ट्यार्पीचे शिलेदार-एक आधुनिकोत्तर पॅकेज.

Nile's picture
Nile in जनातलं, मनातलं
27 Mar 2011 - 6:23 am

मित्रांनो, आम्ही तुमच्या करता एक आधुनिकोत्तर असे पॅकेज घेउन आलेलो आहोत, पॅकेजचे नाव आहे "ट्यार्पीचे शिलेदार". आम्हाला खात्री आहे हे पॅकेज तुमच्यापैकी सर्वांना उपयोगी पडेल, ते कसे याची झलक आम्ही खाली दिलेलीच आहे. ही फक्त झलकच आहे. संपुर्ण पॅकेज ज्यांना हवं आहे त्यांनी व्यनीने संपर्क करणे. पहिल्या पाच गिर्‍हाईकांना १०% डिस्काउंट दिला जाईल.

हे पॅकेज डेव्हलप करण्यामागे काही स्फुर्तीस्थानं आहेत त्यांच्या विसर पडायला नको. पहिले स्फुर्तीस्थान म्हणजे अर्थातच ३% वाले कुंदनसेट. त्यांनी (हवे तितके) ३%ने देण्याचे कबुल केले नसते तर हे पॅकेज डेव्हलप करणे शक्यच नव्हते. याबदल्यात कुंदनसेटना आम्ही २५% डिस्काउंट देणार आहोत. इतर स्फुर्तीस्थानं म्हणजे जेरीस आलेले संपादक. कंपुबाज, इतरांना कंपुबाज म्हणणारे कंपुबाज, कंपुबाजाच्या नावाने रडणारे इत्यादी. या सर्वांकडुन आम्हाला भरगोस बिझनेसची अपेक्षा आहे. नविन मराठी संस्थळ काढण्यास इच्छुकांकडूनही आम्हाला पुष्कळ बिझनेसची अपेक्षा आहे. या सर्वांना खास सवलत दिली जाईल याची नोंद घ्यावी

महत्त्वाची टीपः ही झलक मिपावरील आयड्यांकरता* असल्यानेच येथील उदाहरणांचा वापर केलेला असला (त्याशिवाय मिपाचा आणि आमच्या पॅकेजचा काही संबंध नाही) तरी आमचे पॅकेज कुठल्याही मराठी संस्थळावर चालु शकते याची नोंद घ्यावी. (कुठले संस्थळ अधिक प्रगल्भ आहे किंवा यांसारख्या इतर संशोधनास पॅकेज हवे असल्यास ५% डिस्काउंट दिला जाईल)

या झलके करता आम्ही मिपावरील सर्वोत्तम ट्यार्पी असलेले अकरा धागे निवडले. (अकरावा धागा सत्यनारायणाच्या पुजेतील सुपारीसारखा वेगळा ठेवल्याने पॅकेजला पुष्कळ गिर्‍हाईक मिळेल असे भविष्य पॅकेजच्या नाडीत दिसल्याने आम्ही तो मात्र वापरला नाही.)

ट्यार्पीचे शिलेदार हे नाव आम्ही संस्थळाचा ट्यार्पी वाढविण्यास महत्त्वाचे योगदान देणार्‍या सदस्यांच्या कार्याच्या सन्मानार्थ दिलेले आहे हे तुमच्या ध्यानात आले असेलच.

पॅकेजचे फायदे:

आमचं पॅकेज वापरुन तुम्ही अश्या "ट्यार्पी-किंग्ज"ना शोधु शकता. पुढे मागे संस्थळ काढावयचे असेल तर ही माहिती अत्यंत महत्वाची आहेच पण याचे इतरही अनेक फायदे आहेत.
उदा. मिपावरील टॉप १० धाग्यांमधील ट्यार्पीचे शिलेदार.

क्ष अक्षावर आयडी***.

२. कोण कुठल्या प्रकारच्या धाग्यांचा ट्यार्पी वाढवतो याकडेही लक्ष देता येईल. हे कळले की शतक ठोकायची इच्छा असणार्‍या लेखकुला कुठल्या प्रकारचा धागा काढावा हे ठरवता येईल. त्याशिवाय त्या प्रकारच्या धाग्यावर कोण प्रतिक्रीया देतो हे कळल्याने गावभर माझ्या धाग्यांवर प्रतिसाद द्या म्हणत बोंबलत फिरावे लागणार नाही, थेट अशा लोकांना व्यनी केले की काम झाले.

उदा. धर्म विषयावरील एका धाग्याचे विश्लेषण आम्ही येथे देत आहोत.

३. जेरीस आलेल्या संपादकांना कुठल्याप्रकारचे धागे त्रासदायक आहे हे कळेलच. त्यामुळे कात्री लावणे सोईस्कर होईल. त्याशिवाय माझा "प्रतिसाद का डिलीटला" अश्या येणार्‍यांना व्यनीला थेट त्या आयडीची कुंडलीच दाखवुन गपगार करता येईल.

४. जुन्या जाणत्या वि. नव्या सदस्यांची ट्यार्पी वाढवण्यात तुलना करता येईल. याचा वापर करुन जुने जाणते कसे महत्त्वाचे आहे असे जुना जाणत्यांना म्हणता येइल. नवे कसे 'हार्मलेस' आहेत हे नव्यांना दाखवता येईल.

उदा. टॉप टेन ट्यार्पीमध्ये जुने वि. नवे.

