हिंदु सणांचे बदलते स्वरुप समाजाला घातक आहे कि चांगले?

वेताळ's picture
वेताळ in काथ्याकूट
25 Mar 2011 - 1:29 pm
गाभा: 

आजकाल हिंदु सण साजरे करण्याचे स्वरुप एकदमच झगमगीत व बाजारु बनत चालले आहे. कित्येकदा ह्यावर ज्या त्या सणावेळी चर्चा इथे मिपावर होतच असते. सण साजरे करण्यापेक्षा त्याला जे चंगळवादाचे नवे रुपडे आले आहे ते मात्र समाजासाठी घातक बनत चालले आहे. होली,गणपती, नवरात्री,रंगपंचमी किंवा दिवाळी हे सण आता घरात साजरे करण्यापेक्षा लोक आजकाल रस्त्यावरच साजरे करण्याला पसंती देत आहे.
आज सकाळ मध्ये आलेली ही बातमी खुपच धक्कादायक आहे
http://72.78.249.107/esakal/20110325/4952628336966183042.htm
हे जर होळी साठीचे चित्र असेल तर आता १० दिवसाचा गणपती व ९ दिवसाची नवरात्र किती खप वाढवेल ह्याची कल्पनाच करवत नाही.सरकारने ह्या रस्त्यावरील सणाना बंदी आणली तर कट्टर धर्माभिमानी लोक लगेच रस्त्यावर उतरुन दंगा करतील.पण सणाच्या आडाला जे काही चालु आहे त्यावर मात्र हे लोक मुग गिळुन गप्प बसतात.

प्रतिक्रिया

नगरीनिरंजन's picture

25 Mar 2011 - 1:42 pm | नगरीनिरंजन

>>आज सकाळ मध्ये आलेली ही बातमी खुपच धक्कादायक आहे
खरंच धक्कादायक आहे. या गोळ्या विकत घ्यायला लोक सणासुदीची वाट पाहतात हे धक्कादायक आहे. नो वंडर, भारताची लोकसंख्या वाढतेय. शिवाय काँडोम्स वापरायचे नाहीत ही भारतीय पुरुषी मनोवृत्ती धक्कादायक असण्याबरोबरच चीड आणणारी आहे.
रस्त्यांवरील सणांना बंदी आणून हे कसे बदलेल ते कळले नाही.

रमताराम's picture

25 Mar 2011 - 4:12 pm | रमताराम

रस्त्यांवरील सणांना बंदी आणून हे कसे बदलेल ते कळले नाही.
सहमत. प्रश्न वृत्तीचा असेल तर सणांवर बंदी आणल्याने काय फरक पडणार. खरेतर असे म्हणा की सण हा एक माईलस्टोन मानला गेल्याने त्या सुमारास पाहणी झाल्याने खप वाढलेला लक्षात तरी आला. बातमीमधून या सणाच्या आसपास धडाक्याने विक्री करण्याची योजना आखणार्‍या विक्रेत्यांची - नि पर्यायाने व्यवसायापुढे, पैशापुढे काहीच मोठे नसते ही नव्या जगाच्या यशस्वी होण्याच्या मूलमंत्राची - मानसिकता लक्षात येते.

गर्भनिरोधक साधनांची विक्री 'पर से' ही वाईटच आहे का याबाबत आम्ही भाष्य करू इच्छित नाही (यावर कोणीतरी कौल काढेलच). तसेच सणांच्या वेळेला खास मार्केटिंग करावे का हा ही यक्षप्रश्न आहे. जर हे तुम्ही थांबवू शकत नसाल तर निदान योग्य वळण द्या असे म्हणणारे (जे वेश्याव्यवसायाला उद्योगाचा दर्जा द्या असे प्रतिपादन करतात, जेणेकरून त्या व्यवसायातील स्त्रियांना निदान समाजातील इतर सुविधा उपलब्ध होतील असा यांचा दावा असतो) म्हणतील की हे चांगलेच आहे. अशांच्या मते योग्य मार्गदर्शनाशिवाय अशा साधनांचा वापर होत असेल तर 'निदान' योग्य मार्गदर्शनाबाबत अवेरनेस निर्माण व्हावा, जो सणाचे निमित्त साधून जमलेल्या गर्दीच्या ठिकाणी करणे उलट सोयीस्करच होईल. हा अप्रत्यक्ष फायदाच.
याउलट परंपराप्रेमी मूळ वृत्तीच बदलणे आवश्यक असल्याने हे बदलू शकत नाही हे मान्य करून पुढे जाण्यास नकार देतील. त्यामुळे मुळातच सणांच्या वेळी असल्या अवेरनेस पेक्षा याची काळी बाजू समोर आणून - पुन्हा जमल्या गर्दीचा उपयोग करून - या प्रकारांना आळा घालावा असे म्हणतील. एकेका व्यक्तिपर्यंत पोचण्याऐवजी समुदायासमोर केलेला प्रचार कमी श्रमात अधिक लोकांपर्यंत पोचेल. दोन्ही बाजूंनी असे दिसते की सणांचा वापर योग्य तर्‍हेने करून घेता येईलच.

आणि परंपरावादी सणांच्या विकृतीकरणाला विरोध करत नाहीत हे खरेच आहे. कारण विकृतीकरण करणारे दंडुक्याची भाषा बोलतात नि त्याला विरोध करणारे विचारांची. साहजिकच बळापुढे शेपूट घालून विचारांपुढे आपल्या तथाकथित शौर्याचे प्रदर्शन ते करीत असतात.

वाट का बघायला लागते?त्यामुळे इतर लोकाचा हिंदु सणांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलु शकतो. इतर धर्मियाच्या सणावेळी ह्या गोष्टी बरे आढळत नाहीत.त्या लोकाचा गैरसमज होण्याची शक्यता आहे कि हिंदु सण फक्त संबध वाढवण्यासाठी साजरे केले जातात. बाकी सण सोडुन इतर दिवशी ह्या गोळ्या जरी बुध्दीवर्धक म्हणुन जरी खाल्या तरी मला त्याचे काही वावडे नाही.

टारझन's picture

27 Mar 2011 - 12:47 pm | टारझन

अच्छा , म्हणजे सणासुदीला ब्रम्हचर्य पालनाचा फतवा काढल्या गेला पाहिजे अशी तुमची मागणी आहे काय ? ;)

शिल्पा ब's picture

27 Mar 2011 - 12:49 pm | शिल्पा ब

तसं नाही पण उगाच लसलस करुन अजीर्ण करुन घेउ नये असं त्यांना म्हणायचं असावं असं मला वाटतंय.

वेताळ's picture

27 Mar 2011 - 1:04 pm | वेताळ

आपल्या इथे अंधानुकरण केले जाते ते थांबवले पाहिजे.
अजुन ही एक बातमी वाचा.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/7797704.cms
आता काय करावे?

