाही कोणत्याही प्रकारचा अत्याचार ही बातमी चमचमीत वाटणार्‍याला विकृतच काय नरभक्षक म्हणायलाही हरकत नाही.

काही वर्षांपूर्वी इतक्या धडधडीतपणे अश्या बातम्या (आणि असल्या चुका) येत नसत. निदान शिर्षक तरी जरा बरे दिलेले असे. समाजही आजकाल हे सगळे आहे त्या नावाखाली स्विकारताना दिसतो आहे. घरात वडीलच आपल्या कॉलेजच्या दिवसातले प्रताप हसत सांगत असतील तर वर्तमानपत्रवाल्यांना कोण बोलणार?

पंगा's picture

25 May 2011 - 12:02 am | पंगा

घरात वडीलच आपल्या कॉलेजच्या दिवसातले प्रताप हसत सांगत असतील तर वर्तमानपत्रवाल्यांना कोण बोलणार?

कोणाचे वडील?

ते हेच का?

यकु's picture

24 May 2011 - 6:32 pm | यकु

पास ;-)

प्रियाली's picture

24 May 2011 - 7:04 pm | प्रियाली

आम्ही मटा वाचणे कधीच सोडून दिले आहे. तुम्हीही हा मार्ग धरू शकता.

इंटरनेटस्नेही's picture

24 May 2011 - 8:16 pm | इंटरनेटस्नेही

अतिशय 'झ' दर्जाचा पेपर.

अन्या दातार's picture

24 May 2011 - 9:39 pm | अन्या दातार

हल्ली मटा हा दै. संध्यानंदचा फॉलोअर झालाय.

इंटरनेटस्नेही's picture

25 May 2011 - 12:58 am | इंटरनेटस्नेही

हल्ली मटा हा दै. मुंबई संध्याचा फॉलोअर झालाय.

अप्पा जोगळेकर's picture

24 May 2011 - 9:57 pm | अप्पा जोगळेकर

दर तासाला पेज रिफ्रेश केल्यावर लेटेस्ट बातम्या देणारे दुसरे मराठी वॄत्तपत्र (आंतरजालीय) अस्तित्वात नाही. त्यामुळे वाचतो. ज्यांना इंटरेस्ट नसेल त्यांनी अशा बातम्यांकडे दुर्लक्ष करावे हे उत्तम.

आत्मशून्य's picture

24 May 2011 - 11:51 pm | आत्मशून्य

कोणतीही लेटेस्ट खबर ही फक्त मटा(ओनलाइन)वरती येते, नंतर मग इतरत्र पोचते असा अनूभव आहे (मराठीत).

हुप्प्या's picture

25 May 2011 - 5:02 am | हुप्प्या

मटा पॉर्न साईट बनली आहे असे म्हणून ह्याच्याकडे दुर्लक्ष करु नये. त्यांच्या feedback, contact us अशा लिन्का शोधून शक्य असेल त्यांना इमेला पाठवून निषेध व्यक्त केला गेला पाहिजे.

११ वर्षीय बालिकेवरील हे अत्याचार हा एक गुन्हा आहे. त्याला चविष्ट बातमी बनवून ती लोकांपुढे ठेवणे चूक आहे. आणि त्या पेपराच्या व्यवस्थापनापर्यंत आपला निषेध पोचवला पाहिजे. निदान प्रयत्न केला पाहिजे.

असले अश्लाघ्य प्रकार सहन करता कामा नयेत.

मला मटाचा हा कॉलम आवडतो बॉ ..
उगा फुकाच्या नैतिकतेच्या बाता कशाला मारा ? ;)

-सत्यवादी दुबे

अरे टार्‍या. नीट न वाचता प्रतिक्रिया टाकणार्‍यांत तू कधी जाऊन बसलास रे..

मी त्या कॉलमच्या चविष्टपणाबद्दल बोलत नाहीये. तो अश्लील आहे असंही म्हणत नाहीये. नैतिक अनैतिक असला काही भाग नाही.

११ वर्षांच्या मुलीचे कौमार्य विकले अशी खेदजनक दुर्दैवी बातमी झणझणीत मसाला म्हणून (वाचणे जरी अनेकांना आवडत असले तरी) छापणे चूक वाटत नाही का? ते ही म.टा. ने

आहो गवी .. तुम्हाला काय सगळे उचकटुन सांगावं लागावं काय ? ;)

नीट न वाचता प्रतिक्रिया टाकणार्‍यांत तू कधी जाऊन बसलास रे..

बाकी वरवर प्रतिक्रीया वाचुन आम्हाला जज करणार्‍यांच्या पंक्तित अजुन एक भर टाकलीत तुम्ही .. खॅखॅखॅ

असो , जगात बर्‍याच चुकीच्या गोष्टी होत आहेत. :)

मदनबाण's picture

26 May 2011 - 9:57 am | मदनबाण

ओ विहारी... हल्ली पेपरवाल्यांना अशाच मसालेदार बातम्या लागतात !!! किती क्लीक कुठे होत असतात ते त्यांना बरोबर कळतं ना !!! असो.
बाकी तुमच्या भावनेशी पूर्णपणे सहमत आहे आणि या प्रकाराचा निषेध करावा तेव्हढा कमीच आहे.

मदनबाण's picture

26 May 2011 - 10:04 am | मदनबाण

*

गोगोल's picture

28 May 2011 - 6:35 am | गोगोल

सेन्सॉर शिप साठी काही तरतूदी आहेत का?