पाचवी खोली

आदिजोशी's picture
आदिजोशी in जनातलं, मनातलं
29 Mar 2011 - 9:53 am

गिरगावातल्या चाळीत वाढलेल्या आमच्यासारख्या लोकांचं घराबद्दलचं एक स्वप्न असतं. स्वप्न सुरू - घरात एक प्रशस्त, हवेशीर संडास असावा - स्वप्न समाप्त. जास्त अपेक्षा नाहीत. मजल्यावरच्या ४ बिर्‍हाडात मिळून एक असलेल्या सार्वजनीक संडासाला आम्ही प्रेमाने पाचवी खोली म्हणत असू. काही लोक त्याला 'मालकाची खोली' असंही म्हणत. संडासाला 'मालकाची खोली' म्हणण्यामागे चाळ मालकाला नावं ठेवणं इतकाच हेतू नसून त्या बोलण्याला 'फक्त खोलीचं भाडं देऊन संडास फुकट वापरता' असं मालकाने ऐकवल्याची पार्श्वभूमी असे. चाळीतला संडास हा क्लिओपात्राच्या बाथ-टब सारखा लेख लिहायच्या लायकीचा जिन्नस नाही. कुणी लेख लिहावा इतकी ही उदात्त वस्तू अथवा वास्तू नाहीच. पण चाळकर्‍यांच्या जीवनात हिचं महत्व अनन्यसाधारण आहे हे नाकारता येत नाही.

जे चाळीत राहिले नाहीत त्यांच्यासाठी सांगायचं तर ही पाचवी खोली साधारण सिनेमात दिसणार्‍या पोलिसांच्या टॉर्चर रूम सारखी दिसते. फक्त इथे सत्य शोधक पट्टा नसतो. साधारण ६x६ ची खोली. जास्त जोरात लावली तर तुटेल अशी भीती वाटणारी कडी. कडी लाऊनही उघडाच राहिलाय असं वाटणारा दरवाजा. स्वातंत्र्यपूर्वकाळात कोबा केलेली जमीन. एक शोभेचा नळ. काचा फुटलेली आणि कुणीतरी पुठ्ठा चिकटवलेली खिडकी. संशोधनाचा विषय ठरावा असा रंग. भरीसभर म्हणून त्या खिळखिळ्या दरवाजातून किलकिलत आत येणारा प्रकाशाचा झोत पाचव्या खोलीत एक गूढ-भयाण वातावरण निर्माण करत असे.

दरवाजाच्या त्या फटीखेरीज हवा येण्याजाण्याचा दुसरा मार्ग नसल्याने खोलीतल्या ह्या भयाण वातावरणाला कुंद कारूण्याची झालरही लागत असे. कुणी जास्तवेळ आत राहिल्यास लोकं बाहेरून 'मेलास का रे?' असं ओरडत. ह्या ओरडण्याचे कारण चेष्टा नसून आतल्या माणसाविषयी कळकळ असे. कारण माणूस फार वेळ आत राहिला तर गुदमरून मरण्याचीच शक्यता जास्त. कदचित त्यामुळेच लोकं बाहेरही पटापट येत. आणि ती तशी यावीत ह्यासाठीच कुणी तिथे एग्झॉस्ट फॅन वगरे बसवले नसावेत. कोण जाणे, एखादा आत रमला तर इतरांची पंचाईत व्हायची. फ्लश, एग्झॉस्ट फॅन सारख्या चैनी त्या काळी नव्हत्या. आणि असत्या तरी त्या नळासारख्या शोभेपुरत्याच राहिल्या असत्या.

मुंबईचं प्रतिबिंब मुंबईकराच्या आयुष्यात दिसतं असं म्हणतात. आणि ते बघायला पाचव्या खोली सारखी दुसरी उत्तम जागा नाही. गर्दी, भयानक उकाडा, खूप घाम, कोंदट हवा, मान टाकलेला नळ ही मुंबईची सगळी लक्षणं ह्या ६x६ च्या खोलीत दिसून येतात.

ह्या पाचव्या खोलीने आम्हाला काय काय शिकवलं हे लिहायला लागलो तर यादी फार मोठी होईल. हठयोग्यांसारखं एका पायावर उभं राहून रांगेत तप करायला शिकवलं. सकाळी सकाळी प्रत्येक मजल्यावर असे अनेक ध्यानमहर्षी दिसत. शेअरींग आणि वेटींगचे प्रात्यक्षिक इथे दिसे. एक माणूस माणूस आत गेला की तो जाताना पेपर दुसर्‍या माणसाकडे पास करत असे आणि तो पुढच्याकडे. रांगेचा फायदा सर्वांना ही ओवी इथे प्रत्यक्षात अनुभवली जात असे. इतकी शिस्तबद्ध रांग मुंबईत दुसरीकडे कुठेही दिसणार नाही.

अनेक जण तर सकाळी सकाळी बायकोची कटकट नको म्हणून शांत चित्ताने विडी शिलगावून रांगेत उभे राहत आणि नंबर आला की लोकांना पास देऊन पुढे पाठवत. माणसं उठली की आधी देवापुढे हात जोडायचे सोडून तोंडात ब्रश खुपसून रांगेत उभे राहत. घरात २ पेक्षा अधीक मुलं असली तर एक दुधाच्या रांगेत आणि एक इथल्या रांगेत असं चित्र दिसे.