कुंदन's picture

25 Mar 2011 - 3:00 pm | कुंदन

नान्या , पुढच्या होळीला सिप्लाचे शेअर्स घे रे, भरपुर फायदा व्ह्यायची शक्यता आहे.

असो , तरुण-तरुणींचा कार्यभाग (भोग? ) साध्य होतो , मेडिकलवाल्याला औषधविक्रीचे कमिशन मिळते, औषध कंपन्यांचा ( अन पर्यायाने गुंतवणुकदारांचा ) नफा वाढतो , तर काय बिघडले?
बाकी शेण खाणार्‍याना खाउ द्या की , आपण कोण अडवणार?

मृत्युन्जय's picture

25 Mar 2011 - 3:05 pm | मृत्युन्जय

नान्या , पुढच्या होळीला सिप्लाचे शेअर्स घे रे,

नवीन माहिती बद्दल धन्यवाद. भरुन पावलो ;)

चिरोटा's picture

25 Mar 2011 - 3:59 pm | चिरोटा

आजकाल हिंदु सण साजरे करण्याचे स्वरुप एकदमच झगमगीत व बाजारु बनत चालले आहे

उत्तर भारतातले हे सण पूर्वीपासूनच झगमगीत आणि बाजारुपणे तिकडे साजरे केले जायचे.गेल्या २० वर्षात महाराष्ट्रातही हे लोण आले. १९८५/८६ च्या आधी गर्बा वगैरे मुंबईत्/राज्यात खेळला गेल्याचे असल्याचे मला तरी आठ्वत नाही् . ह्या झगमगीत्/बाजारुपणाला राजकारणी/मिडियाने खतपाणी घातले आणि मराठी लोकांनीही ह्या हिडिसपणाला मनापासून पाठिंबा दिला.

सरकारने ह्या रस्त्यावरील सणाना बंदी आणली तर कट्टर धर्माभिमानी लोक लगेच रस्त्यावर उतरुन दंगा करतील

सहमत आहे. प्रॉब्लेम सणाचा नसून त्या त्या प्रदेशातल्या संस्कृतीचा आहे.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

26 Mar 2011 - 3:50 am | निनाद मुक्काम प...

चिरोटा साहेब
सहमत आहे .
घाटकोपर व पार्ले ( वेस्ट ) व गिरगाव हे १९८० च्या दशकात गुजरात मय झाले होते .
त्यामुळे दांडिया कल्चर येथे त्या काळात रुजले
बटाट्याच्या चाळीतून मध्यमवर्गीय माणूस ( आमच्या आजोबांच्या भाषेत गोऱ्या संडासाच्या प्रलोभनाला भुलून डोंबिवली ,ते बोरीवली येथे स्थाईक झाला .( आमचे तीर्थरूप ह्याच वर्गात मोडतात )
ह्या चाळींमध्ये त्याच वातावरणात गुजराती लोक राहिली ,व्यवसाय केला .व आपले सण जोपासले .
१९८८ मध्ये तेजाब सिनेमात चंद्रा ह्यांनी तेजाब सिनेमातून एक उत्तम प्रसंग रंगवला आहे .
मराठी नायक मुन्ना उर्फ महेश देशमुख
मुंबईत दांडियाच्या माहोल .ह्या निमित्ताने उत्तर भारतातून खून नावावर असलेला तेथील गुंड व त्यांचे सहकारी मुंबईत दांडियाच्या गर्दीचा फायदा घेऊन चोऱ्या करत असतात .
व मुन्ना त्यांची पिटाई करतो .व त्यांना उत्तर प्रदेशात जाणाऱ्या मालगाडीत बसवून पाठवून देतो .
ह्या प्रसंगाला मुंबईत थेटरात मध्ये आमच्या बटाट्याच्या चाळीतील पोरांनी उस्फुर्त प्रतिसाद दिल्याचे आठवते .

आज खुपते म्हणजे संत्या व क्रांती ने ह्या परप्रांतीय सिनेमावाल्यांची मस्त टर खेचली .

कुंदन's picture

26 Mar 2011 - 3:54 am | कुंदन

ते

जाबघायला हवा.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

26 Mar 2011 - 4:16 am | निनाद मुक्काम प...

अनिवासीमोहिनीला पाहण्यासाठीनक्की पहा . .

टारझन's picture

27 Mar 2011 - 1:06 pm | टारझन

(खरं) .
.आहेमी पहिल्यांदा. च समहमती दर्षवतो माधुरी.
.म्ह
णजेच आपली नसुन अ.
.निवासी आहे कारण ती. ( आता अमेरिकत) स्थायिक,,,?
झाली.
आहे (पण? ) मला एक सांगाजें
.व्हातेजा बरिलि जझाला.??? होता ( तेंव्हा माधु) री अवि
.वाहित होतीम्ह णजेती भारतिय होती त्या.
.मुळे का होईनाआ.!! पण मोहिनीलाभा
रतियम्ह णुनंच चित्रपट पाहिलापाहिजे

.

- कागद मुद्दाम पुस्तो टेबल
शाईला पेन असतं. की पेनाला शाई ? ह्या प्रश्नाच्या उत्तरासाठी जेवढे खोल लिहावे , तेवढे अधिक आपण जर्मन होत जातो.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

27 Mar 2011 - 1:22 pm | निनाद मुक्काम प...

सदर प्रतिसाद हा पूर्वग्रह दुषित असून जाणून बुजून अशुद्ध टंकलेखन करणाऱ्या टारझन ह्यांना

माझा सादर प्रणाम

जगड्या's picture

25 Mar 2011 - 8:23 pm | जगड्या

अगदि बरोबर बोललात !

योगप्रभू's picture

26 Mar 2011 - 2:27 pm | योगप्रभू

माणसांचीच नियत बिघडली आहे तिथे सणांना कुठे दोष द्यावा? सण हे निमित्त आहे. सध्याचे सण हिडीस झाले असतील तर खुशाल बंद करावेत, पण वासनांध माणसे काहीतरी नवीन शोधून काढतातच. व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी भर रस्त्यावर मिठ्या मारण्याचे प्रकार आणि फ्रेशर्स वेलकम पार्टीच्या नावाखाली कॉलेजच्या मुला-मुलींची रेव्ह पार्टी हे कशाचे लक्षण आहे?
त्यातून दूरचित्रवाणीवरुन 'तुम्ही मला सरप्राईज द्या, मी तुम्हाला प्लेझर देते' अशा टाईपच्या संदेशांचा आणि गर्भनिरोधक साधनांच्या जाहिरातींचा मारा सुरु असतो तो बघत बघत एक पिढी मोठी होत आहे. पुरुषांनी अमका डिओडरंट वापरल्यावर स्त्रिया वासनेने बेभान होतात, असे सूचित करणार्‍या जाहिरातींत स्त्रियांचा सरळ सरळ अपमान आहे. तरीही हे सगळे लोक विनातक्रार बघतात. स्त्रीला एक 'कमॉडिटी' किंवा निव्वळ उपभोग्य वस्तू असे लेबल लावले जाताना महिला संघटना तिकडे दुर्लक्ष करतात. एका स्कूटरच्या जाहिरातीत दोन तरुणी आपापसातील स्पर्धेमधून जी कामुक देहबोली दाखवून देतात ते बघता उद्या नूडल्स आणि खाद्यतेलाच्या जाहिराती पण अशाच झाल्या तर नवल वाटायला नको.