कोण कीती काथ्या कुटतो याची जंत्री तयार करता येइल. कोण कीती कौलं फोडतो याची सुद्धा यादी करता येईल.

५. कंपुबाजीचे आरोप करणार्‍यांना सांखिकीचे पाठबळ मिळेल. येथे आम्ही "कंपुबाजांनी कंपुबाजांसाठी काढलेल्या" असे बहुसंख्य प्रतिसाद आलेल्या एका धाग्याचे विश्लेषण केले होते, पण आम्हाला कुठल्या ना कुठल्या कंपुत ढकललं जाण्याची आणि पर्यायाने त्या विरुद्ध कंपु कडुन आमच्या बिझनेसला तोटा होण्याची शक्यता असल्याने आम्ही ते विश्लेषण येथे न देण्याचे ठरवले आहे.

६. एखाद्या धाग्याला ट्रॅकर लावुन कुठल्या प्रकारच्या प्रतिसादांना पंख लागतात याची माहिती मिळवता येऊ शकते. अशा माहितीचा उपयोग करुन विवक्षित संपादकास छळण्याचे उपाय सुचवले जाउ शकतील. त्याचा अर्थातच चार्ज वेगळा पडेल.

हे फक्त निवडक फायदे आहेत, संपुर्ण फायद्याची पुस्तिका पॅकेजसोबत मोफत देण्यात येइल. फक्त पुस्तिकेचा चार्ज वेगळा पडेल.

सवलती:
१. पार्श्वभागावर लाथ मारुन हाकलुन दिल्यामुळे नविन संस्थळ काढणार्‍यास रेफर करणार्‍या संपादकास २% कमिशन देण्यात येईल.

२. सतत कंपुबाजीचे आरोप करुन विरोधी कंपुस आमचे पॅकेज घ्यावयास भाग पाडाण्यार्‍याला २% कमिशन दिले जाईल**.

३. पुष्कळ अवांतर करुन संपादकांस जेरीस आणुन पॅकेज घ्यायला भाग पाडण्यार्‍यांस १% कमिशन देण्यात येइल.

याशिवायही परिस्थितीनुसार अनेक सवलती पुरवल्या जातील. पॅकेजचा खप वाढविण्याच्या कुठल्याही प्रयत्नाची नोंद सकारात्मकरीत्या घेतली जाईल.

*इथे आयड्या हा शब्द मुद्दामहुन योजला आहे हे चाणाक्ष लोकांच्या लक्षात आले असेलच.
**ही ऑफर जर्मनीत लागु होत नाही.
*** कुठला आयडी कुणाचा हा प्रश्न पडल्यास अभ्यास वाढविण्याची गरज आहे. त्याचे मार्गदर्शन वेगळ्या चार्ज मध्ये करुन मिळेल.

हे ठिकाणव्युत्पत्तीमौजमजाप्रतिसादमाहितीविरंगुळा

प्रतिक्रिया

प्रीत-मोहर's picture

27 Mar 2011 - 6:43 am | प्रीत-मोहर

निळेसाहेब मला चित्रे दिसत नहीएत !!१ कुछ कीजे

सहज's picture

27 Mar 2011 - 6:51 am | सहज

आजकाल (बहुदा इमेजशॅक संकेतस्थळावरील) बरीच चित्रे दिसत नाही पण त्या ऐवजी खालील 'बेडूक बर्फात' चित्र दिसते.

हा काय प्रकार आहे?

प्रीत-मोहर's picture

27 Mar 2011 - 7:04 am | प्रीत-मोहर

मारलीत का बूच ...अहो आम्हीसुद्धा वरचा प्रतिसाद संपादित करणार होतो !!!

थर्ल्ड वर्ल्ड कंट्रीजमध्ये इमेजशॅक दिसत नाही आहे बहुतेक. ;-)

आता पिकासावरुन अपलोड केली आहे, दिसताहेत का सांगा प्लीज.

प्रीत-मोहर's picture

27 Mar 2011 - 9:18 am | प्रीत-मोहर

दिसले दिसले!!!!!

नगरीनिरंजन's picture

27 Mar 2011 - 6:54 am | नगरीनिरंजन

निळू, तुझ्या विश्लेषणाचं डोमेन अनरजिस्टर्ड आहे अशी एरर दिसतेय रे. उधारीवर धंदा चालू केलास काय?
वेश्लेषण दिसल्यावर हा प्रतिसाद संपादित करून सविस्तर प्रतिसाद दिला जाईल.

राजेश घासकडवी's picture

27 Mar 2011 - 7:05 am | राजेश घासकडवी

वरील पॅकेजसाठी जो विदा देण्यात आलेला आहे त्यावरून हे स्पष्ट दिसतं की तुमच्या पॅकेजमध्ये काही उघड उघड त्रुटी आहेत.