इथे आम्ही पाण्याची बचत करायला शिकलो. पाचव्या खोलीत नळ असे, पण वयस्क माणसांना उठताना आधार म्हणूनच त्याचा वापर होई. त्यातून पाणी येताना कुणीही कधीही पाहिले नव्हते. 'हा नळ मालकाने टाकीला जोडलेलाच नाही, नुस्ताच पाईप टाकलाय' असंही एकदा एकाने मला सांगितलं होतं. अशा परिस्थितीत सगळी भिस्त घरून आणलेल्या बादलीवर असे. घरून निघून मधल्या वाटेत पाण्याचा एकही थेंब खाली न पडू देता, बादली अजिबात डचमळू न देता मुक्कामी पोचणे हे येरागबाळ्याचे काम नव्हे.

पाचव्या खोलीने आम्हाला विजेची बचत करायला शिकवली. प्रत्येकाच्या घरात इथल्या दिव्याचा वेगळा स्विच असे. घरून निघताना तो सुरू करून निघावा लागे. कार्यभाग आटपून माणूस बाहेर पडला की दरवाज्याची बाहेरची कडी लावल्याचा आणि घरून दिव्याचा स्विच ऑफ केल्याचा आवाज एकदमच येत असे. लोकांचे कुले धुवायला आपली वीज का जाळा? असे साधे सोपे तत्व त्या मागे असे. आजकालच्या मुलांना एखाद्या खोलीतून बाहेर पडताना दिवे आणि पंखे बंद करावे हे शिकवावं लागतं. इथे तो आमच्या चाळीच्या संस्कारांचाच भाग होता. कारण 'जरा जाऊन येतो, जोशांचा दिवा सुरू आहे' असे संवादही केवळ आणि केवळ चाळीतच ऐकू येत.

अनेक लोकांच्या प्राणायामाच्या सवयीची सुरुवात इथूनच झाली. जीव मुठीत धरून 'बसणे' म्हणजे काय ह्याचा शब्दशः अनुभव इथे येत असे. आत जाताना छातीभरून श्वास घ्यायचा आणि तो सोडायला लागायच्या आधी बाहेर यायचं असे अचाट प्रकार इथे बघायला मिळत. मुंबईच्या घाईगडबडीच्या आणि गर्दीने व्यापून राहिलेल्या आयुष्यात काही एकटेपणाचे निवांत क्षण अनुभवण्याची जागाही ही पाचवी खोली असे. चाळकर्‍यांचं बाकी सगळं आयुष्यच सार्वजनीक असल्याने इथेच काय तो एकांत मिळत असे. नको नकोसा वाटला तरी.

अशा ह्या आखुडशिंगी, बहुगुणी पाचव्या खोलीपासून एकेकाळी आमच्या दिवसाची सुरुवात होत असे. आणि शेवटही. चाळीवर आणि चाळकर्‍यांवर अनेकांनी अनेक लेख लिहिले पण ही पाचवी खोली मात्र उपेक्षितच राहिली आणि म्हणूनच आमचा हा लेखन प्रपंच.

----------------------------------------------------------------------------X----------------------------------------------------------------------------

संस्कृतीअनुभव

प्रतिक्रिया

एक नंबरी ललित रे....

पुलंची आठवण झाली

हरिप्रिया_'s picture

29 Mar 2011 - 10:04 am | हरिप्रिया_

:)
मस्त लेख...

मृगनयनी's picture

29 Mar 2011 - 10:25 am | मृगनयनी

आदि'जी... मस्त लेख! बटाट्याच्या चाळी'ची आठवण झाली! :)
पुलेशु! :)

_______

मुम्बई'तल्या या अ‍ॅडजस्टमेन्टमध्ये तावून सुलाखून निघालेला माणूस जगाच्या पाठीवर कुठेही राहू शकतो!! ;)

(जसा... पुण्यात वाहने चालविणारा माणूस जगात कुठेही कशीही कोणतीही वाहने चालवू शकतो! ;) )

llपुण्याचे पेशवेll's picture

29 Mar 2011 - 11:15 am | llपुण्याचे पेशवेll

जसा... पुण्यात वाहने चालविणारा माणूस जगात कुठेही कशीही कोणतीही वाहने चालवू शकतो!
हे पुणेकर लोक ना कुठेही प्रौढी मिरवायची संधी मिळाली ना तरी सोडीत नाहीत.
चला आता १००+ नक्की.

टारझन's picture

29 Mar 2011 - 11:56 am | टारझन

ज्या दिवशी चाळीत पाणी येत नाही , त्या दिवशी "ढिगावर ढिग " ठरलेले असतात , त्याची आठवण झाली .