बहुधा ' जे जे होईल ते ते पहावे' अशी सगळ्यांची मानसिकता झालेली दिसते.

सगळेच खापर परप्रांतियांवर फोडायला नको. गणपतीच्या मंडपात जुगार खेळणारे आणि वर्गणीच्या पैशातून नको नको त्या गोष्टी करणारे आपलेच लोक असतात. एक बोट दुसर्‍याकडे रोखताना चार बोटे स्वतःकडेही वळलेली असतातच.

राजेश घासकडवी's picture

26 Mar 2011 - 9:04 pm | राजेश घासकडवी

खरंच धक्कादायक आहे. या गोळ्या विकत घ्यायला लोक सणासुदीची वाट पाहतात हे धक्कादायक आहे.

एकंदरीतच लेखामागचा संस्कृतीरक्षक टाईप टोन खटकला. नगरीनिरंजन यांची ही उद्धृत केलेली ओळ त्या भावनेची प्रातिनिधिक वाटते.

नक्की कसला धक्का बसला आहे? तरुण-तरुणी वयानुरुप वागणुक करतात याबद्दल? अहो ते तारुण्यसुलभ वर्तन जुन्या काळपासून चालू आहे.

हे वर्तन रंगपंचमीसारख्या दिवशी वाढते याचा धक्का? आपल्या समाजात या एका दिवशी थोड्या मुक्त वागणुकीला परवानगी आहे. पंधरावीस टक्क्यांनी खप वाढला तर त्यात आश्चर्य का वाटावं? तशी वागणूक आजकालच व्हायला लागली आहे का?का वागणुकीनंतर गर्भधारणा होणं हे आजकालच व्हायला लागलं आहे का? उलट या गोळ्यांमुळे किती नको असलेले जीव जगात यायचे थांबले व पूर्वी ते थांबत नसत याचा विचार व्हावा. सणाचं स्वरूप बदललेलं नाही, त्याच्या परिणामांना आळा घालण्याची नवी शक्ती हातात आलेली आहे इतकंच.

या गोळ्या घ्यायला कोणी 'सणासुदीची' वाट बघतं असं म्हणणंदेखील रोचक वाटलं. घातक वगैरे शब्दसुद्धा जरा जास्तच वाटतात.

आणि मी म्हणतो काय हरकत आहे? शेवटी सणासुदीचे दिवस गोडाधोडाचा सैपाक करून आणि पूजाअर्चा करण्यात घालवायचे नाहीत तर कुठचे? ;)

माझा ह्या गोष्टीला विरोध कधीच नाही.

अशा गोष्टी योग्य का अयोग्य हे दुसर्‍याला विचारणे म्हणजे...जाउ दे सभ्य उपमा सुचत नाहीय !

तुम्हाला जे पाहिजे आणि जे जमतंय ते करा..समाज गेला फुल्या फुल्यात :D

नगरीनिरंजन's picture

28 Mar 2011 - 7:16 am | नगरीनिरंजन

गुर्जी, गैरसमज होतोय. माझा कोणताही संस्कृतीरक्षणाचा आव नसून लोक योग्य ती काळजी आधीच घेत नाहीत आणि सणासुदीला काही झालं की मग आयत्यावेळी धावाधाव करून या घातक गोळ्या डॉक्टरी सल्ल्याशिवाय घेतात यावर आक्षेप आहे. शिवाय मुलं काँडोम्स का वापरत नाहीत अशी चिंताही मी व्यक्त केली आहे. तारूण्यसुलभ भावनांमुळे आणि पुष्कळशा स्वातंत्र्यामुळे शरीरसंबंध होणार हे नैसर्गिकच आहे पण स्वतःच्या आरोग्याविषयीची आणि भविष्याविषयीची बेजबाबदारी धक्कादायक आहे.

आत्मशून्य's picture

26 Mar 2011 - 10:41 pm | आत्मशून्य

इथे शनीवार, रवीवार स्ट्रेस रीलीज व आठवड्याच्या इतर कामांसाठी व्यतीत करावे लागतात ;)... मग आयूष्य आयूष्य म्हणतात ते सहज आणी मनसोक्त जगायचं तरी कधी ? अर्थातच जास्तीची सूटी मीळाली तरच ना ? मग त्या दीवसात लोकांकडे स्वतःसाठी द्यायला वेळ आणी कारण नीर्माण होत असेल तर मग भलेही ते मसणात जाओत त्या दीवशी.. त्यासाठी एव्हडी ओरड टाकायचं कारणच काय ? तसही ऊगाच दोनचार मोठ्या शहराशी सूसंगत लाइफस्टाइलशी संबंधीत असलेल्या गोश्टी अख्या देशाला लागू करणे चूकच नाहीका ?

चिरोटा's picture

27 Mar 2011 - 8:16 am | चिरोटा

ऊगाच दोनचार मोठ्या शहराशी सूसंगत लाइफस्टाइलशी संबंधीत असलेल्या गोश्टी अख्या देशाला लागू करणे चूकच नाहीका ?

+
मुंबई/दिल्लीत जे घडते ते संपूर्ण देशात घडत असते असा मिडियाचा गैरसमज असतो.गणेश उत्सव मी द़क्षिणेत बघितले आहेत.कुठलेही अश्लिल न्रूत्य न करता,मोठ्या आवाजात गाणी न लावता अनेक ठिकाणी तो साजरा केला जातो.

खरं तर गोळ्यांऐवजी कंडोम्सचा खप वाढायला हवा होता. गोळ्यांमुळे एड्सचा धोका टळत नाही.
नवरात्र व गणेशोत्सव यांना तर बाजारू स्वरूप आले आहेच आता होळीही त्यात सामिल. इथे नैतिकतेचा मुद्दा नाही पण स्त्रियांना भोगवस्तु बनवून पुरुषी चंगळवादाला प्रोत्साहन मिळत आहे हे अधिक घातक आहे. परिणाम निस्तरण्याची सगळी जबाबदारी स्त्रियांवर ढकलून वर त्यांना गोळ्यांच्या घातक परिणांमानाही बळी पडायला लागावं हे फारच वाईट आहे.