- तुमच्या पहिल्याच ग्राफमध्ये नुसत्या प्रतिसादसंख्येचा अभ्यास दाखवला आहे. पण हे चित्र चुकीचं आहे. काही काही आयडींनी बहुतांशी स्वतःच्याच लेखांवर भरमसाठ प्रतिसाद देऊन आपला नंबर तुमच्या ग्राफमध्ये लावलेला आहे, आणि पर्यायाने त्यांच्या लेखांचा क्रमही पहिल्या अकरात आणलेला आहे. त्यांना ट्यार्पीचे शिलेदार ही सर्वसाधारण पदवी देण्याऐवजी स्वतःच्या ट्यार्पीचे शिल्पकार अशी पदवी मिळावी. त्यांचा तुमच्या गिऱ्हाइकांना काय उपयोग? तेव्हा ज्या लेखांवर स्वतः लेखकाने २०% पेक्षा कमी प्रतिसाद दिलेले आहेत अशाच लेखांचा विचार व्हावा.
- काही प्रतिसादक हे केवळ आपल्या मित्रांच्या धाग्यावर प्रतिसाद देतात व पर्यायाने त्यांचा ट्यार्पी वाढवतात. आता अशांपैकी काहींनी आपलं स्वतःचंच असलं पॅकेज खूप आधी काढल्याचं ऐकिवात आहे. व अशांपैकी काही आयडींनी आपले मुखवटेही टाकले आहेत. तेव्हा तुमच्या या पॅकेजमध्ये तेही विचारात घ्यायला हवं.
- या शिलेदारांत स्वतःचीही वर्णी लावून घेण्याच्या प्रयत्नातला क्षीणपणा जाणवल्यावाचून राहिलं नाही.

शतक ठोकायची इच्छा असणार्‍या लेखकुला .... गावभर मला प्रतिसाद द्या म्हणत बोंबलत फिरावे लागणार नाही...
...जेरीस आलेल्या संपादकांना

- आपलं शतक होत नाही म्हणून जेरीस आलेल्या संपादकांचं काय? (गेल्या काही दिवसात ही संख्या कमी झाली आहे हे मात्र खरं...)

थोडक्यात, तुमच्या आलेखांवरून असं दिसतं की ट्यार्पी वाढवण्यासाठी
- स्वतः अविरतपणे आपल्याच धाग्यांना प्रतिसाद देऊन इंचाइंचाने तो धागा वर न्यावा
- आपण व आपले दोनतीन मित्र यांनी ठरवून प्रतिसाद देत दंगा करत रहायचं. (कंपूबाजी)
- किंवा काहीतरी ठराविक प्रक्षोभक विषय घेऊन धागे टाकावे, कधी ना कधी डब्बल सेंच्युरी होईलच. (वरचे दोन उपाय वापरले तर लवकर होईल)

मग तुम्ही नवीन काय सांगता आहात?

असो. आम्ही सांगितलेल्या सुधारणा तुमच्या पॅकेज व्हर्जन २ मध्ये दिसल्यास आम्ही तुमच्या बिझनेसच्या ५% मागू हे लक्षात ठेवा....

राजेश

Nile's picture

27 Mar 2011 - 8:48 am | Nile

स्पष्ट दिसतं की तुमच्या पॅकेजमध्ये काही उघड उघड त्रुटी आहेत.

हा पॅकेजचा डेमो असल्याने ह्यात फक्त लिमिटेड फीचर्स दाखवलेले आहेत. फुल्ल वर्जन विकत घेतल्यास सदर त्रुटी यात नाहीत हे तुम्हाला कळेलच.

काही काही आयडींनी बहुतांशी स्वतःच्याच लेखांवर भरमसाठ प्रतिसाद देऊन आपला नंबर तुमच्या ग्राफमध्ये लावलेला आहे,

त्या आयडींना वगळुन केलेला अभ्यास फुल वर्जन मध्ये आहे.

त्यांना ट्यार्पीचे शिलेदार ही सर्वसाधारण पदवी देण्याऐवजी स्वतःच्या ट्यार्पीचे शिल्पकार अशी पदवी मिळावी.

सदर आयडींनी पैकी बहुसंख्य आयडींनी इतरांच्याही धाग्यावर ट्यार्पी वाढवण्यात सिंहाचा वाटा उचलेला आहे हे फुल्ल वर्जन विकत घेतल्यास स्पष्ट होईलच. त्याशिवाय कोण कुठल्या प्रकारच्या धाग्याचा ट्यार्पी वाढवतो हेही फुल्ल वर्जन मध्ये कळेल असे लेखात आम्ही सांगितले आहेच.

काही प्रतिसादक हे केवळ आपल्या मित्रांच्या धाग्यावर प्रतिसाद देतात व पर्यायाने त्यांचा ट्यार्पी वाढवतात.

ह्या कंपुबाजाचे संपुर्ण ज्ञान आमचे पॅकेज वापरुन होउ शकते असा आमचा दावा आहेच. म्हणुनच संपादकांने ते वापरुन या कंपुबाजांचा बंदोबस्त करावा असे आमचे आवाहन आहे.

मग तुम्ही नवीन काय सांगता आहात?

तुम्ही म्हणता ती माहिती अनेकांना आहे हे खरे आहेच. तरी सुद्धा शतकी खेळी करण्यात कीती यशस्वी होत आहेत (जिथे दोन दोनदा द्विशतक करणारे आहेत तिथे शतकाचे फार अप्रुपही नाही हे ही खरे)?

त्यामुळे अशी नविन माहीती नक्कीच मिळु शकेल, कोणती ते फुल्ल वर्जन मध्ये देऊच.

त्याशिवाय, आमच्या पॅकेजमुळे मिळणारे शतक ये तुमचेच यश आहे असे यशस्वीरीत्या दाखवता येते. पारंपारीक, दवंडी पिटवुन प्रतिसाद घेण्याच्या, पद्धतीपेक्षा हे खुपच रीस्पेक्टेबल आहे.