अवांतर : मालकांची खरडवही ला सुद्धा पाचवे खाते म्हणावे काय ? :)

स्पंदना's picture

29 Mar 2011 - 10:05 am | स्पंदना

वा आदीजोशी भाई!! तुमच देण अगदी मुकाटपणे स्विकारणार्‍या त्या खोलीच देण अगदी झकास देउन टाकल भाउ.

तुमच्या शैली बद्दल मी काही बोलण म्हणजे जरा अगोचर पणा होइल. इथे सर्वांना तुम्ही आवडताच. मला ही तुमच लेखन आवडत इतकच या निमित्ताने.

पु. ले. शु.

मला अक्षररंग फॅसिलिटी डॉन रावांनी दिल्याच्या अविर्भावात मी खालील अवांतर लिहित आहे. तेंव्हा ते फिक्या रंगात वाचावे.
(अवांतर- पहिला प्रतिसाद देताना उगाचच धडधडत नाही?)

sneharani's picture

29 Mar 2011 - 10:07 am | sneharani

हा हा हा! मजा आली वाचायला!
मस्त लिहता! येऊ दे आणखीन लिखाण!!
:)

श्रीराम गावडे's picture

29 Mar 2011 - 10:10 am | श्रीराम गावडे

पण हा लेखन प्रपंच सुंदरच आहे.
चाळीतल्या संडासातला अतिमंदप्रकाशित बल्ब कि ज्यामुळे जेमतेम आपण कुठे बसतोय तेवढच कळत.

आदिजोशी, अजुन एक छान लिखाणं तुमचं. आता एवढंच म्हणतो,

तुम्ही लिहित रहा, आम्ही वाचत राहु.

गवि's picture

29 Mar 2011 - 10:18 am | गवि

अल्टिमेट..

कडी लाऊनही उघडाच राहिलाय असं वाटणारा दरवाजा. स्वातंत्र्यपूर्वकाळात कोबा केलेली जमीन. एक शोभेचा नळ. काचा फुटलेली आणि कुणीतरी पुठ्ठा चिकटवलेली खिडकी. संशोधनाचा विषय ठरावा असा रंग.

पाचव्या खोलीत नळ असे, पण वयस्क माणसांना उठताना आधार म्हणूनच त्याचा वापर होई. त्यातून पाणी येताना कुणीही कधीही पाहिले नव्हते.

अगदी अगदी.. चाळीतले लहानपणचे दिवस खाडकन आठवले.

झकास लिहीत आहात. पुलंची झलक दिसली. फार फार आवडलं.

भई वाह!

तुमच्या या लिखाणाने त्या पाचव्या खोलीचे पांग फेडले हे निश्चितच!

आमच्यासारख्या लोकांचं घराबद्दलचं एक स्वप्न असतं. स्वप्न सुरू - घरात एक प्रशस्त, हवेशीर संडास असावा - स्वप्न समाप्त.

१००% सहमत.

नगरीनिरंजन's picture

29 Mar 2011 - 10:53 am | नगरीनिरंजन

वा! झकास लेख! लेखन विषयाकडे पाहून खुसखुशीत वा कुरकुरीत असे म्हणत नाही पण लेख वाचताना सकाळी सकाळी पोट साफ झाल्यावर वाटते त्यापेक्षा जास्त मजा वाटली.
चाळीत राहायची वेळ न आलेल्या माझ्यासारख्या माणसालाही तुमची व्यथा समजली आणि त्या पाचव्या खोलीचेही यथार्थ चित्र डोळ्यासमोर उभे राहिले. आता रोज सकाळी इतर अनेक गोष्टींबरोबर स्वच्छ, हवेशीर आणि स्वतंत्र अशा संडासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत जाईन.

मृत्युन्जय's picture

29 Mar 2011 - 10:54 am | मृत्युन्जय

_/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_

सादर प्रणाम. साष्टांगाची स्मायली असल्यास ती डकवली आहे असे समजा.

सुहास..'s picture

29 Mar 2011 - 10:58 am | सुहास..

झकास रे अ‍ॅड्या !!

नन्दादीप's picture

29 Mar 2011 - 11:09 am | नन्दादीप

लहानपणी एकदा गिरगावात आलो होतो. त्यावेळची आठवण झाली.
आयुष्यातला पहिला प्राणायाम ईथेच शिकलो. आणि आपल्या सारखच बाकीच्यांना पण पोट आणि काय काय ते असत ते जरा उशिर झाल्यावर खाल्लेल्या शिव्यांवरुन समजल.
आता ईथेच आहे, आणि आम्ही "पाचव्या खोलीला" "चिंतन गृह" असे म्हणतो. मस्त मनन,चिंतन करता येत...(जर तुमच चिंतन गृह तेवढ साफ, आरम्दायक असेल तर.)

नन्दादीप's picture

29 Mar 2011 - 11:10 am | नन्दादीप

लहानपणी एकदा गिरगावात आलो होतो. त्यावेळची आठवण झाली.
आयुष्यातला पहिला प्राणायाम ईथेच शिकलो. आणि आपल्या सारखच बाकीच्यांना पण पोट आणि काय काय ते असत ते जरा उशिर झाल्यावर खाल्लेल्या शिव्यांवरुन समजल.
आता ईथेच आहे, आणि आम्ही "पाचव्या खोलीला" "चिंतन गृह" असे म्हणतो. मस्त मनन,चिंतन करता येत...(जर तुमच चिंतन गृह तेवढ साफ, आरम्दायक असेल तर.)