शिल्पा ब's picture

27 Mar 2011 - 3:41 am | शिल्पा ब

+१

टारझन's picture

27 Mar 2011 - 12:21 pm | टारझन

इथे नैतिकतेचा मुद्दा नाही पण स्त्रियांना भोगवस्तु बनवून पुरुषी चंगळवादाला प्रोत्साहन मिळत आहे हे अधिक घातक आहे.

मुद्दा स्पष्ट करा. फक्त वरिल उदाहरण ग्रुहीत धरल्यास, पुरुष बळजबरीने स्त्रीयांना भोगवस्तु बनवुन त्यांचा भोग घेतात असे म्हणायचे आहे काय ? तसे असल्यास ते हस्यास्पद आहे. आजची स्त्री मुक्त आहे. स्त्रीपुरुष समानते वर विष्वास ठेवणारी आहे. तेंव्हा ह्या भोगाचा कार्यक्रमात ती हिरारीने पुढाकार घेते , तेवढ्याच अपिल ने समोर येते असे चित्र हल्ली दिसते आहे. कृपया बिनबुडाचे विधान करु नये.

परिणाम निस्तरण्याची सगळी जबाबदारी स्त्रियांवर ढकलून वर त्यांना गोळ्यांच्या घातक परिणांमानाही बळी पडायला लागावं हे फारच वाईट आहे.

कोण चोच्या जबाबदारी ढकलतोय ? आणि अशा बेजबाबदार पुरुषांशी स्त्रीयांनी जवळीक करंच कशाला ? जबाबदार पुरुषांना संधी देणे जरुरीचे आहे जेने करुन फक्त स्त्रीयांवर ढकललेली जबाबदारी येणार नाही हे स्त्रीयांना कधी कळणार ?

- बदमाश कंडोम
कदम कदम बढाये जाये , खुशी के गीत गाये जाय.

शिल्पा ब's picture

27 Mar 2011 - 12:28 pm | शिल्पा ब

कपाळावर लिहिलेलं असतं का जबाबदारीने वागणारा आहे का नाही ते? आणि सेक्सच्या बाबतीत "जबाबदार पुरुष" हेच हास्यास्पद आहे.

कपाळावर लिहिलेलं असतं का जबाबदारीने वागणारा आहे का नाही ते?

"त्या" स्त्रीया अशाच कोण्या रोड ने चाललेल्या इसमाबरोबर रत होतात काय ? की ते पुरुष ओळखीचे असतात ? तसं असेल तर कपाळावर लिहीलेलं वाचण्याची गरज पडु णये :) किंबहुना बेनेफिट ऑफ डाउट देऊच नये ना ? :) बळजबरी होत असेल तर "ती" स्त्री - पिडीत आहे असे म्हणन्यास जागा आहे. पण "त्या"स्त्रीया भावनाशुन्य आहेत असे आपणास म्हणायचे आहे काय ? ;)

आणि सेक्सच्या बाबतीत "जबाबदार पुरुष" हेच हास्यास्पद आहे.

ठिक आहे , हसुन घेतो आणि सेक्स च्या बाबतीत "बेजबाबदार स्त्रीया " असे म्हणतो :)

बाकी "जबाबदार पुरुष" हस्यास्पद वाटत असेल तर पुरुषांचा नाद सोडुन बाकी प्पर्याय अंगिकारणे योग्य राहिल काय? असा एक विचार मनाला चाटुन गेला इतकंच :)

- क्रांतीसुर्य टारझन कांबळे
केळकर पुल , आंबेगाव

ज्यांना जमते ते पर्याय शोधतात पण बाकीच्यांनी नाद का सोडावा? त्यापेक्षा जरा जबाबदारीने खबरदारी घेतलेली काय वाईट? ओळखीचा असो नाहीतर नसो काय ते वेळ आल्यावरच समजतं

बाकी सेक्सच्या बाबतीत बेजबाबदार स्त्रीया कशा काय? त्यांनी काय आयत्या वेळी घोळ होउ नये म्हणुन कंडोम्स जवळ बाळगावेत अशी तुमची प्रगल्भ अपेक्षा आहे की का?

तुमच्या मनाला जे काही चाटुन जात असेल ते जगजाहीर कशाला करताय?

टारझन's picture

27 Mar 2011 - 12:53 pm | टारझन

ज्यांना जमते ते पर्याय शोधतात पण बाकीच्यांनी नाद का सोडावा?

नाद का सोडावा ह्याची कारणे आपणंच भरभरुन लिहीली आहेत :)

त्यापेक्षा जरा जबाबदारीने खबरदारी घेतलेली काय वाईट?

जबाबदारीने खबरदारी घेतल्याच गेली पाहिजे. ह्यात वाईट नाहीच काही

ओळखीचा असो नाहीतर नसो काय ते वेळ आल्यावरच समजतं

म्हणुनंच बेनेफिट ऑफ डाऊट देऊ नये असे प्रतिपादन केले होते ते तुम्ही वाचले की नाही माहित नाही.

बाकी सेक्सच्या बाबतीत बेजबाबदार स्त्रीया कशा काय?

जसे "पुरुष जबाबदार " तसेच स्त्रीया :) स्त्रीपुरुष समानता नाकारता काय ?

त्यांनी काय आयत्या वेळी घोळ होउ नये म्हणुन कंडोम्स जवळ बाळगावेत अशी तुमची प्रगल्भ अपेक्षा आहे की का?

मी असे कुठे डायरेक्ट-इन्डायरेक्ट म्हंटल्याचे दाखवुन देणारास १००० कंडोमची पाकीटे घरपोच केल्या जातील. आहो, जर आयत्या वेळी पुरुषाकडे कंडोम्स नसतील तर नकार द्यावा महिलेने, इथे स्त्रीची जबाबदारी नाही का णकार देण्याची ? आणि ह्यावरुन तरी कळावं पुरुष बेजबाबदार आहे ते. की फक्त पुरुषांना बेजबाबदार म्हणुन स्त्रीची जबाबदारी संपणार आहे ?

तुमच्या मनाला जे काही चाटुन जात असेल ते जगजाहीर कशाला करताय?

अभिव्यक्ती स्वातंत्र्य :)

- करताकाम

शिल्पा ब's picture

27 Mar 2011 - 1:11 pm | शिल्पा ब

ती नाद सोडण्याची कारणे कशी काय बॉ? नैसर्गिक उर्मी येतेच आणि म्हणून जबाबदारीने खबरदारी घेतल्याच गेली पाहिजे असं लिहिलंय..तुम्हीपण.

<<जसे "पुरुष जबाबदार " तसेच स्त्रीया Smile स्त्रीपुरुष समानता नाकारता काय ?

कैच्या कैच.

<<<मी असे कुठे डायरेक्ट-इन्डायरेक्ट म्हंटल्याचे दाखवुन देणारास १००० कंडोमची पाकीटे घरपोच केल्या जातील.