त्याशिवाय, शतके गाठणे हा एकच उपयोग झाला, याशिवायही अनेक उपयोग आहेतच, त्यातले काही आम्ही लेखात नोंदवले आहेतच.

शिल्पा ब's picture

27 Mar 2011 - 8:50 am | शिल्पा ब

काय ते एकदाच विचार करुन लिहा...पन्नास वेळा एकच प्रतिसाद काय रीफ्रेश करताय?

अहो ढ काकु, शुद्धलेखनाच्या चुका दुरुस्त करत होतो. तुम्हाला बुचाचे फारच प्रेम ब्वॉ!

शिल्पा ब's picture

27 Mar 2011 - 9:27 am | शिल्पा ब

एवढेच हुश्शार आहात आणि दुसर्‍यांना एवढे फुळकवणी उपदेश पाजायला तय्यार असता तर स्वतः अमलात आणा की...
आधी व्यवस्थित लिहुन मग इथे टाका..

आधी व्यवस्थित लिहुन मग इथे टाका

आम्ही काय तुमच्या सारखे युनिकोदात परावर्तीत करुन आणत नाही, आम्ही इथेच टंकतो म्हंटले.

बरं मग? प्रकाशीत करायच्या आधी आपलाच प्रतिसाद वाचुन पहायची परवानगी आहे बरं का विद्वान!!

काळा पहाड's picture

16 Jul 2015 - 4:03 pm | काळा पहाड

.

शिल्पा ब's picture

27 Mar 2011 - 7:21 am | शिल्पा ब

तुम्ही फार म्हणजे फार्फारच अभ्यासु ब्वॉ!!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

27 Mar 2011 - 8:33 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

सविस्तर चिरफाड करण्यासाठी रूमाल टाकत आहे.
-- (रविवार सकाळी बिज्जी असणारी) अदिती

या प्रतिसादाला प्रतिसाद देणारा आयडी !"£$%^&* चा आहे
-- (कालचा दिवस पुणे-३०मधे घालवलेली) अदिती

प्रीत-मोहर's picture

27 Mar 2011 - 9:29 am | प्रीत-मोहर

घासुगुर्जींशी सहमत ....बाकी ग्राफ बनवायला डेटा मायनिंग चा पीएएसडब्ल्यु मॉडेलर वापरला की काय?

सहज's picture

27 Mar 2011 - 9:34 am | सहज

ग्राफ आवडले. :-) कसे काढलेत म्हणे?

ज्याचे त्याचे 'पहीले प्रेम', ज्याचे त्याचे रणांगण, इ. असल्याने एका संस्थळावरचा अन्य संस्थळावर तितक्याच हिरीरीने शिलेदार बनेलच असे नाही.

कसे काढलेत म्हणे?

कंपनी सिक्रेट, पेटंट, कॉपीराईट वगैरे आहे का नाही काही! ;-)

असल्याने एका संस्थळावरचा अन्य संस्थळावर तितक्याच हिरीरीने शिलेदार बनेलच असे नाही.

म्हणुनच फक्त आयडी न. वापरलेला आहे, तोच आयडी नं. तिकडे कुणा दुसर्‍याचाही असु शकतो. ;-)

शिल्पा ब's picture

27 Mar 2011 - 12:12 pm | शिल्पा ब

जिकडचं तिकडंच ठेवत चला ओ विद्वान!!

पैसा's picture

27 Mar 2011 - 10:29 am | पैसा

सोप्या मराठीत "इथे सुपारी घेतल्या जाईल." एवढाच बोर्ड टाकला तरी पुरे...

कुंदन's picture

27 Mar 2011 - 10:43 am | कुंदन

हॅ हॅ हॅ

इरसाल's picture

27 Mar 2011 - 11:57 am | इरसाल

कोन्चि सुपारी बयो...............................................

नंदन's picture

27 Mar 2011 - 1:32 pm | नंदन

काय अभ्यास! काय अभ्यास!! होजेनदीअल्याडच्या मिभोकाकांनंतर इतक्या बारकाईने आंतरजालीय लेखनाचा अभ्यास इतर कोणी क्वचितच केला असेल ;).

पहिल्या आलेखात उल्लेख केलेले टॉप १० धाग्यांतील आयडी पाहिल्यावर १-२ अपवाद वगळता बाकी सगळे आयडी क्र. ३०० नंतरचे आहेत असं दिसतं. (साधारण ३०० ते ५०० आणि ३००० ते ५००० हे सदस्य फॉर्मात दिसताहेत. शिवाय दुसर्‍या आलेखातील सरासरी आयडी क्रमांक हाही ३६०० च्या आसपास आहे. :)). ह्यातून काय निष्कर्ष काढले जाऊ शकतील, हे वाचणे रोचक ठरावे.

लेखनामागचा अभ्यास व मॅटलॅबीपणा (भयाण पीजेबद्दल क्षमस्व) दिसून येत असला तरी त्यातल्या आधुनिकोत्तर जाणीवांच्या कंगोर्‍यांच्या धांडोळ्यांमागच्या मानसिकतेच्या वेधाचा प्रयत्न तितकासा स्पष्ट झालेला दिसत नाही, असं म्हणण्यास प्रत्यवाय नसावा. त्या दृष्टिकोनातून ह्या लेखाचा पुढचा भाग यावा आणि त्यात निवासी-अनिवासी, पुणेकर-अपुणेकर, भारत-पाकिस्तान, कुंकू-टिकली इ. सनातन वादांचाही संख्यक आणि सम्यक वेध घेण्यात यावा, ही माफक अपेक्षा :)

भवानी तीर्थंकर's picture

27 Mar 2011 - 2:07 pm | भवानी तीर्थंकर

लेखन गंमतीदार आहे हे कळलं. पण हा प्रतिसाद मात्र अभ्यासावा लागेल असा दिसतोय. कारण ते सदस्य क्रमांक पाहून तर मी अचंभित झाले. या प्रतिसादातील आकडेवारीवरचे निष्कर्ष कोणी खरोखर काढणार आहे का? वाचायला आवडेल.

