प्राचीन ग्रंथांचे ऑनलाईन ग्रंथालय: विश्वास भिडे यांचा उपक्रम

यकु's picture
यकु in जनातलं, मनातलं
1 Feb 2011 - 8:06 pm

संपूर्ण ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी, दासबोध, एकनाथी भागवत आणि सार्थ वाल्मिकी रामायण, महाभारताचे जवळपास सर्व खंड, ऋग्वेद, जोनाथन लिव्हींग्स्ट्न्स सीगल आणि असे सुमारे दीडशे ग्रंथ एकाच वेळी, तेही फुकट आपल्याला मिळू शकतात? होय.
सांगली येथील श्री. विश्वास भिडे यांनी स्वत:च्या स्वेच्छानिवृत्तीच्या काळात पुरातन ग्रंथांना डिजीटलाईज्ड करण्याचे काम हाती घेतले आणि सुमारे दीडशे ग्रंथ अंतर्जालावर विनामूल्य उपलब्ध करून दिले आहेत.
म.टा. मध्ये त्यांच्या कार्यावर आलेला हा लेख.
आणि त्यांनी उपलब्ध करून दिलेली विनामूल्य ग्रंथसंपदा इथे.

संस्कृतीधर्मवाङ्मयसमाजअभिनंदनबातमीशिफारसमाध्यमवेधमाहिती

प्रतिक्रिया

विकास's picture

1 Feb 2011 - 8:13 pm | विकास

उत्तम प्रकल्प! येथे माहिती दिल्याबद्दल धन्यवाद!

गणपा's picture

1 Feb 2011 - 8:36 pm | गणपा

असच म्हणतो.
धन्यवाद. :)

डावखुरा's picture

2 Feb 2011 - 12:42 pm | डावखुरा

धन्यु

डावखुरा's picture

2 Feb 2011 - 12:43 pm | डावखुरा

धन्यु

धमाल मुलगा's picture

1 Feb 2011 - 8:18 pm | धमाल मुलगा

धन्यवाद यशवंता....
छान खजिना सापडला की. :)

निवेदिता-ताई's picture

2 Feb 2011 - 9:15 am | निवेदिता-ताई

खरच रे खूप अनमोल खजिना आहे हा..........प्रत्येकाने अवश्य वाचावा.

धन्यवाद .....धन्यवाद....

शुचि's picture

2 Feb 2011 - 8:09 pm | शुचि

धन्यवाद.
गुरुचरित्रातील नृसिंहसरस्वतीष्टक हे आपल्यामुळे मला मिळाले.
आता हा ठेवा.

प्रकाश घाटपांडे's picture

1 Feb 2011 - 9:37 pm | प्रकाश घाटपांडे

एकोहम तथा विश्वास भिडे यांच्या लेखनातुन प्रेरणा घेउन आम्ही ही काही पुस्तके/ लेख तिथे ठेवले आहेत .
इथे पहा

मिहिर's picture

4 Feb 2011 - 2:50 pm | मिहिर

मस्तच!

प्रियाली's picture

1 Feb 2011 - 9:45 pm | प्रियाली

या बातमी साठी धन्यवाद.

अरे हो की! विश्वास भिडे हे नाव ओळखीचे वाटत होते.

विश्वास भिडे म्हणजे मनोगतावरचे विरभि आणि उपक्रमावरचे एकोहम्

वाह! त्यांना आता व्यक्तिगत धन्यवाद द्यायला हवेत.

यशोधरा's picture

1 Feb 2011 - 9:50 pm | यशोधरा

यशवंत, मस्त दुवा, धन्यवाद.
घाटपांडेकाका, धन्यवाद.

प्रशु's picture

1 Feb 2011 - 10:10 pm | प्रशु

खुप खुप धन्यवाद..

कच्ची कैरी's picture

1 Feb 2011 - 10:51 pm | कच्ची कैरी

शतशः धन्यवाद ही माहिती उपलब्ध करुन दिल्याबद्दल!

jaydip.kulkarni's picture

1 Feb 2011 - 11:40 pm | jaydip.kulkarni

अतिशय उत्तम ............

शशिकांत ओक's picture

2 Feb 2011 - 12:06 am | शशिकांत ओक

श्री, विश्वास भिड्यांचा परिचय झाला.
त्यांच्या प्रेरणेने नाडी ग्रंथ वाचायची सोय त्यांनी करून दिली आणि एक स्नेही भेटल्याचा आनंद मिळाला.

धन्यवाद. आपले कार्य आवडले. खूपच मेहनत घेतली आहे :)

सहज's picture

2 Feb 2011 - 5:30 am | सहज

श्री भिडे, श्री घाटपांडे व यशवंता तिघांनाही धन्यवाद!

नंदन's picture

2 Feb 2011 - 5:51 am | नंदन

येथे दुवा दिल्याबद्दल अनेक धन्यवाद!
(दुर्दैवाने अमृतानुभवाच्या निरुपणाचा एकच भाग अपलोड केलेला दिसतोय :(.)

नरेशकुमार's picture

2 Feb 2011 - 6:22 am | नरेशकुमार

छान, खुप वाचता येईल आता.
त्यांची महाभारताची पुस्तके वाचलेली आहेत.
कार्यास शुभेच्छा !

अरुण मनोहर's picture

2 Feb 2011 - 6:23 am | अरुण मनोहर

उत्तम सामाजिक कामगीरी. श्री भिडे ह्यांना शुभेच्छा.

जोशी 'ले''s picture

2 Feb 2011 - 9:53 am | जोशी 'ले'

http://www.new.dli.ernet.in/ या साइट वर तुम्हाला अगदी अठराव्या शतकातील पुस्तके सुध्धा वाचायला मिळतील.