मी कुठे म्हंटलं कि तुम्ही असं म्हंटलं म्हणून...मी "ती " तुमची अपेक्षा आहे काय असं विचारलं...नको विचारू का? त्यामुळे ती पाकीटं तुर्तास तुम्हालाच उपयोगी पडतील असं दिसतंय.

तुमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर आहे.

ती नाद सोडण्याची कारणे कशी काय बॉ? नैसर्गिक उर्मी येतेच आणि म्हणून जबाबदारीने खबरदारी घेतल्याच गेली पाहिजे असं लिहिलंय..तुम्हीपण.

हेच म्हणायचंय ... :) नैसर्गिक उर्मी येते ना ? मग लगेच पुरुषांच्या नावाने गळे काढुन "पिडीत म्हैला " बोलायचं काम नाही :)

त्यामुळे ती पाकीटं तुर्तास तुम्हालाच उपयोगी पडतील असं दिसतंय.

वैयक्तीक जाणे हे चिडल्याचे आणि मुद्दे संपल्याचे द्योतक आहे. उगाच उपप्रतिसाद म्हणुन तुम्हाला मी गोळ्या वापरा असा सल्ला देउ शकतो , पण दिलाय का ? ;)

शिल्पा ब's picture

27 Mar 2011 - 1:25 pm | शिल्पा ब

इतके लगेच कसे काय चिडता बॉ तुम्ही? पिडीत म्हैला असं कोण चोच्या म्हणतोय? जबाबदारीने राहावं हा मुद्दा आहे.
पाकिटांची गोष्ट तुम्हीच काढली आणि कारणाने ती इतरांना दिले जाणे होणार नाही म्हणून वाया जाऊ नयेत म्हणून एक फुकट सल्ला दिला आपलेपणाने!! हां..आता भारतात गोळ्या घेण्याचं प्रमाण त्यामुळेच वाढतंय आणि लोक धागे काढू राहिले त्यात आमचा काय दोष?

मुद्दे / मुद्दा कुठे संपला हो? जिथल्या तिथेच आहे अजून ;)

तुम्हीच आपले गळे काढू नका, बोलायचं काम नाही वगैरे वगैरे भाषा वापरताय...मी काही उल्लेख तरी करतेय का त्याचा? :)

पिडीत म्हैला असं कोण चोच्या म्हणतोय?

ह्या कदम नावाच्या चोच्याला तुमचाच +१ आहे . म्हणजे सहमती आहे . म्हणजे त्या चोच्या तुम्ही पण होतात, अ‍ॅज यु सेड

पाकिटांची गोष्ट तुम्हीच काढली आणि कारणाने ती इतरांना दिले जाणे होणार नाही म्हणून वाया जाऊ नयेत म्हणून एक फुकट सल्ला दिला आपलेपणाने!!

आपलेपणाचा सल्ल्याबद्दल खुप खुप धन्यवाद. मी नेहमी पाकीटे जवळ ठेवीन . तुमच्यासाठी .. आय मीन तुमच्या सल्ल्याच्या आदरासाठी :)

हां..आता भारतात गोळ्या घेण्याचं प्रमाण त्यामुळेच वाढतंय आणि लोक धागे काढू राहिले त्यात आमचा काय दोष?

तुमचा दोष नाही. पण तुम्ही स्त्रीया पिडीत आहेत से गळे काढणार्‍यांना डोळे झाकुन +१ का देताय ? :)

मुद्दे / मुद्दा कुठे संपला हो? जिथल्या तिथेच आहे अजून

भाषा समजुन घ्या : ) विणय सर कुठे आहेत ? :)

तुम्हीच आपले गळे काढू नका, बोलायचं काम नाही वगैरे वगैरे भाषा वापरताय...मी काही उल्लेख तरी करतेय का त्याचा?

छे छे .. तुम्ही तर किती साध्या भोळ्या , सौम्य आणि विवेकी भाषा वापरता. तुम्ही आयडॉल आहात आमच्या. आय वान्ना बी लाईक यु :) भाषा तुमच्यासारखीच व्हावी :)

<<ह्या कदम नावाच्या चोच्याला तुमचाच +१ आहे

हो, गोळ्यांपेक्षा कंडोम वापरणे जास्त योग्य आणि सगळी जबाबदारी स्त्रियांवर ढकलू नये असं लिहिलंय म्हणून +१ आहे तो. तुमच्या सारख्या हुश्शार व्यक्तीला समजेल असं वाटलं होतं पण सगळ्याच अपेक्षा काही पूर्ण होत नाहीत. ज...रा वाचत चला ना भौ!!

<<पण तुम्ही स्त्रीया पिडीत आहेत से गळे काढणार्‍यांना डोळे झाकुन +१ का देताय ? Smile

पिडीत वगैरे शब्द तुम्हीच वापरताय.

<<भाषा समजुन घ्या : )

वा रे वा!!! आम्ही तुमची भाषा समजुन घ्यायची अन तुम्ही मात्र हे काय ते काय करत बसणार, याला दुटप्पीपणा का म्हणु नये? बाकी कोण विणय सर?

<<आय वान्ना बी लाईक यु

अहो साहेब, समर्थ काय म्हणून गेलेत? ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान.

<<भाषा तुमच्यासारखीच व्हावी

अगदी अगदी...हवं तर शिकवणीला या..तुम्ही आमचेच म्हणुन १०% सुट देईन :)

टारझन's picture

27 Mar 2011 - 2:21 pm | टारझन

आजच्या चर्चेमुळे मी एक जबाबदार पुरुष झालो आहे .कोण म्हणतं दर वेळी संस्थळांवर वांझोटी चर्चा होते म्हणुन :) शिल्पा ह्यांचे अभिणंदणा :)

जय जय रघुविर समर्थ

-(जबाबदार पुरुष) ठेवताराम

नन्दादीप's picture

28 Mar 2011 - 3:59 pm | नन्दादीप

तरी सांगत होतो, उगाच हात दाखवून अवलक्षण नको म्हणून...शेवटी एकच सत्य "आपला हात जगन्नाथ.."

llपुण्याचे पेशवेll's picture

28 Mar 2011 - 5:27 pm | llपुण्याचे पेशवेll

सहमत. त्यात कुठलाच धोका नाही. आणि त्यातही होलीसारख्या सणाला पांढर्‍या रंगासारख्या सर्वसमावेशक रंगाची उणीवही जाणवणार नाही.

नन्दादीप's picture

29 Mar 2011 - 11:38 am | नन्दादीप

>>>त्यातही होलीसारख्या सणाला पांढर्‍या रंगासारख्या सर्वसमावेशक रंगाची उणीवही जाणवणार नाही.

अमेरीकन पाय (बिटा वर्जन) नावाच्या चित्रपटाची आठवण झाली....