चावटमेला's picture

29 Mar 2011 - 11:16 am | चावटमेला

अगदी अप्रतिम उभी केली आहे पाचवी खोली. आम्ही ह्या पाचव्या खोलीला लहानपणी पाकिस्तान म्हणायचो, अजूनही म्हणतो ;)

llपुण्याचे पेशवेll's picture

29 Mar 2011 - 11:23 am | llपुण्याचे पेशवेll

कधी कधी तर आतून कोण बाहेर आला आहे यावर लाईनतला पुढचा मनुष्य नंबर घेणार का पास देणार हे ठरत असे. मग आतून बाहेर आलेल्या माणसाच्या समोरच पुढच्याने पास दिला तर आतून आलेला माणूस त्यास उपरोधाने म्हणत असे "बरोबर तुला त्याचा वास आवडतो ना. " मग पास देणाराही त्याच उपरोधाने उत्तर देत असे "अरे हो. तो गावभराचे उकीरडे खाऊन येत नाही आणि तो रोज संडासला जातो. " लाईनतीत उभे असलेल्यांची मात्र अवस्था केविलवाणी होत असे. एकतर आधीच प्रेशर अडवून धरलेले आणि त्यात असे भयाण विनोद. जोरात हसले चायला इथेच प्रोग्रॅम व्हायचा. पोट धरून हसणे सारखाच बोट लावून हसणे हा वाक्प्रचारची क्वचित वापरल्या जायचा. असो या प्रकाराची बरेच दिवसानी आठवण झाली तुमच्या लेखामुळे.

नन्दादीप's picture

29 Mar 2011 - 11:36 am | नन्दादीप

अय्याई ग्ग्ग्ग्ग.....काय भयानक प्रतिसाद आहे वो.
खपलो हसून हसून......

टारझन's picture

29 Mar 2011 - 12:03 pm | टारझन

गतप्राण !!

-(पास देणारा) पासी
मेक्यानिक्स कोचिंग क्लास

सविता's picture

29 Mar 2011 - 1:43 pm | सविता

फुटले

आवशीचो घोव्'s picture

30 Mar 2011 - 12:29 am | आवशीचो घोव्

ह ह पु वा. भन्नाट प्रतिसाद

मृगनयनी's picture

30 Mar 2011 - 12:21 pm | मृगनयनी

ठ्ठो$$$ठ्ठो$$$ठ्ठो$$$ठ्ठो$$$
ठ्ठो$$$ठ्ठो$$$ठ्ठो$$$ठ्ठो$$$ठ्ठो$$$
ठ्ठो$$$ठ्ठो$$$ठ्ठो$$$ठ्ठो$$$ठ्ठो$$$ठ्ठो$$$

_/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_

पु.प्या.... पाय कुठेत तुझे ? ;)

हाहाहाहा…… वाईट! अगदी वाईट!

पोट धरून हसणे सारखाच बोट लावून हसणे हा वाक्प्रचारची क्वचित वापरल्या जायचा.

हा तर कळस झाला.

रमेश भिडे's picture

7 Jun 2016 - 11:04 am | रमेश भिडे

कळस नाही ओ, त्यालाच 'सरळ' करा.... तांब्या कामाला येईल!

दिपक's picture

29 Mar 2011 - 11:34 am | दिपक

वाक्यन्‌ वाक्य आवडले.. तुफान लेख! चाळीत १५-२० वर्षे काढली आहेत त्यामुळे लेख आपला वाटला. आम्ही बादली बरोबर ६० चा बल्ब पण घेऊन जायचो. ;-)

आतल्या भिंतीवर लिहिलेल्या सुविचाराबद्दल काही लिहिले नाहिस ते?

पाचव्या खोलीत नळ असे, पण वयस्क माणसांना उठताना आधार म्हणूनच त्याचा वापर होई. त्यातून पाणी येताना कुणीही कधीही पाहिले नव्हते.

=)) =))

अभिज्ञ's picture

29 Mar 2011 - 11:51 am | अभिज्ञ

एकदम खुसखुशीत लेख.

पाचवी खोली अन मुख्य म्हणजे आपली "शैली" आवडली.

:)

(बारा वर्षे चाळीत राहीलेला)अभिज्ञ.

प्रमोद्_पुणे's picture

29 Mar 2011 - 11:52 am | प्रमोद्_पुणे

छान लिवलय रे..

विनीत संखे's picture

29 Mar 2011 - 11:55 am | विनीत संखे

खरंच आम्हीही चाळीत रहायचो तेव्हा दोन कुटुंबासाठी एक सार्वजनिक संडास होतं. पावसाळ्यात तुंबायचं आणि झुरळं निघायची...

अशा संडासाविषयी लिहायला माझ्यात अजिबात धमक नाही.... ;-)

आवशीचो घोव्'s picture

30 Mar 2011 - 12:31 am | आवशीचो घोव्

फक्त २? आमच्या चाळीत १० कुटुंबांसाठी १ होतं.