पहिल्या आलेखात उल्लेख केलेले टॉप १० धाग्यांतील आयडी पाहिल्यावर १-२ अपवाद वगळता बाकी सगळे आयडी क्र. ३०० नंतरचे आहेत असं दिसतं. (साधारण ३०० ते ५०० आणि ३००० ते ५००० हे सदस्य फॉर्मात दिसताहेत. शिवाय दुसर्‍या आलेखातील सरासरी आयडी क्रमांक हाही ३६०० च्या आसपास आहे. Smile). ह्यातून काय निष्कर्ष काढले जाऊ शकतील, हे वाचणे रोचक ठरावे.

आमच्या मॉडेलच्या निकालांनुसार असे नसावे असे वाटते. म्हणुनच वरती निवडक ट्यार्पीचे शिलेदारच उल्लेखले आहेत. हे शिलेदारही वेगवेगळ्या गटांत आहेत. शिलेदारांचे डिस्ट्रीब्युशन पाहिल्यास ठळक वेगळे जे दिसताहेत ते शिलेदार.

वर दिलेल्या गटानुसार जर वर्गीकरण केले तर विभागणी अशी होते

यावरुन ठोसपणे काही म्हणता येणार नाही. पण ह्या गटांमध्ये असलेल्या निवडक शिलेदारांमुळेच ट्यार्पीचे गणित जमते. छोटे छोटे खेळाडु घेउन संथगतीने शतक करता येईलही. पण हे शिलेदार जोडीला असतील तरच दणकेबाज शतक होणे शक्य आहे. (आमच्या कंपुबाजी मॉडेलमध्ये सरासरी एका प्रतिसादाला शिलेदार कीती प्रतिसाद खेचतो हे ही कळेल, त्यामुळे शिलेदारांचे योगदान कीती महत्त्वाचे आहे याची कल्पना यावी.)
(३००च्या आधी शिलेदारांच्या अभावाची कारणे देता येतील असे वाटते, तो अभ्यास पुढील भागात ;-) )

इतर आधुनिकोत्तर अभ्यासाचा सल्ला रास्त आहे, धन्यवाद. जसजसे कुंदनसेठ आमच्या अकांऊट मध्ये पैसे जमा करतील तसतसा अभ्यास पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न असेल. त्याशिवाय इतर देणग्यांचेही स्वागतच आहे.

नंदन's picture

27 Mar 2011 - 2:20 pm | नंदन

>>> (३००च्या आधी शिलेदारांच्या अभावाची कारणे देता येतील असे वाटते, तो अभ्यास पुढील भागात )
--- हा हा, तीनशे शिलेदारांना खिंडीत पकडण्याचे प्रयत्न तसे जुनेच :), मात्र ३०० ते ५०० हा सभासदगट (कंपू नव्हे) सर्वात अ‍ॅक्टिव्ह असावा असं नवीन आलेखांवरून दिसतंय.

कुंदन's picture

27 Mar 2011 - 2:29 pm | कुंदन

कोण कुंदनसेठ ?

आहेत एक दुबैचे फायनान्सर.. व्यनीतुन फायनान्स करतात ते.

रमताराम's picture

27 Mar 2011 - 3:14 pm | रमताराम

हे कळल्याने गावभर मला प्रतिसाद द्या म्हणत बोंबलत फिरावे लागणार नाही,
अरे लेका, 'माझ्या लेखाला' प्रतिसाद द्या असे लिही रे.

काय बुवा हल्ली भाषेची ऐशीतैशी नि त्यात इथे शुद्धलेखन फाट्यावर मारलेले. काय होणार या देशाचे, गॉड ओन्ली नोज.

कुंदन's picture

27 Mar 2011 - 3:33 pm | कुंदन

>>गॉड ओन्ली नोज.
आय्ला ...र रा तुला कसे कळले मला माहित आहे ते? ;-)

रमताराम's picture

27 Mar 2011 - 3:53 pm | रमताराम

र रा तुला कसे कळले मला माहित आहे ते?
तुला काही माहित नाहीये. 'गॉड ओन्ली नोज' म्हणजे 'देवाचे नाक कापले जाईल' असल्या भाषिक चुकांमुळे. आले लगेच मला माहित आहे म्हणून. पहिले ते ३% दे बघू निळ्याला, कित्ती अभ्यास करतोय बघा तो.

ओन्ली बिका*-ज ररा आजोबा (अ‍ॅन्ड हीज) नोज, चुक सुधारली आहे.

पहिले ते ३% दे बघू निळ्याला, कित्ती अभ्यास करतोय बघा तो.

३%? अहो ते ३% ने दे असे आहे. नुसत्या ३% ने काय होणार आहे? कोक/पिझ्झा/बर्गर सुद्धा यायचे नाहीत, कॉफी तर सोडाच!!