चंद्रू's picture

30 Mar 2011 - 1:38 am | चंद्रू

जबाबदार पुरूष झाल्याबद्दल टारजणचं अभिणंदण !!! आता कंडोमचा खप लय वाडनार. मी उद्याच १०० कंडोमची सिक्स पॅक घेऊण येतो. टारझणला त्याची लय गरज हाय वाचूण लय बरा वाटला. काय ?
पण कंडोम काय नि गोल्या काय वापरुण केलेली चर्चा वांझौटीच होनार ही लय मोटी गोची आमच्या भोल्या टरजणच्या लक्षात कशी आली नाय ? हा सिक्स पॅक मेंदूचा परिनाम हाय. पण हरकत नाय हलू हलू मेंदूची साइज वाडतेय हे पन काय कमी नाय.

जय हणुमाण !
--समर्थाचा शेवक

वेताळ's picture

27 Mar 2011 - 1:23 pm | वेताळ

अजुन एका जाहिरातील सॅमसन कॉर्बी मोबाईल वापरणार्‍या व्यक्तीला दुकानात गल्ल्यावर काम करणारी पोरगी सुट्टे पैसे नसल्यामुळे चॉकलेट देते. व लाव्हाचा मोबाईल वापरणार्‍या पोराला सुट्टे पैश्याच्या बदल्यात कंडोम पाकिटे देते. हे छचोर समाजाचे निदर्शक आहे.चॉकलेट निदान खाता तरी येतील ,पण अविवाहित पोरगा कंडोम पाकिटे घेवुन काय करणार?

शिल्पा ब's picture

27 Mar 2011 - 1:28 pm | शिल्पा ब

<<<अविवाहित पोरगा कंडोम पाकिटे घेवुन काय करणार?

अहो एक काय ते ठरवा पाहू!! कंडोम वापरायचे नाहीत, गोळ्या घ्यायच्या नाहीत मग "अक्सिडेंत" झाल्यावर पुन्हा तुम्हीच धागे काढायला मोकळे!!

(मुख्यतः अविवाहीतांनीच कंडोम वापरणे गरजेचे आहे असं आपलं माझं मत)

Nile's picture

28 Mar 2011 - 4:20 am | Nile

पण अविवाहित पोरगा कंडोम पाकिटे घेवुन काय करणार?

फुगे बनवुन खेळेल.
तुम्ही ते गाणं ऐकलं नाहीए का? "चार आण्याचे तीन हाले काय गो तुनी केले, अहो मला वाटलं धन्या ते फुग्गंच आहे म्या पोरांना वाटले!"**

काय तिच्यायला काही पण काथ्याकुट करतात अन काहीपण प्रश्न विचारतात राव लोक. त्या जहिरातीत तिने-त्याला-ते का दिले आहे हे तुम्हाला खरेच कळले नसेल तर गोळ्या घेण्याची गरज तुम्हाला आहे...

चाकलेट च्या गोळ्या म्हणतोय मी. ;-)

**योग्य शब्दांचे क्रेडीट मिपावरील एका रसिक माणसास. ;-)

अविनाश कदम's picture

28 Mar 2011 - 2:48 am | अविनाश कदम

.................तर नकार द्यावा महिलेने, इथे स्त्रीची जबाबदारी नाही का णकार देण्याची ?

नकार दिला की बळजबरी होते, बलात्कार होतो वा खून होतो. सगळ्या शहरांमधून सध्या हेच मोठ्या प्रमाणावर घडत आहे. वय वर्षे आठ ते वय वर्ष एकशेआठ स्त्रियांच्या बाबतीत. टारझनच्या जंगलात याहून खूपच चांगली परिस्थिती आहे. तिथे बळजबरी, बलात्कार व खून नसतात.

llपुण्याचे पेशवेll's picture

28 Mar 2011 - 5:35 pm | llपुण्याचे पेशवेll

नकार दिला की बळजबरी होते, बलात्कार होतो वा खून होतो. सगळ्या शहरांमधून सध्या हेच मोठ्या प्रमाणावर घडत आहे.
हे अर्धसत्य आहे.. बलात्कार वगैरे होत असले (व ते ही गुन्हे निंदनीय असले ) तरी दोन्ही बाजूंनी प्रचंड Urge असलेल्या केसेस बहुतांश असतात.

टारझन's picture

28 Mar 2011 - 6:40 pm | टारझन

तरी सहि टाकली होती
कदम कदम बढाये जाये , खुशी के गीत गाये जाय.
बट कदम भाय को समजेल तर ना .. :) त्यांच्या मते नुस्ता पुरुषंच पुढे पुढे करतो .. .. बरंय वैवाहिक जिवनावर धागा नाही , नाही तर हे म्हणतील सगळे नवरे आपल्या बायकांवर बळजबरी करतात ,त्यातुन खुन नाही तर बलात्कार होतात ..
हे म्हणजे उचलली जिभ की फोडला माशाचा डॉळा

अविनाश कदम's picture

30 Mar 2011 - 12:13 am | अविनाश कदम

.
लग्नाच्या नसलेल्या बांयकांवर जर येवढी बळजोरी व बलात्कार होत असतील तर हक्काच्या बायकांबाबत काय ? लग्नाअंतर्गत बळजोरी व बलात्काराची नोद होतच नसते. जर नीटपणे त्यांचाही शोध घेतला तर बलात्काराची संख्या अणखीनच वाढेल. एकूण परिस्थिती फारच गंभीर आहे.

कंडोम कंडोम बढाये जा, खुशीके गीत गाये जा
- मच्छींद्र डोळस

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

27 Mar 2011 - 1:40 pm | निनाद मुक्काम प...

सहमत
काही वर्षापूर्वी
नव वर्षाच्या संध्येला एका अनिवासी भारतीय घोळक्यातील स्त्रियांना उपभोग्य वस्तू असल्याचे समजून रस्त्यावरील लोकांनी त्यांचा विनय भंग केला .
आज आमीर खान ला जाहिराती द्वारे पुरुषांना परदेशी महिलांशी नीट वागा असे सांगण्याची वेळ येते .( आरुषी व जेसिका ला न्याय जेथे उशिरा मिळतो )
व बलात्कार होण्यास आपला देशाचा जगात वरचा क्रमांक असतो .
ह्यातून बरेच काही सिद्ध होते .

टारझन's picture

27 Mar 2011 - 2:13 pm | टारझन

व बलात्कार होण्यास आपला देशाचा जगात वरचा क्रमांक असतो .

ह्या वाक्याचा अर्थ , आपल्या देशाचा सारखा बलात्कार होतो असा होतो . कृपया देशाचा अपमाण खपवुन घेतल्या जाणार नाही ह्याची नोंद घेतल्या जावी.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

27 Mar 2011 - 4:10 pm | निनाद मुक्काम प...

दुर्दैवाने ते सत्य आहे
.व बिहार मध्ये आपल्या पेक्षा कमी केसेस होतात ह्या बातमीचा समाचार घेतांना आबा पाटील ह्यांनी तेथे बर्याच बलात्काराच्या केसेस नोंदवल्याच जात नाही असे सांगितले होते .

