मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

स्टेटस चेंज्ड... आशिर्वाद हवेत !!

चिगो · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
मी पारतंत्र्यात आलो... जवळपास ४ वर्षांआधी माझ्या अटकेचा प्रस्ताव (प्रपोजल) मी माझ्या प्रेयसीसमोर मांडला.. त्यावर बराच विचार करुन झाल्यावर तिने मंजूरी दिली. नंतर हा प्रस्ताव हायर कोर्टांमधून पास होत होत फायनली त्याला मंजुरी मिळाली, आणि ०२डिसेंबर २०१० रोजी आम्ही विवाहबद्ध झालो... (ढिसक्लेमर - लग्नाची पत्रिका मिपावर टाकणार होतो, पण स्कॅनर नव्हता आणि फोटोपण स्पष्ट येत नव्हता. नंतर धावपळीत ते राहूनच गेलं. त्यासाठी मनःपुर्वक क्षमस्वः) जीवनातल्या ह्या नव्या प्रवासाला सुरुवात करतांना आपल्या सर्वांच्या शुभाशिर्वादांची आणि शुभेच्छांची सोबत मिळावी, हीच प्रार्थना... Image removed. मी आणि माझी पत्नी (ऐश्वर्या) Image removed. लाजाहोमाचा विधी Image removed. साळ्याने लय जोरात कान पिळला, राव... Image removed. भाऊ आणि यार-दोस्तांसह.. Image removed. फॅमिली ट्री... आशिर्वादाभिलाषी, ऐश्वर्या आणि चिन्मय

वाचन 18020 प्रतिक्रिया 0