मुलूखावेगळी's picture

29 Mar 2011 - 12:03 pm | मुलूखावेगळी

१ नम्बर
भारी लिहिलय

वपाडाव's picture

29 Mar 2011 - 12:03 pm | वपाडाव

अव्वल...

अवांतर : पण ६x६ म्हंजे जरा जास्तच मोठी नाही का हो झाली ५वी खोली....

आहो तो त्यांच्या स्वप्नातला संडास आहे . चुका काय काढता .. भावना महत्वाच्या :)

बाकी संडासात जर डास असतील तर एक वेगळीच मजा येते . जाणकारांनी प्रकाश टाकावा :)

-एक्स्पोजड्

रामदास's picture

30 Mar 2011 - 10:38 am | रामदास

मडक्यावर चापट्या मारायचे आवाज - तो दरवाजाखालून येणारा विडीचा धूर -माचीस खाली पडल्याचा आवाज -ती पटकन उचलण्यासाठीची धावपळ -तो स्मोकर्स कफ --

ती पटकन उचलण्यासाठीची धावपळ

इतक्याश्या जागेत धावणार कुकडे आणी पळणार कुकडे ?
या सर्व गोष्टी बसुनच कराव्या लागत असतील ना !! ;)

प्यारे१'s picture

29 Mar 2011 - 12:23 pm | प्यारे१

लय 'मोकळं मोकळं' वाटलं वाचून....

प्रकाश घाटपांडे's picture

29 Mar 2011 - 12:27 pm | प्रकाश घाटपांडे

आमच्याकं होल वावर इज अवर नंतर हळु हळू पाचवी खोली उत्क्रांत होत गेली. त्यामुळे डुक्करांचा व आमचा सहवास फार जवळचा.

सुधीर१३७'s picture

29 Mar 2011 - 12:39 pm | सुधीर१३७

.................अन्य खोल्यांविषयी देखील लिहा............. :wink:

...पुलेशु....

प.पु.'s picture

29 Mar 2011 - 12:54 pm | प.पु.

पाचव्या खोलीतल्या "भित्तीचित्रे आणि भित्ती-साहित्य" या विषयावर पण काहीतरी येऊद्या की.................

गणपा's picture

29 Mar 2011 - 2:03 pm | गणपा

=)) काय तो लेख आणि काय ते एकसे एक जुन्या आठवणी जागे केलेले प्रतिसाद.
=)) =)) =)) =)) =))
तुफ्फ्फ्फ्फ्फ्फान रे अ‍ॅड्या. थेट लोकांच्या नाळेला हात खालणारं लेखन असत रे तुझं.
आमची इमारतही चाळवजा असली तरी सुदैवाने पाचवी खोली घरातच होती. पण तुम्हणतोस त्या पाचव्या खोलीचा अनुभव दादरला/ठाण्याला आईच्या आत्येकडे घेतला आहे. :)

जातीवंत भटका's picture

29 Mar 2011 - 2:28 pm | जातीवंत भटका

छान लिहीले आहे. शैली आवडली.

RUPALI POYEKAR's picture

29 Mar 2011 - 3:08 pm | RUPALI POYEKAR

लेख एकदम झकास

गणेशा's picture

29 Mar 2011 - 3:28 pm | गणेशा

अप्रतिम लिहिले आहे ..

इरसाल's picture

29 Mar 2011 - 3:56 pm | इरसाल

एकदम छान....................मस्त लिहीलेय.........................

आवशीचो घोव्'s picture

30 Mar 2011 - 12:35 am | आवशीचो घोव्

होता नाही एहसास-ए-खुशबू जब वो गुजरता है पाससे
मुद्द्तो आती ही खुशबू उसके जाने के बाद.

@इरसाल
वा वा. अतिशय योग्य धाग्यावर शायरी आली आहे. माश्या आल्या.

पाचवी खोली चांगली लिहिली आहेस. वाचताना वाईट वाटत राहिले.

रणजित चितळे's picture

29 Mar 2011 - 4:40 pm | रणजित चितळे

))))))))))))))अनेक लोकांच्या प्राणायामाच्या सवयीची सुरुवात इथूनच झाली. जीव मुठीत धरून 'बसणे' म्हणजे काय ह्याचा शब्दशः अनुभव इथे येत असे. आत जाताना छातीभरून श्वास घ्यायचा आणि तो सोडायला लागायच्या आधी बाहेर यायचं असे अचाट प्रकार इथे बघायला मिळत. मुंबईच्या घाईगडबडीच्या आणि गर्दीने व्यापून राहिलेल्या आयुष्यात काही एकटेपणाचे निवांत क्षण अनुभवण्याची जागाही ही पाचवी खोली असे. चाळकर्‍यांचं बाकी सगळं आयुष्यच सार्वजनीक असल्याने इथेच काय तो एकांत मिळत असे. नको नकोसा वाटला तरी.

हसुन हसून पुरेवाट झाली.

पुलंची आठवण आली

आपले ललित वाचून आजचा दिवस धन्य झाला.