पाषाणभेद's picture

2 Feb 2011 - 10:48 am | पाषाणभेद

भिडे काका, प्रकाशकाका, यशवंताचे अभिनंदन अन त्यांना धन्यवाद.
अवांतरः प्राचिन ग्रंथांची ई आवृत्ती आली हे बरेच झाले. पण आताच्य नविन पुस्तकांच्या बाबतीत (उदा. शशीकांत ओक यांच्या ग्रंथाची किंमत रू. ५० आहे अन तो त्यांनी काहीतरी पैसे मिळावेत यासाठी छापला असावा. कदाचित नाडीग्रंथासाठी ते पैश्यासाठी नाही म्हणतील. पण इतर लेखकांचे तसे नसावे.)
त्यांच्याबाबतीत कॉपीराईट वैगेरे नियम काय सांगतो?
जाणकार मते ऐकायला मिळावीत. मला भिडेकाका, प्रकाशकाका यांच्या कामावर निगेटिव्ह बोलायचे नाही. त्यांचे काम तर फारच महत्वाचे आहे. मला त्यांचा अभिमानच आहे पण कॉपिराईटचे नियम काय असू शकतात? गूगल बुक्स मध्ये असले टाकू शकतो काय? किंवा आहे काय?

इन्द्र्राज पवार's picture

2 Feb 2011 - 11:18 am | इन्द्र्राज पवार

"....पण कॉपिराईटचे नियम काय असू शकतात?...."

~ श्री.भिडे यानी जालावर प्रकाशित केलेले सर्वच साहित्य कॉपीराईट मुक्तच आहेत....(अर्थात श्री.यशवंत एकनाथ यानी त्यांची ओळख करून दिली त्यावेळीही ते काम "डोळ्यां"च्या दृष्टीने किती किचकट आणि वेळखाऊ असू शकते याची मला कल्पना आली होतीच, त्यामुळे त्यातील काही पृष्ठे वाचण्यापूर्वी सर्वप्रथम श्री.भिडे याना त्यांच्या चिकाटीबद्दल मनोमनी नमस्कार केला होताच, तसेच यशवंतरावांचेही आभार मानणे तितकेच गरजेचे आहे.....ते आता इथे मानत आहे.)

कॉपीराईटचा 'भारतीय' कायदा (Chapter V Clause 22) ही बाब स्पष्ट करतो की लेखकाच्या मृत्युनंतर ६० (साठ) वर्षांनी त्याचे/तिचे सर्व साहित्य 'कॉपीराईट' बंधनातून मुक्त होते....उदा.श्री.भिडे यांच्या यादीतील सर्व साहित्य प्रकार. तसेच आधुनिक काळातील उदाहरण जर घ्यायचे ठरले तर वीर सावरकर यांचे सर्व साहित्य सन २०२६ मध्ये "कॉपीराईट" कायद्यातून मुक्त होईल. मात्र असे मुक्त झालेले साहित्य पुनःप्रकाशित करायचे झाल्यास त्यासाठी संबधितांना रजिस्ट्रार, कॉपीराईट बॉडीकडे विहित नमुन्यात पुराव्यासह अर्ज करून प्रथम परवानगी घ्यावी लागते.

इन्द्रा

मालोजीराव's picture

2 Feb 2011 - 11:43 am | मालोजीराव

अमेरिकन कायदा § 107. Limitations on exclusive rights - Fair Use प्रमाणे जर पुस्तकान्चा वापर हा
१) ना नफा तत्वावर
२)शैक्षणिक वापरासाठी
३)वार्तांकनासाठी
४)योग्य ज्ञान प्रसारासाठी
५)संशोधनासाठी होणार असेल तर तो कॉपीराईट कायद्याचा भंग होऊ शकत नाही.
म्हणजेच जर अमेरिकन सर्वर वर आपण वेबसाईट होस्ट केली तर आपण भारतीय कॉपीराईट कायद्याच्या कचाट्यातून मुक्त होऊन, कॉपीराईटअसलेली पुस्तके पण वाचकांना डिजिटल स्वरुपात(अंशत: किंवा संपूर्ण) उपलब्ध करून देऊ शकतो.

मुमुक्षु's picture

2 Feb 2011 - 11:54 am | मुमुक्षु

माहिती बद्दल धन्यवाद

मुमुक्षू

महेश काळे's picture

2 Feb 2011 - 1:06 pm | महेश काळे

फारच छान

परिकथेतील राजकुमार's picture

2 Feb 2011 - 1:09 pm | परिकथेतील राजकुमार

अतिशय सुरेख उपक्रम.

प्रकल्पाशी संबंधित सर्वांचे शतशः धन्यवाद. आणि यशवंतराव तुमचे खास आभार.

अवलिया's picture

2 Feb 2011 - 1:10 pm | अवलिया

फारच छान !!

भिडे, घाटपांडेकाका, धन्यवाद!

येश्वंताचेही येथे दुवा दिल्याबद्दल अनेक धन्यवाद. मस्तच आहे उपक्रम!

निनाद's picture

3 Feb 2011 - 4:47 am | निनाद

सुंदर कार्य, महत्त्वाचे तर आहेच!
हे लिखाण आता युनिकोड मध्येही यावे असे मात्र वाटून गेले.

वारकरि रशियात's picture

4 Feb 2011 - 2:53 pm | वारकरि रशियात

सहमत. श्री. भिडे यांना व त्यांच्या सहका-यांना अनेक धन्यवाद.