काय बुवा हल्ली भाषेची ऐशीतैशी नि त्यात इथे शुद्धलेखन फाट्यावर मारलेले. काय होणार या देशाचे, ररा ओन्ली नोज.

*येथे बिकांचा काही संबंध नाही.

रमताराम's picture

28 Mar 2011 - 12:22 am | रमताराम

३%? अहो ते ३% ने दे असे आहे.
तेच रे बाबा. ३% दे काय नि ३% टक्क्याने दे काय, सारखेच. माझं देण्याबद्दलचं ज्ञान कच्चं आहे.
पुढच्या संभाव्य प्रतिसादाला आगाऊ (पन इन्टेन्डेड) उत्तरः
सगळा इतिहास भूगोलात येतो नि माझा भूगोल कच्चा आहे.*

*श्रेयनिर्देशः अण्णा वाघमारे फ्रॉम वासूची सासू.

३% टक्क्याने दे काय, सारखेच.

तुम्ही काय एफसी कॉलेजला गेल्ता का हो! ;-)

गेंडा's picture

27 Mar 2011 - 4:39 pm | गेंडा

पहील्या ग्राफखाली आयडीँचा अभ्यास केल्यावर असे दिसले.

५०२७- सुधीर काळे.
३२४- सदस्य अस्तीत्वात नाही.
११९८- मृत्युन्जय
३८५- पुण्याचे पेशवे
३०८३- नितीन थत्ते
४१४०- Nile
१०९६२- नरेश धाल (सदस्य आठवडे ३७. प्रतीसाद फक्त २०)
३८३- धमाल मुलगा
११५७-टारझन
११४८०-गांधीवादी (सदस्य आठवडे ३४)
८७३- यशोधरा
२१३८- परिकथेतील राजकुमार
८- सहज
३२२- बिपिन कार्यकर्ते
१४९८- रेवती
१०- आजानुकर्ण
२९३- सुनील

३२४- सदस्य अस्तीत्वात नाही यांचा नंबर दोन.
१०९६२- नरेश धाल (सदस्य आठवडे ३७. प्रतीसाद फक्त २०)यांचा नंबर ७

ध.मु., टारझन, प.रा., बि.का इत्यादीँचा नंबर त्या नंतर.

नंदन, aparna akshay, राजेश घासकडवी, ३_१४ विक्षिप्त अदिती, गणपा, गणेशा या अभ्यासपुर्ण प्रतीसाद टाकणा-या जुन्या-जाणत्या तसेच निवेदीता-ताई, ५० फक्त, भवानी तीर्थंकर इत्यादी नवोदीतांचा समावेश नसेल तर ही आकडेवारी आणि ग्राफ ही निव्वळ धुळफेक आहे हे कोणिही शेंबडेपोरसुध्दा सांगेल.

अर्थातच मिपाच्या प्रथेप्रमाणे ह्या लेखाला फाट्यावर मारण्यात येत आहे.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

27 Mar 2011 - 5:16 pm | निनाद मुक्काम प...

गेंडा साहेब
जास्त मनस्ताप करून घेऊ नका
केवळ प्रतिसाद देणारे मिपाकर असा मी उल्लेख केला
म्हणून मारून मुटकून ह्या लेखाचे प्रयोजन केले आहे .
अवांतर - आता इतक्यात कुठे लेखन करून नका
नाहीतर गोत्यात याल ( लेखकाच्या मालकाकडून मला अश्या अर्थाची विनंती केल्या गेली आहे )

केवळ प्रतिसाद देणारे मिपाकर असा मी उल्लेख केला
म्हणून मारून मुटकून ह्या लेखाचे प्रयोजन केले आहे .

प्रतिसाद संपादित

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

28 Mar 2011 - 9:53 am | निनाद मुक्काम प...

तुमच्या ह्या प्रतिसादात काहीच दम नाही
पण आता मी आदिती ताई ह्यांच्या सल्ल्यानुसार सभ्य भाषेत प्रतिसाद देत आहे .

तुमचे ते जगप्रसिध्द वाक्य आठवले
'' मला असला प्रतिसाद आला ,तर कानफाड ..............................................
आणी हो ''मी आता गोत्यात आलो आहे का नाही?
तेही सर्व मिपाकार मंडळींसमोर सांगा बरे
आता पुढे माझ्या लिखाणाला व प्रतिसादाला कुठे नी कसे टार्गेट करायचे ह्याचे प्लानिंग करा .
आम्ही आता सभ्य वागायचे ठरवले आहे (नो वयक्तिक चिखलफेक )

शिल्पा ब's picture

28 Mar 2011 - 10:18 am | शिल्पा ब

कोण अदिती ताई? धन्यवाद.

ग्राफ ही निव्वळ धुळफेक आहे हे कोणिही शेंबडेपोरसुध्दा सांगेल.

त्यांनी सांगितलं काय तुम्ही सांगितलं काय एकच. धन्यवाद.

बाकी शेंबड्या पोरांना ते नाही कळायचं म्हणुन तुम्ही दुर्लक्ष केलं तरी चालेल.