प्राजु's picture

29 Mar 2011 - 8:39 pm | प्राजु

अ‍ॅडी भौ!!! यू रॉक!!

पैसा's picture

29 Mar 2011 - 8:45 pm | पैसा

खरंच पु. लं.ची आठवण करून दिलीस!

प्रीत-मोहर's picture

29 Mar 2011 - 8:46 pm | प्रीत-मोहर

अँडी खपले वारले मेले......त्यावर धन्य पुप्या

दोघांनाही __/\__

शाहरुख's picture

29 Mar 2011 - 8:55 pm | शाहरुख

हाहाहा !!

आमच्याकडे पाचव्या खोलीत दिवा नाही नि कुणी कधी दिवे लावण्याचा प्रयत्नही केल्याचे स्मरत नाही. मग रात्रीच्या वारीला मेणबत्त्या, रॉकेलचे दिवे न्यावे लागत. पुढे मोबाईल आल्यावर ते दिवे कालौघात मागे पडतात का काय अशी शंका येऊ लागली. पण पटवर्धनांच्या बंड्याचा मोबाईल पाताळमार्गी गेल्यापासून (त्यावर "संडासात बसून काय इतका बघत होता मोबाईलवर कोण जाणे.." हे त्याच्या मातोश्रींचे उद्गार अख्ख्या चाळीत खसखस पिकवून गेले!) इतरांनीही त्यापासून धडा घेतला नि पुन्हा पाचव्या खोलीत मेणाचे थर नि रॉकेलच्या दिव्यांची काजळी दिसू लागली!

झकास लेख रे अ‍ॅडीभौ! खुसखुशीत म्हणणार होतो पण उगाच रसभंग व्हायचा! ;)

बंड्याचा मोबाईल पाताळमार्गी गेल्यापासून (त्यावर "संडासात बसून काय इतका बघत होता मोबाईलवर कोण जाणे.." हे त्याच्या मातोश्रींचे उद्गार अख्ख्या चाळीत खसखस पिकवून गेले!)

:) :) :) जबरा.

मेणाचे थर..

अगदी अगदी..
:)

नन्दादीप's picture

31 Mar 2011 - 11:40 am | नन्दादीप

>>>@@पटवर्धनांच्या बंड्याचा मोबाईल पाताळमार्गी गेल्यापासून (त्यावर "संडासात बसून काय इतका बघत होता मोबाईलवर कोण जाणे.." हे त्याच्या मातोश्रींचे उद्गार अख्ख्या चाळीत खसखस पिकवून गेले!) >>

खपलो.......मेलो...
जबरा जोक.....

आनंदयात्री's picture

29 Mar 2011 - 9:13 pm | आनंदयात्री

मस्त रे अ‍ॅड्या. लेख भारी जमलाय.

बाकी आम्ही या खोलीला पाकिस्तान म्हणतो, अगदीच पाकड्यांवर दया आली तर एकांतवास म्हणतो !!

एकांत + वास = एकांतवास

-
(शब्दांच्या फोडी पाडणारा)

आं.द्या. वाळिंबे

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

29 Mar 2011 - 9:48 pm | निनाद मुक्काम प...

भाई काकांची आठवण झाली हा लेख वाचून ,मनाला हळवे करणारे लेखन

लहानपणी सुट्टीत बटाट्याच्या चाळीत यायचो तेव्हा ह्या ५ व्या खोलीत अनेक होतकरू चित्रकार राजा रवी वर्मा ह्यांना लाजवतील अशी अप्रतिम चित्रांची अदाकारी काढत. .( भावनांचा मुक्त अविष्कार ह्या चित्रातून होत असल्याने ती चित्र जिवंत वाटत. लहानपणी येथे दिव्य अनुभूती घेऊन बाहेर आल्यावर माझ्या त्रासलेल्या चेहरा पाहून आजोबा संतापाने म्हणत '' ह्यासाठी तुझा बाप गोऱ्या संडासाच्या मोहाने हक्काची जागा सोडून गेला .
त्यावेळी त्या उद्गारच्या मागे त्यांची कळकळ तेव्हा जाणवायची नाही .
पुढे ह्या बटाट्याच्या चाळीत आम्ही आगमन केले तेव्हा घरात गोरा संडास आला. .आणी ५व्या खोलीशी संबंध आला नाही .
आता ची चाळीतील तरुण पिढी तर सकाळी ऑफिसात जाऊन वातानुकूलीत खोलीत मुक्कामाला असते
.असे कानावर आले .
दंगलीच्या काळात या खोल्यांचा वापर ट्यूब लाईट व इतर सामुग्री साठवण्यासाठी झाला होता .
तस्मात १९४७ नंतर ह्या खोल्यांनी परत असा राडेबाज ,रोमांचक अनुभव घेतला होता .
काही वर्षांपूर्वी ''ही चाळ झोपडपट्टी म्हणून कागदोपत्री दाखवा नी ह्या खोल्या आम्ही चकचकीत नव्या बांधून देतो '' असे कुठल्याशा सरकारी योजने अंतर्गत आमिष दाखवले गेले .
ह्या खोल्यांनी असा गैरमार्गाने होणारा मेक ओवर बाणेदारपणे नाकारला .