राजेश घासकडवी's picture

28 Mar 2011 - 3:56 am | राजेश घासकडवी

शुद्धलेखनात सूट देऊनही टारझन यांच्याशी सहमत.

२००९ मध्ये भारतात नोंदलेल्या बलात्कारांची संख्या आहे २१३९७ http://ncrb.nic.in/CII-2009-NEW/cii-2009/Snapshots-5309.pdf. अगदी दहातल्या एकाचीच नोंद होते असं गृहीत धरलं तर खरोखरच्या बलात्कारांची संख्या होते सुमारे २ लाख. पंचवीसात एका बलात्काराची नोंद होते म्हटलं तर सुमारे ५ लाख. तारुण्यसुलभ वर्तन करू शकणाऱ्या तरुणींची संख्या आहे सुमारे पंधरा ते वीस कोटी. या गोळ्या विकणाऱ्या कंपन्या काय वर्षाला २-५ लाखच्या डेमोग्राफिकला टारगेट करतात काय? ते त्या पंधरा-वीस कोटींवर (वर्षातून सरासरी एकपेक्षा अधिक वेळा वर्तन करण्यावर) अवलंबून असतात. आता तुम्हीच हिशोब करा बलात्कार किती आणि खरंखुरं तारुण्यसुलभ वर्तन किती. हजारेक पटीचा फरक असेल.

आणि हो,
२००९ सालासाठी -
जर्मनी (लोकसंख्या ८.२ कोटी) - ७२९२ बलात्कार.
युएसए (लोकसंख्या ३० कोटी) - ८९००० बलात्कार.
(अमेरिकेतही सगळे बलात्कार नोंदवले जात नाहीत - ३९% केले जातात असा अंदाज आहे. करा हिशोब.)
संदर्भ

थोडा पर्स्पेक्टिव्ह ठेवावा, इतकंच म्हणणं आहे.

अविनाश कदम's picture

30 Mar 2011 - 12:16 am | अविनाश कदम

म्हणजे भारतात दर अर्ध्या मिनिटाला एक बलात्कार होतो

शाहरुख's picture

27 Mar 2011 - 12:29 pm | शाहरुख

नाहीतर काय च्यायला !

पुरुष चंगळवादी आणि स्त्रिया काय अलका कुबल ??

शिल्पा ब's picture

27 Mar 2011 - 12:30 pm | शिल्पा ब

विषयाला फाटे फोडु नका!!

आता फाट्याचाच विषय असेल तर ते तरी काय करणार ? :) फोडा हो फाटे =))

- श्रीयुत कानफाटे

अविनाश कदम's picture

28 Mar 2011 - 2:31 am | अविनाश कदम

“आजची स्त्री मुक्त आहे. स्त्रीपुरुष समानते वर विष्वास ठेवणारी आहे.”
................................................

आज स्त्री संपूर्ण मुक्त झालेली आहे आणि स्त्रिपुरूष समानता निर्माण झालेली आहे हे जर खरं असेल तर माझे सर्व मुद्दे गैरलागू ठरतात हे बरोबर आहे. पण तसं जर नसेल तर दोघांची जबाबदारी सारखी आहे असं म्हणणं मानभावीपणाचं आणि ढोंगी आहे.
पुरुष बळजबरीने स्त्रीयांना भोगवस्तु बनवुन त्यांचा भोग घेतात यात शंकाच नाही. बलात्काराच्या वाढलेल्या घटना हेच दर्शवतात. आणि दरवेळी पुरूषांनी बळजबरीच करवी असं नाही पुरुषसत्ताक वा पुरुषवर्चस्ववादी वातावरणाच्या स्त्रियाही बळी आहेत त्यामुळे त्या बळजबरी न करताही बळी जातात. हे सगळं समजायला ‘टारझन’ मानसिकतेतून बाहेर पडायला हवं तरचं मसल ऐवजी मेंदू नीट आणि संवेदनशीलपणे काम करू लागेल.

स्त्रीयांना उर्मीच नसते असं म्हणताय बाबुजी ? आणि लेखात बलात्कारांचं प्रमाण वाढल्याचं म्हंटलंय की कंडोमच्या खपाचं ? आता बलात्कारी कंडोम घेउन फिरतो असं तुम्ही म्हणाल तर तुमचा मेंदु सिक्स पॅक आहे असे म्हणायला जागा आहे. =))
विषय काय बोलताय काय् ? बी स्पेसिफिक :) येथे जनरल स्त्री-पुरुष बलात्काराबद्दल चर्चा चालली नाहीये :) सणावाराला स्त्री-पुरुषांची जी उर्मी वर् येते ना .. त्यावर् बोलल्या जात आहे. समजुन घ्या .. किमान मसल असलेला का होईना .. मेंदु असलेला बरा असतो नाही ?

- सर्वनाश कंडम

.......मूळ विषयाला फाटे फोडल्यावर फाट्यालाही फाटे फुटणारच. मिपावर तर हे सर्रास घडत असते. मूळ विषय “हिंदू सणांच्या बदलत्या स्वरूपाविषयी”च आहे कंडोमविषयी नाही याचीही आठवण करूया.

- मसललेस ब्रेण.

योगप्रभू's picture

28 Mar 2011 - 1:02 pm | योगप्रभू

<<पुरुष बळजबरीने स्त्रीयांना भोगवस्तु बनवुन त्यांचा भोग घेतात यात शंकाच नाही. बलात्काराच्या वाढलेल्या घटना हेच दर्शवतात. आणि दरवेळी पुरूषांनी बळजबरीच करवी असं नाही पुरुषसत्ताक वा पुरुषवर्चस्ववादी वातावरणाच्या स्त्रियाही बळी आहेत त्यामुळे त्या बळजबरी न करताही बळी जातात.>>

फारच समर्पक बोललात अविनाशजी...

पनवेलजवळ एका निवारा आश्रमात चार गतिमंद बालिकांच्या लैंगिक शोषणाची बातमी नुकतीच वाचनात आली. ज्या बिचार्‍या मुलींचे आपल्या शारीरिक कृतींवरही नियंत्रण नसते त्यांना आपल्या वासनेची शिकार बनवणारे नराधम समाजात आहेत.

प्रत्येकवेळी पुरुषच दोषी असेल असे नाही. परिस्थिती खूप बदलली आहे. दोषी वर्तनाची उदाहरणे दोन्ही बाजूंकडून पाहायला मिळतात. पण एकंदर चित्र किंवा ढोबळमानाने स्थिती पूर्वीइतकीच शोषक आहे, एवढे खरे.