गेंडा's picture

27 Mar 2011 - 11:53 pm | गेंडा

माझ्या प्रतिसादात अभ्यासपुर्ण प्रतीसाद टाकणा-या जुन्या-जाणत्या ग्राफ मधे वगळलेल्या सभासदांची नावे टाकताना बुजुर्ग सभासद श्रा.मो., चोता दोन, पिवळा डांबीस, पाषाणभेद यांची नावे नजरचुकीने राहिली.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

28 Mar 2011 - 12:02 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

माझा सदस्य क्रमांक लेखातल्या सगळ्या प्लॉट्समधे आहे तरी का उगाच त्या गरीब बिचार्‍या निळ्याला बोलता तुम्ही? किती घरं पडली असतील त्याच्या ह्रुदयाला!

गेंडेराव, अभ्यासपुर्ण प्रतिसाद देणारे आणी ट्यार्पी यांचे रिलेशन जाणुन घेण्यासाठी तुम्हाला अभ्यास करायची गरज आहे असे नम्रपणे सुचवतो.

आपण सर्व आयडी उघड केल्याबद्दल धन्स...
मिपाकरांचे कष्ट वाचवण्यात आपला हातभार...
१०९६२ नाही ओ गेंडासाब... तो निळ्यांकडुन चुकुन टंकल्या गेला असावा...
तो १०९५२ असायला हवा होता....(असं मला वाट्टं...)
इथं एवढे मोठे लेख चित्र-विचित्र भाषेत टंकल्या गेलेत तिथे चालुन जाते.
तुम्ही ना जरा शांत व्हा... आल्या आल्या रान करु नका...
आरामात वाचा...
चला निळेंची एक चुक सुधारलीये सध्या !!!!
बघुयात शाबासकी मिळ्त्ये का गुद्दा ...

नाही ते बरोबरच आहे. धागे वाचुन खात्री करुन घेउ शकता. गेंड्यासारखं नुस्तं शिंग उगारुन अंगावर यायचं म्हणल्यावर काय सांगणार. ;-)

माझे नाव ह्या यादीत असल्याचे पाहून खरंच आश्चर्य वाटले. मी सद्ध्या मिपावर फारसे नसतेही आणि पूर्वीही कधी धागे वाढवण्यासाठी प्रतिसाद दिल्याचे आठवत नाही. ह्याउलट काही सदस्यांची नावे येथे हटकून असावयास हवी होती, ती दिसत नाहीत, हे लक्षात घेता, एकूणच लेखाचे प्रयोजन लक्षात आले. असो.

अवांतरः छुप्या संपादकपदाबद्दल अभिनंदन रे निळ्या. :) तू छुपा संपादक नंबर कितवा?

एकूणच लेखाचे प्रयोजन लक्षात आले. असो.

नेहमीप्रमाणे अर्धवट वाचुन केलेला आरोप. "टॉप टेन" प्रतिसाद असलेल्या धाग्यांचा वापर करुन वरील आकडे मिळालेले आहेत. इथे आरोप करायच्या आधी स्वतःचे तिथले प्रतिसाद पाहुन आला असतात तर असे तोंडघशी पडायची वेळ आली नसती.

सर्वांत जास्त प्रतिसाद असलेल्या एकाच धाग्यात तुमचे १२-१३ प्रतिसाद आहेत. इतर प्रतिसादांची खात्री स्वतः करुन घ्यावी अन्यथा आरोप करत रहावेत, धन्यवाद.

नेहमीप्रमाणे अर्धवट वाचुन केलेला आरोप. >> हा आरोप नाही का? असो. मी काय लिहिले आहे ते स्वतःच्याच प्रतिसादाने प्रूव्ह केल्याबद्दल धन्यवाद. चालूदेत.

आत्मशून्य's picture

27 Mar 2011 - 5:06 pm | आत्मशून्य

प्रश्न ०) सपोर्ट आन मेंटेनन्स ची काय गॅरंटी हाय ?

प्रश्न १) पन हे ग्राफ उजर नूसार त्यांच्या प्रोफाइल मधे डीस्प्ले व्हायची सोय होइल काय,मॅच मे़कींगला लय ऊपयोगी पडतालसे वाटालय .....

प्रश्न २) यात दूसर्‍याच्या पाठीवरची बंदूक आपल्या हातात घीऊन बार ऊडवू राय्लेले आय्डी डीस्प्ले करणारे ग्राफ जनरेट होत्याल काय ?

प्रश्न ३) तसबी तूमच्या पॅकेजमंदी फार दम वाटत हूता(हायेच) पन यानावाला सरांनी अपघाताचे गनीत मांडल्यापासून स्टॅटीस्टीक, ग्राफ प्रेडीक्षन काय बी कामाच नाय असं वाटूरायालय, तवा तूम्ही तूमच पॅकेज यानावाला सर्टीफाईड करून द्याल का ? म्हनजे जीवात जीव यील वापरणार्‍यांच्या, आफट्र ऑल इट्स जस्ट इम्पोर्टंट बीजनेस रीक्वायर्मेंट यूनो ?

प्रश्न ४) तसच फेसबूक टाइप प्रायव्हसी सेटींग्स आहेत काय यात ? कारण माझा वीदा कोनीबी माझ्या पूर्वपरवानगी शीवाय पाहणे, अक्केस करणे, वापरणे अथवा व्यावसायीक कारणाला ऊपयोगात आणने हा भारतील माहीती तंत्रज्ञान कायद्यांन्वये शीक्शापात्र गून्हा आहे. तवा या बाबतीत सेटींग इप्लीमेंट करण लय म्हत्वाच... नाय तर धंदाच चऊपट व्हायचा ....खायापीया कूच नही गीलास तोडा बारा आणा.....