आता पुनर्विकासाचे वारे जोरात वाहत आहेत . तेव्हा ह्या खोल्या बहूदा त्यांचे शेवटच्या घटका मोजत आहेत .असे वाटते .
माजी बटाट्याच्या चाळीचा रहिवाशी
मुक्काम पोस्ट...

पिंगू's picture

29 Mar 2011 - 9:47 pm | पिंगू

अ‍ॅड्या एक नंबर लेख. :) :)

- (पाचव्या खोलीतील अनुभवी) पिंगू

आत्मशून्य's picture

30 Mar 2011 - 5:22 am | आत्मशून्य

..._/\_...

लेखनाची "शैली" जबरदस्त !!!! :) :)
हसून हसून मेलो.

खतरनाक,
अशक्य,
पोटफाडू. ;)

(बादवे... "बंड्याची शाळा" लिहिणारे तुम्हीच काय ?)

आदिजोशी's picture

30 Mar 2011 - 10:18 am | आदिजोशी

होय साहेब, मीच तो.

शाम भागवत's picture

7 Jun 2016 - 12:00 pm | शाम भागवत

गुगल असे सांगतय की "बंड्याची शाळा"
www.misalpav.com/node/7802 इथे आहे.
पण इथे जाता येत नाहीय्ये. "access denied" असा संदेश येतोय.

पण इथे जाता येतेय.

आदिजोशी's picture

30 Mar 2011 - 10:16 am | आदिजोशी

सर्वांचे मनापासून आभार _/\_

आभार मानतोयस? अ‍ॅडी लग्नानंतर बराच मवाळ झालाय्......आधी मावळा होता.;)

छोटा डॉन's picture

30 Mar 2011 - 10:17 am | छोटा डॉन

पाचव्या खोलीची लेख झकास रे अ‍ॅड्या.

ह्यानिमित्ताने पाचव्या खोलीतल्या 'चित्रकले'ची राहुन राहुन आठवण येते.
खजुराहोंच्या शिल्पानंतर मानवी शरिराचे जर एवढे रोखठोक चित्रण कुठे आठळत असेल तर ते ह्या पाचव्या खोलीतच.

पाचव्या खोलीचे चाळीच्या सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीने अजुन एक महत्व म्हणजे इथे आढळणारी गॉसिप्स.
कोणाचे कुणाशी जुळले आहे, कोण लै चालु आहे, कोण कुणाला घेतो, कुणाचे काय कशासारखे आहे वगैरे वगैरे बातम्या आणि गॉसिप्सवर इथे अगदी साधकबाधक चर्चा केलेली व त्याची भिंतीवर नोंद करुन ठेवलेली आढळते.

असो, मस्तच लेख !

- छोटा डॉन

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

30 Mar 2011 - 10:40 am | निनाद मुक्काम प...

@पाचव्या खोलीचे चाळीच्या सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीने अजुन एक महत्व म्हणजे इथे आढळणारी गॉसिप्स.
कोणाचे कुणाशी जुळले आहे, कोण लै चालु आहे, कोण कुणाला घेतो, कुणाचे काय कशासारखे आहे वगैरे वगैरे बातम्या आणि गॉसिप्सवर इथे अगदी साधकबाधक चर्चा केलेली व त्याची भिंतीवर नोंद करुन ठेवलेली आढळते.

अगदी अगदी
त्यातून होणारे राडे किंवा शिमग्याला किंवा इतर वेळी जुने स्कोर सेटल करण्यासाठी दिल्या जाणारया हाळी सगळेच जबरा
ह्या सगळ्याचे उगमस्थान हे ह्या खोल्यांमधील ललित लेखन

टुकुल's picture

30 Mar 2011 - 12:05 pm | टुकुल

तुझसम तुच रे :-)

--टुकुल

नंदन's picture

30 Mar 2011 - 12:10 pm | नंदन

कं लिवलंय, कं लिवलंय! (एक नंबर! म्हणणार होतो, पण उगाच पीजे नकोत :))
मेव्या आणि पुपेंचे प्रतिसादही खतरनाक!

स्मिता_१३'s picture

30 Mar 2011 - 8:20 pm | स्मिता_१३

भन्नाट लेख बुवा...

परिकथेतील राजकुमार's picture

31 Mar 2011 - 1:26 pm | परिकथेतील राजकुमार

फर्मास अ‍ॅडीभौ.

बर्‍याच दिवसांनी खळखळुन हास्याचा अनुभव घेता आला :)

स्पंदना's picture

31 Mar 2011 - 3:13 pm | स्पंदना

ख ळ ख ळु न?

प्राजक्ता पवार's picture

31 Mar 2011 - 1:30 pm | प्राजक्ता पवार

मस्त लिहीले आहेस.

विनायक बेलापुरे's picture

31 Mar 2011 - 4:05 pm | विनायक बेलापुरे

हे हे हे हे
खतरनाक लिहिलय

मुक्तसुनीत's picture

31 Mar 2011 - 8:11 pm | मुक्तसुनीत

लेख नॉस्टाल्जिक बनवणारा आहे. शैली अत्यंत खुसखुशीत आहे.