कधी घडला हा प्रकार ? होळी मधे की नवरात्रात ? :) बाकी समाजातल्या गरबा / गणपतीत / होळीत येणार्‍या किती मुली मतिमंद आहेत ?
योगप्रभुंना णम्र विनंती आहे की विषयांतर करु णये. सांगण्याचा मुद्दा हा की सणासुदीला वाढणार्‍या कंडोम खपात पुरुष जितका जबाबदार आहे तितक्यास म्हैला . ही गोष्ट णाकारत असाल तर् त्या मुद्द्यावर बोलावे .
बळेच वरणाचा तडका पुरणपोळीला देऊ नये .

" इतरत्र स्त्री-पुरुष लैंगितेचा तौलणिक अभ्यास " ह्या विषयावर बोलायचे असल्यास तसा नविन धागा काढावा .

- भोगप्रभु

णम्र विनण्तीमागील 'जंगलचा कायदा' समजला. धन्यवाद.
माझी सहमती अविनाश कदम यांच्या मुद्द्याला होती. ती त्यांच्यापर्यंत पोचली तरी पुष्कळ आहे.
बाकी टारझन यांनी बोलत राहावे. आम्ही आपले ऐकण्याचे काम करु.
मिपावर येत जाऊ नका, अशी विनंती केलीत तर तेही ऐकू. :)

ठिक आहे , जाणिवपुर्वक अवांतर पणा करत असाल तर लै भारी .. चालु द्या :) मजा येईल तेवढीच आम्हाला बी :)

मिपावर येत जाऊ नका, अशी विनंती केलीत तर तेही ऐकू

नाही , असं मस्करीतही .
,(,म्हण)
.णार
नाही मी (कसंही असलं ? ?? ?) तरी ही . तुम्ही आमचे आहात तुम्ही. आम्हाला ???
.हवे आहात (आणि) मुख्य म्हण(जे? ) तशी विणंती कर(ण्या)चा हक्क मला नाही मी
.जास्तित (जास्त) निरिक्षण नोंदवु शकेल

वेताळ's picture

27 Mar 2011 - 11:41 am | वेताळ

खरतर पिल्स घेतल्या तर इतर संसर्गजन्य रोग होण्याचे प्रमाण खुप वाढते. त्यामुळे मुक्त लैंगिक संबध ठेवणार्‍यानी इतर कॉन्ट्रासेफ्टीकचा वापर करावा हे देखिल मला ह्या लेखातुन सुचवायचे होते.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

27 Mar 2011 - 4:11 pm | निनाद मुक्काम प...

@खरतर पिल्स घेतल्या तर इतर संसर्गजन्य रोग होण्याचे प्रमाण खुप वाढते. त्यामुळे मुक्त लैंगिक संबध ठेवणार्‍यानी इतर कॉन्ट्रासेफ्टीकचा वापर करावा हे देखिल मला ह्या लेखातुन सुचवायचे होते.
सहमत

आत्मशून्य's picture

28 Mar 2011 - 5:31 am | आत्मशून्य

आम्हाला वाटलं फक्त सणांचे बदलते स्वरुप समाजाला कसे घातक आहे हेच सांगयचे आहे. असो गैरसमज मीटला.

llपुण्याचे पेशवेll's picture

28 Mar 2011 - 6:01 pm | llपुण्याचे पेशवेll

आयला असं आहे होय. मला वाटलं संस्कृतीरक्षण करताय. ते नाही करत आहात ना! मग झालं.

चिरोटा's picture

28 Mar 2011 - 2:12 pm | चिरोटा

आताच एक बातमी वाचली-

मोहालीत गोळ्यांचा,कंडोम्सचा खप झपाट्याने वाढतोय.

(परवा झरदार्‍या/गिल्या आणि मन्या येत आहेत तिकडे म्याच बघायला)

jaydip.kulkarni's picture

28 Mar 2011 - 7:12 pm | jaydip.kulkarni

ह्या गोळ्यान्च्या विक्री वर नियन्त्रण हवे आहे ..............
किती गोळ्या कोणत्या केमिस्ट ला दिल्या ...... त्याने त्या गोळ्या कोणास विकल्या व किती .....कोणत्या डोक्टर च्या सल्ल्याने दिल्या ........ या सगळ्याचे हिशेब दिले गेले पहिजेत ...........

वरील विषयावरील लेख आणि चर्चा वाचली.
१. सणांना दोष देऊन चालणार नाही. ज्यांना कुकर्म करायचे आहे ते दुसरे मार्ग शोधतीलच.
२. प्रश्न असा आहे की हल्ली समाजात बर्याच लोकांना हे करावेसे वाटते. त्यांना सणानिमित्त योग्य ती संधी सापडते.
३. टीव्ही, ईंटरनेट च्या जमान्यात आपण संस्कृतीरक्षण किती करणार ? मुला माणसांना काही झापडें लावता येत नाहीत.
४. आपली संस्कृतीची संकल्पनापण कालानुरुप बदलली पाहिजे नव्हें ती आपोआप बदलत आहे. आजकालची मुले आपला वैवाहीक जोडीदार कुमार्/कुमारी असेलच किंवा असावा असे त्यांना वाटत नाही. नव्हे असला तर तो एक हसण्याचा विषय होतो.
आपल्या जमान्यांत आपण म्हणत असू की लग्नाआधी आमच्या आईनी जरा ईकडे तिकडे पाहु दिलं नाही. जरा उशीर झाला तरी हज्जार प्रश्नं विचारुन भंडावुन सोडायची. आजच्या आया म्हणतील की आमच्या आईनी लग्नाआधी फक्त दोनच वेळा 'ते' करायची परवानगी दिली तेही आधी त्याने टोपी आणलीआहे की नाही याची खात्री करुन. कित्ती अभागी आम्ही ! नाहीतर आजकालच्या तुम्ही पोरी --दर वीकेण्डला एक नवा जोडीदार शोधता!
५. मुली आणी स्त्रीया सुद्धा बदलत आहेत आणि नव नवे अनुभव घेत आहेत. जर अशी गर्भनिरोधके हानिकारक असतील तर त्यांनाही आपोआपच कळेल की.हल्ली मुलींनी कोणता न्यापकिन किंवा प्याड वापरावा हे मैत्रीणी आपसात विचारुनच ठरवतात. कितीही जाहिराती पाहिल्या तरी. तसेच हे पण होईल. आणि विवाहीत किंवा अविवाहीत मुले / मुलिंनी यशस्वीपणे गर्भनिरोधन केले तर त्यात वाईट काय ? आपण त्यांना योग्य सल्ला मिळायची व्यवस्था करायला पाहिजे.
६. आपण आपल्या मुलांना चांगल्या वाईटाची जाण देणे हेच फक्त आपल्या हातात आहे. ते धडपणे करुयात. बाकी त्यांचे तेच जाणे.
कालाय तस्मै नमाहा .....बरोबर आहे की नाही ?

--- हृदय भेदी.