प्रश्न ५) हे पॅकेज "आमच 'ट्यार्पीचे शिलेदार' हे आहे हे असं आहे, ज्याना पाहीजे त्यांनी घ्या पटत नसेल तर फेकून द्या" या ढीस्क्लेमर शीवाय ऊपलब्ध आहे काय ?

विजुभाऊ's picture

28 Mar 2011 - 10:58 am | विजुभाऊ

एखाद्या धाग्यावर फक्त प्र॑तिसाद देणारेच विचारात घेतले आहेत. बर्‍याच उत्तम लिखाण करणारांची नावे सोयीस्करपणे गहाळ केलेले आहेत. इंद्रा , रामदास काका , पिडांकाका ,प्राजू , प्रभूमास्तर ,मुक्तसुनीत , विरजणवाले भाऊ ,पाषाणभेद ,गगनविहारी यांची नावेच नाहीत.
केवळ काही सदस्यांवरच चर्चा व्हावी म्हणून किंवा अभ्यास अगदीच कच्चा केल्याने हा धागा म्हणजे एक फुटकळ काहीबाही अशाश्वत गोष्ट झालेली आहे.
निव्वळ सोयीस्कर उदाहरणे देवून आकडेमोड मांडून धूळफेक करण्याच्या या प्रकाराला काय म्हणावे हे कळत नाही.

लेखात काय लिहले आहे ते तुम्हाला कळले तरी का? का नेहमीप्रमाणे अर्धवट ज्ञानावर प्रतिक्रीया? कुणीतरी संस्थळावरच म्हणले होते, विचारांना घाई झाली म्हणुन कागदावर उतरवण्या आधी थोडा विचार करावा.

विजुभाऊ's picture

28 Mar 2011 - 12:16 pm | विजुभाऊ

लेखात काय लिहले आहे ते तुम्हाला कळले तरी का?
तेवढे जरा फोड करून सांगता का आम्हा पामराना. आम्ही काही इतके ( त्या ग्रॅज्वेट गंगुबाई सारखे) हुश्शार नाही आहोत.
जाउ दे ना नकाच सांगु. त्यामुळे काहीही फरक पडत नाही.
आपल्याला जे वाटते ते इतरानाही तसेच वाटावे या इतका हास्यास्पद विचार जगात दुसरा कोणताच नसेल.
अवांतर : एक सूचना कराविशी वाटते. नाईलशेठजी स्वतःच्याच धाग्यावर प्रतिसाद देताना थोडा संयम बाळगावा. वर आपण दिल्यापैकी एक प्रतिसाद अत्यंत हीन भाषेत लिहीला गेला आहे.

सुचनेबद्दल धन्यवाद. वैयक्तिक धुळफेकीचा आरोप करण्या आधी तुम्हीच स्वतःच्या सुचनेबद्दल विचार करायला हवा होता. तुमचा आरोप माझ्या प्रतिसादापेक्षा जास्त हीन आहे.

विजुभाऊ's picture

28 Mar 2011 - 1:17 pm | विजुभाऊ

मी निनाद यांच्या एका प्रतिसादावर दिलेल्या प्रतिसादाबद्दल बोलत होतो.
असो. सांगून समजत नसेल आणि समजूनही न समजल्यासारखे करायचे असेच ठरवले असेल तर चर्चेला काहीच अर्थ रहात नाही.
तुमचे धागे तुम्हाला लखलाभ.
अवांतर : स्वतःच्याच धाग्यावर स्वतःचेच १३ प्रतिसाद ( १/४ पेक्षा जास्त)
नो कॉमेन्ट्स

स्वतःच्याच धाग्यावर स्वतःचेच १३ प्रतिसाद ( १/४ पेक्षा जास्त)

विजुभौ उद्या तुमच्या एखद्या धाग्यावर कुणी शंका काढल्या तर त्याला तुम्ही उत्तर त्याच धाग्यात द्याल की खवत?

सुहास..'s picture

28 Mar 2011 - 2:00 pm | सुहास..

चांगलाच अभ्यास चालु आहे की ;)

छोटा डॉन's picture

28 Mar 2011 - 2:57 pm | छोटा डॉन

लेख, लेखात मांडलेले ठोकताळे आणि निष्कर्ष तसेच त्यावर काही जणांनी केलेले मतप्रदर्शन 'रोचक' आहे असे म्हणतो.
वाचायला मज्जा येत आहे, काही मुद्द्यांवरची 'भांडणे' अजुन जोरदार पेटावीत अशी मागणी करतो.
काही मुद्द्यांवर अजुन सखोल उहापोह व्हावा अशी अपेक्षा आहे.

बाकी उगाच एक वाक्य देतो "Statistics are like bikinis. What they reveal is suggestive, but what they conceal is vital".
हॅ हॅ हॅ.

आकडेवारी फारच गंमतशीर असते, शप्पथ !!!

- छोटा डॉन

टारझन's picture

28 Mar 2011 - 3:04 pm | टारझन

>>> बाकी उगाच एक वाक्य देतो "Statistics are like bikinis. What they reveal is suggestive, but what they conceal is vital".

मस्त रे .. वेल सेड छोटा सिद्धु

- (ससुराल) गेंडा फुल

वरील दोघांचा नं पहिल्या पाचात न आल्याने झालेली जळजळ पोचली. ;-)

(डान्राव तर ३००! चानसच नाय बघा. ;-) )