या निमित्ताने सुचलेला एक विचार.

गरीबी आणि श्रीमंती या अर्थातच अत्यंत सब्जेक्टिव्ह गोष्टी आहेत हे निराळे सांगायला नको. मुकेश अंबाणीसारखे लोक सोडले तर बाकीचे कुणापेक्षा तरी गरीब नि कुणापेक्षातरी श्रीमंत असतातच. तर , श्रीमंती आणि गरीबी यांच्यातली सीमारेषाच ठरवायची वेळ आली तर बहुदा "आपल्या मालकीची तिसरी/चौथी/पाचवी खोली असणे किंवा नसणे" अशी ठरवता येईल असं मला वाटतं.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

31 Mar 2011 - 8:30 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेखनाची शैली एकदम झकास आहे. चाळीतल्या पाचव्या खोलीची झकास ओळख.
अजून येऊ दे......!

काही प्रतिसादही भन्नाट आहे. मडक्यावरच्या चापटया....हहपुवा झाली. :)

-दिलीप बिरुटे

मराठे's picture

1 Apr 2011 - 12:36 am | मराठे

--/\--
अफलातून लेखन...
कधीकाळी गिरगावातल्या चाळीत १०-१२ बिर्‍हाडांत मिळून असलेल्या पाचव्या खोलीत घालवलेल्या क्षणांची आठवण झाली.

चित्रा's picture

1 Apr 2011 - 12:49 am | चित्रा

लेख आवडला.

जगातल्या सर्वात बोरिंग जागांपैकी एक जागा म्हणजे बैंक! तेथून एकदम पाचव्या खोलीत येईन असे वाटले पण नव्हते.

सूड यांच्या कृपेने आज हे वाचायला मिळाले.
मस्तच लिहलय.
काही प्रतिसाद तर फारच भन्नाट.

आता मला ही फॉक्कन शब्दामुळे हाच लेख आठवेल.
:))

प्रियाजी's picture

6 Jun 2016 - 10:39 pm | प्रियाजी

हे अनुभव फक्त मुंबईतील चाळीचेच नव्हेत तर पुण्यभूमीतील वाड्यातही नळ, पाणी, कंदील मेण्बत्त्यांसकट हेच सर्व अनुभवलेले आहे. आता त्या आठवणीही नकोश्या वाट्तात.
मात्र लेखन शैली पु.लंची आठवण करून देते याच्याशी सहमत. हा लेख वाचताना त्या आठवणी जाग्या होउन डोळ्यात पाणी तरळले.

अनेक लोकांच्या प्राणायामाच्या सवयीची सुरुवात इथूनच झाली.

हा हा हा!

भारी लेख.

हकु's picture

7 Jun 2016 - 10:02 am | हकु

खत्तरनाक लेख!!

अनेक लोकांच्या प्राणायामाच्या सवयीची सुरुवात इथूनच झाली. जीव मुठीत धरून 'बसणे' म्हणजे काय ह्याचा शब्दशः अनुभव इथे येत असे. आत जाताना छातीभरून श्वास घ्यायचा आणि तो सोडायला लागायच्या आधी बाहेर यायचं असे अचाट प्रकार इथे बघायला मिळत.

हे तर ज्यामच भारी !
मजा आली लेख वाचून.
खरंच पुलंची बटाट्याची चाळ आठवली.

बाळ सप्रे's picture

7 Jun 2016 - 10:34 am | बाळ सप्रे

खतरनाक लेख वर काढल्याबद्दल धन्यवाद !

असा लेख पाचव्या खोलीत चिंतन करतानाच सुचला असावा :-)

बाकी अशाच एका पाचव्या खोलीची लहानपणी खूप भिती वाटायची.. खास करून आत कायम रहिवासी असणार्‍या पालीची.. आणि पाणी न्यायला बादली असे पण त्यात तांब्या नसे त्यामुळे धुवायची पंचाइत.. त्यामुळे लहान मुलांची बाहेर एका भिंतीवर वेगळी पंगत बसायची..

त्यामुळे लहान मुलांची बाहेर एका भिंतीवर वेगळी पंगत बसायची..

अगागा =))

कसलं भारी लिवलय राव.... मज्जा आली वाचताना.

हृषिकेश पांडकर's picture

7 Jun 2016 - 12:22 pm | हृषिकेश पांडकर

लई भारी लिहिलंय !

चिनार's picture

7 Jun 2016 - 1:02 pm | चिनार

भन्नाट लेख !!

अभिजीत अवलिया's picture

9 Jun 2016 - 10:37 am | अभिजीत अवलिया

जमलाय लेख.

अनाहूत's picture

10 Jun 2016 - 8:27 am | अनाहूत

लय भारी

कापूसकोन्ड्या's picture

10 Jun 2016 - 10:10 am | कापूसकोन्ड्या

ह मों च्या एअका एका लिखिणात (संदर्भ आठवत नाही) "नागड्याने अंघोळ" असा एक चैनीचा विषय होता.